Tag: आमदार किशोर जोरगेवार

  • Compensation laws for contract workers । कामगारांच्या कुटुंबांसाठी लढा: 50 लाखांचा कायदा होणार का?

    Compensation laws for contract workers

    Compensation laws for contract workers : मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चंद्रपूर मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी कर्तव्यावर असताना अपघातात मृत्यू झालेल्या कंत्राटी कामगारांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणी केली. अनेक वेळा अपघातामुळे कुटुंबाचा एकमेव कमावता सदस्य गमावल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट येते. अशा परिस्थितीत मोठ्या संघर्षानंतरच त्यांना योग्य मदत मिळते. त्यामुळे या संदर्भात कायदेशीर तरतूद असणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी बोलतांना आमदार जोरगेवार यांनी म्हटले आहे. Worker safety laws in India

    चंद्रपूर शहरातील धुळीने व्यापारी झाले त्रस्त

    मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चंद्रपूर मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदारसंघातील विविध विषयांकडे  सभागृहाचे लक्ष वेधले. अधिवेशनाच्या प्रत्येक सत्रात आमदार किशोर जोरगेवार यांनी लक्षवेधी सूचना, प्रश्नोत्तर, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन, औचित्याचा मुद्दा अशा विविध संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करत मतदारसंघातील प्रश्न मांडले आहे. Contract worker death benefits

    प्रश्नोत्तराच्या तासात आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगारांचा विषय सभागृहात मांडत कर्तव्यावर असताना अपघातात जीव गमावलेल्या कंत्राटी कामगारांच्या आर्थिक मदतीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी कामगार मंत्री आकाश पुंडकर यांना विचारणा करताना सांगितले की, त्यांच्या दिलेल्या पहिल्या उत्तरात 49 हजार आणि 50 हजार रुपये तर दुसऱ्या उत्तरात 12 लाख आणि 7 लाख रुपयांची मदत केल्याचे सांगितले आहे. या मदतीत तफावत का असा प्रश्न आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला.

    एका कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींना अनेकदा रस्त्यावर उतरावे लागते, आंदोलन करावे लागते. त्यानंतरच संबंधित कंपनी व्यवस्थापन आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेते. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि कोणत्याही मृत कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक असुरक्षिततेचा सामना करावा लागू नये यासाठी आवश्यक कायदा करणे गरजेचे आहे, असे यावेळी आमदार जोरगेवार यांनी सांगितले. On-duty death compensation policy

    याआधी लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे लढा देत सिद्धपल्ली येथील एका कामगाराच्या कुटुंबाला 70 लाख, तर रॉयल मेटल येथील मृत कामगाराच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची मदत मिळवून दिली होती. परंतु, प्रत्येक वेळी मृत कामगारांच्या कुटुंबीयांना मदत मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ही बाब दुर्दैवी असल्याचे आमदार जोरगेवार म्हणाले. जर हा कायदा अस्तित्वात आला, तर कोणत्याही कुटुंबाला मदतीसाठी संघर्ष करावा लागणार नाही आणि त्यांना आपसूकच आवश्यक आर्थिक मदत मिळेल, असेही त्यांनी यावेळी सभागृहात बोलताना स्पष्ट केले.कामगार हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कोणत्याही उद्योग, व्यवसाय आणि देशाच्या प्रगतीसाठी कामगारांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भविष्यासाठी सरकारने गांभीर्याने विचार करून हा कायदा करावा, अशी आग्रही मागणी आमदार जोरगेवार यांनी कामगार मंत्री आकाश पुंडकर यांच्याकडे अधिवेशनात बोलतांना केली आहे.

  • how local leaders solve citizen issues । “जनतेचा आवाज, प्रशासनाची साथ: घुग्घूसचा जनता दरबार”

    how local leaders solve citizen issues

    “आमदार किशोर जोरगेवारांचा नवा पायंडा: जनता दरबार”

    how local leaders solve citizen issues : आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घूस येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते. स्नेहप्रभा मंगल कार्यालयात झालेल्या या जनता दरबारात घुग्घूसवासीयांनी अधिकाऱ्यांसमक्ष आपल्या समस्या मांडल्या. यावेळी आलेल्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. जनता दरबार हा केवळ समस्या मांडण्याचा नव्हे, तर त्या सोडवण्याचा प्रभावी मंच आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुरावा कमी करून प्रत्येक तक्रारीकडे गांभीर्याने पाहिले जाईल, असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. MLA public meeting impact

    घुग्गुस शहरात शाळकरी मुलीसमोर विकृत प्रकार

    यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, घुग्घूस नगर परिषदेचे मुख्य अधिकारी निलेश रांजनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश अमरशेट्टीवार, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, महावितरण विभागाचे अभियंता पेंदोर, वेकोलीचे उपक्षेत्रीय व्यवस्थापक रेड्डी, आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्यासह संबंधित सर्व विभागांचे अधिकारी तसेच घुग्घूसचे माजी सरपंच संतोष नुने, उपसरपंच संजय तिवारी, माजी जिल्हा परिषद सभापती नितू चौधरी, 

    माजी ग्रामपंचायत सदस्य वैशाली ढवस, भारतीय जनता पार्टीचे  महामंत्री विवेक बोढे,  इमरान खान, सुधाकर रेड्डी, राजकुमार गोडशेट्टीवार, सुनिता गिवे, स्वप्निल वाढई, मुन्ना लोढे, उषा आगदारी, मयुर कलवल, विशाल दामेर, श्याम आगदरी, विनोद चौधरी, वनिता निहाल, अनिल बाम, निरिक्षण तांड्रा, कुसुम सातपूते, साजन गोहणे, नितू जैस्वाल, सविता गोहणे, सिनु रामटेके, विनोद चौधरी, मल्लेश बल्ला, नंदकिशोर यादव, राहुल झाडे आदींची उपस्थिती होती. Local Government Public Meetings

    क्रिकेट न खेळता कमवा लाख रुपये?, पोलिसांच्या नजरेआड गोरखधंदा

    घुग्घूस शहरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी स्नेहप्रभा मंगल कार्यालयात आयोजित जनता दरबार मोठ्या प्रतिसादात पार पडला. या दरबारात शेकडो नागरिकांनी हजेरी लावून स्वतःच्या समस्या थेट अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. प्रशासनाच्या वतीने विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहिल्याने नागरिकांच्या अडचणी तत्काळ नोंदवून त्यावर उपाययोजना करण्यास गती मिळाली. जनता दरबारात पाणीपुरवठा,  रस्ते, वीज, आरोग्य,  स्वच्छता, सार्वजनिक सुविधा, वेकोलीशी संबंधित तक्रारी, वसाहतीतील नागरी सुविधा यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. नागरिकांच्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी गांभीर्याने उत्तर देत काही तक्रारींवर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. how public hearings help citizens

    mla public meeting impact

                घुग्घूसच्या नागरिकांनी आपले प्रश्न प्रामाणिकपणे मांडले. मात्र, प्रश्न उपस्थित करणे हेच शेवटचे पाऊल नाही, तर त्यावर तोडगा काढणे हा जनता दरबार मागचा खरा उद्देश आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने शहराचा विकास साधला जाईल. तुमच्या प्रत्येक समस्येवर तातडीने निर्णय घेतला जाईल आणि आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

                आज या जनता दरबारात आपण उत्साहाने सहभागी झाला आहात, हेच या उपक्रमाचे यश आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र येऊन काम करता तेव्हाच लोकशाहीचे खरे स्वरूप दिसते. आज येथे आलेल्या प्रत्येक नागरिकाने आपली अडचण मांडली आणि प्रशासनाने ती गांभीर्याने ऐकून घेतली आहे. जनता दरबार केवळ चर्चेपुरता मर्यादित नसून, अमलबजावणीची सुरुवात आहे असेही आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि घुग्घूसवासीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Chaitra Navratri preparations 2025 । “महाकाली यात्रेच्या स्वागतासाठी चंद्रपूर एकवटलं – आमदारांचा स्वच्छता मोहिमेत पुढाकार!”

    Chaitra Navratri preparations 2025

    Chaitra Navratri preparations 2025 : ३ एप्रिलपासून चंद्रपूरात चैत्र नवरात्र यात्रेला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून महाकाली मंदिर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत चंद्रपूर शहर महानगरपालिका, भारतीय जनता पक्ष, श्री महाकाली माता महोत्सव समिती, महाकाली मंदिर ट्रस्ट आणि महाकाली भक्त यांनी संयुक्त सहभाग घेतला. Mahakali Temple Chandrapur events

    चंद्रपुरात सट्टेबाज सक्रिय, आजपासून आयपीएल हंगामाला सुरुवात

    यावेळी मनपा आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, संतोष गर्गेलवार, स्वच्छता अधिकारी डॉ. अमोल शेडके, श्री महाकाली माता ट्रस्टचे श्याम धोपटे, अजय जयस्वाल, सुनील महाकाले, मिलिंद गंपावार, अजय वैरागडे, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय राऊत, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, भाजप नेते प्रकाश देवतडे, दशरथसिंह ठाकूर, मनोज पाल, प्रमोद शास्त्रकार, माजी नगरसेवक राजेंद्र अडपेवार, प्रदीप किरमे, श्याम कणकम, दिवाकर पुडट्टवार, गणेश गेडाम,  वंदना हातगावकर, सविता दंढारे, संजय बुरघाटे, करणसिंग बैस, सलीम शेख, कालीदास धामनगे, विनोद अनंतावर, प्रतीक शिवणकर, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा गंधेवार, आशा देशमुख, सुबोध चिकटे, शंकर दंतुलवार आदींची उपस्थित होते.

    महाकाली मंदिर परिसरात चैत्र नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मंदिर परिसर स्वच्छ आणि सुशोभित करण्याच्या उद्देशाने विविध सामाजिक आणि शासकीय संस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. यात्रेच्या काळात महाकाली मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर परिसर स्वच्छ आणि सुरळीत रहावा, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेत व्यापक स्वच्छता अभियान हाती घेतले. Chandrapur temple cleanliness drive

    mahakali temple chandrapur events

    मंदिर परिसरातील रस्ते, सभामंडप, मंदिर प्रांगण आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात आली. कचरा संकलन, निर्जंतुकीकरण आणि पर्यावरणपूरक व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला. यात्रेच्या काळात भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अस्वच्छतेचा त्रास होऊ नये, यासाठी विशेष स्वच्छता पथक तैनात करण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या.

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बैठक घेऊन यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी महाकाली मंदिर परिसरातील स्वच्छता, भाविकांसाठी असलेल्या सुविधा आणि गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली. महाकाली मंदिर हे चंद्रपूरचे धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र असल्याने येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, असे ते म्हणाले.

    महाकाली यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी आमदार किशोर जोरगेवार सातत्याने पाठपुरावा करत आहेत. यात्रेच्या कालावधीत उत्तम सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत ठरविलेल्या उपाययोजनांची पूर्तता तपासण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांसह महाकाली मंदिर परिसराची पाहणी केली आणि आवश्यक सूचना दिल्या होत्या. आज त्यांनी स्वतः पुढाकार घेत मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. यात्रेच्या दरम्यान गर्दी नियंत्रण, स्वच्छतेच्या कायमस्वरूपी उपाययोजना आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने आवश्यक तयारी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

  • Chandrapur tourist places । “चंद्रपूर जिल्हा बनेल देशातील नवा पर्यटन केंद्र?”

    Chandrapur tourist places

    आमदार किशोर जोरगेवार यांची अधिवेशनात मागणी

    Chandrapur tourist places : पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा घटक असून, चंद्रपूर जिल्ह्यात पर्यटनाच्या अपार संधी उपलब्ध आहेत. हा जिल्हा देशाच्या मध्यभागी स्थित असून, कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा धोका नाही. येथे वन, ऐतिहासिक, धार्मिक आणि औद्योगिक पर्यटनाचा मोठा वाव आहे. त्यामुळे संबंधित सर्व विभागांची एकत्रित बैठक घेऊन चंद्रपूर जिल्ह्याचा विकास पर्यटनदृष्ट्या करत चंद्रपूर जिल्ह्याला देशातील पर्यटनाच्या नकाशावर आणा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली. Chandrapur travel guide

    चंद्रपूर मेडिकल कॉलेज परिसरात भीषण आग

    मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याला पर्यटन हब बनविण्याची मागणी लावून धरली. त्यांनी अधिवेशनात बोलताना सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथे पाचशे वर्षे जुने महाकाली मंदिर आहे. या मंदिराच्या विकासासाठी २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असला तरी विकास आराखड्याला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण व्हावे. Chandrapur sightseeing

    ताडोबा अभयारण्यात दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. मात्र, त्यांना जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळांकडे आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न आवश्यक आहेत. चंद्रपूर येथे टायगर सफारीसाठी २८७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, ४०० एकर जागेवर ही सफारी सुरू केली जाणार आहे. हे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणीही त्यांनी केली. चंद्रपूर येथील पवित्र दीक्षाभूमीसाठी १०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यातील ५६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. उर्वरित निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. 

