Tag: आमदार किशोर जोरगेवार

  • Ghugghus city development Progressive । “घुग्घुसच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले – नागरी सुविधा, स्वच्छता आणि क्रीडा संकुल उभारणीला गती”

    Ghugghus city development

    Ghugghus city development : विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. घुग्घुस शहराच्या आणि परिसराचा सर्वांगीण विकासासाठी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, (Water supply schemes in Ghugghus) क्रीडा संकुल आणि पुनर्वसन योजनांवर ठोस निर्णय घेऊन त्यांची तातडीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. निधीची गरज असल्यास शासनाकडे प्रस्ताव पाठवा, आम्ही पाठपुरावा करू, घुग्घुससारख्या वाढत्या शहरांसाठी नियोजनबद्ध विकास महत्त्वाचा असून, तसे नियोजन करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.

    चंद्रपुरात मनसेचे आंदोलन

    चंद्रपूर शहर आणि घुग्घुस परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत अमृत 2.0 (Amrut 2.0 development projects) अंतर्गत सुरू असलेल्या विकास प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, शहरातील स्वच्छता, घुग्घुस नगर परिषदेच्या प्रलंबित प्रकल्पांबाबत आणि क्रीडा संकुल उभारणीसाठी आवश्यक जागेच्या उपलब्धतेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. Urban planning in Chandrapur

    या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार,  घुग्घुस नगर परिषद मुख्य अधिकारी राजनकर, नायब तहसीलदार राजू धांडे, क्रीडा अधिकारी  तसेच इतर संबंधित अधिकारी आणि भाजप नेते मनोज पाल, दशरथ सिंग ठाकूर, संतोष नुने, संजय तिवारी, राजकुमार गोडछेडवार, श्याम आगदरी, निरीक्षण ताद्रा, साजन गोहणे, सोनल भरटकर, स्वप्नील वाढई, विजय सिंग, मयूर कलवल, राजेश मोरपाका, विशाल दामीर उपस्थित होते.

    बैठकीत घुग्घुस नगर परिषदेच्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तालुका क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी २५ एकर जागा उपलब्ध करण्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच, नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या शासकीय जागांचा वापर पाणीपुरवठा प्रकल्प आणि घनकचरा व्यवस्थापन यासाठी करण्यात यावा, यावरही भर देण्यात आला. भूस्खलन आपत्तीग्रस्त भागातील नागरिकांसाठी पुनर्वसन उपाययोजनांवर चर्चा करत, त्यासाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

    नगर परिषदेच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. घुग्घुसमधील एसडब्ल्यूएम क्षेत्राची स्वच्छता करण्यासाठी आवश्यक निधी मिळावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात यावा, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. याशिवाय, सर्वे क्रमांक ३१८ वरील निस्तार हक्क काढण्याच्या प्रक्रियेवर या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. बैठकीदरम्यान, सामाजिक दायित्व निधी अंतर्गत डस्ट सक्शन मशीन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. १५ व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत जिल्हा परिषदेकडे असलेल्या १.१५ कोटी निधीच्या विनियोगावर चर्चा झाली. त्याचा उपयोग विकासकामांसाठी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. मायनॉरिटी विभागाकडून मंजूर झालेल्या २५ लाख निधीच्या वापराबाबतही सविस्तर माहिती घेण्यात आली असून, आवश्यक तेथे हा निधी वापरण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या. (Ghugghus Municipal Council)

    या वेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले, “विकासकामे वेळेत पूर्ण होण्यासाठी स्थानिक प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. प्रलंबित प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नागरिकांच्या सोयीसाठी, शहर स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प वेगाने राबवले जातील. या बैठकीच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल. घुग्घुससारख्या वाढत्या शहरांसाठी नियोजनबद्ध विकास महत्त्वाचा आहे. क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे, स्वच्छतेसाठी आवश्यक यंत्रणा उभारणे आणि नगर परिषदेच्या इमारतीसाठी निधी मिळवणे या प्राधान्याच्या बाबी आहेत. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने कार्य करावे, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या.

