man arrested for killing father in law | रिकामटेकड्या घरजावयाचा राक्षसी चेहरा! सासऱ्याचा काठीने वार करून खून

man arrested for killing father in law

man arrested for killing father in law : वरोरा शहरातील सरदार पटेल वॉर्डात घडलेल्या एक धक्कादायक घटनेत जावयाने सासऱ्याचा काठीने मारहाण करत खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांच्या सांगण्यानुसार, आरोपी जावई हा रिकामटेकडा होता, तो दारू पिऊन नेहमी पत्नीला शिवीगाळ व मारहाण करीत होता यावर नेहमीच जावई व सासऱ्याचे आपसात खटके उडायचे, माझ्या मुलीला त्रास देऊ नको असे बोलल्याने रागाच्या भरात जावयाने सासऱ्यावर हल्ला चढवला. drunk son in law assaults father in law

१३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर महिलेच्या मदतीने बलात्कार करणाऱ्या आरोपीला २० वर्षाची शिक्षा

मृत व्यक्तीचे नाव मुकुंदा हनुमंत देवकर (वय ७०) असे असून, आरोपी जावयाचे नाव दासा लक्ष्मण इटकर (वय ३७) आहे. हे दोघेही सरदार पटेल वॉर्ड, वडारपुरा, वरोरा येथील रहिवासी आहेत. ही दुर्दैवी घटना २१ मे २०२५ रोजी दुपारी १.३० ते २.०० वाजण्याच्या सुमारास घडली.

Powered by myUpchar

नेमकं काय घडलं?

आरोपी जावई दासा इटकर व त्याची पत्नी सुशीला इटकर आधी मालवीय वॉर्ड मध्ये राहत होते, परंतु दासा इटकर हे कसलेही कामधंदा करीत नसल्याने ते रोज दारू पिऊन पत्नीला त्रास द्यायचा, त्यानंतर पती-पत्नी हे सरदार पटेल वॉर्डात भाड्याने रहायला आले.

दासा चा सतत त्रास सुरु असल्याने सुशीला आपल्या मुलीला सोबत घेऊन माहेरी रहायला आली होती, सुशीला च्या मागे तिचा पती दासा सासरी घर जावई म्हणून राहू लागला, सुशीला हि कामावर जायची, त्यानंतर सुद्धा दासा हा दारू पिऊन सुशीला च्या चारित्र्यावर संशय घेत होता.

एकतरी मर्डर करणार

त्यामुळे सुशीलाचे वडील ७० वर्षीय मुकुंदा हनुमंतु देवकर यांनी दासा म्हटले कि तू नुसता दारू पितो,स्वतः काही कामधंदा करीत नाही, सुशीला कामावर जाते त्यानंतर तू तिला त्रास का देतो असे ते बोलत रहायचे. त्यावर दासा ला राग यायचा तो म्हणायचं कि तुमच्या घरात एक तरी मर्डर करणार, अशी धमकी तो द्यायचा.

२१ मे रोजी सुशीला हि आपल्या मुलीसोबत कामावर गेली होती, मुकुंदा चे दोन्ही मुले आपल्या कामावर गेले त्यावेळी मुकुंदा हा घरी एकटा होता, सुशीलाचे वडील घरी एकटे असल्याची संधी साधत जावई दासा ने त्यांच्याशी वाद घातला व लाकडी दांड्याने मुकुंदा यांना मारहाण केली. या मारहाणीत मुकूंदा हे गंभीर जखमी झाले. 70 year old man killed by son in law

याबाबत शेजाऱ्यांनी मुकुंदाच्या मुलीला व मुलाला याबाबत माहिती दिली, रुग्णालयात उपचाराला नेल्यावर डॉक्टरांनी मुकुंदा यांना मृत घोषित केले. याबाबत मुकुंदाच्या मुलाने वरोरा पोलीस ठाण्यात जावई दासा इटकर विरोधात तक्रार दिली.

मुलीला का त्रास देतो यावरून सुशीलाच्या वडिलांनी जावयाला टोकायचे काम केले म्हणून त्या गोष्टीचा राग मनात ठेवत जावयाने सासऱ्याची मारहाण करीत हत्या केली. पोलिसात तक्रार दाखल झाल्यावर आरोपी जावई दासा इटकर ला अटक करण्यात आली.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *