free sewing training for women : निशुल्क शिवणकला शिबिर म्हणजे केवळ शिवणकाम शिकण्याचे साधन नव्हते, तर तो स्वावलंबनाचा एक पहिला टप्पा होता. आपल्या हातात कौशल्य असेल, तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपण स्वतःला सक्षम करू शकतो, आपले कुटुंब सुदृढ करू शकतो. आमच्यासाठी महिला सशक्तीकरण ही केवळ घोषणा नसून ती एक कृती असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. women empowerment through skills
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने नागीनाबाग वार्ड येथे महिलांसाठी निशुल्क शिवणकाम, फॅशन डिजायनींग, ड्रेस कटिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एक महिना चाललेल्या शिबिराचा नुकताच समारोप करण्यात आला असून, यावेळी शिबिरात सहभागी झालेल्या १०० हून अधिक प्रशिक्षणार्थी महिलांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध लेखिका व कवयित्री गीता रायपुरे, वंदना हातगावकर, सविता दंढारे, प्रशिक्षिका कौसर खान, आशू फुलझेले, वंदना हजारे, सुरेखा चहारे, स्वाती, पूजा तावडे, राम जंगम, प्रतीक शिवणकर, ताहिर हुसेन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, मागील तीन वर्षांत आपण शिवणकाम, फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर, मेकअप यांसारखी अनेक निशुल्क शिबिरे आयोजित करून हजारो महिलांना प्रशिक्षण दिले आहे. यातील अनेक महिलांनी स्वतःचा रोजगार सुरू केला आहे. आज येथे १०० हून अधिक महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणातून आपण जे काही शिकलात, ते आता प्रत्यक्ष व्यवहारात उतरवा. हे कौशल्य रोजगाराच्या संधी निर्माण करणारे ठरेल. fashion designing course for women free
काही महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करतील, तर काही जणी घरबसल्या उत्पन्न मिळवू शकतील. यासाठी अधिक मदतीची गरज भासल्यास आमचे कार्यालय सदैव तुमच्या सेवेस तत्पर राहील. शिबिराचे यश केवळ प्रशिक्षण घेतलेल्या महिलांचेच नाही, तर त्या प्रशिक्षणाला दिशा देणाऱ्या प्रशिक्षकांचे, संयोजकांचे आणि संपूर्ण टीमचे असल्याचेही आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले. या समारोपीय कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Guru Yamunamai visit to Chandrapur : शेंद्राची मानकरी श्री गुरु यमुनामाय यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार आणि त्यांच्या पत्नीने श्री गुरु यमुनामाय यांचे मनःपूर्वक स्वागत केले. अम्मा का टिफिन आणि श्री माता महाकालीची मूर्ती भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी श्री माता महाकाली महोत्सव ट्रस्ट व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. Chanda Mahakali Yatra
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही चैत्र महिन्यात महाकाली मंदिर परिसरात आयोजित यात्रेत नांदेड जिल्ह्यातून श्री गुरु यमुनामाय यांचे अश्वारूढ होऊन आगमन झाले. यावर्षीही त्यांनी आपल्या उपस्थितीने यात्रेला आध्यात्मिक तेज प्राप्त करून दिले. राजमाता निवासस्थानी झालेल्या भेटीत श्री गुरु यमुनामाय यांनी यात्रेकरूंसाठी करण्यात आलेल्या विविध सुविधा – स्वच्छता, पोलीस बंदोबस्त, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्नछत्र, आरोग्य व्यवस्था आणि संपूर्ण नियोजनाबद्दल विशेष कौतुक व्यक्त केले. Mahakali Yatra 2025
त्यांनी आयोजकांचा सेवाभाव आणि शिस्तबद्ध आयोजनाबद्दल मनापासून प्रशंसा केली. गेल्या वर्षी झालेल्या यात्रेदरम्यान श्री गुरु यमुनामाय यांनी स्वर्गीय अम्मा यांची भेट घेतली होती. यंदा अम्मा आपल्यात नसल्याची बाब समजताच त्यांनी अम्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. हा क्षण उपस्थित सर्वांसाठी अत्यंत भावूक करणारा ठरला.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, महाकाली यात्रा ही केवळ धार्मिक परंपरा नसून, श्रद्धा, सेवा आणि सामाजिक ऐक्य यांचे प्रतीक आहे. श्री गुरु यमुनामाय यांचे चंद्रपूरमध्ये आगमन हे आपल्या सर्वांसाठी गौरवाचे आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारे आहे. त्यांच्या साक्षात दर्शनाने यात्रेला नवी उंची मिळाली आहे. स्वर्गीय अम्मा यांनी आयुष्यभर सेवा, समर्पण आणि भक्तीचा आदर्श ठेवला. त्यांचे कार्य आजही सर्वांना प्रेरणा देत आहे. यंदाच्या यात्रेत त्या नसल्या तरी त्यांची आठवण प्रत्येकाच्या मनात कायम आहे. येत्या काळात ही यात्रा आणखी भव्य, सुसंघटित आणि लोकाभिमुख करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे ते यावेळी म्हणाले.
