Category: ग्रामीण वार्ता

ग्रामीण वार्ता (Gramin Varta) विभागात वाचा news34.in वर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बातम्या आणि घडामोडी. शेतकरी योजना, ग्रामपंचायत राजकारण, स्थानिक विकास प्रकल्प, कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. चंद्रपूर ग्रामीण भागातील समस्या, यशोगाथा आणि सकारात्मक बदलांना आम्ही प्राधान्य देतो. ग्रामीण भागातील विश्वासार्ह माहितीसाठी नियमित भेट द्या.

  • justice for minor girl murder case । 🚨 14 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू! आता न्यायासाठी थेट आयोग उतरले मैदानात

    justice for minor girl murder case

    justice for minor girl murder case : चंद्रपूर, दि. 27 : भद्रावती तालुक्यातील चोरा येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू हा अतिशय दुर्दैवी असून संशयास्पद सुद्धा आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मृतक मुलीच्या आई-वडीलांकडून तसेच संबंधित यंत्रणांकडून घेतली आहे. मृतक मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अतिशय गांभीर्याने या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करावा, असे निर्देश अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲङ धर्मपाल मेश्राम यांनी दिले.

    तृतीयपंथीयांसाठी सर्व समावेशक कार्यक्रम


    विश्रामगृह येथे आयोजित अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पुढे ॲङ मेश्राम म्हणाले, 20 मार्च 2025 रोजी चोरा येथील अश्विनी आसुटकर या अल्पवयीन मुलीची हत्या की आत्महत्या, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आरोपी हा 22 वर्षाचा असून त्या मुलाने तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दुर्दैव म्हणजे याच गावात पोक्सोची दुसरी घटना घडल्याचे सुध्दा निदर्शनास आले आहे. जिल्हा प्रशासनाने अशा घटनांना तात्काळ आळा घालावा. जिल्हा प्रशासन, पोलिस विभागासह सामाजिक न्याय विभाग, महिला व बालकल्याण विभाग या विभागाने सुद्धा अशा घटकांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. pocso act justice for minor victims


    आयोग म्हणून या घटनेत दिरंगाई झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते. ज्या डॉक्टरांच्या टीमने मृतक मुलीचे पोस्टमार्टम केले आहे, त्या डॉक्टरांना सुद्धा तात्काळ प्रभावाने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच वरोराच्या उपविभागीय पोलिस अधिकारी नियोमी साटम यांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन चांगल्या पद्धतीने तपास करावा. मृतक मुलीच्या आई-वडिलांची शंका नऊ जणांवर असून या सर्व नऊ जणांचे फोनचे चाट, सीडीआर, सोशल मीडिया आदींची तपासणी करावी.


    अशा प्रकरणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कडून 3 लक्ष ते 10 लक्ष रुपये मदतीची तरतूद आहे. ही तरतूद संबंधित कुटुंबाला मिळवून देण्यासाठी विभागाने प्रयत्न करावे. जिल्ह्यात एकूण पोक्सोच्या घटना किती, ॲट्रॉसिटीच्या घटना किती, याचा सविस्तर अहवाल तात्काळ सादर करावा. तसेच या संपूर्ण प्रकरणाबद्दल प्रशासनाने 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देशही ॲङ धर्मपाल मेश्राम यांनी दिले. victim family compensation under pocso act

    चोरा येथे मृतक मुलीच्या घरी भेट


    अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲङ धर्मपाल मेश्राम यांनी भद्रावती तालुक्यातील चोरा येथे मृतक मुलीच्या घरी भेट दिली. तसेच आई-वडिलांसोबत व आजी सोबत चर्चा करून संपूर्ण प्रकरण जाणून घेतले.


    यावेळी वरोराचे उपविभागीय पोलिस अधिकारी नियोमी साटम, वरोराचे उपविभागीय अधिकारी अतुल जटाळे, सहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतुरे, तहसीलदार श्री. भांडारकर, पोलिस निरीक्षक श्री. पारधी, आयोगाचे कायदेशीर सल्लागार ॲङ राहुल झामरे आदी उपस्थित होते.

  • fake news about land eviction । 30 वर्षांचे वास्तव धोक्यात? सुधीर मुनगंटीवारांनी दिला दिलासा!

    fake news about land eviction

    fake news about land eviction : चंद्रपूर :  बल्लारपूर येथील रवींद्र नगर, मौलाना आझाद वॉर्ड, पं. दीनदयाल वॉर्ड व डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्डातील नागरिक गेल्या 30-40 वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नावाखाली या भागातील अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याच्या अफवा काहीजण हेतुपुरस्पर पसरवत आहेत. या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही. नागरिकांच्या हिताचे रक्षण ही माझी नैतिक जबाबदारी असून मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले. MLA assurance against eviction

    चंद्रपुरात हवा बायपास नवा – खासदार धानोरकर

     बल्लारपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात वनजमिनीवरील घरांबाबतच्या अफवांवर स्पष्टता मिळवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते.

    बैठकीला भाजपा जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. व्यवहारे, उपविभागीय अधिकारी अजय चरडे, भाजपाचे काशीनाथ सिंह, तहसीलदार रेणुका कोकाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ आदींची उपस्थिती होती.

    अफवा पसरविणे चुकीचे

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नागरिकांनी एक एक पैसा जमा करून घरे उभारली आहेत. एका बाजूला शासन बेघरांना घरे देण्याचे कार्य करीत आहे, तर दुसऱ्या बाजूला काहीजण अफवा पसरवून बल्लारपूर येथील चार वॉर्डांतील रहिवाशांना हटविले जाणार असल्याचे चुकीचे चित्र उभे करत आहेत. अनेक नागरिक नझुल, वेकोली तसेच वनविभागाच्या जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. legal status of houses on forest land

    या नागरिकांना पट्टे देण्यासंदर्भात नियोजन केले जात असून, आतापर्यंत 4,442 प्रॉपर्टीं आयडेंटिफाय करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या काळात येथील नागरिकांना पट्टे देण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. या संदर्भातील मागणी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्रजी यादव यांच्यासमोरही मांडण्यात येईल.

    अफवा पसरवून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे चुकीचे असून, कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे स्पष्ट शब्दांत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित नागरिकांना सांगितले.

  • accidental death due to electric wire | ⚡शेतात लोंबकळत्या तारांचा स्पर्श… १८ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू!

    accidental death due to electric wire

    accidental death due to electric wire : कोरपना – तालुक्यातील सावलहिरा येथील एका शेतशिवारात जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक २५ रोजी सकाळ अकरा वाजता च्या सुमारास घडली.


    आनंद प्रफुल जोगी (१८) रा.सावलहिरा असे मृतकाचे नाव आहे. मंगळवारी झालेल्या वादळामुळे जगदीश धोटे यांच्या मालकीचे असलेल्या शेतात विद्युत खांब पडून विद्युत तारा लोंबकळत होत्या. प्रफुल जोगी यांनी धोटे यांचे शेत ठेके पद्धतीने केले असल्याने त्यांचा मुलगा आनंद हा बुधवारी सकाळी अकरा वाजता टीबन्या साठी गेला होता.

    वर्ष 1975 ची आणीबाणी पुन्हा, चंद्रपुरात प्रदर्शन

    विद्युत प्रवाह सुरू आणि

    विद्युत तारा लोंबकळल्याची कालची घटना असल्याने विद्युत प्रवाह बंद करण्यात आला आहे असे समजून त्याने टीबन्याला सुरुवात केली. परंतु विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्याच्या पायाला विजेचा जोरदार धक्का बसला. यातच तो त्यावर पडून त्याचा जिवंत ताराला चिपकून मृत्यू झाला.

    घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला आहे. शव विच्छेदनसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय कोरपणा येथे पाठवण्यात आला.


    सदर घटनेचा तपास पोलिस करीत आहे. प्रफुल जोगी यांना आनंद हा एकुलता एक मुलगा असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  • male tiger found dead in forest area । १५ वर्षांचा वाघ जंगलात मृत! चंद्रपूर हादरलं… नेमकं काय घडलं?

    male tiger found dead in forest area

    male tiger found dead in forest area : चंद्रपूर – 15 ते 16 वर्षाच्या एका नर जातीच्या वाघाचा मृतदेह आज मंगळवारी (24 जून) ला दुपारी साडेबाराचे सुमारास सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील सरांडी गावालगतच्या जंगलात आढळून आला. वनविभागाने मृतदेह ताब्यात घेतला असून चंद्रपूर येथील टीटीसी सेंटरला हलविण्यात आले आहे. त्या ठिकाणी त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यानंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे. एका भल्या मोठ्या वाघाचा अचानक मृत्यू झाल्याने वनविभागामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

    चंद्रपूर शासकीय आयटीआय मध्ये रोजगार मेळावा


    सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपवनक्षेत्रातील रत्नापूर बिटात सरांडी गावालगत जंगलात काही नागरिकांना आज मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास वाघाचा मृतदेह कंपार्टमेंट नंबर 45/609 मध्ये दिसून आला. लगेच या बाबतची माहिती नवगाव येथील उपवनक्षेत्र कार्याल्याला देण्यात आली. त्यांचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर त्यांनी सिंदेवाही वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाला माहिती दिली. tiger death investigation forest department

    सिंदेवाही वनपरिक्षेत्राधिकारी अंजली भोरीवार, क्षेत्रसहायक एस.बी उसेंडी, दीड वाजताचे सुमारास घटनास्थळी दाखल झाले. वनाधिकाऱ्यांनी केलेल्या निरीक्षणात घटनास्थळी वाघाचा मृत्यू झालेला होता. 15 ते 16 वयाचा नर जातीचा वाघ आहे. वाघाचे सर्व अवयव शाबुत आहेत. ब्रम्हपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक राकेश शेपट यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी सदर घटनास्थळाची व वाघाच्या मृतदेहाची पहाणी केली.

    वनविभागात खळबळ

    वाघ 15 ते 16 वर्ष वयोगटाचा असल्याने मृत्यूचे नेमके कारण समोर आले नाही. एका मोठ्या वाघाचा मृत्यू झाल्याने वनविभागामध्ये खळबळ उडाली आहे.
    सदर वाघाचा मृतदेह चंद्रपूर येथील टीटीसी सेंटरला पाठविण्यात आला असून त्या ठिकाणी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतरच वाघाच्या मृत्यूचे कारण समोर येणार आहे.

  • village protest for road | आश्वासन फसवं ठरलं? MLA भोंगळे उतरले थेट आंदोलनात

    village protest for road

    village protest for road : राजुरा तालुका (ता. २३ जून) : पालगाव ग्रामस्थ मागील अडीच ते तीन वर्षांपासून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडे रस्त्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करीत आहेत. चिखल आणि खड्ड्यांतून जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदने देऊन तसेच कंपनी प्रशासनाशी चर्चा करूनही रस्ता प्रश्न सुटला नाही. याच पार्श्वभूमीवर ५ मे रोजी ग्रामस्थ आक्रमक होत कंपनीच्या मुख्य कार्यालयात आंदोलन केले होते.

    चंद्रपुरात वाळू माफियांची मुजोरी, वाळूने भरलेला ट्रक तहसीलदार समोर पळविला

    कंपनी प्रशासनाने पाठ फिरविल्याने ग्रामस्थांनी कार्यालयाचा प्रवेशद्वार बंद करून ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनास राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवरावदादा भोंगळे यांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. स्वतः दोन दिवस आंदोलनस्थळी उपस्थित राहून त्यांनी पुढाकार घेतला होता. त्या आंदोलनानंतर कंपनी प्रशासनाने लेखी आश्वासन दिले होते की ३० मेपर्यंत अल्ट्राटेक ते पालगाव रस्त्याचे काम सुरू केले जाईल. villagers protest for road construction

    सिमेंट कंपनी विरोधात गावकऱ्यांमध्ये संताप

    मात्र ३० मे तारीख उलटून गेली तरी प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झाले नाही. कंपनीकडून केवळ टोलवाटोलवीची उत्तरे मिळू लागली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून आजपासून आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या नेतृत्वात नांदा फाटा येथील कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर रस्ता कामासाठी पुन्हा ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली आहे. rural road development issues

    पालगाव हे गाव अल्ट्राटेक कंपनीने दत्तक घेतलेले असून कंपनीची खाणसुद्धा गावालगतच आहे. अशा परिस्थितीतही रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी गावकऱ्यांना आंदोलन करावे लागणे हे दुर्दैव म्हणावे लागेल.

  • Chandrapur flood preparedness training 2025 । 💪 पूर आला तरी घाबरू नका! चंद्रपूरमध्ये नागरिकांना देण्यात येतंय थेट रेस्क्यू ट्रेनिंग

    Chandrapur flood preparedness training 2025

    Chandrapur flood preparedness training 2025 : चंद्रपूर (२१ जुन २०२५ ) – पावसाळ्यात उद्भवणारी पूर परिस्थिती व इतर आपत्ती वेळी नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी, याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच चंद्रपूर तालुका प्रशासनाच्या वतीने लोहारा येथील तलावावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

    चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या ताफ्यात नवे वाहन

    नैसर्गिक आपत्तीमध्ये दक्षता

    या प्रशिक्षणाला अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार यांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी नागरिकांना सीपीआर, नैसर्गिक आपत्तीमध्ये घ्यावयाची दक्षता याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन दलातर्फे प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली.

    सदर प्रशिक्षणाचा लाभ गावातील नागरीक तसेच तालुक्यातील पोलीस पाटील, इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, सरपंच, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, ग्रामसेवक, कृषी सहायक, आशा सेवकिा, आपदा मित्र, आपदा सखी, पट्टीचे पोहणारे नागरिक यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख व त्यांच्या टीमने सहकार्य केले.

