AAP open letter to mla kishor jorgewar । 💥 “अम्मा की पढ़ाई” वरून AAP चं आमदार जोरगेवार यांना खुले पत्र

AAP open letter to mla kishor jorgewar

AAP open letter to mla kishor jorgewar : आदरणीय आमदार किशोरजी,

आपण आपल्या पत्रात “अम्मा की पढ़ाई” हे केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय एका आत्मपरीक्षणात्मक, भावनिक शैलीत जनतेसमोर मांडला. आपण लिहिता की, “ही धम्मसेवा आहे” आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंना आपण ‘अस्वस्थता’ म्हणून मांडता. पण हा मुद्दा भावनांचा नाही हा इतिहास, समाजप्रबोधन, आणि संविधानाच्या मूल्यांचा विषय आहे. Amma ki padhai controversy

अम्मा कि पढाई वाद, आमदार जोरगेवार यांचं भावनिक पत्र

आमच्या आरोपांचा गाभा काय होता?

  1. दीक्षाभूमीच्या परिसरात तिसऱ्या ओळखीची जाणीवपूर्वक निर्मिती “अम्मा की पढ़ाई” हे नाव देऊन.
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मुद्दाम टाळले गेले.
  3. शासकीय रचनेत कोणताही स्पष्ट ठराव न करता, एका विशिष्ट ओळखीचा प्रचार सुरू केला गेला.
  4. स्मारकाच्या किंवा सौंदर्यीकरणाच्या नावाखाली “आयडेंटिटी शिफ्ट” सुरू करण्याचा भाजपाचा देशव्यापी पॅटर्न इथेही दिसून आला. Chandrapur Diksha Bhumi identity politics

आपण काय म्हणता आणि आम्ही का असहमत आहोत?

१. “हा उपक्रम धम्मसेवा आहे”
धम्मसेवा व्यक्तिगत भावना नसते — ती सामूहिक असते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा दीक्षा दिली, तेव्हा ती वैयक्तिक नव्हती — ती क्रांती होती. आपण जर या कार्याला “धम्मसेवा” म्हणत असाल, तर ती पवित्र सेवा एका विशिष्ट ओळखीच्या किंवा नात्याच्या नावाखाली चालवणे म्हणजे त्या क्रांतीचा अवमूल्यन आहे. मग तो तुमच्या मातोश्रींचा आदर असला तरीही. Amma ki padhai vs Ambedkar values

२. “गैरसमज निर्माण झाले”
गैरसमज नव्हते. लोकांनी स्पष्टपणे पाहिले की, बाबासाहेबांचं नाव बाजूला ठेऊन, एका भावनिक नात्याच्या आधारे दीक्षाभूमीच्या परिसरात नवीन ब्रँडिंग सुरू होत होतं. तुम्ही हे केंद्र एखाद्या वस्तीमध्ये सुरू केलं असतं, तर कोणी विरोध केला नसता. पण तुम्ही नेमकं *डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि दीक्षाभूमी परिसर निवडला — हे निवडणूकपूर्व मनोवैज्ञानिक रणनितीचे पाऊल होते.

३. “विद्यार्थ्यांचा विकास झाला, 27 उत्तीर्ण झाले”

हे खूप चांगले आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. पण शिक्षण देताना त्यावर तुमचं “ब्रँडिंग” लावणं — हेच प्रश्न निर्माण करतं.
विचार करा — जर दुसऱ्या कुणी ‘हेडगेवार की पढाई’ सुरू केलं असतं, तर ते ही धम्मसेवा मानली गेली असती का?

मुख्य मुद्दा : “ज्योत विझली नाही — पण तुमचा हात जर त्या ज्योतीच्या सावलीतच राजकारण करत असेल, तर ती विझवणंच योग्य!”

तुम्ही लिहिता की, “ज्योत विझलेली नाही – ती पुन्हा पेटणार आहे”* पण प्रश्न ‘ज्योती’चा नाही आहे.
प्रश्न त्या ज्योतीच्या नावाखाली कोणते झेंडे फडकवले जातात, हाच आहे!
तुम्ही सांगत आहात की केंद्र बंद केलं — परंतु बाबासाहेबाचे नाव ठेऊन हे केंद्र सुरू ठेवता आले असते परंतु तुम्ही तसें केले नाही नावासाठी एवढा अट्टहास का ? हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. AAP open letter to mla kishor jorgewar

तुमचं पत्र — एक रणनीती, आत्मपरीक्षण नव्हे.

आपण तुमच्या पत्रात विद्यार्थ्यांच्या अश्रूंना, आईच्या आठवणींना, आणि धम्मसेवेच्या शब्दसामर्थ्याला कवटाळून लोकभावना तयार करण्याचा प्रयत्न करता.
हे आम आदमी पक्षाचा कार्यकर्ते म्हणून चुकीचे वाटते , बाबासाहेबांच्या विचारांचे कार्यकर्ते म्हणून, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो

भावना बाजूला ठेवा, सत्य ऐका — “बाबासाहेबांची जागा कोणत्याही नावाने बदलता येणार नाही.”

म्हणून शेवटी आमचं उत्तर स्पष्ट आहे:

तुमचं हे पत्र स्वतःला क्लीन चिट देण्याचा एक प्रयत्न आहे.
पण चंद्रपूरच्या जनतेने डोळे उघडले आहेत.
हा लढा “अम्मा की पढ़ाई” विरोधात नाही — तर बाबासाहेबांविरुद्ध सुरू असलेल्या हळूहळू चालणाऱ्या ओळख-हेरफेरी विरोधात आहे.

बाबासाहेबांचे नाव, कार्य आणि जागा कोणत्याही प्रकारे, कोणत्याही भावनिक संज्ञेतून झाकली जाणार नाही हीच आम्ही मागणी पुन्हा मांडतो. आपणाला माहित असेल आम आदमी पार्टी ने दिल्ली पंजाब मध्ये शिक्षा क्रांती सुरू केली ती केवळ नावासाठी नाही तर गरीब, वंचित ,दुर्बल घटकातील मुलगा शिकला पाहिजे कुठलेही जाती पातीचे राजकारण न करता मुलगा सक्षम झाला पाहिजे हीच आम आदमी पार्टीची भूमिका आहे. शिक्षण आणी आरोग्य या विषयावर कुणी राजकारण करत असेल तर आम आदमी पार्टी भविष्यात ही विरोध करणार.
हम राजनीती करणे नही इसे बदलणे आये हैं !

जय संविधान

आम आदमी पक्ष,
चंद्रपुर

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *