Tag: आमदार किशोर जोरगेवार

  • Mahakali mahotsav : महाकाली महोत्सवातील रथाचे राज्यपाल यांनी केले पूजन

    Mahakali mahotsav : महाकाली महोत्सवातील रथाचे राज्यपाल यांनी केले पूजन

    Mahakali mahotsav श्री माता महाकाली महोत्सवाच्या दरम्यान 10 ऑक्टोबर रोजी श्री माता महाकालीची नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. यात राजस्थान येथील जयपूर  येथे तयार झालेल्या रथातून माता महाकालीची मूर्ती नगर प्रदक्षिणेत सहभागी होणार आहे. या रथाचे राज्याचे राज्यपाल सि. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर रथ श्री महाकाली माता ट्रस्टतर्फे महाकाली मंदिराला सुपूर्त करण्यात आला.


     Mahakali mahotsav यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री, वनमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, श्री माता महाकाली महोत्सवाचे संयोजक आमदार किशोर जोरगेवार, सचिव अजय जयस्वाल, विश्वस्त सुनील महाकाले, कोषाध्यक्ष पवन सराफ, श्यामसुंदर धोपटे, राजेंद्र शास्त्रकार, मिलिंद गंपावार, जयश्री कापसे गावंडे, मनीषा पडगीलवार, वंदना हातगावकर, सविता दंढारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.


      चंद्रपूरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  7 ऑक्टोबरपासून सदर महोत्सवाला सुरुवात होणार असून, याची जय्यत तयारी चंद्रपूरात सुरू झाली आहे. यंदा प्रथमच नगर प्रदक्षिणेत मातेची मूर्ती रथामधून नेण्यात येणार आहे, आणि हा भव्य आणि सुंदर रथ राजस्थान येथे तयार करण्यात आला आहे. काल राज्याचे राज्यपाल महामहिम सि. पी. राधाकृष्णन चंद्रपूर दौऱ्यावर असताना त्यांनी माता महाकाली मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते माता महाकाली महोत्सवासाठी राजस्थान येथे तयार करून आणलेल्या रथाचे विधिवत पूजन करण्यात आले. Mahakali mahotsav

    अवश्य वाचा : उमेद चे कर्मचारी झाले ना उमेद


    हा रथ तयार करण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागला असून, सदर रथ 17 फूट उंचीचा आहे, तर या रथाची लांबी 22 फूट आहे. रथावर माता लक्ष्मी आणि माता महाकालीच्या शक्तीचे प्रतीक असलेली सिंहाची मूर्ती साकारण्यात आली आहे. तसेच यावर पोतराजे आणि मातेचे सिंहासन आहे. हा रथ दोन मजली असून,  महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.


    यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, “माता महाकाली ही शक्तीचे केंद्र आहे. येथे आल्यावर सकारात्मक ऊर्जेचा संचार झाला. असे महोत्सव धार्मिक एकतेसाठी आवश्यक आहेत. यातून चंद्रपूरची नवी ओळख निर्माण होणार आहे.” यावेळी श्री महाकाली माता ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह माता भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • mahakali mata mandir : महाकाली महोत्सव निमित्त स्वच्छता अभियान

    mahakali mata mandir : महाकाली महोत्सव निमित्त स्वच्छता अभियान

    mahakali mata mandir आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून 7 ऑक्टोबरपासून चंद्रपूरात आयोजित श्री माता महाकाली महोत्सवानिमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने माता महाकाली मंदिर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात चंद्रपूर महानगरपालिकेनेही सहभाग घेतला होता. यावेळी मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला.

    mahakali mata mandir यावेळी आमदार किशोर जोरगेवार, मनपा आयुक्त विपिन पालिवार, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त राजेंद्र भिलावे, सहायक आयुक्त सूर्यवंशी, मुख्य स्वच्छता अधिक्षक अमोल शेडके यांच्या सह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील हे मार्ग बंद राहणार, राज्यपाल दौरा