    चंद्रपूर हा औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. येथे वीज निर्मिती केंद्रे, सिमेंट उद्योग, कागद कारखाने आणि कोळसा खाणी आहेत. औद्योगिक पर्यटनाच्या दृष्टीने या सर्व सुविधांचा विकास करून, बंद पडलेल्या वेकोलीच्या भूमिगत खाणी पर्यटनासाठी खुल्या कराव्यात, अशी मागणीही आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. पर्यटनविकासाला चालना देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात आणि चंद्रपूर जिल्ह्याला देशाच्या पर्यटन नकाशावर स्थान मिळवून द्यावे, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात जोरदारपणे मांडली आहे.

  • RTO corruption in Maharashtra | चंद्रपूर RTO मध्ये मृत व्यक्तीच्या नावानेही दिले जातायं परवाने – आमदार जोरगेवारांचा गौप्यस्फोट

    RTO corruption in Maharashtra

    RTO corruption in Maharashtra : अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी  परिवहन विभागातील भ्रष्ट काराभाराकडे सभागृहाचे लक्ष वेधत या विभागातील प्रताप, सरनाईकांनी थांबवावा असे म्हणत परिवहन मंत्री प्रताप  सरनाईक यांच्याकडे कठोर कार्यवाहीची मागणी केली. यावर उत्तर देतांना ना. प्रताप सरनाईक यांनीही कार्यवाही करणार असल्याचे सकारात्मक उत्तर सभागृहात दिले आहे. Transport department scam

    चांदाफोर्ट रेल्वे स्थानकावर नव्या रेल्वेचा थांबा

    आरटीओ विभागाच्या वतीने कोणतीही तपासणी न करता वाहनांना परवाने दिले जात आहेत. यातील अनेक वाहने प्रदूषणास तसेच अपघातास कारणीभूत ठरत आहेत. चार वर्षांपासून एकाच अधिकाऱ्याकडे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे नियमित अधिकाऱ्याची नियुक्ती करून आरटीओ विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली. Corruption in RTO office

    मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार आरटीओ विभागातील भ्रष्ट कारभारावर चांगलेच संतापले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना प्रश्न विचारताना त्यांनी चंद्रपूर येथील प्रभारी आरटीओ बदलणार आहात का, असा थेट प्रश्न उपस्थित करत आरटीओ विभागातील भ्रष्ट कारभाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

    यावेळी आ. जोरगेवार म्हणाले की, “आरटीओ विभागात रॅकेट सक्रिय रित्या कार्यरत आहे. मोठ्या ट्रान्सपोर्ट वाहने कार्यालयात जाऊन कोणत्याही प्रकारची तपासणी न करता त्यांना परवाने दिले जात आहेत,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला. Truck overloading problem

    चंद्रपूर येथे आरटीओची जागा रिक्त असतानाही प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या भरवशावर आरटीओ कार्यालय चालवले जात आहे. परराज्यातील वाहनचालक येथे येताना त्यांची कुठल्याही प्रकारची चौकशी केली जात नाही. मागील काही घटनांमधून आरटीओ विभागातील भ्रष्ट कारभार उघड झाला असतानाही अधिकाऱ्यांची उचलबांगडी होत नाही, मृतक व्यक्तीच्या नावाने परवाना देण्याचा प्रताप या विभागाने केला. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे येथे तात्काळ नियमित आरटीओ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात केली. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी “लवकरच योग्य कारवाई करण्यात येईल,” असे आश्वासन दिले. Transport minister action on RTO

    चंद्रपूर जिल्ह्यातील राख वाहतुकी संदर्भात त्वरित उपाययोजना करा

    चंद्रपूर जिल्ह्यातील पावर प्लांटमधून मोठ्या प्रमाणात राख निर्माण होते. ही राख सिमेंट उद्योग आणि रस्ते बांधकामासाठी वापरली जाते. मात्र, राख वाहतुकीवर कोणतेही नियमन नसल्यामुळे प्रदूषण आणि अपघातांची शक्यता वाढली आहे. नुकताच चंद्रपूर-नागपूर महामार्गावर खुल्या ट्रकने राख वाहून नेताना एसटी बसला धडक बसून गंभीर अपघात झाला. यामध्ये बसचालकाचा मृत्यू झाला आणि अनेक प्रवासी जखमी झाले. अशा दुर्घटना टाळण्यासाठी राख वाहतुकीसाठी निश्चित वेळेचे बंधन आणि वाहने सुरक्षित असावीत, याची तपासणी आवश्यक आहे. परिवहन विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा धोका वाढत असल्याचा आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी केला आहे. 

