Tag: आमदार किशोर जोरगेवार

  • leopard in city : चंद्रपूर शहराच्या मध्यभागी बिबट्याचे आगमन

    leopard in city : चंद्रपूर शहराच्या मध्यभागी बिबट्याचे आगमन

    leopard in city चंद्रपूर जिल्हा हा चारही बाजूने वन सौंदर्याने नटलेला आहे, या भागात अनेक वन्यप्राण्यांचा वावर आहे, अश्यात काही वन्यप्राणी अनेकदा रस्त्यावर तर काही गावात वावरताना आढळून येतात.


    Leopard in city 5 सप्टेंबर ला पहाटेच्या सुमारास शहरात अचानक बिबट्या शिरला, त्या बिबट्याचा मागे कुत्रे लागल्याने त्याने पळ काढत थेट बिनबा गेट जवळील बोबडे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या झुडपात आश्रय घेतला सदर बाब नागरिकांना कळताच याबाबत त्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली, सध्या वनविभाग बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न करीत आहे.

    शहरातील बिनबा गेट परिसरात बिबट शिरल्याची घटना समोर आली आहे. याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार ऑन द स्पॉट दाखल झाले असून, सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. येथे जमलेली गर्दी पाहता, सुरक्षा वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या असून, बिबटला जेरबंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी विभागीय एसीएफ आदेश शेणगे, वन अधिकारी प्रशांत खाडे, वन अधिकारी नायगमकर यांच्यासह पोलिस विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात 19 सप्टेंबर पर्यंत कलम 36 लागू


    Leopard in city पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बिनबा गेट लगत असलेल्या झाडी-झुडपांमध्ये बिबट वावरत असल्याचे काही नागरिकांना दिसले. याची माहिती लगेच वन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिस विभागातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सोबतच याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांना पोहोचताच ते मुंबईहून थेट घटनास्थळी पोहोचले. सध्या बिबटला पकडण्यासाठी वन विभागाचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. रेस्क्यू पथकही येथे दाखल झाले आहे. येथे होत असलेली नागरिकांची गर्दी पाहता दंगा नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. या सर्व कार्यवाहीवर आमदार किशोर जोरगेवार स्वतः लक्ष ठेवून असून, त्यांच्या वतीने प्रशासनाला योग्य सूचना करण्यात येत आहेत.

    शहरात बिबट्या


    त्यांनी दूरध्वनीवरून पोलिस अधीक्षकांशीही संपर्क साधत पोलीस विभाग यासंदर्भात अनेक सूचना केल्या आहेत. येथे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात यावा, काही भाग प्रतिबंधित करण्यात यावा, अशी सूचना यावेळी त्यांनी पोलिस अधीक्षकांना केली आहे. तसेच तहसीलदार आणि वन विभागाच्या मोठ्या अधिकाऱ्यांशीही ते सतत संपर्कात आहेत. नागरिकांना कोणतीही हानी न होता नियोजनबद्ध पद्धतीने बिबटला जेरबंद करण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत असून, आपण स्वतः येथे उभे राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

  • Foreign Scholarships : चंद्रपुरातील बहीण-भावाला मिळाली 1 कोटी 90 लाखांची शिष्यवृत्ती

    Foreign Scholarships : चंद्रपुरातील बहीण-भावाला मिळाली 1 कोटी 90 लाखांची शिष्यवृत्ती

    Foreign Scholarships चंद्रपुरातील बहीण भावाला आमदार जोरगेवार यांच्या पाठपुराव्याने तब्बल 1 कोटी 90 लाखांची शिष्यवृत्ती मिळाली. याकरिता बहीण-भावाने आमदार जोरगेवार यांचे आभार मानले.

    Foreign scholarships एका परिवारातील फक्त एकालाच परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्याच्या अटीमुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात अडथळा येत होता.याच अन्यायकारक अटीच्या विरोधात आवाज उचलत आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर अट रद्द करायला लावली, त्याचा लाभ चंद्रपूरातील पवित्रा पोट्टाला आणि शुभम पोट्टाला या बहिण-भावाला झाला असून त्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे. या दोघांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत त्यांचा सत्कार करत आभार मानले आहे.

