Tag: आमदार किशोर जोरगेवार

  • Babupeth Railway Flyover : बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल येणार पूर्णत्वास

    Babupeth Railway Flyover : बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल येणार पूर्णत्वास

    Babupeth Railway Flyover चंद्रपूर आणि बाबूपेठ शहराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा बाबूपेठ उड्डाण पुलाचे बांधकाम निधीअभावी रखडले होते, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर ५ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता या कामाला गती मिळणार आहे.

    अपघात मित्रांचा : चंद्रपुरात भीषण अपघात, 4 मित्रांचा जागीच मृत्यू

     Babupeth Railway Flyover बाबूपेठ रेल्वे उड्डाण पूल ही चंद्रपूरातील मोठ्या समस्यांपैकी एक आहे. येथे उड्डाण पूलाचे बांधकाम व्हावे, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. ते  निवडून आल्यानंतर या कामाला गती मिळाली होती. मात्र, अतिक्रमणधारक आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे कामाला विलंब झाला होता. दरम्यान, बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असतानाच निधीअभावी काम पुन्हा एकदा रखडले.

       आ. किशोर जोरगेवार यांनी १० जुलै २०२४ रोजी मनपा अधिकाऱ्यांशी बैठक घेत उड्डाण पुलाच्या बांधकामाच्या स्थितीबाबत आढावा घेतला. यावेळी पूलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी जवळपास ५ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. यावेळी आ. किशोर जोरगेवार यांनी हा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आणि तातडीने पाठपुरावा सुरू केला.

    योजना : या लाडक्या बहिणीलाचं मिळणार 3 हजार रुपये

    अखेर नगर विकास विभागाच्या वतीने बाबूपेठ उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी ५ कोटी ४९ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे, आणि त्याचा जीआरही शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आला आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात असूनही केवळ निधीअभावी रखडलेले बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम आता पूर्ण होणार आहे.

          आ. किशोर जोरगेवार यांनी याबाबत वेळोवेळी शासन स्तरावर बैठका घेत कामाला गती देण्याचे प्रयत्न केले होते. बाबूपेठ रेल्वे रुळ हा येथील नागरिकांसाठी मोठी समस्या होती. येथे उड्डाण पूल तयार करण्याची येथील नागरिकांची ५० वर्ष जुनी मागणी होती. निवडून आल्यावर त्यांनी या प्रस्तावित कामाला गती दिली. मात्र, रेल्वे विभागाअंतर्गत पुलाच्या तिसऱ्या भागाच्या कामामुळे विलंब झाला होता. आता हे काम पूर्ण झाले असून केवळ पालिकेअंतर्गत करण्यात येणारी कामे अपूर्ण आहेत.यासाठी लागणारा ५ कोटी रुपयांचा निधी मिळवून देता आला याचा आंनद आहे असल्याचे म्हणत  “दिक्षाभूमी नंतर बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलासाठीही अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मला समाधान वाटत असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. 

  • Dikshabhumi : चंद्रपुरातील दिक्षाभूमीच्या विकासासाठी 56 कोटींचा निधी मंजूर

    Dikshabhumi : चंद्रपुरातील दिक्षाभूमीच्या विकासासाठी 56 कोटींचा निधी मंजूर

    Dikshabhumi चंद्रपूर येथील पवित्र दीक्षाभूमीचा विकास व्हावा यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. यासाठी 56 कोटी 90 लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, आज मंगळवारी  56 कोटी 90 लाख रुपयांच्या प्रस्तावाला सामाजिक न्याय विभागाने अंतिम मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पवित्र  दीक्षाभूमीचा सर्वांगीण  विकास होणार आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर शहरात जीवघेणे खड्डे

          Diksha bhumi    महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगात नागपूर आणि चंद्रपूर अशा दोनच ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. नागपूर येथील दीक्षाभूमीचा विकास झाला आहे, मात्र चंद्रपूर येथील दीक्षाभूमी अविकसित राहिली होती. येथे देशभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या, परिणामी येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होत होती. या अनुषंगाने दीक्षाभूमीच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार प्रयत्नशील होते.

