Tag: MH34

  • Amit Shah Rally : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चंद्रपुरात

    Amit Shah Rally आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या शुक्रवारी चंद्रपूर दौऱ्यावर असून, चांदा क्लब येथील भव्य मैदानात त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात घडला संतापजनक प्रकार


    Amit Shah Rally महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी भाजपचे स्टार प्रचारक चंद्रपूरात येत असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची चंद्रपूर आणि घुग्घुस येथे भव्य सभा पार पडली आहे. तर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

    चंद्रपुरात 950 कोटीचा फ्लायओव्हर

    संध्याकाळी 4 वाजता सदर सभा आयोजित करण्यात आली असून, चांदा क्लब मैदानात ही सभा पार पडणार आहे. या सभेची जय्यत तयारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. सभेला महायुतीचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. Amit Shah Rally

    मार्गात बदल

    15 नोव्हेंबर 2024 रोजी चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या सभेकरीता नागरीकांची  मोठया प्रमाणात  गर्दी होण्याची  शक्यता आहे. त्याकरीता महाराष्ट्र पोलिस अधिनियम -1951 च्या कलम-33 (1) (ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व नियमणासाठी  जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचे आदेश निर्गमित केले आहे. Amit Shah Rally

    15 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत वरोरा नाका ते मित्र नगर चौक तसेच पाण्याची टाकी ते वरोरा नाका पर्यंतचा मार्ग हा सर्व प्रकारच्या वाहनाकरीता बंद राहील. वरील दोन्ही मार्ग ‘नो पार्कींग व नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित  करण्यात येत आहे. तरी सदर मार्गावर  कोणत्याही नागरीकांनी वाहने पार्कींग करु नये. तसेच या मार्गावर कोणीही दुकाने / हातठेले लावू नये असे आदेशात नमुद आहे.

    आवश्यकतेनुसार अधिसुचनेच्या मार्गामध्ये व वेळेमध्ये बदल करण्यात येईल. या कालावधीत सर्व वाहतूकदारांनी पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा. Amit Shah Rally

              1.  सदरच्या कालावधीत नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने वरोरा नाका- उड्डान पुल, सिध्दार्थ हॉटेल-बस स्टॅड – प्रियदर्शनी  चौक मार्गे किंवा जिल्हाधिकारी निवासस्थान मार्गे जिल्हा स्टेडियम – मित्र नगर चौक- संत केवलराम चौक मार्गे शहरामध्ये प्रवेश जातील.

            2.  सदरच्या कालावधीत  शहरातून बाहेर जाण्यासाठी नागरिकांनी जटपुरा गेट – प्रियदर्शनी चौक – बसस्टॅण्ड चौक- सिध्दार्थ हॉटेल- उड्डाण पुल –वरोरा नाका मार्गे किंवा संत केवलराम चौक – मित्र नगर चौक – जिल्हा स्टेडियम – जिल्हाधिकारी निवासस्थान मार्गे बाहेर जातील.

          नागरिकांनी सदर अधिसूचनेचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.

  • abhilasha gaoture banner : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात पुन्हा घडला संतापजनक प्रकार

    abhilasha gaoture banner निवडणूक म्हटली की राजकारण, मात्र आता राजकारणाची पातळी खालच्या स्तरावर गेली आहे.

    abhilasha gaoture banner निवडणुकीत बलाढ्य उमेदवारांच्या पुढे सामान्य कार्यकर्ता उभा राहिला तर काही अडचणी जरूर निर्माण होतात मात्र सामान्य कार्यकर्त्याला जेव्हा मतदारांचा जबरदस्त पाठिंबा मिळतो त्यावेळी बलाढ्य उमेदवार हा घाबरतो आणि त्यावेळी राजकारण खालच्या स्तरावर जाते.

    तर चंद्रपुरात 950 कोटीचा फ्लायओव्हर

    अशीच एक घटना बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सतत घडत आहे, या विधानसभा क्षेत्रात भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत हे कांग्रेसकडून उमेदवार आहे तर दोघांनाही या निवडणुकीत अपक्ष महिला उमेदवार डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. abhilasha gaoture banner

    कमळ आणि पंजा पेक्षा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात केटली ने वातावरण टाईट केले आहे, दिवसेंदिवस गावकऱ्यांचा वाढता पाठिंबा प्रस्थापित पक्षांच्या पायाखालची वाळू सरकवीत आहे.

