Tag: चंद्रपूर महानगरपालिका

  • AMRUT scheme corruption case Chandrapur | AMRUT योजनेचा वापर की भ्रष्टाचाराचा महास्फोट? पप्पू देशमुखांचा मोठा आरोप!

    AMRUT scheme corruption case Chandrapur

    AMRUT scheme corruption case Chandrapur : चंद्रपूर : २३४ कोटी रूपयांची अमृत-१ व २७० कोटी रूपयांची अमृत-२ पाणीपुरवठा योजना, ५०६ कोटी रूपयांची अमृत मलनिस्सारण योजना तसेच शहरात विविध ठिकाणी फाउंटेन लावणे, रामाळा तलाव पुनर्जीवन व सौंदर्यीकरण,१०० कोटी रूपयांचे कचरा संकलन व वाहतुकीचे काम, मालमत्ता कर मुल्यांकन प्रसिद्धीचे कंत्राट, कोरोना काळात भोजन पुरविणे, मालमत्तेचे फेर मुल्यांकन अशा कोट्यावधी रुपयांच्या विविध कामांमध्ये गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याची लेखी तक्रार मनपाचे माजी नगरसेवक व जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव यांना केली होती.

    अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू, आता आयोग उतरले मैदानात

    विविध कामातील घोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी दिनांक 12 जुलै 2024 रोजी देशमुख यांनी मंत्रालयातील नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव कार्यालयात पत्र दिले. मात्र मनपातील घोटाळ्यांची चौकशी करण्याऐवजी नगर विकास विभागाने मनपाचे भ्रष्ट आयुक्त विपिन पालीवाल यांना पदोन्नती दिली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या देशमुख यांनी दिनांक 24 जून 2025 ला प्रधान सचिवांना पत्र देऊन न्यायालयात फौजदारी याचिका टाकण्याचा इशारा दिला. एवढेच नव्हे तर फौजदारी याचिकेमध्ये थेट प्रधान सचिवांना गैरअर्जदार करण्यात लेखी इशारा सुद्धा त्यांनी दिला. promotion of corrupt municipal commissioner case


    चंद्रपूर महानगरपालिकेत आतापर्यंत झालेल्या सर्व घोटाळ्यांना तसेच भ्रष्ट आयुक्त विपिन पालीवाल यांना मंत्रालयातील नगर विकास विभागाचे संरक्षण असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.भ्रष्ट आयुक्त पालीवाल यांना पदोन्नतीचे बक्षीस देणाऱ्या नगर विकास विभागातील अधिकाऱ्यांविरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे देशमुख यांनी लेखी तक्रार केली.

    आमदार सुधाकर अडबाले ‘हक्कभंग’ प्रस्ताव मांडणार

    माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी मनपातील भ्रष्टाचाराबाबत नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांना पत्र दिले होते. आमदार अडबाले यांनी 12 जुलै 2024 रोजी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र देऊन मनपातील सर्व घोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. SIT investigation demand in urban development scams

    मात्र आजपावेतो प्रधान सचिव कार्यालयाने या प्रकरणाबाबत आमदार अडबाले यांना कोणतीही माहिती पुरविली नाही.त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडणार व चंद्रपूर मनपा तसेच नगर विकास विभागाच्या सर्व भ्रष्ट अधिकारी यांच्या विरुद्ध कारवाई करण्याकरिता पाठपुरावा करणार असे आश्वासन आमदार अडबाले यांनी माजी नगरसेवक देशमुख यांच्याशी चर्चा करतांना दिले.

  • private companies misusing government property । खासगी कंपनीकडून सरकारी मालमत्तेचा वापर; बेले यांनी केले धक्कादायक खुलासे

    private companies misusing government property

    private companies misusing government property : चंद्रपूर, [२७ जून]: चंद्रपूर शहरातील पठाणपुरा येथील मल्लनिसारण शुद्धीकरण केंद्राच्या शासकीय जागेवर विश्वराज एन्व्हायरमेंट प्रा. लि. या खासगी कंपनीने बेकायदेशीरपणे सोलर पॅनल लावून अतिक्रमण केल्याचा आरोप संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

    चंद्रपुरात बायपास मार्गाची नितांत गरज – खासदार धानोरकर

    मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील मल्लनिसारण शुद्धीकरण केंद्राच्या जागेवर विश्वराज एन्व्हायरमेंट प्रा. लि. या खासगी कंपनीने अवैधरित्या आपली खासगी मालमत्ता, म्हणजेच सोलर पॅनल, स्थापित केले आहेत. या गंभीर आरोपांसोबतच, चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त श्री. विपिन पालीवाल यांच्यावरही आर्थिक गैरव्यवहाराचा आणि पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पालीवाल यांनी संबंधित कंपनीकडून आर्थिक लाभ घेऊन शासकीय जागेवर बेकायदेशीरपणे सोलर पॅनल ठेवण्यास परवानगी दिल्याचा आरोप बेले यांनी केला आहे. solar panel installation on government land

    चौकशीची मागणी

    संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, शासकीय जागेवरील अवैध सोलर पॅनल त्वरित हटवून ती जागा पुन्हा चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या ताब्यात घ्यावी आणि भविष्यात अशी अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी राजेश वारलुजी बेले यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. सार्वजनिक हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने ही तक्रार सादर करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

    या प्रकरणी शासनाकडून त्वरित लक्ष घालून कारवाई केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या आरोपामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आयुक्त विपिन पालीवाल यांच्या भूमिकेची चौकशी होण्याची शक्यता आहे.

  • BJP political stunt water supply । अमृत योजना अपूर्ण, भाजपचा नवा शो सुरु – काँग्रेसचा सडेतोड हल्लाबोल!

    BJP political stunt water supply

    BJP political stunt water supply : चंद्रपूर | केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असून, चंद्रपूर महापालिकेत देखील त्याच पक्षाचे महापौर होते. त्यांच्या कार्यकाळात अमृत पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ करण्यात आला. मात्र या योजनेची अंमलबजावणी ढिसाळ झाली असून, पावसाळ्याचे कारण पुढे करून भाजपचे आमदार आणि महानगराध्यक्ष आता अमृत योजनेचे काम तात्पुरते थांबवण्यासाठी निवेदन देत आहेत, यासारखे दुर्दैव नाही, अशी टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी  केली आहे. BJP failure in urban development

    विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू, महावितरणचा हलगर्जीपणा

    चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत २०१७ मध्ये अमृत पाणीपुरवठा योजनेचा कार्यादेश देण्यात आला होता. २०१९ पर्यंत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आज 8 वर्षे लोटून देखील अनेक भागांमध्ये पाइपलाइनचे काम अपूर्ण आहे. घराघरांत पाणी पोहोचलेले नाही. जलमापकांची व्यवस्था कोलमडली आहे. दुसरीकडे, शहरातील अनेक रस्त्यांचे खोदकाम करून ते तस्सेच सोडल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.सत्ताधारी भाजपने कंत्राटदारांशी संगनमत करून अमृत योजनेचे काम उशिरा, हलगर्जीपणे आणि बेफिकिरीने केले. काम अपूर्ण असूनही योजनेची तारीफ केली जात आहे. मात्र, त्यांना जनतेच्या तहानेची जाणीव नाही,” असा हल्लाबोल रितेश तिवारी यांनी केला. AMRUT scheme implementation issues

    आमदार अपक्ष असताना फक्त घोषणा आणि आता


    चंद्रपूरचे आमदार अपक्ष असताना मोठमोठ्या घोषणा करीत होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता तेच काम लांबणीवर टाकण्यात रस दाखवत आहेत. भाजप मनपा प्रशासकांच्या माध्यमातून स्वतःची कामे करून घेत असून, नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

    भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार, भाजपच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांना निवेदन देऊन पावसाळ्यापूर्वी सुरू असलेले काम तात्पुरते थांबवण्याची मागणी केली आहे. भाजपने यासाठी रस्त्यांची खराब अवस्था आणि पावसामुळे होणाऱ्या अडचणीचे कारण दिले आहे.  हे निव्वळ राजकीय स्टंट असून अपयश झाकण्यासाठी भाजप हे नाट्य रचत आहे. ज्यांच्या सत्ताकाळात ही योजना सुरू झाली आणि कामे रखडली, त्याच भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आता काम थांबवावे लागते, यासारखे दुर्दैव नाही.

    प्रसिद्धीसाठी निवेदन

    चंद्रपूर शहरात अमृत योजनेमुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. जलवाहिनी आणि मलनिस्सारणाच्या कामांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. तरीही भाजपचे नेते केवळ निवेदन देत आहेत, हे केवळ प्रसिद्धीसाठी नौटंकी करीत असल्याचा आरोप रितेश तिवारी यांनी केला आहे. यापुढे नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार झाला तर काँग्रेस आंदोलन करण्यास मागेपुढे बघणार नाही, असा इशाराही रितेश तिवारी यांनी दिला आहे.

  • city roads damaged by amrut scheme work । 🛑 अमृत योजनेत खड्ड्यांचे साम्राज्य! रस्त्यांच्या दुरावस्थेवर भाजप आक्रमक

    city roads damaged by amrut scheme work

    city roads damaged by amrut scheme work : चंद्रपूर – अमृत 2.0 योजनेअंतर्गत शहरात पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण पाईपलाईन टाकण्यासाठी विविध भागांत मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदण्यात आले आहेत. परंतु हे काम नियोजनशून्य पद्धतीने सुरू असल्याने संपूर्ण शहरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी, नागरिकांचे जीव धोक्यात आले असून दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अमृत 2.0 योजनेमुळे रस्त्यांची दुरवस्था दुरुस्ती होईपर्यंत काम थांबवावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचने नंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. road damage due to pipeline work

    चंद्रपुरात वाळू माफियांची मुजोरी, थेट तहसीलदार समोरच…

                  आज भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त यांची भेट घेत त्यांना सदर मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, भाजपचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, मनोज पाल, माजी नगर सेवक देवानंद वाढई, प्रदीप किरमे, राजेंद्र खांडेकर, दिनकर सोमलकर, राकेश बोमनवार, शेखर शेट्टी, रंजन ठाकूर, अ‍ॅड. हरीश मंचलवार, गणेश रासपायले, विजय चव्हाण, मुकेश गाडगे, मंगेश अहिरकर, चंदा ईटनकर, दुर्गा वैरागडे, विमल कातकर,  छाया सातपुते, अनीज दीक्षित, शीतल रंगदळ, छाया चवरे, रेशमा पांडे, मंजू टोरे, अंजू मोडपल्लीवार, विनोद पेंडलीवार आदींची उपस्थिती होती.

    शहरातील रस्ते धोकादायक

                शहरातील रस्ते सध्या अत्यंत धोकादायक झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पावसाळा सुरु झाला असताना काम पूर्ण न झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. कंत्राटदारांकडून कामे अत्यंत संथगतीने व निष्काळजीपणे सुरू आहेत. पावसाचा जोर वाढल्यास खोदलेले रस्ते अधिकच खराब होतील, जलसंचयन होईल आणि अपघातांचा धोका वाढेल. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल. demand to stop amrut 2.0 work temporarily

    ही बाब लक्षात घेता, जेवढी रस्ते खोदली आहेत त्या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती होईपर्यंत पुढील काम थांबवावे, अशी स्पष्ट मागणी निवेदनाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या कामांसाठी आवश्यक निधी आधीच मंजूर झाला आहे. त्यामुळे त्याच निधीतून रस्त्यांची डागडुजी आणि पुनर्बांधणी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • political monopoly in local tenders । ठेके फक्त ‘आपल्याच’ लोकांना? चंद्रपुरातील मोठा राजकीय स्फोट

    political monopoly in local tenders

    political monopoly in local tenders : चंद्रपूर – आम आदमी पक्षाने (आप) चंद्रपूर शहरातील सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यात व्यापक भ्रष्टाचार, ‘ठेकेदारी मक्तेदारी’ आणि बेरोजगारांना संधी नाकारल्याचा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला आहे. पक्षाने चंद्रपूर महानगरपालिका आणि स्थानिक राजकारण्यांच्या जवळच्या व्यक्तींशी संबंधित ‘८५ हजार रुपये वाहन भाडे घोटाळा’ उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. high rent electric vehicles government scam

    आमदारांच्या सचिवांशी जोडलेली उच्च भाड्याची इलेक्ट्रिक वाहने रडारवर

    आपचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर महानगरपालिकेने मागील एका वर्षापासून दोन इलेक्ट्रिक वाहने (MH34 CD 5828 आणि MH34 BZ 4696) प्रत्येकी ८५,००० रुपये प्रति महिना या दराने भाड्याने घेतली आहेत. ही वाहने स्थानिक आमदारांच्या खासगी सचिवाच्या नावावर नोंदणीकृत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.

    बनावट कागदपत्रांच्या आधारे चंद्रपुरात गोवंश जनावरांची तस्करी

    “शहरातील सामान्य टॅक्सी चालक एका महिन्यात जेवढे कमावतो, त्याच्या दुप्पट हे भाडे आहे,” असे राईकवार यांनी नमूद केले. ते म्हणाले की, सामान्य टॅक्सी चालक दरमहा ३०,००० ते ४०,००० रुपये कमावतात आणि त्यांना ईएमआय, चार्जिंग आणि देखभालीचा खर्च भागवणे कठीण जाते, तर आमदारांचे सचिव थेट ८५ हजार रुपयांचे मासिक भाडे घेतात. “ही व्यवस्था म्हणजे सत्तेचा सरळसरळ गैरवापर आणि सामान्य बेरोजगारांवर अन्याय आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. corruption in municipal vehicle contracts

    ‘ठेकेदारी मक्तेदारी’ आणि दडपलेल्या संधींचे आरोप

    आपने पुढे आरोप केला आहे की, महानगरपालिका, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागांमधील बहुतांश ठेके स्थानिक आमदारांच्या जवळच्या गटांनाच मिळतात. सामान्य बेरोजगार आणि ठेकेदार निविदा भरतात, परंतु त्यांच्यावर दबाव टाकून निविदा मागे घ्यायला लावली जाते, असे पक्षाचे म्हणणे आहे.

    “ही मक्तेदारी पद्धत म्हणजे बेरोजगारांसाठी दरवाजे बंद करणे आणि सत्ता केंद्रीत करणे होय,” असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

    निवडक प्रसिद्धी: रोजगार योजनांऐवजी महोत्सवांना प्राधान्य?

    आपने उपस्थित केलेला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सार्वजनिक माहितीच्या प्रसिद्धीतील कथित निवडकपणा. पक्षाने निदर्शनास आणले की, ‘माता महाकाली महोत्सव’, विविध उद्घाटने आणि खासगी महोत्सवांची शहराच्या कानाकोपऱ्यात बॅनर, मोबाईल मेसेजेस आणि ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जाते. मात्र, शासकीय योजना, निविदा आणि रोजगाराच्या संधींविषयीची महत्त्वाची माहिती सामान्य बेरोजगारांपर्यंत पोहोचवली जात नाही. political corruption in Chandrapur 2025

    “ज्या योजनांचा उपयोग बेरोजगारांना व्हावा, त्या योजनांची जाहिरात हेतुपुरस्सर गुप्त ठेवली जाते आणि केवळ ‘सेटिंग’वाल्यांपर्यंत पोहोचते,” असे आपने म्हटले आहे.

    खाजगी लाभासाठी पूरनियंत्रण निधी, वस्त्यांकडे दुर्लक्ष

    आमदारांनी ‘पूर नियंत्रण निधी’चा गैरवापर केल्याचा आरोपही पक्षाने केला आहे. मित्राच्या बंगल्यासाठी संरक्षक भिंत बांधण्यासाठी या निधीतून तब्बल ९५ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याउलट, पावसाळ्यात हजारो रहिवाशांच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरते, परंतु त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. political monopoly in local tenders

    “सामान्य जनतेला केवळ मतदानापुरते वापरणे आणि ‘मित्रगटांना’ सर्व संरक्षण देणे – हीच सत्ताधाऱ्यांची आजची कृती आहे,” असे प्रसिद्धी पत्रकात गंभीरपणे नमूद केले आहे.

    पारदर्शकतेच्या मागणीसाठी ‘आप’चे ‘स्वाक्षरी अभियान’

    या भ्रष्टाचार, मक्तेदारी आणि बेरोजगारांवरील अन्यायाविरोधात आम आदमी पक्षाने ‘स्वाक्षरी अभियान’ जाहीर केले आहे. पक्ष हजारो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करणार आहे.

    या निवेदनात या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची आणि वाहन भाडे व ठेके प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी केली जाणार आहे.

    चंद्रपूरकरांना लढ्यात सामील होण्याचे आवाहन

    आपचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या शेवटी चंद्रपूरच्या नागरिकांना या लढ्यात सामील होण्याचे आवाहन केले आहे. “ही लढाई आहे – बेरोजगारांसाठी समान संधी मिळवण्याची. ही लढाई आहे – सत्तेचा गैरवापर थांबवण्याची. ही लढाई आहे – केवळ ‘आपल्या लोकां’साठी नाही, तर ‘सर्वांच्या अधिकारां’साठी!” असे आवाहन त्यांनी केले.

  • AAP exposes corruption । 💣 M-20 म्हणलं, M-13 निघालं! आम आदमी पक्षाने उघड केली रस्ते घोटाळ्याची पोलखोल!

    AAP exposes corruption

    AAP exposes corruption : चंद्रपूर – शहरात सध्या निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात विकासकामांचा धडाका सुरु आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च करत विविध प्रभागांत सीसी रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. मात्र, या कामांच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आम आदमी पक्षाने महापालिकेवर आणि ठेकेदारांवर गंभीर गैरव्यवहार, निकृष्ट दर्जा व भ्रष्टाचार केल्याचा थेट आरोप केला आहे. Chandrapur Road Work Scam

    चंद्रपुरात या कारणामुळे झाला वाघिणीचा मृत्यू

    🕵️‍♂️ आम आदमी पक्षाची थेट पाहणी – M-20 ऐवजी M-13 गुणवत्ता

    जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह वडगाव प्रभागातील रस्त्यांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. यावेळी रस्त्यांची स्ट्रेंथ तपासली असता, महापालिकेने M-20 दर्जा असल्याचा दावा केला होता, परंतु प्रत्यक्ष मापनात केवळ M-13 स्तराचीच नोंद झाली.

    हेच चित्र तुकुम प्रभागातही पाहायला मिळाले. फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून नागरिकांसमोर हे सारे सत्य मांडण्यात आले.

    💬 “आमदारांच्या छत्रछायेखाली ठेकेदारांना संरक्षण”

    आम आदमी पक्षाच्या मते, हे सर्व काम एका विशिष्ट ठेकेदारामार्फत केले जात आहे, जो स्थानिक आमदारांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता तपासली जात नाही, अधिकारी मौन बाळगतात आणि ठेकेदाराला पूर्ण मोकळीक मिळते.

    📉 “रस्ते पूर्ण झाले” दाखवून निधी वसूल; करदात्यांची फसवणूक

    हे संपूर्ण प्रकरण निवडणुकीपूर्वी निधीच्या लुटीचा ठोस नमुना असल्याचे आम आदमी पक्षाचे म्हणणे आहे. रस्त्यांचा दर्जा अत्यंत खराब असूनही कामे पूर्ण झाल्याचे दाखवले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या कररूपी पैशांची सरळसरळ फसवणूक होत आहे, असा ठपका त्यांनी ठेवला.

    💡 मागील प्रकरणांतही महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप

    यापूर्वीही चंद्रपूर महापालिकेवर:

    • बनावट फाउंटन खर्च,
    • अपूर्ण ड्रेनेज लाईनसाठी पेमेंट,
    • अमृत कलश योजनेंतर्गत अनियमित पाणीपुरवठा,

    या प्रकरणांत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते.

