Tag: आमदार किशोर जोरगेवार

  • skill award । बांबू कारागिरांना अम्मा च्या नावाने कौशल्य पारितोषिक पुरस्कार देणार – आ किशोर जोरगेवार

    skill award

    skill award : आजचा हा कार्यक्रम बुरुड कारागिरांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या कौशल्याला चालना देण्यासाठी महत्त्वाचा आहे. आपल्या परंपरागत व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत नव्या उंचीवर नेण्यासाठी हा टूल किट वाटप उपक्रम राबवला जात आहे. या कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढल्या वर्षी पासून आपण पुढाकार घेणार असून अम्मा च्या नावाने बांबू कारागिरांना कौशल्य पारितोषिक देणार असल्याची घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली

          बांबू प्रशिक्षण केंद्राच्या वतीने वन अकादमी येथे बुरूड समाजातील बांबू कारागिरांना टूल किट चे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला  वन अकादमी चे अप्पर प्रधान मुख्य वनरक्षक एम.एस रेड्डी, बांबू प्रशिक्षण केंद्राचे संचालक अशोक खडसे, भाजप नेते प्रकाश देवतळे आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. 

    चंद्रपुरात वाहनचालकांवर अस्वलीचा हल्ला

        यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आज माझ्या हस्ते टूल किट देण्यात आली. त्यामुळे आपला पारंपरिक व्यवसाय टिकविण्यासाठी एका बुरूड समाजाच्या व्यक्तीने समाजाच्या दुसऱ्या व्यक्तीला  शस्त्र दिल्याचा अधिक आनंद होत आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून कारागिरांच्या हाताला कौशल्य देण्याचे काम आपल्या वतीने केल्या जात आहे. बांबू हा रोजगार देणारे साधन आहे. वन विभागानेही अश्या कारागिरांना आवश्यक असलेल्या बांबू उपलब्ध करून दिला पाहिजे. बांबू प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून आता प्रत्येक वॉर्डात प्रशिक्षण शिबिरे सुरू केले पाहिजेत. यात लागणारी मदत करण्याची आमची पूर्ण तयारी असल्याचे ते यावेळी म्हणाले.  

       बूरूड कारागीरांनी आपली कला व कौशल्य टिकवून ठेवत समाजात मोठे योगदान दिले आहे. बांबू पासून विविध वस्तू तयार करत आपल्या कलेचा ठसा केवळ आपल्या प्रदेशातच नव्हे तर संपूर्ण देशभर उमटला आहे. परंतु बदलत्या काळानुसार आपणही नवे तंत्रज्ञान, नवे साधनसामग्री आत्मसात केली पाहिजे, या टूल किटद्वारे आपले काम अधिक सुलभ आणि दर्जेदार होईल. यामुळे आपण अधिक उत्पादन करू शकाल, गुणवत्ता वाढेल, आणि आपल्या उत्पादनांना बाजारपेठेत अधिक मागणी मिळणार आहे. 

         नवे कौशल्य आत्मसात करत आपल्यातील कला दुसऱ्या पर्यंत पोहचविण्याचे आवाहन यावेळी बोलताना त्यांनी केले. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते बुरूड कारागिरांना टूल किट चे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला कारागिरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Bodybuilding Championship 2025 | शनिवारी चंद्रपुरात बॉडी बिल्डिंग स्पर्धा

    Bodybuilding Championship 2025

    Bodybuilding Championship 2025 : आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

    दुर्गापुरातील कोल प्रदूषणावर संतापले सुधीर मुनगंटीवार

    या अंतर्गत शनिवारी विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग अजिंक्यपद स्पर्धा गांधी चौकातील महापालिकेच्या पटांगणावर संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. या स्पर्धेत विदर्भातील 100 हून अधिक बॉडी बिल्डर्स सहभाग घेत आहेत.


    हरियाणाचे मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण असतील. स्पर्धेतील विजेत्यांना आमदार श्री 2025 पुरस्काराचे रोख 55,555, बेस्ट पोझरला 33,333, तर बेस्ट इम्प्रूव्हला 22,222 आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे.

    दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवात कुस्ती, कबड्डी, बॉडी बिल्डिंग अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन मिळून युवकांना प्रेरणा मिळणार आहे.

  • chandrapur cancer hospital। निर्माणाधीन मेडिकल कॉलेज व कॅन्सर हॉस्पिटलच्या कामाची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी

    chandrapur cancer hospital

    chandrapur cancer hospital : चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भातील रुग्णांसाठी वरदान ठरणारे चंद्रपूर मेडिकल कॉलेज आणि कॅन्सर रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येथील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत मेडिकल कॉलेजची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रलंबित कामांसाठी लागणारा असलेल्या १८० कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. 

       यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मिलिंद कांबळे, कॅन्सर रुग्णालयाचे प्रमूख डॉ. कपुरिया, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.निवृत्ती जिवणे, भारतीय जनता पक्षाचे नेते दशरत सिंग ठाकुर, तुषार सोम, मनोज पाल, अनिल फुलझेले मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, माजी नगर सेविका चंद्रकला सोयाम, वंदना जांभुळकर, जुमडे, वंदना हातगावकर, सविता दंढारे, सायली येरणे, आशा देशमुख, डॉ. गिरिधर येडे, धनराज कोवे, महेंद्र जुमडे, सलिम शेख आदींची उपस्थिती होती.

    बल्लारपूर शहरात सलमान शाहरुख आमिर चित्रपटाचे प्रदर्शन

          चंद्रपूर मेडिकल कॉलेजचे काम अंतिम टप्प्यात येवून निधी अभावी रखडले आहे. त्यामुळे सदर निधी तात्काळ उपलब्ध व्हावा यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. नागपूर येथील अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी हा विषय मांडत उर्वरित कामे पुर्ण करण्यासाठी निधीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबई मंत्रालयात संबंधित विभागाची बैठक घेत येथील फर्निचर खरेदी प्रक्रिया गतीशील करण्याचे निर्देश दिले होते.
      दरम्यान आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मेडिकल कॉलेजची पाहणी करत सध्यास्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मेडिकल कॉलेजच्या परिसरात फिरून उर्वरित कामांची प्रगती आणि अडचणी जाणून घेतल्या. हे पूर्ण होण्यासाठी निधीची कमतरता असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी निधीचा प्रस्ताव पुन्हा तातडीने शासनाकडे पाठवावा त्याला मंजुरी मिळविण्यासाठी आपण पाठपूरावा करु असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
      चंद्रपूर मेडिकल कॉलेज जिल्ह्यासाठीच नव्हे, तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने उपचार मिळू शकतील. तसेच बाहेर उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांचा त्रास कमी होईल. प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून कार्य करावे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
    Cancer hospital

       उर्वरित कामांमध्ये अंतर्गत उपकरणे, डॉक्टरांसाठी सोयीसुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक प्रयोगशाळेकरीता लागणारे उपकरणे लवकर उपलब्ध होणार आहे. चंद्रपूर मेडिकल कॉलेज हा जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात एक नवा अध्याय उघडणार असून, यामुळे लाखो रुग्णांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आपण शासन दरबारी निधीसाठी पाठपूरवा करणार असल्याचे ही आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • savitribai phule jayanti 2024 | सावित्रीबाई फुले यांचा लढा स्त्रीशिक्षणाचे प्रेरणास्त्रोत – आ. किशोर जोरगेवार

    savitribai phule jayanti 2024

    savitribai phule jayanti 2024 : सावित्रीबाई फुले यांनी आपल्या आयुष्यभर समाजातील रूढी-परंपरांविरोधात लढा दिला आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली. त्यांनी स्त्रिया आणि मागासवर्गीयांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले. त्या काळातील प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी हिम्मत न हारता, शिक्षणाचा दिवा पेटवत ठेवला. त्यांचा हा लढाच स्त्रीशिक्षणाचे प्रेरणास्त्रोत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    चंद्रपुरात युवासेना मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन

         बाबुपेठ येथील महानगर पालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळेत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी अश्विनी सोनवने,  मुख्याध्यापक नागेश निट, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुंदा बावणे, उपाध्यक्ष राधा चिंचोळकर, माजी नगरसेवक प्रदिप किरमे, रुपेश पांडे, अमोल नालमवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

     यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (savitribai phule jayanti 2024) यांचे विचार मार्गदर्शक ठरतात. त्यांनी महिलांसाठी शिक्षणाचे दार खुले केले. आज महिला केवळ शिक्षितच झाल्या नाहीत, तर प्रत्येक क्षेत्रात पुढे गेल्या आहेत.

    50 वर्षीय नागरिकांनी सुरू केला गांजाविक्री चा व्यवसाय

    लोकप्रतिनिधी म्हणून आमचीही जबाबदारी असून मुली शिकाव्यात, त्यांना शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अनेक गरजू विद्यार्थिनींना आपण सायकल वितरित केली आहे. पुढेही हा उपक्रम सुरू राहणार असून गरजू विद्यार्थिनींना शाळेत येण्यासाठी सायकलचे वितरण करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार (kishor jorgewar) म्हणाले.

    kishor jorgewar

    आजही त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा आपल्याला समानतेचा आणि शिक्षणाचा मार्ग दाखवते. आपण सर्वांनी सावित्रीबाईंच्या विचारांना आत्मसात करून शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची उन्नती साधावी, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे ते यावेळी म्हणाले.

    शिक्षणाच्या क्षेत्रात कोणत्याही विद्यार्थ्याला अडथळा येणार नाही. नव्या योजना आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मुलींनी शिक्षणात पुढे जावे, नवे कौशल्य आत्मसात करावे आणि देशाच्या प्रगतीत हातभार लावावा, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

      यावेळी स्नेहमीलन आणि क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम आमदार किशोर जोरगेवार यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले. या कार्यक्रमाला शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • krishi mahotsav |चंद्रपुरातील कृषी महोत्सव म्हणजे कृषी विकास आणि सामाजिक बांधिलकीचा संगम – आमदार जोरगेवार

    krishi mahotsav

    krishi mahotsav : कुणबी समाज नेहमीच मेहनती, प्रामाणिकपणा आणि परंपरांचे जतन यासाठी ओळखला जातो. या कृषी महोत्सवाच्या आणि वधू-वर परिचय मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र येऊन कृषी क्षेत्र आणि सामाजिक एकता अधिक बळकट केली आहे. हे एकत्रीतरित्या आयोजित झालेले आयोजन म्हणजे कृषी विकास आणि सामाजिक बांधिलकीचा संगम असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी केले.

    कुणबी समाजाच्या (dhanoje kunbi samaj) वतीने चांदा क्लब मैदानात कृषी महोत्सव आणि वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपूते, श्रीधर मालेकर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, अनिल धानोरकर, मनोहर पाउनकर, सुनील मुसळे, अजय जयसवाल, विलास माथनकर, माजी नगरसेवक वाढई, विनोद पिंपळशेंडे, अतुल देउळकर, अरुण मालेकर, प्रा. अनिल डाहाके, प्रा. मोरे आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

    आपलं विमान पुन्हा उतरणार – सुधीर मुनगंटीवार

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मी सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून विधानसभेत पोहोचलो आहे. त्यामुळे माझ्यावर आता अधिकची जबाबदारी आहे. मागील पाच वर्षांत अनेक विकासकामे आपल्याला करता आली. तर अनेक विकासकामे या पाच वर्षांत करण्याचा निर्धार आपण केला आहे. मतदारसंघात मोठ्या अभ्यासिका आपण तयार करत आहोत. तसेच अनेक भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपला भर असल्याचे यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

     वधू-वर परिचय मेळावा म्हणजे नव्या नात्यांची सुरुवात आहे. हे नाते केवळ दोन व्यक्तींचे नसून दोन कुटुंबे, संस्कृती आणि संपूर्ण समाजाची बांधिलकी दर्शवणारे असते. आज येथे उपस्थित तरुण-तरुणींनी एकमेकांची ओळख करून घेऊन नव्या वाटचालीस सुरुवात करावी.

    कृषी महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, शेतीतील नवसंकल्पना आणि सरकारी योजनांची माहिती मिळते. आपल्या शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीचे मार्ग यातून शोधता येतात. कृषी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा अधिकाधिक लाभ शेतकरी बांधवांनी घेण्याचे आवाहन यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

      आपण कुणबी समाजाच्या अभ्यासिकेसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन दिला आहे. यातून मोठी अभ्यासिका तयार होत आहे. येथे साहित्य खरेदीसाठी आणखी 50 लक्ष रुपयांच्या निधीची मागणी समाजाच्या वतीने आली असून साहित्य खरेदीसाठी 50 लक्ष रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणाही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

