Kishor Jorgewar live आमदार किशोर जोरगेवार यांच्या दणदणीत विजयानंतर तहसील कार्यालयातून भव्य विजय रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिकांना अभिवादन करत आमदार जोरगेवार गांधी चौकात पोहोचले.
Kishor Jorgewar live यावेळी जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्या वरती फुलांचा वर्षाव करण्यात आला, तर क्रेनच्या माध्यमातून भव्य हार घालून कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
आमदार जोरगेवार यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी वॉर्डागणिक फटाके फोडून जल्लोष केला. संध्याकाळी सात वाजता तहसील कार्यालयातून सजवलेल्या खुल्या गाडीतून भव्य रॅली काढण्यात आली.
जटपूरा गेट मार्गे गांधी चौकापर्यंत गेलेल्या या रॅलीत नागरिक, विविध संघटना, संस्था व मंडळांच्या वतीने पुष्पहार घालून आमदार किशोर जोरगेवार यांना विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अनेक ठिकाणी जेसीबीने फुलांचा वर्षाव करत आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वागत करण्यात आले. Kishor Jorgewar live
50 वर्षांत न झालेली कामे पाच वर्षांत पूर्ण केली; हा विकासपर्व असाच सुरू राहील
रॅली गांधी चौकात पोहोचताच तिचे रूपांतर भव्य सभेत झाले. सभेला संबोधित करताना आमदार जोरगेवार म्हणाले की, “मागील पाच वर्षांत मतदारसंघाच्या सर्वसमावेशक विकासावर भर दिला.
गांधी चौकात ऐतिहासिक सभा
अपक्ष असतानाही चार उड्डाणपूल, धानोरा बॅरेजसारखी पाण्याच्या प्रश्नावर उपाययोजना, महाकाली मंदिर परिसरासाठी कोट्यवधींचा निधी, वढा तीर्थक्षेत्रासाठी २५ कोटी रुपये, दीक्षाभूमीसाठी ५७ कोटी रुपये, टायगर सफारीसारखी महत्त्वाची कामे आपण पाच वर्षात केली.
चंद्रपुरात सुरू झालेला विकासपर्व पक्षाच्या साथीत आणखी गतीशील करणार करू असे ते यावेळी म्हणाले. आमदार जोरगेवार पुढे म्हणाले की, “मागील ३० दिवस संघर्षमय होते. मातोश्री अम्मा यांचे निधन झाले, मात्र चंद्रपूरकरांच्या स्नेहाने मला धीर दिला. Kishor Jorgewar live
भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जो विश्वास ठेवला, त्याला चंद्रपूरच्या जनतेने पाठिंबा दिला. सलग दुसऱ्यांदा निवडून देऊन सर्वसामान्य कुटुंबातील एका मुलाला मोठं केलं आहे. या उपकारांची परतफेड होणार नाही, पण तुमच्या प्रत्येक दु:खात मी मोठ्या भावाप्रमाणे उभा राहीन.”
चंद्रपूरच्या विकासाबाबत नागरिकांच्या सूचनांचा सन्मान राखत समान न्याय व सर्वसमावेशक विकासाचे धोरण राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, “पर्यटन विकास हे चंद्रपूरच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे.
ताडोबासोबतच चंद्रपूरच्या ऐतिहासिक, धार्मिक वारशाचा प्रचार-प्रसार करणे आवश्यक आहे,” असे सांगून त्यांनी पर्यटन वाढीच्या दृष्टीने प्रयत्नांची ग्वाही दिली. सभा मंचावरून जनसमुदाया पुढे नतमस्तक आमदार जोरगेवार यांनी नागरिकांचे आभार मानले. या प्रसंगी हजारो नागरिकांची उपस्थिती होती.
Rebel candidates राज्यात संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची लाट आली, भाजपने विरोधकांना चारही मुंड्या चित केले, मात्र काही जागांवर भाजप उमेदवारांना नाकी नऊ आणणारे अपक्ष उमेदवार यांनी चांगलेच मैदान गाजविले.