    अवश्य वाचा : महिला सुरक्षेसाठी चंद्रपूरकर एकत्र, मध्यरात्री निघाली मशाल रॅली

     Foreign scholarships पवित्रा आणि शुभम पोट्टाला यांनी त्यांच्या परदेशी शिक्षणाची स्वप्ने पाहिली होती, परंतु एका परिवारातील फक्त एकालाच शिष्यवृत्ती देण्याच्या अटीमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण झाला होता. अशा अनेक मुलांनी या अटी विरोधात रोष व्यक्त करत सदर अट रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आ. जोरगेवार यांनी तात्काळ हे प्रकरण लक्षात घेतले आणि या अटीच्या विरोधात आवाज उठवला. सदर अट रद्द करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. यासाठी त्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत या अटीविरोधात विद्यार्थांमध्ये असलेल्या रोषाबदल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अवगत केले होते. त्यांनंतर ही अट रद्द करण्यात आली आणि आता पवित्रा आणि शुभम पोट्टाला या दोघांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. शिष्यवृत्तीच्या लाभामुळे महाकाली काॅलरी येथील रहिवासी असलेली पवित्रा पोट्टाला ही युके येथील एडिन बर्क येथे एलएलएम चे शिक्षण घेणार आहे तर तिचा भाऊ शुभम हा युएस येथील एल युनिव्हर्सिटी येथे एमइएम चे शिक्षण पूर्ण करणार आहे. पवित्राला 60 लक्ष तर शुभम ला 1 कोटी 30 लक्ष अशी फुल फंडेंट शिष्यवृत्ती मिळली आहे. त्यामुळे आनंदित झालेल्या पवित्रा आणि शुभम यांनी आपल्या कुटुंबासह आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली आणि त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले आहे. या भेटीदरम्यान, त्यांनी आ. जोरगेवार यांचा सत्कार केला आणि त्यांच्यामुळेच स्वप्न साकार झाले असल्याचे सांगितले.

     Foreign Scholarships आ. किशोर जोरगेवार यांनी सदर अटीला केलेल्या विरोधामुळे आणि शिष्यवृत्तीच्या नियमांमध्ये बदल घडवून आणल्यामुळे पवित्रा आणि शुभम यांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. आ. जोरगेवार यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या प्रगतीला कुठलीही अडचण येऊ नये, हे आमचे उद्दिष्ट आहे. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास मदत होईल. या प्रसंगी पवित्रा आणि शुभम यांच्या कुटुंबीयांनीही आ. जोरगेवार यांचे कौतुक केले आणि त्यांच्या सहकार्याने आपल्या मुलांचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद व्यक्त केला. या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील इतर विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्येही आशेचा किरण निर्माण झाला आहे.

    शिक्षण शुल्काची मर्यादा रद्द झाल्याने दोंघाना मिळाली फुल्ली फंडेट शिष्यवृत्ती

    नव्या नियमांनुसार शिक्षण शुल्काची मर्यादा 30 ते 40 लाख करण्यात आली होती. सदर अटही आमदार किशोर जोरगेवार यांनी रद्द करायला लावली होती. याचा फायदा पवित्रा आणि शुभम ला झाला असून पवित्राला 60 लक्ष तर शुभमला 1 कोटी 30 लक्ष रुपयांची फुल्ली फंटेड शिष्यवृत्ती मिळाली आहे.

  • Railway Flyover : बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूलाचा शेवटचा टप्पा पूर्ण

    Railway Flyover : बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूलाचा शेवटचा टप्पा पूर्ण

    Railway Flyover आमदार किशोर जोरगेवार यांनी ५ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला गती मिळाली आहे. बुधवारी त्यांनी शेवटच्या काँक्रीटीकरणाची पाहणी करून कामाला गती देण्याचे निर्देश दिले.

    अवश्य वाचा : सुधीर मुनगंटीवार यांचा विकास रत्न पुरस्काराने सन्मान


     Railway Flyover यावेळी मनपा आयुक्त विपिन पालीवाल, मनपा शहर अभियंता विजय बोरिकर, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, अतिरिक्त सहायक आयुक्त बोबाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता जावळे आदींची उपस्थिती होती.
      बाबुपेठकरांची अत्यंत महत्त्वाची समस्या असलेल्या बाबुपेठ उड्डाण पुलाचे काम लवकर पूर्णत्वास यावे, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. काम शेवटच्या टप्प्यात असताना निधीअभावी काम रखडले होते. या निधीची व्यवस्था करण्यासाठी आमदार जोरगेवार यांनी सतत प्रयत्न करून ५ कोटी ४९ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
     Railway Flyover सदर निधी प्राप्त होताच पुलाच्या बांधकामाला गती मिळाली असून, येथे रंगकाम आणि विद्युत रोषणाई पोल लावण्यात आले आहेत. उर्वरित पुलावरील शेवटचे काँक्रीटीकरणही आज पूर्ण करण्यात आले आहे. नियमानुसार पुढील काही दिवस हे काँक्रीटीकरण असेच ठेवण्यात येणार आहे; तोपर्यंत उर्वरित पूरक कामे पूर्ण केली जाणार आहेत.
      दरम्यान, बुधवारी पुन्हा एकदा आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर पुलाच्या कामाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली. त्यांनी काँक्रीटीकरणाबाबतची माहिती घेतली आणि आवश्यक निधी मिळवून दिल्यामुळे काम अपेक्षित गतीने सुरू असल्याचे सांगितले. ही गती मंदावणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. युद्धपातळीवर काम करून पुल लवकरात लवकर नागरिकांसाठी खुला करण्याचेही निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी बाबुपेठ येथील नागरिकांसह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Mla Kishor Jorgewar : बस्स झालं… चंद्रपूर मनपाच्या अधिकाऱ्यांवर संतापले आमदार

    Mla Kishor Jorgewar : बस्स झालं… चंद्रपूर मनपाच्या अधिकाऱ्यांवर संतापले आमदार

    mla kishor jorgewar चंद्रपूर शहर वाढत असताना नागरी वस्त्यांसमोर वन विभाग, पुरातन विभाग यांच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच आता ब्लू लाईनवरील बांधकामावर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांनी  जायचे कुठे असा प्रश्न उपस्थित  करत. “एकाही घराला हात लावू नका, ब्लू लाईनवरील घरांवरील कारवाई तात्काळ थांबवा,” असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांना दिले आहेत.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी निलंबित, आमदार अडबाले यांचा पाठपुरावा


    Mla kishor jorgewar आज आमदार किशोर जोरगेवार यांनी महानगरपालिकेत बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीला मनपा आयुक्त विपिन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त रविंद्र भिलावे, शहर नगररचनाकार दहिकर, सहायक नगररचनाकार भोयर, शिरभाते यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
    शहरातील ब्लू लाईनवरील घरांना काढून टाकण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या संदर्भात नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त करत, आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली होती आणि सदर कारवाई थांबविण्याची मागणी केली होती.


    Mla kishor jorgewar ब्लू लाईनवरील बांधकामे वर्षानुवर्षे अस्तित्वात असून, या भागातील अनेक नागरिकांचा व्यवसाय आणि नागरी वस्ती यावर अवलंबून आहे. ही घरे आणि आस्थापने तोडल्यास अनेक लोकांचे रोजगार आणि जीवनमान धोक्यात येईल. त्यामुळे या निर्णयावर मनपा ने  पुनर्विचार करवा अशी मागणी नागरिकांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे केली. त्यानंतर, आज मंगळवारी, आमदार जोरगेवार यांनी मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेत सदर कारवाई थांबविण्याचे निर्देश दिले.


     मागील अनेक वर्षांपासून नागरिक येथे राहत आहेत आणि अनेकांचा व्यवसायही येथे आहे. आधीच अनेक प्रतिबंधाच्या अडचणी नागरिकांपुढे आहेत. अशात मनपाने ब्लू लाईनवरील घरांवर सुरू केलेली कारवाई योग्य नाही. यापुढे एकाही बांधकामावर कारवाई करण्यात येऊ नये, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले. या बैठकीला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती

  • security guards : सुरक्षा रक्षकांनी केला आमदार जोरगेवार यांचा सत्कार

    security guards : सुरक्षा रक्षकांनी केला आमदार जोरगेवार यांचा सत्कार

    security guards आमदार किशोर जोरगेवार यांनी सीएसटीपीएस येथील 103 सुरक्षा रक्षकांची मुंबई येथे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासोबत बैठक घडवून आणली होती. या बैठकीत सदर सुरक्षा रक्षकांची महानिर्मितीमध्ये होणाऱ्या भरती प्रक्रियेत सरळ भरती करण्याचे आदेश कामगार मंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे लवकरच हे सर्व सुरक्षा रक्षक पुन्हा कामावर रुजू होणार असून, या सुरक्षा रक्षकांनी आज कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत सत्कार केला आहे.

    अवश्य वाचा : 27 ऑगस्ट पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

     security guards यावेळी कामगार संघटनेचे बाबु जावळे, समीर पठाण, राजेश गायकवाड, संजय नागपूरे, शरद मंचलवार, यंग चांदा ब्रिगेडच्या नेत्या सायली येरणे, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, माया पटले, करण नायर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

       2015 मध्ये चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ येथे 103 सुरक्षा रक्षकांची नोंदणी करण्यात आली होती. मात्र, सदर नोंदणी अवैध असल्याचे सुरक्षा रक्षकांना सांगण्यात आले. त्यानंतर 2016 मध्ये संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि 103 सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत नोंदित 103 सुरक्षा रक्षकांची नोंदणी वैध ठरविण्यात आली. त्यानंतर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्याकडून मैदानी आणि शारीरिक चाचणी घेण्याचे ठरविण्यात आले. परंतु, तांत्रिक कारणांमुळे चाचणी पुढे ढकलण्यात आली. पुढील चाचणीसाठी तारीख लवकर देण्यात येईल असे संबंधित विभागाकडून सुरक्षा रक्षकांना कळविण्यात आले, मात्र आदेश काढण्यात आलेला नव्हता. त्यामुळे सदर सुरक्षा रक्षक बेरोजगार झालेले होते.

    अवैध बांधकाम : चंद्रपुरातील ब्लू लाईन मध्ये अवैध बांधकाम

      आमदार किशोर जोरगेवार यांनी याचा गांभीर्याने विचार करून सदर सुरक्षा रक्षकांना कामावर घेण्याची मागणी केली होती. मागणीच्या पूर्ततेसाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता. परिणामी मुंबई येथील मंत्रालयात कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांची बैठक बोलावली. महानिर्मितीला 250 सुरक्षा रक्षकांची गरज आहे. या भरती प्रक्रिये दरम्यान नोंदणीकृत 103 सुरक्षा रक्षकांना प्राधान्य देत त्यांना सरळ सेवेत घेण्यात यावे, असे आदेश त्यांनी या बैठकीत दिले होते. आता लवकरच हे सर्व कामगार कामावर रुजू होणार आहेत. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे जवळपास 9 वर्षांची कामगारांची बहु प्रतीक्षा संपली आहे. त्यामुळे या सर्व कामगारांनी शुक्रवारी कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला.

     यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, “हा विजय कामगार आणि कामगार संघटनेच्या जिद्दीचा आहे. आपण एकजुटीने राहिलो, त्यामुळे आपल्याला हे यश मिळाले आहे. आपण सदैव कामगारांसोबत आहोत. आपल्याला न्याय मिळवून देता आला याचा नक्कीच आनंद आहे. आता आपण लागणारी सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत. जिथे गरज भासेल तिथे मी तुमच्यासोबत उभा राहील.” असे ते यावेळी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमाला सुरक्षा रक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Raksha Bandhan : दिव्यांग बहिणींनी आमदार किशोर जोरगेवार यांना बांधला राखीचा रेशीम धागा

    Raksha Bandhan : दिव्यांग बहिणींनी आमदार किशोर जोरगेवार यांना बांधला राखीचा रेशीम धागा

    Raksha bandhan रक्षाबंधन हा आपल्या भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे, जो केवळ बंधुत्वाच्या नात्याला साजरा करत नाही, तर प्रेम,  विश्वास,  आणि संरक्षणाची भावना जागृत करतो. आज दिव्यांग बहिणींनी मला राखी बांधली. दिव्यांग भगिनींच्या संरक्षणाचे आमचे कर्तव्य आहे. त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. आजचा हा कार्यक्रम म्हणजे बंधुत्वाच्या धाग्यात दिव्यांग भगिनींचा सन्मान असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.


    Raksha bandhan आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी शेकडो दिव्यांग बहिणींनी एकत्र येत आमदार किशोर जोरगेवार यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. या प्रसंगी भावना व्यक्त करताना ते बोलत होते.


    “भगिनीला सन्मानाने वागवावे, तिच्या हक्कांचे रक्षण करावे, आणि तिच्या विकासासाठी आपले योगदान द्यावे, हे आपले कर्तव्य आहे. दिव्यांग महिलांच्या संघर्षाची कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायक आहे. त्यांना जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करावी लागते, परंतु त्यांनी आपल्या मनाची आणि शरीराची ताकद दाखवून आपल्या ध्येयांच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल केली आहे. त्यांचे साहस, आत्मविश्वास, आणि अडचणींवर मात करण्याची इच्छाशक्ती ही उर्जा देणारी आहे. आपण एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, एकमेकांचे रक्षण केले पाहिजे, आणि एकमेकांप्रती प्रेम, आदर, आणि समर्पणाची भावना ठेवली पाहिजे,” हे आजचा सण आपल्याला आठवण करून देतो. यातून आपण त्यांच्यासाठी एक सुरक्षित, समर्थ, आणि स्नेहपूर्ण वातावरण निर्माण करणे गरजेचे असल्याचे या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

    राजकारण : पालकमंत्री मुनगंटीवार यांच्यावर खासदार धानोरकरांची टीका, लोकसभे सारखं आता विधानसभा निवडणुकीतही तेच होणार


    यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांना राखी बांधण्यासाठी शेकडो दिव्यांग महिला राजमाता निवासस्थानी एकत्र आल्या होत्या. या प्रसंगी या बहिणींनी आपल्या लाडक्या भावाचे औक्षण करून त्यांना राखीचा पवित्र धागा बांधला. आमदार किशोर जोरगेवार यांनीही भेटवस्तू देत आपल्या बहिणींचा आशीर्वाद घेतला.

    योगा ग्रुपच्या सदस्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना बांधली राखी

    जिव्हाळा परिवर्तन योगा फाउंडेशन ग्रुपच्या वतीने सकाळी सहा वाजता राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज समोरील बागेत रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना राखी बांधली तर तुकूम येथील हनुमान मंदिर आणि स्वामी समर्थ महिला मंडळ योगा ग्रुपच्या वतीनेही कार्यक्रम आयोजित करून आमदार किशोर जोरगेवार यांना राखीचा धागा बांधला. यावेळी शेकडो महिलांची उपस्थिती होती.

