Tag: आमदार किशोर जोरगेवार

  • Notably Now Bengali Samaj : बंगाली समाजाचा निर्धार.. पुन्हा किशोर जोरगेवार

    Bengali Samaj चंद्रपूरात बंगाली समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. या शहराच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. हा प्रामाणिक आणि कष्टकरी समाज आहे. आपली संस्कृती, परंपरा आणि आपसातील प्रेम वृद्धिंगत करणारा हा स्नेहमिलनाचा कार्यक्रम असून बंगाली समाजाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

     Bengali samaj बंगाली कॅम्प येथे बंगाली समाज बांधवांच्या वतीने स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वंदना हातगावकर,  सविता दंढारे, भारती दुधानी, माजी नगरसेविका शिला चव्हाण, चंपा बिश्वास, कौसर खान, कल्पना शिंदे आदींची प्रमुख्यतेने उपस्थिती होती.

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार अभिलाषा गावतुरे यांच्या प्रचाराचा झंझावात

      यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, मागील पाच वर्षांत आपण सर्व समाजाला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. बंगाली समाजाशी माझे नेहमी स्नेहपूर्ण संबंध राहिले आहेत. या समाजातील मोठा वर्ग आमच्यासोबत सक्रियतेने काम करत आहे. आमच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात या समाजातील कार्यकर्त्यांचा सहभाग राहिला आहे. या समाजातील समस्यांचीही आम्हाला जाणीव असून त्या सोडविण्यासाठी नेहमी आमचे प्रयत्न राहिले असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. Bengali samaj

      बंगाली संस्कृती म्हणजे एक समृद्ध वारसा आहे. आपल्या भाषेत, कलेत, साहित्यात, आणि संगीतामध्ये एक अनोखा आत्मभाव आहे. या स्नेहमिलनाच्या निमित्ताने आपल्या परंपरांना अभिवादन करत, आपल्या मुलांना आणि युवा पिढीला या वारशाचा अर्थ पटवून देणे आवश्यक आहे. आजचा कार्यक्रम म्हणजे आपल्यातील बंध वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न आहे. आपल्यातील युवा पिढीला सांस्कृतिक वारशाचे मोल समजावून देणे आणि या परंपरेचे महत्त्व पटवून देणे हे आपले कर्तव्य आहे.

    चंद्रपुरातील मायकल भाई जेव्हा रेल्वे स्टेशनवर बंदूक घेऊन आला

    समाजाला येणाऱ्या प्रत्येक अडचणीच्या वेळी मी आपल्या सोबत आहे आणि हक्काचा भाऊ म्हणून आपण यापूर्वीही मला हाक दिली आहे. पुढेही हे स्थान कायम ठेवावे मि आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही, असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला बंगाली समाजातील पुरुष व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

  • BJP candidate Kishor Jorgewar : आमदार किशोर जोरगेवार यांचा झंझावात

    BJP candidate Kishor Jorgewar भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. ही निवडणूक कोणत्याही एका उमेदवाराची नसून भाजपची आणि पर्यायाने प्रत्येक कार्यकर्त्याची आहे.

    BJP candidate Kishor Jorgewar आपल्या संघटनेच्या बांधणीतून प्रत्येक घरी पक्षाचे विचार पोहोचवायचे असून विजयाचा संकल्प करत पक्षाच्या धोरणांचा प्रचार प्रभावीपणे करण्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    गुन्हेगारी : चंद्रपुरातील खंजर भाई जवळ मिळाली बंदूक

     भारतीय जनता पक्षाच्या पाचही मंडळांची स्वतंत्र बैठक पार पडली. या बैठकीला संबोधित करताना आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा महानगर अध्यक्ष राहुल पावडे, विधानसभा प्रमुख प्रमोद कुडू, महिला मोर्चा महानगर अध्यक्ष सविता कांबळे, महामंत्री किरण बुटले, बंगाली कॅम्प मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, बाबुपेठ मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, सिव्हिल लाईन मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, बाजार मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, तुकुम मंडळ अध्यक्ष पुरुषोत्तम सहारे, वंदना हातगावकर, सायली येरणे, अमोल शेंडे, विश्वजीत शहा, जितेश कुळमेथे, रुपेश पांडे, मुकेश गाडगे, राशिद हुसेन, प्रतिक शिवणकर, मुन्ना जोगी, सलिम शेख, मंगेश अहिरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. BJP candidate Kishor Jorgewar

     यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आपला पक्ष न्याय, समानता आणि विकासावर आधारित विचारधारेवर उभा आहे. आपल्या एकतेने हाच विचार समाजात पोहोचवायचा आहे. आपल्या पक्षाच्या धोरणांतून समाजाचा सर्वांगीण विकास कसा होईल, हे प्रत्येक व्यक्तीला पटवून सांगण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्यासारखे एकजुटीने कार्य करणारे कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या पाठीशी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आपल्या चेहऱ्यांवर असलेला आत्मविश्वास आणि उत्साह पाहून मला विश्वास आहे की कोणतेही आव्हान आपल्याला थांबवू शकणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. BJP candidate Kishor Jorgewar

     आज भारतीय जनता पक्षाच्या पाचही मंडळांची बैठक संपन्न होत आहे. हे मंडळ खऱ्या अर्थाने पक्ष मजबुतीचे केंद्र आहेत. पक्षाकडून आलेला आदेश या मंडळांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आपली जबाबदारी अधिक असणार आहे. या पाचही मंडळांत येणाऱ्या वार्डांमध्ये आपण अनेक विकासकामे केली आहेत. मूलभूत सोयी-सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. याचा मोठा फायदा आपल्याला जमिनीच्या स्तरावर काम करताना होणार असल्याचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

    या बैठकीला भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Bjp Kishor Jorgewar : किशोर जोरगेवार यांना विजयी करणार, भाजप कार्यकर्त्यांचा निर्धार

    Bjp Kishor Jorgewar भाजप पक्ष हा संघटनात्मक बांधणीसाठी ओळखला जातो. आज पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आपण मोठ्या संख्येने एकत्रित आले आहात. आपल्या चेहऱ्यावरील उत्साह बोलका आहे. सक्रिय कार्यकर्ताच पक्षाची आत्मा असून, याच एकतेने पक्षाचा विचार प्रत्येक घरात पोहोचवावा, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

     Bjp Kishor Jorgewar आज घुग्घुस येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत कार्यकर्त्यांनी विजयाचा निर्धार केला. या प्रसंगी भाजपचे चंद्रपूर विधानसभा प्रमुख प्रमोद कडू, तालुका अध्यक्ष नामदेव डावले, भाजप नेते अनिल डोंगरे, महिला तालुका अध्यक्ष शोभा पिदुरकर, पारस पिंपळकर विजय बलकी, विनोद खेवले, सुशांत शर्मा, विजय आगरे, राकेश पिंपळकर, अनिता भोयर, यांची उपस्थिती होती.

        यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, भाजप हा पक्ष संघटन बांधणीसाठी ओळखला जातो. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ताकद आहे. पक्षाचे धोरण आणि विचार घुग्घुस शहरातील प्रत्येक घरात पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. हा पक्ष म्हणजे केवळ एका विचारधारेचा प्रवास नसून समाजासाठी, आपल्या लोकांसाठी एक तळमळीचा संघर्ष आहे.

    राजकीय : वडेट्टीवार यांनी लावले भाजपला खिंडार

    आपल्यातील प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या समाजाचा आधार आहे आणि पक्षाची रीढ आहे. आपला उत्साह, निष्ठा, आणि समाजसेवेसाठी असलेली कटिबद्धता हीच पक्षवाढीसाठी महत्त्वाची आहे. चंद्रपूरसह घुग्घुस शहराच्या विकासासाठी आजपासून आपण निवडणुकीच्या कामाला लागून भाजपच्या ऐतिहासिक विजयासाठी एकत्रित काम करण्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Bjp Kishor Jorgewar

      मागील पाच वर्षांत आपण घुग्घुसच्या विकासासाठी पूर्णशक्तीनिशी प्रयत्न केले. याचे फलस्वरूप म्हणून घुग्घुस ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये झाले आहे. येथील विकासाला गती मिळाली आहे. लवकरच येथील उड्डाणपूल आणि ग्रामीण रुग्णालयाचे काम पूर्ण होणार आहे. झालेली ही कामे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची असल्याचे यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले.