श्री गुरु यमुनामाय म्हणाल्या की, पुढील वर्षी महाकाली यात्रेत भाविकांची संख्या आणखी वाढेल, असा विश्वास आहे. येथे शिस्त, सेवा आणि श्रद्धेचा संगम आहे. त्यामुळे देवतेच्या कृपेने यात्रेचा विस्तार आणि प्रभाव नक्कीच वाढेल असे त्या म्हणाल्या.
Bengali New Year celebration : बंगाली नववर्षाचा हा सण केवळ एक पारंपरिक उत्सव नाही, तर तो नवउद्यम, नवे स्वप्न आणि नवी आशा घेऊन येतो. आजच्या या सांस्कृतिक समारंभाने आपल्या चंद्रपूरात बहुजनता आणि विविधतेतील एकात्मतेचा सुंदर संदेश दिला आहे. बंगाली नववर्ष साजरा करणारा हा उत्सव केवळ तारखांचा बदल नाही, तर संस्कृती, ऐक्य आणि आनंदाचा अप्रतिम संगम असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Pohela Boishakh event
चांदा पावर ऑफ युथ फाउंडेशन, चंद्रपूरच्या वतीने बंगाली कॅम्प येथे बंगाली नववर्ष ‘पोइला बैसाख’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या प्रसंगी मंचावर मनोज पाल, भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, भाजप नेते प्रकाश देवतळे, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, बलराम डोडाणी, श्री माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयसवाल आदी मान्यवर उपस्थित होते. Bengali festival 2025
यावेळी बोलताना आ. जोरगेवार पुढे म्हणाले की, चंद्रपूरात वास्तव्यास असलेला बंगाली समाज प्रामाणिक आणि कष्टकरी आहे. चंद्रपूरच्या विकासात या समाजाचे नेहमीच भरीव योगदान राहिले आहे. या समाजातून अनेक सामाजिक कार्यकर्ते पुढे आले आहेत. हा समाज नेहमी आमच्या पाठीशी उभा राहिला असून, या समाजातील प्रश्न सोडविण्यास आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. बंगाली कॅम्प, कृष्णा नगर या भागात आपण विकासकामे करत आहोत. पुढेही या भागाच्या विकासासाठी मोठा निधी देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. Bengali community
संस्कृती ही आपली ओळख, आपला जन्मसिद्ध वारसा आहे. आज इथे नृत्य, गायन आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धांमुळे आपण आपल्या सांस्कृतिक परंपरेला नवीन रूप दिले आहे. प्रत्येक कलाकाराने आपल्या कलादानातून भारतवासीयांच्या विविधतेचा अद्भुत मेळ घातला. सर्व समाजबंधूंनी एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करणे हेच खरे बंधुत्वाचे प्रतीक आहे. चांदा पावर ऑफ युथ फाउंडेशनची ही जबाबदारी आणि दूरदृष्टी कौतुकास्पद आहे.
स्थानिक कलाकारांनी दिलेली उत्स्फूर्त कला सादरीकरणे तरुणाईला नव्या आत्मविश्वासाची प्रेरणा देतात. या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून तुमच्यातील प्रतिभेचा उजेड अधिक तेजस्वी बनवायला शिका. तुमचे कलारूपी बीज आज येथे रुजत आहे. आजचा हा दिवस केवळ साजरा करण्यासाठी नसून, आपल्याला एकत्र येऊन सामाजिक सौहार्द दृढ करण्याची आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देणारा आहे, असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली.
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या Jayanti 2025 च्या निमित्ताने Chandrapur येथील आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांनी महामानवांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. या विशेष दिवशी आमदार जोरगेवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या Ambedkar thoughts for youth, Social Justice, आणि Indian Constitution वर भाष्य करत त्यांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्व अधोरेखित केले.
Ambedkar Jayanti Celebration in Chandrapur या कार्यक्रमात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी त्यांनी दिक्षाभूमी विकासासाठी मंजूर ५७ कोटी रुपयांच्या निधीचा उल्लेख करत, Vipassana Center in Bapupeth आणि शहरातील १७ बुद्ध विहारांमध्ये Study Rooms for Buddhist Students उभारण्याच्या उपक्रमांची माहिती दिली.
डॉ. आंबेडकर यांचे विचार Social Equality, Dalit Upliftment, आणि Democracy in India या मूल्यांवर आधारित आहेत आणि आजही ते Inspirational Leader of India म्हणून स्मरणात आहेत.
Ambedkar Jayanti 2025 : चंद्रपूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर येथील त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, समानता आणि बंधुतेच्या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्थेची उभारणी केली. त्यांनी दिलेले भारतीय संविधान हे आपल्या लोकशाहीचा मजबूत आधार असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार म्हणजे सामाजिक परिवर्तनाची मशाल असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंग ठाकुर, अजय जयस्वाल, माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार माजी नगर सेवक रवि गुरनुले, माजी नगर सेविका छबु वैरागडे, पुष्पा उराडे, खुशबु चौधरी, मनोज पाल, जितेश कुळमेथे, राजकुमार आक्कपेल्लीवार, प्रज्ञा बोरगमवार, रंजत ठाकूर, आटो असोसिएशनचे अध्यक्ष मधू राउत, प्रमोद शास्त्रकार, वंदना हातगावकर, सविता दंढारे, विश्वजीत शहा, तपोष डे, हरमन जोसेफ, दिगांबर चिमुरकर, करणसिंग बैस, सुबोध चिकटे, विमल कातकर, आशा देशमूख, निलिमा वनकर, अनिता झाडे, सोनाली आंबेकर, वैशाली मेश्राम, दुर्गा वैरागडे, दिक्षा सातपूते, चंपा बिश्वास, सुजाता कापसे, शालीनी राउत, सपना सातपुते, सविता ब्राम्हणे, भावना बारसागडे, सोनाली ईटनकर, सुषमा तपासे, हेमलता खोब्रागडे, कल्पना दुबे, सुप्रिया सरकार आदिंची उपस्थिती होती.
यावेळी आ. जोरगेवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिक्षा दिलेल्या दिक्षाभुमीचा विकास करण्याचा आपला संकल्प पुर्ण होत असल्याचा आनंद आहे. येथे जवळपास 57 कोटी रुपयांचा निधी आपण उपलब्ध करुन दिला आहे. या कामाचे भुमिपूजन झाले असुन लवकरच या कामाला सुरवात होणार आहे. तर बाबुपेठ येथे आपण भव्य विपश्यना केंद्र तयार करत आहोत. शहरातील 17 बुध्दविहारांमध्ये आपण अभ्यासिका तयार करत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
आजच्या विकसित भारताची पायाभरणी ही बाबासाहेबांच्या दूरदृष्टीने घातली गेली असून, त्यांनी समाजातील वंचित, शोषित घटकांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या कार्यातूनच हे घटक आज मुख्य प्रवाहात समाविष्ट झाले आहेत, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे आजही प्रेरणा देतात आणि सशक्त भारताच्या दिशेने मार्गदर्शन करतात असे ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत अभिवादन केले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात आंबेडकर जयंती साजरी
जैन भवन जवळील आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभेच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला बहाल केलेल्या संविधानामुळेच फुटपाथवर टोपल्या विकणा-या मातेचा मुलगा आमदार झाला असल्याचे ते यावेळी म्हणाले. आता समाजातील प्रत्येक दुर्लक्षित घटकाला न्याय देण्याचे काम आपण करत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
आमदार किशोर जोरगेवार यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण अभिवादन!
