kishor jorgewar latest news आमदार किशोर जोरगेवार मतदार करण्यासाठी पटेल हायस्कुल येथील मतदान केंद्रावर गेले असता मतदान करुन बाहेर निघताच एका माय माउलीने आवाज देत आमदार किशोर जोरगेवार यांना आर्शिवाद दिला. आज तुझ्या रुपाने अम्माने आर्शिवाद दिला असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
kishor jorgewar latest news आज विधानसभा निवडणकींसाठी राज्यभरात मतदान होत आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांनी गिरणार चौकातील पटेल हायस्कुल येथे सहपरिवार मतदान केले.
मतदान करुन ते बाहेर पडताच एका वयोवृध्द महिलेने मागुन जोरगेवार यांना हाक मारली आमदार किशोर जोरगेवार यांनीही थांबुन या माय माउलीची विचारपुस केली. यावेळी या मातेने आमदार किशोर जोरगेवार यांना आर्शिवाद दिला.
दरवर्षी मतदान करतांना अम्मा सोबत रहायची, यंदा ती नाही. मात्र मतदान करतांना ती स्मरणात होती. अचाणक आज या मायमाउलीच्या स्नेहात अम्माचे दर्शन झाले. जनु अम्मानेच मला आर्शिवाद दिला असल्याचे या प्रसंगा नंतर आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
kishor jorgewar pathimba क्रांतीवीर शहीद पुलेश्वर शेडमाके आदिवासी समितीने महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
kishor jorgewar pathimba यावेळी क्रांतीवीर शहीद पुलेश्वर शेडमाके आदिवासी समितीच्या अध्यक्ष शशिकला उईके, उपाध्यक्ष राधाबाई शिडाम, सचिव माला पेंदाम, कोषाध्यक्ष श्याम गेडाम यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांना विविध सामाजिक संघटना आणि समाजांचा जाहीर पाठिंबा मिळत असून, या पाठिंब्यामुळे त्यांची बाजू अधिक भक्कम होत असल्याचे दिसून येत आहे.
यापूर्वी सोनार हितकारिणी सभा, व्हॉइस ऑफ छत्रपती टायगर संस्था, एरंडेल तेली समाज, भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी, राष्ट्रीय मानवाधिकार पर्यावरण सुरक्षा व भ्रष्टाचार निवारण संघटन, महाराष्ट्र ए.टी. वर्कर्स युनियन, जय विदर्भ संघटना, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटना, बहुजन युथ क्रांती मोर्चा यांच्यासह विविध संघटनांनी आमदार किशोर जोरगेवार यांना समर्थन दिले आहे. kishor jorgewar pathimba
“आपल्या सर्वांच्या समर्थनाने आमची ताकद वाढली आहे. आपण दाखवलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. सर्व समाजाचा सर्वसमावेशक विकास हा आपला संकल्प आहे. या विकासाच्या पर्वात आपणही सहभागी होत आहात. समर्थन दिले आहे म्हणजे आपण विकासालाच पाठिंबा दिला आहे.
आपल्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या कामाला आमचे प्राधान्य असेल,” असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.
Punha Jorgewar आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. मागील 22 दिवसांपासून आपण विविध माध्यमांतून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. झालेली विकासकामे आणि पुढे करावयाची कामे मतदारांना सांगितली.
Punha Jorgewar यावेळी सभा, बैठका, पदयात्रा यांना चंद्रपूरकरांनी उत्साही प्रतिसाद दिला. त्यामुळे विक्रमी विजयाचा विश्वास असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आज सायंकाळी पाच वाजल्यापासून प्रचाराची तोफ थंडावली आहे. मात्र, या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी पूर्ण ताकद लावली आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तुकूम, बाबुपेठ, जुनोना चौक या भागांमध्ये भव्य पदयात्रा काढून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. Punha Jorgewar
तत्पूर्वी त्यांनी आंबेडकर नगर येथील महा विहार येथे जात तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाथेरो डॉ, सुमनवन्णो यांनी आ. जोरगेवार यांना आशीर्वाद दिला.
यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, मागील पाच वर्षांत आपण अपक्ष असूनही चंद्रपूरसाठी जवळपास चार हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. बाबुपेठ उड्डाणपुलासाठी साडे पाच कोटी रुपये मंजूर करून शेवटचे काम पूर्ण केले आहे. Punha Jorgewar
आज हा पूल नागरिकांसाठी सुरू झाला आहे. वढा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आपण 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. धानोरा बॅरेजचे कामही लवकर सुरू होणार आहे.
आपण 11 अभ्यासिकांचा संकल्प केला होता, मात्र आता 11 पेक्षा जास्त अभ्यासिकांचे काम मतदारसंघात सुरू आहे. दीक्षाभूमीच्या विकासासाठी जवळपास 57 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्या कामांचे भूमिपूजनही पार पडले आहे. गावांमध्ये पांदण रस्ते, सामाजिक सभागृह तयार केले आहेत. घुग्घुस ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर केल्याने या शहराच्या विकासाला गती मिळाली आहे. Punha Jorgewar
आपण विकासकामांसह सामाजिक उपक्रमांतूनही नागरिकांच्या सतत संपर्कात राहिलो आहोत. चंद्रपूरची आराध्य देवी माता महाकालीची महती महाकाली महोत्सवाच्या माध्यमातून देशभर पोहोचवली आहे.
अम्मा का टिफिन अविरत सुरू राहणार
आज आपल्यात अम्मा नाही, मात्र तिच्या प्रेरणेने सुरू झालेला “अम्माचा का टिफिन” उपक्रम नेहमी सुरू राहील. या उपक्रमाद्वारे आपण 200 हून अधिक नागरिकांना घरपोच जेवणाचा टिफिन पोहोचवत आहोत. कार्यालयात कार्यरत सेतू केंद्राद्वारे अनेक नागरिकांचे शासकीय योजनांचे कागदपत्रे निशुल्क तयार करून देत असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन
बाबुपेठ येथील पदयात्रेदरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच नेताजी चौक येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकाला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
chandrapur ring road किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार असताना त्यांनी चंद्रपूर विधानसभेचा प्रचंड मोठा विकास केलेला आहे. आता ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही किशोर जोरगेवार यांना प्रचंड मताधिक्याने निवडून पाठवल्यास या विधानसभेचा चेहरा मोहरा बदलेल हा माझा विश्वास आहे.
चंद्रपूर विधानसभा नव्हे तर चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रातील नंबर एकचा समृद्ध व संपन्न असा जिल्हा होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. chandrapur ring road
किशोर जोरगेवार पुन्हा विधानसभा मध्ये पोहचल्यास चंद्रपूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पूर्णपणे मिटणार कारण 950 कोटींचा उड्डाणपूल निवडणुकीनंतर मंजूर करू असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
नितीन गडकरी म्हणाले की आपल्याला जेव्हा आजार होतो तेव्हा आपण सर्वोत्तम डॉक्टर कोणता आहे हे पाहून त्यांच्याकडे उपचार घेत असतो. त्यामुळे आता निवडणुकीमध्ये सुद्धा जात-पात धर्म ,पंथ न पाहता किशोर जोरगेवार यांच्यासारखा सर्वोत्तम नेता आपण निवडायला हवा. chandrapur ring road
इतर वेळेस आपण कधीही जात पाहत नाही तर निवडणुकीच्या वेळेस आपण जात पाहून मतदान का करायचे? असा प्रश्न नितीन गडकरी यांनी उपस्थितांना केला. भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर या देशामध्ये 67 योजना कार्यान्वित आहेत आणि राज्याच्याही विविध योजना आहेत. या सर्व योजनांचा लाभ घेत असताना कोणत्याही जात-पात धर्म, पंथाचा विचार न करता या योजना सगळ्यांना लागू केल्या जातात.
त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळात सुद्धा या देशाचा विकास घडवून आणण्यासाठी शेवटच्या माणसाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी रेकॉर्ड ब्रेक करत किशोर जोरगेवार यांना आपण निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. chandrapur ring road
मागील लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने संविधान बदलणार हा खोटा प्रचार करत लोकांची दिशाभूल केली. वास्तविक पाहता आणीबाणीच्या काळामध्ये आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाने संविधानात सगळ्यात जास्त बदल केले असून आज हाच पक्ष संविधान बदलण्याची भीती लाल संविधानाची प्रत हातात घेऊन लोकांना दाखवतो आहे.
संविधानात कोणीही बदल करू शकत नाही. संविधानातील मूलभूत तत्व याला कोणीही बदलू शकत नाहीत. आणि आम्ही ते बदलवू सुद्धा देणार नाही . त्यामुळे नागरिकांनी आता या खोट्या प्रचाराला बळी न पडता योग्य उमेदवार व योग्य पक्ष निवडून देणे या देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेली गरज आहे असे मनोगत यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. (chandrapur ring road)
काँग्रेसने 65 वर्षात जे काम केले नाही ते भारतीय जनता पार्टीने गेल्या दहा वर्षात केलेले आहे. देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विविध योजना देशाच्या मूलभूत सोयी सुविधा आणि युवकांना रोजगार मिळेल अशा दृष्टिकोनातून विविध प्रकल्प येणाऱ्या काळात निर्माण होत आहेत. (chandrapur ring road)
देश आज विकासाच्या दिशेने जातो आहे. त्यामुळे आपणही मतदान करत असताना विकासाच्या दृष्टिकोनातून काम करणाऱ्या सरकारला मतदान करावे असे आवाहन गडकरी यांनी केले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची अनेक वर्षापासून इच्छा होती. परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने हा योग जुळून आला असे भावनिक मत व्यक्त केले. अपक्ष असतानाही सरकारच्या सोबत असल्याने या विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी मला मिळाली.
घुघुस ग्रामपंचायत ला नगरपरिषद चा दर्जा मिळावा अशी येथील नागरिकांची ईच्छा होती. त्यादृष्टीने काम पूर्णत्वाला नेण्याचा मी प्रयत्न केला त्याला यश मिळाले. शिवाय ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती तथा उड्डाणपूल निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच हे काम पूर्णत्वाला जाणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आपला आशीर्वादाचा हात माझ्या पाठीशी असाच कायम राहावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. (chandrapur ring road)
चंद्रपूरच्या वाहतूक समस्ये बाबत आमदार किशोर जोरगेवार हे माझ्याशी नेहमीच चर्चा करीत असतात. या समस्येवर आपण उपाय काढावा याबाबतही त्यांनी मला बरेचदा सांगितले आहे. त्या दृष्टीने चंद्रपूरला निवडणूकीनंतर लवकरच नवीन फ्लाय ओव्हर बांधण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. ( chandrapur ring road) पडोली समोरून बंगाली कॅम्प असा हा फ्लाय ओव्हर असणार आहे.
Lakhpati didi प्रत्येक संकटकाळी भाऊ म्हणून उभा राहील – आ. किशोर जोरगेवार, गाव माझा उद्योग फाऊन्डेशन तर्फे आयोजित महिला उद्योजीकांचा एक दिवसीय मेळावा
Lakhpati didi महाराष्ट्र सरकारने ‘लाडकी बहीण योजना’ सुरू करून महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. यापुढेही बहिणींना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यात वाढ करण्यात येणार आहे. आम्हीही आमच्या लाडक्या बहिणींना स्वयंरोजगारातून आर्थिक सक्षम करण्यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले आहे. यामुळे अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे.
पुढेही असे उपक्रम सुरु राहणार असून प्रत्येक संकटकाळी भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहीन, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
गाव माझा उद्योग फाऊंडेशनतर्फे घुग्घुस येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालयात महिला उद्योजिकांसाठी “लखपती दीदी” या एकदिवसीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. Lakhpati didi
या कार्यक्रमाला केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, भाजप घुग्घुस शहर अध्यक्ष विवेक बोडे, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय तिवारी, रघुवीर अहिर, गाव माझा उद्योग फाऊंडेशनचे संचालक पवन वानखेडे, सह-संचालिका अष्टगाथा वानखेडे, जनरल मॅनेजर जसवंत बहादुरे, आणि रिजनल मॅनेजर राजकुमार भडके आदी मान्यवर उपस्थित होते. Lakhpati didi
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, निवडणूक प्रचाराकरिता आज घुग्घुस येथे विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घुग्घुस शहराच्या विकासाला आपले नेहमीच प्राधान्य राहिले आहे. आपण येथील ग्रामपंचायतीचे रुपांतरण नगरपरिषदेत केले.
त्यानंतर आता घुग्घुस शहराच्या विकासाला गती मिळाली आहे. येथे ग्रामीण रुग्णालयाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, तर काही दिवसांत येथील प्रमुख समस्या असलेल्या उड्डाणपूलाचे कामही पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आधार निर्माण करणे हा स्तुत्य उपक्रम आहे. महिलांनी समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे; मात्र, त्यांच्यातील उद्योगशीलतेला आणि व्यवसायवाढीसाठी योग्य दिशा देणे गरजेचे आहे. Lakhpati didi
हीच गरज लक्षात घेऊन या “लखपती दीदी” मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या उद्योगांचे विस्तार, आर्थिक स्थितीचे उन्नतीकरण, तसेच आत्मनिर्भरतेची भावना बळकट करण्यासाठी या उपक्रमाचा निश्चितच मोठा फायदा होणार आहे, असे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले.
मागील पाच वर्षांत आपण विविध प्रकारचे प्रशिक्षण शिबिरे घेऊन ५ हजार महिलांना प्रशिक्षण दिले आहे, यातील अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे, असेही आ. जोरगेवार यांनी सांगितले. या मेळाव्याला हजारो महिलांची उपस्थिती होती.
devendra fadanvis in chandrapur भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर दौऱ्यावर असताना, त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी भेट देऊन आमदार जोरगेवार यांच्या मातोश्री स्व. गंगूबाई उर्फ ‘अम्मा’ यांना आदरांजली अर्पण केली.
devendra fadanvis in chandrapur चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री ‘अम्मा का टिफिन’ उपक्रमाच्या प्रणेत्या, स्व. गंगूबाई, उर्फ यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक, औद्योगिक, क्रीडा क्षेत्रातील नामवंतांनी शोकसंदेशांच्या माध्यमातून अम्माला आदरांजली अर्पण केली.
अम्मा हे सामाजिक कार्यात मोठे नाव होते. ‘अम्मा का टिफिन’, ‘अम्मा की दुकान’, आणि ‘अम्मा की जल सेवा’ या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचे कार्य केले. मात्र दीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून महायुती आणि मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे असलेल्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी आज शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर दौऱ्यावर होते. devendra fadanvis in chandrapur
दादमहल येथील कोहिनूर तलावाजवळ त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मिलन चौकातील आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी पोहचून अम्मांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत अभिवादन केले. यावेळी ना. फडणवीस यांनी अम्मा टिफिन उपक्रमची पहाणी करत कौतुक केले.
सामाजिक उपक्रमांतून निराधारांची सेवा करणाऱ्या अम्मांची सेवा राज्यासाठी प्रेरणादायी आहे. आज निराधारांची ‘अम्मा’ आपल्यात नसली तरी, त्यांनी सुरू केलेले प्रत्येक उपक्रम सेवाभावनेतून पुढे नेला जाईल, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
Star campaigner चंद्रपूर विधानसभेचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई आणि मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ भाजपचे स्टार प्रचारक तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी 9 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असून सकाळी 10 वाजता दादमहल येथील कोहिनूर तलाव क्रीडांगण येथे त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
Star campaigner विधानसभेच्या मतदानाची तारीख जवळ येताच सर्व पक्ष कामाला लागले असून सर्व उमेदवारांनी प्रचारात उडी घेतली आहे. यात भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार यांनी शहरी भागासह ग्रामीण भागातही त्यांनी छोट्या बैठका, नागरिकांशी संवाद अशा माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
मागील पाच वर्षांत केलेली कामे आणि पुढे चंद्रपूरच्या विकासासाठी असलेले त्यांचे व्हिजन ते या बैठकींच्या माध्यमातून सांगत आहेत. Star campaigner
दरम्यान, आता भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चंद्रपूरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ उद्या शनिवारी येत असून, दादमहल येथील कोहिनूर तलाव मैदानात सकाळी 10 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे.
यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून, या सभेला महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
Chhath Puja प्रकृतीचे महत्त्व पटवून देणार्या छट पूजा उत्सवांसाठी घाटांचा विकास करण्याचा संकल्प – आ. किशोर जोरगेवार, छट पूजेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांमध्ये किशोर जोरगेवार यांची हजेरी
Chhath Puja छट पूजा ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून, आपली श्रद्धा, संस्कृती आणि कुटुंबाचे बळ एकत्र येण्याचा पर्व आहे. आपल्या छट पूजेचा उत्सव हा सूर्यदेवाच्या आराधनेचा पवित्र सोहळा असून, सूर्यदेवाच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात प्रकाश, ऊर्जा, आणि समृद्धी नांदावी, अशी कामना करत प्रकृतीचे महत्त्व पटवून देणाऱ्या छट पूजेसाठी चंद्रपूरातील घाटांचा विकास करण्याचा आपला संकल्प आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.
दर वर्षी प्रमाणे यंदा ही चंद्रपूरात छट पूजा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. रामाळा तलाव, महाकाली काॅलरी, लालपेठ शिव मंदिर, दुर्गापूर येथे छट पूजेच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित राहून पूजा अर्चना केली. Chhath Puja
यावेळी ते म्हणाले, “चंद्रपूरात उत्तर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. या शहराच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. आज आपला पवित्र सण आहे. आपण नेहमीच या सनानिमित्त आपल्याकडून आलेल्या सूचनांची दखल घेतली आहे. घाट स्वच्छता आणि सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे नेहमीच आमचे प्रयत्न राहिले आहेत.
या समाजाचे आपल्यावर विशेष प्रेम राहिले आहे. मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात सर्व समाजाला समान न्याय देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे आपल्याला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आमचे प्रथम प्राधान्य राहील आणि पुढेही आपल्या हाकेला साथ मिळणार,” असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.
छट पूजेचा पवित्र पर्व आपल्याला संयम, श्रद्धा आणि सहनशीलतेची शिकवण देतो. सूर्यदेवाच्या उपासनेतून मिळणारी ऊर्जा केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीही प्रेरणा देते. छट पूजा ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे, आणि मातृशक्तीच्या सामर्थ्याचा प्रतीक आहे.
माताभगिनींनी आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी घेतलेले हे तप, हे व्रत यामध्ये एक समर्पण भाव असतो. त्यांचे धैर्य आणि श्रद्धा हे समाजासाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.
Bjp Chandrapur निवडणुका जवळ येताच आपली ऊर्जा आणि उत्साह अधिक वाढत आहे. भाजप कार्यकर्ता म्हणून आपल्यावर जो विश्वास आहे, तो या निवडणुकीत सिद्ध करण्याची संधी आपल्याला पुन्हा मिळाली आहे.
Bjp chandrapur आजच्या या पक्ष प्रवेशानंतर नक्कीच पक्षाला आणखी बळ मिळाले आहे. एकमेकांच्या सहकार्याने, निष्ठेने, मेहनतीने आणि कर्तव्यनिष्ठेने आपण या निवडणुकीत ऐतिहासिक विजय खेचून आणू, असा ठाम विश्वास असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
तुकूम मित्र परिवाराच्या वतीने दिवाळी स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक युवक आणि महिलांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. Bjp chandrapur
या कार्यक्रमाला संबोधित करताना आ. जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टीवार, शिवसेना महिला जिल्हा महानगर अध्यक्षा प्रतिमा ठाकूर, महानगर अध्यक्ष भरत गुप्ता, भाजपचे माजी नगरसेवक अजय सरकार, माजी नगरसेविका पुष्पा उराडे, माजी नगरसेवक रामपाल सिंग आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, भारतीय जनता पक्षात अनेक नवे कार्यकर्ते आपल्यात सामील होत आहेत. आपल्या विचारधारेला बळकटी देण्यासाठी आणि आपला प्रवास अधिक दृढ करण्यासाठी आज येथे उपस्थित असलेल्या नव्या कार्यकर्त्यांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत आहे.
भाजप पक्ष केवळ एक राजकीय संघटना नाही, तर एक विचारधारा आहे. आपल्या देशाच्या, समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित असलेल्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. भाजपच्या प्रत्येक सदस्याने देशसेवा, समाजसेवा, आणि राष्ट्रधर्म या तत्त्वांवर आधारित कार्य केले आहे. आजपासून तुम्ही या पक्षाचा एक अविभाज्य घटक आहात.
तुम्हाला केवळ पक्षाच्या यशात नव्हे, तर देशाच्या विकासात मोठी भूमिका निभवायची आहे. भाजपचे कार्यकर्ते म्हणून आपले ध्येय केवळ सत्ता मिळवणे नसून जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरून देशाच्या विकासाला दिशा देणे आहे, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. Bjp chandrapur
भाजप पक्षात कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे नेहमीच मूल्य राहिले आहे. तुम्ही समाजासाठी काम करत असाल तर पक्षाचा पूर्ण पाठिंबा नेहमीच तुमच्यासोबत असेल. तुमची ऊर्जा, तुमचा उत्साह, आणि तुमची निष्ठा भाजपच्या या संघटनेला अधिक शक्तिशाली बनवेल.
आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे भारतीय जनता पक्षाला विजयाच्या शिखरावर पोहोचविण्यात आपण नक्कीच यशस्वी होणार असल्याचे यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी अनेक युवक, महिला आणि पुरुषांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Chandrapur abhyasika तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेली करुणा, अहिंसा, आणि समतेची शिकवण आपल्या जीवनात आणि समाजात प्रकाश पेरणारी आहे. मतदारसंघातील बुद्ध विहारांमधून आता शिक्षणाचा संदेश जावा या हेतूने आपण १६ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिकांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
Chandrapur abhyasika एकाच मतदारसंघातील १६ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिका असणारे चंद्रपूर कदाचित राज्यातील पहिले मतदारसंघ ठरेल, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
महाकाली कॉलरी येथील आनंद बौद्ध महिला सेवा समिती, भिवापूर येथील करुणा बुद्ध विहार आणि तक्षशिला बुद्ध विहारांच्या वतीने स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आनंद बौद्ध महिला सेवा समितीच्या वतीने आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजप महिला महानगर अध्यक्षा सविता कांबळे, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, कल्याणी किशोर जोरगेवार, सायली येरणे, भाग्यश्री हांडे, नंदा पंधरे, अमोल शेंडे, ताहिर हुसेन, विमल कातकर, नीलिमा वनकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, मागील पाच वर्षांत मी सतत आपल्या संपर्कात होतो. ही गर्दी याचेच फलित आहे. सर्व समाजाचा सर्वसमावेशक विकास हेच आपले ध्येय राहिले आहे. आपण बाबुपेठ येथे भव्य विपश्यना केंद्र तयार करत असून हे केंद्र विदर्भातील उत्तम केंद्रांपैकी एक असणार आहे. Chandrapur abhyasika
मतदारसंघातील १६ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिका तयार करण्याच्या दिशेने आपले प्रयत्न होते. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने यात यश आले आहे. १६ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिकांसाठी आपण साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असल्याचेही यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी बुद्ध विहारांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. येथे केवळ आध्यात्मिक बळच मिळत नाही, तर सामाजिक आणि मानसिक बळही मिळते. आपल्या समाजातील नवीन पिढीने या शिकवणीचा आदर करून एक उत्तम समाज घडवावा.
तथागत गौतम बुद्धांनी दिलेल्या विचारांचा प्रसार करून समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या आपल्या प्रयत्नात आमचे नेहमी योगदान राहील, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.