Blog

  • Majhi Ladki Bahin yojana labharthi verification । चंद्रपुरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरू

    Majhi Ladki Bahin yojana labharthi verification

    Majhi Ladki Bahin yojana labharthi verification : चंद्रपूर, दि. 29 : महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू करण्यात आली आहे.

    मेरी डिग्री मेरा अभिमान, कांग्रेसचं आंदोलन

    शासनाकडून जिल्हास्तरावर या योजनेच्या लाभार्थींचे वय पडताळणी यादी व एका परिवारातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी यादी प्राप्त झाली आहे. 

    यंत्रणेस सहकार्य करा

    त्याअनुषंगाने बाल विकास प्रकल्प अधिकारी शहरी व ग्रामीण यांच्यामार्फत अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांच्याकडून लाभार्थींचे पडताळणीचे कार्य सुरू आहे. या पडताळणीकरिता यंत्रणेस सहकार्य करावे. जेणेकरून लाभार्थीचे शासन स्तरावरून थांबविलेले लाभ पूर्ववत सुरू करता येईल. 

    अधिक माहिती करिता तालुका स्तरावरील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय तथा जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, यांनी केले आहे.

  • hair patch service । टक्कल पडलं, हेअर पॅच लावताय? थांबा आधी माहिती जाणून घ्या

    hair patch service

    hair patch service (29 ऑगस्ट 2025) मराठी पोस्ट – आजकाल, केसांची समस्या, विशेषतः टक्कल पडणे ही अनेक लोकांसाठी एक मोठी चिंता बनली आहे. या समस्येवर विविध उपचार उपलब्ध असले, तरी हेअर पॅच हा एक लोकप्रिय आणि त्वरित उपाय म्हणून समोर आला आहे. परंतु, हेअर पॅच म्हणजे नेमके काय, त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत, आणि तो कोणासाठी योग्य आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

    गृहकर्ज हवं? पण घायचं कसं? जाणून घ्या सोपी पद्धत

    हेअर पॅच म्हणजे काय?

    हेअर पॅच किंवा नॉन-सर्जिकल हेअर रिप्लेसमेंट म्हणजे डोक्याच्या ज्या भागावर केस नाहीत, तिथे नैसर्गिक किंवा कृत्रिम केसांची एक पातळ जाळी (mesh) चिकटवली जाते. ही जाळी खास डिझाइन केलेली असते आणि ती त्वचेला कोणताही त्रास होणार नाही अशा खास ॲडहेसिव्ह (adhesive) किंवा क्लिप्सचा वापर करून बसवली जाते. हे पॅच केसांच्या नैसर्गिक रंगाशी आणि संरचनेशी जुळणारे असतात, ज्यामुळे ते ओळखणे कठीण होते. best hair patch for sudden baldness solution


    हेअर पॅच कसे तयार होतात?

    हेअर पॅच मुख्यत्वे दोन प्रकारच्या केसांपासून तयार होतात:

    1. मानवी केस (Human Hair): हे पॅच दान केलेल्या मानवी केसांपासून बनवलेले असतात. हे केस अनेकदा भारतातील तिरुपतीसारख्या मंदिरांमधून किंवा इतर देशांमधून मिळवले जातात. या केसांची गुणवत्ता खूप चांगली असते आणि ते नैसर्गिक केसांसारखेच दिसतात. या केसांना स्वच्छ करून, प्रक्रिया करून आणि रंगाच्या शेड्समध्ये विभागून पॅचसाठी तयार केले जाते. नैसर्गिक केसांचे पॅच वापरकर्त्याच्या मूळ केसांशी उत्तम प्रकारे जुळतात आणि त्यामुळे ते सहज ओळखता येत नाहीत. non-surgical hair loss solution
    2. सिंथेटिक फायबर (Synthetic Fiber): हे कृत्रिम केस पॉलीमर किंवा प्लास्टिकसारख्या पदार्थांपासून बनवलेले असतात. हे सिंथेटिक फायबर वेगवेगळ्या रंगांमध्ये आणि पोतांमध्ये उपलब्ध असतात, ज्यामुळे ते नैसर्गिक केसांसारखे दिसतील. मात्र, नैसर्गिक केसांच्या तुलनेत यांचा पोत थोडा वेगळा असतो. सिंथेटिक केसांचे पॅच तुलनेने स्वस्त असतात आणि ते विविध रंगांमध्ये सहज उपलब्ध होतात.

    हेअर पॅच तयार करताना, निवडलेले केस अतिशय पातळ आणि हलक्या जाळीवर (mesh base) हाताने किंवा मशीनच्या मदतीने एक-एक करून बसवले जातात. ही जाळी अशा प्रकारे डिझाइन केलेली असते की ती डोक्यावर नैसर्गिकरित्या बसते आणि हवेला आत येऊ देते, ज्यामुळे त्वचेला श्वास घेता येतो. temporary hair patch vs permanent transplant


    हेअर पॅचचे फायदे

    1. झटपट परिणाम: हेअर पॅच लावल्यावर लगेचच टक्कल झाकले जाते आणि व्यक्तीला केसांनी भरलेले डोके मिळते. यासाठी कोणत्याही शस्त्रक्रियेची गरज नसते.
    2. वेळेची बचत: हेअर ट्रान्सप्लांटसारख्या उपायांसाठी बराच वेळ लागतो, तर हेअर पॅचसाठी फक्त काही तास लागतात.
    3. कमी खर्चिक: हेअर ट्रान्सप्लांटच्या तुलनेत हेअर पॅचचा खर्च खूपच कमी असतो.
    4. नॉन-सर्जिकल प्रक्रिया: यात कोणतीही शस्त्रक्रिया, वेदना किंवा गुंतागुंत नसते. ही एक सुरक्षित आणि सोपी प्रक्रिया आहे.
    5. देखरेख आणि शैली: हेअर पॅचला नैसर्गिक केसांप्रमाणेच धुता येते, कंघी करता येते आणि विविध हेअरस्टाईलमध्ये सेट करता येते.

    हेअर पॅचचे तोटे आणि आव्हाने

    1. नियमित देखरेख: हेअर पॅचला नियमितपणे स्वच्छ आणि मेन्टेन करणे आवश्यक असते. यात पॅच काढणे, साफ करणे आणि पुन्हा लावणे इत्यादी गोष्टी येतात.
    2. अस्थिर उपाय: हा एक कायमस्वरूपी उपाय नाही. पॅचचा वापर काही महिन्यांसाठी किंवा वर्षांसाठीच असतो. त्यानंतर तो बदलावा लागतो.
    3. संभाव्य ॲलर्जी: काही लोकांना पॅच चिकटवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोंदामुळे त्वचेवर ॲलर्जी किंवा खाज येऊ शकते.
    4. अनैसर्गिक वाटू शकते: उच्च दर्जाचे पॅच नैसर्गिक वाटत असले, तरी काही वेळा ते अयोग्यरित्या बसवल्यास किंवा वापरल्यास अनैसर्गिक दिसू शकतात.
    5. जीवनशैलीवर परिणाम: हेअर पॅच लावल्यावर पोहणे, व्यायाम करणे किंवा इतर शारीरिक हालचाली करताना काळजी घ्यावी लागते. hair patch service

    हेअर पॅच कोणासाठी योग्य आहे?

    हेअर पॅच खालील व्यक्तींसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो:

    • ज्यांच्या डोक्यावर टक्कल पडले आहे, पण हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी पुरेसे केस नाहीत.
    • ज्या लोकांना शस्त्रक्रियेची भीती आहे किंवा ज्यांच्यासाठी शस्त्रक्रिया शक्य नाही.
    • ज्या लोकांना त्वरित आणि तात्काळ परिणाम हवा आहे.
    • जे लोक कमी खर्चात केस वाढवण्याचा पर्याय शोधत आहेत.

    निष्कर्ष

    हेअर पॅच हा केसांच्या समस्येवर एक चांगला आणि व्यावहारिक उपाय आहे. तो त्वरित परिणाम देतो आणि शस्त्रक्रियेची गरज टाळतो. तथापि, हा एक तात्पुरता उपाय आहे आणि त्याला नियमित देखभालीची आवश्यकता असते. हेअर पॅच घेण्यापूर्वी, त्याच्याशी संबंधित सर्व फायदे आणि तोटे काळजीपूर्वक विचारात घेणे आणि एखाद्या तज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. योग्य काळजी घेतल्यास, हेअर पॅच तुमच्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्कीच मदत करू शकतो.

  • special adoption agency job openings । 🎓 Counsellor व Caretaker पदांसाठी Special Adoption Agency मध्ये जागा

    special adoption agency job openings

    special adoption agency job openings : गडचिरोली (२९ ऑगस्ट २०२५) : महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त (अनुदानित) अनुज्ञाप्ती क्रमांक : GAD-2/SAA/2024/486 असलेल्या लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था ब्रम्हपुरी संचालित लड्डू विशेष दत्तक संस्था, गडचिरोली येथे तात्काळ काही रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.

    मेरी डिग्री मेरा अभियान, कांग्रेसचे अनोखे आंदोलन

    या भरतीअंतर्गत खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत –

    🔹 उपलब्ध रिक्त पदे

    1️⃣ समुपदेशक (Counsellor)

    • शैक्षणिक पात्रता : BSW किंवा मानसशास्त्र विषयातील पदवीधर
    • पदसंख्या : 1

    2️⃣ आया (Care Taker)

    • शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण
    • अनुभव : किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक
    • पदसंख्या : 1

    📞 संपर्कासाठी माहिती

    इच्छुक उमेदवारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा :
    अधीक्षक, लड्डू विशेष दत्तक संस्था, गडचिरोली
    मोबाईल : 8879699138 / 9422181114

    या भरतीमुळे समाजसेवेची आवड असलेल्या आणि पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना गडचिरोलीत थेट कामाची संधी उपलब्ध होणार आहे.

  • Meri Degree Mera Abhiman । 🏛️ डिग्री लपवू नका, अभिमान बाळगा – काँग्रेसचे आंदोलन चर्चेत

    Meri Degree Mera Abhiman

    Meri Degree Mera Abhiman : चंद्रपूर : (२९ ऑगस्ट २०२५) – शिक्षण आणि डिग्री ही व्यक्तीच्या ओळखीची शान आहे, हे अधोरेखित करण्यासाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गिरणार चौक येथे ‘मेरी डिग्री, मेरा अभिमान’ या अनोख्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या डिग्री हातात घेऊन घोषणाबाजी करत शिक्षणाचा सन्मान करण्याचा संदेश दिला.

    चंद्रपुरात भीषण अपघात, ६ जण ठार

    आपल्या शिक्षणाबद्दल अभिमान बाळगावा

    जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी सांगितले की, आज देशात स्वतःची डिग्री लपविण्याची प्रवृत्ती वाढत आहे, जी सुशिक्षितांमध्ये नैराश्य निर्माण करणारी आहे. या पार्श्वभूमीवर, आपल्या शिक्षणाबद्दल अभिमान बाळगावा आणि उच्चशिक्षितांना राजकारणात व समाजात योग्य सन्मान मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

    या आंदोलनात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शिवा राव, वरिष्ठ नेते के. के. सिंग, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, अनिरुद्ध वनकर, रामकृष्ण कोंड्रा, शिरीष गोगुलवार, अख्तर सिद्धिकी, नौशाद शेख, रमिश शेख आणि इतर सुशिक्षित कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


  • responsive governance Adi Karmayogi Abhiyan । 🌍 ‘आदि कर्मयोगी अभियान’ : 2047 पर्यंत विकसीत भारतासाठी क्रांतिकारी पाऊल

    responsive governance Adi Karmayogi Abhiyan

    responsive governance Adi Karmayogi Abhiyan : चंद्रपूर, दि. २९ ऑगस्ट २०२५ : सन 2047 पर्यंत विकसीत भारत घडविण्यासाठी, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा व लोककेंद्रीत विकासाची पुर्तता होणे आवश्यक आहे. त्यासाठीच प्रतिक्रियाशील सुशासन कार्यक्रमाचा भाग म्हणून केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयाने ‘आदि कर्मयोगी अभियान’ सुरू केले आहे. या अभियानात चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहावा, यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य समन्वयातून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले.