      Dikshabhumi  आमदार किशोर जोरगेवार यांनी पहिल्याच हिवाळी अधिवेशनात दीक्षाभूमीच्या विकासासाठी एकत्रित 100 कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी सदर मागणी सातत्याने लावून धरली होती. त्यांनी दीक्षाभूमी समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घडवून आणली होती. सत्ता परिवर्तनानंतर, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या मागणीचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर त्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूर येथील दीक्षाभूमीच्या विकासासंदर्भात घोषणा केली होती.

      त्या अनुषंगाने चंद्रपूरच्या दीक्षाभूमी विकासासाठी उच्चाधिकार समितीच्या वतीने 56 कोटी 90 लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर करत, तो वित्त व नियोजन विभागाकडे अंतिम मान्यतेकरिता पाठविण्यात आला होता. सदर प्रस्ताव उच्च स्तरीय शिखर समितीने मंजूर करून वित्त व नियोजन विभागाकडे पाठविले होते. वित्त व नियोजन विभागाने मंजुरी दिल्यानंतर सामाजिक न्याय विभागानेही सदर प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच या कामाला सुरुवात होणार असून, दीक्षाभूमीच्या विकासाची नवी दिशा ठरवली जाणार आहे.

         या निधीतून येथे 65 फुट उंचीचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा तयार करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भित्तिचित्रे, सुरक्षा भिंत, बुद्धविहार, परिसर सौंदर्यीकरण, भव्य वाहनतळ व्यवस्था, सभामंडप यासह इतर अनुषंगिक कामे केली जाणार आहेत.

  • Young chanda brigade : चंद्रपुरात परंपरागत गुरूंचा सत्कार

    Young chanda brigade : चंद्रपुरात परंपरागत गुरूंचा सत्कार

    Young chanda brigade गुरु हे आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या कृपेमुळे, मार्गदर्शनाने आणि शिकवणीने आपली समाजव्यवस्था अधिक सशक्त झाली आहे. विविध क्षेत्रात गुरुंचे मार्गदर्शन आपल्याला लाभते, जे अज्ञानाच्या अंधारातून आपल्याला प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातात. आजचा हा परंपरागत गुरुंचा सन्मान समारंभ त्यांनी विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरव असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा जिंकणार, भाजप अधिवेशनात निर्धार

       गुरु पोर्णिमे निमित्त आज रविवारी  जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात यंग चांदा ब्रिगेड च्या वतीने परंपरागत गुरुंच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले, सरदार हरविंदर सिंग धुन्ना, डॉ. दाभारे, डॉ. रजनिकांत भलमे, गोपाल मुंदडा, माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, श्याम धोपटे, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, राशिद हुसेन, सायली येरणे, भाग्यश्री हांडे, नकुल वासमवार, दयानंद नागरकर, जय मिश्रा, कार्तिक बोरेवार, कल्पना शिंदे, नंदा पंधरे, रूपा परसराम, विमल कातकर, दर्शना चापले, निलिमा वनकर, वंदना हजारे, अल्का मेश्राम, शांता धांडे, कौसर खान, अनिता झाडे, आशु फुलझेले, आशा देशमुख, मंजुषा दरवरे, सरोज चांदेकर, अस्मिता दोनाडकर, माधुरी निवलकर, दुर्गा वैरागडे, कविता निखारे, प्रियंका हजारे आदींची उपस्थिती होती.

     young chanda brigade आजच्या युगात स्वयंरोजगाराकडे वळण्याची गरज आहे. अशात योग्य गुरुंचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. व्यवसायात प्राविण्य प्राप्त अनेकजन आपले कलागुण दुसऱ्यांना देत स्वावलंबी बनवत आहेत. अशा ज्ञानाचे भांडार असलेल्या गुरुंची समाजालाही गरज आहे. आज अशाच परंपरागत गुरुंचा आपण सन्मान करत आहोत. हे गुरु स्वतःजवळील ज्ञान दुसऱ्यांना देण्याचे काम करत आहेत. यामुळे पारंपारिक व्यवसाय आणि हस्तकला जपली जात असल्याचे आ. जोरगेवार म्हणाले.

      गुरु-शिष्य परंपरेचा एक सुंदर प्रवास आपण पाहिला आहे. यामध्ये ज्ञानाचा, संस्काराचा आणि मूल्यांचा वारसा एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजतेने हस्तांतरित होत असतो. गुरुंचे आशीर्वाद म्हणजेच आपल्या जीवनाचा दीपस्तंभ आहे. आजच्या या सन्मान समारंभात, आपण या गुरूंचे योगदान, त्यांचा परिश्रम आणि त्यागाचा गौरव करत असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले म्हणाले की, गुरुंच्या आशीर्वादामुळे आपले जीवन अधिक सशक्त आणि सुसंस्कारित बनले आहे. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने, आपण जीवनातील अडचणींवर मात करून यशाची शिखरे गाठू शकतो, असे ते म्हणाले.

      यावेळी पेंटर, सुतार, वेल्डर, चालक, मेकॅनिक, ऑटो चालक, जिम ट्रेनर, मूर्तिकार, मूर्ती पेंटर, मच्छीपालन, गाय पालन, पार्लर प्रशिक्षण, मोबाईल रिपेअरिंग, शास्त्रीय संगीत, फेटे बांधणेवाला, मंडपवाला, संगीत प्रशिक्षण, क्रीडा, नाटक दिग्दर्शक, बँड प्रशिक्षक, मटका कुंभार, शिवणकला, बुटीक, झुंबा, केक, योग शिक्षक, भजन आरती प्रशिक्षिका, योग नृत्य, सलून, सुवर्णकार, चित्रकार, भजन प्रशिक्षक, फोटोग्राफर, पुजारी, ऑर्केस्ट्रा अशा विविध क्षेत्रातील परंपरागत गुरुंना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

  • Inspired Talks : त्या मुलीचा आत्मविश्वास बघून आमदार जोरगेवार म्हणाले तू पुन्हा धावशील…

    Inspired Talks : त्या मुलीचा आत्मविश्वास बघून आमदार जोरगेवार म्हणाले तू पुन्हा धावशील…

    inspired talks एक चांगल आयुष्य जगत असताना आपल्यावर दुर्घटना ओढावली की आपलं आयुष्य नष्ट होण्याच्या मार्गावर असतो मात्र त्या प्रसंगाला न जुमानता त्याला सामोरे जातो तो खरा योद्धा असतो असाच एक प्रसंग चंद्रपुरातील पडोली या भागात घडला.

    अभय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी एक खिडकी उपक्रम सुरू करा – आमदार किशोर जोरगेवार

    Inspired talks खुटाळा येथील नर्स असलेल्या पूजा हलदारची दुचाकी स्लिप झाल्याने तो पडोली चौकात पडली आणि त्याच क्षणी मागून येत असलेल्या ट्रक चे चाक पूजाच्या पायावरून गेले, या अपघातात पूजाला एक पाय गमवावा लागला. पूजा ला कायम अपंगत्व आलं, मात्र त्या अपघातातून सुखरूप बचावत पूजाने आपल्या आयुष्याचा खरा संघर्ष सुरू केला.

    पूजाला बघण्यासाठी मित्र, नातेवाईक भेटायला आल्यावर ती त्यांच्याशी हसत खेळत बोलायची तिच्या चेहऱ्यावर अपंगत्वाचे कसलेही भान दिसून येत नव्हते, कारण पूजाने स्वतःला तसं तयार केलं.

    आपल्या क्षेत्रातील एका मुलीवर हा गंभीर प्रसंग ओढावला अशी बाब चंद्रपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार यांना कळली, क्षणाचाही विलंब न करता आमदार जोरगेवार खुटाळा येथे पोहचले, आणि पुजाशी त्यांनी संवाद केला, पूजा ने घडलेला सर्व प्रसंग आमदार जोरगेवार यांना न खचता सांगितला, पूजा च्या चेहऱ्यावरील हावभाव असे सांगत होते की ती आता आपला भूतकाळ मागे टाकत नव्या भविष्याची सुरुवात करीत आहे.