  • Maharashtra sand policy update । राज्यात वाळू धोरणाचा अभाव – विकासकामे आणि घरकुल प्रकल्प ठप्प

    Maharashtra sand policy update

    Maharashtra sand policy update : राज्यात अद्याप ठोस वाळू धोरण तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक महत्त्वाची विकासकामे ठप्प झाली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागासाठी काही रेती घाट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर वाळूवर आधारित उद्योग आणि घरकुलांच्या बांधकामांसाठी स्वतंत्र घाट आरक्षित करण्यात यावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलताना केली. Free sand for housing projects

    चंद्रपुरात २९ मार्चला थेट मुलाखत, थेट नोकरी

    मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीवर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यात वाळू धोरण तयार न झाल्याने विकासकामे आणि नागरिकांवर होणाऱ्या परिणामांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. राज्यातील अनेक महत्त्वाची सार्वजनिक विकासकामे व घरकुल प्रकल्प रखडले आहेत. रस्ते, पूल, इमारती यांसारख्या सार्वजनिक बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणावर वाळू आवश्यक असते. मात्र, वाळूच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे ही कामे खोळंबली आहेत. परिणामी, नागरी सुविधांमध्ये दिरंगाई होत असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. Sand distribution policy

    हाच मुद्दा आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात उपस्थित केला आहे. यावेळी ते म्हणाले की, वाळू धोरण तयार न झाल्याने रेतीवर आधारित असलेल्या अनेक उद्योगांना देखील मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वीटभट्टी व्यवसाय, बांधकाम साहित्य पुरवठादार, काँक्रिट मिक्सिंग प्लांट, गट्टू कारखाने आणि इतर बांधकाम व्यवसाय वाळूच्या तुटवड्यामुळे अडचणीत आले आहेत. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले शेकडो कामगार बेरोजगार होण्याच्या संकटात आहेत.

    घर बांधण्यासाठी वाळू ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मात्र, वाळू मिळत नसल्यामुळे अनेक घरकुल प्रकल्प रखडले आहेत. सरकारच्या विविध गृहनिर्माण योजनांमध्ये अर्ज केलेल्या नागरिकांना हक्काच्या घराची प्रतीक्षा अधिक वाढली आहे. त्यामुळे या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले.

    सरकारने लवकरात लवकर ठोस वाळू धोरण जाहीर करून या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत केली. यावर उत्तर देताना येत्या आठ दिवसांत वाळू धोरण जाहीर करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.

  • Amma Sanskar Bharti । चंद्रपुरात संस्कारांची शाळा: आमदार जोरगेवारांच्या ‘अम्मा संस्कार भारती’चा शुभारंभ!

    Amma Sanskar Bharti

    Amma Sanskar Bharti : आपल्या संस्कृतीचे संवर्धन आणि पुढच्या पिढीला योग्य संस्कार देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आपण उचलले आहे. अम्मा संस्कार भारती हा उपक्रम चिमुकल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक नवे व्यासपीठ आहे. अम्मा संस्कार भारती म्हणजे केवळ एक शिक्षणपर उपक्रम नाही, तर मुलांच्या मनोभूमीवर संस्कारांची गोड शिदोरी ठेवण्याचा आमचा एक प्रयत्न असून, यातून संस्कारक्षम पिढी घडविण्याचा आमचा संकल्प असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Amma Sanskar Bharti initiative

    चंद्रपूर येथे आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आणि स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘अम्मा संस्कार भारती’ या विशेष उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी लक्ष्मी नारायण मंदिर येथे मुलांमध्ये भारतीय संस्कृती, नैतिक मूल्ये आणि शारीरिक-मानसिक विकास घडविण्यावर भर दिला जाणार आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर उपक्रमाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, प्रशिक्षिका अनामिका चहारे, प्रशिक्षक राजु जोशी, प्रशिक्षिका मिनाश्री ठेंगडी, प्रशिक्षिका रुपाली तोषनीवाल, प्रशिक्षक अनिरुद्ध टिकले, श्रद्धा सेलोटे, मृनाल पनके, लक्ष्मी नारायण मंदिरचे विश्वस्त जुगल सोमानी, कैलास सोमानी करणसिंग बैस, आदींची उपस्थिती होती.