    📹 फेसबुक लाईव्हद्वारे जनजागृती

    आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वडगाव व तुकुम प्रभागातील कामांचे फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रसारण केले. लवकरच शहरातील इतर प्रभागांतील रस्त्यांचीही पाहणी करून सच्चाई जनतेसमोर मांडण्यात येईल, अशी माहिती आप ने दिली.

    यावेळी आपचे मयूर राईकवार – जिल्हाध्यक्ष, योगेश गोखरे – शहराध्यक्ष, राजकुमार नगराडे – जिल्हा सचिव, संतोष बोपचे – संघटन मंत्री, विशाल विरंमवार, क्रिश कपूर, आदित्य नंदनवार, अ‍ॅड. तबस्सुम शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
  • upcoming local body elections | चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी सुरू

    upcoming local body elections

    upcoming local body elections :  चंद्रपूर 20 जून – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी सुरु झाली असुन प्रभाग रचना आदेश तसेच मतदार यादी अद्ययावतीकरण मोहिमेसंदर्भात राजकीय पक्षांची संयुक्त बैठक गुरुवार (19 जून) रोजी चंद्रपूर मनपा राणी हिराई सभागृहात घेण्यात आली.


       आगामी निवडणुकांमध्ये वयाचे 18 वर्ष पूर्ण  करणाऱ्या सर्व पात्र मतदारास मतदार यादीत आपले नाव नोंदविणे शक्य व्हावे,सर्व पात्र मतदारांना मतदान करता येऊन मतदानाचे प्रमाण वाढावे यादृष्टीने केल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी निवडणुक निर्णय अधिकारी 71 – चंद्रपूर विधानसभा क्षेत्र तथा उपविभागीय दंडाधिकारी  संजय पवार, सहा. निवडणुक निर्णय अधिकारी 71 – चंद्रपूर विधानसभा क्षेत्र तथा तालुका दंडाधिकारी विजय पवार,मनपा आयुक्त विपीन पालीवाल,उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त संदीप चिद्रावार तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

    शिक्षकांच्या वेतन प्रक्रिया बाबत आमदाराने अधिकाऱ्याला धरले धारेवर

    प्रस्तावित प्रभागाची माहिती


       आगामी निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे तयारी पुर्ण केली जात आहे. या बैठकीत शासनाकडून निर्गमित प्रभाग रचना आदेशावर सविस्तर करण्यात आली. नव्याने प्रस्तावित प्रभागांची माहिती, मार्गदर्शन तसेच नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी नियोजन या विषयांवर चर्चा झाली. ward restructuring for local elections

    विशेष मोहीम

    प्रशासनामार्फत मतदार जनजागृती व्यापक प्रमाणात होणार असुन येत्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, मतदारांची नावे वगळणे, स्थानांतर करणे तसेच नावात दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे. या विशेष मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे व उपलब्ध संधीचा फायदा घेण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले. voter list update


        निवडणुक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी सांगितले की, ‘मतदार यादी अद्ययावतीकरण ही लोकशाहीची मूलभूत प्रक्रिया आहे. सर्व पात्र नागरिकांनी आपली नोंदणी करून लोकशाही हक्क बजावणे आवश्यक आहे. या प्रक्रियेस जनजागृतीसाठी सर्व पक्षांनी सक्रीय सहभाग द्यावा.’ बैठकीदरम्यान सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पारदर्शक, सुसूत्र व शांततेपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

  • how to report stray cattle in Chandrapur city । “7038882889 वर फोन करा… आणि जनावरं हटवा!” – चंद्रपूर मनपाची मोहीम!

    how to report stray cattle in Chandrapur city

    how to report stray cattle in Chandrapur city : चंद्रपूर –  चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली असुन जनावरांना मोकाट सोडुन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जनावरांच्या मालकांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. traffic hazard due to cattle

    बल्लारपूर ते सोलापूर विशेष रेल्वे सुरु करा – खासदार धानोरकर


         शहरातील मुख्य तसेच इतर मार्गांवर, रस्त्यांवर मोकाट जनावरे ठाण मांडून बसून राहात असल्याने वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता अधिक असते. याबाबत मनपातर्फे यापुर्वीही कारवाई करून जनावरांच्या मालकांना समज देण्यात आली आहे.समज दिल्यानंतर काही काळ ते आपल्या जनावरांवर लक्ष देऊन ते रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेतात,मात्र त्यानंतर पुन्हा जनावरांना मोकाट सोडुन देण्यात येते असे निदर्शनास आले होते,यापुर्वी अश्या 33 मोकाट जनावरांच्या मालकांवर पोलिसात तक्रार करून गुन्हा नोंद करण्यात आली होती.  

    आता थेट फौजदारी कारवाई

          जनावरांच्या मालकांनी आपल्या जनावरांचा योग्य बंदोबस्त करावा, अन्यथा यापुढेही सरळ फौजदारी कारवाई केली जाणार आहे. याकरीता मनपाच्या उपद्रव शोध पथकांची यावर नजर राहणार असुन सातत्याने वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जनावरांच्या मालकांची नोंद घेऊन त्यावर कारवाई केली जात आहे. तसेच मोकाट जनावरे दिसल्यास नागरिकांना तक्रार करता यावी म्हणुन मनपातर्फे 7038882889 हा संपर्क क्रमांकसुद्धा देण्यात आला असुन यावर तक्रार केल्यास कारवाई केली जाणार आहे.  

  • municipal officer misconduct । मनपा कार्यालयातच लोकशाहीची गळचेपी? ज्येष्ठ नागरिकाला म्हटले ‘गेट आउट”

    municipal officer misconduct

    पालकमंत्री उईके यांच्याकडे तक्रार, पालकमंत्र्यांनी दिले ‘हे आदेश”

    municipal officer misconduct : चंद्रपूर – महानगरपालिका चंद्रपूर येथील वाघोबा चौक तुकूम, नोकरकर ले आउट येथील 76 वर्षीय जेष्ठ नागरिकांस उप आयुक्तांनी मनपा कार्यालयातून गेट आउट केल्यामुळे अपमानित झालेल्या व्ही. वाय. लिचडे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचेकडे तक्रार नोंदवून मनपा उपआयुक्त खवले यांचेवर कारवाईची मागणी केलेली आहे.

    तुकूम अपघात प्रकरणातील दोषी वाहन चालक व मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

    मनपा अतिक्रमण विभाग कर्मचाऱ्याने अतिक्रमणाचे कारण पुढे करून नाहरकत ठिकाणी असलेली संरक्षण भिंत कां पाडली याची शहानिशा करण्यासाठी दिनांक 07/04/2025 रोजी मनपा कार्यालयात “लोकशाही” दिनी आपली तक्रार घेवून गेलेल्या जेष्ठ नागरिक व्ही. वाय. लिचडे यांना मनपा उपायुक्तानी कार्यालयातून गेट आउट केले.

    लोकशाही दिनी आपली कैफियत प्रभाविपणे मांडण्याचा संवैधानिक अधिकार असतांना तक्रारकर्ते लिचडे यांना गेट आउट करने म्हणजेच त्यांच्या अधिकारावर घाला घालणे होय. constitutional rights of senior citizens

    पालकमंत्र्यांचे आदेश काय?

    जेष्ठ नागरिक व्ही. वाय. लिचडे यांच्या म्हणण्यानुसार मनपा अतिक्रमन विभागातील अधिकाऱ्यांनी तक्रारकर्त्यांची नाहरकत संरक्षण भिंत नकळत पाडली असेल तर त्याची नुकसान भरपाई त्यांना मिळणे स्वाभाविक आहे आणि ते लिचडे यांना अविलंब मिळाले पाहिजे. मनपा उपायुक्त खवले यांनी जेष्ठ नागरिकांस लोकशाही दिनी कार्यालयातून गेट आउट म्हणून अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल संबंधित बाबींची तपासणी करून कार्यवाही करावी.असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांनी मनपा आयुक्त महानगरपालिका चंद्रपूर यांना दिले आहे.

  • no FIR filed despite evidence । ठोस पुरावे असूनही FIR नाही; आप ने दिला खळखळ्खट्याक आंदोलनाचा इशारा

    no FIR filed despite evidence

    no FIR filed despite evidence : चंद्रपूर महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा (chandrapur mahanagarpalika corruption)अजून एक काळा अध्याय समोर आला आहे. कोहिनूर ग्राउंड येथील नागरिकांच्या फिरण्यासाठी तयार केलेल्या ट्रॅकवरील शासकीय पेव्हर्स अर्बन एनव्हायरॉन कंपनीने चोरून स्वतःच्या खासगी कार्यालयात लावले आहेत. यासंदर्भात दि. १६ मे रोजी पालिका आयुक्तांना तक्रार व ठोस पुरावे (फोटो, व्हिडीओ) सादर करूनही अद्याप कोणतीही FIR नोंदवण्यात आलेली नाही.

    माजी सैनिकाने दिला आमरण उपोषणाचा इशारा

    गाडीत टाकून नेले ती चोरी नाही

    याप्रकरणी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. चंदन पाटील यांची भेट घेतली असता, त्यांनी अत्यंत उद्धटपणे व निष्काळजीपणे उत्तर दिले की, “पेव्हर्स गाडीत टाकून नेले, त्याला चोरी म्हणता येत नाही.” हे उत्तर म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे आणि यामधून पालिका प्रशासनाचा भ्रष्ट चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

    महानगरपालिकेतील संपूर्ण यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरलेली असून, हे अधिकारी स्वतःला कोणीही वाकडं करू शकत नाही अशा भ्रमात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराबाबत सातत्याने आवाज उठवला जात आहे. मात्र अधिकारी वर्गाची मानसिकता इतकी बधीर झाली आहे की, सामान्य जनतेच्या हक्कांची खुलेआम पायमल्ली केली जात आहे.

    शासकीय संपत्तीवर डल्ला

    ही घटना केवळ पेव्हर्स चोरीची (Pavers theft) नसून, ती सामान्य जनतेच्या हक्कांवर आणि शासकीय संपत्तीवर डल्ला मारण्याची लक्षणीय घटना आहे. जर सामान्य नागरिक काही चूक करतो, तर प्रशासन त्याच्यावर कठोर कारवाई करते. पण एवढा मोठा प्रकार उघडपणे घडूनही महानगरपालिका शांत का आहे? यामागे गुप्त सांठगांठ व भ्रष्टाचाराचा गंभीर वास येतो.

    आज दिनांक ६ जून २०२५ रोजी आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi party) वतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना या गंभीर घटनेबाबत सविस्तर तक्रार अर्ज सादर करण्यात आला.
    या वेळी उपस्थित होते:
    👉 मयूर राईकवार (जिल्हाध्यक्ष),
    👉 राजू कूडे (युवा जिल्हाध्यक्ष),
    👉 योगेश गोखरे (शहर अध्यक्ष),
    👉 प्रशांत सिदुरकर (जिल्हा सचिव),
    👉 संतोष बोपचे (महानगर संगठन मंत्री),
    👉 एड. तबस्सुम शेख (शहर महिला अध्यक्ष),
    👉 हांडेकर गुरुजी (शहर पदाधिकारी),
    👉 विशाल बिरमवार (शहर पदाधिकारी)
    आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते.

    या घटनेबाबत जर पुढील ८ दिवसांत कोणतीही शासकीय कार्यवाही झाली नाही, तर आम आदमी पक्ष चंद्रपूर जिल्हा तर्फे अभिनव आणि बहिरे असल्याचे सॉन्ग करणाऱ्या भ्रष्ट अधिकार्‍यांचा विरोधात तीव्र व ‘खडकट्याक आंदोलन’ करण्यात येईल, असा जबरदस्त इशारा आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी दिला आहे.

    हा लढा केवळ भ्रष्टाचाराविरोधात नाही, तर सामान्य जनतेच्या न्यायासाठी आहे. आम आदमी पक्ष शेवटच्या श्वासापर्यंत या लढ्याला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.