Blog

  • free health camps Maharashtra Ganpati festival । 🌟 श्री गणेश आरोग्य अभियान : चंद्रपुरात २८ ऑगस्टपासून मोफत आरोग्यसेवा

    free health camps Maharashtra Ganpati festival

    free health camps Maharashtra Ganpati festival : चंद्रपूर (२७ ऑगस्ट २०२५) – श्री. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचे भान ठेवत जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने “श्री गणेश आरोग्य अभियान” अंतर्गत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2025 या कालावधीत शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या ठिकाणी ही शिबिरे भरविण्यात येणार आहेत.

    चंद्रपुरात दारू दुकानाविरुद्ध बेमुदत आमरण उपोषण

    या शिबिरांमधून नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला, आयुष्यमान कार्ड काढणे तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती मिळणार आहे. Free Ganesh festival community health camp

    जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला डॉ. हेमचंद कन्नाके (निवासी वैद्यकीय अधिकारी), डॉ. निवृत्ती जिवने (वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय), डॉ. मौहनिश गिरी (जिल्हा आरोग्य विभाग), डॉ. भूषण जैन (जिल्हा समन्वयक, मुख्यमंत्री सहाय्यता निधी), डॉ. रुपेश कुमारवार (क्षेत्रीय व्यवस्थापक), डॉ. इंद्रजीत किल्लेदार (जिल्हा समन्वयक, महात्मा जोतीबा फुले जन व आयुष्यमान भारत योजना), डॉ. कविश्वरी कुंभलकर (अध्यक्ष, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष) यांसह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

    श्री गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक मंडपांना भेट देतात. त्यामुळे थेट लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवून आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्याचा हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चिंचोळे यांनी सांगितले.

    शिबिरांत सहभागी गणेश मंडळे :

    • * चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ
    • * जोड देऊळ गणेश मंडळ, पठाणपुरा, चंद्रपूर
    • * रेणुका माता गणेश मंडळ, भानापेठ, चंद्रपूर
    • * युवक गणेश मंडळ, गंजवार्ड, चंद्रपूर
    • * श्री हिवरपुरी सर्वोदय सार्वजनिक गणेश मंडळ, चंद्रपूर
    • * जय हिंद गणेश मंडळ, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर

    शिबिरांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आपले आधारकार्ड तसेच शासकीय आरोग्य योजनांशी संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यावेळी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री आरोग्य योजना आदींबाबतही माहिती दिली जाणार आहे.

  • ashram school staff salary delay Maharashtra । आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत: आमदार अडबाले यांचा सरकारकडे पाठपुरावा

    ashram school staff salary delay Maharashtra

    ashram school staff salary delay Maharashtra : चंद्रपूर : (२७ ऑगस्ट २०२५) राज्यातील आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे माहे जुलै व ऑगस्टचे वेतन अजूनही झालेले नाहीत. सणासुदीचे दिवस असल्यामुळे शासनाने माहे ऑगस्टचे वेतन गणेश चतुर्थीपूर्वी करण्याचे आदेश काढलेले असतांना अपुऱ्या तरतुदीमुळे संपूर्ण राज्यातील विजाभज आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे जुलैचेच वेतन झालेले नाही त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष आहे. माहे जुलै व ऑगस्टच्या वेतनासाठी भरीव तरतूद उपलब्ध करून देण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी इतर मागास बहुजन कल्याण व वित्त विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून मागणी केली आहे. Sudhakar Adbale demands salary release for ashram schools

    कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना, जाणून घ्या संपूर्ण माहिती

    तर कर्मचाऱ्यांच्या हातात दमडीही शिल्लक राहणार नाही

    इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत आश्रमशाळांचे वेतन हे नेहमीच एक ते दोन महिने उशिराने होत असते. दोन महिन्यापासून वेतन मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांची गृह कर्जे, वाहनकर्जे, एलआयसीचे हप्ते व बँकांच्या इतर कर्जांचे हप्ते यावर बँकांना अतिरिक्त व्याजाचा भरणा करावा लागतो. सणासुदीचे दिवस असूनही असेच पगार उशिरा होत राहिले तर बँका कर्मचाऱ्यांच्या एकाच महिन्याचे पगारातून दोन दोन कर्जाचे हप्ते कपात करतात परिणामी कर्मचाऱ्यांच्या हातात दमडीही शिल्लक राहत नाही. त्यामुळे आश्रमशाळा कर्मचारी सतत आर्थिक विवंचनेत असतो.

    सणासुदीचे दिवस असल्यामुळे जुलै व आगष्टचे वेतन अनुदान तात्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी प्रधान सचिव, इतर मागास बहुजन कल्याण व वित्त विभाग यांना पत्र देऊन केलेली असून सर्व कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत.

  • MLWB general scholarship scheme Maharashtra । 🚀 कामगारांच्या लेकरांसाठी सुवर्णसंधी! MLWB शिष्यवृत्ती योजना, जाणून घ्या

    MLWB general scholarship scheme Maharashtra

    MLWB general scholarship scheme Maharashtra : वृत्तसेवा (२७ ऑगस्ट २०२५) – कामगार वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हेच भविष्य बदलण्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ (Maharashtra Labour Welfare Board – MLWB) कामगारांच्या मुलांना शैक्षणिक पाठबळ देण्यासाठी दरवर्षी सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजना (General Scholarship Scheme) राबवते. चला तर पाहूया या योजनेबद्दल सविस्तर माहिती.

    शासनाच्या शिष्यवृत्ती योजना काय?


    योजना कोणासाठी आहे?

    • ही योजना फक्त कामगारांच्या मुलांसाठी व पत्नींसाठी आहे.
    • पालक किंवा विद्यार्थी MLWB चे सभासद असणे आणि LIN नंबर (Labour Identification Number) असणे बंधनकारक आहे.

    पात्रता निकष

    ✅ शैक्षणिक अट – मागील शैक्षणिक वर्षात किमान 60% गुण मिळालेले असणे आवश्यक.
    ✅ शैक्षणिक स्तर – 10वी पासून पीएचडी व परदेशातील शिक्षणापर्यंत सर्व स्तरावरील विद्यार्थी अर्ज करू शकतात.
    ✅ दिव्यांग विद्यार्थी – केवळ उत्तीर्ण झालेले असले तरीही पात्र, मात्र प्रमाणपत्र आवश्यक.
    ✅ Gap Year – एका वर्षाचा ब्रेक असल्यास तहसीलदाराचे प्रमाणपत्र द्यावे लागते.
    ❌ अपात्रता – मुक्त विद्यापीठ, दूरस्थ/बाह्य अभ्यासक्रम, अप्रेंटिसशिप व स्टायपंड घेणारे विद्यार्थी पात्र नाहीत. Labour welfare board scholarship eligibility and benefits

    kamgar kalyan board

    शिष्यवृत्तीची रक्कम

    मंडळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्तरानुसार वार्षिक आर्थिक सहाय्य करते.

    शैक्षणिक स्तरशिष्यवृत्ती रक्कम
    10वी – 12वी₹2,000
    पदवी अभ्यासक्रम₹2,500
    पदव्युत्तर (नॉन–प्रोफेशनल)₹3,000
    डिप्लोमा (व्यावसायिक)₹2,500
    व्यावसायिक पदवी (Degree)₹5,000
    पीएचडी नोंदणी₹5,000
    MPSC Prelims उत्तीर्ण₹5,000
    UPSC Prelims उत्तीर्ण₹8,000
    परदेशात शिक्षण₹50,000

    अर्ज कसा करावा?

    👉 संकेतस्थळ: public.mlwb.in

    1. Membership लॉगिन करा –
      • User ID = LIN नंबर
      • Password = मोबाईल OTP
    2. Application for Schemes मध्ये “General Scholarship” निवडा.
    3. अर्जात सर्व माहिती भरा.
    4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा –
      • मागील वर्षाची मार्कशीट
      • चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
      • आधार कार्ड (विद्यार्थी + पालक)
      • बँक पासबुक / कॅन्सल चेक
      • वेतनपावती (MLWF कपात असलेली)
      • दिव्यांगत्व / Gap year पुरावे (लागल्यास)
    5. अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट घ्या. How to apply MLWB scholarship online step by step

    अर्जाची अंतिम तारीख

    • दरवर्षी निश्चित अंतिम मुदत असते.
    • उदा. 2023 साठी शेवटची तारीख 31 मार्च 2023 होती.
    • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जात नाहीत.

