Tag: चंद्रपूर महानगरपालिका

  • chandrapur ganesh murti market 2025 । पीओपी गणेश मूर्ती विकल्यास फसवणुकीचा गुन्हा होणार दाखल

    chandrapur ganesh murti market 2025

    chandrapur ganesh murti market 2025 : चंद्रपूर १० जुलै  – आगामी श्रीगणेशोत्सव काळात यंदाही चांदा क्लब येथे श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले असुन श्री गणेश मूर्ती दुकानांवर होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये व नागरिकांना सहजतेने मूर्ती खरेदी करून घरी नेता याव्या या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी गणेश मंडळे,मूर्तिविक्रेते व मुर्तीकार संघटनांच्या संयुक्त बैठकीत सांगितले.    

    चंद्रपुरात पाणीपट्टी कराची वसुली करण्यासाठी आता वॉर्ड सखी येणार

       लवकरच गणेशोत्वास सुरवात होणार असुन मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात अधिकांश घरी गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. मूर्ती विक्री करणारे अनेक मूर्तिविक्रेते हे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी गणेशमूर्तीची विक्री करत असल्याने नागरिकांना मूर्ती खरेदीस गर्दीच्या ठिकाणी जाण्याशिवाय पर्याय नसतो.यावर उपाय म्हणुन यावर्षी मागील वर्षी प्रायोगिक तत्वावर चांदा क्लब येथील प्रशस्त मैदानावर मूर्तिकारांना मूर्तिविक्रीसाठी जागा मनपाने उपलब्ध करून दिली होती व त्यात जवळपास 250 स्टॉल्स लागुन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता.  


         चांदा क्लब येथे येथे स्टॉल्स, पेंडॉल व्यवस्था मूर्ती विक्रेत्यांना स्वतः करावयाची असुन विद्यूत व्यवस्थेसाठी पॉईंट, फिरते शौचालय,स्वच्छतेची व्यवस्था,पाणी टँकर मनपा प्रशासनातर्फे करून दिली जाणार आहे. नोंदणी न करता मूर्ती विक्री व साहित्य विक्री करणाऱ्यावर तसेच मनपाने निश्चित करून दिलेल्या जागेशिवाय इतरत्र विशेषतः फुटपाथवर मुर्ती विक्री करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. municipal rules for ganesh festival   

         सर्वांच्या सहकार्याने मागील वर्षी पर्यंत पीओपी मूर्ती बंदी 100 टक्के यशस्वी झाली होती. यंदा मा. उच्च न्यायालयाने पीओपी गणेश मूर्ती तयार करणे आणि विक्री करण्यावर असलेली बंदी उठवली आहे. मात्र, या मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम तलावांमध्येच करण्याची अट ठेवली आहे. त्यामुळे बंधन नाही मात्र मातीच्याच मूर्तींची खरेदी – विक्री करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  

    मूर्तींची उंची –

      सर्व मोठ्या मूर्ती या जटपुरा गेट येथूनच जात असल्याने त्यानुसारच मूर्तीची उंची गणेश मंडळांनी ठेवायाची आहे.

    एक खिडकी प्रणाली – 

     सार्वजनीक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या या एकाच ठिकाणाहुन मिळाव्या यासाठी एक खिडकी प्रणाली सुरु करण्यात येणार असुन गणेशोत्सव सुरु होण्याच्या 2 दिवस आधी ती बंद होणार आहे. ज्या मंडळांनी ठराविक काळात परवानगी घेतली नाही त्यांना परवानगी मिळणार नाही. one window system for ganesh mandals

    दुकानांवर व पावतीवर मूर्तीचा प्रकार लिहणे आवश्यक –

      मूर्ती विक्रेत्यानां त्यांच्या दुकानाच्या पाटीवर तसेच विक्रीच्या पावतीवर मूर्ती मातीची आहे अथवा पीओपीची आहे हे लिहणे बंधनकारक आहे.मातीची सांगुन पीओपी मूर्ती विकल्यास त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. ganesh idol height limit municipal order

  • chandrapur mahanagar palika ward sakhi । वॉर्ड सखी येणार दारात, चंद्रपूर मनपाची नवी स्मार्ट सेवा

    chandrapur mahanagar palika ward sakhi

    chandrapur mahanagar palika ward sakhi : चंद्रपूर 9 जुलै – चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने पाणीपट्टी कराची वसुली अधिक प्रभावीपणे करण्यासाठी घरोघरी भेट देऊन कर वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी 69 वॉर्डसखी चंद्रपूर मनपातर्फे नेमण्यात आल्या असुन आता घरीच पाणी देयक भरण्याची सुविधा नागरिकांना मिळत आहे. local tax collection by ward volunteers

    अतिवृष्टीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ४६ मार्ग बंद


       या मोहिमेंतर्गत वॉर्डसखी थेट नागरिकांच्या घरी जाऊन पाणीपट्टी कराची माहिती देत असून, त्यांच्याकडून थेट कर वसुली देखील करण्यात येत आहे. ही कार्यपद्धती पारदर्शक असून प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन देयक भरण्याचा नागरिकांचा त्रास वाचणार आहे. पाण्याचे देयक प्राप्त होताच 15 दिवसांच्या आत ऑनलाईन पद्धतीने कर भरल्यास नागरिकांना 10% सवलत तर नंतरच्या 15 दिवसात देयक अदा करणाऱ्यांना 5 टक्के सवलत दिली जात आहे.


       सर्व वॉर्ड सखींना मनपातर्फे पीओएस मशीन (Point of Sale) देण्यात आली असुन याद्वारे त्यांना नागरिकांकडून ऑनलाईन देयक भरून घेता येते. भरलेल्या देयकाची पावती ही दुसऱ्या दिवशी वॉर्डसखींद्वारे प्रत्यक्ष रूपात देण्यात येईल. देयक भरतांना कुणीही रोख रकमेचा वापर करू नये अथवा रोख रक्कम वॉर्ड सखींना देऊ नये ,ही सेवा केवळ ऑनलाईन कराचा भरणा करण्यासाठी असल्याने या सुविधेचा वापर करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

    ओळखपत्राद्वारे करावी खात्री –

         चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सर्व वॉर्डसखींना मनपाचे ओळखपत्र देण्यात आले असुन त्याद्वारे सदर व्यक्ती अधिकृत असल्याची खात्री करता येईल. त्याचबरोबर मनपाच्या वेबसाईटवर त्यांचा नियुक्ती आदेश,त्यांची यादी,मोबाईल क्रमांक व फोटो उपलब्ध असुन त्याद्वारे सुद्धा खात्री करता येते.      

    कर भरण्याकरिता खालील माध्यमांचा वापर करता येईल:

    पीओएस मशीनद्वारे
    क्यूआर कोडद्वारे
    गुगल पे
    फोन पे

  • Reconstruction of Chandrapur roads । चंद्रपूरच्या रस्त्यांचे ‘पुनर्जन्म’! नागरिक म्हणतात – आता खड्डे नाहीत!

    Reconstruction of Chandrapur roads

    Reconstruction of Chandrapur roads : चंद्रपूर 8 जुलै – शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 (Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation) योजनेअंतर्गत महत्त्वाचे प्रकल्प मनपातर्फे हाती घेण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत वाढीव पाणीपुरवठा यंत्रणा तसेच मलनिःस्सारण योजनेच्या कामासाठी शहरातील विविध भागांमध्ये अनेक रस्त्यांवर खोदकाम करावे लागले होते. या रस्त्यांचे पुनर्बांधकाम, मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे.

    ऑनलाईन गेमिंगविरोधात कठोर कायदे करा – आमदार जोरगेवार

         पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात आजपावेतो 47 किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली असुन विठ्ठल मंदिर,ठक्कर कॉलोनी,पठाणपुरा,एकोरी वॉर्ड येथील रस्त्यांचे काम पुर्ण करण्यात येत आहे.इरई धरणावर नवीन इंटेक वेल व जॅकवेलचे काम प्रस्तावित असुन येथुन अतिरिक्त पाणी उचल करण्यात येणार आहे. तसेच तुकूम येथे 53 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत असुन 6 नवीन जलकुंभ सुद्धा उभारण्यात येणार आहे. तर 38 हजार नवीन नळ जोडणी करण्यात येणार आहे. AMRUT 2.0 योजना

    या भागातील रस्त्याचे पुनर्बांधकाम

        मलनिःस्सारण योजनेअंतर्गत 32 किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली असुन पागल बाबा नगर,विठ्ठल मंदिर,ठक्कर कॉलोनी,बाबुपेठ, गोपाळपुरी,नरेंद्रनगर इंडस्ट्रिअल येथील रस्ता पुनर्बांधणीचे काम सुरु आहे.शहराची वाढती लोकसंख्या बघता मलनिःस्सारणाची योग्य व्यवस्था हे दीर्घकालीन नियोजनाचे पाऊल आहे. sewerage projects

       यामुळे मोकळ्या नाल्यांमध्ये सांडपाणी जाण्याऐवजी ते प्रक्रिया केंद्रात गेल्याने शहरात दुर्गंधी आणि घाणीचे प्रमाण कमी होणार आहे. पुनर्वापर केलेले सांडपाणी बागायती,सिमेंट उद्योग,औद्योगिक वापर,वाटर स्प्रे बांधकामासाठी वापरता येईल. खुल्या नाल्यांमुळे रोगकारक जंतु व जी दुर्गंधी पसरते त्यावर मलनिःस्सारण प्रकल्पामुळे आळा घालता येऊ शकतो. तसेच यामुळे सुदृढ आरोग्य पातळीत वाढ होऊन मच्छरांचा त्रासही कमी होतो.  

       
         सदर कामांमुळे काही भागांतील नागरिकांना तात्पुरती गैरसोय झाली असली, तरी या दीर्घकालीन प्रकल्पांमुळे शहराला भक्कम व टिकाऊ पायाभूत सुविधा प्राप्त होणार आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

  • bjp municipal election strategy chandrapur । चंद्रपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपची स्ट्रॅटेजी ठरली, पालिकेत एकहाती सत्ता मिळवणार!

    bjp municipal election strategy chandrapur

    bjp municipal election strategy chandrapur : चंद्रपूर – आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आज येथे मोठ्या संख्येने जमलेला कार्यकर्ता वर्ग याची साक्ष देणारा आहे. आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर पक्षाच्या माध्यमातून जनतेसाठी काम करण्याची दिसणारी जिद्द आणि विजयाचा संकल्प या भरोशावर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता आणू, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी केले.

    कोब्रा व मुजोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने कन्यका सभागृहात मनपा निवडणूक आढावा बैठक, महानगर अध्यक्ष आणि नवनियुक्त मंडळ अध्यक्ष सत्कार समारंभ तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह नियोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

    या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप नेते अशोक जिवतोडे, माजी महापौर राखी कंचर्लावार, माजी उपमहापौर अनिल फुलझले, नेते विजय राऊत, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर आहिर, माजी नगरसेवक संजय कंचर्लावार, माजी संत मनीष महाराज, तुषार सोम, दशरथसिंह ठाकूर, नामदेव डाहुले, रवी आसवानी, ऍड. सुरेश तालेवार  राजेंद्र अडपेवार, अरुण तिखे,  राहुल घोटेकर, श्याम कणकम, रवी गुरनूले, शीतल गुरनूले, कल्पना बबूलकर, वंदना तिखे, शीतल आश्राम, माया उईके, सारिका नंदुरकर, वंदना जांभुळकर, शीला चौव्हाण, शीतल कुळमेथे, संगीता खांडेकर, आशिष मासिरकर, वंदना हातगावकर, सविता दंढारे, सायली येरणे, अमोल शेंडे, राशिद हुसेन, जितेश कुळमेथे, करणसिंह बैस, कार्तिक बोरेवार, संजय तिवारी आदींची उपस्थिती होती.

    यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांच्यासह नवनियुक्त मंडळ अध्यक्ष सुभाष अदमाने, स्वप्निल डुकरे, रवी जोगी, सारिका नंदुरकर, प्रदीप किरमे यांचा पालकमंत्री अशोक उईके आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    bjp chandrapur 2025 municipal election planning

    यानंतर पुढे बोलताना पालकमंत्री ना. उईके म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. (ashok uike guardian minister chandrapur updates)येथे कार्यकर्त्यांना नेहमीच सन्मान दिला जातो. मात्र पक्षात काम करत असताना कार्यकर्त्यांसाठी एक संस्कारपूर्ण आचारसंहिता आहे. जनतेची कामे करताना सौजन्याने वागले पाहिजे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पक्ष नेहमीच त्याच्या कामाची पावती देतो. आपण काम करत असताना पक्षाचा विचार आणि धोरण प्रत्येक घरी पोहोचविले पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्यात पक्ष खूप मोठा झाला आहे. कार्यकर्त्यांसाठी समर्पित असलेले किशोर जोरगेवार यांसारखे नेतृत्व आपल्याला लाभले आहे. या ताकदीवर आपण सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकून पक्ष अधिक बळकट करू, असा विश्वास यावेळी पालकमंत्री उईके यांनी व्यक्त केला. bjp chandrapur 2025 municipal election planning


    नव्या पदाधिकाऱ्यांसह पक्षाच्या नव्या संघटन पर्वाची सुरुवात – आ. किशोर जोरगेवार

    नवीन मंडळ अध्यक्षांची आपण निवड केली आहे. या मंडळ अध्यक्षांना सोबत घेऊन महानगर अध्यक्षांनी जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम करावे. भारतीय जनता पक्ष हा केवळ व्यक्तीकेंद्रीत पक्ष नाही. हा पक्ष म्हणजे विचार, मूल्ये आणि जनसेवेचा सातत्यपूर्ण ध्यास आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाची ऊर्जा आहे. पक्षाची धोरणे आणि विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. kishor jorgewar bjp leadership speech

    आपल्या समोर महानगरपालिकेच्या निवडणुका उभ्या आहेत. ही केवळ निवडणूक नाही, तर आपल्या कामाचं आणि सेवाभावाचं मूल्य जनतेसमोर मांडण्याची संधी आहे. पक्षाच्या संघटनेत नवीन दमदार नेतृत्वाची भर पडली आहे. मंडळ अध्यक्ष नुकतेच नव्याने नियुक्त झाले आहेत. तुमच्यावर पक्षाने मोठा विश्वास टाकला आहे. हा विश्वास म्हणजे जबाबदारी, सेवा आणि समर्पण याचं प्रतीक आहे. मंडळ हे संघटनेचं मूलभूत स्तर आहे. आपल्या सोबत असलेला जनतेचा विश्वास आणखी दृढ करत एकजुटीने, निर्धाराने आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्याम हेडाऊ यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

  • poor drainage system problems in urban । अनोखं आंदोलन, चंद्रपुरात खड्ड्यांना श्रद्धांजली

    poor drainage system problems in urban

    poor drainage system problems in urban : चंद्रपूर ४ जुलै – चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या बाबूपेठ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर प्रभाग, जो की दलित वस्ती म्हणून ओळखला जातो, या ठिकाणी मलनिसारण योजनेच्या अंतर्गत सुरू असलेले काम अत्यंत हलक्या दर्जाचे व निष्कृष्ट पद्धतीने केले जात असल्याची तीव्र प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

    काम आहे मात्र नोंद नाही, सुरक्षारक्षकांच्या समस्येबाबत आमदार जोरगेवार यांनी वेधले सरकारचे लक्ष

    या योजनेमुळे संपूर्ण रस्ते खड्ड्यांनी भरले असून नागरिकांना अत्यंत गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. पावसाळ्याच्या काळात हे खड्डे पाण्याखाली जाऊन अधिक धोकादायक ठरत आहेत. नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही महानगरपालिका प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. civic negligence and pothole accidents

    खड्ड्यांना श्रद्धांजली

    आज या अन्यायकारक आणि बेजबाबदार वागणुकीविरोधात आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष श्री. राजू कुडे यांच्या नेतृत्वात नागरिकांना सोबत घेऊन खड्ड्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या मनातील संताप व्यक्त केला. खड्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.” pothole protest by citizens against municipal corporation

    या आंदोलनामध्ये आपचे प्रदेश सहसचिव सुनील भाऊ मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, शहराध्यक्ष योगेश गोखकरे, संघटन मंत्री संतोष बोपचे, बाबूपेठ अध्यक्ष राजू भाऊ तोडासे, अनुप तेलतुंबडे, मनीष राऊत, अजय बाथव, रजनीताई गड्डेवार, किरण ताई कुमरवार, रावलकर ताई इत्यादी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते व त्यांनी महानगरपालिकेच्या कामकाजाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

  • monsoon safety rules for old buildings । 🏚️ पावसाळ्यात चंद्रपुरातील जुन्या इमारतींचा धोका वाढतोय!

    monsoon safety rules for old buildings

    monsoon safety rules for old buildings : चंद्रपूर ४ जुलै – महापालिका क्षेत्रातील शिकस्त इमारतींपासून परिसरातील रहिवाशांच्या जीविताला निर्माण होऊ शकणारा संभाव्य धोका पाहता चंद्रपूर महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरवात केली असुन मागील काही दिवसात 62 जीर्ण इमारतींना नोटीस देण्यात आली आहे.  

    शहरात आली हायटेक नालेसफाई यंत्र

        पावसाळ्यात दरवर्षी महापालिका क्षेत्रातील जीर्ण व शिकस्त इमारतींचा सर्व्हे करण्यात येतो. यात आढळलेल्या धोकादायक इमारतीतील रहिवाश्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 चे कलम 264 अन्वये नोटीस जाहीर करण्यात येते. चंद्रपूर मनपातर्फे झोन 1 अंतर्गत 30, झोन 2 अंतर्गत 20 तर झोन 3 अंतर्गत 12 अश्या एकुण 62 धोकादायक इमारतींना नोटीस देण्यात आली आहे. notice to vacate unsafe buildings by municipality 

    अभियंता कडून सर्व्हेक्षण करा

       नोटीसनुसार धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्यास असलेल्या सर्व व्यक्तींना व महत्वाचे साहित्य अन्यत्र सुरक्षित ठिकाणी तात्काळ स्थलांतरीत होण्यास सांगण्यात आले असुन त्वरित आपल्या इमारतीची दुरुस्ती करुन घेण्याचे तसेच त्यांनतर आपल्या इमारतीचे नोंदणीकृत स्ट्रक्चरल अभियंता यांचेकडून सर्वेक्षण करुन त्याबाबतचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट मनपा कार्यालयास सादर करण्यास कळविण्यात आले आहे.

     
      अश्या 6 इमारती यापुर्वी मनपाने निर्लेखित केल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी सदर कारवाई दरवर्षी मनपातर्फे करण्यात येते मात्र काही मालमत्ताधारक जिवाची पर्वा न करता त्याच इमारतीत तळ ठोकून राहतात. यामुळे परिसरातील रहिवाशांच्या जिवालासुद्धा धोका निर्माण होतो. मग अश्या प्रसंगी निष्कासीत करण्याची अथवा नियमानुसार कारवाई मनपातर्फे करण्यात येते.

  • sewage suction machine for city drainage system । 🛠️ स्मार्ट सिटीची वाटचाल! चंद्रपूर शहरात आली हायटेक नालेसफाई यंत्रणा!

    sewage suction machine for city drainage system

    sewage suction machine for city drainage system : चंद्रपूर 4 जुलै – चंद्रपूर शहरात नाली सफाईचा कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात आजपासून ‘ट्रक माउंटेड – हाय सिवेज सक्शन मशीन’ (Truck Mounted – High Sewage Suction Machine) कार्यान्वित करण्यात आली आहे.