  • Ladki Bahin yojana : लाडकी बहीण लाभार्थी महिलांनी मानले आमदार जोरगेवार यांचे आभार

    Ladki Bahin yojana : लाडकी बहीण लाभार्थी महिलांनी मानले आमदार जोरगेवार यांचे आभार

    ladki bahin yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अधिकाधिक बहिणींना लाभ मिळवून देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध ठिकाणी मदत केंद्रे सुरू केली होती. शासनाच्या वतीने काल, अनेक बहिणींच्या खात्यात 3 हजार रुपये जमा करण्यात आले. दरम्यान, आज शुक्रवारी शेकडो लाडक्या बहिणींनी आमदार किशोर जोरगेवार यांची कार्यालयात भेट घेऊन पुष्पगुच्छ देत त्यांचे आभार मानले.

    महत्त्वाचे : अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार जोरगेवार


      Ladki bahin yojana राज्य शासनाच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, या योजनेबाबत अनेक महिलांना योग्य माहिती नसल्याने अर्ज दाखल करण्यात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरातील विविध ठिकाणी मदत केंद्रे सुरू केली. यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात हे मदत केंद्र सुरू करण्यात आले होते. या मदत केंद्राच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना योग्य माहिती देऊन त्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्यात आले.

    या सर्व मदत केंद्रांचा हजारो महिलांनी लाभ घेतला. या केंद्रांच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेल्या बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यात 3 हजार रुपये जमा झाले आहेत. ही योजना गरजू बहिणींसाठी आर्थिक आधार ठरली आहे. ladki bahin yojana

    याच पार्श्वभूमीवर, आज शुक्रवारी, शेकडो लाडक्या बहिणींनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात भेट दिली. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार व्यक्त केले.

    महत्त्वाचे : मामा तलाव फुटण्याच्या मार्गावर

    आमदार किशोर जोरगेवार यांनी लाडकी बहिण योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची सर्वत्र प्रशंसा होत आहे. या योजनेतून महिलांना आर्थिक मदत मिळाल्याने त्यांचे जीवन थोडेसे सुसह्य झाले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी केलेल्या या कार्यामुळे महिलांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. ladki bahin yojana


        यावेळी बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले की, महिलांची भूमिका आपल्या समाजात नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. आपल्या बहिणी, मुली, आणि मातांनी आपल्या संस्कृतीचा, कुटुंबाचा आणि समाजाचा पाया मजबूत केला आहे. त्यांच्यावर अनेकदा जबाबदाऱ्या आणि आव्हाने येतात, आणि त्या त्या परिस्थितीतून स्वतःला आणि कुटुंबाला सांभाळतात. त्यांच्या या प्रवासात, भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे.

    आपल्या सरकारने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना‘ यासारख्या उपक्रमांमुळे अनेक महिलांना आर्थिक मदत मिळाली आहे, ज्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावणार आहे. आपण आपल्या लाडक्या बहिणींना केवळ आर्थिक मदत देत नाही, तर स्वयंरोजगार निर्मितीसाठी विविध प्रशिक्षण शिबिरं राबवत त्यांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, त्यांच्या स्वप्नांना पंख देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मी प्रत्येक लाडक्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.


        यावेळी काही महिलांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, “या योजनेबाबत माहिती मिळाली होती, परंतु कोणते कागदपत्र द्यायचे याची योग्य माहिती मिळत नव्हती. ‘लिंक नाही’ असे कारण सांगून अर्ज स्वीकारला जात नव्हता, त्यामुळे फॉर्म न भरण्याचेही आम्ही ठरवले होते. मात्र नंतर आमदार किशोर जोरगेवार यांच्या मदत केंद्राबाबत माहिती मिळाल्याने तेथे भेट दिली आणि नि:शुल्क आमचा अर्ज या केंद्राच्या माध्यमातून दाखल केला. ladki bahin yojana

    नसलेली कागदपत्रेही या मदत केंद्राच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे आम्हा लाडक्या बहिणींना या केंद्राच्या माध्यमातून मोठी मदत मिळाली आहे,” असे बहिणींनी म्हटले आहे.

  • Humanity : अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार जोरगेवार

    Humanity : अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार जोरगेवार

    humanity वरोरा नाका चौकात अपघात झाल्यानंतर जखमी झालेल्या युवक आणि युवतीला आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर स्वतः उभे राहून, आमदार किशोर जोरगेवार यांनी दोघांवर उपचार करून घेतले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या या माणुसकीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

    लाडकी बहीण योजनेबाबत उडाली ही अफवा

    Humanity 15 ऑगस्टला कार्यक्रम आटोपून रात्री 10 वाजताच्या सुमारास खुटाळा गावातून चंद्रपूरला परत येत असताना वरोरा नाका चौकात अपघात झाल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच आपल्या वाहनांचा ताफा थांबविला. यावेळी, एक 20 वर्षीय युवक आणि 22 वर्षीय तरुणी जखमी अवस्थेत पडलेले होते. कोणीही त्यांची मदत करत नसल्यामुळे, आमदार किशोर जोरगेवार यांनी दोन्ही जखमींना स्वतःच्या वाहनात टाकून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यावेळी स्वतः आमदार रुग्णालयात आल्यामुळे येथील डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केले. उपचार पूर्ण होईपर्यंत जवळपास तासभर आमदारांनी रुग्णालयातच ठाण मांडले होते.

    नवीन चंद्रपुरात 10 हजार घरांची योजना

    आमदार किशोर जोरगेवार यांनी दाखविलेल्या माणुसकीबद्दल जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले.
    दोन दुचाकींच्या धडकेत हा अपघात झाल्याची माहिती आहे. युवती कोरपणा येथील तर युवक चंद्रपूर येथील रहिवासी आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. वेळीच आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांच्यावर योग्यवेळी उपचार करता आल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

    जखमी अवस्थेत रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले हे युवक-युवती ला कोणीही रुग्णालयात दाखल न करता रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करत बसले होते. मात्र आमदार किशोर जोरगेवार यांच्या माणुसकीमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

    आपल्या अतिव्यस्त दौऱ्यात परिसरात घडणाऱ्या बारीक समस्येवर नजर ठेवणाऱ्या आमदार जोरगेवार यांच्या मुळे दोघांचे प्राण वाचू शकले, आमदार जोरगेवार यांनी यापूर्वी अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेत आले आहे, मतदार संघातील विविध समस्या कश्या दूर होणार याबाबत ते नेहमी प्रयत्नशील असतात.

  • independance day post : स्वातंत्र्य दिनाची प्रेरणा घेत देशसेवेच्या भावनेने प्रेरित व्हा – आ. किशोर जोरगेवार

    independance day post : स्वातंत्र्य दिनाची प्रेरणा घेत देशसेवेच्या भावनेने प्रेरित व्हा – आ. किशोर जोरगेवार

    independance day post  आपल्या स्वातंत्र्याच्या मागे असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचे अथक परिश्रम, त्याग, बलिदान आणि देशभक्तीची भावना आहे. अनेक नायकांनी आपले जीवन देशासाठी समर्पित केले. त्यांच्या या बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा आनंद अनुभवत आहोत. आजच्या या  दिनाची प्रेरणा घेत देशसेवेच्या भावनेने प्रेरित व्हा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    सविस्तर : चंद्रपूरात 10 हजार घरांची योजना

    independance day post स्वातंत्र दिना निमित्त आदिवासी समाजाच्या वतीने बिरसा मुंडा चौक येथे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेयावेळी प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमांना अशोक तुमराम यांच्या सह समाज बांधवांची उपस्थिती होती.