    निधी हस्तांतरण कसे होते?

    • अर्ज तपासल्यानंतर मंडळाकडून मंजुरी दिली जाते.
    • मंजूर शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा केली जाते.

    महत्त्वाची टीप

    ✔ अर्ज करताना LIN नंबर व मोबाईल OTP यांची शहानिशा करा.
    ✔ सर्व कागदपत्रे स्पष्ट व वैध असणे आवश्यक.
    ✔ अंतिम मुदतीपूर्वीच अर्ज पूर्ण करा, अन्यथा संधी गमावली जाऊ शकते.


    निष्कर्ष

    महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजना ही कामगारांच्या मुलांसाठी मोठं शैक्षणिक बळ आहे. केवळ शाळा–कॉलेजच्या पातळीवरच नाही, तर UPSC–MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्यांनाही आर्थिक मदत मिळते. परदेशात उच्चशिक्षण घेणाऱ्यांसाठी तर ₹50,000 पर्यंतचं सहाय्य दिलं जातं.

    शिक्षणाला आर्थिक आधार मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नक्कीच गती मिळते. त्यामुळे कामगार कुटुंबातील पात्र विद्यार्थ्यांनी ही योजना नक्कीच अर्ज करून घ्यावी.

  • indefinite hunger strike against liquor store । दारू दुकानाविरोधात बेमुदत आमरण उपोषण

    indefinite hunger strike against liquor store

    indefinite hunger strike against liquor store : चंद्रपूर (२७ ऑगस्ट २०२५)- चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित होण्यापूर्वी ३५० बार व देशी दारूचे दुकाने होते, दारूबंदी झाल्यावर अनेकांनी आपली दुकाने दुसऱ्या जिल्ह्यात स्थानांतरित केली होती, ७ वर्षांनंतर जिल्ह्याची दारूबंदी उठली आणि उत्पादन शुल्क विभागाने दारू दुकानाचा बेकायदेशीर परवाना वाटप करण्याचे काम सुरु केले. ७ वर्षांनी जिल्ह्यात तब्बल ७५० च्या वर दारू दुकानांची संख्या वाढली आहे.

    त्या बेपत्ता अल्पवयीन मुलाचा मृतदेहच आढळला

    असेच कोरपना मध्ये नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांनी देशी दारूच्या दुकानाला बेकायदेशीर ना हरकत प्रमाणपत्र देत गावातील वातावरण खराब करण्याचे काम केले असा आरोप कोरपना शहर वासियांनी केला. देशी दारू दुकान तात्काळ गावातून हटविण्यात यावे या मागणीकरिता शेतकरी संघटनेचे कोरपना तालुका उपाध्यक्ष पद्माकर नथ्थूजी मोहितकर २८ ऑगस्टपासून कोरपना तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहे. women safety concerns

    दारू दुकानाविरोधात अनेक तक्रारी, प्रशासन गप्प

    दारूचे दुकान हटवावे याकरिता संवैधानिक मार्गाने तक्रार, धरणे, मोर्चे व अनेक आंदोलने करण्यात आली मात्र त्याची साधी दखलही घेण्यात आली नाही. दारू दुकानांमुळे महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना व्यसन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दुकानांमुळे महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

    मागण्या काय?

    • २८ मे रोजी नगर पंचायतीने दारू दुकानाला दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करावे.
    • मुख्याधिकारी धुमाळ यांना निलंबित करावे.
    • अवैध बांधकामाची मोका चौकशी करून मुख्याधिकारी यांनी बांधकाम पूर्णत्वाचे दिलेल्या प्रमाणपत्राबाबत कारवाई करावी.

    ४ जुलै व २१ जुलै २०२५ रोजी महिला व पुरुषांच्या स्वाक्षरीनिशी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे तक्रार केली असून अद्यापही जिल्हाधिकारी यांनी कोरपना वासियांच्या तक्रारींवर कसलाही निर्णय घेतला नाही, याकरिता स्वतंत्र भारत पक्ष समर्पित शेतकरी संघटना तालुका उपाध्यक्ष पद्माकर मोहितकर यांनी नागरिकांच्या तक्रारींवर शेवटचा लढा देण्यासाठी बेमुदत आमरण उपोषणाचे हत्यार उगारले असून २८ ऑगस्ट पासून तहसील कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात होणार आहे. जोपर्यंत दारूचे दुकान गावातून हटणार नाही तोपर्यंत माझा लढा सुरु राहणार अशी प्रतिक्रिया मोहितकर यांनी दिली आहे.

