open appeal to MLA Kishor Jorgewar । विद्यार्थ्यांच्या भविष्यावर राजकारण? रामू तिवारी यांचे आमदार जोरगेवारांना आवाहन

open appeal to MLA Kishor Jorgewar

open appeal to MLA Kishor Jorgewar : प्रिय आमदार साहेब,
सप्रेम नमस्कार!
सर्वप्रथम, आपण आणि आपले कुटुंबीय सुखी व समृद्ध राहावेत, तसेच आपल्या राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रगतीसाठी माझ्या शुभेच्छा! मी हे पत्र एका पक्षाचा महानगर प्रमुख म्हणून नव्हे, तर एक चंद्रपूर प्रेमी आणि मित्र म्हणून लिहीत आहे.

आम आदमी पक्षाचे आमदार जोरगेवार यांना खुले पत्र

आज माझ्या एका युवा सहकाऱ्याने मला यूट्यूबवरील एक व्हिडिओ दाखवला, ज्यामध्ये एक मुलगी ‘अम्मा की पढाई’ उपक्रम अचानक बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा दावा करते. या व्हिडिओमुळे मला वाटते की, आपण एक नवीन राजकीय नौटंकी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या भावनांचा आणि त्यांच्या भविष्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करणे हा एक चुकीचा मार्ग आहे. आमदार साहेब, ‘ये पब्लिक है, ये सब जानती है.’
कृपया वाईट वाटून घेऊ नका, पण असे प्रकार खरोखर किळसवाणे वाटतात. विद्यार्थ्यांचा राजकीय हेतूंसाठी वापर तातडीने थांबवावा, अशी मी विनम्र विनंती करतो. Amma Ki Padhai event controversy


‘अम्मा की पढाई’ उपक्रमाला कोणीही विरोध केलेला नाही. मात्र, दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीच्या नावाने उपक्रम सुरू करण्यास आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा विरोध स्वाभाविक आहे. जर आपला खरोखर विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचा शुद्ध हेतू असेल, तर आपण विरोधकांशी संवाद साधला असता, त्यांच्याशी चर्चा केली असती किंवा उपक्रमाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव ठेवला असता. परंतु, आपण यापैकी काहीही केले नाही.


आपल्या शपथपत्रानुसार, आपल्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. विरोधकांशी संवाद साधूनही मार्ग निघाला नसता, तर 24 तासांत ‘अम्मा की पढाई’ उपक्रमाची जागा बदलण्याची आर्थिक क्षमता आपल्यात आहे. जनता महाविद्यालयातील सभागृह, रोटरी हॉल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी हा उपक्रम तातडीने हलवणे आपल्यासाठी सहज शक्य होते. विरोधकांशी चर्चा केली असती, तर त्यांनीही कदाचित सहकार्य केले असते. मात्र, आपण एका दिवसात उपक्रम बंद केला आणि तातडीने त्याचा इव्हेंट आणि नौटंकी सुरू केली. open appeal to MLA Kishor Jorgewar

आंबेडकरी जनतेच्या मनात शंका

आपल्या कार्यालयात आजही डॉ. हेडगेवार आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे फोटो असल्याने आंबेडकरी जनतेच्या मनात शंका निर्माण झाली आहे. दीक्षाभूमीवर मागच्या दाराने प्रवेश करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी संवाद साधणे आपली जबाबदारी होती, पण तसे न करता आपण विद्यार्थ्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. Amma Ki Padhai political misuse

उपक्रम २०२५ ला सुरु मग २०२४ च्या परीक्षेत २७ विद्यार्थी उत्तीर्ण कसे?

मी स्पष्टपणे सांगतो, ‘अम्मा की पढाई’ उपक्रमाला आमचे पूर्ण समर्थन आहे. यामध्ये काही अडचण आल्यास आपल्या परीने सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत(फक्त त्यात राजकारण नको). विद्यार्थ्यांचे एक दिवसही नुकसान होणार नाही, याची काळजी आम्ही सर्व मिळून घेऊ. पण कृपया, या उपक्रमाचा राजकीय वापर थांबवा.
याशिवाय, 2024 च्या एमपीएससी गट ‘ड’ परीक्षेत ‘अम्मा की पढाई’ केंद्रातील 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती मला मिळाली. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! परंतु, हा उपक्रम 2025 मध्ये सुरू झाला, मग 2024 च्या परीक्षेत येथील विद्यार्थ्यांनी कसा सहभाग घेतला? याबाबत सविस्तर माहिती द्यावी, अशी विनंती. Amma Ki Padhai MPSC 2024 student results discrepancy

माझे जिव्हाळ्याचे नाते

वैयक्तिक स्तरावर, आपल्या दिवंगत आईंबरोबर माझे जिव्हाळ्याचे नाते होते, हे आपणास माहीत आहे. टोपल्या विकताना त्यांना अतिक्रमण विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागायचे, तेव्हा त्या मला आवर्जून बोलावायच्या. त्यांचे माझ्यावर मुलासारखे प्रेम होते, असे मला वाटते. त्यामुळे त्यांच्या नावाचा मी कधीही विरोध करू शकत नाही. परंतु, आपल्या आईचे सार्वजनिक जीवनात विशेष योगदान नव्हते, हे सर्व चंद्रपूरकरांना माहीत आहे. ‘अम्मा टिफिन’, ‘अम्मा की पढाई’, ‘अम्मा की दुकान’ हे उपक्रम सुरुवातीला कौतुकास्पद वाटले, पण आता त्यातून राजकीय हेतूंचा गंध येत आहे. open appeal to MLA Kishor Jorgewar

वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,शहीद बाबुराव थोरात यांच्यासारख्या थोर व्यक्तींचे चंद्रपूरच्या इतिहासात मोठे योगदान आहे. अशा भूमीत आपल्या आईच्या नावाने चौक किंवा पुतळा उभारण्याचा विचार आश्चर्यकारक आहे. आपण गांधी चौकाच्या बाजूला ‘अम्मा चौक’ आणि दीक्षाभूमीवर ‘अम्मा की पढाई’ सुरू करून महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्याशी तुलना करत आहात, असा चुकीचा संदेश गेला आहे.
आईच्या नावाचा राजकीय वापर आता थांबवावा आणि चंद्रपूरची सांस्कृतिक परंपरा जपण्याचा प्रयत्न करावा, अशी मी विनंती करतो. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत हा वाद येथेच संपवतो.
आपला स्नेही
रितेश रामु तिवारी

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *