बाळुभाऊ यांच्या जाण्याने निर्भीड युवा नेतृत्व हरपल्याचे दुःख – आ. किशोर जोरगेवार
Balubhau Dhanorkar Memorial Event Chandrapur : वरोरा – आठवणीतले बाळुभाऊ… द्वितीय पुण्यस्मरण सोहळा हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी आहे. बाळु धानोरकर हे एक निस्वार्थ, प्रामाणिक आणि धडाडीचे नेते होते. त्यांच्या जाण्याने चंद्रपूर जिल्ह्याने एक सक्षम युवा नेतृत्व गमावले असल्याची भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.
बाळुभाऊ धानोरकर मित्र परिवाराच्या वतीने वरोरा येथे “आठवणीतले बाळुभाऊ” द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे, विनोद दत्तात्रय यांची उपस्थिती होती. Tribute to a Visionary Leader
प्रेरणादायी शैली
शिवसेनेत सोबत काम करण्याची संधी लाभली. त्यांच्या जिद्दीने, काम करण्याच्या पद्धतीने नेहमीच ते कार्यकर्त्यांसाठी एक आदर्श नेता राहिले. त्यांचे स्पष्ट विचार, कुठल्याही गोष्टीत सडेतोड भूमिका घेण्याची त्यांची शैली कायमच प्रेरणादायी राहिली. त्यांच्या स्वप्नांचा सन्मान करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करायला हवे. त्यांनी कधीही कुठल्याही संकटापुढे हार मानली नाही. बाळु धानोरकर यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असल्याची भावना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.
टायगर सफारीने चंद्रपूरच्या पर्यटनाला नवी दिशा मिळणार – आ. किशोर जोरगेवार
Chandrapur tourism tiger safari : चंद्रपूर – चंद्रपूर येथे १७१ हेक्टर जागेत टायगर सफारीसाठी २८६ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या अधिनस्त एफडीसीएम गोरवाडा झू लिमिटेडकडे आराखडा तयार करण्याचे काम सोपविण्यात आले असून, आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर येथील वन विभागाच्या विश्रामगृहात एफडीसीएम गोरवाडा झू लिमिटेडच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला आहे. या बैठकीला एफडीसीएम गोरवाडा झू लिमिटेडचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शतनीक भागवत यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. upcoming tiger safari projects
चंद्रपूरमध्ये टायगर सफारी सुरू व्हावी, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. अनेक अधिवेशनांमध्ये आमदार जोरगेवार यांनी सदर मागणीवर सभागृहाचे लक्ष वेधले होते. परिणामी, या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. यासाठी २८६ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, महाराष्ट्र वन विकास महामंडळाने सदर कामाचा आराखडा तयार करण्याचे काम गोरवाडा झू लिमिटेड कडे दिले आहे. त्यांनी उत्कृष्ट आराखडा तयार केला आहे. tiger safari in Chandrapur
चंद्रपूरच्या पर्यटनात मोठी वाढ होणार
सदर बैठकीत या आराखड्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. चंद्रपूरच्या टायगर सफारीत प्रत्येकी पाच हेक्टरमध्ये तीन झोन तयार करण्यात येणार असून, यात ‘ऑस्ट्रेलियन ट्रेल’, ‘साउथ अमेरिकन ट्रेल’ आणि ‘इंडियन ट्रेल’ असणार आहेत. पर्यटकांना पायवाटांवरून चालत प्राण्यांना पाहण्याचा अनुभव घेता येणार आहे. तर ४४ हेक्टरमध्ये पर्यटकांना वाहनातून सफारीचा अनुभव घेता येईल. २० एकरमध्ये चिल्ड्रन पार्क आणि पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे एक भव्य पर्यटन क्षेत्र ठरेल आणि चंद्रपूरच्या पर्यटनात मोठी वाढ होईल, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे.
या टायगर सफारी प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत. स्थानिक युवकांना मार्गदर्शक, संरक्षण कर्मचारी, सफारी वाहनचालक, प्राणी संग्रहालय अशा विविध भूमिका मिळतील. शिवाय, स्थानिक व्यवसायांना – हॉटेल, होम-स्टे, स्मृतिचिन्ह, खाद्यपदार्थ विक्री व्यवसायाला देखील चालना मिळेल. यामुळे चंद्रपूरच्या अर्थव्यवस्थेला आणि विकासाला गती मिळेल, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.
विदेशी प्राणी ठरणार आकर्षण..
ऑस्ट्रेलियन ट्रेनमध्ये कांगारू, कॅसोवरी, वाला, लाफिंग कूकाबुरा आणि विविध रंगीबेरंगी पक्षी पर्यटकांना पाहता येणार आहेत. साऊथ अमेरिकन ट्रेलमध्ये जग्वार, कॅपुचिन माकड, स्पायडर माकड, कॅपीबारा, निळे व लाल मकाव असे विदेशी प्राणी पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरणार आहेत.
सावनेरच्या धर्तीवर चंद्रपुरात भूमिगत खान पर्यटन सुरु करणार – आ. किशोर जोरगेवार
Western Coalfields Limited tourism : सावनेर नागपूर येथील भूमिगत कोळसा खाण पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. याच धर्तीवर चंद्रपूर येथील बंद पडलेली महाकाली कॉलरी भूमिगत खाण देखील पर्यटनासाठी खुली व्हावी, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन पुढाकार घेतला आहे. नागपूरच्या सावनेर विश्रामगृह येथे वेकोलि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही बैठक पार पडली. underground coal mine tourism India
यावेळी चंद्रपूर वेकोलि क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक दातार, चंद्रपूर वेकोलिचे प्रबंधक विनोद शेंडे, संजय रेड्डी, सावनेर चे उपक्षेत्रीय प्रबंधक सोहन डेहरिया, सावनेर चे उपक्षेत्रीय कार्मिक प्रबंधक पी. सुभाष, एकोपार्क चे चिप मॅनेजर रुपराव महाजन, अभियंता तपास बनर्जी, राकेश निखारिया यांच्या सह भारतीय जनता पार्टीचे माझी शहर अध्यक्ष दशरथ सिंह ठाकूर, भाजप नेते प्रकाश देवतळे, अजय जयस्वाल, तुषार सोम, नामदेव डाहुले, माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, प्रदीप किरमे, रवी गुरुनुले, अमोल शेंडे, राकेश पिंपळकर, संजय तिवारी, नकुल वासमावर, करण नायर, कार्तिक बोरेवार आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर सावनेर येथील भूमिगत खाण पर्यटन प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली. पर्यटकांना खाणीत प्रवेश देताना कोणत्या सुविधा उपलब्ध केल्या जातात, सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती उपाययोजना करण्यात आली आहे, आणि या उपक्रमाचा स्थानिक स्तरावर कसा सकारात्मक परिणाम होत आहे, याचा सखोल आढावा या बैठकीत घेण्यात आला. Western Coalfields Limited tourism
महाकाली कॉलरी भूमिगत खाण पर्यटनासाठी खुली करावी
बैठकीनंतर आमदार जोरगेवार यांनी प्रत्यक्ष खाणीत जाऊन खाण पर्यटनाचा अनुभव घेतला. त्यांनी खाणीत तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शन सुविधा, पर्यटकांसाठी लावण्यात आलेले माहिती फलक, प्रकाशयोजना आणि गाईड सेवा यांची बारकाईने पाहणी केली. महाकाली कॉलरी भूमिगत खाण पर्यटनासाठी खुली करावी (Mahakali Colliery tourism project) यासाठी प्रस्ताव तयार करून लवकरात लवकर सादर करावा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक महत्त्व देत प्रकल्पाची अंमलबजावणीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
यावेळी आमदार जोरगेवार यांनी सांगितले की, “आपण चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. महाकाली कॉलरीसारख्या प्रकल्पामुळे केवळ चंद्रपूरच्या पर्यटनाला चालना मिळणार नाही, तर येथील नागरिकांना रोजगाराची नवी दारेही उघडतील. लवकरच आपण महाराष्ट्र आणि केंद्रीय पर्यटन मंत्री यांच्याकडे या प्रकल्पाचा प्रस्ताव मांडून या उपक्रमाला मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
इको पार्क ची पाहणी
आमदार जोरगेवार यांनी यावेळी सावनेर इको पार्कचीही पाहणी केली. त्यांनी इको पार्कमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा आढावा घेतला आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी करण्यात आलेल्या कामांची माहिती घेतली. इको पार्कमधील हरित परिसर, सायकल ट्रॅक, निसर्गसंपन्नता यांचे कौतुक करत त्यांनी असे उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरही राबवण्याची गरज व्यक्त केली. इको पार्कमधील व्यवस्थापन, देखभाल आणि स्वच्छतेच्या बाबींचेही निरीक्षण यावेळी त्यांनी केले.
free mpsc coaching for poor students : चंद्रपूर – गरिब आणि गरजू विद्यार्थ्यांना एमपीएससी, पोलीस भरती, आर्मी भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण देण्याचा अम्मा की पढ़ाई हा अभिनव उपक्रम आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. या उपक्रमातील चाचणी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, तीन हजार विद्यार्थ्यांपैकी 300 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
13 एप्रिल रोजी शहरातील चार परीक्षा केंद्रांवर ही चाचणी परिक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर 21 एप्रिल रोजी उत्तरतारीखा प्रसिद्ध करण्यात आली. 26 मे रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, गुणवत्तानिहाय सिमारेषा निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार निवडलेल्या 300 विद्यार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जून महिन्यात सुरु होणार प्रशिक्षण
जून महिन्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र पडताळणी करून प्रत्यक्ष प्रशिक्षणवर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या वर्गांमध्ये तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, मोफत अभ्यासिका, शैक्षणिक साहित्य, तसेच दर रविवारी अधिकाऱ्यांद्वारे विशेष मार्गदर्शन सत्र अशी सुविधा दिली जाणार आहे. या अभिनव उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण मोफत प्रशिक्षण मिळणार असून, त्यांच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होणार आहेत. free army recruitment coaching for needy students
आमदार जोरगेवार यांचा पुढाकार
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी आपल्या अधिकारी होण्याच्या स्वप्नांना बळ देऊ शकणार आहेत. अम्मा की पढ़ाई (Amma ki padhai) उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देऊन सक्षम बनवण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे. अनेक विद्यार्थी फक्त आर्थिक अडचणींमुळे आपल्या स्वप्नांना गळा घालतात, त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून गरिब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांच्या आत्मविश्वासात आणि कौशल्यात वाढ करणे, हेच आमचे ध्येय आहे. अशी भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे. free coaching for competitive exams for underprivileged
या पुढाकारामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्या अधिकारी होण्याच्या स्वप्नांना बळ देऊ शकणार आहेत. अम्मा की पढ़ाई उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देऊन सक्षम बनवण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.
गुणवत्ता निहाय गुणांची सीमारेषा सर्वसाधारण वर्गासाठी 62 गुण , महिलांसाठी 58, बीपीएलसाठी 57, दिव्यांगांसाठी 32 आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी 21 गुण ठेवण्यात आली. यानुसार 300 विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली आहे.
Chandrapur power outage solutions : चंद्रपूर शहरातील वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी वीजपुरवठा खंडित होण्यामागची कारणे शोधून, कायमचा तोडगा काढण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या बैठकीला कार्यकारी अभियंता दारवेकर, उपकार्यकारी अधिकारी राजेश खडसे, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, भाजप नेते प्रकाश देवतळे, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, मनोज पाल आदींची उपस्थिती होती.
तातडीने उपाययोजना करा
शहरातील नागरिकांना वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्यामुळे उद्भवणाऱ्या त्रासाबाबत यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी महावितरण अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तांत्रिक बिघाड, देखभाल व इतर अडचणींचा त्वरित आढावा घेऊन, वीजपुरवठा नियमित व सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ हाती घेण्याचे आदेश यावेळी त्यांनी महावितरणच्या (msedcl)अधिकाऱ्यांना दिले आहेत. Chandrapur electricity supply issues 2025
स्वतंत्र हेल्पलाईन सुरु करा
महावितरणकडून शहरातील विविध भागांत होणाऱ्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याची कारणे तपासून, दुरुस्तीसाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, अशी सूचना बैठकीत देण्यात आली. याशिवाय, नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणी तातडीने निवारण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्याच्या दृष्टीनेही चर्चा झाली. नागरिकांना नियमित, अखंड आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश आमदार जोरगेवार यांनी दिले. नागरिकांचा संयम संपत चालला आहे. सतत वीजपुरवठा खंडित होणे ही गंभीर समस्या असून, त्यावर त्वरीत तोडगा काढणे गरजेचे असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
MLA health initiative : जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून मोठा दिलासा देणारी मोहीम राबवण्यात आली आहे. ज्युपिटर हॉस्पिटल, मुंबई आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तपासण्यात आलेल्या बालकांपैकी ११ बालकांना पहिल्या टप्प्यात पुढील उपचारासाठी आज मुंबईला रेल्वेने रवाना करण्यात आले. तेथे त्यांच्यावर हृदयविकारावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. Free heart surgery aid
या शस्त्रक्रियांसाठी एका रुग्णावर अंदाजे २ ते ४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या ११ रुग्णांवर साधारणतः ४० लाख रुपयांच्या शस्त्रक्रिया होणार आहेत. हा संपूर्ण खर्च आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून करण्यात आला आहे. याशिवाय, रुग्ण बालकासह त्यांच्या दोन नातलगांच्या मुंबईतील राहण्याची व प्रवासाची संपूर्ण व्यवस्था आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी आमदारांच्या सामाजिक भानाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.विनोद बुरांडे, प्रविण वाभितकर, रिया सराटे, प्रांजली जिवतोडे, रोहिनी मोहुर्ले, यश वय्यातकर, प्रविन वासेकर, प्रज्ञा नागोसे, नीलिमा शेंडे, रिद्धी बत्तुलवार अशी पाठविण्यात आलेल्या रुग्णांची नावे आहेत.