    चंद्रपुरात भीषण अपघात ६ ठार

    एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरच्या वतीने नियोजन सभागृह येथे आयोजित तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, ‘आदि कर्मयोगी अभियान’ हे केंद्र शासनाचे अतिशय महत्वाकांक्षी अभियान आहे. या अंतर्गत मास्टर ट्रेनर तयार करून तसेच लोकांचा सहभाग घेऊन प्रत्येक आदिवासी गावातील समस्यांची मांडणी असलेले डॉक्युमेंट तयार केले जाईल. जेणेकरून ‘विकसित भारत – 2047’ च्या व्हीजन डॉक्युमेंटमध्ये त्याचा समावेश करता येईल. त्यासाठी राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि ग्रामस्तरावर तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. Adi Karmayogi capacity building tribal change leaders

    योजनांचे एकत्रिकरण करून व्हीजन डॉक्युमेंट होणार तयार

    या अभियानात 1. पीएम जनमन योजना, 2. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, 3. राष्ट्रीय सिकलसेल उच्चाटन मोहीम आणि 4. एकलव्य निवासी शाळांचा विस्तार आणि शिष्यवृत्ती या व इतर योजनांचे एकत्रिकरण करून व्हीजन डॉक्युमेंट तयार करावयाचे आहे. मुख्य म्हणजे यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांची मुख्य जबाबदारी राहणार आहे. केंद्र आणि राज्य स्तरावरून या अभियानाचा नियमित पाठपुरावा सुरू असून 2 ऑक्टोबर 2025 च्या ग्रामसभेत हा आराखडा मंजूर करून घ्यावयाचा आहे. त्यामुळे यात प्रत्येक यंत्रणेचा सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी योग्य समन्वय व सुक्ष्म नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या. Adi Sewa Kendra tribal service centres scheme 

    प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानात चंद्रपूर जिल्ह्यातील 167 गावे तर पीएम जनमन योजनेत 68 गावांचा समावेशा आहे. आदिवासी गावांमध्ये आरोग्य, शिक्षण, पोषण, रोजगार, पाण्याची उपलब्धता करणे आाणि शासनाशी संपर्क ठेवण्यासाठी ‘आदि कर्मयोगी अभियान’ सुरू करण्यात आले आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. कार्यशाळेला सर्व विभागांचे प्रमुख, जिल्हास्तरीय तज्ज्ञ प्रशिक्षक, गटविकास अधिकारी, नोडल अधिकारी आदी उपस्थित होते. 20 lakh change leaders Adi Karmayogi mission

    ‘आदि कर्मयोगी अभियानाबाबत माहिती’

    आदिवासी भागात तळागाळातील शासन व सेवा वितरणामध्ये आमुलाग्र परिवर्तन घडविणे, आदिवासी समुदायांना सशक्त करण्यासाठी प्रतिक्रियाशील सुशासन कार्यक्रमांतर्गत नेत्यांचे कॅडर निर्माण करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. सेवा, समर्पण आणि संकल्प या तत्वावर हे अभियान राबविले जाणार असून आदिवासी भागांमध्ये प्रतिसादक्षम शासन आणि शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहचवली जाईल. भारतामध्ये 10.5 कोटी आदिवासी नागरीक आहेत, जे 30 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये राहतात. या आदिवासी समुदायांच्या सक्षमीकरणासाठी संपूर्ण भारतात 20 लक्ष परिवर्तनशील नेत्यांचे मिशन आधारीत कॅडर निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

  • highway accident auto truck Marathi news | चंद्रपुरात मोठा अपघात, 6 ठार

    highway accident auto truck Marathi news

    highway accident auto truck Marathi news : राजुरा: (28 ऑगस्ट 2025) राजुरा – गडचांदूर – मार्गावरील कापनगाव जवळ राजुरा येथून पाचगाव कडे जाणा-या एका ॲटोला विरूध्द दिशेने येणा-या हायवा ट्रक ने जबर धडक दिली. या घटनेत ६ प्रवाशी ठार झाले असून एका गंभीर प्रवाश्याला चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

    छोटा मटका जेरबंद

    तर एकावर राजुरा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ वाजता ही दुर्देवी दुर्घटना घडली.

