Tag: चंद्रपूर महानगरपालिका

  • Chandrapur heatwave action plan | चंद्रपूरकरांनो सावधान! उष्माघातापासून बचावासाठी महापालिकेचा कृती आराखडा

    Chandrapur heatwave action plan

    चंद्रपूरचा उन्हाळा आणखी तीव्र होणार? उष्णतेपासून संरक्षणासाठी महत्त्वाच्या सूचना

    Chandrapur heatwave action plan : चंद्रपूर शहर हॉट सिटी म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाते.आता उन्हाळ्याच्या दिवसांना सुरवात झालेली आहे. दरवर्षी येथील सूर्याचा पारा उच्चांक गाठतो. अशा तप्त उन्हात नागरिक उष्माघाताला बळी पडू नये यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका उष्माघात कृती आराखडा राबविणार आहे. याकरीता 27 फेब्रुवारी रोजी उष्माघात कृती आराखडा समन्वय समितीची बैठक अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनपा स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. (Chandrapur summer safety tips)

    एकलव्य निवासी मॉडेल स्कुलमध्ये मोबाईल, तंबाखू व खर्रा, प्राचार्याने विद्यार्थ्यांची केली कान उघाडणी


        याप्रसंगी मार्गदर्शन करतांना अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांनी सांगीतले की, कोरोना काळाचे वर्ष सोडता २०१६ पासून दर उन्हाळ्यात चंद्रपूर मनपातर्फे आरोग्य विभागातर्फे उष्माघात कृती आराखड्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यावर्षी अधिक कडक उन्हाळा राहण्याची शक्यता आहे.आज समितीची प्रथम आढावा बैठक असुन १५ मार्च पर्यंत समितीच्या सर्व सभासदांनी नेमुन दिलेली कार्ये जबाबदारीने पार पाडून त्याचा लेखी अहवाल द्यावा.  

    चंद्रपूर मनपाने जप्त केले 250 किलो प्लॅस्टिक


        उन्हाळ्यात घर थंड राहण्यास नागरीकांनी कुल रूफ टेक्नोलॉजीचा (Cool roof technology) वापर करावा म्हणजेच उष्णतारोधक पेंट जर घराच्या छतावर मारले तर २ ते ३ डिग्री तापमान कमी होण्यास मदत मिळते. मागील वर्षी शहरात २१ जागी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली होती.यावर्षी त्याहुन अधिक पाणपोईची व्यवस्था स्वयंसेवी संस्थां व चिल्ड वॉटर असोसिएशनतर्फे करण्यात यावी.घर बांधकामाच्या रचनेत उष्णता कमी करण्याच्या दृष्टीने बदल करणे आवश्यक आहे. (Heat stroke prevention in Chandrapur)

    स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा


        बेघर आणि भिकारी यांची व्यवस्था बेघर निवाऱ्यात करणे, अनेकदा भिकारी बेघर निवाऱ्यात येत नाही तेव्हा पोलीस विभागाला सोबत घेऊन नियोजन करणे तसेच मानसीक रुग्ण यांच्यासाठीही ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येईल. काही तात्पुरते व कायमचे प्रवासी निवारे मनपा व स्वयंसेवी संस्थांद्वारे तयार करण्यात यावे. स्वयंसेवी संस्था व दुकानदार यांनी जर आपल्या दुकानासमोर पाण्याच्या कॅन किंवा पाण्याची व्यवस्था करावी,व्यापारी संघटनांनी याचे नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (Hot city Chandrapur weather)

    महाकाली यात्रेसाठी मनपाचे नियोजन                    
        महाकाली यात्रेला निवाऱ्यासाठी शेड तसेच पाण्यासाठी स्प्रिंकलर्सची व्यवस्था दरवर्षी मनपातर्फे करण्यात येते तसेच स्प्रिंकलर्स शहरात इतर कुठे लावता येईल याची निश्चिती करणे,ट्रॅफीक सिग्नल दुपारी बंद ठेवणे ,सार्वजनिक खेळांचे आयोजन दुपारी न करणे, सार्वजनिक बगीचे सुरु राहण्याच्या वेळेत वाढ करणे, १०८ रुग्णवाहिकेचा सहभाग, बांधकाम कंत्राटदाराद्वारे मजुरांच्या कामाच्या वेळेत बदल व व्यापक जनजागृती करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. यावेळी डॉ.नयना उत्तरवार यांनी पावर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे सदस्यांना हीट ॲक्शन प्लॅन संबंधी विस्तृत माहिती दिली.


         याप्रसंगी उपायुक्त मंगेश खवले,सहायक आयुक्त अक्षय गडलिंग,शुभांगी सूर्यवंशी,संतोष गर्गेलवार,उपअभियंता रवींद्र हजारे, डॉ. जयश्री वाडे, डॉ. विजया खेरा, डॉ.अश्विनी भारत, डॉ. अमोल शेळके, डॉ. योगेश्वरी गाडगे,डॉ. शरयु गावंडे,डॉ.आरवा लाहिरी,डॉ. नरेंद्र जनबंधू,तसेच विविध शासकीय कार्यालय व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थीत होते.

    उष्माघाताचा विशेष धोका कुणाला –  ५ वर्षापेक्षा कमी व ६५ वर्षावरील नागरीकांना तसेच उन्हात काम करणारे मजूर,प्राणी,अल्कोहोल, धूम्रपान करणारे, शुगर, डायबिटिजचे रुग्ण यांना उष्माघाताचा विशेष धोका असतो.        

    उष्माघाताची लक्षणे –  अस्वस्थपणा, थकवा येणे, शरीर तापणे, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुखी,अतिसार,भारी घाम येणे, मळमळणे,फिकट त्वचा,हृदयाचे ठोके जलद होतात,पोटाच्या वेदना ही लक्षणे आहेत.

    संरक्षणासाठी काय करावे – उन्हाच्या उष्णतेमुळे शरीरावर होणारे दुष्परीणाम टाळण्यास भरपूर पाणी प्यावे, थंड पेये – ताक, आंब्याचे पन्हे, नारळ पाणी प्यावे, अत्यावश्यक असल्याशिवाय उन्हात जाऊ नये, सैल व फिकट रंगाचे कपडे घालावेत, थंड जागेत, वातावरणात राहावे तसेच भर उन्हात म्हणजे साधारणतः दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उन्हात जाणे टाळावे. विना चप्पल बाहेर जाऊ नये,लहान मुलांना तसेच प्राण्यांना कारमध्ये बंद करून जाऊ नये.  

    थंडगार पाण्याने अंघोळ करावी. ( डोक्यावरून गार पाण्याने अंघोळ केल्याने तापलेले शरीर थंड होण्यास मदत होते ) थंड जागेत आराम करावा, परिश्रमाचे काम करू नये, भरपूर थंड पाणी प्यावे, तसेच मनपा आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्वरित औषधोपचार करवून घ्यावा. 

  • Plastic seizure in Chandrapur | चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्लास्टिकबंदी अभियानात मोठी कारवाई

    Plastic seizure in Chandrapur

    Plastic seizure in Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई सुरू असुन उपद्रव शोध पथकाद्वारे दादमहाल वॉर्ड येथील वाशिम खान यांच्या घरून 250 किलो प्लास्टिक पन्नी जप्त करण्यात आले आहेत तसेच संबंधितांवर 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

    वैनगंगा नदीत बुडून चंद्रपुरातील 3 सख्ख्या बहिणीचा करून अंत


        बंदी असलेल्या व एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार 8 टीम्स बनविण्यात आल्या आहेत. या सर्व चमूंद्वारे शहरात नियमित कारवाई करण्यात येते. यावेळेस सुद्धा या दुकानासंबंधी गुप्त माहिती मनपास प्राप्त झाली होती. (Chandrapur Municipal Corporation plastic ban)

    प्लास्टीक साठा,पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येत असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास 5 हजारांचे बक्षिस दिल्या जात असल्याने अनेक सुजाण व्यक्तींकडुन अवैध साठ्यासंबंधी तक्रारी मनपास प्राप्त होत आहेत. (Illegal plastic storage in Chandrapur)


         एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर 5 हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास 10 हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर 25 हजार रुपये दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.


         सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,स्वच्छता निरीक्षक शुभम खोटे,शुभम चिंचेकर, राहुल गगपल्लिवर, प्रफुल पोतराजे,रुचिर कोरेकर यांनी केली. 

  • Chandrapur Lokshahi Din 2025 | “चंद्रपूर महानगरपालिकेत लोकशाही दिन: तक्रारींच्या तत्पर निवारणासाठी नागरिकांना सुवर्णसंधी!”

    Chandrapur Lokshahi Din 2025

    Chandrapur Lokshahi Din 2025 : सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणींची न्याय व तत्परतेने शासकिय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी  उपाय योजना म्हणून ‘लोकशाही दिन’ चंद्रपूर महानगरपालिका कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजीत केला जातो. मार्च महीन्यातील लोकशाही दिन, सोमवार दि.3 मार्च 2025 रोजी महानगरपालिका कार्यालयात मा. आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली दुपारी 1 वाजता आयोजीत करण्यात आलेला आहे.

    शबरी आदिवासी घरकुल योजनेचा नागरिकांना मिळेल असा लाभ


        ज्या नागरिकांना प्रत्यक्षरित्या उपस्थीत राहणे शक्य नाही त्यांच्यासाठी मनपाने ई-लोकशाही दिनाची सुविधा करून दिली असुन यात त्यांना आपले निवेदन   lokshahidincomplaint@gmail.com या ईमेल आयडी वर पाठविता येईल.लोकशाही दिन प्रसंगी अर्जदारांनी विहीत नमून्यातील दोन प्रतीत अर्ज सादर करावे. लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी अर्जदार अर्ज /निवेदन सादर करतील. अर्ज सादर केल्यानंतर संबंधीत विभागाकडे निवेदन कार्यवाही करीता पाठविण्यात येईल. (Chandrapur Municipal Corporation grievances)


        संबंधीत विभागप्रमुख अर्जदाराला आपल्या स्तरावर निवेदनासंबंधी केलेली कार्यवाही किंवा चालु असलेली कार्यवाही याबाबत अवगत करतील,तसे विभाग प्रमुखाकडून न झाल्यास किंवा अर्जदाराचे समाधान न झाल्यास अर्जदारांना  लोकशाही दिनामध्ये मा. आयुक्त यांचे कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे सादर करता येईल. आयुक्त हे सदर अहवाल, अर्जदाराची विनंती, त्याबद्दलचे नियम, शासनाची भुमिका,तरतुदी या बाबींचा विचार करून योग्य निर्णय देतील.

  • Shabari Tribal Housing Scheme Chandrapur | चंद्रपूर शहरातील नागरिकांना असा मिळेल घरकुल योजनेचा लाभ

    Shabari Tribal Housing Scheme Chandrapur

    Shabari Tribal Housing Scheme Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत गावठाण क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ज्या लाभार्थ्यांकडे जमीनीची मालकी नाही अशा लाभार्थ्यांना मागील 3 वर्षाच्या मालमत्ता कर पावतीच्या (टॅक्स पावती) आधारे, मनपा कार्यालयात अर्ज करुन घरकुलाचा लाभ (रु.2.50 लक्ष अनुदान) देण्यात येत आहे.

    गडचिरोली मधील नामांकित संस्थेत काम करण्याची सुवर्णसंधी


        आदिवासी उपयोजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत, जे अनुसूचित जमातीचे लोक, कुडा मातीच्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यात राहतात अशा अनुसूचितील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी वैयक्तिक लाभाची राज्य शासनाची “शबरी आदिवासी घरकुल योजना” चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत राबविण्यात येत आहे. (Chandrapur Municipal Corporation Housing Scheme)


        त्याचप्रमाणे चंद्रपूर शहरात अनुसूचित जमातीतील जागा उपलब्ध नसणाऱ्या नागरिकांना गावठाण क्षेत्रांतर्गत बांधण्यात आलेल्या (बांधण्यात येणाऱ्या) सदनिकांमध्ये (फ्लॅट्स) शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ घेण्याकरिता मनपा कार्यालयात घरकुल मागणीसाठी रितसर अर्ज करुन रु. 2.50 लक्षचा लाभ मिळविता येईल.


       चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सदर योजनेबाबत आवश्यक माहिती जसे योजनेसाठी पात्रता,उत्पन्न मर्यादा,  आवश्यक कागदपत्रे इत्यादींकरिता चंद्रपूर शहर महानगरपालिका कार्यालय, सात मजली इमारत, प्रथम माळा, घरकुल विभाग येथे संपर्क साधावा.

  • How to avoid property tax seizure | चंद्रपूर मनपाच्या 15 पथकांची धाड: दररोज 10 मालमत्ता जप्त

    How to avoid property tax seizure

    How to avoid property tax seizure : मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांवर मनपा वसुली पथकांनी कारवाई केली असुन 51 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत, विहित मुदतीत जर कराचा भरणा झाला नाही तर या मालमत्ताचा लिलाव केला जाणार आहे.

    शिवजयंतीनिमित्त चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान

       
       यापुढेही अशीच धडक कारवाई सतत सुरु राहणार असल्याचे मनपातर्फे स्पष्ट करण्यात येत असुन सवलत देऊनही मालमत्ता कर न भरण्याकडेच नागरिकांचा कल दिसत असल्याने सक्त पाऊले मनपाला उचलावी लागत आहे. जप्त केलेल्या मालमत्तांवर असलेली थकबाकी ही जप्त केल्यानंतर 15  दिवसांच्या आत मनपाला जमा करावी लागते, अन्यथा त्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा अधिकार मनपाला आहे. (Property tax defaulters action)


       15 फेब्रुवारी पर्यंत केवळ 8734 मालमत्ता धारकांनी 50 टक्के शास्तीत सवलतीचा लाभ घेतला होता. 15 फेब्रुवारी नंतर ऑनलाईन 25 टक्के व ऑफलाईन 22 टक्के शास्तीत सूट मनपातर्फे देण्यात येत आहे. करवसुली करिता महानगरपालिकेतर्फे 15 पथके नेमण्यात आली असुन प्रत्येक पथकाला दर दिवशी किमान 10 मालमत्ता धारकांवर कारवाई करण्याचे तसेच जप्तीसोबतच मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.  

    property tas defaulters action


        ऑनलाईन 25 टक्के व ऑफलाईन 22 टक्के शास्तीत सूट ही 31 मार्चपर्यंत लागू राहणार असुन कर भरणा करणे सुविधेचे व्हावे या दृष्टीने 31 मार्च पर्यंत येणाऱ्या प्रत्येक सुटीच्या दिवशी मालमत्ता कर भरणा कार्यालय सुरु राहणार आहे. ज्या मालकांना त्यांच्या मालमत्तेच्या अनुषंगाने आर्थिक उत्पन्न प्राप्त होत असतानाही मालमत्ता कर थकविणार्‍या थकबाकीदारांनी लवकरात लवकर आपल्या थकीत कराचा भरणा करून महानगरपालिकेकडून करण्यात येणारी जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. (Municipal corporation tax concession)

  • Online property tax payment Chandrapur । २५% सूट घेऊन कर भरा, नाहीतर जप्त होईल मालमत्ता

    Online property tax payment Chandrapur

    15 फेब्रुवारी पर्यंत थकबाकीसह मालमत्ता कराचा एकरकमी भरणा करणाऱ्याना ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास 50 टक्के तसेच ऑफलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास 45 टक्के शास्तीत सवलत मनपातर्फे देण्यात आली होती .मात्र सवलत देऊनही कर भरणा करणाऱ्यांचे प्रमाण फार  कमी असल्याने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.  

    आमदार सुधाकर अडबाले यांचा आक्रमकपणा, निप्पोन चे काम पाडले बंद

     
        15 फेब्रुवारी पर्यंत केवळ 8734 मालमत्ता धारकांनी शास्तीत सवलतीचा लाभ घेतला आहे. 15 फेब्रुवारी नंतर सुद्धा ऑनलाईन 25 टक्के व ऑफलाईन 22 टक्के शास्तीत सूट मनपातर्फे देण्यात येत आहे. सवलत देऊनही मालमत्ता कर न भरण्याकडेच नागरिकांचा कल दिसत असल्याने सक्त पाऊले मनपाला उचलावी लागत आहे. (Chandrapur Municipal Corporation tax discount)

    करवसुली करिता महानगरपालिकेतर्फे १५ पथके नेमण्यात आली असुन प्रत्येक पथकाला दर दिवशी किमान १० मालमत्ता धारकांवर कारवाई करण्याचे तसेच जप्तीसोबतच मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आले आहेत.  

    chandrapur property tax 25% discount


        ऑनलाईन 25 टक्के व ऑफलाईन 22 टक्के शास्तीत सूट ही 31 मार्चपर्यंत लागू राहणार असुन कर भरणा करणे सुविधेचे व्हावे या दृष्टीने 31 मार्च पर्यंत येणाऱ्या प्रत्येक सुटीच्या दिवशी मालमत्ता कर भरणा कार्यालय सुरु राहणार आहे. ज्या मालकांना त्यांच्या मालमत्तेच्या अनुषंगाने आर्थिक उत्पन्न प्राप्त होत असतानाही मालमत्ता कर थकविणार्‍या थकबाकीदारांनी लवकरात लवकर आपल्या थकीत कराचा भरणा करून महानगरपालिकेकडून करण्यात येणारी जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  Chandrapur property tax 25% discount

  • Top NMMS Scholarship Achievers । चंद्रपूर महानगरपालिका शाळेतील यशस्वी विद्यार्थी

    Top NMMS Scholarship Achievers

    Top NMMS Scholarship Achievers : चंद्रपूर महानगरपालिकेच्या पीएम श्री सावित्रीबाई फुले शाळेतील 20 विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ( एनएमएमएस ) परीक्षेत उत्तीर्ण झाले असुन शहरातील एका शाळेतील सर्वात अधिक संख्येने या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान मनपा शाळेने मिळविला आहे.

    सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा रौप्य महोत्सवी सोहळा

     
        जातीनिहाय आरक्षण असणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या अनेक कल्याणकारी शिष्यवृत्ती योजनांचा दरवर्षी लाभ मिळत असतो. परंतु ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देशपातळीवर एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येते. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रक्षेची जोपासना, तसेच त्यांचे 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. (Scholarship Opportunities for Bright Students)

    शिष्यवृत्तीत १२ हजार रुपयांची वाढ


        प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती  सलग चार वर्षे म्हणजे 8 वी ते 12 वी पर्यंत मुलांना देण्यात येते. यापूर्वी शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रति वर्षासाठी बारा हजार याप्रमाणे चार वर्षासाठी 48 हजार रुपये मिळत होते. आता यात एक वर्ष वाढल्याने त्यात 12 हजार रुपयांची वाढ झाली आहे. तसेच याआधी पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा दीड लाख रुपये होती. आता त्यात दोन लाखांनी वाढ झाल्याने साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांना देखील ही शिष्यवृत्ती परीक्षा देता येत आहे. (NMMS Scholarship 2025)

    हे आहेत यशस्वी विद्यार्थी


       मनपा शाळेतील गुणवंतांमध्ये अनुष्का भालेराव, गणेश ठाकरे, संस्कृती घोटेकर,वैष्णवी कंदीकुरवार, शौर्य आंबटकर,रिंषा मुजुमदार,प्रशिल रामटेके,भूमिका निखाडे,सोहम सोरते,कैसीकौर भोयर,गौरव नंदनवार,माही निमगडे,श्रेयस दुर्योधन,रचना शंभरकर,समीक्ष गोदरवार,रोजीना सिद्दीकी,लुकेश जेंगठे,आरुषी देवघरे,प्रज्वल वैरागडे,वंश पवार या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (Chandrapur’s Best NMMS Performers)    
       आयुक्त विपीन पालीवाल,अतिरीक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले व प्रभारी शिक्षणाधिकारी नागेश नीत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.  

  • Chandrapur plastic raid news । चंद्रपुरात 10 खोके प्लास्टिक ग्लास जप्त

    Chandrapur plastic raid news

    Chandrapur plastic raid news : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई सुरू असुन उपद्रव शोध पथकाद्वारे रहमतनगर येथील सलीम यांच्या मालकीच्या गोडाऊन येथे कारवाई करून प्लास्टिकचे ग्लास असणारे 10 खोके जप्त करण्यात आले आहेत तसेच संबंधितांवर 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

    प्रेमाला मर्यादा नाही, स्वीडिश दाम्पत्याने व्यंगत्व असलेल्या बाळाला घेतले दत्तक


        बंदी असलेल्या व एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार 8 टीम्स बनविण्यात आल्या आहेत. या सर्व चमूंद्वारे शहरात नियमित कारवाई करण्यात येते. यावेळेस सुद्धा या दुकानासंबंधी गुप्त माहिती मनपास प्राप्त झाली होती. प्लास्टीक साठा,पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येत असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास 5 हजारांचे बक्षिस दिल्या जात असल्याने अनेक सुजाण व्यक्तींकडुन अवैध साठ्यासंबंधी तक्रारी मनपास प्राप्त होत आहेत. (Single-use plastic fine and punishment)


         एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर 5 हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास 10 हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर 25 हजार रुपये दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे. (Chandrapur nuisance search squad action)


         सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त रवींद्र भेलावे व उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात प्रभारी सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,डॉ. अमोल शेळके,स्वच्छता अधिकारी भूपेश गोठे,स्वच्छता निरीक्षक महेंद्र हजारे ,स्वच्छता निरीक्षक शुभम खोटे,शुभम चिंचेकर,राहुल गगपल्लिवर, प्रफुल पोतराजे यांनी केली. 

  • Vipin Paliwal transfer demand | मनपा आयुक्त पालीवाल विरुद्ध माजी नगरसेवकाने पुकारला एल्गार

    Vipin Paliwal transfer demand

    Vipin Paliwal transfer demand : चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल यांची तात्काळ बदली करून त्यांची कठोर विभागीय चौकशी करण्याची मागणी जनविकास सेनेने केली आहे. संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख तसेच जनविकास सेनेचे इमदाद शेख,प्रफुल बैरम व अमोल घोडमारे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन लेखी पत्राद्वारे ही मागणी केली. आयुक्त पालीवाल यांनी अनेक कामांमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा जनविकास सेनेचा आरोप आहे.

    शासकीय आश्रमशाळेत अधिकाऱ्यांचा मुक्काम

    महानगरपालिकेत वाढलेला भोंगळ कारभार व भ्रष्टाचार याला मनपा आयुक्त पालीवाल जबाबदार असून त्यांच्या कारकिर्दीतील सर्व कामांची सखोल व निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याने त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी या भेटीच्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे करण्यात आली. मनपातील भोंगळ कारभार व भ्रष्टाचाराविरुद्ध लवकरच जनआंदोलन सुरू करण्यात येत असल्याची माहिती सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आली. (Chandrapur Municipal Corporation corruption)

