important information pension holders : पेन्शन धारकांसाठी महत्वाची माहिती

pension holders चंद्रपूर कोषागार अंतर्गत बँकेद्वारे निवृत्ती वेतनधारकांना 1 नोव्हेंबर 2024 रोजी हयात असल्याच्या प्रमाणपत्राची (Life Certificate) यादी संबंधित बँकेस माहे ऑक्टोबर अखेर पाठविण्यात आली आहे.

pension holders सदर यादीवर निवृत्तीवेतन धारक/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी मोबाईल क्रमांक, पॅन क्रमांक, आधार क्रमांक नमुद करून 30 नोव्हेंबर 2024 पूर्वी स्वत: उपस्थित होऊन स्वाक्षरी करावयाची आहे.

चंद्रपुरात भाजपच्या बॅनर वरून वाद

जेणेकरून हयात असल्याच्या प्रमाणपत्राची यादी कोषागाराला वेळीच प्राप्त होईल व त्यांचे माहे डिसेंबर 2024 पासूनचे निवृत्तीवेतन बँकेकडे वेळीच पाठविता येईल.  तसेच जे निवृत्ती वेतनधारक मनिऑर्डरद्वारे निवृत्ती वेतन घेतात त्यांनी आपले हयात प्रमाणपत्र राजपत्रित अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत कोषागाराला पाठवावे. pension holders

 असा सादर करता येईल हयातीचा दाखला : आपले पेन्शन खाते  असलेल्या बँकेच्या शाखेत जाऊन बँक अधिकाऱ्याच्या समक्ष हयात दाखल्याच्या यादीतील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करा. बँकेत जाऊ शकत नसल्यास जीवनप्रमाण या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने पुढीलप्रमाणे  हयात दाखला सादर करा.

1. https://jeevanpraman.gov.inया संकेतस्थळावर लॉगइन करा. 2. GENERAL LIFE CERTIFICATE वर क्लीक करा. 3 तुमचा आधार क्रमांक टाका. 4. तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका आणि तुमचा हयातीचा दाखला काही सेंकदात प्राप्त करा.

तुमच्या जवळच्या  जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागाराला भेट द्या. हयात दाखल्यावर  बँक अधिकारी किंवा राजपत्रीत अधिकाऱ्याच्या समक्ष स्वाक्षरी करून जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करा. काही कारणानिमित्त परदेशात असल्यास तेथील भारतीय राजदुतामार्फत हयातीचा दाखला संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करा. 

हयात प्रमाणपत्र 5 डिसेंबर 2024 पर्यंत कोषागारास  प्राप्त न झाल्यास त्यांचे माहे डिसेंबर 2024 पासुनचे निवृत्तीवेतन बॅंकेकडे पाठविले जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी सुहास पवार यांनी कळविले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *