Tag: आमदार किशोर जोरगेवार

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाकाली महोत्सवाचे टिझर लाँच

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्याचे मूख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चंद्रपूरात आयोजित श्री माता महकाली महोत्सवाच्या पहिल्या टिझरची लाँचींग करण्यात आली आहे. काल मुबंई येथे मुख्यमंत्री यांनी सदर टीझरची लाँचींग केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती.

     

    माता महाकाली महोत्सवाची जय्यत तयारी चंद्रपूरात सुरु आहे. 19 ऑक्टोबर पासून महोत्सवाला सुरवात होणार आहे. यासाठी विविध नामांकित कलाकार चंद्रपूरात येणार असून या दरम्यान सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कायक्रमांचे आयोजन नियोजित करण्यात आले आहे. मागच्या वर्षी पार पडलेल्या श्री महाकाली महोत्सवला नागरिकांचा मिळालेला सहभाग लक्षात घेता यंदाचेही महोत्सव भव्य होणार असल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे.

     

    दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री माता महाकाली महोत्सवच्या पहिल्या टिझरची लाँचिंग करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महोत्सवाबाबत आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून माहिती जाणून घेतली आहे.

     

    सदर टिझरमध्ये यंदाच्या महाकाली महोत्सवातील आर्कषण दर्शविण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापुर्वी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेत त्यांना श्री माता महाकाली महोत्सवाची निमंत्रण पत्रिका दिली आहे. यावेळी त्यांनी माता महाकालीच्या दर्शनासाठी महोत्सवा दरम्यान चंद्रपूरात येणार असल्याचे म्हटले आहे.

  • संस्कृतीचा समृध्द मार्ग जोपासण्यासाठी भजन मंडळांना सक्षम करण्याची गरज – आमदार किशोर जोरगेवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार त्यांनी केलेली सेवा समाज कधीही विसरणार नाही. डॉक्टरी पेशात असणाऱ्या डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी ख-या अर्थाने रुग्णसेवा केली. आज त्यांच्या जयंती निमित्त आपण आयोजित केलेले भजन संमेलन त्यांना आपण वाहिलेली सर्वोत्तम आदरांजली आहेच सोबतच संस्कृतीचा समृद्ध मार्ग जोपासण्यासाठी भजन मंडळांना सक्षम करण्याचा संकल्प त्यांच्या जयंती दिनी आज आपण करुया असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

     

    अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम श्री गुरुदेव सेवा शहर शाखा चंद्रपूर च्या वतीने लोकसेवक डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या जयंती निमित्त भव्य भजन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सर्वाधीकारी गुरुकुंज आश्रम मोझरी चे लक्ष्मणराव गमे दादा, भागवताचार्य मनिषजी महाराज, गुरुकुंज आश्रम मोझरी चे उपसर्वाधीकारी दामोधर पाटील दादा, गुरुकुंज आश्रम मोझरी चे प्रचार प्रमुख प्रकाश महाराज वाघ, प्रांताधिकारी विठ्ठलराव सावरकर, जिल्हा सेवाधिकारी अॅड. दत्ता हजारे, अशोक चरडे, जिल्हा प्रचार प्रमूख रुपलाल कावळे, जिल्हा प्रचार प्रमुख दादाजी नंदनवार, राम राउत, अंकुश आगलावे, डॉ. गोपाल मुंधडा, प्रेमलाल पारधी, अॅड. किरण पाल, वासुदेव सादमवार बबनराव धर्मपूरीवार आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

     

    यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, अध्यात्माकडुन दुरावत चाललेल्या समाजाला भजन किर्तनातून आध्यात्माचे महत्व आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृतीचे काम गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने केल्या जात आहे. चांगल्या समाजाच्या निमिर्तीसाठी गुरुदेव सेवा मंडळाचे सेवक काम करत आहे. आपल्या वतीने समाजाच्या शेवटच्या भागापर्यंत भजन किर्तनाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश पोहचविण्याचे काम केल्या जात असल्याचे यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले.