Rebel candidates चंद्रपूर जिल्ह्यातील काही जागांवर पक्षातून बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढली काहींनी दिग्गजांना आवाहन दिले तर काही घराणेशाही विरोधात लढले, निवडणूक हरली तरी अपक्षांचं नाव मात्र मतदारांच्या चर्चेत राहिलं.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यापुढे कांग्रेसचे संतोष रावत व कांग्रेस पक्षातून बंडखोरी करीत निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना आवाहन देण्यासाठी उभे राहिलेल्या डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी शेवटपर्यंत लढत दिली. Rebel candidates
सातव्यांदा विधानसभा निवडणुकीत उतरलेले सुधीर मुनगंटीवार यांना 1 लाख 5 हजार 969 मते मिळाली तर कांग्रेसचे संतोषसिंह रावत यांना 79 हजार 984 मते तर अपक्ष उमेदवार डॉ.अभिलाषा गावतुरे यांना 20 हजार 935 मतांवर समाधान मानावे लागले. मुनगंटीवार यांनी 25 हजार 985 मतांनी विरोधकांचा पराभव केला. Rebel candidates
अभिलाषा गावतुरे यांनी कांग्रेस पक्षाची तिकीट मिळावी यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र पक्ष श्रेष्ठीने त्यांना उमेदवारी नाकारली, मात्र लढण्याची तयारी केल्यावर गावतुरे यांनी माघार न घेता उमेदवारी अर्ज दाखल केला. Rebel candidates
अनेक गावात प्रचार सभा घेतल्या नागरिकांचा प्रतिसाद त्यांना मिळाला, इतकेच नव्हे तर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात काही गावातील नागरिकांनी गावतुरे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला, त्यांच्या प्रचारासाठी सोशल मीडिया इन्फ्लुन्सर डॉली चायवाला सुद्धा आला, केटली निवडणुकीत जिंकणार असा निर्धार मनात ठेवत गावतुरे लढल्या. Rebel candidates
मात्र भाजपच्या सुनामीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, जर कांग्रेस पक्षातून गावतुरे यांना तिकीट मिळालं असत तर परिस्थिती काही और असती. इतरांप्रमाणे त्यांनी निवडणुकीतून माघार न घेता त्या खंबीरपणे लढल्या याची चर्चा सध्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात रंगली आहे.
वरोरा भद्रावती मतदार संघातील शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी उमेदवारी आपल्या पक्षाच्या वाट्याला मिळावी यासाठी अनेक प्रयत्न केले, विशेष म्हणजे त्यांना उबाठा गटाने AB फॉर्म सुद्धा दिला. पण ऐनवेळी कांग्रेस खासदार धानोरकर यांच्या हट्टापुढे वरोरा विधानसभा क्षेत्राची उमेदवारी त्यांच्या भावाला मिळाली.
मुकेश जीवतोडे यांच्याकडून पक्षाने उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले मात्र आता माघार नाही असा मनात निर्धार करीत जीवतोडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला, भाजपचे करण देवतळे व कांग्रेसचे प्रवीण काकडे यांच्या पुढे मुकेश जीवतोडे निवडणुकीच्या रिंगणात उभा झाला.
करण देवतळे यांचे वडील आमदार व मंत्री होते त्यांचा वारसा घेत करण निवडणुक लढविण्यासाठी सज्ज झाला, तर दुसरीकडे खासदार धानोरकर यांचे सख्खे भाऊ प्रवीण काकडे यांची काडीमात्र क्षमता नसताना उमेदवारी आपल्या घरी रहावी यासाठी त्यांना निवडणुकीत उभे करण्यात आले.
दोघांच्या घराणेशाही विरुद्ध कसलाही राजकीय लेबल नसताना मुकेश जीवतोडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली, वरोरा विधानसभा क्षेत्रात डोअर तो डोअर त्यांनी प्रचार सुरू केला.
मतदारांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत होता, 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी सुरू झाली, यामध्ये कांग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेले तर जीवतोडे जिंकण्यासाठी धडपड करताना दिसत होते.
मतमोजणी पूर्ण झाल्यावर भाजप उमेदवार करन देवतळे यांना एकूण 65 हजार 170 मते तर अपक्ष मुकेश जीवतोडे यांना 49 हजार 720 मते मिळाली तर कांग्रेसचे प्रवीण काकडे यांना 25 हजार 48 मतांवर समाधान मानावे लागले. देवतळे यांनी विरोधी उमेदवारांचा 15 हजार 450 मतांनी पराभव केला.
जीवतोडे शेवटपर्यंत घराणेशाही विरुद्ध निवडणुकीत लढले याची चर्चा वरोरा विधानसभा क्षेत्रात चांगलीच रंगली आहे.
vidhan sabha winner 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली, चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा पैकी भाजपने 5 जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले, विजय वडेट्टीवार यांनी कांग्रेसची जिल्ह्यात लाज राखत ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात विजय मिळविला.
vidhan sabha winner चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात भाजपचे किशोर जोरगेवार यांनी कांग्रेस उमेदवार प्रवीण पडवेकर यांचा 22 हजार 804 मतांनी पराभव केला, जोरगेवार यांना एकूण 1 लाख 6 हजार 841 मते मिळाली तर कांग्रेसचे पडवेकर यांना 84 हजार 47 मते मिळाली.
आधी भाजप, मग कांग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व पुन्हा भाजप प्रवास असा दलबदलू चा ठपका विरोधी पक्षाने लावल्यावर सुद्धा जोरगेवार यांच्या विरुद्ध कांग्रेस पक्षाने सक्षम उमेदवार दिला नाही. विशेष म्हणजे 200 युनिट चा मुद्दा ही कांग्रेस कॅच करू शकली नाही. vidhan sabha winner
किशोर जोरगेवार यांची विजयी रॅली
या निवडणुकीत भाजप चे ब्रिजभूषण पाझारे यांनी तिकीट न मिळाल्याने बंडखोरी केली, भाजपने निवडणुकीत अपक्ष उमेदवार पाझारे यांची छुपी मदत केली, हा बंड नाही उठाव म्हणत पाझारे यांनी रडगाणं केलं, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही, प्रचार दरम्यान सामान्य जनतेकडे न जाता त्यांनी भाजप पक्षातील पदाधिकारी यांच्याकडे जाणं पसंत केल्याने जनतेने त्यांना सपेशल नाकारले.
वर्ष 2019 च्या निवडणुकीत जोरगेवार हे अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेच्या रिंगणात होते त्यावेळी त्यांना 1 लाख 17 हजार 570 मते मिळाली होती, यंदा जोरगेवार यांची लीड कमी झाली. vidhan sabha winner
बल्लारपूर विधानसभा
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून सातव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कांग्रेसचे संतोष रावत यांचा 25 हजार 985 मतांनी पराभव केला.
सुधीर मुनगंटीवार यांची विजयी रॅली
मुनगंटीवार यांना 1 लाख 5 हजार 969 मते तर रावत यांना 79 हजार 984 मते मिळाली. 3 वेळा मुनगंटीवार हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले असले तरी त्यांनी सलग 7 वेळा विधानसभा निवडणूक जिंकत त्यांनी विदर्भात इतिहास रचला हे विशेष. vidhan sabha winner
राजुरा विधानसभा
राजुरा विधानसभा क्षेत्रात भाजपचे देवराव भोंगळे यांनी कांग्रेस आमदार व जिल्हा कांग्रेस अध्यक्ष सुभाष धोटे यांचा 3 हजार 54 मतांनी पराभव केला. भोंगळे यांना 72 हजार 882 मते तर कांग्रेसचे सुभाष धोटे यांना 69 हजार 828 मते मिळाली.