    बोगस शिक्षक व शालार्थ आयडी घोटाळ्याची होणार एसआयटी चौकशी

       सदर मशीनद्वारे आता शहरातील विविध भागांतील भूमिगत नाले,गटार, मेनहोल्स, व नाल्यांची सफाई अधिक जलद, कार्यक्षम आणि यांत्रिक पद्धतीने होणार आहे. पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या स्वच्छता कार्यात लागणारा वेळ आणि श्रम यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार असून, विशेषतः पावसाळ्यातील नालेसफाई अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व स्वच्छता विभागाच्या देखरेखीखाली मशीनचे ट्रायल रन करण्यात आले. modern technology in urban sewage cleaning


      यावेळी मशीनची शोषण क्षमता, दाब नियंत्रण, आणि जलप्रवाह व्यवस्थापन याची तपासणी करण्यात आली.सदर मशीनची क्षमता ही 4000 लिटरची असुन बंद गटारांमधून त्वरित सांडपाणी काढण्यासाठी, पावसाळ्यात नाले तुंबल्यास तत्काळ सफाईसाठी, गंध व दुर्गंधीमुक्त परिसर राखण्यासाठी विशेषतः उपयुक्त ठरणार आहे. सीवेज लाइन्स, ड्रेनेज सिस्टीम आणि इतर भागातील मलबा, गाळ आणि द्रव काढण्यासाठी हे मशीन शक्तिशाली सक्शन वापरते. मनपाच्या वतीने ही आधुनिक मशीन सार्वजनिक सेवेसाठी समर्पित करण्यात येत आहे. यामुळे शहर स्वच्छतेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे.

    हे कसे कार्य करते:

    मशीनमध्ये एक शक्तिशाली सक्शन पंप आहे जो नोजल किंवा ट्यूबद्वारे सीवेज लाइनमध्ये सक्शन तयार करतो. हे सक्शन मशीनच्या टाकीमध्ये चिखल आणि द्रव खेचते. नंतर टाकी रिकामी करून ती कचरा विल्हेवाटीसाठी नेली जाऊ शकते.

    फायदे:

    कार्यक्षमता: ही मशीन कमी वेळेत सांडपाणी साफ करू शकते.
    परिणामकारकता: ही मशीन मोठ्या प्रमाणातील नालीचा गाळ व चिखल देखील काढू शकते.
    सुरक्षा: ही मशीन सफाई कामगारांना धोकादायक परिस्थितीत काम करण्यापासून वाचवते.
    पर्यावरण संरक्षण: हे यंत्र सांडपाणी स्वच्छ करून पर्यावरणाचे प्रदूषणापासून संरक्षण करते.
    खर्च प्रभावी: या यंत्रामुळे सांडपाणी साफ करण्याचा खर्च कमी होऊ शकतो.

  • mosquito control campaign municipal corporation । 🦟 चंद्रपुरात डास नियंत्रण मोहिमेला सुरुवात! तुमच्या घरातही येणार तपासणी टीम

    mosquito control campaign municipal corporation

    mosquito control campaign municipal corporation : चंद्रपूर 3 जुलै – मनपा आरोग्य विभागामार्फत संभाव्य डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविण्यात येत असुन या अंतर्गत आरोग्य चमु शहरातल्या प्रत्येक घरांची तपासणी करणार असल्याने घरी येणाऱ्या ब्रिडींग चेकर्सना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. signs of dengue in rainy season

    चंद्रपुरात मित्रासाठी बांधली ९५ लाखांची संरक्षण भिंत

       
         पावसाळा सुरु होताच डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांचा प्रसार होण्यास सुरवात होते. पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे,घरातील कूलर,टायर,कुंड्या खालील प्लेट,फ्रीज खालील ट्रे,पाण्याचे ड्रम, फिश टँक, एसीचे पाणी पडणारे कंटेनर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात. या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे व नागरीकांना सचेत करणे यासाठी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात डॉ. नयना उत्तरवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात 28 ब्रिडींग चेकर्स,32 एएनएम, 22 एमपीडब्लु व 170 आशा वर्कर तसेच स्वच्छता निरीक्षक यांच्याद्वारे डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे.  