    सोबतच घुग्घूस येथे कुणबी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास असून तेथेही अभ्यासिका बांधकामासाठी आपण 50 लक्ष रुपये देणार असल्याची घोषणा यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. या कार्यक्रमाला समाज बांधवांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Veer bal diwas 2024 | खालसा कॉन्व्हेंट येथे वीर बाल दिवस कार्यक्रमाचे आयोजन

    Veer bal diwas 2024

    Veer bal diwas 2024

    Veer bal diwas 2024 : गुरू गोविंदसिंहजी यांच्या सुपुत्रांनी दाखवलेले पराक्रम आणि त्याग यांचे स्मरण आज आम्हाला प्रेरणा देते. आजचा दिवस केवळ एक स्मरणोत्सव नाही, तर मुलांना संस्कार, शौर्य, त्याग आणि न्यायासाठी संघर्ष करण्याची उर्जा देणारा हा दिवस आहे. आजचा वीर बाल दिवस आपल्याला कायमच सत्य, धर्म आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    इंग्रजी नामांकित शाळेत मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

      वीर बाल दिवस निमित्त आज गुरुवारी खालसा कॉन्व्हेंटमध्ये (khalsa highschool) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला लाडी बसेसा, भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, मुख्याध्यापिका सिमरन सहाणी, अमनप्रती गौरा, विश्वजित शाहा आदि प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते.

      यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या पुढच्या पिढीला इतिहासाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो आहोत. मुलांनी आणि युवकांनी या प्रेरणादायी इतिहासातून शिकावे, आपली संस्कृती, परंपरा आणि आदर्श जपावेत. या प्रसंगातून एकजुटीचा संदेश घेऊन पुढे जावे. आपल्या समाजातील मूल्यांना टिकवण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. विशेषतः आजच्या पिढीने आपल्या देशासाठी, समाजासाठी आणि न्यायासाठी सदैव तत्पर राहावे, ही प्रेरणा देणारा आजचा दिवस असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

      आजच्या दिवशी आपण ज्यांनी आपल्या शौर्याने आणि त्यागाने इतिहास घडवला, अशा महान बालवीरांना आदरांजली अर्पण करतो. लहान वयातसुद्धा मोठमोठ्या संकटांना तोंड देणाऱ्या वीर बालांनी आपले मोठे योगदान देशासाठी दिले आहे. गुरू गोविंदसिंह यांचे सुपुत्र साहिबजादे यांचा बलिदान, हा त्याग आणि धर्मासाठी दिलेली आहुती आजही आपल्याला प्रेरणा देते. त्यांच्या शौर्याने धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करण्याचा आदर्श घालून दिला आहे.

    khalsa highschool

      आपली नवी पिढी ही देशाचा उज्ज्वल भविष्यकाळ आहे. त्यांना योग्य शिक्षण, मूल्यसंस्कार आणि समाजसेवेचे महत्त्व शिकविणे ही आपली जबाबदारी आहे. वीर बाल दिवसाच्या निमित्ताने, आपण आपल्या मुलांमध्ये देशप्रेम, आत्मसन्मान आणि आदर्श नागरिक होण्याची वृत्ती रुजवावी, असे आवाहन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमात विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. 

  • Gmc chandrapur | मेडिकल कॉलेजसाठी 100 कोटीचा निधी द्या – आमदार जोरगेवार

    Gmc chandrapur

    Gmc chandrapur : चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र येथे आवश्यक वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची गरज असून, सदर मेडिकल कॉलेज रुग्णसेवेसाठी तात्काळ सुरू करण्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा, अशी मागणी अधिवेशनात (winter session nagpur 2024) औचित्याच्या मुद्यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

    youtube च्या नव्या नियमाने अनेक चॅनेल होणार बंद

    शनिवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर मतदार संघातील प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना त्यांनी चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजचा विषय उचलत साहित्य खरेदीसाठी 100 कोटी रुपये देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

      बहुप्रतिक्षित चंद्रपूर मेडिकल कॉलेजची सुमारे ५० एकरातील नवीन वास्तूचे बांधकाम (new campus) पूर्णत्वास आले असले तरी वैद्यकीय साहित्य आणि फर्निचरसाठी निधी उपलब्ध झाला नाही. साहित्य खरेदीसाठी सुमारे १०० कोटी रुपयांची आवश्यकता असून, तातडीने हा निधी मिळावा म्हणून कॉलेज प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. नवीन इमारतीत लाकडी फर्निचरसाठी ५७ कोटी रुपये तर वैद्यकीय साहित्यासाठी ४१ कोटी ७६ लाख रुपयांची आवश्यकता आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.  मात्र सदर  प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

       लगतच्या गडचिरोली, यवतमाळ, तेलंगणातील आसिफाबाद, करीमनगर या भागातील रुग्णसुद्धा चंद्रपुरात उपचारासाठी येत असतात. सध्याच्या परिस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीत मेडिकल कॉलेज सुरू आहे. दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा सामान्य रुग्णालयात खाटांची संख्या कमी पडत आहे. रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. निवासी डॉक्टरांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत असल्याने नव्या जागेतील इमारतीत कॉलेज हलविण्यात यावे, अशी सातत्याने मागणी होत आहे. परंतु, आवश्यक साहित्य खरेदीसाठी निधी उपलब्ध झालेला नसल्याने सर्व काम रखडले आहे.

      हाच विषय आता आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उचलून धरला. यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, मेडिकल कॉलेजचे काम पूर्ण झाले आहे. परंतु साहित्य खरेदी करण्यासाठी लागणारे 100 कोटी रुपये न मिळाल्याने रुग्णालय बंद आहे. अतिशय सुंदर परिसरात सुंदर वास्तू तयार झाली असली तरी फर्निचर आणि वैद्यकीय साहित्य नसल्याने रुग्णालय सुरू होत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तात्काळ साहित्य खरेदीसाठी 100 कोटी रुपये देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी सभागृहात केली आहे.

  • Kishor Jorgewar on cdcc bank : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक पदभरतीवरून हिवाळी अधिवेशनात आमदाराचा संताप

    Kishor jorgewar on cdcc bank

    Kishor jorgewar on cdcc bank : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील नोकरी भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र, सदर परीक्षा विदर्भातील लगतच्या जिल्ह्यांमध्ये न घेता पुणे, नाशिक या दूरच्या जिल्ह्यांमध्ये घेतली जात आहे. यामुळे उमेदवारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

    तसेच या भरती प्रक्रियेत मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप असून, सदर भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी, अशी मागणी अधिवेशनात औचित्याच्या मुद्यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी केली आहे.

    माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांचा रौप्य महोत्सवी सोहळा, मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित


    जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या लिपिक 261 आणि शिपाई 97 अशा 358 पदांसाठी 31,156 उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जात आहे. मात्र, या परीक्षेत मोठा आर्थिक व्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत.

    एका उमेदवाराकडून 40 लाख रुपयांपर्यंत पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी येत असल्याचा आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलताना केला आहे.
    यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील नोकरी भरतीची जाहिरात निघाली. त्यानुसार 21, 22 आणि 23 डिसेंबरला परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र ही परीक्षा चंद्रपूर, नागपूर किंवा विदर्भातील लगतच्या जिल्ह्यांमध्ये न घेता पुणे, नाशिक अशा दूरच्या जिल्ह्यांमध्ये घेतली जात आहे.

    राज्यातील 31,156 उमेदवारांनी अर्ज केला आहे. मात्र, या परीक्षा प्रक्रियेबाबत अनेक उमेदवारांच्या मनात शंका आहेत. एका जागेचा 40 लाख रुपये असा दर असल्याच्या तक्रारी असून, सदर परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हावी, अशी मागणी अधिवेशनात बोलताना त्यांनी केली आहे.

    रद्द झालेल्या परीक्षेतील उमेदवारांना स्थानिक परीक्षा केंद्र द्या – आ. किशोर जोरगेवार

    आज चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या (cdcc bank chandrapur) उमेदवारांची परीक्षा होती. मात्र, पेपर देत असताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्या. प्रश्नाचे उत्तर लिहिल्यानंतर ते सेव्ह करताच लिहिलेले उत्तर बदलत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यानंतर याची दखल घेत अर्धा तास पेपर झाल्यावर सदर पेपर रद्द करून परीक्षा दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आली.


    मात्र, या प्रकारानंतर विद्यार्थ्यांमध्ये रोष असून, याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी वरिष्ठ अधिकारी आणि परीक्षा घेणाऱ्या दिल्ली येथील आयटीआय लिमिटेड कंपनीचे ओडीएस प्रविण सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असून, आता पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा उमेदवारांच्या स्थानिक केंद्रावरच घेण्यात यावी.

    त्यांना पुन्हा बाहेर जिल्ह्यात केंद्र देऊन आर्थिक भुर्दंड लादू नये, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. सदर कंपनी व्यवस्थापनाने ही आता पुढील परीक्षा स्थानिक केंद्रावर घेण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे पुढील वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या सोयीच्या केंद्रांवर ही परीक्षा घेतल्या जाणार आहे.

  • Social activities | आमदार जोरगेवार यांच्या वाढदिवशी विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न

    Social activities

    Social activities : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस यंदा विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

    याप्रसंगी शेकडो विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा नोटबुक वाटप करण्यात आले. पुढील सहा दिवसांत पाच हजार विद्यार्थ्यांना एकूण 27 हजार नोटबुक वाटण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. तसेच दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.

    चंद्रपुरात प्रसारमाध्यम कार्यशाळा संपन्न

      सकाळी आमदार किशोर जोरगेवार यांनी माता महाकाली मंदिरात महाआरती केली आणि विविध धार्मिक स्थळांना भेट देत प्रार्थना केली. त्यानंतर सामाजिक उपक्रमांची सुरुवात झाली. भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने जनसंपर्क कार्यालयात आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात 200 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करत “रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान” हा संदेश दिला.

    Blood donation

      दुपारी 11 वाजता बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले शाळेत आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवाराच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करण्यात आले. पुढील सहा दिवसांत महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा नोटबुक देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

     पडोली येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. बाबुपेठ छोटा बाजार येथे लाडू तुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

    दीक्षाभूमी येथे आयोजित सत्कार सोहळ्यात उपस्थित राहून आमदार जोरगेवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.

      तुकुम येथील आरोग्य शिबिराचे उद्घाटनही आमदार जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. जोड देऊळ येथे आयोजित दिव्यांग साहित्य वाटप कार्यक्रमात आमदार जोरगेवार यांनी दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप केले. योग नृत्य परिवार यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला.

    भारतीय जनता पक्ष आणि आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवाराच्या वतीने शहरातील विविध धार्मिक स्थळांवर महाआरतीआणि यज्ञ आयोजित करण्यात आले होते. शहरातील अनेक भागांमध्ये आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, लाडू तुला, साहित्य वाटप यांसारखे विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम राबवण्यात आले.

      आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस समाजहिताची भावना व्यक्त करणाऱ्या या उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा क्षेत्र आणि मित्रपरिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

  • Kishor jorgewar birthday | वाढदिवस लोकनेत्याचा

    Kishor jorgewar birthday

    Kishor jorgewar birthday : सकाळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सपत्नीक चंद्रपूरच्या आराध्य दैवत माता महाकालीची महाआरती करत आजच्या दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर योग नृत्य परिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

    आता मी पुस्तकांचा अभ्यास करणार – सुधीर मुनगंटीवार


    भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता पक्ष आणि आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवाराच्या वतीने शहरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

    Kishor jorgewar birthday

    सकाळी आमदार किशोर जोरगेवार यांनी माता महाकालीचे दर्शन घेत पूजा-अर्चना केली. त्यानंतर आझाद बाग येथे योग नृत्य परिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली. दिवसभर आयोजित विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना त्यांनी भेटी देत शुभेच्छुकांचे शुभेच्छा स्वीकारल्या. Kishor jorgewar


    आज विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार किशोर जोरगेवार यांनी या शिबिरांना भेट देऊन रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे आभार मानले. या शिबिरांमध्ये शेकडो रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यासोबतच हजारो नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

    Birthday program


    नागपूर रोडवरील दर्गा येथे आयोजित कार्यक्रमातही आमदार किशोर जोरगेवार यांनी सहभाग घेतला. त्यानंतर एमआयडीसी येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी जैन गुरूंचे आशीर्वाद घेतले.


    वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक व धार्मिक उपक्रमांमुळे चंद्रपूर शहरात एक सामाजिक एकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेल्या या कार्यक्रमांचे नागरिकांनीही भरभरून स्वागत केले.