भोंगळे हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष होते, ते मूळचे घुग्गुस शहरातील निवासी असून त्यांनी राजुरा विधानसभा निवडणुकीत सहभाग घेत विजय मिळविला, मतदानाच्या पूर्वी त्यांच्या कार्यकर्त्याच्या घरून 60 लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. vidhan sabha winner
चिमूर विधानसभा
चिमूर विधानसभा क्षेत्रातून भाजपचे किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळविला. भांगडीया यांना 1 लाख 16 हजार 495 मते तर कांग्रेसचे सतीश वारजूरकर यांना 1 लाख 6 हजार 642 मते मिळाली, भांगडीया यांनी 9 हजार 853 मतांनी वारजूरकर यांचा पराभव केला. vidhan sabha winner
भांगडीया यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी सभा घेतली होती तर वारजूरकर यांच्यासाठी कांग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी सभा घेतली मात्र चिमूर क्षेत्रातील जनतेने गांधी यांना नाकारले.
वरोरा विधानसभा
वरोरा विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा भाजपचा आमदार निवडून आला, वरोरा विधानसभा मतदारसंघ हा कांग्रेस पक्षाचा पारंपरिक मतदारसंघ होता, दिवंगत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेतून निवडणूक लढवीत वरोरा विधानसभा जिंकली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर कांग्रेस पक्षातून निवडून आल्या. vidhan sabha winner
आजारपणाने बाळू धानोरकर यांचं निधन झालं आणि खासदार पदी प्रतिभा धानोरकर निवडून आल्या, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात खासदार धानोरकर यांना 2 लाख 60 हजारांची आघाडी घेतली, वरोऱ्याची जागा कांग्रेसकडे व आपल्या घरी रहावी यासाठी धानोरकर यांनी पक्षातून अनेकांचा विरोध पत्कारीत सख्खा भाऊ प्रवीण काकडे यांना उमेदवारी दिली, मात्र जनतेने काकडे यांना नाकारले.
माजी मंत्री संजय देवतळे यांचे सुपुत्र करन देवतळे यांनी 15 हजार 450 मतांनी शिवसेना उबाठा चे बंडखोर अपक्ष उमेदवार मुकेश जीवतोडे यांचा पराभव केला. देवतळे यांना 65 हजार 170 मते तर अपक्ष उमेदवार जीवतोडे यांना 49 हजार 720 मते व कांग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांना 25 हजार 48 मते घेत तिसरे स्थान मिळाले, या निवडणुकीत कांग्रेस पक्षाचा लाजिरवाणा पराभव झाला.
ब्रह्मपुरी विधानसभा
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात कांग्रेसचे दिग्गज नेते विजय वडेट्टीवार यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवीत कांग्रेस पक्षाची जिल्ह्यात लाज राखली.
विजय वडेट्टीवार यांना एकूण 1 लाख 12 हजार 377 मते मिळाली तर भाजपचे कृष्णा सहारे यांना 98 हजार 289 मते मिळाली, वडेट्टीवार यांनी सहारे यांचा 14 हजार 88 मतांनी पराभव केला.
विजय वडेट्टीवार यांची विजयी रॅली
चंद्रपूर जिल्ह्यात 6 पैकी 5 जागा भाजपच्या वाट्याला तर 1 जागा कांग्रेस पक्षाला मिळाली, लोकसभा निवडणुकीनंतर कांग्रेस पक्ष अति आत्मविश्वासात होता, आपलं जिल्ह्यात वर्चस्व राहावं यासाठी मित्र पक्षांना त्यांनी एकही जागा दिली नाही.
6 पैकी 3 जागेवर क्षमता नसलेले उमेदवार उभे केले, विशेष म्हणजे जिल्ह्यात धानोरकर-वडेट्टीवार यांचा संघर्ष बघता अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळू शकली नाही. भाजपने लोकसभा निवडणुकीत मिळालेला पराभवाची कारणे शोधली आणि त्यावर संघटन शक्तीच्या आधारावर मात केली.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बहिणीच्या मनात जागा मिळविली, ही योजना चंद्रपूर जिल्ह्यात गेमचेंजर ठरली. कांग्रेसला त्यांचा आत्मविश्वास या निवडणुकीत घेऊन बुडाला तर भाजपने गनिमी कावा करीत निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध केले.
Pravin Kakade defeated 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला, या निकालात महायुती ने जोरदार मुसंडी मारली, तर महाविकास आघाडीचे सत्तेचे स्वप्न भंगले.
Pravin Kakade defeated चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा पैकी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात विजय वडेट्टीवार यांनी कांग्रेस पक्षाची लाज राखली, तर आपल्या भावाला वरोरा विधानसभा क्षेत्रातून कांग्रेस पक्षाचे तिकीट खासदार बहीण प्रतिभा धानोरकर यांनी अनेकांचा विरोध पत्कारीत खेचून आणले मात्र प्रवीण काकडे यांचा पराभव झाला, इतकेच नव्हे निकालात काकडे हे तिसऱ्या स्थानी गेले.
जय पराजय हा राजकारणाचा एक भाग असून विधानसभा निवडणूकीत लोकसभा क्षेत्रातील जनतेने दिलेला कौल मान्य करीत असल्याच्या भावना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.
राजकारणात अनेकदा काही चुका न कळत होत असतात. त्या चुका आमच्या हातुनही झाल्या आहेत. परंतु जय झाला तर माजयचं नाही आणि पराजय झाला तर लाजायचं नाही ही आमची वृत्ती असून मी एक खासदार म्हणून येणाऱ्या साडेचार वर्षांच्या काळात जनेतच्या पाठीशी सदैव उभी राहील. Pravin Kakade defeated
लवकरच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून परभवाची समिक्षा करणार असून भविष्यात गाव, तालुका व जिल्हा पातळीवरील संघटन मजबुतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
जनतेतून निवडून आलेल्या सर्व आमदारांना शुभेच्छा देऊन जात, धर्म, पंत या पलिकडे जाऊन आपण आपल्या क्षेत्रातील विकासाचा पाया मजबुत करावा, अशी आशा बाळगून पुनःश्च एकदा मी माझ्या मतदारुपी माय-बापांचा धन्यवाद व्यक्त करत असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Election results live चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक निकालात भाजपने 6 पैकी 5 जागेवर विजय मिळविला तर कांग्रेसला 1 जागेवर समाधान मानावे लागले.
Election results live 20 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत अनेक घडामोडी घडल्या होत्या. चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा क्षेत्रात 3 ठिकाणी तिहेरी तर उर्वरित 3 ठिकाणी दुहेरी लढत बघायला मिळाली.
राज्यात महायुतीने बहुमत पटापट केल्याने त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. Election results live
चंद्रपूर विधानसभा
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात भाजप विरुद्ध कांग्रेस अशी लढत आहे. भाजपचे किशोर जोरगेवार यांना 1 लाख 6 हजार 841 तर कांग्रेसचे प्रवीण पडवेकर यांना 84 हजार 37 मते मिळाली. अपक्ष ब्रिजभूषण पाझारे 14 हजार 598, अपक्ष राजू झोडे यांना 5 हजार 711 मते मिळाली. किशोर जोरगेवार 22 हजार 804 मतांनी विजयी.
बल्लारपूर विधानसभा
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजप ची लढत कांग्रेस व अपक्ष सोबत आहे, भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना 1 लाख 5 हजार 969 मते तर कांग्रेसचे संतोषसिंह रावत यांना 79 हजार 984 मते व अपक्ष अभिलाषा गावतुरे यांना 20 हजार 935 मते मिळाली. सुधीर मुनगंटीवार 25 हजार 985 मतांनी विजयी.
