Tag: आमदार किशोर जोरगेवार

  • Kishor Jorgewar on Indian Army । देशगौरवासाठी पक्ष, धर्म, भाषा, जात विसरून एकत्र येणे हेच भारतीयत्वाचे खरे दर्शन – आ. किशोर जोरगेवार

    Kishor Jorgewar on Indian Army

    Kishor Jorgewar on Indian Army : चंद्रपूर – भारतीय सैन्य हे केवळ रणांगणावर लढणारे शूर योद्धे नाहीत, तर प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणेचा स्रोत आहेत. त्यांचे शौर्य, त्यांची निःस्वार्थ सेवा आणि मातृभूमीबद्दलची निष्ठा हीच खरी देशभक्ती आहे. १४० कोटी भारतीयांचा पाठिंबा सैन्याचा आत्मविश्वास वाढवतो. आज आपण पक्ष, धर्म, भाषा, जात विसरून एकत्र आलो आहोत, हेच भारतीयत्वाचे खरे दर्शन असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    चंद्रपुरात होणार महापंचायत

    चंद्रपुरात शौर्य उत्सव

    भारतीय सैन्य दलाच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने गांधी चौकातील महानगरपालिकेच्या पटांगणावर वंदन भारतीय सैन्याच्या शौर्याला या राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत भारतीय सैन्याला सामूहिक वंदन केले. यावेळी आमदार जोरगेवार बोलत होते. Kishor Jorgewar Indian Army salute Chandrapur

    कार्यक्रमास मनीष महराज, पास्टर बिपीन, जामा मस्जिद चे मौलाना इमाम दिलशाद रजा, माजी सैनिक अश्विन दूर्गे, रोषण अलोणे, ओबीसी नेते अशोकराव जीवतोडे, कॉंगेसचे माजी नगर सेवक नंदुजी नागरकर, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष बंडूजी हजारे, जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख, दशरथसिंह ठाकूर, माजी महापौर अंजली घोटेकर, माजी उपमहापौर अनिल फुलझले, तुषार सोम, प्रकाश देवतळे, सुभाष कसान कासनगोट्टूवार, राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या चारुशीला बारसागडे, भाजपचे माजी नगर सेवक राहुल घोटेकर, नामदेव डाहुले, बंटी घाटे, गुरुदेव सेवा मंडळाचे दादाजी नंदनवार  मिलिंदजी गंपावार, भाजपचे माजी नगर सेवक राहुल घोटेकर,  पंडित मथुराप्रसाद पांडे, नळे, माजी सैनिक राजेंद्र भोयर, माजी सैनिक गोविंदा डोमकावळे, माजी सैनिक धोंडुबा सपाट, माजी सैनिक मदन देशकर, माजी सैनिक अरुण मालेकर, मधुसूदन रुंगठा, संजय बोरघाटे, वाणी राव, अनिल समर्थ आदींची मंचावर उपस्थिती होती.

    भारतीय सैन्य हि आपली सुरक्षा

    यावेळी पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले, आज आपण केवळ एक भावना, एक श्रद्धा आणि एक अभिमानाने भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करणारे, कठीण हवामानातही ताठ मानेने उभे असलेले, प्रत्येक संकटात देशवासीयांचा जीव मोलाचा मानणारे भारतीय जवान आपल्या देशाचे खरे हिरो आहेत. भारतीय सेना ही केवळ एक लष्करी शक्ती नाही, ती आपली अस्मिता आहे, आपली सुरक्षा आहे आणि आपले अभिमानाचे प्रतीक आहे. Chandrapur citizens salute Indian soldiers

    Indian Army honor ceremony Chandrapur

    आजच्या कार्यक्रमात सर्व धर्मीय आणि सर्व पक्षीय लोक एकत्र आले आहेत. हाच खरा भारत आहे. विविधतेत एकता आणि राष्ट्रप्रेम हाच आपल्या संस्कृतीचा पाया असून, हाच देशाचा गौरव आहे. देशासाठी लढणारा जवान जात, धर्म, पक्ष, प्रांत याच्या पलीकडे जातो. त्याला फक्त भारत माता दिसते. भारतीय सैन्याच्या पराक्रमामुळेच आपण शहरात आणि गावात सुरक्षित आहोत. त्यांच्या बलिदानाची परतफेड कधीच शक्य नाही, पण त्यांच्या कार्याला अभिवादन करणे हे आपले कर्तव्य आहे, सैन्याने केवळ सीमारेषा सुरक्षित ठेवल्या नाहीत, तर आपल्याला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. Chandrapur patriotic event honoring soldiers

