Category: ग्रामीण वार्ता

ग्रामीण वार्ता (Gramin Varta) विभागात वाचा news34.in वर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बातम्या आणि घडामोडी. शेतकरी योजना, ग्रामपंचायत राजकारण, स्थानिक विकास प्रकल्प, कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. चंद्रपूर ग्रामीण भागातील समस्या, यशोगाथा आणि सकारात्मक बदलांना आम्ही प्राधान्य देतो. ग्रामीण भागातील विश्वासार्ह माहितीसाठी नियमित भेट द्या.

  • Bhadravati APMC chairman no confidence motion । 15 संचालकांची एकजूट – भद्रावती बाजार समितीतून ताजने हटले!

    Bhadravati APMC chairman no confidence motion

    Bhadravati APMC chairman no confidence motion : भद्रावती : स्थानीक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून अविश्वास प्रस्तावाच्या हालचाली सुरु असताना अखेर आज (दि.७ ऑगस्ट) ला पंधरा संचालकांनी एकमताने सभापती भास्कर ताजने यांच्यावर अविश्वास प्रस्ताव पारित केला व ताजने यांना सभापती पदावरून पायउतार केले. आज दिनांक ७ ऑगस्ट ला स्थानिक बाजार समितीच्या सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत सदर प्रक्रिया पार पडली.

    शिक्षणाच्या उजेडावर राजकारणाचा अंधार, अम्मा कि पढाई उपक्रम स्थगित

    १५ मतांनी प्रस्ताव पारित

    कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध गटांचे मिळून एकूण अठरा संचालक आहेत. भास्कर ताजने हे सभापती होते. मात्र संचालकांना विश्वासात न घेणे, नियमबाह्य कामकाज करणे व कारभारात पारदर्शकता नसल्याचे कारण पुढे करीत सर्व संचालकांनी मिळून एकमताने ताजने यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याचे प्रयत्न चालविले होते. व पंधरा मतांनी सदर प्रस्ताव पारित झाला तर दोन सभासद अनुपस्थित होते.

    अविश्वास प्रस्ताव यशस्वी होईल या भीतीने ताजने यांनी आधीच राजीनामा दिला होता, हे विशेष.

    कोणत्याही पक्षात प्रवेश घेण्यासंदर्भात कोणत्याही संचालकांवर अथवा सभापतीवर दबाव नव्हता. किंबहुना हा विषयच कधी कुणामार्फत बोलल्या गेला नाही. भास्कर ताजने यांनी सदर विषयाला घेऊन भाजपात प्रवेश घेण्यास नकार दिल्याने अविश्वास ठराव आणला असल्याचे बोलून स्वतःवरील दोषावर पांघरून घालण्यासाठी बनाव केला आहे. सदर अविश्वास कुणाच्या सांगण्यावरून झाला नसुन सर्व संचालकांच्या एकमताने पारित झाला आहे. यावेळी राजकीय पक्ष, गट आदी न बघता केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उन्नतीकरिता हा निर्णय घेण्यात आला. ताजने यांच्या बाजूने एकही संचालक नाही, यातूनच त्यांच्या विषयीची नाराजी उघड होते.
    -गजानन उताणे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती]

    मी बांधकाम सभापती असुन सुद्धा या अविश्वास प्रस्तावात सहभागी आहो, यात कोणताही पक्षपात नाही. ताजने यांच्या कारभारावरील नाराजीमुळेच सदर अविश्वास प्रस्ताव आणला. पुढील सभापतीची निवड रीतसर सर्व संचालक एकत्र बसून निर्णय घेऊ.

    • राजु डोंगे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती]
  • 12 year old boy drowned in Sindewahi । सिंदेवाहीत काळजाला हादरवणारी घटना, खेळता खेळता गेला खोल पाण्यात…

    12 year old boy drowned in Sindewahi

    12 year old boy drowned in Sindewahi : सिंदेवाही: सिंदेवाही तालुक्यातील खातगाव गावावर आज शोककळा पसरली आहे. गावात राहणारा १२ वर्षीय लोकेश उर्फ समीर मोहन वरखडवार याचा नदीच्या खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली असून, यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. लोकेश सहावी इयत्तेत शिकत होता.

    अम्मा चौक वाद, काय म्हणाले आमदार जोरगेवार

    कपडे धुण्यासाठी गेलेल्या आईसोबत घडली दुर्दैवी घटना

    मिळालेल्या माहितीनुसार, लोकेश दररोजप्रमाणे आपल्या आईसोबत गावाजवळील नदीवर कपडे धुण्यासाठी गेला होता. आई कपडे धुण्यात व्यस्त असताना लोकेश नदीच्या उथळ पाण्यात खेळत होता. खेळता खेळता तो अचानक खोल पाण्यात गेला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागला.

    आईच्या डोळ्यासमोरच ही दुर्दैवी घटना घडली. आपल्या मुलाला बुडताना पाहून आईने मदतीसाठी आरडाओरडा केला, परंतु काही क्षणातच लोकेश खोल पाण्यात बेपत्ता झाला. या घटनेमुळे आईवर मोठा मानसिक आघात झाला असून, तिची अवस्था पाहून गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. mother witness drowning tragedy

    गावात शोककळा आणि हळहळ व्यक्त

    लोकेशच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. लोकेश हा मनमिळावू आणि हुशार मुलगा होता. त्याच्या अचानक जाण्याने वरखडवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावातील लोक कुटुंबाला धीर देत आहेत.

  • viral video of government employee playing cards । 🚨 चंद्रपूरमध्ये शासकीय कर्मचाऱ्याचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल!

    viral video of government employee playing cards

    viral video of government employee playing cards : चंद्रपूर – सरकारी कार्यालयांमध्ये कामचुकारपणाचे प्रकार नवीन नाहीत. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील पंचायत समिती कार्यालयातून समोर आलेला एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये एक कर्मचारी आपल्या कामाच्या वेळेत, सरकारी संगणकावर चक्क पत्ते खेळताना दिसत आहे. एका जागरूक नागरिकाने हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    चंद्रपूर भाजपची कार्यकारणी जाहीर, निष्ठावंत नाराज

    नेमका प्रकार काय घडला?

    व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भद्रावती येथील पंचायत समिती कार्यालयातील एक कर्मचारी आपल्या खुर्चीवर बसून आहे. त्याच्यासमोर असलेल्या सरकारी संगणकाच्या स्क्रीनवर पत्त्यांचा खेळ सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा कर्मचारी पूर्णपणे खेळात मग्न असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. एका तरुणाने हा व्हिडिओ चित्रित केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सरकारी कार्यालयात जनतेच्या कामाऐवजी असे प्रकार घडत असल्याने जनतेच्या मनात प्रशासनाबद्दल नाराजी आहे. government employee playing cards at work

    माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ चर्चेत असतानाच…

    काही दिवसांपूर्वीच माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानभवनात आपल्या मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. आता चंद्रपूरमध्येही असाच प्रकार समोर आल्याने शासकीय कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे सरकारी कार्यालयातील कामाच्या वेळेत होणाऱ्या गैरवापराबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेची प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे.

  • Big Shocking News Chandrapur । चंद्रपूर जिल्ह्यात घडली धक्कादायक घटना

    Big Shocking News Chandrapur

    Big Shocking News Chandrapur : चंद्रपूर – भद्रावती तालुक्यातील मुरसा येथे एका ३६ वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवार, ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

    कायद्याला न जुमानणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांचा हिसका

    पिंकी मोरेश्वर कोडापे (वय ३६, रा. मुरसा) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंकी यांनी घरगुती कामासाठी एका खाजगी मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची नियमित परतफेड न झाल्याने, कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना वारंवार त्रास दिला जात होता अशी चर्चा आहे.

    दुहेरी त्रास

    या त्रासासोबतच, त्यांचे पती काही कामधंदा करत नसल्याने त्यांच्यात नेहमीच वाद होत असत अशी माहिती समोर आली आहे. या दुहेरी त्रासाला कंटाळूनच पिंकी यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

    या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वसुली पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भद्रावती पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पिंकी यांच्या आत्महत्येमागे नेमके काय कारण आहे, याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत.
  • SNDT Women Empowerment । तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी सक्षम होणे गरजेचे – डॉ. मंजुषा कानडे

    SNDT Women Empowerment

    SNDT Women Empowerment : बल्लारपूर –  एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई चे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपूर येथे दिनांक ३० जुलै २०२५ रोजी “पी.एम.-उषा (मेरु)” प्रकल्पांतर्गत (PM‑Usha (Meru) project) डिजिटल लिटरसी सेंटर – ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर ट्रेनिंग या एक दिवसीय लघु अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. मंजुषा कानडे, डॉ. प्रांजल बोगावार, बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले, सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, तसेच समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त उपस्थित होते.

