Blog

  • Protest in Chandrapur against Manoj Jarange । मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द!, जरांगे पाटलांच्या प्रतिमेवर जोड्यांचा प्रसाद

    Protest in Chandrapur against Manoj Jarange

    Protest in Chandrapur against Manoj Jarange : चंद्रपूर (२६ ऑगस्ट २०२५) – मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत आहे, मात्र त्यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत अपशब्द वापरल्याने भाजप संतापली असून चंद्रपुरात भाजप नेते अशोक जीवतोडे यांनी जरांगे पाटलांचा निषेध करीत त्यांच्या प्रतिमेवर जोडे हाणले.

    चंद्रपुरात हवी गोंड वीरांची स्मारके

    भाजप ओबीसी नेते अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात शहरातील वरोरा नाका चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले, भाजप नेते जीवतोड म्हणाले कि आधीपासून जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे असा हट्ट करीत आहे, मात्र ते शक्य नाही. आम्ही ओबीसी त्यांची घुसखोरी कशी यशस्वी होऊ देणार नाही.

    घुसखोरी हाणून पाडू

    आंतरवाली सराटी मधून सुरु झालेलं जरांगे पाटलाचे आंदोलन आता मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे, अश्यावेळी पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बाबतीत अपशब्द वापरले हे भाजप सहन करणार नाही. जरांगे पाटलांचे आंदोलन व ओबीसी प्रवर्गात करू पाहत असलेली घुसखोरी आम्ही हाणून पाडू अशी प्रतिक्रिया अशोक जिवतोडे यांनी दिली.

    निषेध आंदोलनात ओबीसी समाजाचे नेते, भाजप पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.

  • Bhandak local journalists press club । सामाजिक बांधिलकीसह पुढे सरसावणार! भांदक प्रेस क्लबची नवी टीम सज्ज

    Bhandak local journalists press club

    Bhandak local journalists press club : भद्रावती (२६ ऑगस्ट २०२५) : शहरातील भांदक प्रेस क्लबची महत्वपुर्ण बैठक सोमवारी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आली होती. पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली. उपस्थित सदस्यांनी एकमताने कार्यकारिणीची घोषणा केली.

    अस्वलाचा हल्ला, अस्वलसह एकाचा मृत्यू

    या नव्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष म्हणून सुधीर पारधी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी ईश्वर शर्मा यांच्यावर सोपविण्यात आली. उपाध्यक्षपदी सुनिल पतरंगे, सचिवपदी वतन लोणे, सहसचिवपदी सुनिल बिपटे यांची निवड करण्यात आली. तर कोषाध्यक्षपदी अब्बास अजानी यांची निवड करण्यात आली. याशिवाय सल्लागार म्हणून डॉ. यशवंत घुमे व अशोक पोतदार यांची नेमणूक करण्यात आली. सदस्य म्हणून लिमेश माणुसमारे व शंकर डे यांचा समावेश करण्यात आला. press club executive committee 2025

    पत्रकारांच्या हिताचे मुद्दे प्रभावीपणे मांडणार

    प्रेस क्लबच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न, अडचणी तसेच पत्रकारांच्या हिताचे मुद्दे प्रभावीपणे मांडले जातील असा विश्वास नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पत्रकारांच्या हक्कांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत सकारात्मक उपक्रम राबविण्याचा निर्धार या वेळी नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला.पत्रकार संघटनांचे महत्त्व वाढत असताना भांदक प्रेस क्लबची ही नवीन कार्यकारिणी स्थानिक पत्रकारांना बळकटी देईल, असे मत उपस्थित सदस्यांनी व्यक्त केले.

    सर्वानुमते निवड झाल्यामुळे संघटनेतील एकजूट अधिक मजबूत झाली असल्याचे बैठकीतून स्पष्ट झाले.भांदक प्रेस क्लबच्या बैठकीत झालेली ही कार्यकारिणी निवड स्थानिक पत्रकारितेसाठी एक सकारात्मक पाऊल ठरणार असून, पुढील काळात पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असा निर्धार नवनियुक्त अध्यक्ष सुधीर पारधी यांनी व्यक्त केला.

  • Mahesh Salame drowning death Nagbhid । 🚨 नागभीड हादरलं! तलावात आढळला तरुणाचा मृतदेह – गाव शोकाकुल

    Mahesh Salame drowning death Nagbhid

    Mahesh Salame drowning death Nagbhid : नागभीड-चंद्रपूर (२५ ऑगस्ट २०२५): आज सकाळी नागभीड-चंद्रपूर मार्गावरील चिंधी माल येथील एका २२ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. महेश अभिमन सलामे असे या तरुणाचे नाव आहे.

    चंद्रपुरात हवी गोंड वीरांची स्मारके

    महेश सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतात जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला होता. बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याची वाट पाहिली. दरम्यान, गावाजवळच्या तलावात एका शेतकऱ्याला एक मृतदेह तरंगताना दिसला. जवळ जाऊन पाहिले असता, तो मृतदेह महेशचा असल्याचे निष्पन्न झाले.

    मिर्गीचा आजार

    कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. प्राथमिक अंदाजानुसार, महेशचा पाय घसरून तोल गेल्याने पाण्यात पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची शक्यता आहे. महेशला मिर्गीचा (epilepsy) आजार होता, असेही समजते. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

  • monuments for Gond heroes in Chandrapur । ‘चंद्रपूरचा अभिमान’ – गोंड वीर स्मारकांच्या उभारणीसाठी नागरिकांचा आग्रह

    monuments for Gond heroes in Chandrapur

    monuments for Gond heroes in Chandrapur : चंद्रपूर (२५ ऑगस्ट २०२५) – जिल्ह्यातील आदिवासींच्या मागण्यांवर जिल्हा प्रशासन गंभीर नाही. त्यामुळे आदिवासी प्रशासनावर प्रचंड संतापले आहेत. जर प्रशासनाने या समस्या लवकरात लवकर सोडवल्या नाहीत तर आदिवासी संघटनांना रस्त्यावर उतरून जनआंदोलन सुरू करावे लागेल असे संकेत गोंडवाना गणतंत्र पक्षाचे नामदेव शेडमाके यांनी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा प्रशासनाला दिले.

    अस्वलाच्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी

    त्यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्याला गोंडराजाचा इतिहास आहे. ज्या महापुरुषांनी आपले बलिदान दिले त्यांच्या आदर्शांना आणि बलिदानांना लक्षात ठेवून गिरनार चौकात क्रांतिकारी शहीद बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांचे स्मारक आणि पुतळा उभारावा आणि चौकाला बाबुराव शेडमाके चौक असे नाव द्यावे, जटपुरा गेटजवळ राजमाता राणी हिराई यांचे स्मारक आणि पुतळा उभारावा आणि राणी हिराई चौक असे नाव द्यावे,

    गोंडराज यादवशाह महाराज आत्राम यांचे स्मारक

    चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटचे गोंडराज यादवशाह महाराज आत्राम यांचे स्मारक आणि पुतळा चंद्रपूरच्या बसस्थानक परिसरात बसवावे आणि चौकाला त्यांचे नाव द्यावे, अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपूर आणि लगतच्या परिसरातील शेतकयांच्या शेतजमिनी संपादित करून शेतकयांना योग्य मोबदला द्यावा, सिमेंट कंपनीचे व्यवस्थापक जबरदस्तीने खोदकाम करत आहेत आणि ते त्वरित थांबवण्याची मागणी नामदेव शेडमाके यांनी पत्रकार परिषदेत केली.

    पत्रकार परिषदेत बापूजी मडावी, नामदेव शेडमाके, जितू मडावी, राजेंद्र धुर्वे, राजेंद्र मेरस्कोल्हे उपस्थित होते.


  • District stadium swimming pool coach controversy । चंद्रपूर जिल्हा स्टेडियम स्विमिंग पूल वाद! प्रशिक्षकाच्या गैरवर्तनामुळे विद्यार्थ्याचे नुकसान?

    District stadium swimming pool coach controversy

    District stadium swimming pool coach controversy : चंद्रपूर (२५ ऑगस्ट २०२५) – शहर जिल्हा स्टेडियममधील जलतरण तलावात प्रशिक्षक म्हणून काम करणाया श्रीकांत बल्की यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशी केलेल्या गैरवर्तनामुळे स्पर्धे दरम्यान शालेय विद्यार्थ्याचे नुकसान झाले आहे. येथे आलेल्या दुसया स्विमींग प्रशिक्षकाशी झालेल्या वादात शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमकी दिल्यामुळे प्रशिक्षक श्रीकांत बल्की वर कार्रवाई करण्याची मागणी आयोजित पत्रकार परिषदेत राकेश कुमार रॉय आणि पालक अनिल झाडे यांनी केली आहे.

    NHM कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खासदार धानोरकर यांचा पाठिंबा

    सध्या श्रीकांत बल्की आणि राकेश कुमार रॉय दोघेही जिल्हा स्टेडियमच्या स्मिमींग पुल येथे प्रशिक्षणार्थींना पोहण्याचे प्रशिक्षण देतात. जिल्हा स्टेडीअम वर जिल्हास्तर वर आणि महानगरपालिके कडून आंतरशालेय जलतरण स्पर्धा सुरू आहे. येथे, खेळाडू विद्यार्थ्यांची शासन मार्फत नोंदणी करण्यात आली आहे. रविवार २४ ऑगस्ट रोजी शहरातील एका शाळेतील 13 वर्षीय विद्यार्थ्याची जलतरण स्पर्धा होती. District stadium swimming coach threat controversy

    शिवीगाळ व मारण्याची धमकी

    शाळेने या स्पर्धेसाठी विद्यार्थ्याची ऑनलाइन नोंदणी केली होती. परंतु रविवारी हा विद्यार्थी स्पर्धेसाठी स्विमिंग पूलमध्ये पोहोचला आणि स्पर्धेची तयारी करत होता. तेव्हा प्रशिक्षक बल्की यांनी स्पर्धा पोर्टलवर त्याचे नाव नोंदणीकृत नसल्याने तो स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाही असे सांगून विद्यार्थ्याला निराश केले. यादरम्यान, शाळेचे शिक्षक, प्रशिक्षक राकेश रॉय प्रशिक्षक श्रीकांत बल्की यांच्याकडे पोहोचले आणि कारण विचारले असता, बल्की यांनी दोघांनाही शिवीगाळ केली आणि मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप राकेशकुमार रॉय यांनी पत्रकार परीषदेत केला.

    यादरम्यान, प्रशिक्षक बल्की यांच्या चुकीच्या वर्तनामुळे पालक अनिल झाडे यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
    पत्रकार परीषदेत राकेश कुमार रॉय, अनिल झाडे, मंजुषा झाडे, सुनीता टोंगे, पल्लवी वानखेडे हे उपस्थित होते.

  • NHM contract staff indefinite strike Maharashtra । ✊ खासदार प्रतिभा धानोरकर यांचा NHM कर्मचाऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा

    NHM contract staff indefinite strike Maharashtra

    NHM contract staff indefinite strike Maharashtra : चंद्रपूर : (२५ ऑगस्ट २०२५) राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती तसेच एकता संघटनेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी ‘बेमुदत कामबंद’ आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या दि. १४/०३/२०२४ रोजीच्या निर्णयानुसार नियमित शासन सेवेत समायोजन व बदली धोरण, वेतनवाढ, ईपीएफ, आरोग्य व अपघात विमा आदी लागू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट देऊन पत्राद्वारे आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला.