    ऑटो चालक संभ्रमात आणि

    राजुरा येथुन पाचगाव कडे ॲटो चालक व सात प्रवाशी ॲटो ने जात होते. राजुरा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर महामार्गाचे काम सुरू आहे. आज एकाएकी येथे काम करण्यासाठी रस्ता वाहतुकीत बदल करण्यात आला. मात्र याविषयी कसलेही फलक लावले नव्हते. यामुळे ॲटो चालक संभ्रमात पडला आणि हायवे वर ॲटो घेतल्यानंतर हायवा ट्रक ने ॲटोला भिषण धडक दिली. truck collision Rajura Maharashtra

    ही टक्कर एवढी भिषण होती की संपुर्ण ॲटोचा चुराडा झाला. यावेळी तिन प्रवाशी जागीच ठार झाले. तिन जखमींना चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात रेफर केल्यानंतर रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.

    या दुर्घटनेत रवींद्र हरी बोबडे, वय ४८, राहणार पाचगाव, शंकर कारू पिपरे, वय ५०, राहणार कोची, सौ. वर्षा बंडू मांदळे, वय ४१, राहणार खामोना, तनु सुभाष पिंपळकर, वय १८, राहणार पाचगाव, ताराबाई नानाजी पापुलवार, वय 60 वर्ष, राहणार पाचगाव आणि ऑटो चालक प्रकाश मेश्राम, वय ५० वर्ष, राहणार पाचगाव या सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. याव्यतिरिक्त चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात निर्मला रावजी झाडे, वय ५० वर्षे, पाचगाव यांना चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात आले असून भोजराज महादेव कोडापे, वय ४० वर्षे, भुुरकुंडा यांचे वर राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Rajura accident service road auto truck collision

    राजुरा पोलिसांनी याची दखल घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ट्रकचालक अद्याप फरार आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे . ठाणेदार सुमित परतेकी पुढील तपास करीत आहेत.

  • Chota Matka Tiger |छोटा मटका वाघ TTC उपचार केंद्रात दाखल

    Chota Matka Tiger

    Chota Matka Tiger : (28 ऑगस्ट 2025)चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील (बफर) गंभीर जखमी वाघ T-126 ला यशस्वीरित्या जेरबंद करण्यात आले आहे. खडसंगी वनपरिक्षेत्रातील कंपार्टमेंट क्र. ५१ मध्ये ही बचाव मोहीम राबवण्यात आली. वाघाला पुढील उपचारांसाठी चंद्रपूर येथील ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC) मध्ये हलवण्यात आले आहे.

    कोरपना तहसील कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण, दारू दुकानाविरुद्ध एल्गार

    वाघाच्या झुंजीत सीएम जखमी

    १२ मे, २०२५ रोजी ताडोबातील खडसंगी बफर परिक्षेत्रात T-126 आणि T-158 या दोन वाघांमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. या लढाईत T-158 वाघाचा मृत्यू झाला, तर T-126 गंभीर जखमी झाला होता.

    राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) आणि तांत्रिक समितीच्या शिफारशीनुसार, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी T-126 वाघाला जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. मानवी-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आणि अनुचित घटना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

    वनसंरक्षक आणि क्षेत्र संचालक श्री प्रभू नाथ शुक्ल आणि उपसंचालक (बफर) श्री आनंद रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या शीघ्र कृती दलाने (RRT) सहायक वनसंरक्षक श्री. अनिरुद्ध ढगे यांच्या देखरेखीखाली ही बचाव मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान वाघाला कमीत कमी इजा होईल याची पूर्ण काळजी घेण्यात आली.

    profile picture
  • Festival of Ganesh Chaturthi । चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या घरी श्री चे आगमन

    Festival of Ganesh Chaturthi

    गणेशोत्सव 2025 : २,५०० पोलीस दल सज्ज – जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था कडक