  • Shrimati’s soubhagya utsav । “श्रीमतीचा सौभाग्य सोहळा : संघर्षशील महिलांच्या जिद्दीला सलाम”

    Shrimati’s soubhagya utsav

    Shrimati’s soubhagya utsav : स्त्रीशक्ती ही केवळ कुटुंबाचीच नाही, तर संपूर्ण समाजाची ताकद आहे. जेव्हा एखादी महिला आत्मनिर्भर होते, तेव्हा ती केवळ स्वतःपुरती मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण समाजाला प्रेरणा देते. आज या मंचावर अनेक महिलांनी आपले अनुभव सांगितले. त्यामध्ये संघर्ष होता, कष्ट होते, पण त्याहीपेक्षा जिद्द, आत्मविश्वास आणि काहीतरी करून दाखवण्याची हिम्मत होती. श्रीमतीचा सौभाग्य सोहळा हा याच संघर्षशील प्रवासाची दखल घेत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणारा उपक्रम असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    संकल्प संस्था आणि निमा ह्युमन फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा नगर येथे एकल पालकतत्व करणाऱ्या परितक्ता आणि विधवा महिलांच्या संघर्षमय वाटचालीला सन्मान देण्यासाठी “श्रीमतीचा सौभाग्य सोहळा” आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संकल्प संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक  वासलवार, निमा ह्युमन फोरमच्या अध्यक्ष डॉ. शिमला गाजर्लावार, सचिव डॉ. मनीष घुगल, डॉ. वैशाली बदनोरे, डॉ. स्नेहल पोटदुखे, संकल्प संस्थेचे व्यवस्थापक कुंदन खोब्रागडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. (Celebrating Women’s Strength)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, समाजामध्ये अनेक महिला वेगवेगळ्या परिस्थितींशी सामना करत आपले जीवन साकारत असतात. काही विधवा होतात, काही परीतक्ता असतात, पण त्यांनी कठीण परिस्थितीसमोर हार न मानता आपल्या कुटुंबासाठी उभे राहणे, ही खऱ्या अर्थाने एक शौर्यगाथा आहे.

    आज येथे उपस्थित असलेल्या महिलांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर केवळ स्वतःचे जीवन नव्हे, तर आपल्या मुलांचे आणि परिवाराचे जीवन घडवले आहे. संकल्प संस्थेने हा उपक्रम राबवून या महिलांना सन्मानित करण्याचे मोठे कार्य केले आहे. या गौरवामुळे त्यांना अधिक आत्मविश्वास मिळेल आणि इतर महिलांसाठीही हे एक नवे मार्गदर्शन ठरेल. समाजानेही अशा महिलांच्या जिद्दीला आणि कर्तृत्वाला प्रोत्साहन दिले पाहिजे.

    indira nagar

    स्त्रियांच्या सशक्तीकरणासाठी, त्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचावा, त्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. महिला म्हणजे केवळ कुटुंबाचा आधारस्तंभ नाहीत, तर त्या संपूर्ण समाजाची शक्ती आहेत. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी हे सिद्ध केले आहे. आणि पुढेही करत राहतील,” असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला परीतक्ता आणि विधवा महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Chhatrapati Shivaji Maharaj Memorial । शिव स्मारकासाठी आमदार जोरगेवार यांनी केली ५० लक्ष रुपयांच्या निधीची घोषणा

    Chhatrapati Shivaji Maharaj Memorial

    Chhatrapati Shivaji Maharaj Memorial : घुग्घूस येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारण्यासाठी जागेची परवानगी द्यावी, या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने लॉयड मेटल कंपनीच्या गेटसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले असून  स्मारकासाठी ५० लाख रुपये निधी जाहीर केला आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात भरदिवसा युवकाची हत्या

    या आंदोलनात स्मारक समितीचे चेतन बोबडे, माजी सरपंच संतोष नुने, विवेक बोंढे, संजय तिवारी, सोनल भरडकर, अमित बोरकर, गणेश शेंडे, अनिल बाम, हेमराज बावणे यांच्यासह शिवप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

    घुग्घूस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक तयार करण्यात यावे, अशी येथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे. यासाठी मुख्य चौकात असलेल्या लॉयड मेटल कंपनीच्या गेटसमोरील जागा घुग्घूसवासियांच्या वतीने सुचविण्यात आली आहे. सदर जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. मात्र, तेथे लॉयड मेटल कंपनीचा गेट असल्याने स्मारक उभारण्यास कंपनी व्यवस्थापनाने विरोध दर्शविला आहे. या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, घुग्घूस यांच्या वतीने वेळोवेळी आंदोलने केली जात आहेत. (Chhatrapati Shivaji public movement)

    दरम्यान, आज गुरुवारी याच मागणीसाठी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, ही केवळ जागेची परवानगी मिळवण्यासाठीची लढाई नाही, तर आपल्या अस्मितेची, अभिमानाची आणि इतिहासाच्या जतनाची लढाई आहे. शिवराय हे केवळ एका काळापुरते मर्यादित नाहीत, ते अनंत काळासाठी प्रेरणादायी आहेत म्हणून त्यांचे भव्य स्मारक उभारणे ही आपली जबाबदारी आहे. (Shivaji Maharaj monument news)

    आपल्या भागात वेगवेगळी विकासकामे होत आहेत, मोठमोठ्या उद्योगधंद्यांनी जागा व्यापली आहे. मात्र, शिवरायांच्या स्मारकासाठी जागेची परवानगी मिळावी यासाठी आपल्याला आंदोलन करावे लागते, हे निश्चितच दुर्दैवी आहे. पण आपण माघार घेणारे नाही. ही मागणी आम्ही शासन दरबारी मांडणार आणि योग्य ती परवानगी मिळवणार, असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी घुग्घूसवासियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Chhatrapati Shivaji Maharaj statue | चंद्रपुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लवकरचं…

    Chhatrapati Shivaji Maharaj statue

    Chhatrapati Shivaji Maharaj statue : चंद्रपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याची चंद्रपूरकरांची भावना आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या कामाच्या प्रक्रियेत विलंब होत असल्याने आता या कामाला गती देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून आवश्यक परवानग्या तातडीने घ्याव्यात, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत.

    बर्ड फ्लू च्या पार्श्वभूमीवर चिकन खाऊ शकता काय?

    चंद्रपूर शहर महानगरपालिकेत विविध विकासकामांवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांसंदर्भातील अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. शिवरायांच्या स्मारकाच्या उभारणीस कोणताही अडथळा येऊ नये आणि ही प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण व्हावी, यासाठी प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी स्पष्ट सूचना आमदार जोरगेवार यांनी केली. या बैठकीला मनपा आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, शहर अभियंता विजय बोरिकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते. Chandrapur city development

    चंद्रपुरात शिकाऱ्याची कॉलिंग

    आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते सीमित नसून संपूर्ण देशासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचे अश्वारूढ स्मारक चंद्रपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी उभा राहिल्यास तो येथील नागरिकांसाठी अभिमानास्पद ठरेल. त्याचबरोबर, नव्या पिढीला शिवरायांच्या कर्तृत्वाची प्रेरणा मिळेल. शिवप्रेमी आणि शहरातील नागरिकांनी या स्मारकासाठी मोठा पाठिंबा दिला असून, लवकरच हे काम पूर्ण व्हावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. पुतळ्याच्या उभारणीसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय साधावा, सर्व प्रकारच्या परवानग्या आणि तांत्रिक बाबी तातडीने मार्गी लावाव्यात, अशी सूचना आमदार जोरगेवार यांनी या बैठकीत दिल्या आहेत. Chandrapur equestrian statue

    चंद्रपूर महानगरपालिकेने या कामाची प्राथमिक पातळीवरील कार्यवाही सुरू केली असून, लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष उभारणीच्या कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने आणि नागरिकांच्या सहकार्याने लवकरच हा पुतळा उभारला जाईल, असा विश्वास शिवप्रेमींनी व्यक्त केला आहे.

     

    बंगाली कॅम्प येथे होणार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्मारक

    चंद्रपूरात बंगाली समाज बांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. त्यामुळे बंगाली कॅम्प येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्मारक तयार करण्यात येणार आहे. हे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत. या संदर्भातील सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून उर्वरित असलेल्या वाहतूक विभागाच्या परवानग्या तात्काळ घ्याव्यात, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले आहेत.

  • Woman Empowerment Event | उत्सव नारीशक्तीचा कार्यक्रमात सैराट फेम रिंकू राजगुरू ठरली आकर्षण

    Woman Empowerment Event

    Woman Empowerment Event : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने शनिवारी घुग्घूस येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालयात “उत्सव नारिशक्तीचा” या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. घुग्घूस वासियांनी या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला.

                या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. एकल नृत्य, युगल नृत्य आणि समूह नृत्य स्पर्धेत ५० हून अधिक गटांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सैराट फेम रिंकू राजगुरू हिच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण अधिक रंगतदार झाले. (Cultural Festival for Women)

    मच्छीमारांच्या आयुष्यात परिवर्तन आणणार – नितेश राणे

    कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, कल्याणी किशोर जोरगेवार, विवेक बोडे, नितू चौधरी, सुचिता लुटे, शारदा दुर्गम, वैशाली ढवस, सुषमा सावे, कुसुम सातपुते, नंदा कांबळे, उषा आगदारी, नितू जयस्वाल, उज्वला उईके, वनिता निहाल, किरण बोंढे, निरीक्षण तांड्रा, संतोष नुने, संजय तिवारी, राजकुमार गोडशेलवाल, साजन गोहणे, सीनू इसारप, इमरान खान, स्वप्निल वाढई, मुन्ना लोढे, सुरज मोरपाका, अनिल बाम, राजेश मोरपाका, मयूर कलवल, सुनिता घिवे, जयश्री राजूरकर सिनल भरडकर आदी मान्यवर उपस्थित होते.  

      कार्यक्रमाला संबोधित करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, “महिला सबलीकरण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांना संधी मिळाल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. आजच्या या कार्यक्रमातून घुग्घूस शहरातील महिला कलावंतांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळाले आहे. महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी शिक्षण, कला आणि सामाजिक कार्य यामध्ये पुढाकार घ्यावा. अशा प्रकारच्या सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतात. भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबवून महिलांना संधी उपलब्ध करून दिली जाईल असे ते यावेळी म्हणाले. (Female Talent Showcase)                 

    समोर सैराट फेम रिंकू राजगुरू (आर्ची) या उत्तम अभिनेत्री आज उपस्थित आहेत. तिच्या संघर्षमय प्रवासातून आणि अभिनय कारकिर्दीतून तरुणींना प्रेरणा मिळेल. महिलांनी आत्मनिर्भर व्हावे, कला, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात पुढे जावे, हीच या कार्यक्रमामागची संकल्पना आहे. या भागातील विकासकामांबरोबरच महिला शक्तीला प्रोत्साहित करणारे कार्यक्रम पूढेही आयोजित करणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. (Dance Competition for Women)

     घूग्घूस वासीयांचा मिळालेला प्रतिसाद आजिवन स्मरणात राहिल. आमदार किशोर जोरगेवार यांनी अशा आयोजनातून महिलांना संधी उपलब्ध करुन दिली आहे. आपल्या शहरात आल्यावर उर्जावान घूग्घूसवासी पाहून आनंद झाला. आयोजन उत्तम असून आपल्या उपस्थितीने त्याची भव्यता आणखी वाढल्याचे यावेळी रिंकू राजपूत यांनी सांगीतले. यात एकल स्पर्धेत प्रिती झाडे, युगल नृत्य स्पर्धेत शोभा आणि विभा, तर सामुहिक नृत्य स्पर्धेत शेणगाव येथील नचले गृपने प्रथम पारितोषिक पटकावले. कार्यक्रम पाहण्यासाठी घुग्घूस वासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. 

  • Utsav Narishakticha । अभिनेत्री रिंकू राजगुरू शनिवारी चंद्रपुरात

    Utsav Narishakticha

    Utsav Narishakticha : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने १ फेब्रुवारीला शनिवारी घुग्घूस येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालयात उत्सव नारिशक्तीचा या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सैराट (Sairat) फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु (आर्ची) (Rinku Rajguru) यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण राहणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने घुग्घूस शहरवासीयांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

    कंपनीची मुजोरी गावातील रस्ताच खोदला

    घुग्घूस शहरातील महिला कलावंतांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात संध्याकाळी ५ वाजता होणार असून, यात एकल नृत्य, युगल नृत्य आणि समूह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये सुमारे ५० नृत्य गटांनी सहभाग नोंदवला आहे.

    या विशेष कार्यक्रमाला अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार असून, महिलांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम म्हणून याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे घुग्घूस शहरवासीयांनी या भव्य आयोजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

  • Ashok Uike | पालकमंत्री अशोक उईके यांचा भव्य सत्कार

    Ashok Uike

    आदिवासी संघर्ष कृती समीती आणि भारतीय जनता पार्टीचे आयोजन

    Ashok Uike : चंद्रपूरचे नवे पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांच्या प्रथम आगमनाच्या निमित्ताने आदिवासी संघर्ष कृती समीती आणि भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभेच्या वतीने प्रियर्दशीनी सांस्कृतिक सभागृह येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विविध सामाजिक संघटना, भारतीय जनता पार्टी आणि आदिवासी संघर्ष कृती समीतीच्या वतीने पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांचा जंगी सत्कार करण्यात आला.

                या सत्कार कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, चंद्रपूर मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार, आमदार किर्तीकुमार भांगडीया, आमदार करण देवतळे, माजी मंत्री शोभा फडणवीस, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार अतुल देशकर, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, भाजप नेते प्रकाश देवतळे, भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, दशरथ सिंग ठाकूर, तुषार सोम, अजय जयस्वाल, मनोज पाल, संजय कंचार्लावर, जितेश कुळमेथे, प्रमोद बोरिकर, कृष्णा मसराम, प्रा. हितेश मडावी, अॅड. संतोष कुडमेथे, सुधाकर कन्नाके, शांताराम उईके, ड्रेफुल आत्राम, विजय कुमरे, भय्याजी उईके आदींची उपस्थिती होती.

    १९ वाघांची शिकार करणारा चंद्रपुरात

    रात्रो ८.३० वाजता या कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी विविध संघटनांनी पालकमंत्री  डॉ. प्रा. उईके यांचा स्वागत व सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना पालकमंत्री यांनी चंद्रपूरच्या विकासाची ग्राव्ही दिली. आज माझ्या सत्कारासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती लाभलेल्या जिल्हाचे पालकमंत्री पद मिळाले याचा आनंद असल्याचे” ते यावेळी म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्याचे वैभव वाडवून जिल्हाचे नाव लौकीक करण्यासाठी योग्य पावले उचलले जाणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजित प्रभावी अमलबजावणी आपण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

    minister ashok uike

    यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्हाच्या विकासासाठी सहकार्य मिळावे अशी आशा व्यक्त केली. हे शहर दुरदृष्टी असणाऱ्या गोंड राजाचे आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिलेल्या पवित्र दिक्षाभूमीचे आहे. औद्योगिक असे हे शहर असून राज्याला रेव्हेन्यू देणाऱ्या या शहराचा सर्वसमावेशक विकास व्हावा अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पालकमंत्री डॉ. प्रा. उईके यांच्याकडे केली. आपल्या नेतृत्वात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळेल असा विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बोलून दाखविला.

    यावेळी बोलतांना राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी पालकमंत्री  डॉ. प्रा. अशोक उईके यांचे अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वात चंद्रपूरचा विकास होणार असा विश्वास व्यक्त केला. जितेश कुळमेथे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर संचालन प्रा. श्याम हेडाउ यांनी केले. कार्यक्रमाला आदिवासी टायगर सेना, बिरसा क्रांती दल, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, क्रांतिवीर बाबुराव फुलेश्वर शेडमाके स्मारक समिती, एप्फ्रोड, गोंडियन आदिवासी कल्याण सहाय्यता संस्था, भारतीय जनता पार्टी यांच्या सदस्य व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Purple Festival। दिव्यांगांच्या रोजगार निर्मितीसाठी १ कोटी निधी देणार – आमदार किशोर जोरगेवार

    Purple Festival

    Purple Festival : दिव्यांग बांधवांना आपले कलागुण सादर करण्यास शहरातील सर्वात मोठे सभागृह महानगरपालिकेने उपलब्ध करून दिले, यापेक्षा मोठा आनंद कुठलाच नाही त्यामुळे मनपाने दरवर्षी पर्पल महोत्सवाचे आयोजन करून हा उपक्रम सुरु ठेवण्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.  