    दरवर्षीप्रमाणे यंदाच्या नवरात्रीमध्येही आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  7 ऑक्टोबरपासून सदर महोत्सवाला सुरुवात होणार असून यासाठी महाकाली मंदिर परिसराच्या बाजूला भव्य पंडाल उभारण्यात येणार आहे. Chandrapur

      दरम्यान, आज यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महोत्सवाच्या आगमनापूर्वी मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे पदाधिकारी, चंद्रपूर महानगरपालिका आणि माता महाकाली भक्तांनी अभियानात सहभागी होऊन परिसर स्वच्छ केला. यावेळी माता भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    राज्यपाल दौरा

  • Best Half Marathon : चंद्रपुरात हाफ मॅरेथॉन

    Best Half Marathon : चंद्रपुरात हाफ मॅरेथॉन

    Half Marathon आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने आणि जिल्हा अॅथलेटिक्स संघटना चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माता की एकता दौड या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सहा वाजता गांधी चौक येथून या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत राज्यभरातील 1000 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा संपल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.


     Half marathon या बक्षीस वितरण कार्यक्रमाला माजी नगरसेवक पप्पू देशमुख, जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव सुरेश अडपेवार, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशिद हुसेन, विमल कातकर, योग नृत्य परिवारचे गोपाल मुंधडा, प्रविण सिंग, आशा देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील शाळा अदानी ला विकली? सत्य काय जाणून घ्या


    चंद्रपूरात 7 ऑक्टोंबर पासून श्री माता महाकाली महोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा अॅथलेटिक्स संघटना चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी सहा वाजता गांधी चौक येथून या स्पर्धेला सुरुवात झाली. आमदार किशोर जोरगेवार यांनी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर सर्व धावकांनी नियोजित मार्गावर धावायला सुरुवात केली. गांधी चौक, जटपूरा गेट, रामनगर, जनता कॉलेज, लखमापूर हनुमान मंदिर, बापट नगर मार्गे बंगाली कॅम्प,  बायपास,  अष्टभुजा, हिंग्लाज भवानी, राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज मार्गे माता महाकाली मंदिर आणि पुन्हा गांधी चौक असा 21 किलोमीटरचा अंतर पूर्ण करत सर्व स्पर्धक गांधी चौक येथे पोहचले. (Half marathon)


    स्पर्धेत 51,000 रुपयांचे प्रथम पारितोषिक, 31,000 रुपयांचे द्वितीय पारितोषिक, 21,000 रुपयांचे तृतीय पारितोषिक, 11,000 रुपयांचे चतुर्थ पारितोषिक आणि 5,000 रुपयांचे पाचवे पारितोषिक देण्यात आले. पुरुष गटातून सोलापूर येथील अरुण राठोड यांनी  1 तास 5 मिनिटे 56 सेकंदात 21 किमी अंतर पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला. नागपूर येथील नागराज रकसने यांनी 1 तास 9 मिनिटे 25 सेकंदात दौड पूर्ण करत दुसरा क्रमांक मिळवला, तर गोंदिया येथील निखिल टेर्मुने यांनी तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. Half marathon


    महिला गटातून भंडारा जिल्ह्यातील तेजस्वीनी लांबकाने हिने ही दौड 1 तास 27 मिनिटे 36 सेकंदात पूर्ण करत प्रथम क्रमांक मिळवला. गडचिरोली जिल्ह्यातील प्रियंका ओक्सा हिने 1 तास 55 मिनिटात दौड पूर्ण करत दुसरा क्रमांक पटकावला. चंद्रपूर जिल्ह्यातील अभिलाषा भगत हिने तिसरा क्रमांक मिळवला.

    50 वर्षीय काकू आणि 75 वर्षीय आजोबांनी वेधले लक्ष

    या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतला होता. नागपूर येथील 75 वर्षीय डोमा चाफले यांनी 21 किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. चंद्रपूर येथील 50 वर्षीय ताराबाई उराडे यांनीही सहभाग घेत दौड पूर्ण केली. त्यांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले.

  • Bahin Ladki Yojana : लाडकी बहीण योजनेच्या रकमेत भविष्यात वाढ होणार – पालकमंत्री मुनगंटीवार

    Bahin Ladki Yojana : लाडकी बहीण योजनेच्या रकमेत भविष्यात वाढ होणार – पालकमंत्री मुनगंटीवार

    bahin ladki yojana कोणत्याही व्यापार किंवा व्यवसायामध्ये आता केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिली नाही. महिलांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य संधी मिळाली तर त्या संधीचे सोने करतात. चंद्रपूर जिल्ह्यातील 3 लक्ष महिला भगिनी महिला बचत गटांशी जुळल्या आहेत. या बचत गटांना 292 कोटींचे अर्थसहाय्य करण्यात आले असून चंद्रपूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे, ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. भविष्याताही ही वाटचाल अशीच पुढे जाणार असून बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरेल. त्यातून आत्मनिर्भरता आणि स्त्री शक्तीचा जागर वाढेल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    bahin ladki yojana चांदा क्लब ग्राऊंड येथे जिल्हा प्रशासन व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित महिला मार्गदर्शन मेळाव्यात पालकमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन,  सहायक जिल्हाधिकारी कश्मीरा संख्ये, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळुंखे, गिरीश धायगुडे, पालिका प्रशासन अधिकारी वर्षा गायकवाड, मनपाचे उपायुक्त मंगेश खवले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल वाघ, माविमचे जिल्हा समन्वयक प्रदीप काठोळे, राहुल पावडे आदी उपस्थित होते.

    अवश्य वाचा : कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर यांचं निलंबन

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमातून स्त्री शक्तीचे दर्शन झाले, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्राचे वर्णन ‘चांदा ते बांदा’ असे केले जाते. त्यामुळे चांदा हा राज्यात प्रथमच असला पाहिजे. आपल्या जिल्ह्यात क्षमतेची कुठेही कमतरता नाही, फक्त महिलांना योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. संधी मिळाली की त्याचं सोनं करण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. महिला बचत गटांना 292 कोटींचे कर्जवाटप करण्यात आले असून यात चंद्रपूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. bahin ladki yojana

    लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या जिल्ह्यात 4 लक्ष 70 हजार अर्जांना मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 2 लक्ष 75 हजार बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा सुद्धा झाले आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत संपूर्ण 4 लक्ष 70 हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

    संसदीय समितीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांची नियुक्ती

    लोकसंख्येच्या प्रमाणात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत चंद्रपूर जिल्हा राज्यात पहिल्या दहा क्रमांकात आहे. मात्र अजूनही काही महिलांचे आधार सिडींग नसल्यामुळे त्यांना लाभ मिळाला नाही. वंचित राहिलेल्या लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी बचत गटांनी सहकार्य करावे. कोणतीही बहीण या योजनेपासून वंचित राहता कामा नये. तसेच ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही, आज दरमहा 1500 रुपये या योजनेत दिले जाते, भविष्यात यात वाढ होणार आहे, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आवर्जुन सांगितले. bahin ladki yojana

    पुढे ते म्हणाले, उद्योगांमध्ये सुद्धा महिलांना आरक्षण देण्यात येत आहे. एमआयडीसी मध्ये महिलांना उद्योगांसाठी 20 टक्के प्लॉट आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनुदानित शाळा, आश्रम शाळेत महिला बचत गट वस्तुंचा पुरवठा करण्यास सक्षम असून बचत गटांना अनेक कामे सरकारने दिले आहे. तसेच शिवणकाम प्रशिक्षण सुद्धा देणे सुरू असून जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा गणवेश संबंधित गावातच तयार झाला पाहिजे, असा आपला आग्रह आहे, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. (Sudhir mungantiwar)