     

    आपण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भजन महोत्सवाला सुरवात केली आहे. या महोत्सवात विविध भाषीय भजन मंडळे मोठ्या उत्साहात सहभागी होत आहेत. विशेषत: लहान मुलांचे भजन मंडळेसुध्दा यात सहभागी होत आहे ही विशेष बाब असल्याचेही ते यावेळी म्हणाले. अनेक भजन मंडळांकडे भजनासाठी लागणारे साहित्य नाही. त्यामुळे काही मंडळांना आपण ते उपलब्ध करुन दिले आहे.

     

    भजनातून मानवातील नकारात्मकता नष्ट होऊन त्याच्यात सकारात्मकता निर्माण होते. इच्छाशक्ती प्रबळ होते. मनातील वाईट वृत्तीचा नाश होतो. त्यामूळे भजन – किर्तनाची आजही समाजाला गरज असल्याचे यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला अनेक भजन मंडळांची व नागरिकांची उपस्थिती होती.

  • शासकीय महाविद्यालयातील रुग्णालयात डाॅक्टरांना मिळणार पोलिस सुरक्षा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – रुग्णालयात रुग्णाच्या नातलगांनी डॉक्टराला मारहाण केल्याच्या निषेधार्थ शिकाऊ डॉक्टरांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आंदोलन सुरु केले होते. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनकर्त्या डॉक्टरांची भेट घेत त्यांना रुग्णालयात अधिक पोलिस सुरक्षा देण्यात येणार असल्याचे सांगीतले आहे.

     

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्ती नंतर डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. तर वेतन अदा न झाल्याने डॉक्टरांच्या दुस-या संघटनेने सुरु केलेले आंदोलन सुरुच आहे. याबाबतही वरिष्ट पातळीवर चर्चा करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

     

    काल बुधवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन आंदोलनकरत असलेल्या डॉक्टरांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. नंतर लगेच त्यांनी रुग्णालय आणि पोलिस प्रशासन यांच्या अधिका-यांची बैठक घेत डॉक्टरांना सुरक्षा देण्याच्या सूचना केल्यात. या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद फुलपाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. निवृत्ती जिवने, उप वैद्यकीय अधिक्षक भुषण नैताम, प्रा. डॉ मिलींद कांबळे, प्रा. डॉ प्रशांत उईक, शहर पोलिस ठाण्याचे पालिस निरिक्षक राजपूत आदींची उपस्थिती होती.

     

    जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टराला रुग्णांच्या नातलगांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

     

    पोलिसांनीही या प्रकरणी कार्यवाही केली आहे. मात्र या घटणेच्या विरोधात जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णालय परिसरात आंदोलन सुरु केले होते. याचा परिणाम आरोग्य सेवेवर दिसुन आला होता. याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाउन डॉक्टरांशी चर्चा केली. येथे पुर्ण वेळ सहाय्य पोलिस दर्जाचा अधिकारी तैणात ठेवण्यात यावा, ओपीडी मध्ये दोन पोलिसांची तैनाती ठेवण्यात यावी डॉक्टरांना सुरक्षा देण्यात यावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस प्रशासनाला केल्या आहे.

     

    तसेच यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांच्याशी दूरध्वनी वरुन चर्चा करत त्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यांनतर डाॅक्टरांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे आरोग्य सेवा पुन्हा सुरळीत झाली आहे.

  • आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी बाप्पाचे आगमन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दरवर्षी प्रमाणे यंदाही आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणराया विराजमान झाले. सकाळी ११ वाजताच्या दरम्यान त्यांनी गणेश मुर्तीची विधीवतरित्या स्थापना केले. यंदा हे त्यांचे ९३ वे वर्ष असुन जोरगेवार कुटुंबियांची दुसरी पिढी हि परंपरा चालवत आहे.

     

    गणेशोत्सवाची महती जोरगेवार कुटुंबीयांनी मनाच्या गाभार्यात समृद्ध धार्मिकतेने आणि भावपूर्ण श्रद्धेने जोपासली आहे. आज गणेश चर्तुथी निमित्त त्यांच्या घरी गणराया विराजमान झाले. त्यांच्या या उत्सवाला ९३ वर्षांची पंरपरा असुन स्वातंत्रपुर्व काळापासुन ते हा उत्सव सहकुटुंब साजरा करत आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील जनप्रतिनिधी बाबतीत आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी बाप्पाचं आगमन सर्वात वर्ष 1930 पासून होत आहे.