Tag: आमदार किशोर जोरगेवार

  • Chandrapur Dahi Handi । दहीहंडी हा केवळ खेळ नाही..तर संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक – आ. किशोर जोरगेवार

    Chandrapur Dahi Handi

    Chandrapur Dahi Handi : चंद्रपूर – दहीहंडी हा फक्त खेळ नाही तर भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जिवंत प्रतीक आहे. आपल्या इतिहासात आणि धर्मपरंपरेत दहीहंडीचे विशेष स्थान आहे. श्रीकृष्णाच्या बाललीलांतून धैर्य, साहस, चिकाटी आणि ऐक्याचा जो संदेश मिळतो, तोच आज या उत्सवातून युवकांना अनुभवायला मिळतो. आजच्या पिढीने हा उत्सव केवळ मनोरंजन म्हणून पाहू नये, तर त्यातून मिळणारे संस्कार आणि जीवनमूल्य आत्मसात करावेत, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी केले.

    चंद्रपुरातील या मनपा शाळेला मिळणार १० कोटी रुपयांचा निधी

    कृष्णजन्माष्टमी निमित्त तिरंगा क्रिकेट क्लब आणि शिवस्वाभिमान बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने तुकूम येथे दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी नगरसेवक सुरेश पचारे, सतीश भिवगडे, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री रवि गुरनुले, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, वर्षा कोटेकर, सतीश तायडे, प्रा. निलेश बेलखेडे, जसबीरसिंग बोपारा, सिकंदर खान आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

    युवकांना एकत्र आणून समाजात सकारात्मकता पसरविण्याचे मोठे काम

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, विकासकामांनी शहराची ओळख निर्माण होत असते, हे सत्य असले तरी पारंपरिक व धार्मिक उत्सव देखील शहराची ओळख निर्माण करण्यासाठी आवश्यक आहेत. आपण चंद्रपूरात महाकाली महोत्सवाला सुरुवात केली आहे. त्यामुळे चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची महती देशपातळीवर पोहोचली आहे. येथील भाविकांची संख्या लक्षणीय वाढत आहे. आज आपण दहीहंडी स्पर्धेचे उत्तम आयोजन केले आहे. तिरंगा क्रिकेट क्लब आणि शिवस्वाभिमान बहुउद्देशीय संस्थेने अशा पारंपरिक उत्सवाचे आयोजन करून केवळ धार्मिक परंपरा जोपासली नाही, तर युवकांना एकत्र आणून समाजात सकारात्मकता पसरविण्याचे मोठे काम केले आहे. अशा उपक्रमांमधून आपली संस्कृती जिवंत राहते आणि समाजातील बंधुभाव वृद्धिंगत होतो. Cultural values in Dahi Handi

    ते पुढे म्हणाले की, युवकांनी पथक तयार करताना जसा एकमेकांवर विश्वास ठेवून मानवी पिरॅमिड उभारला, तसाच विश्वास, साहस आणि एकोप्याने आपण समाज उभारायला हवा. हाच खरा दहीहंडी उत्सवाचा संदेश आहे. दहीहंडी आपल्याला साहस आणि परिश्रमांशिवाय यश मिळत नाही, ही शिकवण देते. युवकांनी ही शिकवण आपल्या जीवनात उतरवली पाहिजे. अशा उत्सवांमुळे आपल्याला संस्कृतीची जाणीव तर होतेच, पण समाजातील ऐक्य, बंधुता आणि आपुलकी अधिक बळकट होते, असे ते यावेळी म्हणाले. दहीहंडी स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

  • Controversial Amma Chowk monument removed । वादग्रस्त अम्मा चौक स्मारक हटविले, चंद्रपूर मनपाची कारवाई

    Controversial Amma Chowk monument removed

    Controversial Amma Chowk monument removed : चंद्रपूर : शहरातील ऐतिहासिक गांधी चौक परिसरातील वादग्रस्त अम्मा चौक स्मारक अखेर हटविण्यात आले आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाकडे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

    खड्ड्याविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन

    पुरातत्व स्थळांच्या नियमांचे उल्लंघन

    गांधी चौक ते महानगर पालिकेच्या नेताजी भवनच्या मागील भागात महादेव मंदिर आहे. ते भारत सरकारद्वारे ११ एप्रिल १९२५ रोजी केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्राचीन स्मारके व पुरातत्त्व स्थळे अधिनियम १९५८ नुसार या परिसरातील १०० मीटरच्या आत कोणतेही नवीन बांधकाम किंवा अतिक्रमण करण्यास सक्त मनाई आहे. तरीदेखील चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून परवानगी न घेता पोलिस ठाणे आणि नेताजी भवनच्या मधोमध अम्मा चौक स्मारकाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते.


    या प्रकरणी काँग्रेसचे शहराध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी पुरातत्त्व विभागाकडे लेखी निवेदन देत संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी व कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनंतर पुरातत्त्व विभागाने महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली होती. नोटीसमध्ये सात दिवसांच्या आत अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. तसे न झाल्यास पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला होता. अखेर महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवून परिसर मुक्त केला. Amma Chowk controversy Chandrapur heritage violation

    या निर्णयाचे स्वागत करत काँग्रेस कमिटीने सांगितले की, गांधी चौक परिसराची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती. नियम मोडून उभारलेले स्मारक हा कायद्याचा अवमान होता. भविष्यात असा प्रकार घडू नये, अशी मागणी काँग्रेसने पुन्हा एकदा केली आहे.

  • Chandrapur women send 30000 rakhis to CM । 🌸 चंद्रपूरच्या भगिनींकडून मुख्यमंत्री फडणवीस यांना ३० हजार राख्या

    Chandrapur women send 30000 rakhis to CM

    Chandrapur women send 30000 rakhis to CM : चंद्रपूर – भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या महिला आघाडीच्या वतीने आज शुक्रवारी जैन भवन येथे रक्षाबंधन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या विशेष सोहळ्यात चंद्रपूर मतदारसंघाच्या वतीने पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांच्या मार्फत तब्बल ३० हजार राख्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आल्या. भगिनींनी मुख्यमंत्री यांच्याप्रती असलेला विश्वास, प्रेम आणि संरक्षणाची भावना या उपक्रमातून व्यक्त केली.

    स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ

    या कार्यक्रमाला आदिवासी विभाग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके, चंद्रपूर मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार अनिल सोले, भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्ष छबु वैरागडे, भाजप नेते प्रकाश देवतळे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, नामदेव डाहुले, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकुर, वंदना हातगावकर, महामंत्री मनोज पाल, रवि गुरुनुले, सविता दंढारे,  युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, मंडळ अध्यक्ष रवि जोगी, प्रदीप किरमे, अॅड. सारिका संदुरकर, स्वप्निल डुकरे, अरुण तिखे, अॅड. राहुल घोटेकर, माजी नगरसेविका कल्पना बबुलकर, पुष्पा उराडे, शितल आश्रम, शितल गुरनूरे, वनिता डुकरे, वंदना तिखे, सायली येरणे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. Chandrapur Raksha Bandhan grand event

    महिलांच्या स्वावलंबनासाठी राज्य सरकारचे विविध उपक्रम

    यावेळी बोलताना पालकमंत्री अशोक उईके म्हणाले कि, रक्षाबंधन हा भगिनींच्या सन्मान आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहे. आज चंद्रपूरच्या भगिनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ३० हजार राख्या पाठवून आपला विश्वास व्यक्त केला आहे, हा क्षण अभिमानाचा आहे. मुख्यमंत्री स्वतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहेत. राज्य सरकार महिलांच्या शिक्षण, आरोग्य, स्वावलंबनासाठी विविध उपक्रम राबवत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

    या कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, भगिनींचा विश्वास हा माझ्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहे. आज या कार्यक्रमातून भगिनींनी केवळ आमच्याच नाही तर थेट मुख्यमंत्री यांच्याप्रती विश्वासाचा पवित्र धागा पाठवून एक सुंदर संदेश दिला आहे. आमच्या लाडक्या ताईंच्या सुरक्षिततेसाठी, न्यायासाठी आणि सन्मानासाठी आम्ही प्राथमिकतेचे काम करू, असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. Chandrapur Raksha Bandhan

                या कार्यक्रमात लहान मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनी राखी बांधून सणाचे महत्त्व अधोरेखित केले. अखेरीस ३० हजार राख्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्याची औपचारिक घोषणा करत हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. विशेष म्हणजे अल्पसंख्यांक महिला आघाडीच्या वतीने ही 2 हजार राख्या मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आल्यात.  या कार्यक्रमाला महिला भगिनींची शेकडोंच्या संख्येने उपस्थिती होती.

  • kishor jorgewar on raksha bandhan । ✨ “भगिनींचा सन्मान हा आमचा अभिमान” रक्षाबंधनला आमदार जोरगेवारांचा भावनिक संकल्प

    kishor jorgewar on raksha bandhan

    kishor jorgewar on raksha bandhan : चंद्रपूर – भारतीय जनता पार्टी ग्रामीणच्या वतीने पडोली येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शेकडो महिलांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांनी भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत महिलांच्या सन्मान, सुरक्षेसाठी व प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी त्यांनी भगिनींचा विश्वास हा आमच्या ताकदीचा सर्वात मोठा स्तंभ आहे  असे प्रतिपादन केले.

    आमदार जोरगेवार यांचा जीवनदायिनी उपक्रम चर्चेत

    या कार्यक्रमाला महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप नेते नामदेव डाहुले, मंडळ अध्यक्ष विनोद खेवले, आशिष वाढई, दुर्गा वावणे, ममता मोरे, ज्योश्ना वनकर, सुरेखा पाटील, उज्वला नलगे, राकेश पिंपळकर, गुड्डू सिंग, नकुल वासमवार, सुरेश पिदुरकर, अचल चार्लेकर, डॉ.दशरथ झाडे, दयानंद नागरकर, महादेव पिदुरकर, नाकेश निखाडे, महेश येनुरकर, सुभाष पिंपळकर आदी मान्यवर उपस्थित होते. BJP Rakhi program women empowerment

    ५ हजार महिलांना प्रशिक्षणाचा लाभ

    यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, मतदारसंघात विकासकामे करताना महिलांची सुरक्षा आणि सन्मान याला आपण नेहमी केंद्रस्थानी ठेवले आहे. महिला सक्षमीकरणासाठी मतदारसंघात अनेक सेवाभावी उपक्रम राबविले आहेत. विविध प्रकारच्या महागड्या कोर्सचे प्रशिक्षण मोफत उपलब्ध करून दिले आहे. आतापर्यंत सुमारे पाच हजार महिलांना ब्युटी पार्लर, शिवणकाम, फॅशन डिझायनिंग यांसारख्या प्रशिक्षणांचा लाभ मिळाला असून यातील अनेक भगिनींनी स्वतःचा रोजगार सुरू केला आहे. local BJP Rakhi event women empowerment

    रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा दिवस नसून संरक्षण, सन्मान व साथ देण्याची शपथ घेण्याचा दिवस आहे. भारतीय जनता पार्टी नेहमीच ‘सबका साथ, सबका विकास’ या ध्येयाने कार्य करते. महिलांचे शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन आणि सुरक्षा यासाठी मी सदैव तत्पर राहीन. जिथे स्त्रीचा सन्मान होतो, तिथे देवता वास करतात. महिलांच्या प्रगतीशिवाय समाजाचा विकास अपूर्ण आहे.

    यासाठीच भाजप सरकारने लाडकी बहिण योजना, उज्ज्वला योजना, महिला बचतगटांना कर्जसहाय्य अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत. या सर्व योजना आपल्या भगिनींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आहेत, असेही आ. जोरगेवार यांनी सांगितले. या कार्यक्रमात शेकडो भगिनींनी आमदार किशोर जोरगेवार यांना राखीचे पवित्र बंधन बांधले. आमदारांनीही भेटवस्तू देत भगिनींचे आशीर्वाद घेतले.

  • free heart surgery for child । आमदारांचा जीवनदायी उपक्रम; चंद्रपूरच्या लहानग्यांना नवी संजीवनी!

    free heart surgery for child

    free heart surgery for child : चंद्रपूर – आमदार किशोर  जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित महाआरोग्य शिबिराचा एक हृदयस्पर्शी आणि जीवनदायी टप्पा आज साकारला. या शिबिरातून हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या एकूण सहा बालकांना मोफत शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले. ही सर्व बालके चंद्रपूर जिल्ह्यातील असून त्यांचे वय आठ वर्षांखालील आहे.

    क्षयरुग्णाबाबत घुग्गुस मधील राजीव रतन चिकित्सालयने घेतला महत्वाचा निर्णय

    मोफत शस्त्रक्रिया होणार

    यामध्ये केवळ पाच महिन्यांचे अक्षु शेंद्रे याचाही समावेश आहे. सर्व बालकांना चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून जुपिटर हॉस्पिटल, मुंबई येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष मयूर वाढई, रॉबिन बिश्वास, राकेश बोमनवार, सुमित बेले यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व बालकांवर शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत होणार आहे. बालकांना रवाना करण्याच्या या भावनिक क्षणी पालकांच्या डोळ्यात दिलासा आणि आनंदाश्रूंनी भरलेला होता.

    आ. जोरगेवार यांच्या सामाजिक उपक्रमातून सुरू झालेल्या या महाआरोग्य शिबिरामुळे जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्णांना मोफत तपासणी, औषधे आणि आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा मिळत आहे. अशा वैद्यकीय उपक्रमांना पुढे अधिक व्यापक स्वरूप दिले जाणार असून, कोणीही आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये ही आपली भूमिका असून हीच खरी आपली ध्येयपूर्ती असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

  • Amma Chowk memorial violation | अनधिकृत अम्मा चौक स्मारक बांधकामांवर कारवाईचे निर्देश

    Amma Chowk memorial violation

    Amma Chowk memorial violation : चंद्रपूर : चंद्रपूर येथील महादेव मंदिर (मुळशीगोदाम) हे भारत सरकारद्वारे 11 एप्रिल 1925 रोजीच्या अधिसूचनेनुसार केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) नुसार, या मंदिराच्या परिसरात महानगरपालिकेच्या माध्यमातून अम्मा चौक स्मारकासाठी अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण झाल्याची तक्रार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून करण्यात आली होती. या अनुषंगाने, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने यासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे.

    चंद्रपुरात 18 वर्षीय मुलाची मफेड्रोन पावडर ची वाहतूक

    नोटीसनुसार, प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे व अवशेष अधिनियम 1958 नुसार (Act 24 of 1958) या संरक्षित स्मारकाच्या 100 मीटरच्या परिसरात अनधिकृत बांधकाम, उत्खनन किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम (निर्माण) किंवा नूतनीकरण करण्यास सक्त मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस दोन वर्षांपर्यंतचा कारावास आणि/किंवा 1,00,000/- (एक लाख) रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.

    7 दिवसाच्या आत अतिक्रमण हटवा


    या प्रकरणी, भारत सरकारने, पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी, चंद्रपूर यांना, अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींना, बांधकामाची प्रक्रिया थांबवून ७ दिवसांच्या आत अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, जर ७ दिवसांच्या आत अतिक्रमण हटवले नाही, तर स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने ते हटवण्यात येईल आणि संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. Amma Chowk controversy


    या नोटीसमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, जर संरक्षित स्मारकाच्या परिसरात कोणत्याही बांधकामाची दुरुस्ती (Repairs) करायची असेल, तर त्यासाठी सक्षम प्राधिकारी (Competent Authority) यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.


    या नोटीसमुळे, स्थानिक प्रशासनाने महादेव मंदिराच्या संरक्षित परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर आणि अतिक्रमणांवर लक्ष केंद्रित केले आहे. मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

  • ramala lake floating cleaning machine । चंद्रपूरच्या हृदयात जलक्रांती, रामाळा तलाव स्वच्छता मोहिमेला गती, तलाव संवर्धनासाठी आ. किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न

    ramala lake floating cleaning machine

    ramala lake floating cleaning machine : चंद्रपूर – रामाळा तलाव सौदर्यीकण आणि संरक्षण यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर निधीतून घेण्यात आलेल्या तरंगत्या यंत्राच्या माध्यमातून रामाळा तलाव स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. सदर कामाची आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी करत अधिका-यांना सुचना केल्या आहे. सदर मशीनरी रामाळा तलाव स्वच्छतेत उपयुक्त ठरणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

    यावेळी उपायुक्त चिद्रावार, यांत्रिकी सहायक अभियंता चोरे, पाण्यापूरवठा कनिष्ठ अभियंता चोरे, महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, विधानसभा प्रमुख दशरथ ठाकूर, महामंत्री रवी गुरुनूले, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, मंडळ अध्यक्ष सुभाष अदमाने, संजीव सिंग, राकेश बोमनवार, तेजा सिंग, सुबोध चिकटे, नितेश गवळी, आदींची उपस्थिती होती.

    चंद्रपूर जिल्हाधिकारी व सीईओ यांनी केला अवयवदानाचा निर्णय

    आ. किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक व निसर्गरम्य रामाळा तलावाची स्वच्छता आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेने मोठा उपक्रम हाती घेतला आहे. अनेक वर्षांपासून तलावाच्या पृष्ठभागावर पसरलेल्या इकोर्निया या जलवनस्पतींमुळे तलावातील पाण्याचा प्रवाह, जलजीवन व सौंदर्य या तिन्ही गोष्टींवर प्रतिकूल परिणाम होत होता. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून आता विशेष यांत्रिक साधनांची मदत घेतली जात आहे. automatic lake cleaning machine

    स्वच्छतेचे प्रमाण व गती दोन्ही वाढणार

    आमदार किशोर जोरगेवार यांनी मंजूर केलेल्या निधीतून महानगरपालिकेच्या वतीने आणण्यात आलेल्या या अत्याधुनिक यांत्राद्र्वारे  ईकोर्निया वनस्पतींचे मोठ्या प्रमाणावर उच्चाटन सुरू आहे. मशीन पाण्यात तरंगत राहून थेट पृष्ठभागावरील व मुळांसकट वनस्पती गोळा करून बाहेर काढते. यामुळे स्वच्छतेचे प्रमाण व गती दोन्ही वाढले असून, अल्पावधीतच तलाव वनस्पतीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे.

    आज आमदार किशोर जोरगेवार यांनी रामाळा तलावावर भेट देऊन सुरू असलेल्या कामाची सखोल पाहणी केली. मशीनरीची कार्यपद्धती, कामाचा वेग आणि स्वच्छतेचा परिणाम याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.

    यावेळी ते म्हणाले, रामाळा तलाव हे फक्त जलस्रोत नसून चंद्रपूर शहराची ओळख आहे. या तलावाचे संरक्षण, संवर्धन आणि सौंदर्यवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. स्वच्छतेनंतरही सातत्याने देखभाल केली तरच हे कार्य दीर्घकाळ टिकेल असे ते म्हणाले. आ. जोरगेवार यांनी काम अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी तसेच साफ केलेल्या वनस्पतींचे योग्य व्यवस्थापन करण्याबाबतही अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या मोहिमेमुळे तलावातील पाणी प्रवाह सुधारेल, ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल, पाण्यातील जैवविविधतेला चालना मिळेल आणि तलाव परिसर पुन्हा एकदा नागरिकांसाठी स्वच्छ, निसर्गरम्य ठिकाण म्हणून उजळून निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. Ramala Lake beauty conservation project

  • Rani Durgavati tribal women empowerment । चंद्रपूरचा ऐतिहासिक दिवस, राणी दुर्गावती योजनेचा लोकार्पण समारंभ

    Rani Durgavati tribal women empowerment

    Rani Durgavati tribal women empowerment : चंद्रपूर, दि. 9 : आदिवासी महिलांना शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन व सामाजिक सक्षमता देऊन सर्वांगिण सक्षम बनविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या “राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना” उपक्रमाचा जिल्हास्तरीय लोकार्पण सोहळा आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे पार पडला. tribal women empowerment scheme

    राज्यातील मुख्य लोकार्पण समारंभ नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्याचे थेट प्रक्षेपण चंद्रपूर कार्यक्रमात दाखविण्यात आले.

    ११ ऑगस्ट रोजी चंद्रपुरात रोजगार मेळावा

    जिल्हा कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन आदी मान्यवर उपस्थित होते.

    राखी पौर्णिमा साजरी

    याप्रसंगी आदिवासी महिलांनी मान्यवरांना राखी बांधून योजनेचे स्वागत केले. विविध शासकीय योजनांचे लाभ प्रदान करून ‘राखी पौर्णिमा’ साजरी करण्यात आली.

     हंसराज अहिर यांनी महिलांना केवळ शिक्षण नव्हे तर आर्थिक सक्षमता देणे आवश्यक असल्याचे सांगितले. आमदार श्री. जोरगेवार यांनी आदिवासी युवतींना जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.

    प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी महिलांनी या उपक्रमाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे सांगून राज्य शासन या योजनेच्या उद्देशपूर्तीसाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.

  • Raksha Bandhan ceremony । राखीचा धागा – भावनिक नात्याचे, आदर आणि जबाबदारीचे प्रतीक – आ. किशोर जोरगेवार

    Raksha Bandhan ceremony

    Raksha Bandhan ceremony : चंद्रपूर – आज असंख्य बहिणींनी माझ्या हातावर राखी बांधून प्रेम, आपुलकी आणि स्नेहाचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. प्रत्येक राखीत मला बहिणींच्या मनातील माया, विश्वास आणि आपल्या नात्यातील अढळ बांधिलकीची अनुभूती झाली. हे नाते केवळ धाग्याचे नसून, भावनिक नात्याचे, परस्पर आदराचे आणि बहिणींप्रती भावाच्या जबाबदारीचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    आमदार जोरगेवार यांच्या पुढाकाराने २० अभ्यासिका होणार सुरु

    गुरुदेव सेवा समितीच्या महिला मंडळाच्या वतीने चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघ येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक संगिडवार, भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, पुरुषोत्तम राऊत, बबन मत्ते, टिपले, मंडळ अध्यक्ष स्वप्नील डुकरे, मंजुश्री कासनगोट्टूवार, कल्पना गिरडकर, नकुल वासमवार, चंदा ईटनकर आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

    नवी प्रेरणा आणि लोकसेवेची निष्ठा

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आज रक्षाबंधनाच्या या पवित्र पर्वानिमित्त चंद्रपूर महिला गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्याचा मला आनंद आहे. या सुंदर आणि भावनिक क्षणांचे साक्षीदार होणे, हे माझ्यासाठी केवळ सन्मानच नाही तर जीवनभर जपून ठेवावा असा एक अमूल्य ठेवा आहे. मंडळाच्या सर्व महिला सदस्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग आणि कार्यक्रमातील उत्साहामुळे सणाचा आनंद द्विगुणित झाला आहे. आपल्याकडून मिळालेल्या या प्रेमाच्या उबेने माझ्या आयुष्याला नेहमीच नवे बळ, नवी प्रेरणा आणि लोकसेवेची निष्ठा मिळत राहील. MLA Kishor Jorgewar

    या प्रसंगी आपण सर्वांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील राखी पाठवली आहे. हा भावनिक संदेश नक्कीच आपल्या बहिणींच्या प्रेमाचा आणि आपल्या संस्कृतीतील स्नेहबंधाचा गौरव वाढवणारा आहे.  असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला गुरुदेव सेवा मंडळाच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • open appeal to MLA Kishor Jorgewar । विद्यार्थ्यांच्या भविष्यावर राजकारण? रामू तिवारी यांचे आमदार जोरगेवारांना आवाहन

    open appeal to MLA Kishor Jorgewar

    open appeal to MLA Kishor Jorgewar : प्रिय आमदार साहेब,
    सप्रेम नमस्कार!
    सर्वप्रथम, आपण आणि आपले कुटुंबीय सुखी व समृद्ध राहावेत, तसेच आपल्या राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रगतीसाठी माझ्या शुभेच्छा! मी हे पत्र एका पक्षाचा महानगर प्रमुख म्हणून नव्हे, तर एक चंद्रपूर प्रेमी आणि मित्र म्हणून लिहीत आहे.

    आम आदमी पक्षाचे आमदार जोरगेवार यांना खुले पत्र

    आज माझ्या एका युवा सहकाऱ्याने मला यूट्यूबवरील एक व्हिडिओ दाखवला, ज्यामध्ये एक मुलगी ‘अम्मा की पढाई’ उपक्रम अचानक बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा दावा करते. या व्हिडिओमुळे मला वाटते की, आपण एक नवीन राजकीय नौटंकी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या भावनांचा आणि त्यांच्या भविष्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करणे हा एक चुकीचा मार्ग आहे. आमदार साहेब, ‘ये पब्लिक है, ये सब जानती है.’
    कृपया वाईट वाटून घेऊ नका, पण असे प्रकार खरोखर किळसवाणे वाटतात. विद्यार्थ्यांचा राजकीय हेतूंसाठी वापर तातडीने थांबवावा, अशी मी विनम्र विनंती करतो. Amma Ki Padhai event controversy


    ‘अम्मा की पढाई’ उपक्रमाला कोणीही विरोध केलेला नाही. मात्र, दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीच्या नावाने उपक्रम सुरू करण्यास आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा विरोध स्वाभाविक आहे. जर आपला खरोखर विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचा शुद्ध हेतू असेल, तर आपण विरोधकांशी संवाद साधला असता, त्यांच्याशी चर्चा केली असती किंवा उपक्रमाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव ठेवला असता. परंतु, आपण यापैकी काहीही केले नाही.


    आपल्या शपथपत्रानुसार, आपल्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. विरोधकांशी संवाद साधूनही मार्ग निघाला नसता, तर 24 तासांत ‘अम्मा की पढाई’ उपक्रमाची जागा बदलण्याची आर्थिक क्षमता आपल्यात आहे. जनता महाविद्यालयातील सभागृह, रोटरी हॉल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी हा उपक्रम तातडीने हलवणे आपल्यासाठी सहज शक्य होते. विरोधकांशी चर्चा केली असती, तर त्यांनीही कदाचित सहकार्य केले असते. मात्र, आपण एका दिवसात उपक्रम बंद केला आणि तातडीने त्याचा इव्हेंट आणि नौटंकी सुरू केली. open appeal to MLA Kishor Jorgewar

    आंबेडकरी जनतेच्या मनात शंका

    आपल्या कार्यालयात आजही डॉ. हेडगेवार आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे फोटो असल्याने आंबेडकरी जनतेच्या मनात शंका निर्माण झाली आहे. दीक्षाभूमीवर मागच्या दाराने प्रवेश करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी संवाद साधणे आपली जबाबदारी होती, पण तसे न करता आपण विद्यार्थ्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. Amma Ki Padhai political misuse

    उपक्रम २०२५ ला सुरु मग २०२४ च्या परीक्षेत २७ विद्यार्थी उत्तीर्ण कसे?

    मी स्पष्टपणे सांगतो, ‘अम्मा की पढाई’ उपक्रमाला आमचे पूर्ण समर्थन आहे. यामध्ये काही अडचण आल्यास आपल्या परीने सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत(फक्त त्यात राजकारण नको). विद्यार्थ्यांचे एक दिवसही नुकसान होणार नाही, याची काळजी आम्ही सर्व मिळून घेऊ. पण कृपया, या उपक्रमाचा राजकीय वापर थांबवा.
    याशिवाय, 2024 च्या एमपीएससी गट ‘ड’ परीक्षेत ‘अम्मा की पढाई’ केंद्रातील 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती मला मिळाली. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! परंतु, हा उपक्रम 2025 मध्ये सुरू झाला, मग 2024 च्या परीक्षेत येथील विद्यार्थ्यांनी कसा सहभाग घेतला? याबाबत सविस्तर माहिती द्यावी, अशी विनंती. Amma Ki Padhai MPSC 2024 student results discrepancy

    माझे जिव्हाळ्याचे नाते

    वैयक्तिक स्तरावर, आपल्या दिवंगत आईंबरोबर माझे जिव्हाळ्याचे नाते होते, हे आपणास माहीत आहे. टोपल्या विकताना त्यांना अतिक्रमण विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागायचे, तेव्हा त्या मला आवर्जून बोलावायच्या. त्यांचे माझ्यावर मुलासारखे प्रेम होते, असे मला वाटते. त्यामुळे त्यांच्या नावाचा मी कधीही विरोध करू शकत नाही. परंतु, आपल्या आईचे सार्वजनिक जीवनात विशेष योगदान नव्हते, हे सर्व चंद्रपूरकरांना माहीत आहे. ‘अम्मा टिफिन’, ‘अम्मा की पढाई’, ‘अम्मा की दुकान’ हे उपक्रम सुरुवातीला कौतुकास्पद वाटले, पण आता त्यातून राजकीय हेतूंचा गंध येत आहे. open appeal to MLA Kishor Jorgewar

    वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,शहीद बाबुराव थोरात यांच्यासारख्या थोर व्यक्तींचे चंद्रपूरच्या इतिहासात मोठे योगदान आहे. अशा भूमीत आपल्या आईच्या नावाने चौक किंवा पुतळा उभारण्याचा विचार आश्चर्यकारक आहे. आपण गांधी चौकाच्या बाजूला ‘अम्मा चौक’ आणि दीक्षाभूमीवर ‘अम्मा की पढाई’ सुरू करून महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्याशी तुलना करत आहात, असा चुकीचा संदेश गेला आहे.
    आईच्या नावाचा राजकीय वापर आता थांबवावा आणि चंद्रपूरची सांस्कृतिक परंपरा जपण्याचा प्रयत्न करावा, अशी मी विनंती करतो. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत हा वाद येथेच संपवतो.
    आपला स्नेही
    रितेश रामु तिवारी