  • dead bear cub found । 🐻 मांगली जंगलात मृत अवस्थेत आढळले अस्वलीचे पिल्लू; वनखात्यात खळबळ!

    dead bear cub found

    dead bear cub found : ब्रह्मपुरी वनविभागातील उपक्षेत्र मिंडाळा नियतक्षेत्र मंगळी कक्ष ४८ मध्ये जंगल गस्त दरम्यान १७ जून रोजी अस्वलीचे अंदाजे १ वर्षे वयाचे पिल्लू मृत अवस्थेत आढळले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असता घटनास्थळी अधिकाऱ्यांनी पोहचत माहिती घेतली.

    नोंदणी व मुद्रांक विभागात मोठी पदभरती

    वनरक्षक एलएस गावंडे ह्या जंगल गस्त करीत असताना त्यांना मांगली बनवाही रस्त्यालगत वन्यप्राणी अस्वल नर वय अंदाजे १ वर्षे हे मृत अवस्थेत आढळून आले, त्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली असता घटनास्थळी एआर कन्नमवार हे दाखल झाले.

    अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी मौका स्थळाची पाहणी केली, मृत अस्वलाच्या शवाचे निरीक्षण केले असता पिल्लाच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळूंन आल्या. यावेळी वन वसाहत परिसरात त्या पिल्लाचे शव विच्छेदन करीत दहन करण्यात आले.

    हिंस्त्र प्राण्याचा हल्ला

    सदर अस्वलीचे पिल्लू हे हिंस्त्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होत मृत पावल्याचा अंदाज यावेळी लगावण्यात आला. याबाबत वनगुन्हा नोंदविण्यात आला असून याबाबत उपवनसंरक्षक राकेश सेपट, एमबी गायकवाड सहायक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

  • Sindewahi crime update June 17 2025 । दहशतीचा डाव उधळला! सिंदेवाहीत तलवार घेऊन फिरणारा तरुण अटकेत

    Sindewahi crime update June 17 2025

    Sindewahi crime update June 17 2025 : सिंदेवाही, दि. १७ जून २०२५: सिंदेवाही शहरात दि. १७ जून २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी एका तरुणाला धारदार तलवारीसह अटक केली. शिवराज सुनील उटलवार (वय २४, रा. विद्यानगर कॉलनी, सिंदेवाही) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने अंधाराचा फायदा घेऊन शहरातील पानटपरी जवळ घातपात करून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हातात तलवार घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

    बल्लारपूर शहरात युवकाच्या घरून तलवार जप्त

    आरोपीला अटक

    सिंदेवाही पोलिसांना पहाटे ५:०० ते ५:४५ वाजण्याच्या दरम्यान पेट्रोलिंग करताना ही घटना निदर्शनास आली. आरोपी शिवराज उटलवार याच्याविरुद्ध भादंवि कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा सह कलम १२२ मपोका अन्वये अप क्रमांक २१३/२०२५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, सिंदेवाही पोलीस पुढील तपास करत आहेत.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली स.फौ. चंद्रभान सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

  • theft of dam structure plates । ४ चोर, ३० प्लेट्स, एक बोलेरो! ब्रह्मपुरीच्या बंधाऱ्यातील चोरी प्रकरण उघडकीस

    theft of dam structure plates

    theft of dam structure plates : ब्रह्मपुरी – तालुक्यातील बेलदाटी शेत शिवारात शेतीला पाणी देण्याकरिता पाणी अडवून ठेवण्यासाठी मृद संधारण विभागाने दीड वर्षांपूर्वी बंधारा बांधला होता, मात्र त्या बंधाऱ्याचे ३० लोखंडी प्लेट मे महिन्यात अज्ञात चोरांनी चोरून नेले होते. पोलिसांनी या प्रकरणी ४ आरोपीना अटक करीत चोरी केलेल्या लोखंडी प्लेट जप्त केले.