    त्यांच्या योगदानाची आठवण फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला झाली तर ती पुरेशी नाही. ही कृतज्ञता आपल्याला दररोज जगायला हवी. असेही ते म्हणाले. या कार्यक्रमात माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी विविध धर्मीय आणि सर्व पक्षीय नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अमजद खान यांनी आभार  प्रदर्शन केले तर प्रज्ञा जीवनकर यांनीसूत्र संचलन केले. 

  • Chandrapur political situation । आता रंगत येणार! चंद्रपुरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!

    Chandrapur political situation

    Chandrapur political situation : येत्या ४ महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत निवडणूक कार्यक्रम जाहीर करा असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आजची राजकीय परिस्थिती वेगळी असल्याने एकाच पक्षाचे झालेले २ भाग या निवडणुकीत रंगत आणणार आहे. मागील ३ वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील महानगरपालिका व जिल्हा परिषद व नगरपालिका मध्ये प्रशासक बसल्याने निवडणूका आरक्षण मुळे लांबणीवर गेली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. Political parties Chandrapur municipal corporation election

    चंद्रपूर ॲक्शन मोडमध्ये! शालेय वाहतुकीतील धोके टाळण्यासाठी कडक उपाययोजना!

    चंद्रपूर जिल्ह्यात १ महानगरपालिका, जिल्हा परिषद, ८ नगरपालिका व १५ पंचायत समित्या आहे.

    चंद्रपूर महानगरपालिकेत पक्षीय बलाबल मध्ये भाजपची आघाडी होती, १७ प्रभागात ६६ नगरसेवकांची सदस्य संख्या असलेल्या महानगरपालिकेत भाजप ३६, कांग्रेस १२, राष्ट्रवादी कांग्रेस २, शिवसेना २ , बसपा ८, मनसे २ व अपक्ष ४ अशी सदस्यसंख्या होती. राज्यातील राजकीय उलथापूलथीमध्ये नगरसेवक विविध पक्षात दाखल झाले आहे. Chandrapur district council election political analysis

    चंद्रपूर जिल्हा परिषद एकूण जागा ५६, पक्षीय बलाबल भाजप ३३, कांग्रेस २० इतर ३.

    चंद्रपूर जिल्ह्यात एकूण नगरपालिका ८ आहे ज्यामध्ये बल्लारपूर, राजुरा, वरोरा, भद्रावती, चिमूर,मूल,ब्रह्मपुरी व नव्याने घुग्गुस नगरपालिकेचा समावेश झाला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५ भाजप तर १ जागेवर कांग्रेसचे विजय झाला असून भाजपसाठी सध्याची परिस्थिती अनुकूल आहे. चंद्रपूर महानगरात नागरिक पाणी समस्येने त्रस्त असून यावर अजूनही तोडगा निघालेला नाही त्यामुळे चंद्रपुरात निवडणूक अटीतटीची होणार अशी चिन्हे आहे.

    राजकीय स्थिती

    चंद्रपूर शहरात भाजपची सध्याची परिस्थिती बिकट अवस्थेत आहे, भाजपच्या २ आमदारांमध्ये विधानसभा क्षेत्रावरून कोल्ड वार सुरु आहे, मात्र आमदार किशोर जोरगेवार भाजपची नैया पार लावणार अशी चित्रे आहे. चंद्रपुरात अमृत व भूमिगत गटार योजनेच्या खोदकामावरून नागरिक प्रचंड नाराज आहे. रस्ते बनल्यावर वारंवार ते खोदल्या जात असून वाहतुकीची समस्या बिकट परिस्थितीमध्ये जात आहे त्यामुळे धुळीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

    शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस चे विभाजन झाल्यावर पाहल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेना व राष्ट्रवादी आमने सामने येणार, विशेष बाब म्हणजे या दोन्ही पक्षाची परिस्थिती जिल्ह्यात पूर्णतः मजबूत नाही..परिस्थिती जैसे थे आहे.

  • chandrapur bjp mla news । गांधी चौकात जल्लोष! चंद्रपूर भाजपने जातीनिहाय जनगणना निर्णयाचे केले स्वागत!

    chandrapur bjp mla news

    chandrapur bjp mla news : चंद्रपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेला जातिनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय फक्त आकड्यांचा विषय नाही, तर समाजाच्या प्रत्येक घटकाला ओळख देणारा, त्यांच्या गरजांवर केंद्रित धोरणे आखणारा आणि सामाजिक समतेकडे नेणारे एक क्रांतिकारी पाऊल आहे. समाजातील वंचित, मागास घटकांना त्यांचे प्रतिनिधित्व, त्यांची संख्या आणि त्यांच्या अडचणी दिसून येण्यासाठी ही जनगणना आवश्यक होती, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. caste census laddu celebration

    महावितरणच्या नाट्यकुंभात रंग बावरी ने मारली बाजी

    गांधी चौकात जल्लोष

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेल्या जातिनिहाय जनगणनेच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शहरातील गांधी चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लाडू वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला. या प्रसंगी आमदार जोरगेवार बोलत होते.

    या कार्यक्रमात राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, विजय राऊत, भाजप नेते अशोक जिवतोडे, अनिल फुलझेले, माजी शहराध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, प्रकाश देवतळे, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, नामदेव डाहुळे, मनोज पाल, राजू अडपेवार, माजी नगरसेविका छबू वैरागडे, वंदना तिखे, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, माजी नगरसेविका शीतल आश्राम, अरुण तिखे, बलराम डोडाणी, प्रवीण गिलबिले, अमोल शेंडे, वंदना हातगावकर, सविता दंढारे, सायली येरणे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

    आता समतोल विकास

    यावेळी पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, भाजप सरकारने हे ऐतिहासिक पाऊल उचलून ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या घोषवाक्याला खरी दिशा दिली आहे. जातिनिहाय जनगणना ही केवळ न्यायाची सुरुवात नाही, तर ती समतेकडे नेणारी वाट आहे. या निर्णयामुळे केंद्र व राज्य सरकारांना समाजातील प्रत्येक घटकाला योजनांमध्ये योग्य स्थान देणे, निधीचे योग्य वाटप करणे आणि समतोल विकास साधणे शक्य होणार आहे. gandhi chowk chandrapur event

    gandhi chowk chandrapur event

    गांधी चौक येथे करण्यात आलेला लाडू वाटपाचा जल्लोष ही फक्त आनंदाची प्रतिक्रिया नाही, तर सामाजिक न्यायाच्या दिशेने असलेली बांधिलकीची प्रतिक्रिया आहे. आता आपली जबाबदारी वाढली आहे. हा निर्णय समाजात समता निर्माण करण्यासाठी, गरजूंपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने समाजहित साधण्यासाठी उपयोगी ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

    जनहिताचा निर्णय – हंसराज अहिर

    यावेळी बोलतांना राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर म्हणाले की, राष्ट्रीय ओबीसी आयोगाच्या माध्यमातून आम्ही शासनाला जातिनिहाय योग्य आकडेवारी सादर केली होती. त्याचा परिणाम म्हणून पश्चिम बंगालमधील अनेक बोगस जाती रद्द करण्यात आल्या आहेत. आता कर्नाटकमध्येही आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार जनहिताचे निर्णय घेत आहेत. कार्यक्रमाच्या समारोपात नागरिकांना लाडूचे वाटप करून केंद्र सरकारच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Kishor Jorgewar supports caste census initiative । किशोर जोरगेवार: जातीय जनगणना समाजातील वंचित घटकांना न्याय देईल

    Kishor Jorgewar supports caste census initiative

    पडोली आणि घुग्घूस मध्ये लाडू वाटपाने जल्लोष; मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत

    Kishor Jorgewar supports caste census initiative : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेला जातीय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय हा समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा, सर्वसमावेशक विकासाला चालना देणारा आणि सामाजिक समतोल प्रस्थापित करणारा आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पडोली आणि घुग्घूस येथे लाडू वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. BJP celebrates caste census decision in Chandrapur

    रेल्वे अतिक्रमण धारकांना दिलासा मिळणार

    या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष दशरथ ठाकूर, नेते नामदेव डाहुळे, प्रकाश देवतळे, संजय तिवारी, नीता चौधरी, इमरान खान, राकेश पिंपळकर, दयानंद नागरकर, आशिष मासिरकर, आशिष वाढई, सुभाष पिंपळकर, विजय आगरे, अजय कार्लेकर, रमेश बुच्चे, रमाकांत बलकी, सुरेश पिदुरकर, डॉ. दशरथ झाडे, दुर्गा बावणे, मीना मानुसमारे, रजनी ढुंगणे, ममता मोरे, शितल कोटा, नकुल वासमवार, कोसारा गावचे माजी सरपंच गुड्डू सिंग, उषा आगदारी, सुचिता लुटे, अनिल बाम, श्याम आगदारी, महेश डोंगरे, निरीक्षण तांड्रा, संतोष नुने, जय मिश्रा आदींची प्रमुख उपस्थिती होती. Caste census celebration in Padoli and Ghugghus

    bjp leaders distribute sweets for caste census approval

    बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, जातीय जनगणनेच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकाला ओळख मिळणार असून त्यांच्या अडचणी व गरजा समजून घेऊन योजनांची आखणी करता येणार आहे. आजवर अनेक सरकारांनी जातीवर आधारित आकडेवारीची मागणी फक्त घोषणा आणि आश्वासनांपुरती मर्यादित ठेवली. मात्र केंद्रातील भाजप सरकारने प्रत्यक्षात हे पाऊल उचलून समाजातील वंचित, शोषित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याची दिशा स्पष्ट केली असल्याचे ते यावेळी म्हणाले.यावेळी ‘मोदी सरकार जिंदाबाद’, ‘सामाजिक न्यायाचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.कार्यक्रमात नागरिकांना लाडू वाटप करून निर्णयाचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Kishor Jorgewar social initiatives । किशोर जोरगेवार यांच्या सामाजिक कार्यामुळे दिव्यांग मुलांना मिळाली सशक्तता

    Kishor Jorgewar social initiatives

    Kishor Jorgewar social initiatives : चंद्रपूर – आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला हक्काचे स्थान मिळाले पाहिजे. बौद्विक दिव्यांग मुले ही आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहेत. त्यांच्या आयुष्यात आनंद, आत्मसन्मान आणि स्वतंत्रतेची भावना निर्माण करणे, ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने हातात हात घालून या कार्यात सहभागी होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Support for disabled children

    आमदार जोरगेवार मुले पहलगाम मधील कुटुंब परतले

    श्री साई मतिमंद शिक्षण संस्था, चंद्रपूर द्वारा संचालित स्विकार दुर्बल मनस्कर (मतिमंद) मुलांची निवास शाळा, ताडाळी येथे मार्गदर्शन शिबिर आणि बस लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला रेखाजाई पिंपळशेंडे, अ‍ॅड. अभय पाचपोर, समाजकल्याण विभागाचे उपयुक्त राजेशजी पांडे, डॉ. दिलीप चौधरी, शाश्वत शेरे, शेरे, नंदकुमार फुले, जैन, मुधोळकर, वैभव सनास्कर, नलगंटिवार, अमोल मारुतकर आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, “श्री साई मतिमंद शिक्षण संस्था ज्या प्रकारे या मुलांच्या विकासासाठी कार्यरत आहे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. केवळ शिक्षणच नव्हे, तर प्रेम, सहकार्य आणि योग्य दिशा या मुलांसाठी येथे दिली जात आहे. आजच्या या कार्यक्रमात नव्या बसचे लोकार्पण करण्यात आले आहे. ही बस या मुलांसाठी केवळ वाहतुकीचे साधन नसून त्यांच्या स्वप्नांना गती देणारे साधन ठरेल. शिक्षणाचा आणि विकासाचा हा प्रवास अधिक सुलभ व सुरक्षित व्हावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. Mental disability education programs

    या मुलांसाठी केवळ भौतिक सुविधा पुरवणे पुरेसे नाही, तर त्यांना प्रेमाने, मायेने समजून घेऊन जगण्याची संधी देणे आवश्यक आहे. आम्हीही येथे आवश्यक त्या सर्व मदतीसाठी कटिबद्ध आहोत. ही मुले समाजाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांना वेगळे न मानता, त्यांच्या गरजांनुसार विशेष प्रेम, काळजी आणि संधी देणे, ही प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी आहे असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Chandrapur water conservation movement । चंद्रपूरमध्ये जलरथाचा शुभारंभ; तलाव व नाल्यांचे होणार पुनरुज्जीवन

    Chandrapur water conservation movement

    Chandrapur water conservation movement : (चंद्रपूर) महाराष्ट्र शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तसेच ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या योजनेचा गावागावात जाऊन प्रचार-प्रसार तसेच जनजागृतीसाठी करणार्‍या जलरथाचे उद्घाटन ( चंद्रपूर विधानसभा आमदार) श्री किशोर भाऊ जोरगेवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
    या वेळी महासचिव सकल जैन समाज चंद्रपूर –संदीपजी बांठिया, भारतीय जैन संघटनेचे विदर्भ अध्यक्ष गौतमजी कोठारी , सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय कोठारी, बिजेस जिल्हाध्यक्ष दिपेंद्र भाई पारेख, जिल्हा सदस्य अनिकेत लूनावत, जिल्हा सचिव ऋषभ सकलेचा, सामाजिक कार्यकर्ते मोहित मोदी, तसेच भारतीय जैन संघटनेचे जिल्हा समन्वयक दीक्षांत जी बेले आदी मान्यवर उपस्थित होते. Pond rejuvenation scheme Maharashtra

    आमदार जोरगेवार मुळे पहलगाम मध्ये अडकलेले ते कुटुंब चंद्रपुरात परतले

    सदरील योजनेद्वारे शासन गावागावांतील तलावांमधील गाळ काढून त्यांचे पुनरुज्जीवन करणार आहे. गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च शासन करणार असून यासाठी पूर्ण राज्यात एकच दर निश्चित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत किंवा पात्र स्वयंसेवी संस्थेला या कामासाठी अर्ज करून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या पद्धतीनुसार काम करता येईल. तसेच तलावातून काढलेला गाळ शेतात टाकण्यासाठी अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी, विधवा, अपंग शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून निश्चित दरानुसार अनुदानही दिले जाणार आहे. BJS water conservation initiative

    BJS water conservation initiative


    शासनाची ही योजना गावागावात पोहोचवणे, शेतकर्‍यांना गाळ घेऊन जाण्यासाठी प्रोत्साहन देणे, जनजागृती करून जनआंदोलन उभे करणे, मागणी अर्ज निर्माण करणे तसेच ‘गाळमुक्त धरण’ हे टेक्नॉलॉजी पोर्टल तयार करण्यासाठी भारतीय जैन संघटना (बीजेएस) आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्या अनुषंगाने जलरथाची निर्मिती करण्यात आली असून तो जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जाऊन या योजनेचा प्रचार-प्रसार करणार आहे.


    या योजनेत सहभागी होण्यासाठी सरपंचांनी आपल्या गावांचा मागणी अर्ज ‘बीजेएस डिमांड अॅप’वर ऑनलाइन भरावा. बीजेएसने सर्व जिल्ह्यात नेमलेले प्रशिक्षित जिल्हा समन्वयक तसेच महाराष्ट्रातील बीजेएसचे हजारो कार्यकर्ते हे बीजेएसच्या माध्यमातून शेतकर्‍यांना, ग्रामपंचायतींना, तालुका-जिल्हा प्रशासनाला सहयोग करण्यासाठी सज्ज आहेत. या योजनेच्या जनजागृतीसाठी ‘सुहाना स्पाइसेस’ यांनी बीजेएसला सहकार्य केले आहे.

    योजनेची सर्व माहिती ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ म्हणजेच www.shiwaar.com या शासनाच्या पोर्टलवर दिली आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गावांनी तलावातील गाळ काढण्यासाठी, नाला खोलीकरण-रुंदीकरणासाठी त्वरित अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान बीजेएस च्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

  • Dhanora dam project । धानोरा बंधाऱ्याच्या प्रकल्पाला गती! आमदार किशोर जोरगेवारांचा मोठा पुढाकार

    Dhanora dam project

    Dhanora dam project : चंद्रपूर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या धानोरा बंधाऱ्याच्या संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांच्या वतीने नागपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह कार्यकारी संचालक श्री. राजेश सोनटक्के, मुख्य अभियंता श्री. रवी पराते, अधीक्षक अभियंता श्री. माधव कदम, कार्यकारी अभियंता वऱ्हाडे साहेब तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. Dhanora irrigation scheme

    ताडोब्यातील वाघांना उन्हाच्या झळा, सफारीचे वेळापत्रक बदलले

    या बैठकीत प्रस्तावित धानोरा बंधाऱ्याच्या कामाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या सुरुवातीला धानोरा बंधाऱ्याच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रकल्पाच्या आगामी टप्प्यातील कामकाज, तांत्रिक अडचणी, डीपीआरच्या अंतिम प्रक्रियेबाबत सखोल चर्चा झाली. डीपीआर अंतिम करून लवकरच हाय पावर कमिटीकडे प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते प्रकाश देवतळे, मनोज पाल, कारण नायर आदींची उपस्थिती होती. 

    बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कोणतीही ढिलाई होऊ नये यावर जोर दिला. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना कामाला गती देण्याच्या ठोस सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी दिल्या. धानोरा बंधारा प्रकल्प हा केवळ सिंचनाची गरज भागवणारा प्रकल्प नसून, परिसरातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवणारा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Chandrapur irrigation project

    सदर बंधाऱ्याच्या कामाला गती देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी सातत्याने प्रयत्न सुरू केले आहेत. सदर विषयावर अनेकदा अधिवेशनात आवाज उठवत त्यांनी या महत्त्वाच्या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. परिणामी, या प्रकल्पाच्या डीपीआरसाठी ५ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.

    धानोरा बंधाऱ्याच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होईल, तसेच गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होईल. त्यामुळे या प्रकल्पाला वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले. ही बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली असून कामाला गती देण्यासंदर्भातील अनेक मोठे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. सदर बैठकीस संबंधित अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.

  • Municipal water supply solutions । इरई नदीचा गाळ उपसून शहराला पाणी! आमदार जोरगेवार यांनी सुचविला उपाय

    Municipal water supply solutions

    Municipal water supply solutions : शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत एक बैठक पार पडली. इरई नदीतील गाळ उपसा तसेच शहरातील विविध मूलभूत सुविधा आणि पायाभूत कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीत पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी महत्त्वपूर्ण सूचना मनपा प्रशासनाला दिल्या.

    १ मे पासून चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अभियान

    या बैठकीस मनपा आयुक्त विपिन पालिवाल, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, स्वच्छता विभागाचे निरीक्षक डॉ. अमोल शेडकी, बांधकाम विभागाच्या अभियंता वैष्णवी रिठे, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, तुषार सोम, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, माजी नगरसेविका छबू वैरागडे, कल्पना बबूलकर, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, श्याम कनकम, राजेंद्र अडपेवार, अरुण तिखे, वंदना हातगावकर, सुरेश तालेवार, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा बोरगमवार, करणसिंग बैस, करण नायर, विनोद अनंतवार आदी उपस्थित होते.

    शहर व परिसरातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर इरई नदीतील गाळ उपसा हे एक महत्त्वाचे काम ठरत असून, या कामाच्या प्रगतीचा व अडचणींचा सविस्तर आढावा आमदार किशोर जोरगेवार यांनी या बैठकीत घेतला. बैठकीदरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून गाळ उपसण्याची सद्यस्थिती, यंत्रसामुग्रीची उपलब्धता आणि कामाचा कालावधी याबाबत सविस्तर माहिती घेतली. कामात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी आवश्यक ती मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. River dredging for irrigation

    शहरातील काही भागांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार जोरगेवार यांनी टँकरद्वारे सातत्यपूर्ण पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. झोननिहाय पाणीवाटप अधिक कार्यक्षम पद्धतीने होण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच पाण्याच्या टाक्या आणि टँकरच्या स्थान निश्चितीचे काम तातडीने पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला यावेळी देण्यात आले. Sustainable urban water management

    परिसरातील रस्ते व बांधकामाच्या कामांची सविस्तर समीक्षा करताना, या प्रकल्पांना गती देण्याची गरज आमदार किशोर जोरगेवार म्हणाले केली. शहराच्या स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी दूर करताना डिव्हायडर देखभाल, फुलझाडे लावणे यांसारख्या सौंदर्यीकरण च्या उपक्रमांना अधिक गती देण्यावरही भर देण्यात आला. प्रशासनाने नागरिकांच्या समस्या तातडीने आणि प्रभावीपणे सोडवाव्यात, अशा सूचना यावेळी आमदार जोरगेवार यांनी केल्यात. या बैठकीला संबधित अधिकारी आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

  • Pahalgam tourist rescue operation​ । पहलगाममध्ये अडकलेले चंद्रपूरचे पर्यटक; आमदार जोरगेवारांची तातडीने मदत

    Pahalgam tourist rescue operation​

    पहलगाम हल्ल्यानंतर चंद्रपूरच्या नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आमदारांचा पुढाकार​

    Pahalgam tourist rescue operation​ : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे अनेक पर्यटक तिथे अडकले आहेत. अशा संकटात चंद्रपूर शहरातील तीन कुटुंबांतील सात नागरिक देखील पहलगाम येथे अडकले असून, त्यांना चंद्रपूरला परत आणण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या तत्पर प्रयत्नांमुळे हालचालींना वेग आला आहे.

    चंद्रपुरातील त्या ७ नागरिकांनी सांगितला पहलगाम मधील थरार

    दरवर्षी लाखो पर्यटक काश्मीर पर्यटनासाठी जात असतात. यंदाही काश्मीर खोऱ्यात पर्यटकांची गर्दी असताना पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला. त्यामुळे अनेक पर्यटक तिथे अडकले आहेत. यामध्ये चंद्रपूर शहरातील तीन कुटुंबांतील सात सदस्य अडकले असल्याची माहिती मिळताच, आमदार किशोर जोरगेवार यांनी तात्काळ व्हिडिओ कॉलद्वारे संबंधित कुटुंबांशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची चौकशी केली. यावेळी आम्ही हल्ल्याच्या ठिकाणाजवळच थांबलेलो होतो. आम्हाला चंद्रपूरला परत यायचे आहे, मात्र सध्याचे वातावरण पाहता ते शक्य नाही. आम्ही घाबरलो आहोत असे त्यांनी आमदार जोरगेवार यांना सांगितले. MLA Kishor Jorgewar news

    ही बाब गांभीर्याने घेत आमदार जोरगेवार यांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. त्यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके आणि तसेच जम्मू-काश्मीर येथील प्रशासनाशी थेट दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या  कुटुंबाच्या सुटकेसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याची विनंती केली. सदर कुटुंब थांबलेले स्थान आणि त्यांची सर्व माहिती आमदार जोरगेवार यांनी जम्मू-काश्मीर प्रशासनाला दिली. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने संबंधित कुटुंबीयांशी संपर्क साधल्याची माहितीही समोर आली आहे. MLA Kishor Jorgewar news

    आमदार जोरगेवार यांच्या तत्परतेमुळे या कुटुंबांच्या सुरक्षित चंद्रपूरकडे परतीच्या हालचालींना गती मिळाली आहे. अंकीत नगराळे, शिल्पा नळे, स्पर्श नळे, प्रितेश नळे, अजय गाडीवान, वर्षा गाडीवान,  तेजस्विनी गाडीवान असे या कुटुंबियांची नावे असून ते नागीनाबग येथील रहिवासी आहेत. हे कुटुंब सुरक्षितपणे घरी परतेपर्यंत मी सातत्याने प्रशासनाशी संपर्कात राहणार असून, त्यांना आवश्यक ती प्रत्येक मदत दिली जाईल.असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. 

  • Free medical camp Chandrapur 2025 । बालकांचे हृदय वाचवण्यासाठी पुढे सरसावले आमदार, मोफत शिबिरात डॉक्टरांचे मोलाचे योगदान

    Free medical camp Chandrapur 2025

    हृदय’ जिंकणारा उपक्रम! आमदार किशोर जोरगेवार यांची आरोग्यसेवेची अनोखी मोहीम

    Free medical camp Chandrapur 2025 : गरजू रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आणि भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ व मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय मोफत हृदयविकार व श्रवण तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर २२ व २३ एप्रिल २०२५ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे पार पडले. Free hearing screening camp Chandrapur