    अमृत पाणीपुरवठा व भूमिगत गटार योजनेच्या भ्रष्टाचाराची तक्रार

    234 कोटी रुपयांच्या पहिल्या अमृत पाणीपुरवठा योजनेसाठी फोडलेले रस्ते दुरुस्त करणे, काम पूर्ण झाल्यानंतर एक वर्षापर्यंत योजना चालवणे इत्यादी पूर्ण केलेली नसतांना कंत्राटदार मे. संतोष एजन्सीचे देयके देण्यात आली. 270 कोटी रुपयांच्या दुसऱ्या अमृत पाणीपुरवठा योजनेसाठी मंजुरी घेताना अनेक नियमांना बगल देण्यात आली. नवीन अमृत भुमिगत गटार योजनेचे सुरुवातीला 450 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधील अधिकाऱ्यांना हाताशी धरून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयुक्त पालीवाल यांनी अंदाजपत्रकीय किमंतीत वाढ केली. सुमारे 450 कोटी रुपयांचे काम कंत्राटदाराला 506 कोटी रुपयांमध्ये देण्यात आले. या कामात कंत्राटदाराला सुरुवातीलाच 50 कोटी रुपयांचा लाभ पोहोचविला माजी नगरसेवक देशमुख यांचा आरोप आहे. (Corruption in Chandrapur projects)

    आयुक्तांचा भूतकाळ वादग्रस्त

    बल्लारपूर नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असतांना पालीवाल यांनी नगरपालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसात खोट्या तक्रारी केल्याचा आरोप होता. वर्धा नगरपालिकेत त्यांची कारकीर्द वादग्रस्त होती. त्यांच्याविरुद्ध शासनाकडे आजपर्यंत अनेक तक्रारी झालेल्या आहेत.

    चंद्रपूर महानगरपालिकेत अतिक्रमण काढतांना किंवा ब्ल्यु झोन मधील अवैध बांधकाम पडताना त्यांनी निवडक व भेदभावपूर्ण कारवाई केल्याचा आरोप आहे. निळ्या पूर रेषेच्या आतील अनेक मध्यमवर्गीयांची बांधकामे पाडण्यात आली. त्याचवेळी श्रीमंत व वजनदार लोकांच्या अवैध बांधकामांना संरक्षण दिल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. लोकसभागातून विविध उपक्रम राबवून जनमानसात प्रतिमा संवर्धन करणे व या प्रतिमेच्या आडून करोडो रुपयांचा मलिदा लाटणे ही आयुक्त पालीवाल यांची कार्यपद्धती असल्याचा देशमुख यांचा आरोप आहे.

  • Chandrapur Municipal Corporation action | चंद्रपुरात 180 किलो प्लॅस्टिक पन्नी जप्त

    Chandrapur Municipal Corporation action

    Chandrapur Municipal Corporation action : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई सुरू असुन उपद्रव शोध पथकाद्वारे रामनगर येथील साई पान शॉप येथे कारवाई करून खर्ऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे 180 किलो प्लास्टिक पन्नी जप्त करण्यात आल्या तसेच संबंधितांवर 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (Single-use plastic ban Chandrapur)

    चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे, वाळू तस्करांनी मुजोरी, तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न


        बंदी असलेल्या व एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार 8 टीम्स बनविण्यात आल्या आहेत. या सर्व चमूंद्वारे शहरात नियमित कारवाई करण्यात येते. यावेळेस सुद्धा या दुकानासंबंधी गुप्त माहिती मनपास प्राप्त झाली होती. प्लास्टीक साठा,पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येत असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास 5 हजारांचे बक्षिस दिल्या जात असल्याने अनेक सुजाण व्यक्तींकडुन अवैध साठ्यासंबंधी तक्रारी मनपास प्राप्त होत आहेत.


         एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर 5 हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास 10 हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर 25 हजार रुपये दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे. (One-time use plastic penalty)


         सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त रवींद्र भेलावे व उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके,स्वच्छता निरीक्षक शुभम खोटे,शुभम चिंचेकर,राहुल गगपल्लिवर, प्रफुल पोतराजे यांनी केली