         डेंग्यु डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे आपल्या घराची स्व- तपासणी करणे देखील आवश्यक आहे.प्रत्येकाने आपल्या घरातील पाणी साठवण्याची भांडी आठवड्यातून एकदा कोरडी करून,पुसून वाळवणे आवश्यक आहे  जेणेकरून डास अंडी निर्माण होणार नाही. डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाकणे, पाणी साठा मोठा असले तर त्यात गप्पी मासे टाकणे आवश्यक आहे. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी खाऊन टाकतात ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो. डेंग्यु डासाची उत्पत्ती टाळणे आवश्यक असल्याने आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा. mosquito control campaign municipal corporation

    signs of dengue in rainy season

    लक्षणे

        – डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यूताप व डेंग्यू रक्तस्रावी ताप हे मुख्य आजार आहेत. ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या खोबणीमधे दुखणे, पाठदुखी, डोकेदुखी, स्नायूमध्ये वेदना, सांधेदुखी ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत.ताप आल्यास वैद्यकीय सल्ला शिवाय कुठलीही औषधे घेऊ नये. वस्तुतः डेंग्यू हा सामान्य आजार आहे परंतु सर्वसामान्यांना  या रोगाबाबत माहिती नसल्याने किंवा अपुरी माहिती असल्याने काही वेळा तो जीवघेणा ठरू शकतो. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे याबाबत नागरिकांना वारंवार माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे.  

     बचाव कसा करावा

         –  संभाव्य डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांच्या प्रतिबंधास पुढील काही दिवस महत्वाचे आहेत. प्रत्येक घरातील एका व्यक्तीने दररोज फक्त दहा मिनिटे पुढील दहा आठवडे घराची पाणी साचलेले सर्व कंटेनर यांची स्व तपासणी केल्यास निश्चितच डेंग्यू आजारापासून बचाव होऊ शकतो. आधी ज्या घरांमध्ये रुग्ण आढळले होते ते व संभाव्य दुषित घरे यावर विशेष लक्ष ठेवले जात असुन नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

  • sewer line construction hazards in rainy season । भर पावसात रस्त्याचं खोदकाम, नागरिकांच्या जिवाशी खेळ!, AAPचा इशारा

    sewer line construction hazards in rainy season

    sewer line construction hazards in rainy season : चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरात भर पावसाळ्यात सुरू असलेले सिव्हरेजचे खोदकाम नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून, यामुळे अनेक रस्ते पूर्णतः बंद झाले आहेत. या खोदकामामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी महानगरपालिकेला निवेदन देऊन काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.

    मूल पोलिसांच्या कौतुकास्पद कार्याची सर्वत्र चर्चा

    निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, रस्त्यावर झालेले खड्डे अपघाताला आमंत्रण देत असून, यामध्ये शाळकरी विद्यार्थी, महिला व वृद्ध नागरिक यांना इजा झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. तसेच, पावसामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, नव्याने तयार करण्यात आलेल्या चेंबरांना भेगा पडत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे.

    आम आदमी पार्टीने पुढील तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:

    1. भर पावसाळ्यात सुरू असलेले सिव्हरेजचे काम तात्काळ थांबवावे.
    2. खोदकामामुळे निर्माण झालेले खड्डे त्वरित बुजवून वाहतूक सुरळीत करावी.
    3. काम पूर्ण झालेल्या भागात दर्जेदार काँक्रीटीकरण करावे.

    या मागण्या दोन दिवसांत मान्य न झाल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजू कुडे यांनी दिला आहे.