      यावेळी भाजपच्या बंगाली कॅम्प मंडळ, बाबुपेठ मंडळ, सिव्हिल मंडळ, बाजार मंडळ, तुकुम मंडळ येथे बैठका पार पडल्या, आणि पूर्ण शक्तीने प्रचार कार्याला लागण्याचा संकल्प पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला. या बैठकीला भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Chandrapur Bjp leader : आमदार जोरगेवार यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपात….

    Chandrapur Bjp leader : आमदार जोरगेवार यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपात….

    chandrapur bjp leader भारतीय जनता पार्टीमध्ये विद्यमान आमदार किशोर जोरगेवार व राज्याचे माजी राज्यमंत्री तथा माना समाजाचे दिग्गज नेते डाॅ. रमेशकुमार गजभे यांची घरवापसी झाल्याने पक्षाची राजकीय ताकद शतपटीने वाढली असून या प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपाला पुनर्वैभव प्राप्त होईल असा विश्वास पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.


    Chandrapur bjp leader जिल्ह्यात भाजपाचे प्रबळ संघटन अस्तित्वात असून जोरगेवार व गजभे या लोकप्रिय नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे चंद्रपूर, वरोरा, चिमुर सह संपुर्ण जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांमध्ये पक्षाला मोठ्या प्रमाणात जनाधार लाभणार असून भाजपा या प्रवेशाने पुन्हा संघटनात्मकदृष्ट्या मजबुत होईल असेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.  

    राजकीय : निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्याचा प्रयत्न – कांग्रेस उमेदवार संतोष रावत


    भाजपामध्ये प्रवेश करणारे किशोर जोरगेवार हे महायुतीचे चंदपूर विधानसभा क्षेत्रातील अधिकृत उमेदवार असल्यामुळे त्यांच्या प्रवेशाने अनुसुचित जाती वर्ग भाजपाप्रती अनुकुल राहील तसेच डाॅ. गजभे यांच्या राजकीय क्षेत्रातील गाढा अनुभव व अनुसुचित जमाती प्रवर्गात प्रभाव राखणाऱ्या या नेत्याचा निवडणुकीत मोठा लाभ होईल असे सांगत सर्व समाजामध्ये असलेला उभयतांचा प्रभाव दखलपात्र ठरेल असा आशावादही हंसराज अहीर यांनी व्यक्त केला असून या दोन्ही नेत्यांच्या भाजप प्रवेशाचे त्यांनी स्वागत केले आहे.

  • Now Kishor Jorgewar Candidature Application : किशोर जोरगेवार 28 ऑक्टोबरला दाखल करणार उमेदवारी अर्ज

    Now Kishor Jorgewar Candidature Application : किशोर जोरगेवार 28 ऑक्टोबरला दाखल करणार उमेदवारी अर्ज

    Kishor Jorgewar Candidature Application चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

    राजुरा विधानसभा : देवराव भोंगळे यांच्या उमेदवारीला माजी आमदारांचा विरोध

    Kishor Jorgewar Candidature Application सोमवारी ते भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ना. सुधीर मुनगंटीवार, आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची प्रमुखतेने उपस्थिती राहणार आहे.

    चंद्रपूर विधानसभा : किशोर जोरगेवार भाजपवासी

    आमदार किशोर जोरगेवार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना भाजप तर्फे महायुतीची उमेदवारी देण्यात आली असून आता ते भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणुकीला समोर जाणार आहेत. “जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेच, आता भाजपची साथ मिळाल्याने चंद्रपूरातील विकासकामे आणखी गतीशील करण्यात मदत होईल,” असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी म्हटले आहे.

    देवराव भोंगळे नको

     सोमवारी 28 ऑक्टोबर दुपारी १२ वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या गांधी चौक येथील कार्यालयाजवळून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार नामांकन अर्ज दाखल करतील. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.

  • Mla kishor jorgewar in bjp : आमदार किशोर जोरगेवार यांची घरवापसी

    Mla kishor jorgewar in bjp : आमदार किशोर जोरगेवार यांची घरवापसी

    mla kishor jorgewar in bjp विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना कोण टक्कर देणार असा प्रश्न सर्व राजकीय पक्षासमोर उभा झाला होता, आधी राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाला जोरगेवार यांनी उमेदवारी मागितली, त्यावेळी चंद्रपूर कांग्रेस व खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जोरगेवार यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शविला, त्यामुळे आमदार जोरगेवार यांना राष्ट्रवादी कांग्रेसने उमेदवारी नाकारली.
    अनेक राजकीय घडामोडी नंतर आमदार जोरगेवार आज भाजप पक्षात सामील झाले आणि भाजपच्या जागेचा तिढा सुटला.


    Mla kishor jorgewar in bjp चंद्रपुरातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार व माजी कांग्रेस महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांनी आज भाजप पक्षात प्रवेश करीत पक्षाला मजबुती देण्याचे काम केले.
    यावेळी भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार व मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व माजी खासदार हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला.

    महत्त्वाचे : चंद्रपुर शहरात वेश्याव्यवसाय, 4 महिलांची सुटका


    विशेष म्हणजे जोरगेवार यांना भाजपचे तिकीट मिळावे यासाठी माजी खासदार हंसराज अहिर यांनी प्रयत्न केले.
    वर्ष 2019 च्या विधानसभा निवडणुकीत किशोर जोरगेवार यांनी सर्वच राजकीय पक्षांना पराभवाची धूळ चाटवित 72 हजारांचे मताधिक्य घेतले होते, आधी भाजप प्रवेशवरून अनेक वादंग पक्षात निर्माण झाले, मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक ब्रिजभूषण पाझारे यांना तिकीट मिळावी याकरिता मुनगंटीवार हे प्रयत्नशील होते मात्र ऐनवेळी जोरगेवार यांच्या एंट्रीने पक्षात बंडाचे वातावरण निर्माण झाले, खुद्द मुनगंटीवार हे दिल्ली ला गेले, आणि पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची भावना लक्षात घ्यावी व उमेदवारी देण्यात यावी अशी विनंती त्यांनी पक्ष श्रेष्ठीना केली होती. Mla kishor jorgewar in bjp

    बघा अनकट पक्ष प्रवेश सोहळा


    मात्र पक्ष श्रेष्ठीनी जोरगेवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, आणि त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम आज घेण्यात आला.
    चंद्रपूर जिल्ह्याला मुनगंटीवार विरुद्ध किशोर जोरगेवार हा वाद नवा नाही मात्र यंदा जोरगेवार यांनी या वादात आघाडी घेतल्याने भाजप चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारणार हे निश्चित झाले आहे.

    Namrata themaskar


    महिला कांग्रेसच्या माजी अध्यक्षा नम्रता ठेमस्कर यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या जातीय राजकारण विरोधात कांग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता, चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात नम्रता ठेमस्कर यांची ओळख फायरब्रॅंड नेता म्हणून आहे.
    आजच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात आमदार जोरगेवार व ठेमस्कर यांच्या शेकडो समर्थकांनी पक्षात प्रवेश करीत जिल्ह्यातील 6 विधानसभा जागेवर विजय निश्चित होणार अशी हमी दिली. Mla kishor jorgewar in bjp

    विशेष म्हणजे आजच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपचे ब्रिजभूषण पाझारे व त्यांचे समर्थक उपस्थित नव्हते, सध्या समाजमाध्यमांवर पाझारे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असे संदेश पसरलेले आहे.

