Tag: चंद्रपूर महानगरपालिका

  • Chandrapur building safety notice 2025 । 54 जिर्ण इमारतींना चंद्रपूर मनपाची नोटीस

    Chandrapur building safety notice 2025

    Chandrapur building safety notice 2025 : चंद्रपूर – महापालिका क्षेत्रातील शिकस्त इमारतींपासून परिसरातील रहिवाशांच्या जीविताला निर्माण होऊ शकणारा संभाव्य धोका पाहता चंद्रपूर महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरवात केली असुन मागील काही दिवसात 54 जीर्ण इमारतींना नोटीस देण्यात आली आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोघांची वाघाने केली शिकार

     
        पावसाळ्यात दरवर्षी महापालिका क्षेत्रातील जीर्ण व शिकस्त इमारतींचा सर्व्हे करण्यात येतो. यात आढळलेल्या धोकादायक इमारतीतील रहिवाश्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 चे कलम 264 अन्वये नोटीस जाहीर करण्यात येते. चंद्रपूर मनपातर्फे झोन 1 अंतर्गत 28, झोन 2 अंतर्गत 16 तर झोन 3 अंतर्गत 10 अश्या एकुण 54 धोकादायक इमारतींना नोटीस देण्यात आली आहे.  

    स्थलांतरित व्हा


       नोटीसनुसार धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्यास असलेल्या सर्व व्यक्तींना व महत्वाचे साहित्य अन्यत्र सुरक्षित ठिकाणी तात्काळ स्थलांतरीत होण्यास सांगण्यात आले असुन त्वरित आपल्या इमारतीची दुरुस्ती करुन घेण्याचे तसेच त्यांनतर आपल्या इमारतीचे नोंदणीकृत स्ट्रक्चरल अभियंता यांचेकडून सर्वेक्षण करुन त्याबाबतचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट मनपा कार्यालयास सादर करण्यास कळविण्यात आले आहे. how to get structural stability certificate

     
      पावसाळ्यापूर्वी सदर कारवाई दरवर्षी मनपातर्फे करण्यात येते मात्र काही मालमत्ताधारक जिवाची पर्वा न करता त्याच इमारतीत तळ ठोकून राहतात. यामुळे परिसरातील रहिवाशांच्या जिवालासुद्धा धोका निर्माण होतो. मग अश्या प्रसंगी निष्कासीत करण्याची अथवा नियमानुसार कारवाई मनपातर्फे करण्यात येते.

  • Chandrapur Water Tanker Initiative । चंद्रपूरमध्ये पाणीटंचाईवर तोडगा – आमदार निधीतून टँकरची भर!

    Chandrapur Water Tanker Initiative

    Chandrapur Water Tanker Initiative : चंद्रपूर – स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या 3 पाणी टँकरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते फीत कापुन लोकार्पण आज करण्यात आले.

    चंद्रपूर मनपाकडे ११ पाणी टँकर


        या 3 टँकर पैकी 1 टँकर 1 हजार लिटर क्षमतेचा असुन उर्वरीत 2 हे 4 हजार लिटर क्षमतेचे आहेत. पाणीपुरवठा करण्यास मनपाचे स्वतःचे 8 टँकर असुन ता 3 टँकरची भर पडल्याने मनपाकडे एकुण 11 टँकर पाणी पुरवठा करण्यास सज्ज झाले आहेत. पाण्याची टंचाई बघता 6 खाजगी टँकरने सुद्धा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सदर खरेदी करण्यास स्थानिक आमदार विकास निधीतुन मा. आमदार किशोर जोरगेवार यांनी निधी उपलब्ध करून दिला होता. mla kishor jorgewar

    mla kishor jorgewar

    रिकामटेकड्या घर जावयाने केला सासऱ्याच्या खून


       दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याच्या मागणीत मोठया प्रमाणात वाढ होत असते. सातत्याने वाढणारे उष्णतामानाने पिण्याच्या पाण्यासह उकाडा घालविण्यास कुलर सारख्या गोष्टींचा दैनंदिन वापर केला जातो. अशा परिस्थितीत शहरवासीयांकडून पाण्याच्‍या वापरात लक्षणीय वाढ होते. वाढीव मागणीचा विचार करता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे वाढीव स्वरूपात पाणीपुरवठा केला जातो.

