Tag: MH34

  • record break sabha : अपक्ष उमेदवारांच्या जाहीर सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी

    record break sabha मा.सा. उर्फ दादासाहेब कन्नमवार हे महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे योगदान आमच्या सारख्या समाजसेवेचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्फूर्तीदायक वाटावे असेच आहे.

    पवन कल्याण यांच्या रोड शो मध्ये नागरिकांची गर्दीचं गर्दी

    record break sabha समाजाच्या मागासवर्गात जन्म घेतलेली एक व्यक्ती राज्याचे मुख्यमंत्रीपद प्राप्त करते ही सामाजिक इतिहासातील अत्यंत क्रांतिकारक गोष्ट आहे. कर्मवीर कन्नमवार हे विदर्भाची शान आहेत.

    चंद्रपूरकरांसाठी तर ते प्रेरणादायक व्यक्तिमत्व आहे. भद्रावती येथील आयुध निर्माण सारखे मोठे प्रकल्प आणून हजारो लोकांना रोजगार पुरविणारे आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातील खरे विकास पुरुष हे दादासाहेब कन्नमवार आहेत.


    लाखोंची प्रेरणा बनलेल्या अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना येथील तथाकथित विकासपुरुषाची जीभ घसरली. त्यांनी जाहीर सभेतून बोलतांना त्यांचा अपमान केला.
    दादासाहेब कन्नमवार पेक्षा ही स्वतःला मोठे समजणाऱ्या मंत्र्याला महाराष्ट्रातील जनता कदापी माफ करणार नाही. record break sabha

    लोकसभेच्या वेळी असेच महिलांबद्दल अपमानजक व्यक्तव्य केल्याबद्दल त्यांचा दारून पराभव झाला होता. व आता लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. असे स्पष्ट प्रतिपादन अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी केले, त्या मारोडा येथील आपल्या प्रचाराच्या जाहीर सभेत बोलत होत्या.

    आयोजित सभेत प्रथमच एका अपक्ष उमेदवारांच्या जाहीर सभेला रेकोर्डब्रेक गर्दी होती.

    या सभेला प्रवीण गावातूरे,सत्यशोधक समाजाचे हिराचंद बोरकुटे,कवडुजी येणप्रेड्डीवार शेतकरी संघटना,उमाजी मंडलवार जेष्ठ प्रचारक गुरुदेव सेवा मंडळ, श्री. कोठारेजि तेली महासंघ, दीपक काका वाढई ,प्रा. नामदेव कोकोडे आदी.विविध समाज घटकातील मान्यवर उपस्थित होते. या सभेला मारोडा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

  • Baahubali of development : सुधीर मुनगंटीवार हे विकासाचे बाहुबली – पवन कल्याण

    Baahubali of development बल्लारपूर – ज्या बल्लारपूरच्या सागवनाने अयोध्येतील राम मंदिराचा कोपरा न् कोपरा सुगंधीत झाला, त्या बल्लारपूरचा विकास बघून मी थक्क झालो. त्यामुळे ‘बाहुबली’ चित्रपटात ज्याप्रमाणे बाहुबलीने राजमाता शिवगामीची पावले थांबू दिली नाहीत, त्याचप्रमाणे तुम्ही देखील सुधीरभाऊंच्या नेतृत्वात विकासाचे पाऊल थांबू देऊ नका.

    Baahubali of development बल्लारपूरच्या ‘पॉवरफुल्ल’ विकासासाठी सुधीरभाऊंना अभूतपूर्व मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि तेलगू सुपरस्टार पवन कल्याण यांनी केले.

    चंद्रपुरात पवन कल्याण यांच्या रोड शो मध्ये उसळला जनसागर

    बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ डब्ल्यूसीएल कॉलनी मैदानावर श्री. पवन कल्याण यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. पवन कल्याण यांचे भाषण सुरू असताना प्रत्येक वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. त्यामुळे बल्लारपूरकरांनी अभूतपूर्व अश्या सभेचा अनुभव घेतला. Baahubali of development

    पवन कल्याण म्हणाले, ‘सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाच्या दृष्टीने बल्लारपूरचा प्रवास सर्वांगीण विकासाच्या दिशेने सुरू आहे. एसडीओ किंवा तहसील कार्यालय असो वा विमानतळासारखे बसस्थानकाचा निर्माण असो. येथील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे असो किंवा जातीपाती भेद न करता समाजातील प्रत्येक घटकाची सेवा करणे असो. सुधीरभाऊंनी प्रत्येक क्षेत्रात काम केले. त्यामुळे त्यांनी केलेली कामे लक्षात ठेवा आणि येत्या २० नोव्हेंबरला कमळ चिन्हाची बटण दाबून प्रचंड मतांनी त्यांना विजयी करा.’ sudhir mungantiwar

    सुधीरभाऊंनी चंद्रपूरला एसएनडीटी, स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र मतदारसंघात आणून मोठे काम केले आहे. भारताला आर्थिक महासत्ता होण्यासाठी आणि महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी अश्याप्रकारच्या केंद्रांचे मोठे योगदान राहणार आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सुधीरभाऊंनी अत्यंत महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, या शब्दांत पवन कल्याण यांनी ना. श्री. मुनगंटीवार यांच्या योगदानाचे कौतुक केले. Sudhir mungantiwar

    तेलगूसह मराठीतही भाषण

    पवन कल्याण यांनी तेलगूसह मराठीतही भाषण केले. सुरुवातीला त्यांनी ‘जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र’ असा जयघोष केला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींनाही त्यांनी मराठीतच अभिवादन केले. ‘ माझे मराठी शिकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी मराठी बोलताना चुकलो तर मला क्षमा करा. पांडुरंगाच्या वारीची परंपरा असणाऱ्या या महाराष्ट्रात मला प्रचारवारीसाठी येता आले, याचा आनंद आहे,’ अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. Sudhir mungantiwar

    पवन कल्याण यांच्या नावाने ‘कल्याण मंडपम्’ उभारणार – ना. श्री. मुनगंटीवार

    बल्लारपुरातील तेलगू बांधवांनी देशाची सेवा केली. तेलगू बांधवांच्या कल्याणासाठी मलाही तेलगू साहित्य अकादमीची स्थापना करता आले. मंदिर निर्माण करता आले. सामाजिक सभागृह उभारता आले. तेलगू बांधवांच्या संघटनेसाठी खूप काम केले आणि पुढेही करणार आहे. आता पवन कल्याण यांच्या नावाने बल्लारपुरात ‘कल्याण मंडपम्’ उभारणार आहे, अशी घोषणा ना. श्री. मुनगंटीवार यांनी केली. त्याचवेळी पवन कल्याण यांच्या आगमनाने व सभेत हजारों संख्येने उपस्थित तेलगू समाजाच्या आशीर्वादाने माझा विजय सुनिश्चित झाल्याची भावनाही ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. Sudhir mungantiwar

    बल्लारपूर विधानसभेच्या विकासासाठी कटिबद्ध

    बल्लारपूरसाठी तहसील कार्यालय, एसडीओ, ग्रामीण रुग्णालय उभारले. नगर परिषदेची इमारत बनवत आहे. बसस्टॅण्ड, सैनिक स्कुल, स्टेडियम, जलतरण केंद्र, नाट्य गृह,डिजीटल स्कुल बांधले. स्व. सुषमा स्वराज स्किल सेंटरची निर्मिती केली. यापुढेही बल्लारपूर मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

  • Warora Voters : कांग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांचा मतदारांशी थेट संवाद

    Warora Voters विधानसभेतील प्रचार अंतिम टप्प्यात असून प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचून आपल्या योजना समजवुन सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.

    Warora Voters महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण काकडे यांनी ग्रामीण भागातील मतदारांची संवाद साधून ग्रामीण भागातील विकासासाठी निवडून देण्याचे मतदारांना आवाहन केले आहे.

    उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या रोड शो मध्ये उसळला जनसागर


    मागील दहा वर्षाच्या काळात धानोरकर दांपत्यांनी वरोरा विधानसभेचा विकासाच्या माध्यमातून चेहरा बदलवीलेला आहे. येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात ग्रामीण भागातील विकासातील सातत्य व आणखी विकासात्मक योजना आणण्याकरिता आपण निवडून द्यावं असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण काकडे यांनी ग्रामीण भागातील प्रचारादरम्यान मतदारांना केले आहे.

    आम्ही विकासावर मते मागतो अपप्रचार करून नाही असे मत देखील प्रवीण काकडे यांनी व्यक्त केले. अपक्ष उमेदवारांना मत देणे म्हणजे भ्रष्टाचाराला चालना देणे असे देखील मत प्रचारांना दरम्यान त्यांनी व्यक्त केले. Congress candidate

    येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील नागरिकांची संवादातून माझी नाळ जुळून राहील व विकास करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन याकरिता आपण मला मतदान करावं असं मत देखील प्रवीण काकडे यांनी व्यक्त केले. वरोरा तालुक्यातील खांबाडा, टेंभुर्डा, नागरी, या ठिकाणी प्रवीण काकडे यांनी प्रचाराच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला.

  • nivadnuk padyatra : जोरगेवारांसाठी हंसराज अहिर मैदानात

    nivadnuk padyatra घुग्घूस येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी पदयात्रेतून प्रचार करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची प्रमुख उपस्थिती होती.

    nivadnuk padyatra आमदार किशोर जोरगेवार यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आव्हाहन हंसराज अहिर यांनी घुग्घूस येथील नागरिकांना केले. यावेळी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    डॉ.अभिलाषा गावतुरे यांना बहुजन समाज पक्षाचा पाठिंबा
    केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला असून, त्यांच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी प्रचार केला जात आहे. kishor jorgewar

    पदयात्रा आणि बैठकींच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत आणि आमदार किशोर जोरगेवार यांना विजय मिळवून देण्याचे आवाहन करत आहेत.


    दरम्यान, काल आमदार किशोर जोरगेवार आणि हंसराज अहिर यांनी घुग्घूस येथे पदयात्रा काढून प्रचार केला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि घुग्घूसवासियांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. kishor jorgewar


    सायंकाळी सात वाजता घुग्घूस शहरातील टिळक नगर येथून या पदयात्रेला सुरुवात झाली. नंतर दसरा मैदान, जे.जे. आयटीआय, वराडे हॉस्पिटल, जामा मस्जिद, घुग्घूस पोलीस स्टेशन, एस.सी.सी. रोड, मिरची मार्केट, फटाका कॉर्नर, पंचशील चौक मार्गे ही पदयात्रा नगर परिषदेच्या जलव विभागापर्यंत पोहोचली. यावेळी घुग्घूसवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

  • Voting awareness : लोकशाहीचा किल्ला मजबूत करा, मतदान करा

    Voting awareness एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ, मुंबईचे  महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपूर कॅम्पसच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत आज मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आले.

    पॉवर स्टार पवन कल्याण यांचा चंद्रपुरात रोड शो

    Voting awareness या उपक्रमाची सुरुवात बल्लारपूर बसस्थानक येथे पथनाट्य सादरीकरणाने झाली. कॅम्पसचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी बल्लारपूर बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक राकेश कांबळे यांचे स्वागत केले.

    सुमारे २०० नागरिकांनी पथनाट्य पाहून मतदानाचे महत्त्व समजून घेतले आणि त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली.

     विद्यार्थिनींनी शहीद भगतसिंह वॉर्डमध्ये घरोघरी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. सुमारे १००-१५० घरांमध्ये जाऊन त्यांनी मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले.

    यादरम्यान नागरिकांकडून मतदानासाठी उत्स्फूर्त पाठिंबा व्यक्त करण्यात आला. याशिवाय, नागरिकांना त्यांचे मत बजावण्याचे अधिकार आणि त्याच्या महत्त्वाची जाणीव करून दिली. Sndt woman university

    अभिलाषा गावतुरे यांना मिळाली बसपाची साथ

    रेल्वे स्थानकावर पथनाट्य सादर करताना सुमारे २५०-३०० लोकांनी पथनाट्य पाहिले. याठिकाणी उपस्थित नागरिकांनी फक्त पथनाट्य पाहून प्रेरणा घेतली नाही, तर त्यांच्याकडून मतदानाची प्रतिज्ञा घेण्यात आली. नागरिकांनी या प्रतिज्ञेमार्फत आपापले मतदानाचा हक्क न चुकवण्याचा निर्धार व्यक्त केला.

    कार्यक्रम पोलिस निरीक्षक श्री. गाडे यांच्या देखरेखीखाली पार पडला. निवडणूक विभाग, तहसील कार्यालय बल्लारपूरचे श्री. सचिन उमरे आणि नीरज बेहेरे यांचाही या उपक्रमात महत्त्वाचा सहभाग होता. Sndt woman university

    संपूर्ण कार्यक्रम कॅम्पसचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. सहाय्यक कुलसचिव डॉ. बाळू राठोड आणि समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांनी या उपक्रमाला विशेष प्रोत्साहन दिले.

    पथनाट्याचे सादरीकरण सहाय्यक प्राध्यापिका अपेक्षा पिंपळे आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्रुतिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली झाले, तर कार्यक्रम अधिकारी खुशबू जोसेफ यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

    राष्ट्रीय सेवा योजनेच्या या अभियानात विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतरांचे सहकार्य लाभले. Sndt woman university

    या अभियानाद्वारे नागरिकांना मतदानाची जबाबदारी समजावून सांगण्यात आली आणि त्यांना त्यांच्या लोकशाही हक्काचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले.

  • Pawan kalyan road show : उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा चंद्रपुरात रोड शो

    Pawan kalyan road show आंध्रप्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पावर स्टार पवन कल्याण हे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी 17 नोव्हेंबर, रविवारी चंद्रपूर दौऱ्यावर येत असून, दुपारी दीड वाजता रोड शोच्या माध्यमातून ते आमदार किशोर जोरगेवार यांचा प्रचार करणार आहेत.


    Pawan kalyan road show चंद्रपूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी भाजपचे स्टार प्रचारक चंद्रपूरात येत असून त्यांच्या सभांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

    बहुजन समाज पक्षाने दिला अपक्ष उमेदवार डॉ. गावतुरे यांना पाठिंबा

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या चंद्रपूर मतदारसंघात जाहिर सभा पार पडल्या आहेत. आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून होणारी विकासकामे प्राधान्याने करण्यात येतील, असा शब्द भाजप नेत्यांकडून प्रचार सभांमध्ये देण्यात आला आहे. Pawan kalyan road show


    दरम्यान, आंध्रप्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री, जनसेना पार्टीचे अध्यक्ष तथा पावर स्टार पवन कल्याण यांचा चंद्रपूर दौरा नियोजित करण्यात आला आहे. येत्या 17 नोव्हेंबरला, रविवारी ते आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ भव्य रोड शो करणार आहेत.

    आज डॉली चायवाला बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात

    दुपारी दिड वाजता बागला चौक, गांधी चौक, जटपूरा गेट, प्रियदर्शिनी चौक, तुकूम मार्ग, ट्रॅफिक ऑफिस, बसस्थानक मार्गे हा रोड शो एस.टी. वर्कशॉप येथे पोहोचणार आहे. येथे रोड शोचा समारोप होणार आहे. तरी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या रोड शोमध्ये सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

  • Support of BSP : डॉ. गावतुरे यांना विधानसभेत पाठविणार, बसपाचा पाठिंबा

    Support of BSP डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी ७२ बल्लारपूर विधानसभेमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्यापासून विविध सामाजिक संघटना विविध राजकीय पक्ष विविध पुरोगामी संघटना यांचा पाठिंबा रोज जाहीर होत आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी आणि निवडून येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.


    Support of BSP EVM मशीन वरील अनु क्र. 8 वर त्यांचे बोध चिन्ह किटली आहे. बसपा ही एससी, एसटी ,ओबीसी व धार्मिक अल्पसंख्यांक यांच्या सर्वांगीण विकासावर काम करणारी पार्टी आहे. डॉ. अभिलाषा गावतुरे या स्वतः बहुजन ओबीसी आहेत.

    केटलीच्या प्रचारासाठी डॉली चायवाला मैदानात

    प्रस्थापित पक्षाचा अल्पसंख्याक उमेदवारा विरुद्ध बहुजन समाजाचा त्या उमेदवार आहेत. त्यांना विधानसभेत पाठवून बहुजन समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी बहुजन समाज पार्टी त्यांना जाहीर पाठिंबा घोषित करीत आहे.


    आज देशात व राज्यामध्ये प्रतिगामी शक्तींनी हाहाकार माजवलेला आहे.भाजपा , कॉंग्रेस वाले ताई ची प्रतिमा मलीन करून पाहत आहे. हे आम्हास माहित आहे. डॉ. अभिलाषा ताई यांना मिळत असलेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद पाहून त्यांची झोप उडाली आहे. या मुळे विरोधी पक्ष ताई विरुद्ध भाजपाला अप्रत्यक्षपणे मदत करत आहेत अश्या अफवा पसरवत आहे. मात्र जनतेला सत्य माहित आहे. Support of BSP

    तेव्हा प्रस्थापित पक्षाचा अल्पसंख्याक उमेदवाराला हरविण्यासाठी व डॉ. अभिलाषाताई गावतुरे ह्यांना जिंकविण्यासाठी बहुजन समाज पार्टी च्या सर्व बूथ, सेक्टर, व विधानसभेतील पदाधिकारी ह्यांनी सहकार्य करावे असे आव्हान पक्षाद्रारे करण्यात येत आहे.