     हा बहिणींचा सन्मान निधी : आमदार किशोर जोरगेवार

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत जिल्हा अग्रक्रमावर आहे. या योजनेमुळे बहिणी खुश झाल्या असून बहिणींना किमान 100 रुपये रोज मिळावे, म्हणजे महिन्याला तीन हजार रुपये बहिणीच्या खात्यात जमा व्हावे, अशी आपली मागणी आहे. महिलांच्या महत्त्वाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शासनातर्फे बहिणींना हा सन्मान निधी देण्यात येत आहे. ज्या बहिणींच्या अर्जात तांत्रिक कारणामुळे त्रुटी आहेत, त्या त्वरित दूर कराव्यात, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या. bahin ladki yojana

    बचत गटांच्या उत्पादनासाठी मॉलची निर्मिती : जिल्ह्यातील महिला बचत गटांनी आता तंत्रज्ञान,  सोलर, सर्विस सेक्टर, उत्पादनांची मार्केटिंग,  पॅकेजिंग या क्षेत्रात उत्कृष्ट काम करण्याची गरज आहे. बचत गटाच्या वस्तूंसाठी चंद्रपुरात कृषी विभागाच्या जागेवर उत्कृष्ट मॉल तयार होत आहे. यात फूड कोर्ट, प्रदर्शनी सेंटर, प्रशिक्षण सभागृह आदी सुसज्ज राहणार आहे. तालुका स्तरावरही बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी असे मॉल उभे करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. रिलायन्स पेक्षाही आपला मॉल उत्कृष्ट राहील, अशी अपेक्षा पालकमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. (Sudhir mungantiwar)

    वन विभागात आता ‘वनसखी

    चंद्रपूर जिल्ह्यात कृषी सखी, वॉर्ड सखी सुरू करण्यात आली असून ‘सखी’ या शब्दातच प्रेम जाणवते. वनविभागात सुद्धा ‘वनसखी’ करण्याचा निर्णय आपल्या विभागाने घेतला आहे. bahin ladki yojana

    विविध लाभार्थ्यांचा सत्कार व धनादेश वाटप

    यावेळी माविमच्या माधुरी वाकडे, वैशाली गोवर्धन, देवीनंदा भोयर, कीर्ती चंदनमलाधार, नसरीत बानो मोहम्मद हारून, संध्या घरात यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कल्याणी रायपुरे आणि प्रियतमा खातखेडे यांना 1500 रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. लखपती दीदी अंतर्गत लीना मॅडावार, अर्चना टेकाम, लता खोब्रागडे,  उज्वला गेडाम यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. दाताळा येथील सरस्वती समूह आणि जामतुकूम येथील संतोषी उत्पादक गट यांना धनादेश वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेले प्रियंका मोटघरे, अक्षता रामटेके, चांदणी शेंडे, अस्मिता आत्राम, सुश्मिता गिठणलवार यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. bahin ladki yojana

    महिलांना पैठणी आणि सुरक्षा कीट : लकी ड्रॉ द्वारे निवड करण्यात आलेल्या पाच महिलांना पैठणी प्रदान करण्यात आली. यात सुलोचना नैताम, कल्पना शेडमाके, शकुंतला चालखुरे, गीता कार्लेकर, अन्नपूर्णा राऊत यांचा समावेश होता. तसेच लकी ड्रॉ द्वारे निवड झालेल्या शीतल दरेकर, माधुरी टेकाम, मोहिता बोंडे, सविता नेवारे, सुनिता किसनाशिले यांना सुरक्षा किट तर विजया गोटमुखले,  वासंती नन्नावरे, विद्या सदनपवार, अंकिता चंद्रा, शुभांगी ढगे यांना लकी ड्रॉ द्वारे अम्माचा टिफिन देण्यात आला. bahin ladki yojana

    प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, महिला शिक्षित तर कुटुंब शिक्षित होते. महिलांमुळेच कुटुंबात आर्थिक साक्षरता निर्माण होते. चंद्रपूर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 4 लक्ष 73 हजार 70 अर्ज प्राप्त झाले, यापैकी 4 लक्ष 64 हजार 800 महिलांना लाभ मिळणार आहे. उर्वरित महिलांनी या योजनेकरिता अर्ज करावे. मुख्यमंत्री लाडके बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणाची महत्त्वाची पायरी आहे. जिल्ह्यामध्ये तीन लक्ष महिला, बचत गटांसोबत जुळल्या असून बचत गटांना 292 कोटीचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. यात चंद्रपूर जिल्हा राज्यात क्रमांक एकवर आहे, असेही त्यांनी सांगितले.