    Powered by myUpchar


       या प्रसंगी मा. आमदार किशोर जोरगेवार,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त संदीप चिद्रावार, शहर अभियंता रवींद्र हजारे,उपअभियंता रवींद्र कळंबे,चैतन्य चोरे,माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार,देवानंद वाढई तसेच मनपाचे अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते. 

  • Tullu pump seizure । टिल्लू पंपचा गैरवापर थांबवा! मनपाची मोठी कारवाई – 30 पंप जप्त

    Tullu pump seizure

    Tullu pump seizure : चंद्रपूर  –  शहरातील बालाजी वार्ड,बालाजी मंदिर,मातोश्री शाळेमागील परिसर,महाकाली मंदिर परिसरात महानगरपालिकेमार्फत टिल्लू पंप जप्तीची मोहीम राबविण्यात येऊन 30 ग्राहकांचे टिल्लू पंप जप्त करण्यात आले असुन त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करून नळ कपात करण्यात आली आहे.

    चंद्रपुरातील जेबी आर्ट्स अँड स्टेशनरी मध्ये भीषण आग


       मनपातर्फे शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक ( मीटर ) लावण्यात आले असुन मीटरचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. मात्र काही जागी मीटरला लावलेला पाईप काढुन पाणी भरत असल्याचे तसेच काही नागरिक टिल्लू पंपचा वापर करत असल्याचे आढळुन आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून जप्ती करण्यात आली आहे.

    Powered by myUpchar

    पाण्याचा जितका वापर तितकेच बिल


        सर्व नळ जोडणींवर मीटर लावण्यात आले असल्याने पाण्याचा जेवढा वापर होईल तेवढेच देयक येत असुन अनावश्यक खर्च व अनावश्यक पाण्याच्या वापरावर नियंत्रण आले आहे.मात्र काही नागरिक नळाचे देयक कमी करण्याच्या दृष्टीने मीटरला लागुन असलेला पाईप काढतात ज्यामुळे पाण्याचा वापर करतांना मीटर बंद असते व बिल अतिशय कमी येते,शिवाय टिल्लु पंप द्वारे मोठ्या प्रमाणात पाणी एकाच कनेक्शनवर ओढले जाऊन इतर नळधारकांना अतिशय कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतो. municipal action against water theft

    तर काळ्या यादीत टाकणार


          त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम लक्षात घेता मनपातर्फे कारवाई सुरु असुन यापुढे अश्या प्रकारे पाणी भरतांना आढळल्यास त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

  • public property theft chandrapur । चंद्रपुरात घनकचरा कंपनीने चोरली पेव्हर्स आणि गिट्टी?, आपची तक्रार

    public property theft chandrapur

    public property theft chandrapur : चंद्रपूर – शहरातील नागरी सुविधा आणि सौंदर्यीकरणासाठी वापरल्या गेलेल्या शासकीय मालमत्तेची सर्रास चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहरात उघडकीस आला आहे. कोहिनूर ग्राउंडवरील वॉकिंग ट्रॅकसाठी वापरलेले पेव्हर्स आणि माता महाकाली महोत्सवाच्या वेळी सार्वजनिक व्यवस्थेसाठी टाकलेली काळी गिट्टी ही दोन्ही शासकीय मालमत्ता अर्बन एनव्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड या घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या खासगी कंपनीने चोरून स्वतःच्या खासगी कार्यालयात लावली असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. AAP complaint against waste management company

    नरभक्षक वाघिणीनंतर बछडा जेरबंद

    या प्रकरणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी चंद्रपूर महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार सादर केली असून, यामध्ये त्यांनी संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई, मालमत्तेची जप्ती, तसेच पोलीस तक्रार व FIR दाखल करण्याची विनंती केली आहे. kohinoor ground pavers stolen case

    चोरीचा घटनाक्रम:

    • दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी, कोहिनूर ग्राउंडवरील वॉकिंग ट्रॅकवरील शेकडो पेव्हर्स काढून घेण्यात आले.
    • त्याच दिवशी माता महाकाली मंदिर परिसरात टाकलेली काळी गिट्टी देखील गायब झाली.
    • ही सर्व मालमत्ता शहरातील बायपास रोड, अष्टभूजा जैन पेट्रोल पंप समोर असलेल्या अर्बन एनव्हायरो कंपनीच्या कार्यालयात लावलेली असल्याचे फोटो व साक्षीदारांद्वारे स्पष्ट झाले आहे.