राजुरा विधानसभा
राजुरा विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत – कांग्रेसचे सुभाष धोटे यांना 69 हजार 828 इतकी मते, शेतकरी संघटना वामनराव चटप यांना 55 हजार 90 भाजपचे देवराव भोंगळे यांना 72 हजार 882 मते मिळाली. देवराव भोंगळे 3 हजार 54 मतांनी विजयी.
भाजपचे बंटी भांगडीया विजयी
चिमूर विधानसभा
चिमूर मतदारसंघात कांग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत आहे. भाजपचे बंटी भांगडीया यांना 1 लाख 16 हजार 495 मते तर कांग्रेसचे सतीश वारजूरकर यांना 1 लाख 6 हजार 642 मते मिळाली. बंटी भांगडीया 9 हजार 853 मतांनी विजयी.
वरोरा विधानसभा
वरोरा विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत. कांग्रेसचे प्रवीण काकडे यांना 25 हजार 49 मते, भाजपचे करन देवतळे यांना 65 हजार 170 मते तर अपक्ष मुकेश जीवतोडे यांना 49 हजार 720 मते, अपक्ष अहतेशाम अली यांना 20 हजार 723 मते. करन देवतळे 15 हजार 450 मतांनी विजयी.
ब्रह्मपुरी विधानसभा
ब्रह्मपुरी मतदारसंघात दुहेरी लढत, कांग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना 1 लाख 12 हजार 377 मते तर भाजपचे कृष्णा सहारे यांना 98 हजार 289 मते. विजय वडेट्टीवार यांना 14 हजार 88 मतांनी विजय.
road closed महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे होणार आहे.
Road closed मतमोजणी दरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चंद्रपूर शहरातील न्यायालयापासून ते डॉ. हेडगेवार आश्रय छात्रवासापर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच दोन्ही बाजूचे रस्ते नो पार्किंग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
मतमोजणी दरम्यान दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 4 वाजतापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चंद्रपूर शहरातील न्यायालयाच्या मेन गेट पासून ते डॉ. हेडगेवार यांचे आश्रय छात्रावासपर्यंत सर्व वाहनांना सदर रस्ता वाहतुकीकरिता बंद करण्यात येत आहे. Road closed
तसेच सदरचे दोन्ही रस्ते हे नो पार्किंग झोन व नो हॉकर्स झोन घोषित करण्यात आल्यामुळे या मार्गावर कोणत्याही नागरिकांनी आपले वाहन पार्किंग करू नये व हातठेले सुद्धा लावू नये.
मतमोजणीकरिता येणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वाहनाकरिता खालीलप्रमाणे पार्किंग स्थळे घोषित करण्यात आली आहे.
1. प्रशासकीय भवन पार्किंग (दुचाकी वाहनांकरिता)
2. रेल्वे स्टेशन (चारचाकी वाहनांकरिता)
वरील आदेशाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.
Counting of votes येत्या शनिवारी दि. 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मतमोजणी होणार आहे.
