Tag: MH34

  • cast your vote : खासदार धानोरकर यांनी मतदारांना दिला हा खास संदेश

    cast your vote लोकशाहीच्या पर्वणीचा सुंदर दिवस म्हणजे मतदानाचा दिवस. आज आपण सर्वांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे. 

    बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांवर गुन्हे दाखल

    Cast your vote आपल्या क्षेत्रातील प्रश्न, क्षेत्रांचा सर्वांगीण विकास, त्यासोबतच संविधानाने दिलेल्या अधिकाराचा परिपूर्ण वापर करण्यासाठी आपण सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करावं, तसेच नव मतदारांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असून भविष्याचा वेध घेण्यासाठी आपलं मतदान अत्यंत आवश्यक आहे.

    यासाठी सर्वांनी घराबाहेर पडून मतदानाचा टक्का वाढवावा व लोकशाहीचा उत्सव साजरा करावा असे आवाहन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे.

    मतदानासाठी येणाऱ्या अडचणीं करिता प्रशासनाची मदत घेऊन मतदान यादीतील आपले नाव तपासून मतदान करावे असे देखील आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

  • Political crimes : अखेर गुन्हे दाखल

    Political crimes मुल पोलिस स्टेशन हद्दितील मौजा कोसंबी गावात 18 नोव्हेंबर रोजी दोन राजकीय पक्षाचे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यात झालेल्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत.

    Political crimes त्या अनुषंगाने कुठल्याही पक्षाने किंवा नागरिकांनी याबाबतीत अफवा न पसरविण्याचे तसेच निवडणुक संबंधी कुठलीही तक्रार असल्यास कायदा हातात न घेता संबंधित यंत्रणेला तात्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

    18 नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रकरणात दोन्ही राजकीय पक्षांनी एकमेकांविरुद्ध तक्रार नोंदविली असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सध्यां गुरूनुले यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार, बल्लारपुर विधानसभा मतदार संघात उभे असलेले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे मौजा कोसंबी गावातील नागरिकांशी गावाच्या समस्यांबाबत चर्चा करीत होते. Political crimes

    यावेळी तेथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषसिंग रावत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासोबत मुनगंटीवार चर्चा करीत असलेल्या ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमवून मोबईलद्वारे व्हिडीओ शुटींग केली. तसेच संध्या गुरूनुले व तिथे असलेल्या नागरिकांना अश्लील शिवीगाळ करून भांडण केले असल्याची तक्रार नोंदविली.

    मूल विधानसभा क्षेत्रात राजकीय राडा

    त्यावरून मुल पोलिस स्टेशन येथे कलम 296,189(2),191(2),190 अन्वये संतोषसिंह रावत, राकेश रत्नावार, बाबा अजीम,विजय चिमडयालवार व इतर यांचे विरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. Political crimes

    तसेच दुसऱ्या पक्षाच्या तक्रारीनुसार 18 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता दरम्यान भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे बल्लारशा विधानसभा क्षेत्रातील मौजा कोसंबी येथे सभा घेत असल्याचे माहिती झाल्याने, तक्रारदार कांग्रेस पार्टीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांचे वाहनचालक राजू माणिकराव गावतुरे हे मौजा कोसंबी येथे उमेदवार व कार्यकर्त्यांसोबत गेले असता सदर सभा ठिकाणी मोबाईलने व्हिडीओ चित्रीत करीत असतांना, सुधीर मुनगंटीवार यांनी चित्रीकरण का करीत आहे?

    यावरून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार दिल्याने पोलिस स्टेशन मुल येथे सुधिर मुनगंटीवार यांच्यावर कलम 115(2), 351 (2),351(3) अन्वये (एनसी) गुन्हा दाखल केला आहे.

    सदर घटनेबाबत दोन्ही गटांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. बल्लारशा विधानसभा क्षेत्रात तसेच चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र शांतता आहे.

    याबाबत कुठल्याही पक्षाने किंवा नागरिकांनी अफवा न पसरविण्याचे आणि निवडणूकसंबंधी कुठलीही तक्रार असल्यास कायदा हातात न घेता संबंधित यंत्रणेला तात्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक कार्यालयाने कळविले आहे.

  • Exclusive political rada : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात रात्र झाली वैऱ्याची

    political rada 18 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या मात्र मूल तालुक्यातील कोसंबी गावात 19 नोव्हेंबर ला मध्यरात्री भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार गावकऱ्यांसोबत कॉर्नर सभा घेत असल्याची माहिती कांग्रेस उमेदवार संतोष रावत यांना मिळाली.