    कुख्यात गुंडाला चंद्रपूर पोलिसांनी केले स्थानबद्ध

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वेदानंद अलमस्त यांनी केले व अध्यक्षीय भाषण डॉ. राजेश इंगोले यांनी केले त्यांनी शिक्षण क्षेत्रातील सतत होणारे बदल आणि शिक्षकांनी नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज या मुद्द्यावर सविस्तर प्रकाश टाकला यावेळी डॉ. मंजुषा कानडे यांनी शिक्षणपद्धती, शिक्षकाची भूमिका व बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातील नवविचार यावर भाष्य केले.

    कार्यक्रमात तीन शैक्षणिक सत्रे घेण्यात आली. पहिल्या सत्रात प्रियांदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथील  इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशनचे विभागप्रमुख डॉ. विशाल पांचभाई , यांनी मायक्रोसॉफ्ट ऑफिस, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट यावर सविस्तर माहिती व प्रात्यक्षिके सादर केली. दुसऱ्या सत्रात शैक्षणिक, व्यवस्थापन परिषद सदस्य, एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई , तथा प्राचार्य डॉ. प्रांजल बोगावार यांनी शिक्षण व संशोधनासाठी उपयुक्त विविध डिजिटल साधनांवर मार्गदर्शन केले. PM Usha Meru digital application training program

    chatgpt चा असा करा वापर

    यात गूगल वर्कस्पेस, ऑनलाइन मीटिंग टूल्स, स्क्रीन रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम्स, रेफरन्स मॅनेजमेंट टूल्स, शोधनिबंध साधने व साहित्य चोरी तपासणी उपकरणांचा समावेश होता. तिसऱ्या सत्रात प्रियांदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथील उपप्राचार्य डॉ. गजेन्द्र आसुटकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याचे शिक्षणासाठीचे उपयोग यावर सखोल माहिती दिली. त्यांनी चॅटजीपीटी, गूगल जेमिनी, बिंग कोपायलट, क्लॉड, डिफिट, क्युरिपॉड, मॅजिक स्कूल या साधनांचा अभ्यास करून वेगवेगळ्या पद्धतीचे अध्यापन साहित्य, प्रश्नपत्रिका व मूल्यमापनासाठी त्याचा वापर कसा करावा हे स्पष्ट केले.

    कार्यक्रमाची सांगता सहभागी प्राध्यापकांच्या अभिप्रायाने झाली. उपस्थित सर्व  प्राध्यापकांनी कार्यशाळेबाबत सकारात्मक अनुभव मांडले. यानंतर  सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहा. प्रा. शीतल बिल्लोरे, सहा. प्रा. अपेक्षा पिंपळे, सहा. प्रा.पायल तापासे, सहा. प्रा. कोमल भाटिया व सहा. प्रा. प्रनाली गौरकर यांनी संयोजन समितीच्या सदस्य म्हणून महत्वाची भूमिका बजावली, आभारप्रदर्शन सहा. प्रा. ऋग्वेद खंगमपट्टीवार यांनी केले.

  • student dies in river while swimming । 🛑 “१५ वर्षीय विद्यार्थ्याचा चिमढा नदीत बुडून मृत्यू – पावसाळ्यातील आनंद ठरला जीवघेणा!”

    student dies in river while swimming

    student dies in river while swimming : सावली – २८ जुलै २०२५]: सावली तालुक्यातील चिमढा नदीत बुडून सोहम प्रमोद मोहूर्ले (वय १५) या शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सुट्टी असल्याने मित्रांसोबत फिरायला गेलेल्या सोहमचा नदीत आंघोळीसाठी उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. ही घटना सावलीतील प्रभाग क्रमांक ९ मध्ये घडली असून, सोमवारी सायंकाळी त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    राजुरा शहरात पुन्हा तलवार जप्त, दोन दिवसात दोन कारवाई

    मिळालेल्या माहितीनुसार, सोहम मोहूर्ले, जो इयत्ता दहावीत शिकत होता, रविवारी कुटुंबीय घरी नसताना आपल्या मित्रांसोगट फिरायला गेला होता. फिरत असताना वाटेत चिमढा नदीवरील बंधारा पाहण्याची त्याला इच्छा झाली. बंधाऱ्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू असताना सोहमला पोहण्याचा मोह आवरता आला नाही. सोबत असलेले मित्र लहान असल्याने त्याला रोखू शकले नाहीत. पोहण्याच्या इच्छेने त्याने पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो प्रवाहात वाहून गेला.

    ही घटना सोहमच्या मित्रांच्या डोळ्यासमोरच घडली, परंतु भीतीपोटी त्यांनी तातडीने घरच्यांना किंवा पोलिसांना माहिती दिली नाही. रात्री उशीरपर्यंत सोहम घरी परत न आल्याने घरच्या मंडळींची चिंता वाढली. त्यांनी शोधाशोध सुरू केली असता, मित्रांकडून सत्य परिस्थिती समोर आली. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

    माहिती मिळताच पोलीस विभाग आणि आपत्कालीन मदत विभागाने तातडीने शोधमोहीम राबवली. अखेर, दुसऱ्या दिवशी, म्हणजेच सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास, घटनास्थळापासून काही अंतरावर सोहमचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण सावली तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

    Somayya institute of technology

    पोलिसांचे आवाहन

    सावली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर सावली पोलिसांनी नागरिकांना वाहत्या पाण्यापासून सावध राहण्याचे आणि विशेषतः पावसाळ्यात नद्यांमध्ये न उतरण्याचे आवाहन केले आहे. पालकांनी आपल्या मुलांना अशा धोक्याच्या ठिकाणी जाण्यापासून रोखावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. police advisory for monsoon water safety

  • leopard road accident । 🐆वन्यजीव मरताहेत, प्रशासन झोपलंय! चंद्रपूरमध्ये बिबट्याचा मृत्यू!,

    leopard road accident

    leopard road accident : चंद्रपूर – अहेरी-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर, गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूरजवळ एका बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (२७ जुलै रोजी) सकाळी ८ वाजताच्या सुमारास झरण वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १२१ आणि १२२ च्या मध्ये घडली, ज्यामुळे वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

    असा झाला अपघात

    मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्या रस्ता ओलांडत असताना एका भरधाव अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच झरण वनपरिक्षेत्राचे अधिकारी संदीप मडावी, कर्णेवाड, क्षेत्रसहायक रुपाली आडे, आक्सापूरचे पोलीस पाटील सूरज वैरागडे, उपसरपंच चंद्रजित गव्हारे आणि गावातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. leopard road accident

    चंद्रपुरात मेफेड्रोन ची विक्री, २ आरोपीना अटक १ पसार

    क्षेत्रसहायक रुपाली आडे यांनी पंचनामा केला असता, मृत बिबट्या तीन ते चार वर्षांचा नर असून, त्याने नुकतीच रानडुकराची शिकार केली होती. अपघातामुळे त्याच्या शरीरातून रानडुकराचे मांस बाहेर आलेले दिसत होते. झरण वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप मडावी यांनी सांगितले की, मृत बिबट्याला चंद्रपूर येथे नेण्यात येणार असून, शवविच्छेदनानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

    वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

    या घटनेमुळे परिसरातील वन्यजीव सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच आक्सापूर गावाजवळ आणि शेतात वाघाचे दर्शन झाल्याने तसेच वाघाचे पाऊलखुणा (पगमार्क) आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपूर यांना १४ जुलै रोजी निवेदनही देण्यात आले होते. शेतकरी आपला जीव धोक्यात घालून शेतीची कामे करत आहेत, तर वानरांमुळे वेलवर्गीय आणि फळबागा वाचवणेही कठीण झाले आहे, अशी कैफियत गावकऱ्यांनी मांडली आहे. highway animal crossing danger zones

    Somayya institute of technology

    कान्हाळगाव अभयारण्य आणि वन्यप्राण्यांचा भ्रमणमार्ग

    नुकतेच कान्हाळगावला अभयारण्य घोषित करण्यात आले असल्याने, हा परिसर वन्यप्राण्यांचा महत्त्वाचा भ्रमणमार्ग बनला आहे. यामुळे रस्त्यावर वन्यप्राण्यांना वारंवार अपघातांना सामोरे जावे लागत आहे. या घटनेला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. वनविभाग, महामंडळ आणि शासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालून वन्यजीवांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

    या घटनेमुळे वन्यजीव आणि मानवी वस्ती यांच्यातील संघर्ष आणि वन्यजीव संरक्षणाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने त्वरित पाऊले उचलणे आवश्यक आहे.