Counting of votes या मतमोजणीकरीता जिल्हा प्रशासनासह संबंधित विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण यंत्रणा सज्ज असून याबाबत कर्मचा-यांचे प्रशिक्षणसुध्दा घेण्यात आले.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. उद्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
याकरीता संबंधित विधानसभा मतदारसंघात तयारी झाली आहे. यात चंद्रपूर मध्ये मतमोजणीचे सर्वाधिक 28 फे-या तर बल्लारपूरमध्ये 27 फे-या होणार आहेत. Counting of votes
चंद्रपूर यंत्रणा सज्ज
विधानसभानिहाय टेबल आणि राऊंडची संख्या : 70 – राजुरा विधानसभा मतदारसंघात मतमोजणीकरीता एकूण 14 ईव्हीएम टेबल, 25 फे-या आणि 10 पोस्टल बॅलेट टेबल राहणार आहे. 71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 28 फे-या आणि 10 पोस्टल बॅलेट टेबल, 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 27 फे-या आणि 7 पोस्टल बॅलेट टेबल, 73 – ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 23 फे-या आणि 10 पोस्टल बॅलेट टेबल, 74 – चिमूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 23 फे-या आणि 6 पोस्टल बॅलेट टेबल, तर 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 25 फे-या आणि 10 पोस्टल बॅलेट टेबल राहणार आहेत. Counting of votes
या ठिकाणी होणार मतमोजणी : राजुरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, राजुरा येथे, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत मुल येथे, ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन, नागभीड रोड, ब्रम्हपूरी येथे, चिमूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी राजीव गांधी सभागृह, उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर चिमूर येथे आणि वरोरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती, गोडावून क्रमांक 2 मोहबाळा रोड वरोरा येथे होणार आहे.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
कर्मचा-यांचे प्रशिक्षण : मतमोजणी संदर्भात तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे उजळणी प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी चंद्रपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार, सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विजय पवार, सीमा गजभिये व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार सचिन खंडाळे यांनी सादरीकरणातून उपस्थितांना प्रशिक्षण दिले.
Dr Kalpana Gulwade इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या “बेस्ट सेक्रेटरी” म्हणजेच उत्कृष्ट सचिव या प्रतिष्ठित पुरस्काराने चंद्रपूरच्या डॉ. कल्पना गुलवाडे यांचा गौरव करण्यात आला.
Dr Kalpana Gulwade डॉ. कल्पना गुलवाडे या अतिशय होतकरू आणि कर्तव्यनिष्ठ कार्यकर्त्या असून, त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
IMA महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम आणि सचिव डॉ. अनिल आव्हाड यांच्या उपस्थितीत डॉ. कल्पना गुलवाडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यात डॉ. मंगेश गुलवाडे, आयएमए महाराष्ट्रचे माजी उपाध्यक्ष, तसेच आयएमए चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. संजय घाटे, सचिव डॉ. प्रवीण पंत, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या यशस्वी कार्यप्रदर्शनाबद्दल डॉ. कल्पना गुलवाडे यांचे डॉ. संजय घाटे, डॉ. प्रवीण पंत, डॉ. कीर्ती साने, डॉ. अपर्णा देवळीकर, डॉ. मनीषा घाटे आणि डॉ. अप्रतिम दीक्षित यांनी अभिनंदन केले.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण असून, या सन्मानाने वैद्यकीय क्षेत्रात महिला डॉक्टरांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
Postal ballot चंद्रपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया २० रोजी पार पडली. या निवडणुकीत मतदानाचा टक्का देखील मोठ्या प्रमाणात वाढला.
Postal ballot यासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. मात्र, निवडणूक कर्तव्यावर असलेल्या राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट मिळाले नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व मुख्य सचिव (म.रा.) यांच्याकडे केली आहे. Postal ballot
विधानसभा निवडणूक व्यवस्थित पार पाडण्यासाठी राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. यासाठी त्यांना प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले होते. पहिल्या प्रशिक्षणाच्या वेळी पोस्टल बॅलेटसाठी त्यांच्याकडून फॉर्म नंबर १२ भरून घेण्यात आला होता.
त्यासोबत मतदान कार्डची झेरॉक्ससुद्धा घेण्यात आली होती. परंतु, फॉर्म नंबर १२ भरूनही राज्यातील निवडणुकीसाठी कर्तव्यावर असणाऱ्या अनेक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व बी.एल.ओ. यांना अद्यापही पोस्टल बॅलेट मिळाले नसल्याने राज्यातील अनेक कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले आहे. Postal ballot
“निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क मिळालाच पाहिजे. त्यांना पोस्टल बॅलेट न मिळाल्याने त्यांचा हक्क नाकारला गेला आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे.”
काही शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी याबाबत आपली नाराजी आमदार अडबाले यांच्याकडे व्यक्त केली. निवडणूक प्रक्रियेत ते स्वतः योगदान देत असतानाही त्यांचा मतदानाचा हक्क नाकारला गेला.
अनेकांनी वेळेत अर्ज सादर करूनही पोस्टल बॅलेट मिळाले नसल्याचा आरोप केला आहे. यावर आमदार अडबाले यांनी या तक्रारींची दखल घेऊन शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक मतदानापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.
त्यामुळे या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व मुख्य सचिव (म.रा.) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
chandrapur vidhan sabha 23 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचा आमदार कोण हे निकालातून स्पष्ट होणार असून तत्पूर्वी विधानसभा क्षेत्रात कोण जिंकणार याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे.
chandrapur vidhan sabha 20 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी मतदान पार पडलं, 16 उमेदवारांचे नशीब ईव्हीएम मशीन मध्ये बंद आहे, वर्ष 2019 मध्ये चंद्रपूर विधानसभेत 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
वर्ष 2019 मध्ये ना कांग्रेस चालली ना भाजप अपक्ष उमेदवाराची या क्षेत्रात लाट चालली आणि तब्बल 72 हजार मते घेत अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांचा विजय झाला. chandrapur vidhan sabha
यंदा चित्र काही वेगळे आहे, कांग्रेस पक्षातून प्रवीण पडवेकर हे निवडणुकीच्या रिंगणात जोरगेवार यांच्या पुढे होते, अपक्ष म्हणून आमदार झालेले जोरगेवार यांनी वर्ष 2024 मध्ये भाजप पक्षात प्रवेश करीत निवडणूक लढवली. chandrapur vidhan sabha
यंदा विधानसभा निवडणुकीत अनेक समीकरणे बदलली होती, मागच्या विधानसभा निवडणुकीत किशोर जोरगेवार यांना 1 लाख 17 हजार 570 मते मिळाली, भाजपचे नाना श्यामकुळे – 44 हजार 909, वंचित बहुजन आघाडी अनिरुद्ध वनकर – 15 हजार 403 तर कांग्रेसचे महेश मेंढे यांना 14 हजार 284 मतांवर समाधान मानावे लागले होते.
यंदा कांग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत विधानसभा क्षेत्रात बघायला मिळाली, भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार असताना त्यांचे अनेक नागरिकांसोबत चांगले संबंध या निवडणुकीत कामी आले, काही ठिकाणी भाजपचे पदाधिकारी यांनी आमच्या पक्षाला नको अपक्ष उमेदवाराला मतदान करा असे प्रकार अनेक ठिकाणी घडले. chandrapur vidhan sabha
कांग्रेस पक्षात सुद्धा हीच परिस्थिती मतदान प्रक्रियेत बघायला मिळाली, विशेष म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठी 2 उमेदवार निवडणुकीत उभे राहिले. मतदान पार पडले, आता जिंकून कोण येणार याबाबत चर्चा रंगल्या आहे.
शहरी भागात किशोर जोरगेवार यांचे नाव आघाडीवर असून ग्रामीण भागात कांग्रेस विरुद्ध भाजप अशी चर्चा आहे, काही नागरिकांनी तर उमेदवाराला किती मते मिळणार याचा थेट आकडाचं सांगितला.
चर्चे प्रमाणे किशोर जोरगेवार यांना 80 हजार तर पडवेकर यांना 50 ते 55 हजार मते मिळणार आहे, तर काही नागरिक कांग्रेसचे पडवेकर नवीन आमदार म्हणून निवडून येणार अशी चर्चा रंगलेली आहे.
अनेक ठिकाणी नागरिक सदर मतांच्या आकड्यांची गोळा बेरीज करताना दिसले. मात्र याबाबत अचूक निकाल 23 नोव्हेंबर रोजी नागरिकांपुढे येणार आहे.