  • decomposed body of minor found । मित्रांसोबत गेलेला अल्पवयीन रहस्यमयरीत्या मृतावस्थेत – पालकांची CID चौकशीची मागणी

    decomposed body of minor found

    decomposed body of minor found : राजुरा : (२६ ऑगस्ट २०२५)तालुक्यातील मानोली (बु.) शिवारात बल्लारपूर येथील अल्पवयीन रणजित निशाद उर्फ कट्टाणी (१७) याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. हा घातपात असल्याने सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी मृताचे वडील दिनेश व आई राजाराणी कट्टाणी यांनी निवेदनातून केली आहे.

    ८ ऑगस्ट रोजी रात्री ११:३० वाजता रणजित कट्टाणी हा सात मित्रांसह राजुरा तालुक्यातील गौरी सास्ती, कढोली परिसरातील गुप्ता कोळसा वॉशरी व वेकोलि क्षेत्रात गेला होता. मात्र, तो घरी परत आला नाही. दुसऱ्या दिवशी रणजितसोबत गेलेल्या तरुणांना चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली. त्यांच्यामध्ये रणजित नव्हता.

    रस्ते अपघातात २ युवकांचा मृत्यू

    परंतु त्याचा मोबाइल फोन दाऊद नावाच्या एका तरुणाने पोलिसांकडे जमा केला होता. त्यानंतर रणजितचा मृतदेह मानोली शिवारात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. रणजितच्या सोबत गेलेल्या मित्रांची चौकशी करून सत्य बाहेर काढावे, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. father demands CID investigation teen death

    पत्रकार परिषदेत पालकांनी व्यक्त केला होता घातपाताचा संशय

    बेपत्ता अल्पवयीन मुलाची आई राजाराणी आणि वडील दिनेश यांनी सांगितले की, राजुरा तहसीलमधील बावापूर कडोली मानोली कोलगांव येथील परिसराजवळ गुप्ता वॉशरी आणि वेकोली कोळसा खाणी आहेत, जिथे रात्रीच्या वेळी वाहतूक वाहनांमधून वाहनांच्या बॅटरी आणि डिझेलची चोरी अनेक वेळा होते. त्याचप्रमाणे, ८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११.3० वाजता, बल्लारपूर येथील रहिवासी रणजित निशाद उर्फ कट्टाणी, वय १७, त्याच्या ७ मित्रांसह बाहेर गेला आणि परतला नाही. दरम्यान, दुस_या दिवशी, रणजितसोबत गेलेल्या तरुणांना चोरीच्या आरोपाखाली राजुरा पोलिसांनी अटक केली. witness friends arrested teen missing

    त्यात रणजित निशाद त्यांच्यात नव्हता. परंतु त्याचा मोबाईल फोन दाऊद नावाच्या मुलाने राजुरा पोलिसांना दिला. या आधारे, रणजितसोबत गेलेल्या तरुणांनी त्याच्याशी काहीतरी चुकीचे केले आहे असा कुटुंबाचा संशय आहे. या संदर्भात, पोलिसांनी बेपत्ता मुलाला शोधून न्याय द्यावा किंवा सीआयडी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली होती.

  • welding laborers killed in road accident । काम संपवून परतत असताना दुर्दैवी अपघात – दोन तरुणांचा मृत्यू, एक जखमी

    welding laborers killed in road accident

    welding laborers killed in road accident : गडचिरोली/मूल (२६ ऑगस्ट २०२५) – आष्टी-मुलचेरा मार्गावर सोमवारी (२५ ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजता दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात लवकुश सदाशिव गोरडवार (२९, रा. घोसरी) आणि शुभम सखाराम वाकुडकर (२५, रा. बोंडाळा) या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अक्षय राजू वाकुडकर हा जखमी झाला आहे.

    मुख्यमंत्री विरुद्ध अपशब्द, चंद्रपुरात निषेध आंदोलन

    दुचाकीचे नियंत्रण सुटले आणि

    हे तिन्ही तरुण वेल्डिंगचे काम करत होते. सोमवारी ते मुलचेरा येथे आयुष वेल्डिंग दुकानाच्या मालकाच्या घरी कामासाठी गेले होते. काम संपवून ते दुचाकीने घोसरीकडे परत येत असताना आष्टीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका वळणावर त्यांच्या दुचाकीचे नियंत्रण सुटले आणि ती झाडावर आदळली.

    या अपघातात दुचाकीवरील तिघेही जण फेकले गेले. लवकुश गोरडवारचा जागीच मृत्यू झाला, तर शुभम वाकुडकरला तातडीने आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या अपघातामुळे घोसरी, नांदगाव आणि बोंडाळा परिसरात शोककळा पसरली आहे.

  • Inspiring stories of unexpected winners । संघर्षातून यशाकडे, अडचणींवर मात करून चमकलेले विजेते

    Inspiring stories of unexpected winners

    Inspiring stories of unexpected winners : चंद्रपूर (२६ ऑगस्ट २०२५) – कोणत्याही खेळाला पैशाची श्रीमंती लागत नाही, प्रतिष्ठेचा दिमाख लागत नाही. लागतं ते फक्त जिद्दीचं आभाळ आणि मेहनतीचं क्षितिज. चंद्रपूरच्या जय शीतला माता गोविंदा पथकाने हेच दाखवून दिलंय. त्यांची गोष्ट ऐकल्यावर वाटतं, खरंच, स्वप्नं पाहण्यासाठी डोळ्यांत फक्त आत्मविश्वास असावा लागतो, बाकी सगळं आपोआप जुळून येतं.

    बाबुपेठ येथील सोनझारी मोहल्ल्यात राहणारे हे तरुण. कोणी स्मशानभूमीची साफसफाई करतो, तर कोणी भंगार गोळा करतो. समाजाने त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमीच वेगळा राहिला. पण या उपेक्षित जगातही त्यांची स्वप्नं मोठी होती. साधारण सात-आठ वर्षांपूर्वी नागपूरला नातेवाईकांकडे दहीहंडी पाहिली आणि त्यांच्या डोळ्यांत एकच स्वप्न तरळलं – आपणही हा थरार अनुभवायचा. पैसे नव्हते, ना कोणती मोठी ओळख. होतं फक्त एक वेड आणि अफाट मेहनत करण्याची तयारी. Inspirational story

    घुग्गुस वासियांचे स्वप्न होणार पूर्ण

    त्यांच्या या वेडाला हळूहळू आकार मिळत गेला. छोट्या-मोठ्या दहीहंडी स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केली. पडले, ठेच लागली, पण थांबले नाहीत. माणसांच्या थरावर थर रचत त्यांनी माणुसकीचा आणि एकजुटीचा एक वेगळाच कळस उभा केला. या वर्षी तर त्यांनी कमालच केली. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मानाची मानली जाणारी ‘भाऊंची दहीहंडी’ फोडली आणि दीड लाख रुपयांचं मोठं बक्षीस जिंकलं. त्यासोबतच, जिल्ह्यातील अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांनी सुमारे ४ लाख रुपयांची बक्षिसांची रक्कम जमा केली. त्या एका क्षणासाठी, त्या गोविंदांच्या डोळ्यांतील चमक पाहण्यासारखी होती. ती फक्त विजयाची चमक नव्हती, तर त्यांच्या जिद्दीला मिळालेल्या यशाची ती एक ज्योत होती. Dahi Handi Winner

    पैश्याचा सदुपयोग

    पण खरी गोष्ट तर यापुढे आहे. जिंकलेल्या पैशाचं त्यांनी काय केलं, हे ऐकून मन भरून येतं. एकही पैसा त्यांनी स्वतःच्या चैनीसाठी खर्च केला नाही. यातील काही रक्कम पथकातील कुणा सदस्याच्या कुटुंबात दुर्दैवाने जीवितहानी झाली असेल, तर त्यांना मदत केली जाते. कुणाला उपचारासाठी पैशांची गरज असेल, तर तेही याच निधीतून दिले जातात.