    आमदार किशोर जोरगेवार यांना पूजा सोबत संवाद साधत असताना तिच्या चेहऱ्यावरील धाडस आणि आत्मविश्वास पाहून तिचं कौतुक करावं वाटत होतं. तीच हे धाडस दिव्यांगत्व आल्याने निराश झालेल्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

    अपघातामुळे अपंगत्व येऊन सुद्धा तिच्या लढण्याची असलेली धमक आणि जिद्द ही वाखाणण्याजोगे आहे. तिच्या चेहऱ्यावर एक विश्वास होता तो म्हणजे ती हार मानणाऱ्या मधील नाही.. जीवनात कितीही संकटे आली तरी इच्छाशक्ती असल्यावर अशक्य असं काहीच नाही, हे तिच्या संवादादरम्यान प्रकर्षाने जाणवत होते. तिच्यात असलेली. इच्छाशक्ती आणि जिद्द पाहून “धाडसी पूजा तू एक दिवस पुन्हा धावशील आणि या परिस्थितीवर विजय मिळवशील…. असे उदगार आमदार जोरगेवार यांनी यावेळी काढले, अपंगत्व आल्यावर आयुष्यात काय समस्या येतात ते न अनुभवलेलं बरं मात्र पूजाला बघून आमदार जोरगेवार म्हणाले की ज्यांना अपंगत्व आलं आणि हताश झाले त्यांनी पूजा कडे बघा तिचा आत्मविश्वास आपल्याला प्रेरणा देणारा आहे तीच पुढचं आयुष्य सर्वांसाठी एक प्रेरणादायी आहे अशी प्रतिक्रिया आमदार जोरगेवार यांनी यावेळी दिली.

    brave #stubbornness #धाडसी #जिद्द #प्रेरणा #अभिमान #inspiration

  • Abhay Yojana : प्रभावी अंमलबजावणीसाठी एक खिडकी उपक्रम सुरू करा – आमदार जोरगेवार

    Abhay Yojana : प्रभावी अंमलबजावणीसाठी एक खिडकी उपक्रम सुरू करा – आमदार जोरगेवार

    Abhay Yojana नागपूर व अमरावती विभागातील निवासी कारणांसाठी भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनींसाठी विशेष अभय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत नझुल धारक नागरिकांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी एक खिडकी उपक्रम सुरु करा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना दिल्या आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात येणार अग्निशमन बाईक


     Abhay yojana अतिवृष्टीमुळे नागरिकांचे झालेले नुकसान, भुस्खलनाच्या घटना आणि मतदार संघातील विकास कामांसदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी सदर सुचना केल्या असून एका आठवड्यात अभय योजनेकरिता एक खिडकी उपक्रम सुरु करण्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.


        ज्या नझूल जमिनी निवासी कारणासाठी लिलावाद्धारे, प्रीमियम अथवा अन्यप्रकारे भाडे तत्त्वावर दिल्या आहेत, त्यांनाच अभय योजना ३१ जुलै २०२५ पर्यंत लागू राहणार आहे. नझूल जमिनीच्या भोगवटादार- १ करण्यासाठी जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील बाजारमूल्याच्या २ टक्के एवढा प्रीमिअम आकारण्यात येणार आहे. तर फ्री होल्ड करण्यासाठी अन्य अटी शर्ती कायम राहणार आहे. नझूल जमिनीचे वार्षिक भूभाड्याची आकारणी प्रचलित दराने ३१ जुलै २०२५ पूर्वी कालमर्यादेत भरणे अनिवार्य असेल. त्यानंतर भूभाडे न भरल्यास थकीत भूभाडे व त्यावर वार्षिक १० टक्के व दंडनीय व्याज आकारण्यात येईल, असे निर्णय महाराष्ट्र शासणाच्या वतीने घेण्यात आले आहे.

    राजकीय : 4 ऑगस्टला चंद्रपुरात भाजपचे महाअधिवेशन


      त्यानुसार नझुल जागेसाठी सदर अभय योजना ही दिनांक ३१ जुलै २०२५ पर्यंत मर्यादित आहे. अश्या परिस्थितीत नागरिक सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशासनाकडे गेले असता या संबधित यंत्रणा नसल्याने कागदपत्रांची पूर्तता करतांना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.


       सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी आवश्यक कर्मचारी उपलब्ध नाही. त्यामुळे मागील चार महिन्यापासून एकही नागरिकांना या लोकहित अभय योजनेचा लाभ मिळालेला नाही. समर्पित कार्य यंत्रणा अस्तित्वात नसल्याने  सदर योजनेचा लाभ नागरिकांना वेळेत घेणे शक्य होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. चंद्रपूर मनपा कार्य क्षेत्रात १३००० च्या वर नझुल धारक आहे. त्यामुळे सदर योजना प्रभावीपने राबविण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असून नागरिकांना नझुल जमिनीसाठी लोकहित विशेष अभय योजने  च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समर्पित दालन (एक खिडकी योजना) तयार करून आवश्यक कर्मचाऱ्यांची  नियुक्ती तातडीने करण्याच्या सुचना त्यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना दिल्या आहेत. 

