Politics on Amma Ki Padhai
Politics on Amma Ki Padhai : चंद्रपूर – आज अनेक युवा डोळ्यात अधिकारी बनण्याचं स्वप्न बाळगून असतात , मात्र आर्थिक परिस्थिती, योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे अनेक युवा वर्गाचे स्वप्न भंग होतात, मात्र हि अडचण युवा वर्गापुढे येऊ नये यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या आईच्या नावाने अम्मा कि पढाई हा उपक्रम सुरु केला मात्र गोरगरीब युवकांच्या अधिकारी बनण्याच्या मार्गावर काही राजकीय पक्षांनी अडथळा आणला. आणि आज हा उपक्रम काही काळासाठी स्थगित करण्यात आला. Politics on Amma Ki Padhai
वनात वनरक्षकाने केला अत्याचार, चंद्रपूर हादरलं
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी युवा वर्गाला शिका व संघटित व्हा, असा मोलाचा संदेश दिला होता, त्यांच्या या संदेशावर आमदार जोरगेवार यांनी एक पाऊल पुढे टाकत अम्मा कि पढाई उपक्रमाचा शुभारंभ केला, या माध्यमातून पूर्व तयारी परीक्षा घेण्यात आली ज्यामध्ये तब्बल ३ हजार युवक वर्गाने परीक्षा दिली व त्यामधून एकूण २८४ विद्यार्थ्यांची निवड झाली. जून महिन्यात शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अम्मा कि पढाई केंद्र सुरु करण्यात आले. सर्व सुरळीत सुरु होते मात्र जोरगेवार हे दीक्षाभूमी परिसरात अतिक्रमण करीत आहे असा आरोप करीत काही राजकीय पक्षांनी अम्मा कि पढाई केंद्र बंद करा अशी मागणी केली. Amma Ki Padhai free coaching
यावर आमदार किशोर जोरगेवार यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून नवा वाद निर्माण न व्हावा यासाठी सदर केंद्र आंबेडकर महाविद्यालयातून बंद करण्यात आला. याबाबत त्यांनी संदेश प्रसारित केला आहे.
काय आहे आमदार जोरगेवार यांचा भावनिक संदेश?
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूरच्या पवित्र भूमीत आपल्या करुणामयी स्पर्शाने धम्मदीक्षेचा दीप प्रज्वलित केला. ही दीक्षा केवळ धर्मग्रहण नव्हे, तर आत्मोद्धार, समता, आणि शिक्षणाच्या क्रांतीची ग्वाही होती. त्याच प्रेरणेतून शिक्षणाची नवी ज्योत प्रज्वलित करण्यासाठी. ‘अम्मा की पढाई’ हा उपक्रम आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सुरू केला. MPSC exam coaching for poor youth
या उपक्रमात 284 गरीव व गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन दिले जात होते. महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024 चा निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) नुकताच दिनांक ६ ऑगस्ट रोजी जाहीर केला. यामध्ये अम्मा की पढाई शिक्षा केंद्रातील 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याचे समाधान आहे. ही केवळ शैक्षणिक यशाची गोष्ट नव्हे, तर त्या मुलांच्या स्वप्नांना हात देणाऱ्या धम्मकार्याची साक्ष आहे. मात्र, या कार्याला काही राजकीय पक्षांचा विरोध उभा राहिला. त्यांच्या भावना आम्ही समजून घेतो, त्यांचाही आम्ही मन:पूर्वक आदर करतो.
परंतु हे केंद्र नेमकं काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, हे समजवण्यात कदाचित आम्ही कमी पडलो असू शकतो. किंवा, हा एक विधायक सामाजिक उपक्रम राजकारणाच्या आणि त्यातून निर्माण झालेल्या गैरसमजाच्या भोवऱ्यात सापडून बळी गेला असेल — हे सुद्धा चिंतन करण्यासारखे आहे. उद्घाटनाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत जे तेज होतं, त्याच डोळ्यांत आज अश्रू आहेत – ही बाब अस्वस्थ करणारी आहे. Chandrapur youth free exam preparation centre
स्वतःच्या जिद्दीवर आणि शिक्षणावर विश्वास ठेवणाऱ्या या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेतलं… आज त्यांच्या अपेक्षांना तात्पुरता विराम मिळतो आहे, ही गोष्ट मनाला चटका लावून जाते. हा उपक्रम काही काळासाठी स्थगित करत आहोत. नवीन जागेची शोधाशोध व पुनर्रचना करण्यासाठी आम्हाला थोडा कालावधी लागणार आहे.
या निर्णयामुळे काही विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना तात्पुरता थांबा लागेल, याचे दुःख आहे. आम्ही त्यांची आशा पूर्ण करू शकलो नाही, याचे मनस्वी वाईटही वाटते. पण हे कार्य इथे थांबणार नाही. कारण शिक्षण ही बाबासाहेबांची खरी दीक्षा आहे, आणि ही आमची धम्मसेवा आहे. या प्रवासात आमच्यासोबत उभं राहिलेल्या प्रत्येकाचा आम्ही ऋणी आहोत
ज्योत विझलेली नाही — ती पुन्हा पेटणार आहे. अधिक तेजस्वीपणे.
– तुमचा किशोर जोरगेवार

राजकारणाचा बळी अम्मा कि पढाई
ज्या राजकीय पक्षांनी अम्मा कि पढाई या केंद्राला विरोध केला त्यांनी कदाचित आयुष्यात एकही गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली नसेल, शिक्षणाचं महत्व काय हे बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित वर्गाला पटवून दिले होते मात्र आज राजकीय पक्ष बाबासाहेबांच्या धोरणावर टीका करताना दिसत आहे. राजकीय पक्षांनी या विरोधाच्या माध्यमातून गोरगरीब मुलांचे भविष्य उध्वस्त केले आहे.
Leave a Reply