    असंख्य कार्यकर्त्यांनी आम्ही जोरगेवार यांचं काम करणार नाही अशी भूमिका घेतली आहे, कार्यकर्त्यांच्या या बंडावर पालकमंत्री काय भूमिका घेणार ही येणारी वेळ सांगेलचं. Mla kishor jorgewar in bjp

    वर्ष 1995 पासून भाजप पक्ष चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत विजय मिळवीत आला मात्र त्यांच्या विजयी रथाला खिंडार लावण्याचे काम आमदार जोरगेवार यांनी केले, त्यावेळी आमदार जोरगेवार यांना जनतेनी भाजपविरोधी मतदान केले होते, 2009 मध्ये जोरगेवार यांना भाजपने तिकीट नाकारल्यावर त्यांनी पक्ष सोडला आणि विधानसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली होती हे विशेष.

  • Powerful kishor jorgewar join bjp : आमदार जोरगेवार यांचा 10 वर्षाचा वनवास संपणार

    Powerful kishor jorgewar join bjp : आमदार जोरगेवार यांचा 10 वर्षाचा वनवास संपणार

    kishor jorgewar join bjp चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार यांचा 10 वर्षाचा वनवास संपला असून ते 27 ऑक्टोबर रोजी घरवापसी करणार असून त्यांचा भाजप पक्षात प्रवेश होत आहे.

    kishor jorgewar join bjp वर्ष 2014 मध्ये भाजप सोडून शिवसेना पक्षात प्रवेश केल्यावर किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढली होती, त्यावेळी त्यांना 52 हजार मत मिळाले मात्र त्यांचा पराभव झाला, वर्ष 2009 मध्ये पालकमंत्री मुनगंटीवार यांनी किशोर जोरगेवार तर हंसराज अहिर यांच्याकडून राजेश मुन यांचं नाव पक्षाकडे गेलं मात्र दोन्ही नेत्यांच्या वादात जागा सुटू नये यासाठी भाजपने नागपूर निवासी नाना श्यामकुळे यांना चंद्रपूर मध्ये पाठवीत विधानसभेची उमेदवारी दिली.

    राजकीय : ब्रह्मपुरी येथे विजय वडेट्टीवार यांनी भाजपला लावले खिंडार

    त्यावेळी निष्ठावंत भाजप पदाधिकाऱ्यांना डावलून बाहेरच्या पदाधिकाऱ्याला भाजपने उमेदवारी दिली होती, नाना श्यामकुळे विजयी झाले मात्र निष्ठवंतांना डावल्ल्याची खंत अनेकांच्या मनात होती, 2014 ला जोरगेवार यांनी भाजप सोडली, विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपसमोर आव्हान निर्माण केलं होतं, पराभव झाल्यावर जोरगेवार घरी बसले नाही तर त्यांनी 5 वर्षे सतत जनतेच्या संपर्कात राहिले. kishor jorgewar join bjp

    वर्ष 2019 ला जोरगेवार यांनी कांग्रेस पक्षाला विधानसभेची उमेदवारी मागितली मात्र त्यावेळी खासदार बाळू धानोरकर यांचा विरोध बघता जोरगेवार यांना उमेदवारी मिळाली नाही, परंतु 2019 ला जोरगेवार अपक्ष निवडणुकीत उभे राहिले, कांग्रेस पक्षाची जमानत जप्त झाली, भाजप चा तब्बल 72 हजार मतांनी पराभव झाला.

    त्यावेळी महाविकास आघाडी अस्तित्वात आली, जोरगेवार यांनी सरकारला समर्थन दिले, अडीच वर्षांनी महायुती सरकार राज्यात स्थापन झाले, अपक्ष आमदार असल्याने विधानसभा क्षेत्रातील कामे व्हावी यासाठी जोरगेवार यांनी महायुती सरकारला समर्थन दिले.