    महत्त्वाचे : बाबूपेठ उड्डाणपूलाचे काम होणार पूर्ण, आमदार जोरगेवार यांचा पाठपुरावा


      स्वातंत्र्य दिन हा आपल्यासाठी केवळ एक दिवस साजरा करण्याचा क्षण नाही, तर तो आपल्या कर्तव्यांची आठवण करून देणारा आहे. आजही आपल्यासमोर असलेल्या शिक्षणाचा अभाव, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संरक्षण. या सर्व आव्हानांचा सामना करून आपल्या देशाला अधिक सशक्त, समृद्ध आणि स्वावलंबी बनविणे हे आपले कर्तव्य आहे. आपण आपल्या देशासाठी काय करीत आहोत, या विचाराने प्रत्येक भारतीयाने प्रेरित व्हावे. स्वातंत्र्याचा खरा अर्थ आपल्या विचारात, आचारात आणि कृतीत दिसला पाहिजे. आपण एकत्र येऊन समाजाच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे,देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम योगदान देण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण होताच उपस्थितांनी तिरंग्याला सलामी देत राष्ट्रगाण गाईले.

  • Kishor Jorgewar : बाबूपेठ उड्डाणपूल महिन्याभरात सुरू होणार – आमदार किशोर जोरगेवार

    Kishor Jorgewar : बाबूपेठ उड्डाणपूल महिन्याभरात सुरू होणार – आमदार किशोर जोरगेवार

    Kishor jorgewar बाबूपेठ उड्डाणपूलाच्या बांधकामात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण वेळोवेळी प्रयत्न केले. शेवटच्या टप्यातील काम निधीअभावी रखडल्याचे लक्षात येताच आपण ५ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आता युद्धपातळीवर काम करून महिन्याभरात काम पूर्ण करत उड्डाणपुल नागरिकांसाठी सुरू करा असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

    योजना : माझी लाडकी बहीण योजना, बँक खाते आधार सोबत लिंक करा


      Kishor jorgewar आज बुधवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह बाबूपेठ उड्डाणपुलाची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश तांगडे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, मनपा शहर अभियंता विजय बोरिकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता विवेक अंबुले यांच्यासह रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

    राजकीय : चंद्रपुरात गोळीबार, पालकमंत्री मुनगंटीवार यांचं महत्वाची प्रतिक्रिया


                 बाबूपेठ उड्डाणपूल चंद्रपूरातील प्रमुख समस्यांपैकी एक समस्या होती. हा पूल व्हावा यासाठी बाबूपेठ वासीयांच्या वतीने अनेक आंदोलने करण्यात आली. दर पाच मिनिटाला येथील रेल्वेगेट बंद होतो. येथून मध्य रेल्वे लाईन आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे लाईन आहे. परिणामी दोन्ही गेट बंद राहत असल्याने नागरिकांना तासंतास येथे उभे राहावे लागत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष होता.


                  ही बाब लक्षात घेता येथे रेल्वे उड्डाण पूल तयार करण्याच्या दिशेने आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र अनेक तांत्रिक अडचणींमध्ये हा पूल अडकला. अखेर पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र रेल्वे विभागाच्या तिसऱ्या रुळाच्या कामासाठी पुन्हा या पुलाचे काम मंदावले होते. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी सातत्याने प्रयत्न करत सदर पुलाच्या कामाला गती दिली. मात्र पुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना निधीअभावी सदर काम पुन्हा एकदा रखडले होते.

    अशक्य आता शक्य होणार


                  यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेत सदर कामाला लागणारा ५ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी सदर निधी मंजूर करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. काल बुधवारी सदर कामासाठी नगर विकास विभागाच्या वतीने ५ कोटी ४९ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. दरम्यान, आज आमदार किशोर जोरगेवार मुंबईहून थेट बाबूपेठ उड्डाण पुलाच्या पाहणीसाठी चंद्रपूरात दाखल झाले. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सदर कामासाठी आपण निधी उपलब्ध करून दिला आहे.

    आता येथील कामाला गती देण्यात यावी, युद्धपातळीवर हे काम पूर्ण करून महिन्याभरात सदर पुल नागरिकांच्या सेवेत सुरू करावा असे निर्देश अधिकार्यांना दिले आहे, यावेळी निधी मंजूर केल्याबद्दल बाबूपेठ येथील नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले. याप्रसंगी शेकडो बाबूपेठ वासीयांची उपस्थिती होती.