    Festival of Ganesh Chaturthi (२७ ऑगस्ट २०२५) : चंद्रपूर – आज देशात विविध ठिकाणी गणरायाचे जल्लोषात आगमन झाले असून चंद्रपूर जिल्ह्यात एकूण १४ हजार ८३१ गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये खाजगी व घरगुती १२ हजार ९७५ गणेश मूर्ती, सार्वजनिक गणेश मूर्ती स्थापना लहान मंडळ ८७३, मोठे मंडळ ६१३ तर एक गाव एक गणपती ३७६, जिल्ह्यातील एकूण सार्वजनिक गणेश मूर्ती १ हजार ८४७ ठिकाणी विराजमान झाली आहे. गणेशोत्सव काळात जिल्ह्यात अप्रिय घटना घडू नये यासाठी २ हजार ५०० पोलीस अधिकारी, अंमलदार महिला/पोलीस सह १ हजार होमगार्ड्स पुढील ११ दिवस कर्तव्य बजावणार आहे. police deployment Chandrapur 2500 officers

    दारू दुकानाविरोधात २८ ऑगस्ट रोजी बेमुदत आमरण उपोषण

    चंद्रपूर जिल्ह्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी आज गणरायाचे आगमन करण्यात आले आहे. Ganpati peace prayers Chandrapur leaders

    महाराष्ट्र सदैव सुजलाम्-सुफलाम् राहो

    माजी मंत्री व आमदार मुनगंटीवार यांनी सहकुटुंब श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करून पूजन केले. ‘श्री’च्या आगमनाने संपूर्ण घर भक्तिभावाच्या दिव्य लहरींनी न्हाऊन निघाले. महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, दीन-दुर्बल व पीडित जनतेच्या कल्याणासाठी अखंड सेवा करण्याची शक्ती लाभो. महाराष्ट्र सदैव सुजलाम्-सुफलाम् राहो, अशी प्रार्थना श्री गणरायाच्या चरणी मुनगंटीवार यांनी केली.

    गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते वरोरा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात गणपती बाप्पाची विधिवत स्थापना करण्यात आली. यावेळी पारंपारिक पद्धतीने पूजा-अर्चा करून बाप्पाचे पूजन करण्यात आले. या मंगलमय प्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत मानस धानोरकर आणि पार्थ धानोरकर उपस्थित होते, ज्यामुळे या सोहळ्याला कौटुंबिक आणि उत्साहाचे स्वरूप आले होते.

    नागरिकांच्या आयुष्यात आनंदाची भरभराट होवो

    गणेश चतुर्थीच्या पावन दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणरायाचे मंगल आगमन झाले. यावर्षीचे हे ९५ वे वर्ष असून, जोरगेवार कुटुंबीयांनी १९३० पासून ही परंपरा जपली आहे. आता त्यांच्या चौथ्या पिढीने ही पवित्र परंपरा पुढे नेली आहे.

    सकाळी शुभ मुहूर्तावर संपूर्ण कुटुंबासह गणरायाची प्राणप्रतिष्ठा करून शास्त्रोक्त विधी-विधानानुसार पूजा-अर्चा करण्यात आली. गणेशाच्या मंगलमय आगमनाने घरात आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा नांदू दे, अशी प्रार्थना सर्वांनी केली.

    या पावन प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी गणरायाच्या चरणी सर्व शेतकऱ्यांना भरपूर पिके, चांगले उत्पन्न, निसर्गाची साथ आणि सुरक्षित भविष्य मिळावे, तसेचसर्व नागरिकांच्या जीवनात सुख-समृद्धी, आरोग्य, धनधान्य आणि आनंदाची भरभराट होवो अशी प्रार्थना केली

  • how to apply for a credit card । 💳 क्रेडिट कार्ड म्हणजे काय? संपूर्ण मार्गदर्शन

    how to apply for a credit card

    how to apply for a credit card : ३४ माहिती सेवा (२८ ऑगस्ट २०२५) -आजच्या डिजिटल युगात क्रेडिट कार्ड ही केवळ पेमेंट करण्याची सुविधा नसून आर्थिक सुरक्षितता आणि तातडीच्या गरजांमध्ये मदतीचा मोठा आधार आहे. योग्य वापर केला तर क्रेडिट कार्डमुळे तुमची क्रेडिट हिस्टरी (CIBIL Score) सुधारते, ज्यामुळे भविष्यात कर्ज घेणे सोपे होते.

    गृहकर्ज कसे घ्यायचे? जाणून घ्या पूर्ण माहिती


    🔹 क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

    क्रेडिट कार्ड हे बँक किंवा वित्तीय संस्थेकडून दिले जाणारे असे कार्ड आहे ज्यामध्ये तुम्ही ठराविक मर्यादेपर्यंत (Credit Limit) बँकेकडून पैसे उधार घेऊन खरेदी, बिल पेमेंट किंवा ऑनलाइन व्यवहार करू शकता. नंतर ठराविक कालावधीत (Billing Cycle) ती रक्कम परतफेड करावी लागते.


    🔹 क्रेडिट कार्डचे प्रकार

    1. स्टॅंडर्ड क्रेडिट कार्ड – दैनंदिन खरेदीसाठी
    2. रिवॉर्ड्स क्रेडिट कार्ड – खरेदीवर पॉइंट्स किंवा रिवॉर्ड्स मिळतात
    3. कॅशबॅक क्रेडिट कार्ड – खर्चावर ठराविक टक्केवारीने कॅशबॅक मिळतो
    4. ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड – फ्लाइट्स, हॉटेल बुकिंग, ट्रॅव्हल रिवॉर्ड्ससाठी फायदेशीर
    5. बिझनेस क्रेडिट कार्ड – व्यवसायिकांसाठी विशेष सुविधा
    6. सिक्योर्ड क्रेडिट कार्ड – फिक्स्ड डिपॉझिटवर आधारित, कमी CIBIL असणाऱ्यांसाठी

    🔹 क्रेडिट कार्डचे फायदे

    • कॅशलेस व्यवहार – रोख रक्कम बाळगण्याची गरज नाही
    • इमर्जन्सी मदत – अचानक खर्चासाठी सोपी सुविधा
    • रिवॉर्ड्स व कॅशबॅक – खरेदीवर अतिरिक्त फायदा
    • क्रेडिट स्कोअर सुधारणा – वेळेवर हप्ता भरल्यास कर्ज मिळणे सोपे
    • ऑनलाइन शॉपिंग व बिल पेमेंट्स सोपे credit card benefits

    🔹 क्रेडिट कार्ड वापरताना घ्यावयाची काळजी

    • खर्च आपल्या उत्पन्नानुसारच करा
    • Minimum Payment करून थांबू नका, पूर्ण रक्कम भरा
    • वेळेवर बिल भरावे, अन्यथा जास्त व्याज व दंड लागू शकतो
    • वारंवार कॅश विथड्रॉल टाळा – त्यावर जास्त शुल्क लागू होतं
    • क्रेडिट लिमिटचा 30-40% पेक्षा जास्त वापर करू नये

    🔹 क्रेडिट कार्डचे तोटे (जर योग्य वापर केला नाही तर)

    • जास्त व्याजदरामुळे कर्जाचा बोजा
    • उशिरा पेमेंटमुळे CIBIL Score खराब होतो
    • जास्त खर्चाची सवय लागू शकते
    • वार्षिक फी, हिडन चार्जेसचा फटका credit card interest rates

    🔹 क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता

    • वय 21 ते 60 वर्षे
    • नियमित उत्पन्नाचा पुरावा (Salary Slip/ITR)
    • चांगला CIBIL Score (700 पेक्षा जास्त)
    • आवश्यक कागदपत्रे: आधारकार्ड, पॅनकार्ड, पत्ता पुरावा, बँक स्टेटमेंट

    ✨ निष्कर्ष

    क्रेडिट कार्ड हा उत्तम आर्थिक साधन आहे, पण त्याचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. वेळेवर बिल भरल्यास आणि मर्यादित खर्च केल्यास ते तुमच्या भविष्यातील कर्जसुविधा व आर्थिक प्रगतीसाठी खूप फायदेशीर ठरते. अन्यथा चुकीच्या वापरामुळे कर्जाचे ओझे वाढू शकते.


  • How to take a home loan । स्वप्नातील घरासाठी बँकेकडून कर्ज घ्यायचंय? जाणून घ्या How to take a home loan

    How to take a home loan

    How to take a home loan : माहिती सेवा (२८ ऑगस्ट २०२५) स्वतःचं घर असावं ही प्रत्येकाची आयुष्यातील मोठी स्वप्नपूर्ती असते. परंतु घर खरेदीसाठी लागणारी मोठी रक्कम एकदम उपलब्ध करणे प्रत्येकासाठी शक्य नसते. अशावेळी गृहकर्ज (Home Loan) हा सर्वात सोपा व सुरक्षित पर्याय ठरतो. पण गृहकर्ज घ्यायचं कसं, कुठून सुरू करायचं आणि कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

    कामगारांच्या मुलांसाठी राज्य सरकारची शिष्यवृत्ती योजना


    1. गृहकर्जासाठी आवश्यक तयारी

    गृहकर्ज मिळवण्यापूर्वी काही प्राथमिक बाबींची तयारी करणे आवश्यक आहे:

    • तुमचा क्रेडिट स्कोअर (CIBIL Score) 750 पेक्षा जास्त असावा.
    • नियमित आयाचे स्त्रोत (Salary/Business Income Proof) असणे महत्त्वाचे.
    • तुमच्याकडे स्वतःची काही बचत असेल तर डाउन पेमेंट साठी सोपे पडते. mortgage interest rates

    2. योग्य बँक किंवा वित्तीय संस्था निवडणे

    • विविध बँका व हाउसिंग फायनान्स कंपन्या गृहकर्ज उपलब्ध करून देतात.
    • त्यांचे व्याजदर (Interest Rate), प्रोसेसिंग फी, व परतफेडीची मुदत (Tenure) यांची तुलना करा.
    • SBI, HDFC, ICICI, Axis, LIC Housing सारख्या संस्थांचे ऑफर्स तपासा.

    3. आवश्यक कागदपत्रांची तयारी

    गृहकर्ज अर्जासाठी खालील महत्त्वाची कागदपत्रे लागतात:

    • ओळखपत्र (Aadhar, PAN, Passport)
    • पत्त्याचा पुरावा (Electricity Bill, Rent Agreement)
    • पगारदारांसाठी: Salary Slips, Form 16, Bank Statements
    • व्यवसायिकांसाठी: ITR, GST Returns, Balance Sheet
    • घराच्या मालकीचे व प्रकल्पाशी संबंधित कागदपत्रे

    4. गृहकर्ज अर्ज प्रक्रिया

    1. बँकेकडे कर्जासाठी अर्ज करावा.
    2. कागदपत्रांची तपासणी व पडताळणी केली जाते.
    3. बँकेकडून तुमच्या कर्ज घेण्याची पात्रता (Loan Eligibility) निश्चित केली जाते.
    4. घराच्या किमतीनुसार कर्जाची रक्कम मंजूर केली जाते.
    5. मंजुरीनंतर बँक तुमच्या विक्रेत्याला थेट पैसे देते.

    5. व्याजदर व EMI बाबींची माहिती

    • गृहकर्जाचे व्याजदर फ्लोटिंग (बदलणारे) किंवा फिक्स्ड (ठरलेले) असू शकतात.
    • EMI (Equated Monthly Installment) कॅल्क्युलेटर वापरून तुमचा मासिक हप्ता किती येईल हे तपासा.
    • हप्ता तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 40-45% पेक्षा जास्त नसावा. mortgage interest rates today

    6. करसवलतीचे फायदे

    • Income Tax Act च्या कलम 80C अंतर्गत तुम्हाला मूळ रकमेवर सवलत मिळते.
    • Section 24(b) अंतर्गत व्याजरकमेवर सूट मिळते.
    • यामुळे गृहकर्ज घेतल्यावर कर बचतही होते.

    7. गृहकर्ज घेताना महत्त्वाच्या टिप्स

    • EMI वेळेवर भरा, अन्यथा CIBIL Score खराब होऊ शकतो.
    • कर्ज परतफेडीसाठी Auto-Debit / ECS सुविधा वापरा.
    • जास्तीत जास्त डाउन पेमेंट करा, म्हणजे EMI कमी येईल.
    • व्याजदर कमी झाल्यास बँक बदलण्याचा (Balance Transfer) पर्याय वापरा. average mortgage interest rate

    ✨ निष्कर्ष

    गृहकर्ज घेणे ही मोठी जबाबदारी असली तरी योग्य नियोजन, कागदपत्रांची तयारी आणि योग्य बँकेची निवड केली तर ते सहज शक्य आहे. स्वतःचं घर ही प्रत्येकासाठी आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी सर्व बाबींचा नीट अभ्यास करूनच पुढे जा.