    या दरम्यान पालकमंत्री मुनगंटीवार विरुद्ध आमदार जोरगेवार यांचा अनेकदा वाद झाला, अनेक सार्वजनिक कार्यक्रमात दोघेही एकमेकांवर टीकास्त्र सोडत होते, लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार जोरगेवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा दिला, मात्र मुनगंटीवार यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. kishor jorgewar join bjp

    मुनगंटीवार यांच्याशी जवळीकता वाढल्याने वर्ष 2024 मध्ये आमदार जोरगेवार यांना भाजपची उमेदवारी मिळणार अशी शक्यता निर्माण झाली मात्र त्यांच्या उमेदवारीला पालकमंत्री मुनगंटीवार यांनी विरोध दर्शविला, अश्यात आमदार जोरगेवार यांच्यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे भाजप पक्षाची संजीवनी घेऊन आले, आणि जोरगेवार यांचा भाजप पक्षात प्रवेश निश्चित केला.

    परंतु या राजकीय घडामोडी मध्ये पालकमंत्री मुनगंटीवार यांनी विरोध दर्शविला कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांनी लक्षात घ्याव्या यासाठी दिल्ली ला गेले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही अखेर निष्ठवंतांच्या उमेदवारीचा इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती झाली, मात्र यंदा जोरगेवार यांना अहिरांची संजीवनी कामी आली. kishor jorgewar join bjp

    भाजपच्या वरिष्ठांनी एक एक विधानसभा महत्वाची आहे हे नेत्यांना सांगितले आहे तर आपले उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून यावे यासाठी प्रयत्न करा असा आदेश दिला.

    आता 10 वर्षांनी आमदार जोरगेवार यांची भाजपात घर वापसी होणार असून चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार हे आमदार किशोर जोरगेवार असणार हे स्पष्ट झाले आहे, राजकारणात काहीही होऊ शकते हे याचं जिवंत उदाहरण आहे.

    वर्ष 2019 च्या निवडणुकीत आमदार जोरगेवार यांना मतदारांनी भाजप विरोधात मतदान केले पण यावेळी चित्र वेगळे आहे, जनतेच्या मनात जोरगेवार अपक्ष म्हणून निवडून येणार असा कल आहे, ज्या विरुद्ध आपण निवडणूक लढलो आता त्या पक्षाला मतदान जनता करेल काय? हा मोठा गोंधळ व प्रश्न निर्माण झाला आहे.

  • Exclusive Kishor Jorgewar Bjp Candidate : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात महायुतीचे मेरिट उमेदवार किशोर जोरगेवार?

    Exclusive Kishor Jorgewar Bjp Candidate : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात महायुतीचे मेरिट उमेदवार किशोर जोरगेवार?

    Kishor Jorgewar Bjp Candidate विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये आता हळूहळू चुरस निर्माण होत आहे, महाविकास आघाडी व महायुती ने काही उमेदवारांची यादी जाहीर केली तर काही जागांवर एकमत नसल्याने जागा वाटपाचे घोड अजूनही अडलं आहे.

    Kishor Jorgewar Bjp Candidate चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी आधी राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली मात्र कांग्रेसने जोरगेवार यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला त्यामुळे त्यांचा प्रवेशाचा मार्ग खडतर झाला.

    24 ऑक्टोबर रोजी रात्री दिल्ली मध्ये खलबत झालं आणि जोरगेवार हे भाजपचे उमेदवार असणार अशी माहिती बाहेर आली, त्यामुळे भाजप निष्ठावंत खवळून गेले, आता भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे, यासाठी भाजपचे पदाधिकारी नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपली भूमिका मांडणार आहे.

    जोरगेवार यांना उमेदवारी मिळू नये यासाठी भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार तातडीने दिल्ली ला रवाना झाले, आपल्या कार्यकर्त्यांची भूमिका काय? हे समजवून सांगण्यासाठी मुनगंटीवार दिल्ली येथे जात असल्याची प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली आहे. Kishor Jorgewar Bjp Candidate

    महत्त्वाचे : चंद्रपूर पोलीस म्हणतात या पोलिसांपासून सावध रहा

    विशेष बाब म्हणजे यंदा महायुती मेरिट नुसार तिकीट वाटप करणार आहे, महायुती च्या सर्व्हेमध्ये किशोर जोरगेवार हे आघाडीवर असल्याने भाजप पक्षाने त्यांना उमेदवारी देण्याचे कदाचित ठरविले असणार अशी शक्यता आहे.