    थेट मुलाखत थेट नोकरी, २९ मार्चला चंद्रपुरात रोजगार मेळावा

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, सध्याच्या तंत्रज्ञान प्रधान युगात मोबाईल आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये मानसिक अस्थैर्य आणि जीवनशैलीत विस्कळीतपणा दिसून येत आहे. गॅझेटच्या आहारी गेलेल्या मुलांना आपली परंपरा, संस्कारांची ओळख व्हावी, त्यांना जीवनमूल्ये मिळावीत, यासाठी आपण हा उपक्रम सुरू केला आहे. स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपण हा उपक्रमाचा राबवत आहोत. या उपक्रमाला पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. Indian culture for kids Chandrapur

    amma sanskar bharti initiative

    भारतीय संस्कृतीत बालपणी दिलेले संस्कार संपूर्ण जीवनाचा पाया घडवतात. म्हणूनच ‘अम्मा संस्कार भारती’ उपक्रमाच्या माध्यमातून ३ ते १२ वयोगटातील मुलांसाठी मंत्रजप, श्लोक, स्तोत्र पठण, प्राणायाम, सूर्यनमस्कार, चारित्र्य संवर्धन, पौराणिक कथा, चित्रकला आणि आर्ट अँड क्राफ्ट असे विविध उपक्रम घेतले जात आहे. मुलांच्या मनामध्ये सकारात्मक विचार रुजावेत, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना चांगले आचरण आणि आदर्श विचार मिळावेत, यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. Traditional values learning India

    आजच्या मुलांमध्ये चांगले विचार आणि सशक्त व्यक्तिमत्त्व निर्माण करणे, हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. म्हणूनच हा उपक्रम केवळ संस्कारांची शिकवण देणारा नसून, आपल्या समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल असल्याचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी चिमुकल्यांसह पालकवर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Sewer line road damage repair । सीवरेजमुळे खोदलेले रस्ते लवकरच होतील सुरळीत – 20 कोटींच्या निधीतून दुरुस्ती होणार सुरू

    Sewer line road damage repair

    Sewer line road damage repair : शहरातील सीवरेज लाईनच्या कामामुळे अनेक रस्ते खोदण्यात आले आहेत. परिणामी नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी आज शनिवारी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत शहरातील प्रमुख मार्गांची पाहणी केली. यावेळी त्यांनी मंजूर 20 कोटी रुपयांच्या निधीतून त्वरित रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्याचे निर्देश दिले. City road repair after sewer work

    घोडाझरी तलावात पोहायला गेलेल्या ५ युवकांचा बुडून मृत्यू

              यावेळी मनपाचे शहर अभियंता विजय बोरिकर, शाखा अभियंता अविनाश भारती, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्रीकांत भट्टड यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, माजी महानगर शहर अध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, अमोल शेंडे, सलिम शेख, करण नायर, करणसिंग बैस, स्वप्निल पटकोटवार, सुमित बेले, चंद्रराज बातो आदींची उपस्थिती होती.

              सीवरेजसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांवरून प्रवास करणे नागरिकांसाठी मोठे संकट बनले आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ही परिस्थिती पाहता आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्य मार्गांची पाहणी केली. सीवरेजचे काम पूर्ण होताच तातडीने रस्त्यांची पुनर्बांधणी सुरू करावी. चैत्र नवरात्र यात्रा 3 एप्रिलपासून सुरू होत आहे, त्यामुळे या यात्रेपूर्वी जटपूरा गेट ते जटपूरा गेट हा प्रमुख मार्ग संपूर्णतः तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. Sewerage project affecting traffic

              शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी नगर विकास निधी अंतर्गत 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, सीवरेज लाईनच्या कामामुळे रस्त्यांचे खोदकाम सुरू असल्याने पुनर्बांधणी थांबवण्यात आली होती. आता शहरात सिवरेजचे काम पूर्ण होत असल्याने तातडीने दुरुस्तीला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वय साधत कामे वेगाने पूर्ण करावीत, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. City traffic problems due to roadwork

              यापूर्वीही आमदार किशोर जोरगेवार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सीवरेजच्या कामामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा केली होती. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत, कामे लवकर पूर्ण करून रस्त्यांची पुनर्बांधणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. विशेषतः शहरातील मुख्य मार्गांचे काम तातडीने हाती घेण्याचा निर्णय बैठकीत झाला होता.