    त्यामुळे अभिलाषा गावतुरे यांच्या बॅनर वर 2 दिवसांपूर्वी शेण फेकण्यात आले तर आता त्यांचे बॅनर फाडण्याचे काम सुरू आहे. या प्रकारामुळे गावतुरे यांच्या विषयी सहानुभूतीची लाट पसरत आहे.

    महिला उमेदवाराला बलाढ्य उमेदवार विरोधात लढत देताना कशाप्रकारे खच्चीकरण केल्या जात आहे असे उदाहरण बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात बघायला मिळत आहे. abhilasha gaoture banner

    अपक्ष महिला उमेदवारांच्या बॅनर वर शेणाचा मारा

    डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी कांग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली होती मात्र धनशक्ती च्या मोठ्या वापराने त्यांची उमेदवारीला बगल देण्यात आला, मात्र एखाद्या रणरागिणीप्रमाणे गावतुरे यांनी दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा आधार न घेता अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्धार करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

    विशेष बाब म्हणजे डॉ. गावतुरे यांचं नाव बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी काही नवे नाही, त्यांनी भूमिपुत्र ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य या क्षेत्रात केले, त्यामुळे आता नागरिकांनी गावतुरे यांना पाठबळ देण्याचे काम सुरू केले आहे. abhilasha gaoture banner

    त्यांच्या कार्याची दखल व मतदारसंघात आता बदल हवा या भावनेमुळे नागरिक त्यांना प्रचंड प्रमाणात पाठिंबा दर्शवित आहे, त्यामुळे विरोधी पक्ष त्यांच्या प्रचारातील आघाडीला ब्रेक लावण्याचे काम करीत आहे. येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी या सर्व घटनेच्या विरुद्ध मतदार मतदानातून उत्तर देणार असा विश्वास अपक्ष उमेदवार डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी व्यक्त केला आहे.

  • chandrapur ring road : तर चंद्रपुरात 950 कोटींचा फ्लायओव्हर

    chandrapur ring road किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार असताना त्यांनी चंद्रपूर विधानसभेचा प्रचंड मोठा विकास केलेला आहे. आता ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही किशोर जोरगेवार यांना प्रचंड मताधिक्याने निवडून पाठवल्यास या विधानसभेचा चेहरा मोहरा बदलेल हा माझा विश्वास आहे. 

    सुधीर मुनगंटीवार यांचं दमदार भाषण

    चंद्रपूर विधानसभा नव्हे तर चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रातील नंबर एकचा समृद्ध व संपन्न असा जिल्हा होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.  chandrapur ring road

    किशोर जोरगेवार पुन्हा विधानसभा मध्ये पोहचल्यास चंद्रपूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पूर्णपणे मिटणार कारण 950 कोटींचा उड्डाणपूल निवडणुकीनंतर मंजूर करू असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

    केंद्र व राज्यातील डबल इंजिन फक्त धुव्वा उडविण्याचे काम करतो – सचिन पायलट

    नितीन गडकरी म्हणाले की आपल्याला जेव्हा आजार होतो तेव्हा आपण सर्वोत्तम डॉक्टर कोणता आहे हे पाहून त्यांच्याकडे उपचार घेत असतो. त्यामुळे आता निवडणुकीमध्ये सुद्धा जात-पात धर्म ,पंथ न पाहता किशोर जोरगेवार यांच्यासारखा सर्वोत्तम नेता आपण निवडायला हवा. chandrapur ring road

    इतर वेळेस आपण कधीही जात पाहत नाही तर निवडणुकीच्या वेळेस आपण जात पाहून मतदान का करायचे? असा प्रश्न नितीन गडकरी यांनी उपस्थितांना केला. भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर या देशामध्ये 67 योजना कार्यान्वित आहेत आणि राज्याच्याही विविध योजना आहेत. या सर्व योजनांचा लाभ घेत असताना कोणत्याही जात-पात धर्म, पंथाचा  विचार न करता या योजना सगळ्यांना लागू केल्या जातात.