    बल्लारपुरात लाखोंचे चोर बीटी बियाणे जप्त

    २ मे रोजी प्रकाश रामचंद्र कुथे यांनी बंधाऱ्याचे ४९ मग लोखंडी प्लेट अज्ञाताने चोरून नेले अशी तक्रार दिली होती, ब्रह्मपुरी पोलिसांनी या प्रकरणी ३०३ (२) या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला. सदर गुन्ह्यात गोपनीय माहिती व तांत्रिक कौशल्यपूर्ण तपास करीत आरोपी २५ वर्षीय राकेश विजय वैरकार, २१ वर्षीय छगन विजय गुरनुले, २३ वर्षीय सूरज उद्धव मेश्राम व २२ वर्षीय महेश रवींद्र सहारे यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी लोखंडी प्लेट चोरी प्रकरणात कबुली दिली. Bramhapuri iron theft

    ३० प्लेट जप्त

    आरोपीकडून ३० नग लोखंडी प्लेट किंमत ६० हजार रुपये गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MH 40 -BG 3866 असा एकूण २ लक्ष ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वात सपोनि मनोज खडसे, पोलीस कर्मचारी योगेश शिवणकर, अजय कटाईत, मुकेश गजबे, स्वप्नील पळसपगार, चंदू कुरसंगे व निलेश तुमसरे यांनी केली.

  • wife kills husband over domestic violence । आईनेच केली वडिलांची हत्या! पितृदिनी मुलं झाली पोरकी, सिंदेवाही तालुक्यातील घटना

    wife kills husband over domestic violence

    wife kills husband over domestic violence : सिंदेवाही – एकीकडे प्रेमाच्या लोभापायी लग्न झाल्यावर पतीचा खून केल्याची घटना सध्या देशात चर्चेचा विषय बनला आहे, तर राज्यात कौटुंबिक हिंसाचारातून काही महिला आत्महत्या करतानाचे प्रकरण उघडकीस येत आहे मात्र ग्रामीण भागात पतीचा व कौटुंबिक जाचाला कंटाळुन महिलेने थेट पतीला यमसदनी पाठविल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात घडली आहे. मात्र या घटनेमुळे दोन मुले पोरकी झाली.

    राजुरा शहरात महिलेची हत्या

    मौजा सिंदेवाही तालुक्यातील नवीन जामसाळा येथील पत्नी वैशाली चौधरी ने पती दुर्वास चौधरीचा रुमालाच्या साहाय्याने गळा आवळून खून केल्याची घटना १४ जूनला रात्री घडली, मृतकाची आई सुनंदा चौधरी ने सिंदेवाही पोलिस स्टेशन येथे सुनेविरोधात तक्रार दाखल केली. आरोपी वैशाली चौधरी ला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली.

    नवीन जामसाळा येथे सदर घटना १५ जून ला रविवार सकाळी सहा वाजता उघडकीस आली. कौटुंबिक वादातून हि हत्या झाली अशी माहिती सिंदेवाही पोलिसांनी दिली आहे. domestic violence murder two kids orphaned

    कौटुंबिक वाद विकोपाला

    नवीन जामसाळा येथील चौधरी कुटुंबात नेहमी कौटुंबिक वाद होत होता, मृतक दुर्वास हा दारू पिऊन पत्नीला नेहमी त्रास देत होता, १४ जूनला मृतक दुर्वास व वैशाली या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले, पतीचा होणार सततच्या त्रासाला वैशाली कंटाळून गेली होती, आता त्रास सहन करायचा नाही, असा राग वैशालीच्या मनात घर करून बसला. शनिवारी झालेलं भांडणाचा बदला घेण्यासाठी वैशालीने रात्री पती दुर्वास झोपल्यावर त्याचा रुमालाने गळा आवळत त्याचा खून केला. सकाळी दुर्वास ला आईने हाक मारली मात्र तो काही प्रतिसाद देत नव्हता, आईने बघितले असता दुर्वास हा निपचित पडला होता, याबाबत पोलिसांना माहिती दिली.

    सिंदेवाही पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं दुर्वासच्या पत्नी व आईची चौकशी केली, यावर शनिवारी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले असल्याची माहिती आई सुनंदा चौधरी ने पोलिसांना दिली, पोलिसांनी पत्नी वैशालीची कसून चौकशी केली असता तिने गळा आवळून दुर्वासचा खून केल्याची कबुली दिली. सुनंदा चौधरी यांच्या तक्रारीवरून पोस्टे सिंदेवाही येथे अप.क. २१०/२०२५ कलम १०३(१), ११५ (२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

    सदर गुन्ह्याचा तपास उपविभागिय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विजय राठोड पो. स्टे सिन्देवाही करीत आहे.

    पितृदिनी आईने केली दोन मुले पोरकी

    सकाळी घटनेची माहिती उघडकीस होतास आईने आपल्या वडिलांचा गळा दाबून खून केला असल्याची पोलिसांना कबुली दिली. मृतक दुर्वास चौधरी याला दोन मुले आहेत. एकाचे वय 10 वर्ष, आणि दुसरा 12 वर्षाचा आहेत. या मुलांना वडिलांपासून पितृदीनी आईने पोरके केले आहे.