    sewerage project affecting traffic

              शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्राथमिक टप्प्यात सर्वाधिक रहदारी असलेल्या मार्गांचे काम करण्यात येणार आहे. चैत्र नवरात्र यात्रा सुरू होण्यापूर्वी यात्रेकरूंना आणि स्थानिक नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी जटपूरा गेट ते जटपूरा गेट हा मार्ग तयार करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या आहेत. यात्रेच्या गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी मनपा प्रशासनाने सिवरेजचे उर्वरित काम वेगाने करावे, असे आदेश त्यांनी दिले. Municipal corporation road repair plan

              सीवरेजचे काम पूर्ण होताच गांधी चौक ते पठाणपुरा, आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट यासह इतर दोन प्रमुख मार्गांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच, ज्या भागात सिवरेजचे काम पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणी रस्त्यांचे डागडुजी करण्याच्याही सूचनाही त्यांनी दिल्या.नागरिकांना वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांपासून लवकरच दिलासा मिळावा, यासाठी प्रशासनाने त्वरीत पावले उचलावीत असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले आहे.

  • kishor jorgewar on mahakali yatra । चैत्र नवरात्र: चंद्रपूर सज्ज, भाविकांसाठी विशेष सुविधा!

    kishor jorgewar on mahakali yatra

    आमदार जोरगेवारांनी घेतला तयारीचा आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश!

    kishor jorgewar on mahakali yatra :  3 एप्रिल पासून चंद्रपूरात सुरु होणार असलेल्या चैत्र नवरात्र यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विभागाच्या अधिका-यासंसह यात्रा परिसराची पाहणी केली. ही यात्रा आपल्या जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेशी जोडलेली असून, भाविकांना आध्यात्मिक शांती आणि सुरक्षित दर्शन अनुभव मिळावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे असे निर्देश यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहे. Chandrapur Navratri Yatra

    चंद्रपूर-यवतमाळ करांची व्यथा, खासदार धानोरकर यांचा रेल्वे विभागाला सवाल

      या  यावेळी मनपा आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपविभागीय अधिकारी संजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी यादव, शहर पोलिस निरिक्षक प्रभावती ऐकुरे, वाहतूक पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाटील, तहसीलदार विजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अमरशेट्टीवार, शहर अभियंता विजय बोरीकर, यांच्यासह वेकीलीचे आणि महावितरण विभागाचे अधिकारी आदि अधिका-यांची उपस्थिती होती.

     आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचनांनतंतर चैत्र नवरात्र यात्रेत येणा-या भाविकांच्या व्यवस्थेसाठी प्रशासन कामाला लागले आहे. या संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात बैठक घेत अधिका-यांना महत्वाच्या सुचना केल्या होत्या. तर आज त्यांनी प्रत्यक्ष यात्रा परिसराला भेट देत सर्व विभागाच्या अधिका-यांसह परिसरात करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची पाहणी केली आहे. Mahakali Temple Chandrapur

       पार्किंग व्यवस्था, यात्रा परिसराचा विस्तार, राहण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, स्वच्छता, ट्रॅफिक नियंत्रण आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. यात्रेच्या सुव्यवस्थेसाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. श्री महाकाली माता यात्रा ही चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रमुख धार्मिक यात्रा असून, राज्यभरातून लाखो भाविक माता महाकालीच्या दर्शनासाठी येथे येतात. त्यामुळे भाविकांच्या सोयीसुविधांसाठी सुसज्ज नियोजन करणे ही आपली जबाबदारी आहे. यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय होणार नाही, गर्दीचे नियोजन योग्य प्रकारे होईल आणि सर्व सुविधांची पूर्तता होईल असे सुक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या.

    chandrapur navratri yatra

      यात्रेच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होईल. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी येताना आणि परत जाताना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी योग्य नियोजन गरजेचे आहे. वाहतूक व्यवस्था योग्य प्रकारे नियोजित केली पाहिजे. कोणत्याही प्रकारे ट्रॅफिक कोंडी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. बाहेरून येणार्या भाविकांसाठी निवास, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य सेवा या सर्व बाबींवर विशेष लक्ष दिले पाहिजे. Navratri Yatra Traffic Control

      पिण्याच्या पाण्याची सोय पुरेशा प्रमाणात असावी. उन्हाच्या झळा वाढलेल्या असताना, भाविकांना शुद्ध आणि थंड पाणी सहज उपलब्ध होईल, यासाठी यात्रा मार्गावर आणि मंदिर परिसरात भरपूर पाण्याचे ठिकाणे असावीत. यात्रा परिसरात कचरा साचणार नाही, यासाठी नियमित साफसफाई आणि कचर्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था महापालिका आणि मंदिर प्रशासनाने उभारावी, यात्रेदरम्यान भाविकांची सुरक्षितता हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे.

    गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त असावा, सीसीटीव्हीच्या साहाय्याने संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले जावे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस विभागाला केल्या आहे. व्यवसायिक आणि दुकानदारांनी देखील यात्रेच्या वेळेस शिस्तबद्ध पद्धतीने आपला व्यवसाय करावा. वीज वितरण आणि इतर महत्त्वाच्या सुविधा पुरवणार्या यंत्रणांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. Chandrapur Temple Crowd Management

    रस्ते व्यवस्थित असावेत, प्रकाशयोजना योग्य प्रकारे कार्यरत असावी आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देता यावे, यासाठी सर्व स्तरांवर योग्य नियोजन असावे अशा सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.  यावेळी  श्री महाकाली माता ट्रस्टचे श्याम धोपटे, अजय जयस्वाल, सुनिल महाकाले, मिलिंद गंपावार, पवन सराफ, अजय वैरागडे, सुरेश महाकुळकर, अॅड. विजय मोगरे, तुषार सोम, दशरथ सिंग ठाकुर, मनोज पाल, छबु वैरागडे, सविता दंढारे, अमोल शेंडे, करणसिंग बैस, नकुल वासमवार, सलीम शेख, कालीदास धामनगे, कार्तिक बोरेवार आदींची उपस्थिती होती.

  • Coal mafia activities in Chandrapur | चंद्रपूर जिल्ह्यातील कोल माफियांवर निर्बंध लावा – आमदार किशोर जोरगेवार

    Coal mafia activities in Chandrapur

    Coal mafia activities in Chandrapur : शासनाने कर्नाटक एम्टा, अरविंदो यांसारख्या काही खाजगी कोळसा खाणींना परवाने दिले आहेत. या खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असून, येथील कोळसा खुल्या बाजारात विकला जात असल्याने कोळसा माफिया सक्रिय झाला आहे. परिणामी, असामाजिक कृत्ये घडत असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या परिस्थितीवर निर्बंध लावण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलताना केली आहे.

    चंद्रपुरातील हॉटेलमधील व्हेज बिर्यानीमध्ये आढळली अळी, युवासेनेची तक्रार

    चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणींचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. मात्र, त्याचे दुष्परिणामही आता समोर येत आहेत. या खाणींमुळे प्रदूषण, जनजीवनावरील परिणाम आणि गुन्हेगारीचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

    कोळसा खाणींच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आणि शेती व्यवसायालाही मोठा फटका बसत आहे. याबाबत अनेक तक्रारी आ. किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारी लक्षात घेऊन, त्यांनी यापूर्वीच वेकोलिच्या सीएमडी यांची भेट घेऊन हा विषय उपस्थित केला होता. मात्र, ठोस कार्यवाही न झाल्यामुळे, त्यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एकदा हा मुद्दा सभागृहात मांडला. Coal mining impact on farmers

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना आ. किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर कोळसा खाणींमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. वेकोलीच्या वतीने अधिग्रहीत केलेल्या जमिनींचा मोबदला अद्याप दिला गेलेला नाही. तसेच, उर्वरित जमिनींची खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. Kishor Jorgewar coal mining issues

    वेकोली प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांचे पांदण रस्ते अडवले जात आहेत, याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले आणि यावर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली. बंराज कोळसा खाणीने वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून तिथून कोळशाचे उत्खनन सुरू केले आहे. या प्रकाराची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांनी यावेळी अधिवेशनात केली.

    तसेच, अरविंद खाणीस विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची शासनाने दखल घ्यावी आणि स्थानिक जनतेच्या मागण्या ऐकून घेत ठोस निर्णय घ्यावा, अशीही त्यांनी अधिवेशनात जोरदार मागणी केली आहे .खाजगी कोळसा खाणींमुळे कोळसा माफिया सक्रिय झाला असून, अनेक ठिकाणी अवैध व्यवहार होत आहेत. या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत आणि कोळसा खाणींवर निर्बंध लागू करावे असे ते यावेळी बोलताना म्हणाले.