  • Chandrapur Crime : चंद्रपुरात पोलिसांचा धाक राहिला का नाही? आमदार जोरगेवार यांचा सवाल

    Chandrapur Crime : चंद्रपुरात पोलिसांचा धाक राहिला का नाही? आमदार जोरगेवार यांचा सवाल

    Chandrapur Crime पिस्तुल घेऊन गुन्हेगार सर्रास वावरत असेल तर ही बाब कायदा सुव्यवस्थेसाठी चिंतेची आहे. वर्दळीच्या ठिकाणी  भरदिवसा गोळीबार केल्या जात आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नाही का असा प्रश्न उपस्थित करत जिल्हात आणखी किती बळी जाऊ देणार आहात असा प्रश्न आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक  मुमक्का सुदर्शन यांना विचारला असुन रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांवर कार्यवाही करत वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याच्या सूचना केल्या आहे.

    अवश्य वाचा : तो नरभक्षक अडकला वनविभागाच्या जाळ्यात


       Chandrapur crime शहरातील वाढती गुन्हेगारी आणि पोलिस विभागाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर सुचना केल्या आहे. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन,  पोलीस निरीक्षक पंकज बनसोडे, पोलीस निरीक्षक शैलेश ठाकरे, माता महाकाली महोत्सव  समितीचे सचिव अजय जयस्वाल, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, शहर संघटक करणसिंह बैस आदींची उपस्थिती होती.
        शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागील काही दिवसांत शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी डोके उचलले आहे. काही घटनांमध्ये पिस्तूलचा वापर करण्यात आला असून, ही गंभीर बाब आहे. पोलीस विभागाने सतर्क राहून, ही शस्त्रे चंद्रपूरात दाखल कशी होतात याची चौकशी करून वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी गुन्हेगारीत लिप्त असलेल्यांवर कठोर कार्यवाही करावी, अशा सूचना जोरगेवार यांनी केल्या आहेत.

         बैठकीत मागील काही दिवसांत घडलेल्या गंभीर गुन्हेगारी घटनांची तपशीलवार चर्चा करण्यात आली. विशेषतः पिस्तूलचा वापर करून झालेल्या घटनांमुळे  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारच्या गुन्हेगारीला थांबवण्यासाठी पोलीस विभागाने सतर्क राहणे आवश्यक आहे. शस्त्रे चंद्रपूरात कशी येतात, याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. गुन्हेगारीत लिप्त असलेल्या व्यक्तींवर कठोर कार्यवाही केली जावी. अशा गुन्हेगारांना तातडीने अटक करून न्यायालयात सादर करावे, मोठी घटना घडण्याआधीच गुप्तचर विभागा मार्फत त्याची माहिती पोलिस विभागाला मिळत असते. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा पून्हा सक्षम करावी, आलेल्या माहितीकडे दुर्लक्ष न करता त्याची सत्यता तपासण्यात यावी अशा सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.
          अवैध व्यवसाय आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या दिशेनेही प्रयत्न करणे आवश्यक आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. गस्त वाढवणे, संदिग्ध व्यक्तींवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना केल्या आहे.  

  • Tadoba Tiger Reserve : ताडोबा महोत्सवात यांचा सन्मान करा – आमदार किशोर जोरगेवार

    Tadoba Tiger Reserve : ताडोबा महोत्सवात यांचा सन्मान करा – आमदार किशोर जोरगेवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जागतिक स्तरावर पोहचविण्यास वन्यप्राणी छायाचित्रकार,  पत्रकार, वन्यजीव संरक्षण संस्था, वन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व जंगलांचे संरक्षण करणारे स्थानिक नागरिकांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे चंद्रपूरात आयोजित ताडोबा महोत्सवात त्यांचा सत्कार करण्यात यावा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी वनसंरक्षक तथा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डाॅ. जितेंद्र रामगावकर यांना केल्या आहे. सदर पत्रही त्यांनी पाठवले आहे.  Tadoba mahotsav

     

          वन विभागाच्या वतीने ताडोबा महोत्सव २०२४ चे आयोजन १ मार्च ते ३ मार्च २०२४ दरम्यान करण्यात आले आहे. ताडोबा महोत्सव 2024 चे उद्दिष्ट ताडोबाची यशोगाथा साजरी करणे आणि ती जागतिक मंचावर प्रकाशित करणे हि आहे. मात्र सदर महोत्सव साजरा करत असतांना ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील प्राण्यांचे छायाचित्र आपल्या कॅमेर्यात टिपून येथील सौंदर्य जगात पोहोचविणार्या वन्यजीव छायाचित्रकरांचा विसर पडता कामा नये. त्यासोबतच अनेक पत्रकार वृतांकनच्या माध्यमातून ताडोब्याच्या प्रसिद्धीसाठी काम करीत आहे. Forest conservation

     

    तसेच वन्यजीव संस्था वन विभागातील कर्मचारी – अधिकारी यांच्या खांद्याला खांदा लावून वन्य प्राणी संरक्षणाचे ईश्वरीय कार्य करीत आहे. येथील स्थानिक नागरिकांनी या वनसंपत्तीचे संरक्षण केले आहे. यांच्या एकत्रित योगदानामुळेच आज ताडोबा व्याघ्रप्रकल्प जागतिक स्तरावर पोहचले आहे. Wildlife conservation

     

    या सर्वांच्या सामुहिक योगदानाशिवाय ताडोबा महोत्सवाची संकल्पनाच अपुरी राहील त्यामुळे अश्या आयोजनात ताडोबाच्या प्रसिद्धीत, संरक्षणात उल्लेखनीय योगदान असलेल्या या सर्व घटकांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या सेवाकार्याची पावती देण्यात यावी अशा सूचना त्यांनी क्षेत्र संचालक डाॅ जितेंद्र रामगावकर यांना पाठविलेल्या पत्रातुन केल्या आहे.

  • Mla Kishor Jorgewar : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, पूर संरक्षण भिंत, आमदार जोरगेवार यांनी वेधले सभागृहात लक्ष

    Mla Kishor Jorgewar : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, पूर संरक्षण भिंत, आमदार जोरगेवार यांनी वेधले सभागृहात लक्ष

    News34 chandrapur

    चंद्रपूर – छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा  राज्याभिषेक सोहळा राज्यभर साजरा केला जात आहे. मात्र हे होत असतांना छत्रपती महाराज यांचा अश्वारूढ पुताळा चंद्रपूर सह राज्यातील अनेक जिल्हात आजही नाही. त्यामुळे जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नाही त्या ठिकाणी पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली आहे. Chhatrapati Shivaji Maharaj

     

    गुरुवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी अर्थसंकल्पाचा समर्थनार्थ  आमदार किशोर जोरगेवार सभागृहात बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर मतदार संघातील विविध विषयांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, सुमारे 17 किलोमीटर लांबीचा परकोट असलेले चंद्रपूर हे पुरातन शहर आहे. येथे 500 वर्ष जून मंदिर असुन 2 हजार वर्ष जुनी माता महाकालीची मुर्ती येथे स्थापित आहे. मात्र पूरातत्व विभागाच्या जाचक अटिंमुळे मंदिराचा अपेक्षित असा विकास झालेला नाही. येथे चैत्र अश्विनी महिन्यात यात्रा भरते. देशभरातील भाविक येथे येतात त्यामुळे सदर यात्रा परिसराचा विकास करण्यात यावा अशी मागणी यावेळी बोलताना त्यांनी केली आहे.

     

    चंद्रपुरातील इरई नदीला वारंवार पूर येत असतो. त्यामुळे मोठे नुकसान या भागातील नागरिकांचे होत आहे. (flood protection wall)त्यामुळे येथे पुर संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, विदर्भातील पंढरपूर असलेल्या वढा तिर्थ (vada tirtha funds) क्षेत्राला महाविकास आघाडी सरकारच्या वेळेस 25 कोटी रुपये देण्यात आले होते. मात्र ते मिळालेले नाही. त्यामुळे सदर निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावा, जगात सर्वाधिक वाघांचा संरक्षण करणारा आमचा जिल्हा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने येथे टायगर सफारीची घोषणा केली होती.

     

    171 हेक्टर जागेत 286 कोटी रुपये खर्च करत टायगर सफारी निर्माण होणार होती. चंद्रपूरच्या विकासाला चालणा मिळणार असलेल्या या घोषित टायगर सफारीचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे अशी मागणही यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.   tiger safari project

     

    काळा राम मंदिराचा पर्यटनदृष्ट्या विकास करा

    नाशिकला काळाराम मंदिर आहे. त्याच प्रमाणे चंद्रपूरलाही प्राचीन  असे काळाराम मंदिर आहे. येथे जागाही उपलब्ध आहे. त्यामुळे या मंदिराच्या पर्यटनदृष्टा विकास करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा अशी मागणी यावेळी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. mla kishor jorgewar

  • Maharashtra Kesari : 48 वर्षांनंतर भव्य कुस्तीचा सामना चंद्रपुरात परतला

    Maharashtra Kesari : 48 वर्षांनंतर भव्य कुस्तीचा सामना चंद्रपुरात परतला

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे तब्बल 48 वर्षांच्या खंडानंतर भव्य कुस्ती सामन्याने चंद्रपुरात विजयी पुनरागमन केले. प्रतिष्ठित महाकाली मैदानावर हा कार्यक्रम झाला, ज्यात मोठ्या संख्येने उत्साही प्रेक्षकांनी गर्दी केली होती. सामर्थ्य आणि कौशल्याच्या रोमांचकारी प्रदर्शनात महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख याने पुरुषांच्या कुस्ती स्पर्धेत विजय मिळवला. Maharashtra kesari sikandar shaikh

     

     

    शेखने राष्ट्रीय कुस्तीपटू दीपक काकरन याला तीन मिनिटांच्या अप्रतिम लढतीत पराभूत करून सन्मानाची गदा मिळवून दिली. महिलांच्या कुस्ती स्पर्धेत तितकीच तीव्र स्पर्धा पाहायला मिळाली, अर्जुन पुरस्कार विजेती दिव्या काकरन चॅम्पियन म्हणून उदयास आली. काकरनने तिचे कौशल्य आणि दृढनिश्चय प्रदर्शित केले कारण तिने पंजाब आणि हरियाणा केसरी जसप्रीत कौरचा पराभव केला आणि तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी योग्य ओळख मिळवली. विशेष अतिथी म्हणून उपस्थित आदरणीय महान भारतीय केसरी योगेश बोंबले यांच्या उपस्थितीने हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला. बोंबलेच्या उपस्थितीने आधीच विद्युतीकरण करणाऱ्या वातावरणात प्रतिष्ठा आणि उत्साह वाढवला आणि प्रेक्षकांना त्याच्या कर्तृत्वाने आश्चर्य वाटले.

     

    सुमारे पाच दशकांनंतर चंद्रपूर येथे भव्य कुस्ती सामन्याच्या पुनरागमनाने या प्रदेशातील या पारंपारिक खेळाची आवड पुन्हा जागृत केली आहे. या इव्हेंटने कुस्तीपटूंची अफाट प्रतिभा आणि समर्पण दाखवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले, तसेच परिसरातील समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रचार केला. एकूणच, चंद्रपूर येथील भव्य कुस्ती सामना जबरदस्त यशस्वी झाला, ज्याने क्रीडापटू, प्रेक्षक आणि कुस्तीप्रेमींना एकत्र आणून खिलाडूवृत्ती आणि स्पर्धेची भावना साजरी केली. हा कार्यक्रम भारतीय संस्कृतीत कुस्तीच्या कायम लोकप्रियतेची आणि महत्त्वाची आठवण करून देणारा ठरला.

     

    चंद्रपूरात मागील काही दिवसांपासून आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून विविध खेळांचे आयोजन केल्या जात आहे. यात क्रिकेट, बाॅडी बिल्डिंग, कबड्डी नंतर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माता महाकालीच्या मैदानात तब्बल 48 वर्षा नंतर कुस्तीचा थरार चंद्रपूरकरांना अनुभवायला मिळाला. यावेळी महान भारत केसरी योगेश बोंबाळे यांची विशेष उपस्थिती होती. गांधी चौकातून महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख आणि पंजाब व हरियाना केसरी जसप्रीत कौर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती. या दरम्यान विविध सामाजिक व क्रिडा संघटनांच्या वतीने रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

     

    सदर रॅली अंचलेश्वर गेट होत महाकाली मंदिरच्या पटांगणात पोहचली. त्यानंतर या विशेष कुस्ती सामन्यांना सुरवात झाली. यावेळी पंजाबचे कमलजित सिंग यांची वाशिमचे विजय शिंदे यांच्यात लढत झाली या लढतीत कमलजित सिंग या कुस्तीगीराचा विजय झाला. त्यानंतर पंजाब व हरियाना केसरी जसप्रीत कौर व अर्जुन पुरस्कार प्राप्त दिव्या काकराण यांच्यात लढत झाली या लढतीत अर्जुन पुरस्कार दिव्या काकराण हिने विजय मिळवत मानाची गदा मिळविली. या नंतर सर्वांचे लक्ष लागलेल्या सिकंदर शेख व राष्ट्रीय कुस्तीपटू दीपक काकरण यांच्यात कुस्तीचा थरार रंगला.

     

    या सामन्याला पंच म्हणून धर्मशील कातकर हे प्रसिध्द पंच लाभले होते. ही कुस्ती पाहण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. या सामन्यात तिन मिनीटाच्या आत सिंकदर शेख याने प्रतिस्पर्धी दिपक यांचा पराभव करत विजय मिळविला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरपूरचे मदने आणि प्रा. श्याम हेडाऊ यांनी केले. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्यांक विभाग प्रमुख सलिम शेख, युवा नेते अमोल शेंडे, चंद्रशेखर देशमुख, बंगाली समाज विभाग महिला शहर प्रमूख सविता दंडारे, सायली येरणे, आदिवासी विभाग जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, राशिद हुसेन, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, प्रतिक शिवणकर करणसिंग बैस यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येेने उपस्थिती होती.

  • Mla Kishor Jorgewar : आमदार किशोर जोरगेवार यांनी तो रस्ता गावकऱ्यांसाठी केला मोकळा

    Mla Kishor Jorgewar : आमदार किशोर जोरगेवार यांनी तो रस्ता गावकऱ्यांसाठी केला मोकळा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – खुटाळा येथील लहुजी नगर कडे जाण-या मार्गात एकाचे ले – आउट असल्याने सदर ले – आउट धारकाने गावाकडे जाणारा मार्ग अडविला होता. त्यामुळे गाव-यांना अडचण निर्माण झाली होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी येथे सदर रस्ता गावक-यांसाठी मोकळा करुन दिला आहे. तसेच येथे पक्का रस्ता तयार करण्यासाठी निधी देणार असल्याचे म्हटले आहे.

     

     

       खुटाळा येथे लहुजी नगर आहे. मागील 40 वर्षापासून सदर गाव येथे असून या गावाकडे जाणारा एक मुख्य मार्ग आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सदर मार्ग आपल्या ले – आउट मध्ये असल्याचे सांगत ले – आउट धारकाने गावक-यांचा रस्ता बंद केला होता. अशात गावक-यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. दरम्यान गावातील एका मुलीची प्रकृती खराब झाली.

     

     

    तीला रुग्णालयात नेण्यासाठी सदर मार्गाचा वापर करु दिल्या गेला नाही असा आरोप गावक-यांनी केला आहे. ही बाब कळताच आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी गावाला भेट देत गावक-यांची समस्या समजून घेतली. यावेळी संबधीत ले – आउट धारकाला बोलावून त्याची समज काडण्यात आली असून सदर मार्ग पुन्हा गावक-यांसाठी मोकळा करण्यात आला आहे.

     

     

        तसेच सदर मार्गाचे पक्के बांधकाम करण्यासाठी आवश्यक तितका निधी आपण उपलब्ध करुन देउ अशी ग्याही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी गावक-यांना दिली आहे. गावकडे जाण्याचा मार्ग कोणीही अडवू शकत नाही. यापुढे असा प्रकार घडता कामा नये. असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. यावेळी गावक-यांनीही आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले आहे.

     

    या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, जय मिश्रा यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची आणि गावक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.