आज सकाळी ९.३० वाजता या बालकांना त्यांच्या पालकांसह मुंबईकडे रेल्वेने रवाना करण्यात आले. आमदारांच्या पुढाकारामुळे कोणतीही आर्थिक अडचण न येता मोफत उपचार मिळणार असल्याने रुग्णांचे नातेवाईक भारावून गेले आहेत. आमच्या घरात अशा महागड्या उपचारांची सोय शक्यच नव्हती. आमदार किशोर जोरगेवार यांनी आमच्यावर मायेची सावली धरली, असे भावुक उद्गार बालकांच्या आई-वडिलांनी व्यक्त केले आहेत. medical help for poor children
उपचारासाठी सर्वतोपरी मदत करणार
समाजातील गरजू रुग्णांना दर्जेदार उपचार मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. आरोग्य शिबिरात पात्र झालेले रुग्ण गंभीर आजारांशी झुंज देत आहेत. त्यांच्या उपचारासाठी आर्थिक अडचण येऊ नये, यासाठीच आमच्या पुढाकारातून या शस्त्रक्रियांचा संपूर्ण खर्च उचलण्यात आला आहे. या बालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यात आपण यशस्वी होत आहोत. त्यांच्या उत्तम उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना केवळ उपचारच मिळत नाहीत, तर त्यांच्या जीवनात नव्या आशा निर्माण होत आहेत. चंद्रपूरसारख्या जिल्ह्यातून मुंबईसारख्या मोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेची संधी मिळणे ही निशुल्क आरोग्यसेवा उपक्रमाची मोठी देणगी ठरली आहे. तर पुढील टप्यात आणखी रुग्णांना उपचाराकरीता मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे.
Cyber Scam CDCC Bank : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल २.९३ कोटींचा सायबर घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर, या प्रकरणाची तातडीने फॉरेन्सिक चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. याबबत त्यांनी पोलिस महासंचालकांना निवेदन सादर केले होते. या मागणीची दखल घेत पोलीस महासंचालकांनी तातडीने जिल्हा पोलिस अधीक्षकांना या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. Cyber Fraud in Chandrapur
दिनांक ७ ते १० फेब्रुवारी २०२५ दरम्यान चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सायबर हल्ल्यातील गैरव्यवहारामुळे एकूण ₹३.६० कोटींच्या व्यवहारात आर्थिक घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात केवळ ₹९० लाखांची रक्कम परत मिळवण्यात पोलिसांना यश आले असून, उर्वरित २.९३ कोटींची रक्कम अद्यापही गहाळ आहे. यामध्ये बँकेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयटी विभागप्रमुख, संगणक सहाय्यक तसेच सायबर सिक्युरिटी पुरवठादार यांच्या संगनमताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
न्याय प्रक्रियेचा अवमान । Cyber Scam CDCC Bank
विशेष म्हणजे, बँकेने सायबर सुरक्षिततेसाठी तब्बल १०० कोटींचा खर्च दाखवूनही कोणतीही ठोस सुरक्षित व्यवस्था न ठेवता, विमा संरक्षणही घेतलेले नव्हते. इतकेच नव्हे, तर न्यायालयीन परवानगी न घेता ग्राहकांची रक्कम नफ्यातून परत करून बँकेने न्यायप्रक्रिया चाही अवमान केला आहे.
फॉरेन्सिक अहवाल दिशाभूल करणारा
बँकेच्या आंतरर्गत समितीने तयार केलेला फॉरेन्सिक अहवाल अपुरा व दिशाभूल करणारा असल्याने, त्याची पुनर्तपासणी स्वतंत्र तज्ज्ञांमार्फत करण्यात यावी, अशीही मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. या प्रकरणातील सर्वांगीण चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमण्यात यावे, दोषींवर तातडीने कारवाई व्हावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे. या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत पोलिस महासंचालकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना त्वरित चौकशी करून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची लवकरच सखोल चौकशी होणार असून, दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Chandrapur Deekshabhoomi development plan : चंद्रपूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र चरणस्पर्शाने पावन झालेल्या दिक्षाभूमीचा जागतिक पातळीवर विकास करण्याचा संकल्प आमदार किशोर जोरगेवार यांनी केला आहे. त्यांच्या प्रयत्नातून या पवित्र स्थळाच्या विकासासाठी ५६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातील जवळपास १४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे या कामांना गती देण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले.
दिक्षाभूमीच्या विकास कामाचा आढावा (Chandrapur Deekshabhoomi development plan) घेण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात बैठक बोलावली होती. सदर बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, समाजकल्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद माहुतुरे, समाज कल्यान विभागाच्या स्मिता बैहीरमवार, सार्वजनिक विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, दिक्षाभुमी ट्रस्टचे उपाध्यक्ष अशोक घोटेकर, कुणाल घोटेकर, राहुल घोटेकर, प्राचार्य दहेगावकर, निवृत्त प्रा संजय बेले, भारतीय जनता पक्षाचे माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकुर, भाजप नेते प्रकाश देवतळे, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, मनोज पाल, रवी गुरुनुले, रंजन ठाकूर, करणसिंह बैस, कार्तिक बोरेवार आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिक्षाभूमीच्या विकासकामाबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली आणि सर्व प्रक्रिया जलद पूर्ण करून कामाला सुरुवात करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पवित्र स्थळाचा विकास नेटका व भव्य व्हावा, यासाठी सर्व विभागांनी आपसात समन्वय साधावा. निधीचा योग्य वापर होईल याची काळजी घ्या, असे ते यावेळी म्हणाले. दिक्षाभूमीच्या विकासासाठी मागील अनेक वर्षांपासून आपण प्रयत्नशील होतो. आता निधी मंजूर झाल्यामुळे जागतिक पातळीवर या पवित्र स्थळाचा विकास होईल. दिक्षाभूमी हे जागतिक स्तरावर एक महत्त्वाचे पवित्र स्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती जपण्यासाठी, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या ठिकाणाचा विकास अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच मागील अनेक वर्षांपासून आपण या विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो. Kishor Jorgewar Deekshabhoomi funding
दीक्षाभूमीचा विकास भव्य स्वरूपात होणार
या निधीतून सभागृह, पथदिवे, उद्यान, पाणीपुरवठा, शौचालय सुविधा, सुरक्षा यंत्रणा, स्थापत्यशास्त्रीय सौंदर्यवृद्धी आणि पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यामुळे दिक्षाभूमीचा विकास भव्य स्वरूपात होणार आहे. सर्व विभागांनी आपसात समन्वय साधावा.निधीचा प्रत्येक रुपया योग्य कामासाठीच वापरला गेला पाहिजे. कोणत्याही अडथळ्यामुळे विकासकामांना विलंब होऊ देऊ नका, काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे. या पवित्र भूमीचा जागतिक दर्जाचा विकास व्हावा, हा आपल्या सगळ्यांचा संकल्प आहे. आपण सर्वांनी प्रामाणिकपणे आणि एकजुटीने काम करावे, अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. Deekshabhoomi global heritage site development
या बैठकीत विकासकामांची रूपरेषा, निधी वितरण प्रक्रिया, निविदा प्रक्रिया आणि वेळापत्रक याबद्दल सविस्तर चर्चा झाली. जिल्हा प्रशासनाने कामांना गती देण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे दिक्षाभूमीच्या विकासकामांना नवा वेग मिळणार आहे. लवकरच हे पवित्र स्थान जागतिक स्तरावर नव्या स्वरूपात ओळखले जाईल, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे.
Ghugus Loha pul : घुग्घुस रेल्वे सायडिंग वरील मागील दोन वर्षांपासून बंद असलेल्या लोखंडी पुलाच्या कामास येत्या १० दिवसांत सुरुवात करावी, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
सदर विषयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, वेकोलि वणी एरियाचे अभियंता जमगाडे, रेल्वे अभियंता राजूरकर, घुग्गुस नगरपरिषदचे दिनेश बावणे, आशिष मासिरकर, सोनल भरडकर, सन्नी खारकर, संजय भोंगळे, अनिल यादव, किरण पूरेली, राजूभाऊ जगताप, सक्कील राईन, दिनेश बोरपे, , संतोष नुन्ने, संजय तिवारी, मयूर कलवल आदींची उपस्थिती होती.
या पुलाच्या बंदमुळे सायडिंग कॉलनीतील नागरिकांना घुग्घुस शहरातील बाजारपेठेत ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे वणी रोडवरील पुलाचे कामही अपूर्ण असल्याने वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. problems faced by locals due to incomplete bridges
यावेळी बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, हा पूल घुग्घुसच्या जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांपासून महिलांपर्यंत, कामगारांपासून वृद्धांपर्यंत सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कामाची अधिक विलंब सहन केला जाणार नाही. १० दिवसात प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले पाहिजे अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनीही प्रशासनाच्या वतीने तातडीने हालचाली करण्याचे आश्वासन दिले. लवकरच रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या समन्वयातून काम सुरु करण्यात येईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
चांदाफोर्ट स्थानकाचा ऐतिहासिक कायापालट हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा परिणाम – आ. किशोर जोरगेवार
chanda fort railway station upgrade : चंद्रपूर – चांदाफोर्ट स्थानकाचा झालेला कायापालट हा केवळ भौतिक स्वरूपातील बदल नाही, तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे मूर्तस्वरूप आहे. त्यांच्या संकल्पशक्तीमुळे आणि केंद्र शासनाच्या सहकार्यामुळेच आज चंद्रपूरकरांना स्वच्छ, सुसज्ज आणि आधुनिक रेल्वे स्थानक अनुभवता येत आहे. चांदाफोर्ट स्थानकाचा ऐतिहासिक कायापालट हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Amrit Bharat Station scheme Chandrapur
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत चांदाफोर्ट रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, स्वातंत्र्यसैनिक डॉ. शेषरावजी इंगोले, मुख्य अभियंता बी.व्ही.एस. सुब्रमण्यम, दामोदर मंत्री, पूनम तिवारी, प्रकाश देवतळे, सुभाष कासनगोट्टुवार, विठ्ठल डुकरे, रवी गुरनुले, देवानंद वाढई, मधुसूदन रुगंठा, प्रदीत किरमे, वंदना हातगावकर, मधुकर राहूत, सुदामा यादव, विश्वजित शाहा, नकुल वासमवार, विनोद अनंतवार, कार्तिक बोरेवार, राहुल मोहुर्ले, शेखर शेट्टी, सलीम शेख आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात “अमृत भारत स्टेशन योजना” अंतर्गत देशातील १०३ नव्याने पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण झाले, ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. चांदाफोर्ट स्थानकाचे या यादीत समावेश होणे हे आपल्यासाठी विशेष महत्त्वाचे आहे. चांदा फोर्ट स्थानक हे केवळ एक स्थानक नसून, हे या परिसराचा सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार ठरेल. या स्थानकामुळे स्थानिक नागरिकांना आधुनिक, स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज सेवा मिळतील. आता हे स्थानक अधिक सुरक्षित आणि सुसज्ज सुविधांनी युक्त असेल. स्थानकातील प्रवाशांसाठी नवीन सुविधा, व्हीलचेअर ॲक्सेस, सुसज्ज प्रतीक्षा कक्ष, डिजिटल सिस्टीम्स, एलईडी डिस्प्ले, आधुनिक तिकीट व्यवस्था, स्वच्छतागृहे, आणि व्यावसायिक गरजांसाठी सुलभ मालवाहतूक व्यवस्थापन – या सर्व सुविधा मिळणार आहेत. Benefits of Amrit Bharat scheme in Chandrapur
केंद्र शासनाच्या सहकार्याने, रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून हे शक्य झाले
स्थानकासह रस्ते, वीज, पाणी, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी अधिकाधिक योजना राबवण्याचा आमचा प्रयत्न राहील. तसेच या परिसरातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.