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील अपक्ष महिला उमेदवार यांच्या बॅनर वर शेणाचा मारा

     त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळात सुद्धा या देशाचा विकास घडवून आणण्यासाठी शेवटच्या माणसाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी रेकॉर्ड ब्रेक करत किशोर जोरगेवार यांना आपण निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. chandrapur ring road

    भाजपच्या बॅनर वरून संपर्क प्रमुखाचा फोटो गायब

    मागील लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने संविधान बदलणार हा खोटा प्रचार करत लोकांची दिशाभूल केली. वास्तविक पाहता आणीबाणीच्या काळामध्ये आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाने संविधानात सगळ्यात जास्त बदल केले असून आज हाच पक्ष संविधान बदलण्याची भीती लाल संविधानाची प्रत हातात घेऊन लोकांना दाखवतो आहे. 

    संविधानात कोणीही बदल करू शकत नाही. संविधानातील मूलभूत तत्व याला कोणीही बदलू शकत नाहीत. आणि आम्ही ते बदलवू सुद्धा देणार नाही . त्यामुळे नागरिकांनी आता या खोट्या प्रचाराला बळी न पडता योग्य उमेदवार व योग्य पक्ष निवडून देणे या देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेली गरज आहे असे मनोगत यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. (chandrapur ring road)

    16 नोव्हेंबर रोजी कांग्रेस खासदार राहुल गांधी यांची चिमुरात सभा

    काँग्रेसने 65 वर्षात जे काम केले नाही ते भारतीय जनता पार्टीने गेल्या दहा वर्षात केलेले आहे. देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विविध योजना देशाच्या मूलभूत सोयी सुविधा आणि युवकांना रोजगार मिळेल अशा दृष्टिकोनातून विविध प्रकल्प येणाऱ्या काळात निर्माण होत आहेत. (chandrapur ring road)

    देश आज विकासाच्या दिशेने जातो आहे. त्यामुळे आपणही मतदान करत असताना विकासाच्या दृष्टिकोनातून काम करणाऱ्या सरकारला मतदान करावे असे आवाहन गडकरी यांनी केले. 

    यावेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची अनेक वर्षापासून इच्छा होती. परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने हा योग जुळून आला असे भावनिक मत व्यक्त केले. अपक्ष असतानाही सरकारच्या सोबत असल्याने या विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी मला मिळाली. 

    घुघुस ग्रामपंचायत ला नगरपरिषद चा दर्जा मिळावा अशी येथील नागरिकांची ईच्छा होती. त्यादृष्टीने काम पूर्णत्वाला नेण्याचा मी प्रयत्न केला त्याला यश मिळाले. शिवाय ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती तथा उड्डाणपूल निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच हे काम पूर्णत्वाला जाणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आपला आशीर्वादाचा हात माझ्या पाठीशी असाच कायम राहावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. (chandrapur ring road)

    चंद्रपूरच्या वाहतूक समस्ये बाबत आमदार किशोर जोरगेवार हे माझ्याशी नेहमीच चर्चा करीत असतात. या समस्येवर आपण उपाय काढावा याबाबतही त्यांनी मला बरेचदा सांगितले आहे. त्या दृष्टीने चंद्रपूरला निवडणूकीनंतर लवकरच नवीन फ्लाय ओव्हर बांधण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. ( chandrapur ring road) पडोली  समोरून बंगाली कॅम्प असा हा फ्लाय ओव्हर असणार आहे.

             

         

  • Sudhir mungantiwar speech : सुधीर मुनगंटीवार यांचं दमदार भाषण

    sudhir mungantiwar speech राजकारणात अपघाती मित्र व मित्रातील अनेक शत्रू असतात मात्र या सर्व शत्रू-मित्रांच्या पलीकडे अवलिया राजकारणी म्हणून सुधीर मुनगंटीवार यांचं नाव आहे.


    Sudhir mungantiwar speech आमदार व त्यानंतर मंत्री पदी विराजमान झालेले भाऊ यांनी कधीही कसल्याही जाती-पातीत भेदभाव केला नाही, उलट सर्व समाजाच्या व्यक्तींच्या मूलभूत गरजा कश्या पूर्ण होतील याकडे विशेष लक्ष दिले. याचाचं आशीर्वाद म्हणून जनतेने तब्बल 6 वेळा मुनगंटीवार यांना विधानसभेत पाठविले, आज बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून ते 7 व्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

    भाजपच्या बॅनर वरून संपर्क प्रमुखाचा फोटो गायब


    सध्या प्रचारसभा अंतिम टप्प्यात असून स्टार प्रचारकांच्या जिल्ह्यात फेऱ्या वाढल्या आहे, आपल्या प्रचार दौऱ्यात व्यस्त असलेले मुनगंटीवार यांचं दुर्गापुरातील भाषण चांगलेच गाजलं असून त्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे. Sudhir mungantiwar speech


    13 नोव्हेंबर रोजी दुर्गापुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती, या सभेत मुनगंटीवार यांनी आम्हीच फक्त विकासाचे राजकारण करणारे आहो, मग तो कसल्याही जाती-पातीचा असू दे त्यांचं काम पूर्णत्वास यायला हवं यासाठी मी प्रयत्नशील असतो. Sudhir mungantiwar speech

    अपक्ष उमेदवारांच्या बॅनर वर शेणाचा मारा

    आज चंद्रपूर जिल्ह्यात असंख्य विकासाची कामे झाली आहे, आज विरोधी पक्ष विचारतो मुनगंटीवार यांनी कसला विकास केला? कांग्रेस वाल्यांनो आपण माझ्या मतदारसंघातील ज्या विश्रामगृहात बसता ते माझ्या कार्यकाळात निर्माण झालं, आपण ज्या रस्त्यावरून पायी चालताना प्रचार रॅली काढत आहे, तो सुद्धा आम्ही निर्माण केला आहे.


    ज्या तहसील कार्यालयात आपण उमेदवारी अर्ज भरला ते कार्यालय सुद्धा आमच्या काळात निर्माण झालं, आम्ही विकासाला चालना दिली आणि तुम्ही जातीचे विष पाजण्याचे काम केले.


    आपल्या भाषण दरम्यान मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात केलेल्या विकासकामांची आपल्या शैलीत यादी वाचली, मी केलेलं काम म्हणजे विकास नाही का? असा प्रश्न उपस्थित करीत दारूचं दुकान काढणं याला कांग्रेस पक्ष विकास म्हणतो. अशी टीका मुनगंटीवार यांनी यावेळी केली.


    20 नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे, मात्र त्यापूर्वी सत्ताधारी व विरोधीपक्ष एकमेकांवर ताशेरे ओढताना दिसत आहे, या राजकीय युद्धात मुनगंटीवार यांचं भाषण म्हणजेच विरोधकांना चारही मुंड्या चित करणारं आहे हे मात्र नक्कीचं.

  • Exclusive sachin pilot : या इंजिनचा फक्त धुव्वा उडतो – सचिन पायलट

    sachin pilot भद्रावती – महायुती सरकार च्या काळात भ्रष्टाचार फोफावला, केंद्र व महाराष्ट्र राज्यातील सरकारला हे डबल इंजिन सरकार म्हणून सांगतात पण डबल इंजिन सरकार कामाचे नसून फक्त धुव्वा उडविण्याचे काम करीत आहे म्हणून महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडी चे सरकार आणून महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन सचिन पायलट यांनी आज केले.

    अपक्ष महिला उमेदवार यांच्या बॅनर वर फेकले शेण

    Sachin pilot भद्रावती येथील स्वागत सेलिब्रेशन येथे आयोजित महाविकास आघाडीचे उमेदवार प्रविण काकडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राजस्थान चे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती.

    सभेदरम्यान आपले मत व्यक्त करताना सचिन पायलट म्हणाले कि, महाराष्ट्र हा देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारे राज्य असून या ठिकाणी धर्म निरपेक्ष सरकार म्हणून महाविकास आघाडीतील प्रत्येक उमेदवाराला निवडणून आणणे हे आपली जबाबदरी आहे.

    वरोरा विधानसभेतील उमेदवार प्रवीण काकडे हे जनसामान्यांचे नेतृत्त्व करणारे उमेदवार म्हणून आपल्या समोर आहे. विकासातील सातत्य व भविष्यातील विधानसभा क्षेत्राच्या विकासाकरीता महाविकास आघाडीने आपल्या समोर योग्य उमेदवारी दिली आहे. तरी आपण यांच्या पाठाशी राहून या विधानसभेत पुन्हा एकदा विक्रम घडवावा असे आवाहन यावेळी सचिन पायलट यांनी केले आहे. Sachin pilot

    महायुती सरकार च्या काळात महिलांवर होणारे अन्याय अत्याचार वाढले असून भ्रष्टाचार देखील फोपावला आहे. राज्यातील अनेक उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहे. शेतकऱ्यासाठी 3 काळे कायदे केंद्र सरकारने आणले होते त्याविरोधात हजारो शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले होते. त्या आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर केंद्र सरकारला काळे कायदे परत घ्यावे लागले होते, केंद्र व राज्य सरकारचे डबल इंजिन फक्त धुव्वा फेकण्याचे काम करीत आहे.

    राज्यातील विकासाचे ध्येय ठेवून कार्य करणाऱ्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान करुन सत्ता परिर्वनाच्या लढाईत आपला सहभाग नोंदवावा, असे मत देखील यावेळी सचिन पायलट यांनी केले. यावेळी मंचावर खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, यांसह महाविकास आघाडीचे अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

  • House Voting : चंद्रपूर जिल्ह्यात 2080 नागरिकांनी केले मतदान

    House Voting चंद्रपूर : सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

    House voting याच अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात यंत्रणेने नागरिकांच्या घरी जाऊन मतदान घेतले. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 2080 मतदारांनी गृहमतदान करून समाधान व्यक्त केले. यात 85 वर्षांवरील 1711 मतदारांचा तर 369 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.

    अपक्ष उमेदवारांच्या बॅनर वर शेणाचा मारा

    असे आहे विधानसभानिहाय गृहमतदान : राजूरा विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 85 वर्षांवरील 478 मतदारांनी आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या 53 अशा एकूण 531 मतदारांनी गृहमतदान केले.

    चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 197 आणि दिव्यांग 24 असे एकूण 221 मतदारांनी गृहमतदानात सहभाग घेतला. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 238 आणि दिव्यांग 84 असे एकूण 322 मतदारांनी, ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 251 आणि दिव्यांग 79 असे एकूण 330 मतदारांनी, चिमूर विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 265 आणि दिव्यांग 64 असे एकूण 329 मतदारांनी तर वरोरा विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 282 आणि दिव्यांग 65 असे एकूण 347 मतदारांनी गृहमतदान केले. House voting

    मतदानाची गोपनीयता : गृह मतदान करतांना मतदान प्रक्रियेची गोपनीयता पाळण्याच्या सुचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार फॉर्म 13 – ए (डिक्लरेशन), फॉर्म 13 – बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म 13 – सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म 13 – डी (मतदान कसे करायचे याबाबत सुचना) आदी प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचा-यांनी सुरवातीला मतदारांना माहिती दिली. यावेळी घरामध्ये स्थापन केलेल्या मतदान कक्षामध्ये सदर मतदारांनी आपले मत नोंदविले. यावेळी मतदान करतांना कोणताही दुसरा व्यक्ती त्यांच्याजवळपास नव्हता. House Voting

    मतपत्रिका घडी केल्यानंतर सदर मतपत्रिका छोट्या लिफाफामध्ये आणि नंतर मोठ्या लिफाफामध्ये टाकून मतपेटीत जमा करण्यात आली.

  • Abhilasha gaoture campaign : अपक्ष उमेदवार यांच्या बॅनर वर शेणाचा मारा

    Abhilasha gaoture campaign विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहचली असून उमेदवार पायात भिंगरी घालून प्रचार करीत आहे.

    Abhilasha gaoture campaign बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील लढत आता चुरशीची झाली असून या लढती मध्ये अपक्ष उमेदवार डॉ.अभिलाषा गावतुरे यांच्या उमेदवारीने विरोधी पक्ष धास्तावला असून आता खालच्या पातळीचे राजकारण सुरू झाले आहे, गावतुरे यांच्या बॅनर वर शेणाचा मारा केल्याची बाब उघडकीस आली आहे.

    भाजपच्या बॅनर वरून सम्पर्क प्रमुखाचा फोटो गायब

    बल्लारपूर(72) मतदार संघातून डॉ. अभिलाषाताई गावतुरे या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत.
    डॉ.गावतुरे यांची मतदारसंघामध्ये दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत असून त्यांना समाजातील सर्व स्तरातून विशेषातः युवा, शेतकरी,शेतमजूर, दलित, आदिवासी, ओबीसी, महिला,डॉक्टर,वकील तथा पुरोगामी विचारवंतांचा जोरदार पाठिंबा मिळत आहे. Abhilasha gaoture campaign

    एक महिला कणखर नेतृत्व म्हणून त्या पुढे येत आहेत. त्यामुळे आपला पराभव होते की काय या धास्तीमुळे त्यांचे विरोधक नीच स्थरावर जाऊन प्रचार करीत आहेत. कुठे त्यांच्या लावलेल्या बॅनरवर शेणफेक करण्यात आली तर कुठे त्यांचे बॅनर फाडून त्यांचा अपमान करण्यात आला.


    असाच महिलांचा अपमान येथील विद्यमान आमदार यांनी लोकसभेच्या प्रचार दरम्यान केला होता व त्यामुळे लोकांनी विशेषातः महिलांनी त्यांना त्यांची जागा दाखविली त्यांचा दारून पराभव झाला.त्यामुळे डॉ. अभिलाषा ताईच्या बॅनरवर जी शेणफेक झालेली, त्यामागे कोण प्रस्थापित आहेत हे आता लपून राहिलेले नाही.


    आणी तसे जर असेल तर अगोदरच एका महिले कडून लोकसभेत एका प्रस्थापिताचा पराभव झाला. यावेळी सुद्धा या प्रस्थापितांचा पराभव एक महिलाच करेल असे बोलले जात आहे.

  • BJP banner controversy : भाजपच्या बॅनर वरून संपर्क प्रमुखाचा फोटो गायब

    BJP banner controversy चंद्रपूर : जिल्ह्यात वरोरा विधानसभा क्षेत्राकडे सध्या नागरिकांचे लक्ष लागले आहे. यामध्ये वरोरा विधानसभा क्षेत्रातून भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले आणि भाजप विधानसभा संपर्क प्रमुख असलेल्या डाॅ. रमेश राजूरकर यांचा भाजप उमेदवाराच्या प्रचार बॅनरवर फोटो नसल्याने चर्चांना उधान आले आहे.

    BJP banner controversy विशेष म्हणजे, धनोजे कुणबी चेहरा म्हणून भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत
    त्यांचा पक्ष प्रवेश करून घेत त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या.

    16 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांची चिमुरात सभा


    वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपने करण देवतळे यांना उमेदवारी दिली आहे. येथून निवडणूक लढविण्यासाठी धनोजे कुणबी समाजात सक्रीय असलेले भाजपचे डाॅ. रमेश राजूरकर इच्छुक होते. मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी नाकारून देवतळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर डाॅ. राजुरकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र ओबीसी आयोगाचे अध्यक्ष माजी मंत्री हंसराज अहीर, सांस्कृतिक तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. BJP banner controversy

    विशेष म्हणजे, २०१९ मध्ये राजुरकर यांनी मनसेकडून विधानसभा निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांना ३४ हजारांवर मते मिळाली. त्यानंतर भाजपचे लक्ष त्यांच्याकडे गेले आणि विधानसभा क्षेत्रातील कुणबी चेहरा म्हणून त्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करीत पक्ष प्रवेश करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर विधानसभा संपर्क प्रमुखासह विविध जबाबदाऱ्या देण्यात आले. BJP banner controversy

    वरोरा विधानसभा क्षेत्र धनोजे कुणबी बहुल असल्याने त्याचा फायदा भाजपला झाला. मात्र विधानसभा निवडणुकीत डाॅ. राजुरकर यांना तिकीट नाकारत आता भाजप उमेदवाराच्या प्रचार बॅनरवर साधा फोटोही नसल्याने या विधानसभा क्षेत्रामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

    उमेदवारी मिळाली नसल्याने राजूरकर नाराज असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे कुणबी चेहरा असलेल्या राजुरकर यांच्या नाराजीचा कोणाला फायदा होतो आणि कोणाला तोटा याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.


    २०१९ मध्ये ३४ हजारांवर मते

    २०१९ ची विधानसभा निवडणूक झाली यावेळी वरोरा विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून डाॅ. रमेश राजूरकर यांनी निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांना ३४ हजार ८४८ मते मिळाली होती. विशेष म्हणजे, या निवडणुकीनंतर राजुरकर यांच्या घरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली होती.

  • Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज चंद्रपुरात

    nitin gadkari चंद्रपूर – बल्लारपूर व चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार व किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ 13 नोव्हेंबर 2024 ला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, विकासपुरूष ना. श्री. नितीन गडकरी यांची जाहीर सभा दुर्गापूर व घुग्गुस जिल्हा चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

    Nitin gadkari देशभर रस्ते आणि पुलांचे जाळे निर्माण करून पायाभूत सुविधांना उभारी देणारे केंद्रीय मंत्री विकासपुरूष ना. श्री. नितीन गडकरी दुर्गापूर येथिल कार्यक्रमाला 13 नोव्हेंबरला उपस्थित राहणार आहे.

    शक्तीनगर दुर्गापूर येथे डब्ल्यूसीएल कॉलनीजवळील गणेश मैदानात सकाळी 11 वाजता तर दुपारी दीड वाजता घुग्घुस येथील बसस्थानकाजवळील लॉयड मेटल परिसरात ना. श्री. नितीन गडकरी नागरिकांशी संवाद साधतील.

    क्रांतिभूमी चिमुरात राहुल गांधी यांची जाहीर सभा

    भाजपा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार व किशोर जोरगेवार यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजीत केंद्रिय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या जाहीर सभेला जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

  • Rahul Gandhi Rally : क्रांतिभूमी चिमुरात राहुल गांधी यांची सभा

    Rahul Gandhi Rally विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात आता स्टार प्रचारकांच्या एन्ट्रीने नवी चुरस निर्माण झाली आहे.


    Rahul gandhi rally चंद्रपूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते भाजप खासदार रवि किशन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर कांग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक आता उमेदवारांच्या प्रचारार्थ रणांगणात उतरले आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विरुद्ध मोहीम, तब्बल 300 गुन्हे दाखल


    कांग्रेसचे कन्हैया कुमार नंतर आता कांग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांची चिमूर येथे जाहीर सभा होणार आहे.
    16 नोव्हेंबर रोजी चिमूर तालुक्यातील नेरी रोड जवळ कांग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.


    20 नोव्हेंबर मतदानाचा दिवस असून त्यापूर्वी कांग्रेस व भाजप पक्षाचे स्टार प्रचारक आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी दाखल होत आहे.
    12 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चिमूर मध्ये सभा आयोजित करण्यात आली होती.


    पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मार्गदर्शनात कांग्रेसवर जोरदार टीका केली आता त्या टीकेवर राहुल गांधी काय उत्तर देतात याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष असेल.
    चिमूर विधानसभा क्षेत्रातील कांग्रेसचे उमेदवार सतीश वारजूरकर यावेळी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यांच्यासमोर भाजपचे बंटी भांगडिया विजयाची हॅट्रिक मारण्याच्या तयारीत आहे. त्यांच्या विजयी रथाला वारजूरकर यंदा जोरदार आव्हान देताना दिसत आहे.