    जंगलात पिता-पुत्रावर अस्वलाचा हल्ला, अस्वल सह एकाचा मृत्यू

    मी सभागृहात ठाम आवाज उठवला

    प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “सार्वजनिक आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी अनेक वर्षांपासून अखंड सेवा बजावत आहेत. शासनाने या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, यासाठी मी आमदार असताना सातत्याने प्रयत्न केले आहेत. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या विधानसभेत मांडल्या होत्या. विशेषतः १० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणासाठी मी सभागृहात ठाम आवाज उठवला होता. या पाठपुराव्यामुळेच सरकारने नियमितीकरणाचा आदेश जारी केला.” Maharashtra NHM staff indefinite strike

    त्या पुढे म्हणाल्या, “परंतु अत्यंत खेदाने सांगावे लागते की, आदेश असूनही परिचारिकांसह अनेक कर्मचाऱ्यांचे आजतागायत नियमितीकरण झालेले नाही. हे फक्त निराशाजनकच नाही, तर त्यांच्या निष्ठावंत परिश्रमांचा व योगदानाचा अवमान आहे.”

    या लढ्यात कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन देत प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, “कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण हा त्यांचा हक्क आहे. या हक्कासाठी लढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. तुमच्या या लढ्यात मी खंबीरपणे तुमच्या सोबत उभी आहे. तुमच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी मी पुन्हा एकदा संसदेत आणि केंद्र सरकारकडे ठोस पाठपुरावा करेन.” यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आंदोलन कर्त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले. 

    आंदोलक कर्मचाऱ्यांनी शासनाने या विषयाकडे तातडीने लक्ष देऊन त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. 

  • Human-bear conflict in Chandrapur । अस्वलाच्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू, २५ लाख भरपाई व मुलाला वनविभागात नोकरी द्या

    Human-bear conflict in Chandrapur

    Human-bear conflict in Chandrapur : चंद्रपूर (२५ ऑगस्ट २०२५) – चंद्रपुरातील जुनोना गावात २३ ऑगस्ट रोजी जंगलात पाने तोडण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्रावर अस्वलीने हल्ला केला होता, या हल्ल्यात वडील अरुण कुकसे व मुलगा विजय कुकसे गंभीर जखमी झाले होते. अरुण कुकसे यांना नागपुरातील एम्स मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र २५ ऑगस्ट रोजी अरुण कुकसे यांचा मृत्यू झाला.

    अस्वलाच्या पंज्यात अडकले पिता-पुत्र, बघा हल्ल्याचा व्हिडीओ

    २३ ऑगस्ट रोजी अरुण व विजय कुकसे पिता-पुत्र जुनोना जंगलात पाने तोडण्यासाठी गेले असता अरुण कुकसे वर अस्वलीने हल्ला केला, वडिलाला वाचविण्यासाठी विजय ने अस्वलीचा सामना केला मात्र अस्वलीने दोघांना पंज्यात पकडत जखमी केले, यावेळी दोघांनी आरडाओरडा केला असता गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेत, अस्वलीला हाकलण्यास सुरुवात केली मात्र अस्वलीने दोघांना सोडले नाही. wildlife incident Junona forest

    उपचारादरम्यान मृत्यू

    गावकर्यांनी हातात दंडुके घेत अस्वलीला हाकलण्याचा प्रयत्न केला, तासभरानंतर अस्वलीने दोघांना सोडले, यावेळी अरुण कुकसे हे गंभीर जखमी झाले होते, गावकर्यांनी दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले, वडील अरुण हे गंभीर जखमी असल्या कारणाने त्यांना तात्काळ नागपुरातील एम्स मध्ये दाखल करण्यात आले. आज २५ ऑगस्ट रोजी सकाळी अरुण कुकसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या मुलगा विजय रुग्णालयात उपचार घेत आहे.