     
       चंद्रपूर महानगरपालिकेच्या दिव्यांग धोरण अंतर्गत, दिव्यांग कौशल विकास मल्टीपर्पज सोसायटी व पुनम प्रॉडक्शन यांच्या साहाय्याने दिव्यांग बांधवांच्या उत्कर्ष आणि विकासासाठी गणतंत्र दिनानिमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन २४ जानेवारी रोजी प्रियदर्शिनी सभागृह येथे करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. शरीराने धडधाकट असणारे अनेक लोक मनाने समाधान नसतात,मात्र दिव्यांग बांधवांना शरीराच्या सीमा असतांनाही जीवनावर प्रेम करतात,हे बोध घेण्यासारखे आहे.

    न्यायाच्या प्रतीक्षेत वझरकर कुटुंब, युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण


        चंद्रपूर शहरात १० बस स्टॅन्ड मनपाने तयार करावे ज्यात सोलर व्यवस्था असावी,महिलांसाठी प्रसाधन गृह असावे व ते दिव्यांग बांधवांस चालविण्यास देण्यात यावे,ज्यायोगे त्यांना रोजगार मिळेल यासाठी १ कोटी रुपये देण्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच दिव्यांग बांधवांच्या रोजगारासाठी इतरही प्रस्ताव मनपाने तयार करावे त्यासाठी लागेल तेवढा निधी देण्याची ग्वाही त्यांनी दिली. महाकाली महोत्सवातही दिव्यांग बांधवांना सादरीकरण करण्यास स्टेज उपलब्ध करून देणार असुन या माध्यमातुन त्यांचे कलागुण देशपातळीवर पोहोचण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मोठ्या पातळीवर जर दिव्यांग बांधवांना संधी मिळत असेल तर उपलब्ध करून द्यावी त्यासाठी लागणारी सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.    

    किशोर जोरगेवार


     पालक सचिव श्री.संतोष कुमार – ज्या उत्साहाने दिव्यांग बांधवांनी आहे येथे नृत्य सादर केले त्यावरून त्यांना आपले कलागुण सादर करण्यास स्टेज मिळाल्याचा आनंद दिसुन येतो.चंद्रपूर मनपाने दिव्यांग बांधवांसाठी आयोजित केलेला कार्यक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.पुढील वर्षी याहुन दुप्पट लोक कार्यक्रम सादर करण्यास व बघण्यास असतील अशी आशा व्यक्त करतो.    


        जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा –  व्यक्त होण्यासाठी दिव्यांग बांधवांना स्टेज उपलब्ध करून त्यांना समाजाचा महत्वाचा घटक म्हणुन गौरवान्वित केल्याबद्दल चंद्रपूर मनपाचे अभिनंदन.पुढील वर्षी ज्यास्तीत ज्यास्त दिव्यांग बांधवांनी पर्पल उत्सवात सहभाग घेऊन आनंद घेण्याचे अपेक्षा व्यक्त करतो.  


    आयुक्त श्री. विपीन पालीवाल – चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदा पर्पल महोत्सवाचे यशस्वी आयोजन मनपाने केले आहे. विशेष क्षमता असणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी पर्पल उत्सव ओळखला जातो.दिव्यांग मुलांच्या पालकांना आज नक्कीच आनंद होत असेल.उत्सवात दिव्यांग बांधवांसाठी लागणारी सर्व व्यवस्था कार्यक्रमात करण्यात आली होती. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मनपाचे धोरण आहे. असेच कार्यक्रम पुढेही आयोजित करण्याचा मनपाचा प्रयत्न राहील.

       याप्रसंगी पालक सचिव संतोषकुमार,जिल्हाधिकारी विनय गौडा,आयुक्त विपीन पालीवाल, समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवे,उपायुक्त मंगेश खवले,सहायक आयुक्त शुभांगी सुर्यवंशी,अक्षय गडलिंग संतोष गर्गेलवार,समाज विकास अधिकारी सचिन माकोडे, रफिक शेख,प्राचार्य डॉ. कापसे-गावंडे,निलेश पाझारे, रमेशकुमार बोरकुटे,अमोल शेंडे, दत्ताजी,रोशनी तपासे,चिंतेश्वर मेश्राम,शहर अभियान व्यवस्थापक तसेच समुदाय संघटक पांडुरंग खडसे,सुषमा करमनकर,रेखा लोणारे, रेखा पाटील, चिंगुताई मुन तसेच वॉर्ड सखी उपस्थीत होते.          

  • Naming of Medical College | चंद्रपूरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आले कर्मवीर मा.सां. कन्नमवार यांचे नाव

    Naming of Medical College

    Naming of Medical College : चंद्रपूर येथे निर्माणाधीन असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्याल, रुग्णालयाला राज्याचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा.सां. कन्नमवार यांचे नाव देण्यात आले आहे. या संदर्भात शासनाच्या वतीने परिपत्रक काढण्यात आले असून, लोकभावना लक्षात घेता महाविद्यालयाला कर्मवीर मा. सां. कन्नमवार यांचे नाव दिल्याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदभरती मध्ये असा झाला घोळ, परिक्षार्थीने केली पोलखोल


    चंद्रपूरातील सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या महाविद्यालयाच्या शेवटच्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

    नुकतीच त्यांनी महाविद्यालयाच्या कामाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
    दरम्यान, या महाविद्यालयाला माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा.सां. कन्नमवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी समाजबांधवांच्या वतीने करण्यात आली होती.

    नुकत्याच पार पडलेल्या कर्मवीर मा. सां. कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळ्याला आमदार किशोर जोरगेवार, माजी मंत्री शोभा फडणवीस, आणि आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या आग्रहामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली होती. या महोत्सवात सदर मागणी पुन्हा एकदा करण्यात आली.


    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची दखल घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कर्मवीर मा. सां. कन्नमवार यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, “शासकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर” याचे नामकरण “कर्मवीर मा.सा. कन्नमवार शासकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर” असे करण्यात आले आहे.

    त्या अनुषंगाने आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयाबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

  • Social responsibility MLA । चंद्रपूरच्या आमदाराचं दमदार काम

    Social responsibility MLA

    Social responsibility MLA : संकटाच्या काळात तत्परतेने मदत करणारे लोकप्रतिनिधी समाजासाठी प्रेरणादायक ठरतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असुन श्याम नगर येथील 70 वर्षीय महिलेच्या उपचारासाठी आमदार किशोर जोरगेवार पूढे आले आहे. त्यांनी या महिलेच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून निधी उपलब्ध करुन दिला असुन उर्वरित खर्च स्वखर्चाने केला आहे. गुडघ्याच्या आजाराने ग्रस्त असलेल्या या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असुन ती आता स्वस्थ आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात २० दिवसात ४ वाघांचा मृत्यू


    श्याम नगर येथील निर्मला गोजे या सत्तरी गाठलेल्या महिलेला गुडघ्याचा आजार झाला. त्यामुळे तिला चालणे फिरणे वेदनादाई झाले होते. घरची परिस्थिती हालाकीची असल्याने पूढील उपचार करण्यासाठी त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली होती. यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर महिलेच्या उपचारा करिता मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत 50 हजार रुपये उपलब्ध करुन दिले. त्यानंर सदर वृध्द महिलेवर खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करुन क्नी रिपलेस्टमेंट करण्यात आले आहे.


    शस्त्रक्रियेनंतर आमदार जोरगेवार यांनी स्वतः रुग्णालयात भेट देऊन वृद्ध महिलेची विचारपूस केली. त्यांनी रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांकडून तिच्या प्रकृतीविषयी सविस्तर माहिती घेतली आणि पुढील उपचारांसाठीही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी वृद्धेच्या कुटुंबीयांनी आमदार जोरगेवार यांचे आभार मानले समाजातील ज्येष्ठ नागरिक हे आपल्या संस्कृतीचे अधिष्ठान आहेत. त्यांची काळजी घेणे आणि त्यांना योग्य उपचार मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. ही मदत करण्याची संधी मिळाल्यामुळे मला समाधान वाटत असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.