Tag: आमदार किशोर जोरगेवार

  • mla kishor jorgewar birthday | सेवा सप्ताहाने होणार वाढदिवस साजरा

    mla kishor jorgewar birthday

    Mla kishor jorgewar birthday भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यासाठी पुढील सहा दिवस तुकूम प्रभागात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

    शुक्रवार पासून या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून सुमित्रा नगर येथील अमृत पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन कार्यक्रमाने या सेवा सप्ताहाला सुरवात करण्यात आली आहे.

    आमदार जोरगेवार यांचा अनोखा सत्कार

      १७ डिसेंबरला चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार mla kishor jorgewar यांचा वाढदिवस मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम घेत साजरा केला जाणार आहे.

    या निमित्ताने दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे यासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तर माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी आठवडाभर तुकूम परिसरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

     यात १३ तारखेला सुमित्रा नगर येथील अमृत पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन, १४ डिसेंबरला शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, १५ डिसेंबरला योग शिबिर, १६ डिसेंबरला राष्ट्रवादी नगर येथील जगन्नाथ महाराज यांचा महाप्रसाद, १७ डिसेंबरला रक्तदान, रोगनिदान, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वाटप, लाडकी बहीण योजनेचा मेळावा, तर १८ डिसेंबरला मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी या सामाजिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन सुभाष कासनगोट्टूवार यांनी केले आहे.

  • A unique honor | आमदार जोरगेवार यांचा अनोखा सत्कार

    A unique honor

    A unique honor आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार यांचा चंद्रपूरमधील फळ विक्रेते आणि जिल्हा फुटपात दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात भेट घेत अनोख्या पद्धतीने सत्कार केला.

    फुलांच्या पारंपरिक गुलदस्त्यांऐवजी ताज्या फळांनी भरलेल्या टोपल्या देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या अभिनव आणि आगळ्या स्वागताबद्दल आमदार जोरगेवार (mla jorgewar) यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

    चंद्रपुरातील 18 वर्षीय मुलांना लागला गुन्हेगारीचा चस्का


     माणूस पैश्याने नाही तर मनाने श्रीमंत असतो याचे जिवंत उदाहरण आज एकदा अनुभवयास मिळाले फळ विक्रेत्यांनी आपल्या मेहनतीचे प्रतीक म्हणून एक नव्हे तर डजनभर टोपलीभर ताजी फळे देत आमदार किशोर जोरगेवार यांना आमदारकीच्या शुभेच्छा दिल्या.

    यावेळी फळ विक्रेत्यांनी सांगितले की, “आमदार जोरगेवार यांनी नेहमीच चंद्रपूरच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी काम केले आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकांना नेहमीच प्रोत्साहन आणि आधार मिळाला आहे. त्यांचे आमदार होणे आम्हाला आनंददायक आहे, आणि या अनोख्या पद्धतीने आम्ही त्यांचे अभिनंदन केले आहे. A unique honor

    mla jorgewar


     सत्कार स्वीकारतांना आमदार जोरगेवार म्हणाले, “हा सत्कार केवळ माझ्यासाठी नव्हे, तर समाजात सामजिक कार्यासाठी प्रेरणा देणारा आहे. फळ विक्रेत्यांच्या या अनोख्या कल्पनेमुळे मला खूप अभिमान वाटतो. त्यांनी दाखवलेली आत्मीयता आणि सन्मान खूप महत्त्वाचा आहे.

    फळ विक्रेत्यांनी दिलेली फळे लगेचच चंद्रपूर शहरातील रुग्णालयामध्ये वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना ही फळे वाटण्यात आली.

  • pm awas yojana 2.0 : घुग्गुस वासीयांना मिळणार हक्काचं घर

    pm awas yojana 2.0

    pm awas yojana 2.0 आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून घुग्घूस शहराचे नाव प्रधानमंत्री आवास (शहरी) 2.0 योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे घुग्घूस वासीयांना आपल्या स्वप्नातील हक्काचे पक्के घर बांधण्यासाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

    महाकाली मंदिर परिसराच्या मागे महिलेचा मृतदेह आढळला


    घुग्घूस हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर असून, येथे कोळसा खाणी, लोहशुद्धीकरण प्रकल्प, सिमेंट कारखाने अशा मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आहेत. त्यामुळे येथे कामगार वर्ग आणि कमी उत्पन्न गटातील नागरिक मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. Pm awas yojana 2024

    परंतु, बहुसंख्य नागरिकांकडे पक्क्या घरांची सुविधा नाही. घुग्घूस शहराचे नाव यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेत नव्हते. त्यामुळे या योजनेतून लाभ मिळवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासाठी आमदार किशोर जोरगेवार (kishor jorgewar) यांनी अनेकदा राज्य सरकार व केंद्र सरकारकडे मागणी केली होती.

    नवे सरकार स्थापन होताच त्यांनी पुन्हा एकदा सदर मागणी रेटून धरली त्यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे सदर योजनेत घुग्घूसचा समावेश करण्याची विनंती केली.
    केंद्रीय मंत्री खट्टर यांनी या मागणीला तातडीने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता घुग्घूस शहराचे नाव प्रधानमंत्री आवास (शहरी) 2.0 योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. परिणामी घुग्घूस नगरपरिषदेतील पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.


    या निर्णयाबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांचे आभार मानले आहेत. यामुळे घुग्घूसवासीयांचे हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.


    आता पात्र नागरिकांनी या योजनेसाठी अर्ज करावा आणि योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.

  • Encroachment on government land : त्या 84 कुटुंबाच्या मदतीला धावले आमदार जोरगेवार

    Encroachment on government land

    Encroachment on government land नकोडा येथील शासकीय जागेवर अतिक्रमण करून घरे बांधलेल्या ८४ कुटुंबांना न्यायालयीन आदेशाचा संदर्भ देत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या संदर्भात ५ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात विशेष बैठक झाली.

    या बैठकीत नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईविरोधात आक्षेप नोंदवला. या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्वरित कारवाई न करता त्यांना सवलत देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे केली आहे. Encroachment

    महाराष्ट्र विधानसभेच्या सभागृहात धडाडली चंद्रपूरची तोफ

      आ. किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेत चंद्रपूर मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चे दरम्यान नकोडा येथील ८४ कुटुंबांना सवलतीची मागणी त्यांनी केली.

    या बैठकीत माझी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, मनोज पाल, गणपत गेडाम यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नकोडा येथील नागरिक उपस्थित होते.

    चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणातील मोठी बातमी

      नकोडा येथील सर्वे क्र. ५८ आराजी ५.२९ पैकी ६१६ चौ. मी. शासकीय जागेवर निवासी व वाणिज्य प्रयोजनार्थ अतिक्रमण झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे तहसील प्रशासनाने या कुटुंबांना नोटिसा बजावल्या आहेत.

    नोटिसांमध्ये सात दिवसांच्या आत अतिक्रमण स्वतःहून हटवण्याचा इशारा देण्यात आला आहे. अतिक्रमण न हटविल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ अंतर्गत प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही होईल, असे नमूद आहे.

      आ. किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, नकोडा येथील ८४ कुटुंबे आर्थिक दृष्ट्या अतिशय गरीब असून त्यांच्याकडे इतरत्र घरे बांधण्यासाठी जागा नाही.

    या कारणास्तव, या कुटुंबांना शासकीय जागेवरील अतिक्रमणाबाबत सवलत देऊन त्यांची इतरत्र योग्य व्यवस्थापन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

  • Jay Chandrapur : महाराष्ट्र विधानसभेत धडाडली चंद्रपूरची तोफ

    Jay Chandrapur

    Jay chandrapur चंद्रपूर मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी शनिवारी मुंबई येथील विधानभवनात सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांनी “जय चंद्रपूर” म्हणत आपल्या नावाबरोबर आईचे नाव घेऊन शपथ ग्रहण केली.

      नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किशोर जोरगेवार यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रवीण पडवेकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या विजयानंतर सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडून आले.

    चंद्रपूर बसपा जिल्हाध्यक्ष यांचा कांग्रेस पक्षात प्रवेश

      आज विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. किशोर जोरगेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून, “मी किशोर प्रभाताई, गंगूबाई, गजानन जोरगेवार” असे म्हणत शपथ घेतली. त्यांनी “जय हिंद, जय भीम, जय सेवा, जय माता महाकाली, जय चंद्रपूर” असे उद्गार काढत सर्व धर्मीय मतदारांचे आभार मानले. Maharashtra vidhansabha

      ते म्हणाले, “चंद्रपूरच्या जनतेने दुसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली आहे. अनेक विकासकामे पूर्ण करण्याचा संकल्प आहे. मागील पाच वर्षांत सुरू केलेले समाजोपयोगी उपक्रम गतीने पुढे न्यायचे आहेत. अभ्यासिकांची कामे लवकरात लवकर पूर्ण करून ती विद्यार्थ्यांसाठी खुली करणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे.”

    रामनगर पोलिसांची मोठी कारवाई

    ते पुढे म्हणाले, “मंजूर दीक्षाभूमी विकासकाम, वढा आणि धानोरा बॅरेज यांसारखी प्रकल्पे जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. किशोर जोरगेवार यांच्या शपथविधीने चंद्रपूरच्या जनतेला नवीन आशा दिल्या आहेत.

  • mahaparinirvan diwas 2024 : महामानवाला आमदार जोरगेवार यांची आदरांजली

    mahaparinirvan diwas 2024

    Mahaparinirvan diwas 2024 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर ते एक महान तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि मानवतेचे खरे सेवक होते. त्यांनी शिक्षण, समानता, आणि सामाजिक न्यायाचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांनी कोट्यवधी लोकांचे जीवन बदलले.

    संघर्षातून समाजाला विषमतेच्या विळख्यातून मुक्त करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासाला अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या प्रेरणादायी संघर्षाची गाथा म्हणता येईल, असे विधान आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले.

    ताडोबा येथे कुटीचे बांधकाम, आणि 41 लाखांची फसवणूक

     महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्य रस्त्यावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयातही अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली. Mahaparinirvan diwas

    या कार्यक्रमाला भाजपचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, भाजप नेते दशरथसिंह ठाकुर, माजी नगरसेविका कल्पना बबुलकर, वंदना हातगावकर, सविता दंढारे, सायली येरणे, विमल कातकर, निलिमा वनकर, अमोल शेंडे, नकुल वासमवार, आशा देशमुख, सुमित बेले, स्वप्नील पटकोटवार, चंद्रशेखर देशमुख, हेरमन जोसेफ, डॉ. सत्यजित पोद्दार, विनोद अनंतवार, छाया चवरे, सुरेंद्र अंचल, संजय महाकालीवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

    चंद्रपुरात भाईगिरी चे वाढते ट्रेंड

    यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, “आपण आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली  अर्पण करत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त नाव नाही, तर एका क्रांतीचे प्रतिक आहे. त्यांच्या जिद्द आणि आत्मविश्वासाने त्यांनी स्वतःसाठी आणि समाजासाठी समानतेचा मार्ग शोधला. Mahaparinirvan diwas

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान केवळ भारतापुरते मर्यादित नाही. ते एका वैश्विक विचारधारेचे प्रतिक आहेत. शिक्षण, समानता, आणि सामाजिक न्याय या तत्त्वांवर आधारित समाज उभारण्यासाठी त्यांनी दिलेला संदेश अमूल्य आहे.

    mahaparinirvan diwas

      महापरिनिर्वाण दिन हा त्यांच्या स्मृतींना वंदन करण्याचा दिवस असला तरी, त्यांच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्याचा दिवस आहे. डॉ बाबासाहेब  यांनी  दाखविलेल्या मार्गावर चालून आपण त्यांच्या स्वप्नातील समाज घडवण्यासाठी वचनबद्ध होऊया, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Chandrapur On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, चंद्रपुरात जल्लोष

    Chandrapur On Devendra Fadnavis

    Chandrapur on devendra fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. याचे थेट प्रक्षेपण गांधी चौकातील महानगरपालिकेच्या पटांगणावर करण्यात आले.

    भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, लाडू वाटप करत जल्लोष साजरा केला.

    दुरसंचार कंपनी बीएसएनएल तोट्यात – खासदार धानोरकर

    यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते खुशाल बोंडे, विजय राऊत, प्रमोद कडू, संजय कंचर्लावार, भाजपचे माजी महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुडवाडे, माजी नगरसेवक संदीप आवारी, रवी आस्वानी, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, माजी नगरसेविका छबू वैरागडे, माजी नगरसेविका पुष्पा उराडे, वंदना जांभुळकर, शीला चव्हाण, अनिल फुलझेले, युवा नेते मनोज पाल, चंद्रकला सोयाम,  आत्राम, तुकुम मंडळ अध्यक्ष पुरुषोत्तम सहारे, बंगाली मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, सिव्हिल लाईन मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, सिव्हिल लाईन महिला मंडळ अध्यक्ष शीतल इटनकर

    यांच्यासह दशरथसिंग ठाकूर, भाजप महामंत्री किरण बुटले, माजी नगरसेवक रवी गुरनुले, प्रकाश धारणे, युवती प्रमुख मुग्धा खाडे, वंदना हातगावकर, सायली येरणे, सविता दंढारे, वैशाली मद्दीवार, विमल कातकर,  भाग्यश्री हांडे, निलीमा वनकर, वंदना हजारे,  कल्पना शिंदे, अमोल शेंडे, राशिद हुसेन, नकुल वासमवार,  करणसिंग बैस, प्रतीक शिवणकर, जितेश कुळमेथे, मंगेश अहिरकर, श्याम हेडाऊ, देवानंद साखरकर, अस्मिता डोनारकर  आदींची प्रमुख उपस्थिती होती. Chandrapur on devendra fadnavis

    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील आजाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.

    यावेळी  महामहिम राज्यपाल सि.पी राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. भव्य अश्या या शपथविधी कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने गांधी चौक येथील महानगरपालिकेच्या पटांगणावर जय्यत तयारी करण्यात आली होती. Chandrapur bjp

    चंद्रपुरात वाढलंय भाईगिरी चे ट्रेंड

    यावेळी शपथविधी कार्यक्रम सुरू होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी सुरू करत जल्लोष साजरा केला. तसेच लाडू वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या. या सोहळ्यास भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. Devendra fadnavis

    ३५ फूट उंच मुख्यमंत्री फडणवीसांचे बॅनर ठरले आकर्षण

    devendra fadanvis banner
    चंद्रपुरात 35 फूट उंच बॅनर

    भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी गांधी चौक येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छांसाठी ३५ फूट उंच बॅनर लावले होते. हे बॅनर विशेष आकर्षण ठरले. 

    ३५ फूट उंच बॅनरला चारही बाजूंनी लावण्यात आलेली लायटिंग यामुळे हे बॅनर उठून दिसत होते. त्यामुळे गांधी चौकातील उपस्थितांनी हे बॅनर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

  • chandrapur mahanagar palika : मनपाच्या अनेक तक्रारी लक्ष द्या – आमदार किशोर जोरगेवार

    chandrapur mahanagar palika

    Chandrapur mahanagar palika भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूरात पोहोचताच त्यांनी कार्यालयात जनसंपर्क साधत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. महानगरपालिका संदर्भात अधिक समस्या असल्याचे लक्षात येताच त्यांनी मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांना कार्यालयात बोलावून घेतले.

    शहर स्वच्छ ठेवणे आणि नागरिकांच्या समस्या प्राथमिकतेने सोडविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी आयुक्तांना दिल्या.

    चंद्रपुरात कुटुंबासमोर झाला अपमान, आरोपीने आणली बंदूक आणि….

      आपण मतरूपी आशीर्वाद देत सलग दुसऱ्यांदा मला आमदार म्हणून निवडून पाठवले आहे. चंद्रपूरात अनेक विकासकामे करायची आहेत. मागील पाच वर्षांत अपूर्ण राहिलेल्या महत्त्वाच्या कामांना गती द्यायची आहे. येत्या काही दिवसांत या कामांना गती मिळाल्याचे आपणास दिसेल. आपल्या मतांच्या आशीर्वादामुळे विकासाचा पाया अधिक मजबूत करू,” अशी ग्वाही नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी  दिली. Chandrapur

      निवडून आल्यानंतर आज भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कार्यालयात पोहोचले. यावेळी अनेक सामाजिक संघटना, विविध समाज, संस्था यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

    आयुध निर्माणी चांदा येथे नोकरीची संधी, पगार 36 हजार

      नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रविण पडवेकर यांचा भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार यांनी २२ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. निवडून आल्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार ते मुंबईत दाखल झाले होते. मतदारसंघात परतताच त्यांनी जनसंपर्क कार्यालयात येऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. Chandrapur mahanagar palika

      शहरात स्वच्छतेचा अभाव आणि पाणीपुरवठा यांसारख्या समस्यांवर विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्तांना बोलावून घेऊन आयुक्तांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

    “निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी फिरत असताना नागरिकांकडून मनपा प्रशासनाविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारी तत्काळ सोडवल्या गेल्या, मात्र अशा तक्रारी वारंवार येणे योग्य नाही. Chandrapur

    मनपा प्रशासनाने प्रामाणिकपणे लक्ष देत शहर स्वच्छ ठेवावे. अनेक भागांमध्ये लाईट बंद असतात; त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करावी. तसेच प्रत्येक भागात समान पाणीपुरवठ्यासाठी उत्तम नियोजन करावे,” अशा सूचना आमदार जोरगेवार यांनी दिल्या.

    mla jorgewar honoured
    नागरिकांनी आमदार जोरगेवार यांचा केला सत्कार

      दरम्यान, नागरिक, सामाजिक संस्था, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत विजयाबद्दल त्यांचा सत्कार केला. यावेळी आमदार जोरगेवार यांनी, “आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. विकासकामांच्या माध्यमातून या विश्वासाची परतफेड करू असे म्हटले.

  • The tiger of Chandrapur : चंद्रपूरचा वाघ आला

    The tiger of Chandrapur चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात मोठ्या मताधिक्याने निवडून येत आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा चंद्रपूरचा गड मिळवून दिला आहे.

    The tiger of Chandrapur आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाल घालून आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वागत व सत्कार केला.

    चंद्रपुरात पुन्हा देशी कट्टा जप्त

      नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात आमदार किशोर जोरगेवार यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रवीण पडवेकर यांचा २२,००० हून अधिक मतांनी पराभव केला आहे.

    आमदार जोरगेवार सलग दुसऱ्यांदा चंद्रपूर विधानसभेचे आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले आहेत. भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या चंद्रपूर मतदारसंघात मागील निवडणुकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. यंदा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत त्यांनी मोठ्या विजयाची नोंद केली. त्यामुळे चंद्रपूर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे बळ पुन्हा वाढले आहे. The tiger of Chandrapur

      दरम्यान, आज मुंबईत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी आमदार जोरगेवार यांचा शाल घालून त्यांचा सत्कार केला. या वेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले, “पक्षाने दाखविलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही.

    विशेष म्हणजे ज्यावेळी जोरगेवार उपमुख्यमंत्री फडणवीस भेटण्यासाठी गेले असता त्यांना बघून चंद्रपूरचा वाघ आला असे वक्तव्य फडणवीस यांनी केले. The tiger of Chandrapur

    पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू. येणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकेल, यासाठी प्रयत्नशील राहीन. तसेच, चंद्रपूरातील विकासकामे मार्गी लावणार असल्याचे यावेळी ते म्हणाले आहे. 