    राईकवार यांचा आरोप:

    “महानगरपालिकेच्या मालकीची, सार्वजनिक वापरासाठी असलेली शासकीय मालमत्ता खासगी कंपनीने चोरून नेली हे गंभीर गुन्हेगारी कृत्य आहे. ही केवळ चोरी नव्हे, तर नागरी सुविधा नष्ट करण्याचा आणि लोकांच्या पैशांची लूट करण्याचा प्रकार आहे. यामध्ये संबंधित अधिकारी आणि कंपनीतील उच्चपदस्थांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे राईकवार यांनी सांगितले.

    Powered by myUpchar

    तक्रारीतील मुख्य मागण्या:

    • अर्बन एनव्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा.
    • शासकीय मालमत्तेची जप्ती करून मूळ ठिकाणी परत लावण्यात यावी.
    • कंपनीच्या महानगरपालिकेशी असलेल्या कराराची चौकशी करून, करार त्वरित रद्द करण्यात यावा.
    • स्थानिक पोलिस स्टेशनच्या FIR नोंदवून कार्यवाही सुरू करण्यात यावी.
    शहरात संतापाची लाट!

    या प्रकरणामुळे शहरात संतापाची लाट पसरली असून, नागरिकांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कोहिनूर ग्राउंडवरील नागरिक आणि महाकाली मंदिर परिसरातील रहिवाशांनी यापूर्वीही मालमत्ता काढली जात असल्याची तक्रार केली होती, मात्र कारवाई करण्यात आलेली नव्हती. kohinoor ground pavers stolen case

    महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?


    सदर कंपनी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे काम करत असून, त्यांच्या विरुद्ध इतक्या गंभीर स्वरूपाचा आरोप होणे ही महापालिकेच्या देखरेखीतील हलगर्जीपणाचे स्पष्ट लक्षण आहे. यामुळे प्रशासनाची भूमिका आणि पारदर्शकता यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    आम आदमी पार्टीचा इशारा:

    जर याप्रकरणी तातडीने कारवाई झाली नाही, तर आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल आणि जनतेसोबत एकजूट होऊन जबाबदारांवर कठोर कार्यवाही होईपर्यंत लढा देईल, असा इशारा पक्षाने दिला आहे या वेळी जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार , युवा जिल्हाध्यक्ष राजू कूडे, शहर अध्यक्ष योगेश गोखरे , महानगर संगठन मंत्री सतोष बोपचे ,महिला अध्यक्ष एड तबस्सुम शेख इत्यादि उपस्थित होते .

  • Tullu pump seizure by municipality । ⚠️ पाणी चोरांवर चाप! मनपाने जप्त केले 15 टिल्लू पंप

    Tullu pump seizure by municipality

    Tullu pump seizure by municipality : चंद्रपूर  –  शहरातील बालाजी वार्ड आणि बालाजी मंदिर परिसरात परिसरात महानगरपालिकेमार्फत टिल्लू पंप जप्तीची मोहीम राबविण्यात येऊन 15 ग्राहकांचे टिल्लू पंप जप्त करण्यात आले असुन त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करून नळ कपात करण्यात आली आहे.

    वाघाने महिलेला नेले फरफटत, चंद्रपूर जिल्ह्यात ४ दिवसात ६ बळी


       मनपातर्फे शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक ( मीटर ) लावण्यात आले असुन मीटरचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. मात्र काही जागी मीटरला लावलेला पाईप काढुन पाणी भरत असल्याचे तसेच काही नागरिक टिल्लू पंपचा वापर करत असल्याचे आढळुन आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून जप्ती करण्यात आली आहे.

    टिल्लू पंप मुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम


        सर्व नळ जोडणींवर मीटर लावण्यात आले असल्याने पाण्याचा जेवढा वापर होईल तेवढेच देयक येत असुन अनावश्यक खर्च व अनावश्यक पाण्याच्या वापरावर नियंत्रण आले आहे.मात्र काही नागरिक नळाचे देयक कमी करण्याच्या दृष्टीने मीटरला लागुन असलेला पाईप काढतात ज्यामुळे पाण्याचा वापर करतांना मीटर बंद असते व बिल अतिशय कमी येते,शिवाय टिल्लु पंप द्वारे मोठ्या प्रमाणात पाणी एकाच कनेक्शनवर ओढले जाऊन इतर नळधारकांना अतिशय कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतो.  illegal water pump use in city


          त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम लक्षात घेता मनपातर्फे कारवाई सुरु असुन यापुढे अश्या प्रकारे पाणी भरतांना आढळल्यास त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

  • Chandrapur learn and earn scheme । बारावी पास? चंद्रपूर मनपात ‘शिका आणि कमवा’ संधी!

    Chandrapur learn and earn scheme

    नोकरीसह पदवी! चंद्रपूर मनपाची विद्यार्थ्यांसाठी खास योजना.

    Chandrapur learn and earn scheme : चंद्रपूर 06 मे (News३४) – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नुकतेच बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘शिका आणि कमवा’ योजना राबविण्यात येणार असुन या योजनेअंतर्गत  इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) यांच्या BBA (Service Management) या दूरस्थ पदवी अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या,चंद्रपूर महानगरपालिकेच्या शहरी भागातील, निवडक गुणवंत आणि होतकरु विद्यार्थ्यांना सन 2025-26 या वर्षापासून महानगरपालिकेच्या विविध विभागामध्ये, तीन वर्षासाठी ‘डिजिटल आणि एआय सुलभक’ (Digital and AI Facilitator) म्हणून प्रशासकीय काम करण्याची संधी मिळणार आहे. CMC IGNOU BBA Service Management internship 2025

    सायकलच्या चाकात अडकला मृत्यू


        IGNOU च्या BBA (SM) या कार्यानुभवावर आधारित दूरस्थ पदवी अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना ३ वर्षे एखाद्या कार्यालयामध्ये पूर्णवेळ इंटर्नशिप करणे बंधनकारक असते. ही 3 वर्षाची इंटर्नशिप गरजू पात्र विद्यार्थ्यांना देऊन, त्यांना केलेल्या कामाच्या बदल्यात विद्यावेतन देणारी ‘शिका आणि कमवा’ ही नाविन्यपूर्ण योजना यंदाच्या वर्षापासून चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राबविली जाणार आहे. सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्याना त्यांनी केलेल्या कामापोटी पहिल्या वर्षी रु. 5 हजार दुसऱ्या वर्षी रु. 6 हजार आणि शेवटच्या वर्षासाठी रु. 7 हजार इतके विद्यावेतन प्रत्येक महिन्यासाठी अदा केले जाईल.  Chandrapur 12th pass job with study 2025


        सदर योजनेमध्ये सलग तीन वर्षे समाधानकारकरित्या केलेले काम आणि स्वयंअध्ययन यातून तिसऱ्या वर्षाच्या शेवटी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची (IGNOU) बीबीए म्हणजेच Bachelor in Business Administration (Services Management) ही कामातून पदवी आणि तीन वर्षे काम केल्याचे महापालिकेच्या वतीने कार्यानुभवाचे प्रमाणपत्र असा विद्यार्थ्याचा दुहेरी फायदा होणार आहे. तसेच 12 वी नंतरचे पदवीचे, स्पर्धात्मक युगामध्ये पुढे जाऊन कामाला येऊ शकणारे कार्यावर आधारीत शिक्षण हे स्वत:च्या मेहनतीच्या कमाईवर करता येणार असल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावण्यास यामुळे मदत होणार आहे.