    प्रतिभा धानोरकर यांच्यात दिवंगत खासदार बाळूभाऊ ची झलक

    political rada रावत यांनी समर्थकासह कोसंबी गावातील सभास्थळी पोहचले, यावेळी कांग्रेस भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला, प्रचार संपला नंतर गावात सभा घेणं हे निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात आहे असे रावत यावेळी म्हणाले मात्र भाजप उमेदवार मुनगंटीवार म्हणाले की मी या क्षेत्राचा आमदार आहो गावातील समस्येबाबत बैठक घेत आहो, माझी बैठक संपली की आपण सुद्धा गावकऱ्यांशी चर्चा करा असे सांगितले.

    100 सराईत गुन्हेगारांना शहर पोलिसांनी दिली नोटीस


    हा आचारसंहितेचा भंग आहे म्हणत रावत यांनी सभा उधळून लावली, यावेळी रावत व मुनगंटीवार यांच्यात बाचाबाची झाली, काही कार्यकर्ते एकमेकांना सभेत भिडले.
    काही क्षणात पोलीस दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. political rada


    रात्री 1 उशिरापर्यंत कांग्रेस कार्यकर्त्यांनी मूल पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करीत भाजप उमेदवार भाजप कार्यकर्ते व उमेदवार मुनगंटीवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, कांग्रेस उमेदवार संतोष रावत यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

    अपक्ष उमेदवाराचे पारडं जड?

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार विरुद्ध कांग्रेसचे संतोष रावत अशी लढत आहे मात्र ऐनवेळी कांग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारल्याने डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार चांगलेच अडचणीत आले असून अपक्ष उमेदवार दोघांनाही पाणी पाजनार अशी स्थिती निर्माण झाली आहे.

  • New awards Take a selfie : सेल्फी काढा आणि जिंका आकर्षक बक्षिसे

    Take a selfie लोकशाही प्रक्रियेमध्ये 18 वर्षांवरील नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे. या अधिकाराचा प्रत्येकाने वापर करून लोकशाहीच्या बळकटीकरणसाठी तसेच देशाचे भविष्य उज्वल करण्यासाठी हातभार लावणे अपेक्षित आहे.

    Take a selfie जास्तीत जास्त मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने मतदारांसाठी आकर्षक बक्षीस योजना जाहीर केली आहे. यात एनफिल्ड बुलेट, सोन्याचे नाणे आणि मोबाईल ही बक्षीसे तुम्ही जिंकू शकता, त्याकरीता बस, मतदान करून आपला सेल्फी फोटो अपलोड करायचा आहे. 

    प्रतिभा धानोरकर मध्ये दिसली दिवंगत खासदार बाळूभाऊ ची झलक

    20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुकीकरीता मतदान होणार आहे. यात मतदारांनो तुमचे मत द्या आणि लकी ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिसे जिंकण्याच्या संधीचा फायदा घ्या, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. लकी ड्रॉद्वारे काढण्यात येणा-या पहिल्या क्रमांकाचे बक्षीस आहे 2.15 लाखांची  रॉयल एनफिल्ड बुलेट (प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा आणि विमा खर्च समाविष्ट). सदर बाईक सध्या विसापूर येथील अटलबिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डनमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. इतर बक्षिसांमध्ये 15 ग्राम सोन्याचे नाणे, आणि एस-23, फाईव्ह जी सॅमसंग गॅलक्सी फोनचा समावेश आाहे. Take a selfie

    अशी आहे पात्रता : 1) चंद्रपूर जिल्ह्यातील नोंदणीकृत मतदार असणे आवश्यक. 2) 20 नोव्हेंबर 2024 रोजी यशस्वीरित्या मतदान करणे आवश्यक.

    सहभागी होण्यासाठी : इच्छुक मतदारांनी मतदानाच्या दिवशी सेल्फी घ्यावा आणि तो दिलेल्या Google फॉर्मवर (https://forms.gle/L9hkapkUuR3c46jBA) अपलोड करावा. दिलेला QR कोड देखील त्यात प्रवेश करण्यासाठी स्कॅन केला जाऊ शकतो.

  • Exclusive Political criticism : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात दिसली दिवंगत बाळूभाऊ ची झलक

    Political criticism विधानसभा निवणूकीच्या प्रचाराच्या अंतिम दिवशी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विरोधकांसह अपक्ष उमेदवारांचा चांगलाच समाचार घेतला. वंचित च्या उमेदवारावर तोफ डागत त्यांनी वारसदारी दाखवणाऱ्या उमेदवारावर आपले मत व्यक्त केले.

    Political criticism संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधलेल्या वरोरा विधानसभा क्षेत्रात वंचित कडून दिवंगत खा. बाळू धानोरकर यांचे भाऊ अनिल धानोरकर निवडणूकीला रिंगणात आहेत. खा. प्रतिभा धानोरकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा येथे झालेल्या जाहिर सभेत वारसदारी सांगणाऱ्या वंचित च्या उमेदवाराचा चांगलाच समाचार घेतला.

    १०० गुन्हेगारांबाबत चंद्रपूर पोलिसांनी घेतला हा निर्णय

    वारसदार असते तर संपुर्ण माझ्या कुटूंबाची जबाबदारी स्वीकारली असती, वारसदार असते तर माझ्या दुखात माझ्या कुटुंबाला सावरले असते. आज सांगण्यात येत असलेली वारसदारी ही केवळ राजकीय स्वार्थासाठी असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अपप्रचार करतांना आपण देखील आपल्या स्वतःहात डोकावून बघावं, त्यानंतरच दुसऱ्यांचा अपप्रचार करावा असे बोलून देखील अपक्ष उमेदवारांवर निशाना साधला. Political criticism

    प्रहार च्या उमेदवारांबद्दल बोलतांना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, हो मी त्यांना शब्द दिला होता परंतु कॉग्रेस पक्षात प्रवेश करा अशी अट त्यांच्या समोर ठेवली होती. आजच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या भाषणातून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांची एक झलक जाहिर सभेतून बघायला मिळाली, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.

    तर ४ कामे मी जास्त करणार

  • Bhagwan Birsa Munda : त्यापेक्षा 4 काम मी जास्त करणार – सुधीर मुनगंटीवार

    Bhagwan Birsa Munda समाजातील शोषित, वंचित आणि आदिवासींचा जगण्याचा संघर्ष दूर करण्याचा संकल्प भगवान क्रांतीवीर बिरसा मुंडा यांनी केला.

    Bhagwan Birsa Munda आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देत भगवान बिरसा मुंडा संपुर्ण आयुष्य जगले. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा पाईक म्हणून त्यांचा संकल्प मी निश्चितपणे पुढे नेईल आणि समाजातील उपेक्षितांच्या आयुष्यातील अंधःकार दूर करण्याचा प्रयत्न करेन, असा निर्धार राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    मतदारांचा निर्धार….म्हणतात आम्हाला पुन्हा हवा किशोर जोरगेवार

    बल्लारपूर येथे भगवान वीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ना. श्री. मुनगंटीवार सहभागी झाले. त्यावेळी ते बोलत होते. ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘भगवान वीर बिरसा मुंडा यांनी लहान वयातच इंग्रजाच्या अन्याय, अत्याचार, शोषणाविरुद्ध लढा पुकारला. आमचा देश, आमचा अधिकार हा विचार त्यांनी मांडला. इंग्रजांना चले जाव म्हणत एल्गार केला. Bhagwan Birsa Munda

    आदिवासीचे शोषण करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, एक-एक आदिवासी हजार वाघांची ताकद ठेवतो, हे सांगण्याचे काम भगवान वीर बिरसा मुंडा यांनी केले. आदिवासी व इतर समाजासाठी वीर बिरसा मुंडा यांनी संघर्षाचा शंखनाद केला. आज त्यांच्या जयंती निमित्त स्मरण करीत असताना भयमुक्त महाराष्ट्राचा संकल्प करायचा आहे.’

    ‘मी आदिवासी बांधवांसाठी अनेक कामे केलीत. शबरी आवास योजना शहरी भागासाठी लागू करण्याचा निर्णय केला. वनजमिनीचे पट्टे देण्याच्या कायद्यात बदल करण्यात आला आहे. आदिवासी बांधवांना शेतजमिनीचे केवळ पट्टेच नव्हे तर या भागामध्ये घर बांधकामासाठी पट्टे उपलब्ध करून देण्यात येईल. वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाचे पोस्ट तिकीट काढले. Bhagwan Birsa Munda

    या जिल्ह्यात मिशन ऑलिम्पिकसाठी 137 कोटी रुपये खर्चून वातानुकूलित स्टेडियम उभारण्यात येत आहे. या स्टेडियमला वीर बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्याचा निर्णय केला आहे. स्पर्धा परीक्षांसाठी वाचनालय, समाज मंदिर, सभागृहाचे जिम, या परिसराचे सौंदर्यीकरण, भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा आदी कामे पूर्णत्वास नेईल,’ असा विश्वास ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिला.

    आदिवासी समाजाचा एखादा आमदार आदिवासी समाजासाठी जेवढे काम करेल त्यापेक्षा चार कामे जास्तीच करेल, अशी ग्वाही देखील ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

    75 वर्षात काँग्रेसच्या राज्यामध्ये एकदाही आदिवासी व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकली नाही. विश्वगौरव नरेंद्रजी मोदीजी यांनी आदिवासी समाजातील सामान्य व्यक्तीला राष्ट्रपती करीत आदिवासी समाजाला सन्मान मिळवून दिला. Bhagwan Birsa Munda

    बल्लारपूरमध्ये आदिवासी समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राष्ट्रपती महोदयांना निश्चितपणे निमंत्रीत करेन, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

  • congress pravin kakde : आपल्या हक्काच्या माणसाला निवडून द्या – खासदार प्रतापगढी

    congress pravin kakde विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी खा. इम्रान प्रतापगढी यांची तोफ वरोऱ्यात धडकली.

    congress pravin kakde शेरो-शायरी च्या माध्यमातून त्यांनी विरोधकांचा भरपूर समाचार घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार प्रविण काकडे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

    विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा येथील मैदानावर खा. इम्रान प्रतापगढी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

    मतदारांनी केला निर्धार आता पुन्हा जोरगेवार

    आपल्या भाषणा दरम्यान त्यांनी शायरींच्या माध्यमातून विरोधकांवर जारेदार टिकास्त्र सोडले. ‘‘नफरत के बाजार मे अपने इमान को जिंदा रखना’’ या शायरीतून महायुतीच्या चुकीच्या राजकारणाला बळी न पडता. एकजुट राहुन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी प्रविण काकडे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. congress pravin kakde

    मी एक महाराष्ट्राचा खासदार म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास देखील खा. इम्रान प्रतापगढ़ी यांनी व्यक्त केला. आपण दिलेले प्रत्येक मत हे फक्त उमेदवारांसाठी नसून धर्मांध शक्तीला दुर करण्यासाठी असेल, असे मत देखील खा. इम्रान प्रतापगढ़ी यांनी व्यक्त केले.

    धडकी भरविणारे अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन

    ‘‘अपने हौसलो को बुलंद रखना, मै जीत के जश्न को फिर लौटुंगा’’ असे म्हणत त्यांनी उपस्थितांकडून दाद मिळवली. यावेळी मंचावर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी जाहीर सभेला हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

  • Punha Jorgewar : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जोरगेवारांचा झंझावात

    Punha Jorgewar आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. मागील 22 दिवसांपासून आपण विविध माध्यमांतून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. झालेली विकासकामे आणि पुढे करावयाची कामे मतदारांना सांगितली.

    Punha Jorgewar यावेळी सभा, बैठका, पदयात्रा यांना चंद्रपूरकरांनी उत्साही प्रतिसाद दिला. त्यामुळे विक्रमी विजयाचा विश्वास असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    चंद्रपुरातील 100 सराईत गुन्हेगारांना नोटीस, पुढचे 3 दिवस

    आज सायंकाळी पाच वाजल्यापासून प्रचाराची तोफ थंडावली आहे. मात्र, या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी पूर्ण ताकद लावली आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तुकूम, बाबुपेठ, जुनोना चौक या भागांमध्ये भव्य पदयात्रा काढून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. Punha Jorgewar

    धडकी भरविणारे शक्ती प्रदर्शन

    तत्पूर्वी त्यांनी आंबेडकर नगर येथील महा विहार येथे जात तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाथेरो डॉ, सुमनवन्णो यांनी आ. जोरगेवार यांना आशीर्वाद दिला. 

    यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, मागील पाच वर्षांत आपण अपक्ष असूनही चंद्रपूरसाठी जवळपास  चार हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. बाबुपेठ उड्डाणपुलासाठी साडे पाच कोटी रुपये मंजूर करून शेवटचे काम पूर्ण केले आहे. Punha Jorgewar

    आज हा पूल नागरिकांसाठी सुरू झाला आहे. वढा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आपण 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. धानोरा बॅरेजचे कामही लवकर सुरू होणार आहे.

    आपण 11 अभ्यासिकांचा संकल्प केला होता, मात्र आता 11 पेक्षा जास्त अभ्यासिकांचे काम मतदारसंघात सुरू आहे. दीक्षाभूमीच्या विकासासाठी जवळपास 57 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्या कामांचे भूमिपूजनही पार पडले आहे. गावांमध्ये पांदण रस्ते, सामाजिक सभागृह तयार केले आहेत. घुग्घुस ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर केल्याने या शहराच्या विकासाला गती मिळाली आहे. Punha Jorgewar

    आपण विकासकामांसह सामाजिक उपक्रमांतूनही नागरिकांच्या सतत संपर्कात राहिलो आहोत. चंद्रपूरची आराध्य देवी माता महाकालीची महती महाकाली महोत्सवाच्या माध्यमातून देशभर पोहोचवली आहे.

    अम्मा का टिफिन अविरत सुरू राहणार

    आज आपल्यात अम्मा नाही, मात्र तिच्या प्रेरणेने सुरू झालेला “अम्माचा का टिफिन” उपक्रम नेहमी सुरू राहील. या उपक्रमाद्वारे आपण 200 हून अधिक नागरिकांना घरपोच जेवणाचा टिफिन पोहोचवत आहोत. कार्यालयात कार्यरत सेतू केंद्राद्वारे अनेक नागरिकांचे शासकीय योजनांचे कागदपत्रे निशुल्क तयार करून देत असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

    बाबुपेठ येथील पदयात्रेदरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला  पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच नेताजी चौक येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकाला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

  • chandrapur city police : 100 सराईत गुन्हेगाराबाबत चंद्रपूर पोलिसांनी घेतला “हा’ निर्णय

    chandrapur city police चंद्रपूर विधानसभा निवडणूक प्रक्रिया दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चंद्रपूर पोलिसांनी 100 सराईत गुन्हेगारांना स्थानब्धतेचं नोटीस बजावले आहे.

    chandrapur city police 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी पोलिसांनी शहर पोलीस स्टेशन हद्दीतील 100 सराईत गुन्हेगारांना नोटीस बजावीत मतदान प्रक्रिया झाल्यावर घरी राहण्याच्या सूचना दिल्या आहे.

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवारांचे अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन

    अवैध दारूविक्री करणारे व विविध गंभीर गुन्ह्यातील 100 रेकार्डवरिल १०० सराईत गुन्हेगार यांचेवर क. १६३(२) बि.एन.एस.एस. अन्वये मा. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधिक्षक कार्यालय चंद्रपुर येथे पुढील आदेश होणेस प्रस्ताव पाठविण्यात आले होते. chandrapur city police

    निवडणूक काळात सराईत गुन्हेगार यांची गुन्हेगारी वृत्ती तशीच राहू शकते अशी शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे शहर पोलिसांनी 18 ते 20 नोव्हेंबर पर्यंत सदर 100 गुन्हेगारांना स्थानब्धतेचे नोटीस बजावण्यात आले आहे.

    अपक्ष उमेदवारांच्या जाहीर सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी

    असा आदेश पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी जारी केला आहे.

  • Shakti Pradarshan : अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन

    Shakti Pradarshan प्रचार तोफा हळूहळू थंडावत असतानाच एक दिवसा अगोदर भव्य दिव्य असा रोड शो काढून डॉ. अभिलाषाताई गावतुरे ह्यांनी प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन करून विरोधकांच्या छातीत अक्षरशः धडकी भरवली आहे.

    जाहीर सभेत रेकॉर्डब्रेक गर्दी

    Shakti Pradarshan एकीकडे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी सुधीर मुनगंटीवार यांनी पवन कल्याण सारख्या स्टार प्रचारकाला आणूनही त्यांना पाहिजे तशी गर्दी खेचता आली नाही तर दुसरीकडे डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांच्या रोड शो च्या माध्यमातून जनता स्वयं स्फूर्तीने रस्त्यावर उतरून त्यांना जोरदार प्रतिसाद दिला त्यामुळे या रॅलीची एकच चर्चा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये होत आहे.


    ढोल ताश्याच्या गजर, आदिवासी नृत्य, व डॉली चायवाला हे रॅली चे विशेष आकर्षण ठरले. या रॅली ची सुरुवात वस्ती परिसरातील गांधी चौक येथून सुरवात होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे या रॅलीची सांगता झाशी राणी चौकामध्ये एक मोठ्या जाहीर सभेमध्ये करण्यात आली. Shakti Pradarshan


    या सभेला सत्यशोधक समाजाचे हिराचंद बोरकुटे, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार, प्रचारासाठी आलेले डॉली चायवाला, गोंडवानाचे गणपत नैताम, सामाजिक कार्यकर्ते रितेश बोरकर, आरपीआय गवई गटाचे धीरज वाळके, प्रकृती पाटील मॅडम, प्रियाताई झांबरे, कारव्याचे विनोद सीडाम, ताहीर भाई हुसेन व विविध समाज घटकातील मान्यवर उपस्थित होते.