    वर्ष 2019 मध्ये आमदार जोरगेवार यांच्या उमेदवारीला कांग्रेस पक्षातून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी विरोध दर्शविला होता, आता वर्ष 2024 मध्ये पुन्हा कांग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जोरगेवार यांच्या महाविकास आघाडी मधून उमेदवारीला विरोध केला.

    विशेष म्हणजे धानोरकर यांच्या विरोधामुळे किशोर जोरगेवार यांनी 72 हजार मतांची आघाडी घेत राष्ट्रीय पक्षांना धोबीपछाड दिली होती, मात्र त्यावेळी महाविकास आघाडी ने एका जागेचे नुकसान केले होते, आता सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. Kishor Jorgewar Bjp Candidate

    सत्तेसाठी सर्व पक्षांना एक-एक जागा महत्वाची आहे मात्र महाविकास आघाडी व महायुती आमदार जोरगेवार यांच्या उमेदवारीला विरोध करीत स्वतःच नुकसान करीत आहे.

    चंद्रपूर विधानसभा ही जागा कांग्रेस पक्ष 1995 पासून सतत हरत आहे, वर्ष 2014 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर तर वर्ष 2019 मध्ये कांग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर होता त्यानंतर सुद्धा कांग्रेस पक्षाचा चंद्रपूर विधानसभेवरील दावा हास्यास्पद आहे असे जाणकारांचे मत आहे. लोकसभा निवडणुक व विधानसभा निवडणूक यामध्ये मोठा फरक असतो.

    एकेकाळी आमदार मुनगंटीवार यांचे भाजप पक्षातील खंदे समर्थक म्हणून किशोर जोरगेवार यांची ओळख होती, मात्र राजकारणात वैर व मैत्री हे जास्त काळ टिकत नसते.

    सध्या महाविकास आघाडी व महायुती मधील नेते आपापल्या सोयीनुसार उमेदवारी ठरवीत सेटिंग चे राजकारण करीत आहे. जोरगेवार यांनी अपक्ष निवडणूक लढल्यास तेचं जिंकणार असा कौल चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील मतदारांचा आहे.

  • Amma funeral : अम्मा पंचतत्वात विलीन

    Amma funeral : अम्मा पंचतत्वात विलीन

    Amma funeral चंद्रपूर: निराधार आणि गरीबांच्या सेवेसाठी झटणाऱ्या आणि समाजसेवेचे प्रतीक असलेल्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा यांच्या पार्थिवावर आज सकाळी भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

    Amma funeral अम्मा यांनी काल सकाळी चंद्रपूरच्या राजमाता निवासस्थानी सर्वांचा निरोप घेतला. त्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर चंद्रपूर येथील बिनबा गेट शांतीधाम येथे शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.

    राजकीय : सातव्यांदा सुधीर मुनगंटीवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

    Amma funeral त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर,  समाजसेवक, आणि राजकीय नेते उपस्थित होते. अंत्यविधीमध्ये आमदार किशोर जोरगेवार आणि त्यांचे छोटे बंदू प्रशांत जोरगेवार यांनी आपल्या मातोश्रींना अग्नी दिला. तत्पूर्वी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. अम्मांच्या निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

    आज सकाळी 10 वाजता कोतवाली वार्ड येथील मातोश्री निवासस्थानातून अम्मांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर बिनबा गेट येथील मौक्षधाम येथे अम्मांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आला. यावेळी अम्मा टिफिन परिवारासह हजारो नागरिकांनी नमत्या डोळ्यांनी अम्मांना अखेरचा निरोप दिला. Amma funeral

    अम्मा यांचा “अम्मा का टिफिन” आणि “अम्मा की दुकान” या उपक्रमांनी चंद्रपूरात समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण केला. गरजू, निराधार, आणि गरीब व्यक्तींना मदत करण्यासाठी त्या झटल्या. या उपक्रमातून अनेकांना रोजीरोटी मिळाली आणि समाजात एक नवा विश्वास निर्माण झाला. त्यांचे योगदान नेहमीच प्रेरणादायी ठरेल, असे यावेळी शोकसभेत नागरिकांनी म्हटले. अम्मांचे कष्टमय आणि सेवाभावी जीवन समाजातील प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारे राहील, असे नागरिकांनी भावुकतेने सांगितले.

    सर्वधर्मीय धर्मगुरूंची प्रार्थना
    अम्मांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी राजमाता निवासस्थानी  ठेवण्यात आले होते. यावेळी सर्वधर्मीय धर्मगुरूंनी प्रार्थना करत अम्मांना आदरांजली अर्पण केली. यात हिंदू धर्मगुरू, ख्रिश्चन धर्मगुरू, बौद्ध धर्मगुरू, मुस्लिम धर्मगुरू आणि शीख धर्मगुरूंनी प्रार्थना केली.

  • Amma chandrapur : निराधारांना आधार देणारी ‘अम्मा” यांचं निधन

    Amma chandrapur : निराधारांना आधार देणारी ‘अम्मा” यांचं निधन

    amma chandrapur आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा यांचे आज आजाराने निधन झाले. चंद्रपूर येथील राजमाता निवासस्थानी सकाळी 9.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यात बोगस मतदार, डाव कुणाचा?, प्रशासनाने केली पोलिसात तक्रार

    Amma chandrapur सोमवारी 21 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता गांधी चौक येथील कोतवाली वार्ड येथील घरून अंत्ययात्रा निघणार आहे. बिनवा गेट येथील शांतीधाम येथे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे.

    अम्मांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना विविध संस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या नावाने चंद्रपूरात सुरु असलेल्या “अम्मा का टिफिन” आणि “अम्मा कि दुकान” या उपक्रमामुळे अनेकांना हक्काची साथ मिळाली होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने उपचारासाठी त्यांना नागपूर येथे दाखल करण्यात आले होते. amma chandrapur

    सामाजिक : त्या दोघांसाठी आमदार जोरगेवार बनले देवदूत

    जवळपास 10 दिवस नागपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने काल शनिवारीच त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. घरी डॉक्टरांच्या निगराणीत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांच्या प्रकृतीत पुन्हा बिघाड झाला आणि सकाळी 9.30 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

    मागील अनेक वर्षांपासून गंगुबाई उर्फ अम्मा या गांधी चौकात टोपल्या विकायच्या, आपल्या साध्या भोळ्या स्वभावाने त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली होती, गरिबी व संघर्षांच्या काळात त्यांनी टोपल्या विणून मुलगा किशोर व प्रशांत यांना मोठं केलं, विशेष बाब म्हणजे अम्मा चा आशीर्वाद सोबत घेत किशोर जोरगेवार हे समाजकार्यात रुजू झाले, काळ लोटला आणि वर्ष 2019 ला किशोर जोरगेवार हे आमदार बनले, अनेक भाषणावेळी मी टोपली विकणाऱ्याचा मुलगा आहे माझी आई आजही टोपल्या विकते असा उल्लेख आमदार जोरगेवार करायचे.

    शहरातील असलेले निराधार नागरिक उपाशी झोपू नये यासाठी गंगुबाई यांनी किशोर जोरगेवार यांना निराधार नागरिकांना आपल्याद्वारे टिफिन उपलब्ध करूया अशी कल्पना दिली, मातोश्री चा आदेश मिळाल्यावर आमदार जोरगेवार यांनी अम्मा का टिफिन उपक्रम राबविला.

    आज निराधारांचा आधार हिरावला, आज अनेक निराधारांचे डोळे अम्माच्या जाण्याने अश्रूने पाणावले आहे.