    आज त्यांच्याकडे समाज एका वेगळ्या नजरेने पाहतोय. ती नजर आता तुच्छतेची नाही, तर आदराची आहे. त्यांची ही गाथा सांगते की, माणसातले गुण त्याच्या कामावरून आणि निस्वार्थीपणावरून ठरतात. या गोविंदा पथकाने दहीहंडीच्या उंचीलाच नव्हे, तर माणुसकीच्या उंचीलाही गवसणी घातली आहे. त्यांच्या या प्रवासाने सिद्ध केलंय की, जिद्द असेल तर प्रत्येक काम, प्रत्येक खेळ, आणि प्रत्येक स्वप्न जिंकता येतं.

    गोविल मेहरकुरे ९६८९९८८२८२

  • Nazul holders permanent patta order । आमदार जोरगेवारांचा पाठपुरावा – नझूल धारकांना अखेर घरपट्टे निश्चित

    Nazul holders permanent patta order

    Nazul holders permanent patta order : चंद्रपूर – (२६ ऑगस्ट २०२५) – आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई मंत्रालयात बैठक घेऊन चंद्रपूर आणि घुग्घुस येथील नझूल धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची प्रक्रिया गतीशील करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठीच्या सर्वेक्षणाकरिता पाच एजन्सी नियुक्त करून त्याचा खर्च खनिज विकास निधीतून करण्याचे निर्देशही ना. बावनकुळे यांनी दिले असून सहा महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

    मनोज जरांगे यांच्या प्रतिमेला जोड्याचा प्रसाद

    चंद्रपूर आणि घुग्घुस येथील नझूल धारकांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्यात यावेत, तसेच विविध विषयांवर बैठक घेण्यात यावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुंबई मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीला आमदार किशोर जोरगेवार, महसूल विभागाचे सहसचिव संजय बनकर, अवर सचिव आश्विनी यमगर, चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा उपस्थित होते. तर महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डी. एस. कुंभार, तहसीलदार विजय पवार, मनपाचे अप्पर आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त चीद्रावार, संजय गांधी योजनेंतर्गत तहसीलदार सीमा गजभिये, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी गायकवाड आदी अधिकारी व्हिसीच्या माध्यमातून उपस्थिती होती. Nazul land permanent pattas process

    नागरिकांची सतत मागणी

    चंद्रपूर शहरात नझूल जागेवर मोठी लोकवस्ती असून या नागरिकांकडे कायमस्वरूपी पट्टे नसल्याने त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील ५० ते ७० वर्षांपासून वास्तव्यास असूनही पट्टे न मिळाल्याने येथील नागरिक सतत मागणी करत होते. याच मागणीसंदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी शासनाशी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचे फलित स्वरूप महसूल मंत्री यांनी सदर विषयावर बैठक घेतली. या बैठकीत सर्वेक्षण पूर्ण झालेल्या ७०० नागरिकांना तात्काळ पट्टे वाटप करण्याचे आदेश देण्यात आले.

    सर्व्हेसाठी पाच एजन्सींची नियुक्ती करण्याचे आदेश

    चंद्रपूर शहरात 39 झोपडपट्टी नझुलच्या जागेवर असल्याची नोंद मनपाकडे आहे. यातील 14 झोडपट्टांचे सर्वेक्षण झाले आहे. तर उर्वरित झोडपट्टींचे सर्वेक्षण सुरु आहे. मात्र सध्या एकाच एजन्सीमार्फत सर्वेक्षण सुरू असल्याने काम संथ गतीने सुरू असल्याचे आमदार जोरगेवार यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी पाच एजन्सींची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. सर्वेक्षणाचा खर्च खनिज विकास निधीतून करण्याचेही निर्देशही यावेळी देण्यात आले. त्यामुळे आता शहरातील जवळपास १८ हजार घरांना पट्टे मिळणार आहेत. त्यासोबतच घुग्घुस येथील नझूल धारक नागरिकांनाही पट्टे देण्यात येणार आहेत.

    याशिवाय संजय गांधी योजनेंतर्गत तहसीलदारांची रिक्त पदे तातडीने भरून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले. तसेच नझूल प्रकरणांसाठी स्वतंत्र तलाठी नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. घुग्घुससाठी स्वतंत्र क्रीडांगणाची जुनी मागणी आमदार जोरगेवार यांनी बैठकीत मांडली. त्यानुसार जागेची अडचण दूर करून प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. याशिवाय घुग्घुस परिसरात अप्पर तहसील कार्यालयासही मंजुरी देण्यात आली असून त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी चंद्रपूरला जाण्याची गरज भासणार नाही. nazul land survey agencies

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारामुळेच या बैठकीत मतदार संघातील प्रश्न प्राधान्याने चर्चेत आले. त्यांच्या ठाम भूमिकेमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांना गती मिळणार असून चंद्रपूर-घुग्घुस परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या बैठकीला चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ देवतळे, नामदेवभाऊ डाहुले, भाजपा महामंत्री रवींद्र गुरनुले, शाम कणकम, सविताताई दंडारे, घुग्घुस शहराध्यक्ष संजय तिवारी, माजी नगरसेविका कल्पनाताई बगुलकर,  आदी मान्यवर उपस्थित होते. Nazul holders permanent patta order

  • MSEDCL Ganeshotsav electrical safety advisory । 🎉 उत्सवात आनंद दुप्पट, धोका शून्य – महावितरणने दिले सुरक्षा टिप्स

    MSEDCL Ganeshotsav electrical safety advisory

    MSEDCL Ganeshotsav electrical safety advisory :चंद्रपूर:- २६ ऑगस्ट २०२५ – ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष करत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची तयारी शिगेला पोहोचली आहे. गल्लोगल्ली उभारले जाणारे भव्य मंडप, त्यावर केलेली आकर्षक रोषणाई, आणि मनमोहक देखावे यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

    चंद्रपुरात हवी गोंड वीरांची स्मारके

    या उत्सवाला झगमगाट देणारी विद्युत ऊर्जा ही जितकी आवश्यक आहे, तितकीच ती सुरक्षितपणे हाताळणे महत्त्वाचे आहे. उत्साहाच्या भरात विजेच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. यंदाच्या उत्सवात गणेशभक्त आणि मंडळांनी समन्वयाने काम करत, विजेचा वापर सुरक्षितपणे केल्यास, हा उत्सव खऱ्या अर्थाने विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने उजळून निघेल. Ganesh festival safe electricity tips

    मंडळांसाठी महत्त्वाची नियमावली: सुरक्षा हाच पहिला मान

    गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आणि कोणत्याही संभाव्य अपघाताला टाळण्यासाठी, गणेश मंडळांनी काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

    तात्पुरत्या वीज जोडणीसाठी आवश्यक कागदपत्रे:

    • मंडळाने तात्पुरत्या वीज जोडणीसाठी महावितरण कडे अर्ज करताना खालील कागदपत्रे तयार ठेवावीत:
      • महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र: हे प्रमाणपत्र तुमच्या मंडळाची नोंदणी कायदेशीर असल्याची खात्री करते. temporary power connection Ganesh Festival
      • पोलिस परवानगी: मंडप उभारणी आणि वीज जोडणीसाठी पोलिसांची परवानगी घेणे अनिवार्य आहे.
      • वीज मागणी अर्ज आणि वीजसंच मांडणी अहवाल: महावितरणकडे तात्पुरत्या वीज जोडणीसाठी रीतसर अर्ज करण्यासोबतच वीज जोडणी सुरक्षितपणे करण्यात आल्याचा अहवालही सादर करणे महत्त्वाचे आहे.

    सुरक्षा उपाययोजना आणि खबरदारी:

    • • पुरेसे अंतर राखा: मंडप, रोषणाई आणि देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवा. वितरण रोहित्रे (Transformers) आणि इतर विद्युत यंत्रणेपासून पुरेशा अंतरावर मंडप उभारा.
      • तज्ञ व्यक्तींची मदत: वीज जोडणीसाठी फक्त मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांची नेमणूक करा. ते सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करतील याची खात्री करा. licensed electrician Ganesh pandal wiring safety
      • सुरक्षित उपकरणे वापरा: योग्य इन्सुलेशन (Insulation) असलेले वायर्स, फ्यूज आणि सर्किट ब्रेकर्सचा वापर करा. विजेच्या सुरक्षिततेमध्ये कोणतीही तडजोड करू नका.
      • आपात्कालीन मदत: कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरीत संपर्क साधण्यासाठी, आपल्या कार्यक्षेत्रातील महावितरणच्या स्थानिक शाखा अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवा.

