BJP banner controversy चंद्रपूर : जिल्ह्यात वरोरा विधानसभा क्षेत्राकडे सध्या नागरिकांचे लक्ष लागले आहे. यामध्ये वरोरा विधानसभा क्षेत्रातून भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले आणि भाजप विधानसभा संपर्क प्रमुख असलेल्या डाॅ. रमेश राजूरकर यांचा भाजप उमेदवाराच्या प्रचार बॅनरवर फोटो नसल्याने चर्चांना उधान आले आहे.
BJP banner controversy विशेष म्हणजे, धनोजे कुणबी चेहरा म्हणून भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत
त्यांचा पक्ष प्रवेश करून घेत त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या.
16 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांची चिमुरात सभा
वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपने करण देवतळे यांना उमेदवारी दिली आहे. येथून निवडणूक लढविण्यासाठी धनोजे कुणबी समाजात सक्रीय असलेले भाजपचे डाॅ. रमेश राजूरकर इच्छुक होते. मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी नाकारून देवतळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर डाॅ. राजुरकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र ओबीसी आयोगाचे अध्यक्ष माजी मंत्री हंसराज अहीर, सांस्कृतिक तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. BJP banner controversy
विशेष म्हणजे, २०१९ मध्ये राजुरकर यांनी मनसेकडून विधानसभा निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांना ३४ हजारांवर मते मिळाली. त्यानंतर भाजपचे लक्ष त्यांच्याकडे गेले आणि विधानसभा क्षेत्रातील कुणबी चेहरा म्हणून त्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करीत पक्ष प्रवेश करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर विधानसभा संपर्क प्रमुखासह विविध जबाबदाऱ्या देण्यात आले. BJP banner controversy
वरोरा विधानसभा क्षेत्र धनोजे कुणबी बहुल असल्याने त्याचा फायदा भाजपला झाला. मात्र विधानसभा निवडणुकीत डाॅ. राजुरकर यांना तिकीट नाकारत आता भाजप उमेदवाराच्या प्रचार बॅनरवर साधा फोटोही नसल्याने या विधानसभा क्षेत्रामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
उमेदवारी मिळाली नसल्याने राजूरकर नाराज असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे कुणबी चेहरा असलेल्या राजुरकर यांच्या नाराजीचा कोणाला फायदा होतो आणि कोणाला तोटा याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
२०१९ मध्ये ३४ हजारांवर मते
२०१९ ची विधानसभा निवडणूक झाली यावेळी वरोरा विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून डाॅ. रमेश राजूरकर यांनी निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांना ३४ हजार ८४८ मते मिळाली होती. विशेष म्हणजे, या निवडणुकीनंतर राजुरकर यांच्या घरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली होती.
Leave a Reply