पंचमुखी हनुमान मंदिराच्या विकासास चालना देणाऱ्या ऐतिहासिक निर्णयामुळे स्थानिक जनता आणि भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. Panchmukhi Hanuman Temple Development News अंतर्गत, आमदार किशोर जोरगेवार यांनी मंदिर परिसरासाठी २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पात भक्तनिवास, सौंदर्यीकरण, आणि भाविकांसाठी मूलभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. पवित्रतेसह पर्यटनाला चालना देणारा हा उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यासाठी एक मोठे पाऊल ठरणार आहे.
Panchmukhi Hanuman Temple Development News : पवनसुत हनुमान म्हणजे निस्वार्थ सेवा, पराक्रम आणि भक्ती यांचे प्रतीक. हा देश नेहमीच सेवाभावी लोकांना स्मरणात ठेवतो. म्हणूनच भारतभर सर्वाधिक मंदिरे हनुमानाचे आहेत. हनुमानांसारखा सेवक होणे हे अत्यंत कठीण, पण प्रेरणादायक आहे. येथून समाजसेवेची प्रेरणा मिळावी यासाठी या संपूर्ण मंदिर परिसराचा विकास २५ कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. यातील पहिल्या टप्प्यातील पाच कोटी रुपये याच आर्थिक वर्षात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. hanuman temple development
पंचमुखी पांढरकवडा हनुमान मंदिर येथील भक्तनिवासाच्या कामाचे शासकीय लोकार्पण रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला सरपंच सुरज तोतडे, उपसरपंच समीर भिवापूरे, मंदिर देवस्थानचे लक्ष्मण सदलावर, कोषाध्यक्ष बाबूराव कुकडे, भाजपचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, रघुवीर अहिर, प्रकाश देवतळे, अजय जयस्वाल, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, बलराम डोडाणी, संजय तिवारी, माजी नगरसेविका छबू वैरागडे, मनोज पाल, वंदना हातगावकर, सविता दंढारे, संतोष नुने, मंदिर समितीचे विश्वस्त सहदेव कोल्हे, आशिष मासिरकर, ईमारान खान उपसरपंच विनोद खवले, प्रज्ञा बोरगमवार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, आज पांढरकवडा येथील पंचमुखी हे पवित्र व ऐतिहासिक हणुमान मंदिर केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उन्नतीचे केंद्र ठरत आहे. येथे भक्तनिवास, परिसर सौंदर्यीकरण, भाविकांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येणार असून, मंदिर परिसराचा समग्र विकास करण्याचा आमचा संकल्प आहे. आपण घुग्घूसला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून दिल्यानंतर येथील विकासाला गती मिळाली आहे. उड्डाणपूल, ग्रामीण रुग्णालय, व इतर मूलभूत सुविधा आता अंतिम टप्प्यात आहेत, असेही आमदार जोरगेवार म्हणाले. kishor jorgewar news
पांढरकडा गावाजवळून जाणारा प्रस्तावित समृद्धी महामार्ग चंद्रपूरच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरेल. मुंबईहून चंद्रपूरला येणाऱ्या पर्यटकांना शहरात प्रवेश करताना पंचमुखी हणुमान मंदिरासमोरूनच यावे लागेल. त्यामुळे या परिसराचे सुशोभीकरण व पर्यटन केंद्र म्हणून विकास करणे ही वेळेची गरज आहे. हे मंदिर सध्या ‘क’ दर्जात असून त्यास ‘ब’ दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले सेवा हीच खरी श्रद्धा आहे. ही सेवा आपल्याला यश, समृद्धी आणि एकतेच्या दिशेने घेऊन जाते. असेही ते यावेळी म्हणाले. या लोकार्पण सोहळ्याला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. परिसरात उत्साही वातावरण पाहायला मिळाले.
“Education is not a luxury – it’s a right! आणि हाच अधिकार मिळवून देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला ‘Amma Ki Padhai’ उपक्रम गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक नवा आशेचा किरण ठरतोय. या उपक्रमांतर्गत आयोजित चाचणी परीक्षेत चंद्रपूर शहरातील जवळपास 3,000 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला, जे मोफत कोचिंग, मार्गदर्शन, आणि शिक्षण साहित्याच्या संधीसाठी उत्सुक आहेत!”
Amma Ki Padhai initiative : शहरातील गरजू, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या अम्मा की पढाई या शैक्षणिक उपक्रमांतर्गत चाचणी परीक्षा रविवारी उत्साहात पार पडली. चंद्रपूर शहरातील चार परीक्षा केंद्रांवर एकूण ३ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
अम्मा की पढाई या उपक्रमाची चाचणी परीक्षा जनता महाविद्यालय, सरदार पटेल महाविद्यालय, एफ.ई.एस. गर्ल्स महाविद्यालय आणि आंबेडकर महाविद्यालय या चार परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेला जवळपास ३ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाची गरज असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून, त्यांना मोफत कोचिंग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शिक्षण साहित्य आणि वेळोवेळी करिअर मार्गदर्शन पुरविले जाणार आहे. free coaching classes in Chandrapur
अम्मा की पढाई हा उपक्रम आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू केला असून, गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम चंद्रपूर शहरातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती. परीक्षेच्या आयोजनासाठी विशेष समिती नियुक्त करण्यात आली. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व इतर सर्व व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. परीक्षेनंतर लवकरच निकाल जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन वर्गात प्रवेश दिला जाईल. free coaching for competitive exams
शहरातील विविध भागांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. शिक्षणाच्या संधी आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या हातून निसटतात, हे जाणूनच आमदार किशोर जोरगेवार यांनी समाजातील शेवटच्या घटकासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. शहरातील शैक्षणिक वातावरण उन्नत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी ‘अम्मा की पढाई’ उपक्रम मोलाची भूमिका बजावत आहे.
या परीक्षेच्या आयोजनात परिक्षा प्रमुख म्हणून आंबेडकर कॉलेजचे उपप्राचार्य संजय बेले यांनी जबाबदारी सांभाळली. परीक्षेचे नियोजन व समन्वयक म्हणून सुमित बेले यांनी काम पाहिले. उपकेंद्र प्रमुख म्हणून सरदार पटेल महाविद्यालयात राज्यकर निरीक्षक निलेश मालेकर, आंबेडकर कॉलेजमध्ये पोलीस उपनिरीक्षक अनिल देरकर, जनता कॉलेजमध्ये नायब तहसीलदार गिरीश बोर्डे, तर एफ.ई.एस. गर्ल्स कॉलेजमध्ये तृपाल कोल्हे यांनी काम पाहिले. परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य प्रमोद कातकर, प्राचार्य राजेश दहेगावकर, प्राचार्य आशिष महाताले, प्राचार्य राजेश चिमनकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
Shehnaz Akhtar live in Chandrapur : आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा तथा श्री माता महाकाली महोत्सव ट्रस्टच्या वतीने महाकाली मंदिर यात्रा परिसरात आयोजित करण्यात आलेला सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला चंद्रपूरकर भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून भक्तीरसात न्हाल्याचा अनुभव घेतला. Shehnaz Akhtar Bhajans