    महावितरणचे आवाहन: घरगुती दरात वीज आणि ऑनलाईन पेमेंट

    राज्य वीज नियामक आयोगाने गणेश मंडळांना मोठा दिलासा दिला आहे.
    • घरगुती दरात वीज: मंडळांना तात्पुरती वीज जोडणी आता घरगुती वापराच्या दराने उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक भार कमी होईल.
    • ऑनलाईन अनामत रक्कम: तात्पुरत्या वीज जोडणीसाठी मंडळांना मंजूर वीजभाराप्रमाणे अनामत रक्कम भरावी लागते. ही रक्कम ऑनलाईन भरल्यास, गणेशोत्सव संपल्यावर वीजबिलाची रक्कम वजा करून उरलेली रक्कम त्वरित परत केली जाईल. यामुळे मंडळांना रक्कम परत मिळवण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही. महावितरणने मंडळांना ही रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच भरण्याचे आवाहन केले आहे. MSEDCL Ganeshotsav electrical safety advisory

    गणेशभक्तांनी घ्यावयाची काळजी: जागरुकता हेच खरे भक्तित्व

    गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्तानेही सुरक्षिततेची जबाबदारी घेणे महत्त्वाचे आहे.
    • ओल्या हातांनी स्पर्श टाळा: पावसाळ्यात किंवा ओले हात असताना कोणत्याही विद्युत उपकरणाला किंवा दिव्यांच्या माळेला स्पर्श करू नका.
    • उघड्या तारांपासून सावधान राहा: मंडपात किंवा परिसरात उघड्या पडलेल्या किंवा लटकलेल्या तारांपासून दूर राहा.
    • मुलांची काळजी घ्या: लहान मुलांना विद्युत रोषणाई किंवा कोणत्याही विजेच्या उपकरणाजवळ जाऊ देऊ नका. त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करा.

    गणेशोत्सव हा केवळ आनंद आणि उत्साहाचा नाही, तर सामाजिक जबाबदारीचाही उत्सव आहे. मंडळांनी आणि गणेशभक्तांनी एकत्र येऊन विजेच्या सुरक्षिततेचे नियम पाळल्यास, हा उत्सव खऱ्या अर्थाने निर्विघ्नपणे साजरा होईल. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत, त्यांच्या या गुणाला आपण सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून खरा मान देऊया. यंदाच्या उत्सवात ‘सुरक्षिततेची वीज’ वापरून ‘आनंदाची रोषणाई’ करूया!

  • MNS Numerous youth join party । स्थानिक स्वराज्य निवडणुकीत मनसेची धडक तयारी – युवकांचा उत्स्फूर्त प्रवेश

    MNS Numerous youth join party

    MNS Numerous youth join party : राजुरा – जिल्ह्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून होत आहे अश्यातच पक्षाच्या बैठकीचे आयोजन ग्रामीण क्षेत्रात सुरू आहे, त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा मागे नसून ग्रामीण क्षेत्रात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, उमाशंकर तिवारी, जनहीत जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे यांचे जिल्हा दौरे सुरू आहे.

    जरांगे पाटलांच्या प्रतिमेला जोड्यांचा प्रसाद

    राजुरा तालुक्यातील गोयेगाव व आजूबाजूच्या परिसरातील गावामधून आलेल्या युवकांनी दिनांक 25 ऑगस्ट रोज सोमवारला गोयेगाव येथील हनुमान मंदिर परिसरातील खुल्या मैदानात मनसेत प्रवेश केला. यावेळी गोयेगाव गावातील आजीमाजी ग्रामपंचायत सदस्य यासंह माजी पोलीस पाटील उपस्थित होते. MNS youth joining in Rajura taluka

    आगामी निवडणुकीत मनसेला फायदा

    चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा भद्रावती या क्षेत्रात मनसेचा प्रभाव असल्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसेने उमेदवार दिले तर जिल्हापरिषद मध्ये मनसेचं खातं उघडू शकतं, त्यामुळे मनसेच्या दुसऱ्या फळीतील सर्व मनसे पदाधिकारी हे कामाला लागले आहे.

    या धर्तीवर राजुरा तालुक्यातील गोयेगाव येथे शेकडो युवकांनी मनसेत प्रवेश घेतला, यावेळी सर्व मनसे पदाधिकारी यांनी उपस्थित महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन करून पक्ष संघटनेला मजबूत करण्याचे व स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये आपले लोकप्रतिनिधी निवडून आणण्याचे आवाहन केले.