Tag: आमदार किशोर जोरगेवार

  • mla kishor jorgewar study room initiative । 📚 २० अभ्यासिका! समाजासाठी क्रांतिकारी उपक्रम! किशोर जोरगेवारांचा पुढाकार

    mla kishor jorgewar study room initiative

    mla kishor jorgewar study room initiative : चंद्रपूर – श्री श्री रामकृष्ण सेवा समितीने हाती घेतलेले हे स्वप्नवत कार्य आज पहिल्या टप्प्यात प्रवेश करत आहे. आपल्या परिसरात अभ्यासिका उभारण्याचा शुभारंभ होत आहे. ही केवळ चार भिंतींची इमारत नसून, आपल्या मुलांच्या आणि समाजाच्या भविष्यास आकार देणारे ज्ञानमंदिर ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. modern digital study center

    फार्मर आयडी शिवाय मिळणार पीक विम्याचा लाभ

    आमदार किशोर जोरगेवार यांनी कृष्णा नगर येथील श्री श्री रामकृष्ण सेवा समिती येथे अभ्यासिकेच्या बांधकामासाठी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर कामाचे भुमिपूजन आज त्यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री मनोज पॉल, सविता दंढारे, राष्ट्रीय परिषद सदस्य तुषार सोम, बलराम डोडाणी, मंडळ अध्यक्ष अॅड. सारिका संदुरकर, सचिव विश्वजीत शाहा, रॉबिन बिश्वास, तपोष डे, प्रलय सरकार, आनंद रणशूर, सुधाकर राखडे, जितेश कूळमेथे, कृष्णा मंडळ, बलाई चक्रवर्ती, मदन शहा, संतोष चक्रवर्ती, सुशांत भद्रा, सुनील रॉय आदी मान्यवर उपस्थित होते.

    चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात तब्बल २० अभ्यासिका

    पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याचा संकल्प आपण केला आहे. ११ अभ्यासिकांचा आपला संकल्प होता; मात्र आता जवळपास २० अभ्यासिका आपण मतदारसंघात तयार करत आहोत. यातील काही अभ्यासिकांचे काम पूर्ण झाले असून, विद्यार्थी येथे अभ्यास करून स्वप्नांना पंख देत आहेत, असे ते म्हणाले. bjp mla kishor jorgewar development works

    ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी केवळ पुस्तक वाचण्याची किंवा अभ्यास करण्याची जागा नसेल, तर त्यांच्या विचारशक्तीचा, सर्जनशीलतेचा आणि स्वप्नांचा विस्तार करणारे केंद्र ठरेल. येथे होणाऱ्या वाचन-संवादातून, मार्गदर्शन सत्रांतून आणि विविध शैक्षणिक उपक्रमांतून अनेक तरुणाई आपले उद्दिष्ट पूर्ण करतील. केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे, तर आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची जपणूक हेही या अभ्यासिकेचे ध्येय असेल. आजच्या डिजिटल युगात वाचनाची आणि प्रत्यक्ष संवादाची गरज अधिक वाढली आहे. अशा वेळी, अशी सुविधा निर्माण होणे म्हणजे पुढच्या पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • AAP open letter to mla kishor jorgewar । 💥 “अम्मा की पढ़ाई” वरून AAP चं आमदार जोरगेवार यांना खुले पत्र

    AAP open letter to mla kishor jorgewar

    AAP open letter to mla kishor jorgewar : आदरणीय आमदार किशोरजी,

    आपण आपल्या पत्रात “अम्मा की पढ़ाई” हे केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय एका आत्मपरीक्षणात्मक, भावनिक शैलीत जनतेसमोर मांडला. आपण लिहिता की, “ही धम्मसेवा आहे” आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंना आपण ‘अस्वस्थता’ म्हणून मांडता. पण हा मुद्दा भावनांचा नाही हा इतिहास, समाजप्रबोधन, आणि संविधानाच्या मूल्यांचा विषय आहे. Amma ki padhai controversy

    अम्मा कि पढाई वाद, आमदार जोरगेवार यांचं भावनिक पत्र

    आमच्या आरोपांचा गाभा काय होता?

    1. दीक्षाभूमीच्या परिसरात तिसऱ्या ओळखीची जाणीवपूर्वक निर्मिती “अम्मा की पढ़ाई” हे नाव देऊन.
    2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मुद्दाम टाळले गेले.
    3. शासकीय रचनेत कोणताही स्पष्ट ठराव न करता, एका विशिष्ट ओळखीचा प्रचार सुरू केला गेला.
    4. स्मारकाच्या किंवा सौंदर्यीकरणाच्या नावाखाली “आयडेंटिटी शिफ्ट” सुरू करण्याचा भाजपाचा देशव्यापी पॅटर्न इथेही दिसून आला. Chandrapur Diksha Bhumi identity politics

    आपण काय म्हणता आणि आम्ही का असहमत आहोत?

    १. “हा उपक्रम धम्मसेवा आहे”
    धम्मसेवा व्यक्तिगत भावना नसते — ती सामूहिक असते.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा दीक्षा दिली, तेव्हा ती वैयक्तिक नव्हती — ती क्रांती होती. आपण जर या कार्याला “धम्मसेवा” म्हणत असाल, तर ती पवित्र सेवा एका विशिष्ट ओळखीच्या किंवा नात्याच्या नावाखाली चालवणे म्हणजे त्या क्रांतीचा अवमूल्यन आहे. मग तो तुमच्या मातोश्रींचा आदर असला तरीही. Amma ki padhai vs Ambedkar values

    २. “गैरसमज निर्माण झाले”
    गैरसमज नव्हते. लोकांनी स्पष्टपणे पाहिले की, बाबासाहेबांचं नाव बाजूला ठेऊन, एका भावनिक नात्याच्या आधारे दीक्षाभूमीच्या परिसरात नवीन ब्रँडिंग सुरू होत होतं. तुम्ही हे केंद्र एखाद्या वस्तीमध्ये सुरू केलं असतं, तर कोणी विरोध केला नसता. पण तुम्ही नेमकं *डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि दीक्षाभूमी परिसर निवडला — हे निवडणूकपूर्व मनोवैज्ञानिक रणनितीचे पाऊल होते.

    ३. “विद्यार्थ्यांचा विकास झाला, 27 उत्तीर्ण झाले”

    हे खूप चांगले आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. पण शिक्षण देताना त्यावर तुमचं “ब्रँडिंग” लावणं — हेच प्रश्न निर्माण करतं.
    विचार करा — जर दुसऱ्या कुणी ‘हेडगेवार की पढाई’ सुरू केलं असतं, तर ते ही धम्मसेवा मानली गेली असती का?

    मुख्य मुद्दा : “ज्योत विझली नाही — पण तुमचा हात जर त्या ज्योतीच्या सावलीतच राजकारण करत असेल, तर ती विझवणंच योग्य!”

    तुम्ही लिहिता की, “ज्योत विझलेली नाही – ती पुन्हा पेटणार आहे”* पण प्रश्न ‘ज्योती’चा नाही आहे.
    प्रश्न त्या ज्योतीच्या नावाखाली कोणते झेंडे फडकवले जातात, हाच आहे!
    तुम्ही सांगत आहात की केंद्र बंद केलं — परंतु बाबासाहेबाचे नाव ठेऊन हे केंद्र सुरू ठेवता आले असते परंतु तुम्ही तसें केले नाही नावासाठी एवढा अट्टहास का ? हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. AAP open letter to mla kishor jorgewar

    तुमचं पत्र — एक रणनीती, आत्मपरीक्षण नव्हे.

    आपण तुमच्या पत्रात विद्यार्थ्यांच्या अश्रूंना, आईच्या आठवणींना, आणि धम्मसेवेच्या शब्दसामर्थ्याला कवटाळून लोकभावना तयार करण्याचा प्रयत्न करता.
    हे आम आदमी पक्षाचा कार्यकर्ते म्हणून चुकीचे वाटते , बाबासाहेबांच्या विचारांचे कार्यकर्ते म्हणून, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो

    भावना बाजूला ठेवा, सत्य ऐका — “बाबासाहेबांची जागा कोणत्याही नावाने बदलता येणार नाही.”

    म्हणून शेवटी आमचं उत्तर स्पष्ट आहे:

    तुमचं हे पत्र स्वतःला क्लीन चिट देण्याचा एक प्रयत्न आहे.
    पण चंद्रपूरच्या जनतेने डोळे उघडले आहेत.
    हा लढा “अम्मा की पढ़ाई” विरोधात नाही — तर बाबासाहेबांविरुद्ध सुरू असलेल्या हळूहळू चालणाऱ्या ओळख-हेरफेरी विरोधात आहे.

    बाबासाहेबांचे नाव, कार्य आणि जागा कोणत्याही प्रकारे, कोणत्याही भावनिक संज्ञेतून झाकली जाणार नाही हीच आम्ही मागणी पुन्हा मांडतो. आपणाला माहित असेल आम आदमी पार्टी ने दिल्ली पंजाब मध्ये शिक्षा क्रांती सुरू केली ती केवळ नावासाठी नाही तर गरीब, वंचित ,दुर्बल घटकातील मुलगा शिकला पाहिजे कुठलेही जाती पातीचे राजकारण न करता मुलगा सक्षम झाला पाहिजे हीच आम आदमी पार्टीची भूमिका आहे. शिक्षण आणी आरोग्य या विषयावर कुणी राजकारण करत असेल तर आम आदमी पार्टी भविष्यात ही विरोध करणार.
    हम राजनीती करणे नही इसे बदलणे आये हैं !

    जय संविधान

    आम आदमी पक्ष,
    चंद्रपुर

  • Politics on Amma Ki Padhai । शिक्षणाच्या उजेडावर राजकारणाचा अंधार, Amma Ki Padhai बंद?

    Politics on Amma Ki Padhai

    Politics on Amma Ki Padhai : चंद्रपूर – आज अनेक युवा डोळ्यात अधिकारी बनण्याचं स्वप्न बाळगून असतात , मात्र आर्थिक परिस्थिती, योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे अनेक युवा वर्गाचे स्वप्न भंग होतात, मात्र हि अडचण युवा वर्गापुढे येऊ नये यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या आईच्या नावाने अम्मा कि पढाई हा उपक्रम सुरु केला मात्र गोरगरीब युवकांच्या अधिकारी बनण्याच्या मार्गावर काही राजकीय पक्षांनी अडथळा आणला. आणि आज हा उपक्रम काही काळासाठी स्थगित करण्यात आला. Politics on Amma Ki Padhai

    वनात वनरक्षकाने केला अत्याचार, चंद्रपूर हादरलं

    महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी युवा वर्गाला शिका व संघटित व्हा, असा मोलाचा संदेश दिला होता, त्यांच्या या संदेशावर आमदार जोरगेवार यांनी एक पाऊल पुढे टाकत अम्मा कि पढाई उपक्रमाचा शुभारंभ केला, या माध्यमातून पूर्व तयारी परीक्षा घेण्यात आली ज्यामध्ये तब्बल ३ हजार युवक वर्गाने परीक्षा दिली व त्यामधून एकूण २८४ विद्यार्थ्यांची निवड झाली. जून महिन्यात शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अम्मा कि पढाई केंद्र सुरु करण्यात आले. सर्व सुरळीत सुरु होते मात्र जोरगेवार हे दीक्षाभूमी परिसरात अतिक्रमण करीत आहे असा आरोप करीत काही राजकीय पक्षांनी अम्मा कि पढाई केंद्र बंद करा अशी मागणी केली. Amma Ki Padhai free coaching

    यावर आमदार किशोर जोरगेवार यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून नवा वाद निर्माण न व्हावा यासाठी सदर केंद्र आंबेडकर महाविद्यालयातून बंद करण्यात आला. याबाबत त्यांनी संदेश प्रसारित केला आहे.

    काय आहे आमदार जोरगेवार यांचा भावनिक संदेश?

    महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूरच्या पवित्र भूमीत आपल्या करुणामयी स्पर्शाने धम्मदीक्षेचा दीप प्रज्वलित केला. ही दीक्षा केवळ धर्मग्रहण नव्हे, तर आत्मोद्धार, समता, आणि शिक्षणाच्या क्रांतीची ग्वाही होती. त्याच प्रेरणेतून शिक्षणाची नवी ज्योत प्रज्वलित करण्यासाठी. ‘अम्मा की पढाई’ हा उपक्रम आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सुरू केला. MPSC exam coaching for poor youth

      या उपक्रमात 284 गरीव व गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन दिले जात होते. महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024 चा निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) नुकताच दिनांक ६ ऑगस्ट रोजी जाहीर केला. यामध्ये अम्मा की पढाई शिक्षा केंद्रातील 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याचे समाधान आहे. ही केवळ शैक्षणिक यशाची गोष्ट नव्हे, तर त्या मुलांच्या स्वप्नांना हात देणाऱ्या धम्मकार्याची साक्ष आहे. मात्र, या कार्याला काही राजकीय पक्षांचा विरोध उभा राहिला. त्यांच्या भावना आम्ही समजून घेतो, त्यांचाही आम्ही मन:पूर्वक आदर करतो.

    परंतु हे केंद्र नेमकं काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, हे समजवण्यात कदाचित आम्ही कमी पडलो असू शकतो. किंवा, हा एक विधायक सामाजिक उपक्रम राजकारणाच्या आणि त्यातून निर्माण झालेल्या गैरसमजाच्या भोवऱ्यात सापडून बळी गेला असेल — हे सुद्धा चिंतन करण्यासारखे आहे. उद्घाटनाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत जे तेज होतं, त्याच डोळ्यांत आज अश्रू आहेत – ही बाब अस्वस्थ करणारी आहे. Chandrapur youth free exam preparation centre


    स्वतःच्या जिद्दीवर आणि शिक्षणावर विश्वास ठेवणाऱ्या या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेतलं… आज त्यांच्या अपेक्षांना तात्पुरता विराम मिळतो आहे, ही गोष्ट मनाला चटका लावून जाते. हा उपक्रम काही काळासाठी स्थगित करत आहोत. नवीन जागेची शोधाशोध व पुनर्रचना करण्यासाठी आम्हाला थोडा कालावधी लागणार आहे.

    या निर्णयामुळे काही विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना तात्पुरता थांबा लागेल, याचे दुःख आहे. आम्ही त्यांची आशा पूर्ण करू शकलो नाही, याचे मनस्वी वाईटही वाटते. पण हे कार्य इथे थांबणार नाही. कारण शिक्षण ही बाबासाहेबांची खरी दीक्षा आहे, आणि ही आमची धम्मसेवा आहे. या प्रवासात आमच्यासोबत उभं राहिलेल्या प्रत्येकाचा आम्ही ऋणी आहोत

       ज्योत विझलेली नाही — ती पुन्हा पेटणार आहे. अधिक तेजस्वीपणे.

     –  तुमचा किशोर जोरगेवार 

    राजकारणाचा बळी अम्मा कि पढाई

    ज्या राजकीय पक्षांनी अम्मा कि पढाई या केंद्राला विरोध केला त्यांनी कदाचित आयुष्यात एकही गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली नसेल, शिक्षणाचं महत्व काय हे बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित वर्गाला पटवून दिले होते मात्र आज राजकीय पक्ष बाबासाहेबांच्या धोरणावर टीका करताना दिसत आहे. राजकीय पक्षांनी या विरोधाच्या माध्यमातून गोरगरीब मुलांचे भविष्य उध्वस्त केले आहे.

  • Ramchandra Hindi primary school । चंद्रपुरातील रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा होणार स्मार्ट व डिजिटल

    Ramchandra Hindi primary school

    Ramchandra Hindi primary school : चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील जटपूरा गेट परिसरात स्थित रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळेला मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यासाठी  ५ कोटींच्या निधीची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे. ना. दादाजी भुसे चंद्रपूर दौऱ्यावर असताना, विश्रामगृह येथे आमदार जोरगेवार यांनी त्यांची भेट घेऊन या संदर्भातील निवेदन सादर केले. Model school funding 5 crore

    चंद्रपूर हादरलं, वनरक्षकाने वनात केला अत्याचार

    यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्षा छबू वैरागडे, भाजप नेते अशोक जिवतोडे, विधानसभा महिला प्रमुख वंदना हातगावकर, प्रकाश देवतळे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, नामदेव डाहुले, महामंत्री मनोज पाल, रवि गुरुनुरे, सविता दंढारे, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, स्वप्नील डुकरे, सुभाष अदमाने, रवि जोगी, ॲड. सारिका संदुरकर, देवनंद वाढई, वंदना तिखे, सायली येरणे, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा बोरगमवार यांची उपस्थिती होती.

    शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत

    रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा प्रभाग क्र. ७ मध्ये असून, ही शाळा गेल्या अनेक वर्षांपासून अल्पसाधनांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. शाळेतील बहुतांश विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. सध्या शाळेची इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असून पायाभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. वर्गखोल्या अपुऱ्या आहेत, शौचालयांची संख्या कमी आहे, तसेच डिजिटल शिक्षणासाठी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. Chandrapur Jatpura Gate model school funding

    या पार्श्वभूमीवर, सदर शाळेला मॉडेल स्कूलचा दर्जा देत नव्याने सुसज्ज इमारत, स्मार्ट क्लासरूम, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, वाचनालय, शौचालय, शुद्ध पिण्याचे पाणी आणि खेळाचे मैदान उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यासाठी अंदाजे  ५ कोटी निधीची आवश्यकता असुन हा निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना केली आहे.

  • Event MLA Road chandrapur । ‘इव्हेन्ट आमदार मार्ग”, चंद्रपुरात कांग्रेसने केले रस्त्याचे नामकरण

    Event MLA Road chandrapur

    Event MLA Road chandrapur : चंद्रपूर ६ ऑगस्ट – चंद्रपूर शहरातील महात्मा गांधी रोड, कस्तुरबा गांधी रोड, पठाणपुरा, इंजिनिअरिंग कॉलेज परिसर, जटपुरा गेट आदी प्रमुख रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय बनली आहे. रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबर आणि धुळीच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे वाहतूक खोळंबते असून अपघात, श्वसन विकार यांसारख्या गंभीर समस्या उद्भवत आहेत.

    ‘इव्हेंट आमदार मार्ग’ असे नामकरण

    या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर काँग्रेसने जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडले. बागला चौक ते कामगार चौक या मार्गावरील खड्ड्यांना प्रतीकात्मक नाव देत ‘इव्हेंट आमदार मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. “मुक्त करा… मुक्त करा… चंद्रपूरला खड्डे मुक्त करा!”, “आमदारांचा इव्हेंट जोरात… पण रस्त्यावर जनतेचा जीव धोक्यात!” अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. event MLA road potholes Chandrapur


    चंद्रपूर हे ऐतिहासिक, औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून, येथे दररोज बाहेरून येणाऱ्या नागरिकांची व वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मागील अनेक वर्षांपासून रस्त्यांचे सुस्थितिकरण झालेले नाही. अमृत जलप्रकल्प आणि भूमिगत गटार योजनेसाठी फोडले गेलेले रस्ते अजूनही दुरुस्त झालेले नाहीत.महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

    डिजे मुक्त गणोशोत्सव साजरा करा – चंद्रपूर पोलिसांचे आवाहन

    धुळीमुळे श्वसन विकार तर खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसने आंदोलन करत रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे. शहरातील सर्व खड्डे तात्काळ बुजवावेत, अपूर्ण असलेली सिमेंट व डांबरीकरणाची कामे त्वरित पूर्ण करावीत, धूळ कमी करण्यासाठी नियमित रस्ते झाडणे व पाणी मारण्याची व्यवस्था करावी आदी मागण्या करण्यात आल्या. जर या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले गेले नाही, तर काँग्रेस पक्षाच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिला. dust and pollution problems Chandrapur roads

    यावेळी आंदोलनात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह सर्वधर्माचे प्रमुख देखील सहभागी झाले होते. बौद्ध भंते यांनी सहभागी होऊन चंद्रपूरच्या विकासासाठी प्रार्थना केली. हे आंदोलनात चंद्रपूर शहर महिला जिल्हाध्यक्ष चंदाताई वैरागडे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष राजेश अडुर, काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ते युसुफ भाई, तसेच किसान सेल, अल्पसंख्यांक सेल पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

  • Amma Chowk controversy । चंद्रपुरात “अम्मा’ वरून नवा वाद, कांग्रेसचे मनपाला निवेदन

    Amma Chowk controversy

    Amma Chowk controversy : चंद्रपूर | शहर पोलीस स्टेशन आणि सात मजली इमारत यांच्या मधोमध असलेल्या जागेवर चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून अचानक एका पुतळ्याचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. ही जागा सध्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली असतानाही कोणतीही पूर्वसूचना अथवा परवानगी न घेता सुरू करण्यात आलेल्या या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

    चंद्रपुरात गुंतवणुकीच्या नावावर कोट्यवधींची फसवणूक

    या अनधिकृत कामाचा तीव्र निषेध करत चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी हे बांधकाम तातडीने थांबविण्याची मागणी केली. त्यांनी या संदर्भात महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल यांना निवेदन सादर करून सदर बांधकामास त्वरित स्थगिती देण्याची मागणी केली आहे. Congress complaint to municipal commissioner

    congress complaint to municipal commissioner

    ओळख पुसण्याचा डाव

    चंद्रपूर शहरातील सात मजलीसमोरील फुटपाथ वर स्व. गंगुबाई जोरगेवार (अम्मा) टोपल्या विकायला बसायच्या. त्या सदर जागेला परिसराला “अम्मा चौक” असे नांव देण्याबाबत मनपा प्रशासकाने मान्यता प्रदान केली. चंद्रपूर शहरातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक, समाजसेवक, माजी लोकप्रतिनिधी यांच्या कार्याची आठवण ठेवून मनपाने कधीच स्मारक बनण्याचा विचार केला नाही. मात्र एखादी महिला त्या ठिकाणी टोपल्या विकत होती म्हणून त्या परिसराला त्यांचे नाव देणे कितपत योग्य आहे. हा संपूर्ण परिसर गांधी चौक म्हणून ओळखला जातो मात्र ही ओळख पुसण्याचा डाव आखण्यात देत आहे, असा आरोप तिवारी यांनी केला. 


    तिवारी यांनी सांगितले की, हा परिसर पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली येतो. त्या जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करणे कायद्याच्या विरोधात आहे. अशा प्रकारची कारवाई केल्यास शहरातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला धोका पोहोचू शकतो. महानगरपालिकेने या प्रकरणी तातडीने खुलासा करावा आणि संबंधित काम थांबविण्याची कारवाई करावी, अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे.

  • Kishor Jorgewar cycle distribution । चंद्रपुरातील २०५५ मुलींना मिळाल्या सायकली, देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाचा समारोप

    Kishor Jorgewar cycle distribution

    Kishor Jorgewar cycle distribution : चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूरात सुरू असलेल्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाचा समारोप विद्यार्थिनींना सायकल वाटप आणि ५५ पारंपरिक गुरूंच्या सन्मान सोहळ्याने संपन्न झाला. शकुंतला लॉन येथे पार पडलेल्या या भव्य समारोप कार्यक्रमात इयत्ता ८ वी ते १० वी वर्गातील २,०५५ विद्यार्थिनींना सायकलीचे वितरण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील ५५ गुरूजनांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सदर उपक्रमासाठी चंद्रपूर महानगरपालिकेचे विशेष सहकार्य लाभले. cycle empowerment initiative for school girls

    चंद्रपुरात रेड रन मॅरेथॉन

    या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त संजय चिद्रावार, भाजप महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, अमेरिकेतील भारतीय वैद्यानिक अनुप वाघ, संदिप बांटिया, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, रामनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदार आसिफ रझा शेख, तुषार सोम, प्रकाश देवतळे, अजय जयस्वाल, नामदेव डाहुळे, मंडळ अध्यक्ष रवी जोगी, सुभाष आदमाने, रवी गुरनुले, वंदना हातगावकर, सविता दंढारे, आदी मान्यवर उपस्थित होते.

    या प्रसंगी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि ,एकूण १०,००० सायकली वाटप करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. मुलींच्या चेहऱ्यावरचे हसू हेच या उपक्रमाच्या यशाचे प्रतीक आहे. शिक्षण हा तुमच्या आयुष्याचा पाया आहे. आज तुमच्या हातात सायकल आहे, ती केवळ वाहन नाही, तर शिक्षणाच्या दिशेने वेग देणारे साधन आहे. मनापासून शिक्षण घ्या, आई-वडिलांचे आणि शिक्षकांचे ऐका. सोशल मीडियाच्या आहारी न जाता ज्ञानाच्या जवळ रहा. स्वप्न मोठी ठेवात प्रामाणिक मेहनत ठेवा असे ते म्हणाले. girls bicycle distribution event Chandrapur students

                पडोली, संजय नगर या टोकावरच्या भागातून मुली शहरात पायदळ शाळेत जाताना पाहून मी गरजू विद्यार्थिनींसाठी सायकल वाटपाचा संकल्प केला होता. आज तो पूर्ण करताना समाधान वाटते. मतदारसंघातील सुमारे ८८ शाळांमधून २,०५५ पात्र विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. पण यातच थांबायचं नाही – १० हजार सायकली वाटण्याचे आपले उद्दिष्ट आहे. परिस्थितीमुळे शिक्षण थांबू नये म्हणून अम्मा की पढ़ाई या उपक्रमातून आम्ही २८४ विद्यार्थ्यांना निशुल्क दर्जेदार शिक्षण देत आहोत असेही त्यांनी सांगितले. Kishor Jorgewar cycle distribution

    सेवा सप्ताहाच्या निमित्ताने गेल्या आठवडाभरात आपण विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम राबवले. मात्र, आजच्या कार्यक्रमातील विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे हास्य आणि नव्या आशेचा प्रकाश पाहून आमचाही सारा थकवा दूर झाला असून, अशा सामाजिक उपक्रमांना अधिक जोमाने गती देण्याची उर्जा मिळाली असे ते म्हणाले. कार्यक्रमात मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला विद्यार्थिनींसह पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Kishor Jorgewar cycle distribution

    ४०० पेक्षा अधिक उपक्रमांतून साजरा झाला सेवा सप्ताह; ३ हजार रक्तदात्यांचे योगदान

    सेवा सप्ताह अंतर्गत ४०० हून अधिक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मतदारसंघात घेण्यात आलेल्या ५५ रक्तदान शिबिरांमध्ये ३ हजारांहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी दाखवली. हे चंद्रपूरातील आजवरचे सर्वात मोठे रक्तदान अभियान ठरले.

    तसेच, ७५ मंदिरांमध्ये महाआरती, ७९ ठिकाणी योग शिबिर, ६८ ठिकाणी वृक्षारोपण, १७ ठिकाणी शालेय साहित्य वाटप, रोजगार मेळावे, कर्तव्य सेतूचे उद्घाटन, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता अभियान, सामूहिक सूर्यनमस्कार, महाआरोग्य शिबिरे, राज्यातील सर्वात मोठ्या प्राचीन शिवलिंगाचा रुद्राभिषेक, कावड यात्रा, डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन, अम्मा संस्कार केंद्र, कार्यकर्ता मेळावे, पक्षप्रवेश कार्यक्रम, तसेच विविध धार्मिक स्थळी सामाजिक उपक्रम अशा अनेक सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. Kishor Jorgewar cycle distribution

    ५५ पारंपरिक गुरूंचा सन्मान..

    समारोपाच्या दिवशी मंगळवारी, विविध पारंपरिक आणि व्यावसायिक क्षेत्रांतील ५५ गुरूजनांचा सत्कार आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कार प्राप्त गुरूंमध्ये वकिली क्षेत्रातील रविंद्रजी भागवत, गायनिक डॉ. उषा अरोरा, योगगुरु शशिकांत मस्के, कथ्थक गुरू चारुशिला फेकडे, गरबा शिक्षक गुरुरूप मसराम, भरतनाट्यम शिक्षक प्रशांत कत्तूरवार, शिल्पकार सुहास ताटकंटीवार, शिंपी वर्गातील उबाळकर, आदर्श शिक्षिका विजया मुलकावार, दाई अरुणा सामंतपल्लीवार, लाठी-काठी शिक्षिका खोब्रागडे, हॉकी प्रशिक्षक जनक खान पठाण, इलेक्ट्रिशियन नरेश वानखेडे, ग्रामगीताचार्य अण्णाजी ढवस, हरिपाठ गुरू सिंधु चौधरी, स्वामी समर्थ संस्कार केंद्राचे सुधाकर टिपले, टायपिंग शिक्षिका विजया कोटकर, वेल्डर राजू वाहाडे, योग शिक्षिका सुवर्णा लोखंडे, वेटलिफ्टिंग प्रशिक्षक नरेश भुते, न्हावी शंकर चावके यांच्यासह इतर गुरूंचा समावेश होता.

    Somayya institute of technology

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, कोणत्याही समाजाची खरी प्रगती ही रस्ते, इमारती, सुविधा यावर नव्हे, तर संस्कार, शिक्षण, मूल्य आणि मार्गदर्शनावर अवलंबून असते. हे कार्य पार पाडणारे गुरू केवळ शाळांपुरते मर्यादित नाहीत. कला, क्रीडा, आरोग्य, अध्यात्म, शेती, समाजसेवा यांसारख्या सर्वच क्षेत्रातील मार्गदर्शक हेही समाजाचे ‘गुरू’ आहेत. आजचा हा सन्मान म्हणजे त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा आणि आदराचा मुजरा असल्याचे ते यावेळी म्हणाले.  55 traditional gurus honor ceremony Chandrapur

  • amruta fadnavis chandrapur visit । 💥 ५५ नद्यांचं जल, १.५५ लाख बेलपत्र! अमृता फडणवीस यांनी केला चंद्रपूरच्या शिवलिंगाचा रुद्राभिषेक!

    amruta fadnavis chandrapur visit

    amruta fadnavis chandrapur visit : चंद्रपूर – देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाच्या निमित्ताने आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून पहिल्या श्रावण सोमवारी आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यातील सर्वात मोठ्या प्राचीन शिवलिंगाचा जलाभिषेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ५५ नद्यांचे पवित्र जल आणि १ लाख ५५ हजार बेलपत्र अर्पण करण्यात आले. या भव्य धार्मिक कार्यक्रमाला हजारो भाविकांची उपस्थिती लाभली. आमदार किशोर जोरगेवार आणि त्यांच्या पत्नी तथा माजी मंत्री शोभा फडणवीस यांची यावेळी उपस्थिती होती. ही एक जागृत देवस्थान असल्याची अनुभूती झाल्याचे अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

    आधारकार्ड मध्ये अनेक चुका, खासदार धानोरकर यांचा अधिवेशनात प्रश्न

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह साजरा करण्यात येत असून, त्याअंतर्गत ३५५ हून अधिक विविध सेवाभावी उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून भिवापूर वॉर्डातील प्राचीन आणि राज्यातील सर्वात मोठ्या शिवलिंगाच्या रुद्राभिषेकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी राज्यातील तसेच राज्याबाहेरील नामवंत पंडितांना आमंत्रित करण्यात आले होते. 55 rivers water abhishek ritual

    amruta fadnavis chandrapur visit 2025

    दरम्यान, या कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस आज चंद्रपुरात दाखल झाल्या. सायंकाळी चार वाजता त्या कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. कावड घेऊन त्या शिवलिंगाजवळ आल्या आणि राज्यभरातून आणलेल्या ५५ नद्यांच्या पवित्र जलाने व १ लाख ५५ हजार बेलपत्रांनी शिवलिंगाचे जलाभिषेक केले. त्यानंतर त्यांनी शिवलिंगाची आरती केली.

    यावेळी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, “चंद्रपूर ही विविध रूपातील सौंदर्याने नटलेली नगरी आहे. हे सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे. त्याचा विकास व्हायला हवा. मी वर्षातून किमान दोनदा तरी चंद्रपूरला भेट देईन, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी महामृत्युंजय मंत्राचे पठण केले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचे कौतुक केले.

    अमृता फडणवीस यांच्या हस्ते सायकल वाटप व चित्रप्रदर्शनाचे निरीक्षण

    देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहानिमित्त २०५५ विद्यार्थिनींना सायकली वाटप करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ आज अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या ‘राजमाता निवासस्थान’ येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी ५५ विद्यार्थिनींना सायकली वाटप करून या उपक्रमाचा प्रारंभ केला.

    Somayya institute of technology

    तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचीही त्यांनी पाहणी केली.

  • Amruta Fadnavis in chandrapur । देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह, मिसेस मुख्यमंत्री चंद्रपुरात

    Amruta Fadnavis in chandrapur

    Amruta Fadnavis in chandrapur : चंद्रपूर – आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह अंतर्गत आयोजित विविध सामाजिक उपक्रमांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस उद्या (सोमवार) चंद्रपूर दौर्‍यावर येत असून, त्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

    गुन्हेगारीचा हॉटस्पॉट चंद्रपूर जिल्हा

    सायकल वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ

    दुपारी ३ वाजता सौ. फडणवीस यांचे चंद्रपूर येथे आगमन होईल. त्यानंतर त्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या कोतवाली वार्ड येथील ‘राजमाता निवास’ या निवासस्थानी भेट देतील. दुपारी ३.३० वाजता २०५५ विद्यार्थ्यांपैकी ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करून सायकल वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ‘राजमाता निवास’ येथेच होणार आहे.

    Somayya institute of technology

    दुपारी ४ वाजता सौ. फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनपटावर आधारित चित्रप्रदर्शनीची पाहणी करतील. यानंतर ४.२५ वाजता भिवापूर येथील शिवलिंग परिसरात आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिवलिंगाचे त्यांच्या हस्ते पूजन करण्यात येणार आहे. येथे एक लाख ५५ बेलपत्रे आणि ५५ नद्यांच्या पवित्र जलाने शिवलिंगाचा जलाभिषेक करण्यात येणार आहे.

  • maha arogya shibir Chandrapur । महाआरोग्य शिबिरात ५ हजार रुग्णांची तपासणी, देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह

    maha arogya shibir Chandrapur

    maha arogya shibir Chandrapur : चंद्रपूर – आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाच्या निमित्ताने शंकुतला लॉन येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा ५ हजार २६ नागरिकांनी लाभ घेतला. विविध तपासण्यांमध्ये काही रुग्णांमध्ये गंभीर आजारांचे निदान झाले असून त्यांच्यावर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या तपासणीत बालकांचाही समावेश आहे.

    अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

    या कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजप प्रवक्त्या व चिखलीच्या आमदार श्वेता महाले, भाजप महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, कल्याणी किशोर जोरगेवार, अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंह, माजी उपमहापौर अनिल फुलझले, प्रकाश देवतळे, तुषार सोम, नामदेव डाहुले, संजय कंचर्लावार, दशरथसिंह ठाकूर, भारती दुधाणी, मंडळ अध्यक्ष रवि जागी, प्रदीप किरमे, स्वप्नील डुकरे, 

    अ‍ॅड. सारिका संदुरकर, सुभाष आदमाने, विनोद खेवले, माजी नगरसेविका छबू वैरागडे, घुग्घुस शहर अध्यक्ष संजय तिवारी, मनोज पाल, माजी नगरसेवक देवानंद वाढई, प्रशांत चौधरी, वंदना तिखे, पुष्पा उराडे, वनिता डुकरे, शीतल आत्राम, वंदना हातगावकर, सविता दंढारे तसेच ज्युपिटर हॉस्पिटल मुंबईचे डॉ. रचना केशवानी, डॉ. सुषांत श्रीवास्तव, एनसीआय हॉस्पिटल कामटीचे डॉ. पवन अरगडे, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. वसंत वाघ, कस्तुरबा गांधी हॉस्पिटलचे डॉ. अजहर शेख, आयएमएचे अध्यक्ष डॉ. दिक्षीत आदी मान्यवर उपस्थित होते.

    चंद्रपूरात सुरू असलेल्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह अंतर्गत विविध सामाजिक, धार्मिक व आरोग्यवर्धक उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आयोजित महाआरोग्य शिबिरात मुंबईच्या ज्युपिटर हॉस्पिटल, नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.

    Somayya institute of technology

    या शिबिरात कर्करोग, बालरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, हृदयविकार, सामान्य आरोग्य, कान-नाक-घसा, श्वसन रोग, न्यूरोलॉजी, स्त्रीरोग, त्वचारोग आणि दंतरोग अशा विविध तपासण्या करण्यात आल्या. तपासणीदरम्यान गंभीर आजाराचे निदान झालेल्या रुग्णांवर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. free health camp

    आरोग्य शिबिरे गरजेची – हंसराज अहिर

    वाढते आजार पाहता त्यांचे वेळीच निदान होणे अत्यंत आवश्यक आहे. अशा शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या शरीरातील आजारांची माहिती मिळते. त्यामुळे अशा आरोग्य शिबिरांची आवश्यकता आहे, असे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी सांगितले. त्यांनी देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहातील विविध सेवाभावी उपक्रमांचेही कौतुक केले.

    मुख्यमंत्री यांचा संकल्प आमदार जोरगेवार यांनी साकारला – आ. श्वेता महाले

    वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनहिताचे उपक्रम राबवण्याचे आवाहन केले होते. अनेक आमदारांनी एक दिवसाचे उपक्रम राबवले, पण आमदार किशोर जोरगेवार यांनी १० दिवसांचा साप्ताह राबवीत तब्बल ३५५ हून अधिक उपक्रम राबवून हा संकल्प खऱ्या अर्थाने साकारला आहे, असे आमदार श्रेता महाले म्हणाल्या. त्यांनी आमदार जोरगेवार यांच्या कार्याची प्रशंसा करताना त्यांचे अपक्ष असताना केलेले काम आणि आज भाजपचे आमदार असतानाही मतदारसंघासाठीची तळमळ अधिवेशनात पाहायला मिळते, असे नमूद केले.

    पर्यटन, आरोग्य आणि शिक्षण केंद्रस्थानी – आ. किशोर जोरगेवार

    मतदारसंघात काम करताना पर्यटन, आरोग्य आणि शिक्षण या तीनही क्षेत्रांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करत आहोत. यापूर्वीही आम्ही आरोग्य शिबिरांद्वारे ४७ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. आता या महाआरोग्य शिबिरातही गंभीर रुग्णांवर उपचाराचा सर्व खर्च आम्ही उचलणार आहोत, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.

    या शिबिरात डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या मदतीमुळेच हे शिबिर यशस्वी झाले आहे. अनेक रुग्णांमध्ये गंभीर आजारांचे निदान झाले असून त्यांच्या उपचाराचा खर्च मोठा आहे. मात्र, रुग्णांनी चिंता करू नये. या सर्व शस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य करण्यात येणार असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.