        चंद्रपूर महानगपालिकेच्या कार्यक्षेत्रातील म्हणजेच चंद्रपूर च्या शहरी भागातील 18 ते 25 वयोगटातील नुकत्याच बारावी पास झालेल्या, संगणक आणि विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) टूल्स चा प्रभावी वापर करता येणाऱ्यागुणवंत व होतकरू  विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी केले आहे.
        सदर योजनेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना स्वारस्य अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 2 जून 2025 अशी असून त्यासाठी https://tinyurl.com/cmcibba2025ही ऑनलाईन लिंक चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.तसेच मनपाच्या संगणक विभागात संपर्क साधता येणार आहे.

  • Municipal water supply solutions । इरई नदीचा गाळ उपसून शहराला पाणी! आमदार जोरगेवार यांनी सुचविला उपाय

    Municipal water supply solutions

    Municipal water supply solutions : शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत एक बैठक पार पडली. इरई नदीतील गाळ उपसा तसेच शहरातील विविध मूलभूत सुविधा आणि पायाभूत कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीत पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी महत्त्वपूर्ण सूचना मनपा प्रशासनाला दिल्या.

    १ मे पासून चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अभियान

    या बैठकीस मनपा आयुक्त विपिन पालिवाल, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, स्वच्छता विभागाचे निरीक्षक डॉ. अमोल शेडकी, बांधकाम विभागाच्या अभियंता वैष्णवी रिठे, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, तुषार सोम, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, माजी नगरसेविका छबू वैरागडे, कल्पना बबूलकर, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, श्याम कनकम, राजेंद्र अडपेवार, अरुण तिखे, वंदना हातगावकर, सुरेश तालेवार, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा बोरगमवार, करणसिंग बैस, करण नायर, विनोद अनंतवार आदी उपस्थित होते.

    शहर व परिसरातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर इरई नदीतील गाळ उपसा हे एक महत्त्वाचे काम ठरत असून, या कामाच्या प्रगतीचा व अडचणींचा सविस्तर आढावा आमदार किशोर जोरगेवार यांनी या बैठकीत घेतला. बैठकीदरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून गाळ उपसण्याची सद्यस्थिती, यंत्रसामुग्रीची उपलब्धता आणि कामाचा कालावधी याबाबत सविस्तर माहिती घेतली. कामात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी आवश्यक ती मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. River dredging for irrigation

    शहरातील काही भागांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार जोरगेवार यांनी टँकरद्वारे सातत्यपूर्ण पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. झोननिहाय पाणीवाटप अधिक कार्यक्षम पद्धतीने होण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच पाण्याच्या टाक्या आणि टँकरच्या स्थान निश्चितीचे काम तातडीने पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला यावेळी देण्यात आले. Sustainable urban water management

    परिसरातील रस्ते व बांधकामाच्या कामांची सविस्तर समीक्षा करताना, या प्रकल्पांना गती देण्याची गरज आमदार किशोर जोरगेवार म्हणाले केली. शहराच्या स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी दूर करताना डिव्हायडर देखभाल, फुलझाडे लावणे यांसारख्या सौंदर्यीकरण च्या उपक्रमांना अधिक गती देण्यावरही भर देण्यात आला. प्रशासनाने नागरिकांच्या समस्या तातडीने आणि प्रभावीपणे सोडवाव्यात, अशा सूचना यावेळी आमदार जोरगेवार यांनी केल्यात. या बैठकीला संबधित अधिकारी आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

  • Maharashtra municipal administration awards । राज्यभरातून चंद्रपूरचा गौरव! मनपाला मिळाले प्रतिष्ठेचे ‘राजीव गांधी पुरस्कार’

    Maharashtra municipal administration awards

    Maharashtra municipal administration awards : चंद्रपूर 22 एप्रिल  :- चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये राबवलेल्या नागरी उपक्रमांसाठी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांना राजीव गांधी गतिमान प्रशासन पुरस्कार 2023-24 आणि 2024-25 या वर्षातील दोन पुरस्कारांद्वारे मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते नागरी सेवा दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले. Chandrapur Municipal Corporation news

    चंद्रपुरात उष्णतेचा कहर, शाळांना ५ दिवसांची सुट्टी जाहीर करा

       2023-24 वर्षाकरीता मालमत्ता कराची नॅच प्रणाली यशस्वीरित्या राबविल्याबद्दल व 2024-25 ला सौंदर्यीकरण अभियान, जलाशय व पाणीसाठे यांची स्वच्छता, शाळा इमारत नूतनीकरण, सुंदर माझे उद्यान व सुंदर माझी ओपन स्पेस स्पर्धा, रस्त्यांचे सुशोभिकरण, विविध शिल्प उभारणी इत्यादी विविध कार्ये यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल महानगरपालिका गटात तिसरा पुरस्कार चंद्रपूर मनपाला मिळाला आहे. ही सर्व कार्ये आयुक्त विपीन पालीवाल यांच्या कार्यकाळात झाली असल्याने त्यांना राजीव गांधी गतिमान प्रशासन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Rajiv Gandhi Administrative Awards 2024


      महानगरपालिका स्तरावरून थेट प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या गटामध्ये ही निवड करण्यात आली आहे. प्रशासन लोकाभिमुख करणे, त्यात निर्णयक्षमता आणणे आणि सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी वर्ष 2023-24 आणि वर्ष 2024-25 यां दोन वर्षांत राज्यस्तरावर तसेच तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावर व महानगरपालिका स्तरावर “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान राबविण्यात आले. या स्पर्धेत सहभागी सर्व कार्यालय व अधिकाऱ्यांचे विविध निकषांवर परीक्षक मंडळाकडून परीक्षण करून सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.


        अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त संदीप चिंद्रवार,विधी अधिकारी अनिलकुमार घुले शहर अभियंता विजय बोरीकर,उपअभियंता रवींद्र हजारे,संगणक अभियंता अमुल भुते या चंद्रपूर मनपाचे सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे व शहरातील नागरिकांचे अभियानात सहकार्य मिळाल्याबद्दल आयुक्तांनी आभार मानले आहेत.  


    2024-25 चा पुरस्कार – मनपाने राबविलेल्या सुंदर माझे उद्यान ” व ” सुंदर माझी ओपन स्पेस स्पर्धेत लोकसहभागाने मोठ्या प्रमाणात उद्याने व विविध भागांचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण करण्यात आले होते. जवळपास 3400 नागरिक यात प्रत्यक्ष -अप्रत्यक्षरीत्या सहभागी झाले होते. विविध शिल्प व कारंजे चौक सौंदर्यीकरण अंतर्गत उभारण्यात आले. मनपाच्या 15 शाळा या भौतिक सोयी सुविधांनी सुसज्ज करण्यात येऊन या शाळांना आयएसओ मानांकन सुद्धा मिळाले. विद्यार्थी नागरिक,स्वयंसेवी संस्था यांच्याशी जुळुन प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयाने विविध उपक्रम राबविण्यात आल्याने या वर्षीचा पुरस्कार सुद्धा मनपास प्राप्त झाला.  Rajiv Gandhi Administrative Awards 2024

  • anti encroachment drive । पूर टाळण्यासाठी मोठा निर्णय: नाल्यावरील बेकायदेशीर बांधकामांवर चंद्रपूर मनपाची गाज

    anti encroachment drive

    anti encroachment drive : चंद्रपूर 16 एप्रिल – शहरातील तीनही झोन अंतर्गत येणाऱ्या 6 मोठे नालेसफाई स्वच्छतेचे कार्य युद्धपातळीवर हाती घेऊन 10 छोट्या नाल्यांचीही स्वच्छता जुन महिन्यापर्यंत करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिले आहेत. मंगळवार 15 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत आयुक्तांनी मान्सूनपूर्व नाले स्वच्छता कामाचा आढावा घेतांना नाले स्वच्छता मोहीमेआधी नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचेही निर्देश त्यांनी दिले आहेत. illegal construction removal

    चंद्रपुरात जनविकास सेनेचे पैसे फेका आंदोलन

     
        नाल्यावर अतिक्रमण केल्याने पाण्याच्या प्रवाहाला अवरोध निर्माण होऊन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते,याशिवाय पावसाळ्यात नाला ओव्हरफ्लो झाल्यास परिसरात पाणी शिरून साधन संपत्ती व आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे ज्या नागरिक, दुकानदारांनी नाल्यावर अतिक्रमण करून बांधकाम केले आहे त्यांनी ते त्वरित काढण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. नाल्यावरील अतिक्रमण हे पाणी तुंबण्याचे कारण ठरू शकत असल्याचे लक्षात घेता मनपातर्फे नाल्यावरील अतिक्रमणाचा सर्व्हे करण्यात आला होता. यात गडर लाईन कव्हर करणे,पक्के बांधकाम करणे,व्हरांडा बांधण्यासारखे अतिक्रमण केलेले आढळुन आले होते. या सर्व अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची विशेष मोहीम आता राबविण्यात येणार आहे. municipal drain cleaning project


         शहरातील तीनही झोनअंतर्गत बहुतांश नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा जमा झाला आहे. यामुळे नाल्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होतो. मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थितीही निर्माण होण्याची शक्यता असते. हे सर्व टाळण्यासाठी मान्सूनपूर्व नाले स्वच्छता करण्याच्या कामाला सुरवात करण्यात येत आहे.


          शहरातील महाविदर्भ वृत्तपत्र कार्यालय ते मच्छीनाला, सावरकर नगर, बगड़खिडकी रेल्वेपटरी, बिनबा मोरी ते सटवाई, रहमत नगर , सिस्टर कॉलोनी, चांबारकुंडी, आकाशवाणी, निंबाळकर वाडी, एस.पी कॉलेज ते नगराळे दवाखाना इत्यादी मोठ्या नाल्यांची साफसफाई सुरु असून मनुष्यबळ व  जेसीबी च्या मदतीने तेथील गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात येत आहे. नाल्याभोवती वाढलेली झाडेझुडपी व नाल्यातील माती दगड बाहेर काढून सांडपाण्याला वाट काढून दिली जाणार आहे. त्यामुळे सांडपाणी तुंबून न राहता पुढे वाहून जाईल, सांडपाण्याला वेग आल्याने नाल्याजवळील दुर्गंधी कमी व्हायला मदत होईल. flood prevention measures India


         नाले सफाईचे कार्य मशीनद्वारे आणि जेथे मशीनद्वारे शक्य नाही तेथे स्वच्छता कर्मचाऱ्यांतर्फे होणार आहे. सध्या स्वच्छतेच्या कामात नियमीत 315 सफाई कर्मचारी व अतिरिक्त 130 असे एकुण 445 कर्मचारी कार्यरत असणार आहेत. याशिवाय मोठ्या नाल्यांच्या सफाईकरीता 5 जेसीबी लावण्यात आल्या असून लवकरच पोकलेनद्वारे स्वच्छता सुरू करण्यात येणार आहे. अन्य नाले जेथे पोकलेन जाऊ शकत नाही अशा उर्वरीत नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे करण्यात येत आहे.


        यापूर्वी मे महिन्यात सुरू होणारी नाला सफाई यावर्षी एप्रिल महिन्यातच सुरू करण्यात आली आहे. विविध विभागांच्या समन्वयातून स्वच्छता विभाग हे उद्दिष्ट साध्य करणार आहे. नाले स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी झोनचे सहायक आयुक्त यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात, मुख्य स्वच्छता अधिकारी, झोनचे  स्वच्छता निरिक्षक, आपत्ती व्यवस्थापन पथक सांभाळणार असुन नाला स्वच्छतेदरम्यान निघणारा गाळ हा परिसरातील सखल भागात टाकण्यात येणार आहे.