  • e-office system in municipal corporation । 📂 चंद्रपूर मनपात ई-कारभाराची नवी सुरुवात – आता सर्व काही ऑनलाईन!

    e-office system in municipal corporation

    e-office system in municipal corporation : चंद्रपूर 1 जुलै  – प्रशासकीय कारभार गतीमान आणि पेपर लेस करण्यासाठी आता चंद्रपूर महानगरपालिकेने ‘ई-ऑफीस प्रणाली’ कार्यान्वित केली असुन जी कामे ऑफलाईन पद्धतीने आतापर्यंत सुरु होती ती आता ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. यामुळे मनपात येणाऱ्या सर्व कागदपत्रांचे डिजीटल ट्रॅकिंग करणे आता शक्य होणार आहे. आतापर्यंत मनपात 649 फाईल या ई-ऑफीस प्रणालीवर ऑनलाईन करण्यात आल्या आहेत.

    २१ गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुन्हेगाराला पोलिसांनी केले स्थानबद्ध

       
       100 दिवस कृती आराखडा मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर राज्य शासनाद्वारे (Future Roadmap) भविष्यातील वाटचाल अंतर्गत विकसित महाराष्ट्र,ई गव्हर्नन्स रिफॉर्म्स व सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या 3 मुद्द्यांवर केंद्रीत 150 दिवसांची मोहीम 6 मे ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सुरु करण्यात आली आहे.यात ऑनलाईन पद्धतीने जलद गतीने कामे करण्यास प्राधान्य देण्यात येत असुन प्रत्येक शासकीय कार्यालयात ई ऑफीसचा वापर सुरु करण्यात येत आहे. e-office implementation in local bodies

             
       महानगरपालिकेत दररोज मोठ्या प्रमाणात टपालांची आवक जावक नोंद होते. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या हस्ते पारंपारीक पद्धत टपाल संबंधित विभागाच्या टेबलवर पोहचवले जाते. त्यामुळे अनेकदा टपाल विभागप्रमुखांपर्यंत पोहचायला उशीर लागतो तर कधी कधी टपाल गहाळ होण्याचाही धोका असतो. त्यामुळे या सर्व प्रकाराला पायबंद घालतानाच ई ऑफीस प्रणाली सुरू करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल हे आग्रही होते.  मनपाच्या सर्व विभागांनी आता ई प्रणालीचा वापर सुरु केल्याने आलेल्या तक्रारींचे डिजीटल ट्रॅकिंग शक्य होणार असुन मनपाचे सर्व विभाग या प्रणालीशी जोडले जाऊन आता मनुष्यबळ, वेळ आणि कागदावरील खर्चही वाचणार आहे.  

    काय आहे ई ऑफीस प्रणाली –

      ई – ऑफिस प्रणाली म्हणजे शासकीय कामकाज कागदविरहित (पेपरलेस) करणे. सध्या शासनात फायलींचा प्रदीर्घ प्रवास होतो. त्याऐवजी संगणकावरून अधिकाधिक कामकाज करण्यात येणार. मनपाच्या आवक-जावक कक्षात आवक-जावकची ई ऑफीस प्रणालीवर स्कॅनिंग करून नोंद केली जाईल. पोहच देताना त्यावर ऑनलाईन नोंद झालेला डिजीटल क्रमांकही असेल, त्यामुळे या क्रमांकावरूनच आपल्या तक्रारीची, इतर अर्जाचे पुढे काय झाले, हे ट्रॅकिंग करणे सुलभ होणार आहे. संबंधित टपाल हे ज्या त्या विभागाकडे पाठविले जाईल तिथुन विभागप्रमुख आणि त्या पुढे आवश्यतेनुसार उपायुक्त,अतिरिक्त आयुक्त व आयुक्त यांच्याकडे संबंधित फाईल संगणकावरूनच पुढे पाठविली जाईल.

    विभागप्रमुखांसह कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

    महानगरपालिका क्षेत्रात ई-ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या सूचनांनुसार, मनपा स्तरावरील कार्यालयांमध्ये तैनात असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई-ऑफिस प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.