या कार्यक्रमास आमदार किशोर जोरगेवार, सत्कारमूर्ती जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, उपविभागीय अधिकारी संजय पवार, महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल, तहसीलदार विजय पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खेवले, शहर अभियंता विजय बोरीकर, सिटी पोलीस स्टेशनच्या निरीक्षक प्रभावती एकुरके, रामनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक आसिफ रजा, वाहतूक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील, वेकोलीचे क्षेत्रीय महाप्रबंधक,
विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता व सहाय्यक अभियंता, एस.टी. महामंडळाच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे, महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता रविंद्र हजारे, प्रभारी उप-अभियंता आशीष भारती, शहर स्वच्छता निरीक्षक डॉ. अमोल शेळके, नगर रचनाकार राहुल भोयर, सहाय्यक नगर रचनाकार प्रतीक देवतळे, सुरक्षा अधिकारी राहुल पंचबुद्धे, सहाय्यक अभियंता शुभांगी सूर्यवंशी, नगर सचिव नरेंद्र बोबाटे, यांत्रिकी विभाग प्रमुख रविंद्र कळंबे, पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता सोनुजी थुल, विद्युत विभागाच्या उपअभियंता प्रगती भुरे, सिस्टम मॅनेजर अमोल भुते, भांडारपाल सिद्दीकी शेख, झोन क्र. ३ चे सहाय्यक आयुक्त संतोष गर्गेलवार, आणि झोन क्र. १ चे सहाय्यक आयुक्त अक्षय गडलिंग, अतिक्रमण विभागाचे मनिष शुक्ला यांची उपस्थिती होती. यात्रेत उत्तम व्यवस्था केल्याबद्दल या सर्व अधिकाऱ्यांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले की, सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे समाजात आध्यात्मिक सकारात्मकता निर्माण होते. अशा उपक्रमांद्वारे चंद्रपूरमध्ये भक्ती आणि संस्कृती यांचे संतुलन राखले जात आहे. यंदा यात्रा परिसरात प्रशासनाच्या सहकार्याने आपण उत्तम व्यवस्था उभी करू शकलो. यात्रा परिसराचा विस्तार केल्यामुळे भाविकांना राहण्याची सोय झाली. पिण्याच्या पाण्याची, पूजा साहित्य खरेदीची, आंघोळीची, चेंजिंग रूमची व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आली. यात्रेकरूंच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. Bhajan Sandhya Event
या वर्षीच्या यात्रेचे आयोजन विशेष ठरले. प्रशासनाच्या सक्रिय सहकार्यामुळे यात्रा परिसरात पूजा साहित्य विक्रीसाठी दुकाने, अन्नदान वितरण व्यवस्था, आणि भाविकांसाठी मार्गदर्शक स्वयंसेवक यामुळे संपूर्ण यात्रा शिस्तबद्ध आणि सुसंगठित झाली. ही सर्व व्यवस्था करताना जनतेच्या गरजा केंद्रस्थानी ठेवण्यात आल्या. त्यामुळे भाविकांचा चेहरा आनंदी आणि समाधानी दिसत होता, हीच आपल्या प्रयत्नांची खरी पावती असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. Bhakti Geet Program
शहनाज अख्तर यांच्या सुमधुर आवाजात सादर झालेल्या संतवाणी, भक्तिगीते आणि भावगीतांनी संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी अल्पावधीत सदर व्यवस्था उभारण्यात आल्याचे सांगितले. पुढील वर्षी यापेक्षाही अधिक चांगली व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला मनीष महाराज, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, रघुवीर आहिर, प्रकाश देवतळे, तुषार सोम, मनोज पाल, श्री माता महाकाली महोत्सवचे सचिव अजय जयस्वाल, कोषाध्यक्ष पवन सराफ, माजी नगरसेविका छबू वैरागडे, पुष्पा उराडे, वंदना तिखे, माजी नगरसेवक बलराम डोडाणी, मोनू चौधरी, प्रदीप किरमे, राजेंद्र अडपेवार, पुरुषोत्तम राऊत, कल्पना बबूलकर, श्री माता महाकाली महोत्सव समितीचे विश्वस्त वंदना हातगावर, सविता दंढारे, श्याम धोपटे, चंदू वासाडे, अजय वैरागडे, संजय बुरघाटे, रूपेश भुते, रंजन ठाकूर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा जीवनकर यांनी केले.
Kshatriya Mali Samaj : महात्मा फुले हे केवळ नाव नाही, तर सामाजिक परिवर्तनाची एक अखंड ज्वाळा आहेत. त्यांनी शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय या तत्त्वांना समाजाच्या केंद्रस्थानी आणले. आज ४० लाख रुपये आमदार निधीतून क्षत्रिय माळी समाज भवनाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन होत आहे. ही जागा समाजाच्या भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शन करणारी ठरेल, नव्या विचारांचे केंद्र बनेल, आणि सामाजिक ऐक्य वाढवणारी भूमी ठरेल. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ही समाजाला विकासाची भेट असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांनी उपलब्ध करून दिलेल्या ४० लाख रुपयांच्या स्थानिक आमदार निधीतून क्षत्रिय माळी समाज भवनाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. आज गुरुवारी या कामाचे भूमिपूजन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक नंदू नागरकर, क्षत्रिय माळी सेवा मंडळाचे अध्यक्ष राजू बनकर, भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, अमोल शेंडे, क्षत्रिय माळी सेवा मंडळाचे उपाध्यक्ष धनंजय वासेकर, सागर वासेकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. Community hall renovation ideas
यावेळी पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूर मतदारसंघाच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. शहराचा शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्यावर आमचा भर आहे. हे विकासकार्य सुरू असताना प्रत्येक समाजाला सक्षम करण्याचे कामही आमच्या वतीने केले जात आहे. समाज बांधवांकडे स्वतःच्या हक्काचे भवन असावे यासाठी शहरी भागासह ग्रामीण भागातही समाज भवन निर्मितीवर भर दिला आहे. आता क्षत्रिय माळी समाज भवनाचे नूतनीकरण करण्यासाठी निधी देता आला याचा आनंद आहे.
महात्मा फुले हे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. शोषित, वंचित आणि मागासलेल्या घटकांसाठी त्यांनी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. आमदार निधी अंतर्गत ४० लाख रुपयांची तरतूद करून क्षत्रिय माळी समाज भवनाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. समाजासाठी ही जागा एक महत्त्वाची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख आहे. येथून अनेक उपक्रम, एकत्र येणं, आणि भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शन होणार आहे. या माध्यमातून प्रत्येक समाजघटकाला न्याय मिळावा, संधी मिळावी, आणि त्या संधींच्या माध्यमातून विकासाची वाट मोकळी व्हावी. असेही आमदार जोरगेवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी माळी समाज युवा मंचाचे अध्यक्ष सागर वानखेडे, सचिन निंबाळकर, अभिजीत मारोतकर, कार्तिक वानखेडे, भालचंद्र दानव, शैलेश इंगोले, आशुतोष वानखेडे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
kishor jorgewar land donation : जेव्हा पक्ष नव्हता, सत्ता नव्हती आणि संधीसुद्धा नव्हती, अशा काळात या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यांनी केवळ विचारांवर विश्वास ठेवून, रात्रंदिवस झटून पक्षाचे बीज रुजवले. त्यांच्या निष्ठा, समर्पण आणि निःस्वार्थ सेवेमुळेच आज भारतीय जनता पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. आज पक्षाच्या स्थापना दिनी होत असलेला ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान केवळ औपचारिकता नाही, तर ही आपल्या अंतःकरणातील कृतज्ञतेचे खरे प्रतीक आहे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त, भारतीय जनता पक्ष चंद्रपूर विधानसभा विभागाच्या वतीने श्री माता कन्यका सभागृहात ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पक्षाच्या शेकडो ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार जोरगेवार बोलत होते. BJP senior workers honor ceremony
यावेळी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर (hansraj ahir), भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस, ज्येष्ठ नेते रमेशचंद्र बागला, विजय राऊत, माजी महानगराध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश देवतळे, अशोक जिवतोडे, अजय जयस्वाल, तुषार सोम, रघुवीर अहिर, मनोज पाल, राजेंद्र अडपेवार, माजी नगरसेवक देवानंद वाढई, माजी नगरसेविका वनिता डुकरे, वंदना हातगावकर, सविता दंढारे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यानंतर बोलताना आ. जोरगेवार म्हणाले, पक्षासाठी निष्ठेने आणि समर्पण भावनेने काम करणाऱ्या आपल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचा हा पवित्र प्रसंग आहे. या माध्यमातून पक्षाच्या वाटचालीत योगदान दिलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आदरभावनेचा नम्र नमस्कार करण्याचा हा सोहळा आहे. भारतीय जनता पक्ष ही केवळ राजकीय संघटना नसून एक विचारधारा आहे. Political leaders honoring ceremony
राष्ट्रवाद, पारदर्शक प्रशासन, विकासाची निष्ठा आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा निर्धार, या विचारधारेचे बीज आपल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पेरले, जपले आणि रुजवले. त्यांच्यामुळेच आज पक्ष देशात आणि राज्यात बळकटपणे उभा आहे. पक्षासाठी केवळ निवडणुकीत नव्हे, तर प्रत्येक संकटात, प्रत्येक लढ्यात खंबीरपणे उभे राहणारे हे ज्येष्ठ कार्यकर्ते आपल्यासाठी आदर्श आहेत. BJP foundation day celebrations
भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस हा संघर्ष, समर्पण आणि निष्ठेची आठवण करून देणारा दिवस आहे. आज आपण ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करतो आहोत. ते केवळ कार्यकर्ते नसून पक्षाच्या मूळ पाया आहेत. त्यांनी पक्ष नसताना झेंडा घेतला, जनतेपर्यंत विचार पोहोचवले, अनेक वेळा संघर्ष केला. त्यांचे योगदान कधीही शब्दांत मावणारे नाही. सत्ता असो वा नसो, कार्यकर्त्यांनी पक्षासाठी खांद्याला खांदा लावून काम केले आहे. त्यांचा समर्पणभाव खरोखर वंदनीय आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. Veteran BJP workers felicitation
यावेळी बोलताना राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी ज्येष्ठ कार्यकर्ते हे पक्षाची खरी ताकद आहेत. त्यांच्या त्यागातूनच हा पक्ष उभा राहिला आहे व पुढे जात आहे, असे सांगितले. तर ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांनी आयोजनाचे कौतुक करताना जनसंघापासूनच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. आणीबाणीच्या काळात कारागृह सोसले. हाच पक्ष जुन्या कार्यकर्त्यांच्या विचारांवर उभा राहिला आहे. हा पक्ष नेत्यांचा नसून कार्यकर्त्यांचा असल्याचे सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना भोजनासाठी मानाच्या पंगतीत बसवून आदरभाव व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाईव्ह संबोधन कार्यकर्त्यांना दाखवण्यात आले. पक्षाचा झेंडा लहरवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. स्वर्गवासी कार्यकर्त्यांना यावेळी नमन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्याम हेडाऊ यांनी केले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. BJP foundation day celebrations
पक्षाच्या भवनासाठी एक एकर जागा – आमदार किशोर जोरगेवार यांची घोषणा भाषणात बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, शहरात पक्षाचे कार्यक्रम घेण्यासाठी स्वतःच्या हक्काचे भवन नाही, ही खंत आहे. त्यामुळे मी स्वतःच्या मालकीची एक एकर जागा भारतीय जनता पक्षाच्या भवनासाठी देण्याची घोषणा करतो. यामध्ये कार्यकर्त्यांच्या निवासाचीही सोय करू असे ते म्हणाले.
Kishor Jorgewar BJP Chandrapur program : भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाकडून प्रत्येक आमदारांना आपल्या मतदारसंघात कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar)यांनी भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन कन्यका सभागृहात केले आहे. या कार्यक्रमाला माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) उपस्थित राहणार का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे दोन गट सक्रिय असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. याचाच प्रत्यय भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पुन्हा एकदा आला आहे. स्थापना दिन साजरा करण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालयात पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तर आमदार किशोर जोरगेवार यांनी श्री माता कन्यका सभागृहात भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. विशेष म्हणजे, सुधीर मुनगंटीवार यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“भाजप स्थापना दिनी चंद्रपूरात दोन कार्यक्रम – मुनगंटीवार आणि जोरगेवार आमने-सामने?”