  • ambulance price hike protest । चंद्रपूर मनपाची सेवा महागली – गरीबांच्या जखमेवर मीठ, आंदोलन पेटलं!

    ambulance price hike protest

    ambulance price hike protest : चंद्रपूर : १ एप्रिल २०२५ पासून चंद्रपूर महानगरपालिकेने ॲम्बुलन्स,शव वाहिका, पाण्याचे टँकर इत्यादी मूलभूत सेवांच्या दरात मोठी वाढ केली. या दरवाढीने संतप्त झालेल्या जनविकास सेनेने संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात पुन्हा एकदा आयुक्तांच्या गाडीवर नोटांची उधळण करण्याचा प्रयत्न केला. मात्र आयुक्त व त्यांची गाडी नसल्याने यावेळी उपायुक्त मंगेश खवले यांच्या गाडीवर नोटा उधळण्यात आल्या.

    क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा, पोलिसांनी केली एकाला अटक


    मनपा प्रशासन व आयुक्त विपिन पालीवाल यांना केवळ पैशाची भूक आहे हे दर्शविण्यासाठी जनविकास सेनेने पुन्हा एकदा ‘घे पैसा’ आंदोलन केले.आज १६ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या दरम्यान गांधी चौकातील मनपा इमारतीसमोर ‘घे पैसा’ आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिका आता व्यापारी प्रतिष्ठान झाले असुन आयुक्त व्यापारी झाल्याची प्रतिक्रिया यावेळी देशमुख यांनी दिली. protest against ambulance charges


    २०० ऐवजी आता १ हजार रुपये भाडे…
    पेट्रोल-डिझेलचा खर्चही खाजगीपेक्षा जास्त

    शहराच्या हद्दीमध्ये यापूर्वी मनपाच्या ॲम्बुलन्सची सेवा निशुल्क होती. आता यासाठी ५०० रुपये भाडे आकारण्यात आले. मनपा हद्दीच्या बाहेर ॲम्बुलन्स व शव वाहिकेसाठी साठी २०० रुपये भाडे आकारण्यात येत होते. १ एप्रिल पासुन मनपा यासाठी २०० ऐवजी १००० रुपये म्हणजेच पाचपट भाडे आकारण्यात येणार आहे. खाजगी ॲम्बुलन्स व शव वाहिका चालक १५ किलोमीटर मागे एक लिटर पेट्रोल- डिझेलचा खर्च घेतात. मनपा ॲम्बुलन्ससाठी १० किलोमीटर मागे एक लिटर पेट्रोल व शव वाहिकेसाठी ८ किलोमीटर मागे एक लिटर डिझेल घेत असल्याने इंधनाचा खर्चही जास्त लागणार आहे.याचा मोठा फटका शहरातील तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू लोकांना बसणार आहे. ambulance service hike

    protest against ambulance charges


    १०० गुन्हे दाखल झाले तरी घाबरत नाही..पप्पू देशमुख

    आयुक्त विपिन पालीवाल यांनी जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध आजपर्यंत अनेक खोट्या तक्रारी दाखल केल्या.कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल झाले. आमची लढाई ही चंद्रपूर शहरातील ४ लक्ष नागरिकांच्या हिताची लढाई आहे. पैशाच्या हव्यासापोटी मनपाच्या तिजोरीची लूट करणाऱ्या कोणत्याही घोटाळेबाज अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही.आयुक्तांनी १०० तक्रारी केल्या व १०० गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरत नाही. यासाठीच पुन्हा एकदा नोटांची उधळण केली. आयुक्तांनी १०० तक्रारी कराव्या. आम्ही एकच तक्रार करणार आणि आयुक्त पालीवाल सर्व घोटाळेबाजांसह जेलमध्ये जाणार हे त्यांनी लक्षात ठेवावे. ambulance charges hike India

    ambulance service hike


    दर आठवड्याला एक घोटाळा उघडकीस आणणार

    चंद्रपूर शहराची दुर्दशा करणाऱ्या महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी जनविकास सेना दर आठवड्याला एक घोटाळा उघडकीस आणणार आहे. सोबतच एक लक्ष स्वाक्षऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करून पुराव्यासह सर्व घोटाळ्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येईल. या तक्रारीच्या अनुषंगाने एसआयटी मार्फत चौकशी व कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.