    अस्वलाच्या हल्ल्यांनंतर वनविभागाने कसोशीने प्रयत्न करीत अस्वलाला जेरबंद केले होते, मात्र अस्वल गंभीर जखमी असल्याने २४ ऑगस्ट रोजी अस्वलाचा मृत्यू झाला. जुनोना गावातील नागरिकांनी मागणी केली आहे कि मृतक अरुण कुकसे यांच्या परिवाराला २५ लाख रुपये आर्थिक भरपाई तर मुलगा विजय ला वनविभागात नोकरी द्यावी अशी मागणी केली केली आहे.

  • Shantidham cremation center । शांतीधाम संस्थेवर वादंग, महिला ऑपरेटरचे धक्कादायक आरोप

    Shantidham cremation center

    Shantidham cremation center : चंद्रपूर – रहमतनगर ईरई नदी घाटावर अंत्यसंस्कार व्यवस्था पाहणायां शांती धाम संस्थेत भ्रष्टाचार आणि महिला छळवणुकीचे गंभीर आरोप इथे लाकडाचा टॉल चालविणारी स्नेहा गर्गेलवार यांनी पत्रपरीषदेत केला आहे. तसेच संस्थेचे कर्मचारी आणि पदाधिकायांविरोधात काही खुलासे समोर आणले आहे.

    तीने पत्रपरीषदेत माहीती दिली की, तीचे वडील नरेंद्र गर्गेलवार यांच्या नावाने संस्थेशी करार करून लाकडाचा टॉल सुरू होता. मात्र संस्थेतील कर्मचारी हरीश गोडे याने कारस्थान रचल्यामुळे झालेल्या मानसिक तणावामुळे नरेंद्र गर्गेलवार यांचा नोव्हेंबर २०२४ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर स्नेहा हिने व्यवसाय स्वतः हाती घेतला.

    दिवसाढवळ्या वाघाचा हल्ला, चंद्रपूर हादरले

    स्नेहा ने सांगितले की, “मी व्यवसाय प्रामाणिकपणे चालवते, तरी हरीश गोडे माझ्यावर वाईट नजर ठेवतो, मजुरांना धमकावतो आणि माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला छळतो.” हरीश गोडेवर पूर्वीही विनयभंगाचा गुन्हा नोंद असल्याची माहिती समोर आली. तरीही संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक वासलवार आणि सचिव घनशामसिंह दरबार यांच्याकडून त्याला पाठबळ मिळत असल्याचा आरोप स्नेहा ने केला आहे. Shantidham trust corruption

    न्यायालयाचा अवमान, व्यवसायात अडथळे

    याशिवाय, गर्गेलवार कुटुंबीयांचा करार न्यायालयात प्रलंबित असताना स्थगिती आदेश असूनही संस्थेने टॉल बंद करण्याचे पत्र दिले. न्यायालयाचा अवमान करून स्नेहाच्या व्यवसायात अडथळे आणले जात असल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांकडे तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे स्नेहाने सांगितले.

    यारदम्यान मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी संस्थेतील गैरव्यवहार उघड करताना सांगितले की, १९९६ ते २०२० दरम्यान संस्थेचे ऑडिट झाले नाही. रथ, बैंड, मेटाडोर यांचे दर मनमानी वाढवून मृतकांच्या कुटुंबियांकडून अतिरिक्त रक्कम वसूल केली जाते. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊनही हिशेब नाही असा आरोप त्यांनी केला.

    त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष, सचिव, कर्मचारी हरीश गोडे आणि इतरांवर महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्नेहा गर्गेलवार हिने केली आहे.

  • daylight tiger attack on cow । ⚠️ चंद्रपूरमध्ये दिवसाढवळ्या वाघाचा हल्ला, जनावरांचा बळी; नागरिक भयभीत

    daylight tiger attack on cow

    daylight tiger attack on cow : घुग्घुस, चंद्रपूर 24 ऑगस्ट 2025 : घुग्घुस शहरालगत असलेल्या नकोडा गावाजवळ वाघाच्या हल्ल्यात एका गाईचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना रविवारी (24 ऑगस्ट 2025) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

    पिता-पुत्राला अस्वलाने पकडले आणि….

    नागरिक दहशतीमध्ये

    नकोडा येथील वेकोलि मॅगझीनजवळ ही घटना घडली. वाघाने अचानक एका गाईवर हल्ला केला. वाघाने गाईला गंभीर जखमी करून काही अंतरापर्यंत ओढत नेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु उपचारापूर्वीच गाईचा मृत्यू झाला. ही घटना दिवसाढवळ्या घडल्यामुळे स्थानिक नागरिक अधिकच धास्तावले आहेत.

    घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टीम, ज्यात वनरक्षक सुनीता मकणी आणि इतर कर्मचारी होते, त्यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी केली. पाहणीदरम्यान वाघाचे स्पष्ट ठसे (पगमार्क) आढळून आले.

    दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे नकोडा, घुग्घुस आणि आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज जनावरावर हल्ला झाला, उद्या नागरिकांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वनविभागाने या परिसरात गस्त वाढवून वाघाला पकडण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

  • Sanatan Hindu culture oldest civilization । 🔱 भागवत सप्ताहात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन : सनातन हिंदू संस्कृतीच जगातील सर्वात जुनी संस्कृती

    Sanatan Hindu culture oldest civilization

    Sanatan Hindu culture oldest civilization : चिमूर – सुमारे ८०० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी देवाकडे आशीर्वाद मागितला होता. मनुष्य आणि चराचरातील सर्व सजीव त्यांच्या सह जीवनाचा विचार हा आमच्या संतांनी मांडलेला आहे. भागवत सप्ताहाच्या निमित्ताने संतांनी सांगितलेल्या ईश्वरीय बोधकथेतून आपले जीवन समृद्ध होते. व आपली अध्यात्मिक परंपरा चिरकाल टिकून राहते. संपूर्ण विश्वात प्राचीन संस्कृती म्हणून सनातन संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती हीच आहे. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले ते चिमूर येथे भांगडिया कुटुंबीयांकडून आयोजित भागवत सप्ताहाच्या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. Chief Minister Devendra Fadnavis

    महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांची माहिती

    आयोजित भागवत सप्ताहाच्या समारोपीय सोहळ्यास आदिवासी विकास विभाग मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री प्रा.अशोक उईके, माजी आमदार मितेश भांगडिया, आ. कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया, भागवत कथाकार संत राजारामजी महाराज, संत कृपारामजी महाराज,आ. किशोर जोरगेवार, आ. करन देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष रविंद्र शिंदे, व संचालक मंडळ, तसेच विविध विभागाचे अधिकारी ,चिमूर न. प.मुख्याधिकारी अर्चना वंजारी उद्योजक श्रीकांत भांगडिया, व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

    पुण्य आत्मांनाच भागवत श्रावणाची संधी

    पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्य आत्मांनाच भागवत श्रावणाची संधी मिळते. आपल्या आध्यात्मिक परंपरेला भागवत समृद्ध करते. जगाच्या पाठीवर प्राचीन ज्या संस्कृतीला अधोरेखित केल्या गेले आहे. ती सातत्यपूर्ण संस्कृती म्हणजे सनातन हिंदू संस्कृती होय. चिमूर येथे भांगडिया परिवारा द्वारा आयोजित भागवत सप्ताहाच्या निमित्ताने आलेल्या संतांचे मी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेकडून स्वागत करतो. तसेच या भागवत कथेच्या श्रवणाचा लाभ मला मिळाला त्याबद्दल मी भांगडिया कुटुंबीयांना धन्यवाद देतो. व त्यांचेकडून भागवताची सेवा अविरत सुरू राहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असेही ते यावेळी म्हणाले.

    आयोजित भागवत कार्यक्रमास राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच नागपूर चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातून बहुसंख्येने भक्तगण व नागरिक उपस्थित होते.