    प्रेस क्लब वरोरा नाका चंद्रपूर येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बसपाचे जिल्हाध्यक्ष शिरीष कुमार गोगुलवार यांनी पक्षाचा पाठिंबा डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांना जाहीर केला. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये रत्नाकर साठे जिल्हा उपाध्यक्ष आणि संजय मेश्राम जिल्हा सचिव तसेच डॉक्टर राकेश गावतुरे हजर होते. Support of BSP


    डॉ.अभिलाषा गावतुरे यांचे केवळ विधानसभा आणि जिल्ह्यामध्येच काम नाही, तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर देखील त्यांनी बऱ्याच मंचावर काम केलेले आहे आणि त्यामध्ये बहुजन समाजामध्ये त्यांनी केलेली कामे आणि त्यांनी दिलेले योगदान सुद्धा अतुलनीय आहे त्यांचं सामाजिक,शैक्षणिक,वैद्यकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान हे जिल्ह्यामध्ये अतुलनीय आहे. Support of BSP

    सामाजिक कार्यात त्यांनी कुठलेही जात पात धर्म लिंग पंथ प्रांत भाषा यांचा भेद न करता योगदान दिलेले आहे. अशा सक्षम बहुजन महिला ने बहुजन समाजाचे नेतृत्व विधानसभेमध्ये करावे. या विश्वासाने आम्ही समर्थन जाहीर करीत आहोत अशी प्रतिक्रिया गोगुलवार यांनी दिली.

  • Power star pawan kalyan : किशोर जोरगेवार यांना मिळाली पॉवर स्टार ची साथ

    Power star pawan kalyan आंध्रप्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पावर स्टार पवन कल्याण हे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी 17 नोव्हेंबर,  रविवारी चंद्रपूर दौऱ्यावर येत असून, सकाळी  11 वाजता रोड शोच्या माध्यमातून ते आमदार किशोर जोरगेवार यांचा प्रचार करणार आहेत.

    Power star pawan kalyan चंद्रपूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी भाजपचे स्टार प्रचारक चंद्रपूरात येत असून त्यांच्या सभांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात केटली च्या प्रचारासाठी येणार डॉली चायवाला

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या चंद्रपूर मतदारसंघात जाहिर सभा पार पडल्या आहेत. आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून होणारी विकासकामे प्राधान्याने करण्यात येतील, असा शब्द भाजप नेत्यांकडून प्रचार सभांमध्ये देण्यात आला आहे.

      दरम्यान, आंध्रप्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री, जनसेना पार्टीचे अध्यक्ष तथा पावर स्टार पवन कल्याण यांचा चंद्रपूर दौरा नियोजित करण्यात आला आहे. Power star pawan kalyan

    येत्या 17 नोव्हेंबरला, रविवारी ते आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ भव्य रोड शो करणार आहेत. सकाळी 11 वाजता बागला चौक, गांधी चौक, जटपूरा गेट, प्रियदर्शिनी चौक, तुकूम मार्ग, ट्रॅफिक ऑफिस,  बसस्थानक मार्गे हा रोड शो एस.टी. वर्कशॉप येथे पोहोचणार आहे. येथे रोड शोचा समारोप होणार आहे.

    तरी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या रोड शोमध्ये सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

  • Exclusive Dolly Chaiwala : केटलीच्या प्रचारासाठी डॉली चायवाला बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात

    Dolly Chaiwala बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील हॉटसीट असलेल्या लढतीमध्ये सोशल मीडिया स्टार डॉली चायवाला केटलीच्या प्रचारासाठी 17 नोव्हेंबर रोजी येणार आहे.

    Dolly Chaiwala बल्लारपूर मतदारसंघात भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार विरुद्ध कांग्रेसचे संतोष रावत विरुद्ध अपक्ष उमेदवार डॉ.अभिलाषा गावतुरे यांची तिरंगी लढत होणार आहे.

    वरोरा विधानसभा क्षेत्रात भाजपचा वाद चव्हाट्यावर

    नुकताच लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झालेले सुधीर मुनगंटीवार हे सातव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे, आधी कांग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होणार असे चित्र होते मात्र अपक्ष उमेदवार गावतुरे यांच्या एंट्रीने प्रस्थापित पक्षांना घाम फुटला आहे.

