Tag: MH34

  • important information pension holders : पेन्शन धारकांसाठी महत्वाची माहिती

    pension holders चंद्रपूर कोषागार अंतर्गत बँकेद्वारे निवृत्ती वेतनधारकांना 1 नोव्हेंबर 2024 रोजी हयात असल्याच्या प्रमाणपत्राची (Life Certificate) यादी संबंधित बँकेस माहे ऑक्टोबर अखेर पाठविण्यात आली आहे.

    pension holders सदर यादीवर निवृत्तीवेतन धारक/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी मोबाईल क्रमांक, पॅन क्रमांक, आधार क्रमांक नमुद करून 30 नोव्हेंबर 2024 पूर्वी स्वत: उपस्थित होऊन स्वाक्षरी करावयाची आहे.

    चंद्रपुरात भाजपच्या बॅनर वरून वाद

    जेणेकरून हयात असल्याच्या प्रमाणपत्राची यादी कोषागाराला वेळीच प्राप्त होईल व त्यांचे माहे डिसेंबर 2024 पासूनचे निवृत्तीवेतन बँकेकडे वेळीच पाठविता येईल.  तसेच जे निवृत्ती वेतनधारक मनिऑर्डरद्वारे निवृत्ती वेतन घेतात त्यांनी आपले हयात प्रमाणपत्र राजपत्रित अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत कोषागाराला पाठवावे. pension holders

     असा सादर करता येईल हयातीचा दाखला : आपले पेन्शन खाते  असलेल्या बँकेच्या शाखेत जाऊन बँक अधिकाऱ्याच्या समक्ष हयात दाखल्याच्या यादीतील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करा. बँकेत जाऊ शकत नसल्यास जीवनप्रमाण या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने पुढीलप्रमाणे  हयात दाखला सादर करा.

    1. https://jeevanpraman.gov.inया संकेतस्थळावर लॉगइन करा. 2. GENERAL LIFE CERTIFICATE वर क्लीक करा. 3 तुमचा आधार क्रमांक टाका. 4. तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका आणि तुमचा हयातीचा दाखला काही सेंकदात प्राप्त करा.

    तुमच्या जवळच्या  जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागाराला भेट द्या. हयात दाखल्यावर  बँक अधिकारी किंवा राजपत्रीत अधिकाऱ्याच्या समक्ष स्वाक्षरी करून जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करा. काही कारणानिमित्त परदेशात असल्यास तेथील भारतीय राजदुतामार्फत हयातीचा दाखला संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करा. 

    हयात प्रमाणपत्र 5 डिसेंबर 2024 पर्यंत कोषागारास  प्राप्त न झाल्यास त्यांचे माहे डिसेंबर 2024 पासुनचे निवृत्तीवेतन बॅंकेकडे पाठविले जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी सुहास पवार यांनी कळविले आहे.

  • bjp banner controversy : भाजपच्या बॅनरवर आमदार किशोर जोरगेवार यांची ठसठशीत एन्ट्री

    bjp banner controversy भाजप नेते देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरमध्ये भाजप नेत्यांचे फोटो होते. मात्र, त्यामध्ये आमदार किशोर जोरगेवार यांचा फोटो नसल्याने भाजपच्याच एका गटाकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला.

    bjp banner controversy त्यानंतर हे बॅनर काढून, नवीन बॅनर लावण्यात आले, ज्यामध्ये आमदार किशोर जोरगेवार यांचा फोटो टाकण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या बॅनरवर आमदार किशोर जोरगेवार यांची ठसठशीत एन्ट्री झाल्याची चर्चा चंद्रपुरात सुरू झाली आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात कुणाची आघाडी?

    भाजप नेते देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील आझाद बाग मार्गावर शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष राऊल पावडे यांच्या वतीने लावले होते. त्यामध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, विधानसभा प्रमुख प्रमोद कळू, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांचे फोटो होते.

    सकाळच्या सुमारास हे बॅनर दिसताच भाजपच्या एका वर्तुळात खळबळ माजली. “सदर बॅनरवर आमदार किशोर जोरगेवार यांचा फोटो नाही,” अशा चर्चा शहरात रंगू लागल्या. त्यामुळे हे बॅनर तात्काळ काढण्यात आले आणि आमदार किशोर जोरगेवार यांचा फोटो असलेले नवे बॅनर त्याच ठिकाणी लावण्यात आले.

    या प्रकारामुळे चंद्रपूरच्या भाजप राजकारणात आमदार किशोर जोरगेवार यांना सन्मानजनक स्थान द्यावेच लागणार असल्याचे दिसून येत आहे. भाजपमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांनी “ग्रँड एन्ट्री” केली असल्याचे स्पष्ट होत आहे.

  • Polling Center Restrictions : मतमोजणी केंद्र परिसरात निर्बंध लागू

    Polling Center Restrictions येत्या शनिवारी दि. 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे यथायोग्य पालन होण्याचे दृष्टीने तसेच आचारसंहिता अंमलात असेपर्यंतच्या कालावधीकरीता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये निर्बंध लागू करण्यात आले असून मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

    Polling Center Restrictions सदर आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी निर्गमित केले आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत कुणाची आघाडी?

    त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या परीसरात 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खालील बाबी करण्यास मनाई करण्यात आली आहे. Polling Center Restrictions

    1. मतमोजणीची प्रक्रिया होत असलेल्या ठिकाणापासून बाहेरील 100 मीटर परीसरात सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध असेल. तसेच मतमोजणी केंद्राचे बाहेरील 100 मीटर परीसरातील सर्व दुकाने /आस्थापना/व्यवसाय केंद्र बंद राहतील.
    2. 2. मतमेाजणी केंद्राचे परीसरात मतमोजणी कामावर नेमणुक झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकरीता वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली असून, मतमोजणी करीता नियुक्ती झालेल्या अधिकरी व कर्मचारी यांची वाहने, पोलिस विभाग, विदयुत विभाग, अग्निशमन विभाग व सुरक्षा व्यवस्थेकरीता असलेली वाहने यांनाच प्रवेश राहील. इतर सर्व प्रकारच्या वाहनांस प्रतिबंध असेल.
    3. भारत निवडणुक आयोगाचे वतीने वितरीत केलेल्या अधिकृत ओळखपत्राशिवाय इतर व्यक्तिंना मतमोजणी परिसरात प्रवेश प्रतिबंधीत असेल. मतमोजणीचे दिवशी मतमोजणी केंद्राच्या बाहेरील 100 परीसरात 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती समुहास जमा होण्यास प्रतिबंध असेल. उमेदवार व पत्रकार यांना ठरवून दिलेल्या बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे संपर्क साधण्यासाठी मोबाईल फोनचा वापर करता येईल, परंतू प्रत्यक्ष मतमोजणी कक्षात मोबाईल फोन वा कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट नेण्यास/ वापरण्यास प्रतिबंध असेल. Polling Center Restrictions
    4. मतमोजणी केंद्राच्या परिसरात सभोवताल 1 कि.मी.चे क्षेत्रात/ परीसरात ड्रोन वा ड्रोन सदृश्य वस्तु उडविण्यास 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजतापासून मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत प्रतिबंध असेल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

    या ठिकाणी होणार मतमोजणी : 70- राजुरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, राजुरा येथे, 71- चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे, 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत मुल येथे, 73 – ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन, नागभीड रोड, ब्रम्हपूरी येथे, 74- चिमूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी राजीव गांधी सभागृह, उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर चिमूर येथे आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती, गोडावून क्रमांक 2 मोहबाळा रोड वरोरा येथे होणार आहे.

  • Latest Total voting percentage : मतदानाची टक्केवारी वाढली, चंद्रपूर जिल्ह्यात कुणाची आघाडी?

    Total voting percentage चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले, ग्रामीण भागातील जनतेने यंदा लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येत सहभाग घेतला पण शहरी भागातील जनता निरुत्साही निघाली.

    Total voting percentage जिल्ह्यात एकूण 71.27 टक्के मतदान झाले, असले तरी विधानसभा क्षेत्रात बाजी कोण मारणार हे अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी नागरिक गल्ली बोळात कोण जिंकून येणार याची चर्चा करताना दिसून येत आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात ईव्हीएम मशीनची तोडफोड

    वर्ष 2019 च्या तुलनेत यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. वर्ष 2019 मध्ये चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात 51.42 टक्के, बल्लारपूर – 62.53, राजुरा – 71.02, ब्रह्मपुरी – 71.53, चिमूर – 75.01 तर वरोरा विधानसभा मतदारसंघात एकूण 62.68 टक्के मतदान झाले होते. Total voting percentage

    वर्ष 2024 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर विधानसभा मतदार संघात 57.98 (6.50 टक्के वाढ), ब्रह्मपुरी – 80.54 (9 टक्के), बल्लारपूर – 69.70 (7 टक्के), चिमूर – 81.75 (6.74 टक्के), राजुरा 72.71 (1.50 टक्के), वरोरा मतदारसंघात 69.48 (7 टक्के) मतदानात वाढ झाली आहे.

    ग्रामीण भागातील नागरिकांनी भरघोस मतदान केले तर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील नागरिक लोकशाहीच्या उत्सवात कमी प्रमाणात सहभागी झाले.

    विजय कुणाचा?

    राजुरा विधानसभा मतदारसंघात वामनराव चटप यांचे नाव आघाडीवर तर बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर – किशोर जोरगेवार, चिमूर – सतीश वारजूरकर, वरोरा – अपक्ष/भाजप, ब्रह्मपुरी मतदारसंघात विजय वडेट्टीवार यांचं नाव आघाडीवर आहे.

  • electronic voting machine : संविधान बचाव चा नारा देत महिलेचा ईव्हीएम मशीनवर धावा

    electronic voting machine चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत दिवसभरात काही ठिकाणी कांग्रेस-भाजप कार्यकर्ते यांचा वाद बघायला मिळाला.

    electronic voting machine वरोरा विधानसभा क्षेत्रातील भद्रावती येथे एका महिलेने थेट ईव्हीएम मशीनच आदळली, या घटनेमुळे उपस्थित मतदान केंद्र अधिकारी यांची तारांबळ उडाली.

    ग्रामीण भागातील जनता हुशार, शहरी भागातील जनता मतदानात निरुत्साही

    सदर कृत्य करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले, विशेष म्हणजे संविधान बचाव, ईव्हीएम मशीन हटाव असा नारा त्या महिलेने यावेळी दिला.

    वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीदरम्यान भद्रावती येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान टाकण्यासाठी गेलेल्या एका राजकीय पक्षाची महिलेने संविधान बचाव चा नारा देत थेट ईव्हीएम मशीनवर धावा बोलला. electronic voting machine


    लता मंसराम शिंगाडे वय ६५ वर्षे राहणार सुरक्षा नगर भद्रावती असे त्या महिलेचे नाव आह . ही महिला बहुजन मुक्ती पार्टीची कार्यकर्ता आहे. ही महिला दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान मतदान करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या बूथ क्रमांक ३०९ गेली असता तिथे मतदान करते वेळी ईव्हीएम मशीन उचलून जोराने त्या टेबलावर आदळली आणि ईव्हीएम हटाव संविधान बचाव अशी नारेबाजी करत तिने बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशा घोषणा करत होती.

    ही घटना होताच येथील मतदान केंद्रावरील अधिकारी तसेच सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले या घटनेने येथे अर्धा तास मतदान केंद्राची प्रक्रिया थांबली होती पोलिसांनी लता शिंगाडे या महिलेवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे पुढील तपास ठाणेदार अमोल काचोरे करीत आहे.

  • Latest polling live update : सायंकाळी 5 वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 64.48 टक्के मतदान, सर्वात कमी मतदान चंद्रपुरात

    polling live update महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 49.87 टक्के मतदान दुपारी 3 वाजेपर्यंत झाले असून यामध्ये सर्वाधिक चिमूर विधानसभा क्षेत्रात एकूण 57.79 टक्के मतदान झाले आहे.

    polling live update विधानसभा क्षेत्रात सकाळपासून प्रमुख उमेदवारांनी मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला, संथगतीने सुरू झालेले मतदान दुपारी 3 वाजेपर्यंत संथगतीने सुरूच होते 3 वाजेनंतर नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात केल्याने टक्केवारीत वाढ झाली.

    जोरगेवार यांना मिळाला अम्मा चा आशीर्वाद

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्र – 63.44 टक्के, ब्रह्मपुरी विधानसभा – 72.97 टक्के, चंद्रपूर विधानसभा – 53.57 टक्के, चिमूर विधानसभा – 74.83 टक्के, राजुरा विधानसभा क्षेत्र – 65.59 टक्के, वरोरा विधानसभा – 60.21 टक्के असे एकूण 64.48 टक्के सरासरी मतदानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात झाली आहे. polling live update

    शेवटचा 1 तास शिल्लक असल्याने मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील 94 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद होणार असून 23 नोव्हेंबर ला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

  • Polling day : चंद्रपूर जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 49.87 टक्के मतदान

    polling day महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 49.87 टक्के मतदान दुपारी 3 वाजेपर्यंत झाले असून यामध्ये सर्वाधिक चिमूर विधानसभा क्षेत्रात एकूण 57.79 टक्के मतदान झाले आहे.

    60 लाखांची रोकड व भाजपचे प्रचार साहित्य जप्त

    polling day विधानसभा क्षेत्रात सकाळपासून प्रमुख उमेदवारांनी मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला, संथगतीने सुरू झालेले मतदान दुपारी 3 वाजेपर्यंत संथगतीने सुरूच होते.

    एकूण मतदान दुपारी 3 वाजेपर्यंत

    Polling day बल्लारपूर विधानसभा क्षेत्र – 48.81 टक्के, ब्रह्मपुरी विधानसभा – 56.34 टक्के, चंद्रपूर विधानसभा – 41.44 टक्के, चिमूर विधानसभा – 57.79 टक्के, राजुरा विधानसभा क्षेत्र – 51.52 टक्के, वरोरा विधानसभा – 46.09 टक्के असे एकूण 49.87 टक्के सरासरी मतदानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात झाली आहे.

    राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावीत राज्यात मजबूत सरकार स्थापन होण्याचा विश्वास व्यक्त केला. Polling day

    जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकाळी सहकुटुंब मतदान केंद्रावर उपस्थित राहत मतदानाचा हक्क बजावला, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज सह कुटुंब ब्रम्हपुरी येथील देलनवाडी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. Polling day

    लोकशाही व संविधान रक्षणाकरीता आपण सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा. असे त्यांनी सर्वांना आवाहन केले.
    यावेळी त्यांच्या पत्नी किरणताई वडेट्टीवार, मुली रोशनी वडेट्टीवार, शिवानी वडेट्टीवार, देवयानी वडेट्टीवार उपस्थीत होत्या.

    चंद्रपूर जिल्ह्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुलगा मानस धानोरकर सोबत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

    आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत आज सकाळी चंद्रपुरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील केंद्रावर जाऊन सपत्नीक मतदान केले.

    या उत्सवात आपणही सहभागी होऊन मतदान अवश्य करावे, असे आवाहन आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी यावेळी केले.

    आमदार किशोर जोरगेवार यांनी स्व. अम्माचा आर्शिवाद घेत सकाळी १० वाजता पटेल हायस्कूल येथील मतदान केंद्रावर जात सह परिवार मतदान केले. यावेळी त्यांच्या सोबत कल्याणी किशोर जोरगेवार, प्रशांत जोरगेवार, रंजना जोरगेवार, प्रसाद जोरगेवार, कोमल जोरगेवार, यांची उपस्थिती होती.

  • kishor jorgewar latest news : त्या माय माऊलीने दिला आशीर्वाद

    kishor jorgewar latest news आमदार किशोर जोरगेवार मतदार करण्यासाठी पटेल हायस्कुल येथील मतदान केंद्रावर गेले असता मतदान करुन बाहेर निघताच एका माय माउलीने आवाज देत आमदार किशोर जोरगेवार यांना आर्शिवाद दिला. आज तुझ्या रुपाने अम्माने आर्शिवाद दिला असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

    60 लाखांची रोकड, भाजपचे प्रचारसाहित्य चंद्रपुरात नेमकं चाललंय तरी काय?

    kishor jorgewar latest news आज विधानसभा निवडणकींसाठी राज्यभरात मतदान होत आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांनी गिरणार चौकातील पटेल हायस्कुल येथे सहपरिवार मतदान केले.

    मतदान करुन ते बाहेर पडताच एका वयोवृध्द महिलेने मागुन जोरगेवार यांना हाक मारली आमदार किशोर जोरगेवार यांनीही थांबुन या माय माउलीची विचारपुस केली. यावेळी या मातेने आमदार किशोर जोरगेवार यांना आर्शिवाद दिला.


    दरवर्षी मतदान करतांना अम्मा सोबत रहायची, यंदा ती नाही. मात्र मतदान करतांना ती स्मरणात होती. अचाणक आज या मायमाउलीच्या स्नेहात अम्माचे दर्शन झाले. जनु अम्मानेच मला आर्शिवाद दिला असल्याचे या प्रसंगा नंतर आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

  • Cash seized : 60 लाखांची रोकड व भाजपचे प्रचारसाहित्य चंद्रपुरात चाललंय तरी काय?

    Cash seized चंद्रपूर जिल्ह्यात प्रचारतोफा थंडावल्यानंतर भाजप व कांग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली, त्यानंतर प्रमुख उमेदवारांवर गुन्हेही दाखल झाले मात्र आता तर 60 लाखांची रोकड व प्रचार साहित्य जप्त केल्याने निवडणुकीत चालणारा घोडेबाजार सुद्धा उघडकीस आला आहे.

    Cash seized राजुरा विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांनी मतदारांना आमिष देण्यासाठी ६० लाखांची रोकड लपवून ठेवली होती. अशी तक्रार राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाने केल्यानंतर निवडणूक आयोगाने रात्री उशिरा गडचांदूर येथील एका घरावर धाड टाकत ही रक्कम जप्त केली.

    राजकीय हाणामारीत उमेदवारांवर गुन्हे दाखल

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुरा विधानसभा प्रमुख अरुण निमजे यांनी आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारीनुसार, संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात बाहेरील महिला – पुरुष व बाऊंसर नेमून मतदारांना पैसे वाटप करण्याचा कट रचला जात असल्याचे समोर आले आहे. Cash seized

    आयोगाची सतर्कता आणि निवडणुकीतील गैरप्रकार उघड
    निवडणूक आयोगाच्या टीमने रात्रभर तपास करून ही मोठी कारवाई केली. जप्त केलेली रक्कम निवडणूक आयोगाच्या ताब्यात देण्यात आली असून, या घटनेने निवडणुकीच्या निष्पक्षतेवर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

    या कारवाईत रोकड व भाजपचे प्रचार साहित्य बुथ निहाय यादी जप्त करण्यात आली असून या प्रकरणी अद्यापही कुणाला अटक करण्यात आलेली नाही.

    या घटनेमुळे राजुरा विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असून, निवडणूक आयोगाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • violation code of conduct : चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

    violation code of conduct महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुकीचा जाहीर प्रचार 18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता संपला आहे. त्यानंतरचे 48 तास हे शांतता झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

    violation code of conduct या कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास याबाबत त्वरीत तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

    बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. जाहीर प्रचार संपल्यानंतर 48 तासांच्या कालावधीत कोणताही जाहीर प्रचार करता येत नाही.

    बल्लारपूर राजकीय राडा, दोन उमेदवारांवर गुन्हे दाखल

    त्यामुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची कुठलीही बाब आढळल्यास नागरिकांनी त्वरित सी-व्हीजील ॲप वर तक्रार करावी किंवा 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा.

    जिल्हा प्रशासनाकडून याबाबत दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी सर्व नागरिकांना केले आहे.