  • revenue officer action on sand mining । “रेतीचा डोंगर, बिना नंबरची पोकलेन!” महसूल अधिकाऱ्यांची कारवाई

    revenue officer action on sand mining

    revenue officer action on sand mining : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अनेक वर्षांपासून अवैध वाळूचे उत्खनन सुरु आहे मात्र यावर चंद्रपूर जिल्हा प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसत आहे. वाळू घाटाचा एकदा लिलाव झाला तर त्याठिकाणी कश्याप्रकारे उत्खनन होते हे सुद्धा प्रशासनाकडून बघितले जात नाही. चंद्रपुरात मात्र अधिकारी थेट मध्यरात्री घाटावर पोहचत कारवाई केली.

    चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस मधील नकोडा रेती घाटावर मध्यरात्री दीड वाजता अवैध रेती उत्खनन व साठवणुकीची माहिती मिळाल्यावर नायब तहसीलदार सचिन खंडाळे व मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे यांनी चौकशी केली असता तिथे त्यांना मोठं घबाड आढळलं. पण या कारवाईत प्रशासनाला बेवारस मुद्देमाल जप्त करावा लागला. poklen seized during illegal mining Chandrapur

    नोकरीसाठी विकलं मंगळसूत्र पण झाली फसवणूक

    वर्धा नदी पात्राजवळील नकोडा घाटात वाळूचे अवैध उत्खनन सुरु असल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली होती, माहितीच्या आधारे तहसील विभागातील अधिकारी घाटाजवळ पोहोचले असता त्याठिकाणी दोन बोटीने नदी पात्रात वाळू उत्खनन होत असल्याचे समजले, अधिकाऱ्यांना बघताच काम करणारे मजुरांनी धूम ठोकली. बोट आणि तीस ब्रास वाळू जप्त करीत पंचनामा करण्यात आला. तहसील परत जात असताना पंप हाऊस च्या रोडवरील अंदाजे 100 ब्रास रेती साठवून करून असल्याचे दिसून आले व त्या रेतीवर एक पोकलेन मशीन दिसून आली सदर स्टॉक आणि पोकलेन मशीन अवैध असल्याचे कळल्यानंतर त्यावर जप्तीची कारवाई करून व मोका पंचनामा करण्यात आला सदर मशीन जप्त करण्यात आली व रेती स्टॉक पण जप्त करण्यात आला. unclaimed sand stock seized Chandrapur

    वाळू व पोकलेन कुणाची?

    विशेष बाब म्हणजे कारवाई केल्यावर अजूनही वाळू उत्खनन, बोट व पोकलेन मशीन कुणाची याचा थांगपत्ता अजूनही लागलेला नाही, यावर नायब तहसीलदार सचिन खंडाळे यांनी माहिती दिली कि सदर माल कुणाचा याबाबत माहिती मिळालेली नाही, सोबतच जप्त करण्यात आलेली पोकलेन मशीन कुणाची हे सुद्धा समजले नाही कारण मशीन वर नम्बर प्लेट नव्हता, पुढील कारवाई साठी प्रादेशिक परिवहन विभागाला याबाबत कळविण्यात आले आहे. प्रशासनाच्या वतीने घुग्गुस पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार नोंदविण्यात आली आहे.

    Somayya institute of technology

    सदरची यशस्वी कारवाई उपविभागीय अधिकारी चंद्रपूर संजय पवार, विजय पवार तहसीलदार चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सचिन खंडाळे नायब तहसीलदार यांनी केली सदर कारवाई करत असताना प्रकाश सुर्वे मंडळ अधिकारी घुगुस ,तलाठी मनोज कांबळे ,तलाठी मनोज शेंडे, तलाठी नवनाथ गोडघासे, परशुराम पेंदोर कोतवाल,पोलीस पाटील प्रणय कांबळे नकोडा हे उपस्थित होते.