    प्रचाराच्या तोफा अंतिम टप्प्यात असून कांग्रेस, भाजप पक्ष आपल्या स्टार प्रचारकांना मतदारसंघात प्रचार करायला लावत आहे, चळवळी मधून सामाजिक व आता राजकीय क्षेत्रात उदयास आलेले नाव म्हणजेच डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या प्रचार सभेला मिळत असलेला प्रतिसाद बघता चहा ची केटली ने वातावरण तापविले अशी चिन्हे आहे.

    तापलेल्या राजकीय वातावरणात बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना चहा चा घोट पाजण्यासाठी नागपुरातील जगप्रसिद्ध डॉली चायवाला केटलीचा प्रचार करण्यासाठी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी दाखल होणार आहे.

    17 नोव्हेंबर रोजी भाजपचे स्टार प्रचारक आंध्रप्रदेश चे उपमुख्यमंत्री पवन कल्याण सुद्धा बल्लारपूर शहरात येत आहे आणि याच दिवशी सायंकाळी डॉली चायवाला यांचं आगमन होणार असून दोघांपैकी कुणाची चांगली क्रेज आहे हे समजेल.

  • Important decision of Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वाचा निर्णय

    Important decision of Sudhir Mungantiwar मुल शहराच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून आजपर्यंत कार्य करीत आलो आहे. या क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी रोजगार, आरोग्य, कृषी, शिक्षण, सिंचन या पंचसूत्रीवर भर देण्यात येत आहे.

    Important decision of Sudhir Mungantiwar भविष्यात विकासाच्या मालिकेत मुल शहर वेगाने पुढे जाईल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. मुल येथे नागरिकांशी संवाद साधताना ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते.

    चंद्रपुर जिल्ह्यात भाजपचा वाद चव्हाट्यावर

    आरोग्य सेवा अद्ययावत करण्यासाठी मुल व पोंभूर्णा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सात उपकेंद्रांना मंजुरी दिली. मुल येथे 107 कोटी रुपये खर्चून 100 खाटांच्या सर्व सोयीसुविधायुक्त रुग्णालयाची निर्मिती होत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील मुलींना व्यावसायिक शिक्षणात शंभर टक्के शुल्क सवलत देण्यात येत आहे.

    अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रात काम होत आहे.शहरी भागातील आदिवासी बांधवांसाठी शबरी आवास योजना लागू करण्यात आली असून आवास योजनेचे अनुदान 2.50 लाखापर्यंत वाढविण्यात आल आहे.असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

    गरिबांसाठी आरोग्य शिबिरे, नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन केले. गरजूंच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. अतिवृष्टीमध्ये नागरिकांना आर्थिक सहकार्य केले. Important decision of Sudhir Mungantiwar

    दिव्यांगांना सायकल तसेच महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले. सर्वसामान्य घटकातील नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम केले, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

    कांग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर उघड करा – सुधीर मुनगंटीवार

    कांग्रेसच्या सत्तेच्या काळात विकासकामे झाली नाही

    या राज्यामध्ये 2 वर्षे 8 महिने काँग्रेसचे सरकार होते. काँग्रेसचा खासदार व पालकमंत्री असताना देखील विकास कामे केली नाहीत. मुल शहरातील जनता जातीपातीच्या राजकारणाला मत न देता, मुल शहराच्या विकासाला आणि स्वतःच्या उज्ज्वल भविष्याला मत देतील, असा विश्वास ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. Important decision of Sudhir Mungantiwar

    मुलच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

    मुल शहराचा चेहरा मोहरा बदलविण्यासाठी 80 टक्के रस्ते बांधून पूर्ण केले. येत्या पाच वर्षात शिल्लक रस्ते बांधून पूर्ण होतील. मुलमध्ये शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज उघडण्याचा निर्णय करण्यात आला आहे. तसेच मुल बायपासचा विषय निकाली काढण्यात येणार असून रेल्वे गेटवर ब्रिज करण्यास प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

    15 लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज

    मुल-पोंभुर्णाच्या मध्ये भारतातील सर्वात मोठा पोलाद उद्योग उभा राहत असून येथील तरुणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. बचत गटासाठी बाजारपेठ उभारून महिला  सक्षमीकरणाचा प्रयत्न राहील. येत्या मार्च महिन्यातील अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होऊन वर्षभरात कर्जमाफी करण्याचा निर्णय करण्यात येणार आहे. Important decision of Sudhir Mungantiwar

    विविध जाती प्रवर्गातील तरुण- तरुणींना 15 लाखापर्यंतचे व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला असल्याचेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.