  • Kishor Jorgewar live : हा विजय जनतेचा – आमदार किशोर जोरगेवार

    Kishor Jorgewar live आमदार किशोर जोरगेवार यांच्या दणदणीत विजयानंतर तहसील कार्यालयातून भव्य विजय रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिकांना अभिवादन करत आमदार जोरगेवार गांधी चौकात पोहोचले.

    Kishor Jorgewar live यावेळी जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्या वरती फुलांचा वर्षाव करण्यात आला, तर क्रेनच्या माध्यमातून भव्य हार घालून कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

    Winning rally
    रॅलीत उसळला जनसागर

    चंद्रपूर जिल्ह्यात अपक्ष उमेदवारांनी गाजवलं निवडणुकीचे मैदान

    आमदार जोरगेवार यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी वॉर्डागणिक फटाके फोडून जल्लोष केला. संध्याकाळी सात वाजता तहसील कार्यालयातून सजवलेल्या खुल्या गाडीतून भव्य रॅली काढण्यात आली.

    जटपूरा गेट मार्गे गांधी चौकापर्यंत गेलेल्या या रॅलीत नागरिक, विविध संघटना, संस्था व मंडळांच्या वतीने पुष्पहार घालून आमदार किशोर जोरगेवार यांना विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अनेक ठिकाणी जेसीबीने फुलांचा वर्षाव करत आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वागत करण्यात आले. Kishor Jorgewar live

    50 वर्षांत न झालेली कामे पाच वर्षांत पूर्ण केली; हा विकासपर्व असाच सुरू राहील

    रॅली गांधी चौकात पोहोचताच तिचे रूपांतर भव्य सभेत झाले. सभेला संबोधित करताना आमदार जोरगेवार म्हणाले की, “मागील पाच वर्षांत मतदारसंघाच्या सर्वसमावेशक विकासावर भर दिला.

    Vijayi sabha
    गांधी चौकात ऐतिहासिक सभा

    अपक्ष असतानाही चार उड्डाणपूल, धानोरा बॅरेजसारखी पाण्याच्या प्रश्नावर उपाययोजना, महाकाली मंदिर परिसरासाठी कोट्यवधींचा निधी, वढा तीर्थक्षेत्रासाठी २५ कोटी रुपये, दीक्षाभूमीसाठी ५७ कोटी रुपये, टायगर सफारीसारखी महत्त्वाची कामे आपण पाच वर्षात केली.

    चंद्रपुरात सुरू झालेला विकासपर्व पक्षाच्या साथीत आणखी गतीशील करणार करू असे ते यावेळी म्हणाले.
    आमदार जोरगेवार पुढे म्हणाले की, “मागील ३० दिवस संघर्षमय होते. मातोश्री अम्मा यांचे निधन झाले, मात्र चंद्रपूरकरांच्या स्नेहाने मला धीर दिला. Kishor Jorgewar live

    भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जो विश्वास ठेवला, त्याला चंद्रपूरच्या जनतेने पाठिंबा दिला. सलग दुसऱ्यांदा निवडून देऊन सर्वसामान्य कुटुंबातील एका मुलाला मोठं केलं आहे. या उपकारांची परतफेड होणार नाही, पण तुमच्या प्रत्येक दु:खात मी मोठ्या भावाप्रमाणे उभा राहीन.”


    चंद्रपूरच्या विकासाबाबत नागरिकांच्या सूचनांचा सन्मान राखत समान न्याय व सर्वसमावेशक विकासाचे धोरण राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, “पर्यटन विकास हे चंद्रपूरच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे.

    ताडोबासोबतच चंद्रपूरच्या ऐतिहासिक, धार्मिक वारशाचा प्रचार-प्रसार करणे आवश्यक आहे,” असे सांगून त्यांनी पर्यटन वाढीच्या दृष्टीने प्रयत्नांची ग्वाही दिली. सभा मंचावरून जनसमुदाया पुढे नतमस्तक आमदार जोरगेवार यांनी नागरिकांचे आभार मानले. या प्रसंगी हजारो नागरिकांची उपस्थिती होती.