  • sudden electric shock while drying clothes । 💥 अंगणातील तार ठरली मृत्यूचं कारण, महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू!

    sudden electric shock while drying clothes

    sudden electric shock while drying clothes : राजुरा – मृत्यू हा कधी आणि केव्हाही येऊ शकतो, त्यासाठी एक निमित्त पुरे आहे, अधिक हृदयद्रावक घटना राजुरा तालुक्यातील चिंचोली (खुर्द) गावात घडली. घरातील कामे आटोपते करीत असताना महिलेला विजेचा जोरदार धक्का बसला, या धक्क्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला.

    चंद्रपुरात गांजा विक्री करणाऱ्या महिलांना अटक

    ४० वर्षीय सुवर्णा राजेश वांढरे असे त्या मृत महिलेचे नाव असून घरासमोरील अंगणात कपडे वाळू लावायला बाहेर आलेल्या सुवर्णा यांनी कपडे वाळविण्यासाठी अंगणातील लोखंडी तारांवर कपडे ठेवत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. हि घटना २० जुलै रोजी रविवारी सकाळच्या सुमारास घडली.

    सर्व्हिस केबलमुळे विजेचा प्रवाह

    विशेष बाब म्हणजे त्या तारेला कटलेली विजेची सर्व्हिस केबल लागली होती त्यामुळे त्या तारांमध्ये विजेचा प्रवाह सुरु होता, याची कल्पना सुर्वणा यांना नव्हती नेहमीप्रमाणे त्या आपलं काम करीत होत्या मात्र आजचा दिवस त्यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल असे कुणालाही वाटलं नसेल.

    या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून वांढरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

     

  • Dhariwal infrastructure re-investigation । 🧨 “पाईपलाईन गळतीने पिकांची वाट लावली – आता धारीवालची पुन्हा चौकशी!”

    Dhariwal infrastructure re-investigation

    आमदार सुधाकर अडबाले यांच्या तारांकित प्रश्नावर जलसंपदा मंत्री यांचे निर्देश

    Dhariwal infrastructure re-investigation : चंद्रपूर : जिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथील धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने वर्धा नदी ते विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी पाईपलाईन मंजूर मार्ग न वापरता खाजगी जमिनीतून पाईपलाईन टाकल्याचे उघड झाले आहे. या पाईपलाईनच्‍या गळतीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्‍याने कंपनीची फेर चौकशी करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आमदार सुधाकर अडबाले यांच्या प्रश्‍नावर उत्तर देताना दिले.

    चंद्रपुरात बनावट ओयोचा धंदा, पोलिसांच्या धाडी

    आमदार सुधाकर अडबाले यांनी २०२५ च्या पावसाळी अधिवेशनात यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. पाईपलाईन टाकण्यासाठी चुकीचा मार्ग वापरणाऱ्या धारिवाल कंपनीवर अजूनपर्यंत दंडात्मक कारवाई का करण्यात आलेली नाही? तसेच झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना दिली जावी, अशी मागणी आमदार अडबाले यांनी  लावून धरली. pipeline leakage affecting farmers

    भरपाई दिल्याचा संशयास्पद अहवाल

    या प्रश्नावर उत्तर देताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, धारिवाल कंपनीने शासकीय मंजुरीनुसार सहा फूट खोलीत पाईपलाईन टाकणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी ही पाइपलाईन खाजगी जमिनीतून आणि कमी खोलीत टाकल्याने गळती होत असून त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १८ मार्च २०२५ रोजी आदेश पारित करून उपअधीक्षक, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व अन्‍य अधिकारी अशा अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. मात्र, या समितीने केवळ सहा शेतकऱ्यांना मिळून १५,००० रुपयांची भरपाई दिल्याचा संशयास्पद अहवाल दिला आहे. मंत्री महाजन यांनी या अहवालावर नाराजी व्यक्त करत चौकशी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

    पुन्हा चौकशीचे निर्देश

    “पंधरा हजार रुपयांची मदत म्हणजे केवळ प्रवास खर्चापेक्षा कमी आहे. वास्तविक नुकसान किती झाले याचा वस्तुनिष्ठ अभ्यासच झालेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना नव्याने चौकशी करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. कंपनीने मंजूर मार्गानेच पाईपलाईन टाकावी व तोपर्यंत गळती होणार नाही याची काळजी कंपनीने घ्यावी,” असे स्पष्ट निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात दिले.

    धारीवाल कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेपर्यंत सभागृहात पाठपुरावा करणार असल्‍याचे यावेळी आमदार अडबाले यांनी सांगितले.