    पहलगाम मध्ये अडकले चंद्रपुरातील पर्यटक

    आज (बुधवार) समारोपीय कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते शिबिरात सेवा देणाऱ्या मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटल व जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
    यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चिंचोळे, ज्युपिटर रुग्णालयाचे डॉ. परमानंद आंदनकर, डॉ. एल. श्रीनिवास, डॉ. सोनारकर, डॉ. सोनिया कारापूरकर,  डॉ. खुशबू मेहता, रेशमा पवार, अजय जयस्वाल, तुषार सोम, भाजपचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, चंदू वासाडे, माजी नगरसेवक बलराम डोडाणी, नामदेव डाहुले, राहुल घोटेकर, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, माजी नगरसेविका छबू वैरागडे, वंदना हातगावकर, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा, अमोल शेंडे, राशिद हुसेन, नकुल वासमवार, करणसिंह बैस, कार्तिक बुरेवार आदी मान्यवर उपस्थित होते.

    या शिबिरात विशेषतः दुर्बळ व गरजू कुटुंबांतील १८ वर्षांखालील हजारो बालकांची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या साहाय्याने सखोल तपासणी करण्यात आली. जन्मतः हृदयरोग, गुंतागुंतीचे आजार तसेच श्रवण क्षमतेशी संबंधित अडचणी असलेल्या बालकांची तपासणी मुंबईतील ज्युपिटर डॉक्टरांनी केली. Jupiter Hospital free heart checkup

    या शिबिरादरम्यान सुमारे ४० हून अधिक बालकांमध्ये शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले असून, त्यांच्यावर लवकरच मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तपासणी झालेल्या इतर बालकांनाही पुढील उपचारासाठी सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले आहे. Free child health checkup camp India

    यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, भारतामध्ये अनेक गरीब व दुर्बल घटकांतील मुलांना वेळेवर निदान व उपचार न मिळाल्यामुळे गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. अशा शिबिरांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, अत्याधुनिक तपासणी आणि मोफत उपचार मिळाल्याने अनेक बालकांचे जीवन वाचू शकते. विशेषतः बालहृदयरोग योग्य वेळी निदान केल्यास बरा होऊ शकतो. तसेच, ५ वर्षांच्या आत श्रवण अडचणी असलेल्या बालकांवर उपचार केल्यास ते ऐकू आणि बोलू शकतात. मात्र, या उपचारांचा खर्च जास्त असल्यामुळे अनेक गरीब कुटुंबातील नागरिक हे उपचार करू शकत नाहीत. म्हणूनच अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे आहे. Free hearing screening camp Chandrapur

    Free hearing screening camp Chandrapur

    या शिबिरात वैद्यकीय तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि समर्पित आरोग्य कर्मचारी कार्यरत होते. तपासणीसाठी आलेल्या प्रत्येक मुलावर अत्यंत संवेदनशीलतेने उपचार करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणताही गरीब बालक केवळ आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये, हीच आमची भावना आहे, पुढेही असे शिबीर आपण आयोजित करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

    ४० हून अधिक बालकांवर होणार शस्त्रक्रिया

    सदर आरोग्य शिबिरात ४० हून अधिक बालकांना गंभीर स्वरूपाचे आजार असल्याचे निदान झाले असून, या सर्व बालकांवर पुढील तीन महिन्यांच्या आत मुंबई येथील ज्युपिटर रुग्णालयात निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ७ बालकांवर शस्त्रक्रिया केली जाणार असून, येत्या सोमवारी हे सर्व बालक मुंबईत रवाना होणार आहेत. त्यांना  उपचारांसाठी आवश्यक असलेल्या प्रवास, राहणी, भोजन व इतर सर्व खर्च आयोजकांच्या वतीने करण्यात येणार आहे.  

    १४ तासांच्या चिमुकलीवर तीन महिन्यांची होताच शस्त्रक्रिया

    हृदयात छिद्र असलेल्या अवघ्या १४ तासांच्या एका चिमुकलीची तपासणी मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध हृदयतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास एल. आणि डॉ. सोनिया कारापूरकर यांनी केली. ही चिमुकली तीन महिन्यांची झाल्यावर तिच्यावर मुंबईत निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तोपर्यंत तिच्यावर आवश्यक उपचार व नियमित वैद्यकीय सल्लाही दिला जाणार आहे.