    यावेळी पोंभुर्णा येथील माविमच्या महिला बचत गटाच्या सरिता मून आणि उमेदच्या शुभांगी गोवर्धने यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी स्टॉलची पाहणी केली. कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी तर आभार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी मानले.

  • Deaf Mute School : विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आमदार जोरगेवार यांची तत्परता

    Deaf Mute School : विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आमदार जोरगेवार यांची तत्परता

    Deaf Mute School मूक व बधिर शैक्षणिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था द्वारा संचालित मूक बधिर निवासी विद्यालय बाबूपेठ चंद्रपूर मध्ये शाळेतील कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याने शासनाने सदर निवासी शाळेची मान्यता काढत कायमची बंद केली. शाळा बंद झाल्याने शाळेतील 100 मूक बधिर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले.


    Deaf Mute School सदर शाळा सुरू व्हावी यासाठी अनुपम बहुद्देशीय सामाजिक संस्था द्वारे जिल्हा परिषद चंद्रपूर समोर पालक व विद्यार्थ्यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. सदर आंदोलन संस्था अध्यक्ष रमाकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

    महत्वाचे : चंद्रपूर शहरातील हा मार्ग 28 सप्टेंबर रोजी राहणार बंद


    यादव यावेळी म्हणाले की चालू सत्रात शासनाने शाळा बंद करण्याऐवजी प्रशासकाची नियुक्ती करायला हवी होती मात्र तसे न करता थेट शाळा बंद केली, किंवा इतर संस्थेला शाळा हस्तांतरित करणे गरजेचे होते मात्र तसे काही झाले नाही.


    त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीना बडतर्फ करावे, संस्थेची नोंदणी रद्द करावी, या मागण्या घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले. (Deaf Mute School)


    धरणे आंदोलनाबाबत चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील आमदार किशोर जोरगेवार यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ धरणे आंदोलन मंडपाला भेट देत आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या. व त्यांनी सदर मूक बधिर शाळा तात्काळ सुरू व्हावी यासाठी केलेल्या पाठपुरावा बाबत आंदोलकांना माहिती देत लवकरात लवकर शाळा सुरू करणार असल्याचे आश्वासन आंदोलकाना आमदार जोरगेवार यांनी दिले.


    30 ऑगस्ट रोजी शासनाने शाळा बंद करण्याचा आदेश जारी केला, 3 सप्टेंबर रोजी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे सदर मूक बधिर निवासी विद्यालय लोक कल्याण बहुद्देशीय शिक्षण संस्था, ब्रह्मपुरी यांना हस्तांतरण करावे अशी विनंती केली.
    विशेष म्हणजे आमदार किशोर जोरगेवार यांच्या पत्राची मुख्यमंत्री शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेत सदर लोक कल्याण शिक्षण संस्थेबाबत अहवाल सादर करावा असे निर्देश दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांना दिले, त्यामुळे मूक बधिर निवासी शाळा तात्काळ सुरू होणार अशी आशा निर्माण झाली आहे, यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांनी आमदार किशोर जोरगेवार यांची विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रति असलेली तत्परता बघत त्यांचे अभिनंदन केले.

    यावेळी अनुपम संस्थेचे अध्यक्ष रमाकांत यादव यांनी, आमदार किशोर जोरगेवार व मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद यांना मागण्यांचे निवेदन दिले, मागण्या 15 दिवसांच्या आत पूर्ण झाल्या नाही तर रमाकांत यादव यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करू असा इशारा यावेळी दिला.

  • Traffic signal project : बागला चौकात लागणार ट्रॅफिक सिग्नल

    Traffic signal project : बागला चौकात लागणार ट्रॅफिक सिग्नल

    Traffic signal project काही दिवसांतच बाबूपेठ उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. येथील उर्वरित शिल्लक कामे जलद पूर्ण करण्यासाठी प्रशासन युद्धस्तरावर काम करत आहे. आपण सतत अधिका-यांच्या संपर्कात आहोत असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असून पूल सुरू झाल्यावर बागला चौकात वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी येथे ट्रॅफिक सिग्नल लावा, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांना दिल्या आहेत.

    अवश्य वाचा : आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबत दक्षता घ्या – जिल्हाधिकारी गौडा

    Traffic signal project आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, चंद्रपूर महानगरपालिका, महावितरण विभाग आणि रेल्वे विभागाच्या अधिका-यांसह पुलाची पाहणी करत उड्डाणपूल सुरू झाल्यावर वाहतुकीवर होणाऱ्या परिणामाचा आढावा घेतला. यावेळी मनपा आयुक्त विपिन पालिवाल,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश तांगडे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विवेक अंबुले, महावितरणचे हेडाऊ  यांच्यासह रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. (Mla kishor jorgewar)

    बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे काम जलद गतीने पुढे जात आहे. यात रेल्वे विभाग, महानगरपालिका, महावितरण कंपनी, एमएमआरडीए, आणि सार्वजनिक बांधकाम विभाग समन्वय साधून उत्तम काम करत आहेत. रेल्वे पूल उतरणार असलेल्या बागला चौकातील लाइट पोल आणि इतर अडथळे दूर करण्यात आले आहेत. लवकरच हा भाग पूलाशी जोडला जाणार आहे. दोन दिवस पाऊस असल्याने काम थोडे मंदावले आहे, मात्र पुन्हा या कामाला गती देण्याची गरज असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

    उड्डाणपूल सुरू होण्याआधी येथील वाहतुकीचा आमदार किशोर जोरगेवार यांनी आढावा घेतला. बल्लारशाह, लालपेठ या भागात जाणारा नागरिक बागला चौकातून जातो, आणि हा पूलही बागला चौकात उतरणार आहे. अशा परिस्थितीत येथे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर तोडगा काढण्यासाठी नियोजन करा आणि पूल सुरू होण्याआधीच येथे ट्रॅफिक सिग्नल सुरू करा, असे निर्देश यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांना दिले आहेत.

  • Jatpura Gate : जटपुरा गेट परिसरात अडकली गणरायाची मूर्ती आणि…

    Jatpura Gate : जटपुरा गेट परिसरात अडकली गणरायाची मूर्ती आणि…

    jatpura gate गणेशाची मूर्ती भव्य असल्याने ती जटपूरा गेटमध्ये अडकली होती. याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी रात्री तीन वाजता येथे पोहोचत प्रशासनाला बाजूची बॅरिकेटींग काढायला लावून गणपतीचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर गणेश भक्तांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले.

    Jatpura gate काल मोठ्या उत्साह आणि जल्लोषात लाडक्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. मात्र, गंज वॉर्ड येथील युवक गणेश मंडळाची मूर्ती अतिशय भव्य असल्यामुळे ती जटपूरा गेटच्या आतून निघण्यास अडचण निर्माण झाली. पोलिस प्रशासनाने गणेश मूर्ती बाजूला ठेवून मूर्ती परत नेण्याची विनंती मंडळाला केली. परंतु मंडळ पदाधिकाऱ्यांनी याला नकार दिला.

    अवश्य वाचा : वंदे भारत एक्सप्रेस चा शब्द पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केला पूर्ण

    यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री तीन वाजता आमदार किशोर जोरगेवार यांना माहिती दिली. आमदार जोरगेवार स्वतः जटपूरा गेट येथे पोहोचले. त्यांनी सर्व परिस्थिती समजून घेत बाजूची  बॅरिकेटींग  मोकळी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर गणेशाची मूर्ती जटपुरा गेटच्या बाजूने नेण्यात आली. 

    चंद्रपुरात थांबली वंदे भारत एक्सप्रेस

    रात्री तीन वाजता उपस्थित राहून निर्माण झालेल्या समस्येचे निराकरण करणाऱ्या आमदार किशोर जोरगेवार यांचे गणेश मंडळ आणि भक्तांनी विशेष आभार मानले.

  • Maharashtra Public Service Commission : 623 अधिकाऱ्यांना नियुक्ती द्या – आमदार किशोर जोरगेवार

    Maharashtra Public Service Commission : 623 अधिकाऱ्यांना नियुक्ती द्या – आमदार किशोर जोरगेवार

    Maharashtra Public Service Commission महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने राज्यसेवा २०२२ अंतर्गत ६२३ पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असला, तरी नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे ६२३ अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. या अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्ती देण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली आहे.

     Maharashtra Public Service Commission MPSC च्या वतीने मार्च २०२४ मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ च्या उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र, काही उमेदवारांनी याविरोधात न्यायालयात प्रकरणे दाखल केल्यामुळे त्यावर स्थगिती येऊन नियुक्त्या रखडल्या होत्या. आता सर्व प्रकरणे निकाली निघाली असून न्यायालयाने फेरनिवड यादी जाहीर करण्यावर कोणतीही बंधने घातलेली नाहीत. तरीही, MPSC ने अद्याप अंतिम यादी जाहीर न केल्यामुळे उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, आणि इतर महत्त्वाच्या ६२३ पदांवरील नियुक्त्या रखडल्या आहेत.

    अवश्य वाचा : मुख्यमंत्री योजना दूत मध्ये अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

      MPSC ने २०२२ मध्ये २३ संवर्गातील ६२३ पदांच्या राज्यसेवा परीक्षेसाठी जाहिरात दिली होती. त्यानुसार, पूर्व परीक्षा ऑगस्ट २०२२ मध्ये, मुख्य परीक्षा जानेवारी २०२३ मध्ये, आणि डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत मुलाखती पार पडल्या. १८ जानेवारी २०२४ रोजी गुणवत्ता यादी जाहीर झाली, तर २० मार्च २०२४ रोजी पदनिहाय अंतरिम यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक उमेदवारांची उपजिल्हाधिकारी,  तहसीलदार,  शिक्षणाधिकारी अशा महत्त्वाच्या पदांवर निवड झाली आहे. (Maharashtra Public Service Commission)

    शेतकऱ्यांना दिलासा

     अंतिम निवड यादीनंतर काही खेळाडू आणि बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे काही प्रकरणे दाखल झाली होती. तसेच, औरंगाबाद खंडपीठात पशुसंवर्धन अधिकारी पदासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायाधिकरणाने सर्व प्रकरणे निकाली काढल्याने आता अंतिम निकाल जाहीर करण्यास कोणतीही अडचण नाही.

    असे असले तरी राज्यसेवा २०२२ च्या पूर्वपरीक्षेपासून जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटला असूनही, अद्याप अंतिम निकाल आणि नियुक्ती प्रक्रिया अनिश्चिततेत आहे. स्पर्धा परीक्षांसाठी अनेक उमेदवारांनी आपले पाच ते सात वर्षांचे कष्ट वाहिले आहेत, परंतु निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या विलंबामुळे उमेदवारांना आर्थिक आणि सामाजिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. बेरोजगारी आणि पदस्थापनेच्या अभावी उद्याचे अधिकारी नैराश्याच्या गर्तेत अडकले आहेत. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्ती देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी या संदर्भात सकारात्मक चर्चा केली असून, यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

  • Latest Clerk Recruitment : चंद्रपुरातील त्या युवकांसाठी आमदाराने घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट

    Latest Clerk Recruitment : चंद्रपुरातील त्या युवकांसाठी आमदाराने घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट

    Clerk Recruitment मुंबई महानगरपालिका आस्थापनावरील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार, एकूण 1 हजार 846 पदांची भरती होणार आहे.

    Clerk recruitment मात्र, या जाहिरातीत नमूद केलेल्या अटींमध्ये दहावी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आणि पदवी प्रथम प्रयत्नात किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी या जाचक अटींवर आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे  त्या रद्द करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

    अवश्य वाचा : या कुंडात गणेश मूर्तीचे विसर्जन नको, चंद्रपूर मनपाचा आदेश

      मुंबई महानगरपालिका आस्थापनावरील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार, एकूण 1846 पदांची भरती होणार आहे. यात राज्यभरासह चंद्रपूरातील उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत. मात्र, प्रचलित पदभरतीमध्ये या प्रकारच्या अटींचा समावेश नसतो. अशा जाचक अटींमुळे साधारणतः २ ते ३ लाख उमेदवारांना पदभरती परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही, ज्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असून, या अटीमुळे अनेक युवक-युवतींसाठी नोकरीच्या संधी कमी होत आहेत. जाहीर केलेल्या जाहिरातीत उमेदवाराने दहावी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आणि पदवी प्रथम प्रयत्नात किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याची अट घालण्यात आली आहे. सदर अट अन्यायकारक असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे, आणि या बाबत अनेक विद्यार्थ्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत अन्यायकारक अट रद्द करण्याची मागणी केली होती.

      दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन सदर अट तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत आमदार किशोर जोरगेवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असून, सदर प्रकरण तपासून कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मनपा आयुक्त यांना दिले आहेत.

  • Ganesh Utsav 2024 : आमदार जोरगेवार यांच्या घरी गणरायाचे आगमन

    Ganesh Utsav 2024 : आमदार जोरगेवार यांच्या घरी गणरायाचे आगमन

    Ganesh utsav 2024 चंद्रपुरातील स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले असून आज जोरगेवार कुटुंबाने सहपरिवार गणरायाची पूजा केली.

    Ganesh utsav 2024 दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. सकाळी ११ वाजता विधीवत पूजा आणि मंत्रोच्चारांच्या साथीत गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. हे गणेशोत्सवाचे ९४ वे वर्ष असून, जोरगेवार कुटुंबीयांची दुसरी पिढी ही परंपरा उत्साहाने पुढे नेत आहे.

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या गणेश उत्सवाच्या शुभेच्छा

      जोरगेवार कुटुंबीयांनी गणेशोत्सवाची महती मनाच्या गाभार्यात समृद्ध धार्मिकतेने आणि भावपूर्ण श्रद्धेने जोपासली आहे. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. त्यांच्या या उत्सवाला ९४ वर्षांची परंपरा असून, स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते हा उत्सव सहकुटुंब साजरा करत आहेत.

    अवश्य वाचा : आता आपणही बनू शकता, मुख्यमंत्री योजनादुत, असा करा अर्ज

     गणेशोत्सवाच्या या मंगलमय प्रसंगी, जोरगेवार कुटुंबीयांनी गणरायाची आरती केली आणि गणेशोत्सवाची सुरुवात केली. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने कुटुंबाचे आणि समाजाचे कल्याण होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. जोरगेवार कुटुंबीयांची गणेशोत्सवाची ही परंपरा श्रद्धा, भक्ती आणि समाजाभिमुखतेचा अनोखा संगम आहे. गणपतीच्या या आगमनाने त्यांच्या निवासस्थानी भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले असून, कुटुंबीयांसह नागरिकांनी सहर्ष गणरायाचे दर्शन घेतले.

    Lord ganesha

     गणेशोत्सवाच्या या पारंपरिक सोहळ्याचे ९४ वे वर्ष साजरे करण्याचे भाग्य मिळाल्याबद्दल जोरगेवार कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. गणरायाच्या आशीर्वादाने आगामी वर्ष नागरिकांसाठी सुख, समृद्धी, आणि आरोग्यदायी जावो, अशी प्रार्थना त्यांनी गणरायापुढे केली आहे.