Blog

  • protest against illegal mobile tower । मोबाईल टॉवर विरोधात शिवसेना आक्रमक, साखळी उपोषणाला सुरुवात

    protest against illegal mobile tower

    protest against illegal mobile tower : भद्रावती – १ सप्टेंबर २०२५ – भद्रावती तालुक्यातील गौतम नगर (स्नेहल नगर) परिसरात अनधिकृत मोबाईल टॉवरचे बांधकाम सुरू आहे. आधीच केवळ 100 मीटरच्या अंतरावर दोन मोबाईल टॉवर अस्तित्वात असून, आता तिसऱ्या मोबाईल टॉवरचे काम सुरू झाले आहे.

    चंद्रपुरात वाहतुकीच्या मार्गात बदल

    मोबाईल टॉवरमुळे निर्माण होणाऱ्या रेडिएशनचा सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. या धोक्याचा विचार करून नागरिकांनी वारंवार संबंधित शासकीय कार्यालयांकडे निवेदने दिली, परंतु अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही.

    शांततापूर्ण साखळी उपोषण

    म्हणूनच आजपासून शिवसेना तर्फे नगर परिषद भद्रावती समोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. हे आंदोलन पूर्णपणे शांततामय पद्धतीने राबवले जाणार असून, नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि अनधिकृत टॉवरचे काम तात्काळ थांबविणे ही शिवसेनेची व समस्त गौतम नगर (स्नेहल नगर) रहिवासी यांची प्रमुख मागणी आहे.

    👉 प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेना शिंदे गट उग्र आंदोलनाचा इशारा देत आहे.

  • Eco-friendly Ganesh Visarjan । कृत्रिम कुंडात 2917 गणेश मूर्तीचे विसर्जन

    Eco-friendly Ganesh Visarjan

    Eco-friendly Ganesh Visarjan : चंद्रपूर 1 सप्टेंबर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या 25 कृत्रिम कुंड व 3 फिरत्या विसर्जन कुंडात एकुण 2917 मूर्तींचे विसर्जन सोमवार 1 सप्टेंबरपर्यंत करण्यात आले आहे.

    बोगस मतदार व ६१ लाख रुपयांचा वाली कोण?

    शहरात दीड दिवस,दोन दिवस,पाच दिवसाच्या गणपतीचीही स्थापना करण्यात येत असल्याने त्या त्या दिवशी विसर्जन व्यवस्था सुरळीत ठेवण्याची गरज भासते. उत्‍सवादरम्‍यान होणारी गर्दी टाळण्‍याकरिता महापालिका प्रशासनातर्फे घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी झोननिहाय ‘फिरत्या विसर्जन कुंडांची’ व्यवस्था करण्यात आली आहे. सदर विसर्जन कुंड हे मनपा स्वच्छता विभागामार्फत नियमित स्वच्छ करण्यात येत असुन 25 निर्माल्य कलशांचीही स्वच्छता करण्यात येत आहे.  POP free ganesh idols immersion

    भक्तिमय वातावरणात बाप्पा ला निरोप

    या फिरत्या विसर्जन कुंडांसाठी झोननिहाय संपर्क क्रमांक महापालिकेद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मनपातर्फे पुरविण्यात आलेल्या या घरपोच सुविधेमुळे अत्यंत शांतीपूर्ण व भक्तिमय वातावरणात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत.उभारण्यात आलेल्या 25 कृत्रिम कुंडात 2835 तर फिरत्या विसर्जन कुंडात झोन क्रमांक 1 मध्ये 42, झोन क्रमांक 2 मध्ये 20, झोन क्रमांक 3 मध्ये 20 अश्या एकुण 82 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. यात एकही पीओपी मुर्ती आढळुन आली नाही.

    visarjan

     मागील वर्षी पीओपीच्या मुर्तींचा वापर न करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केले होते यंदाही श्रीगणेशोत्सवाच्या सुनियोजित आयोजनासाठी चंद्रपूर मनपा दक्ष असून भाविकांनीही पर्यावरणपुरक श्रीगणेशोत्सव संपन्न व्हावा याकरीता सहकार्य करण्याचे तसेच सर्व घरगुती व लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडातच करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. 


           


       

  • electoral fraud suspicion local news । बोगस मतदार व ६१ लाख रुपयांचा वाली कोण? – माजी आमदार सुभाष धोटे यांचा सवाल

    electoral fraud suspicion local news

    electoral fraud suspicion local news : चंद्रपूर १ सप्टेंबर २०२५ – देशपातळीवर कांग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे मत चोरचोरीच्या मुद्द्यावर वोटर अधिकार यात्रा सुरू केली आहे, देशातील भाजप सरकार हि मत चोरी करून सत्तेत बसली असा आरोप खासदार गांधी यांनी लावला. अश्याच मतचोरीच्या मुद्द्यावर माजी आमदार व कांग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी पत्रकार परिषद घेत जिल्हा प्रशासन व निवडणूक आयोगविरोधात नाराजी व्यक्त केली.

    सणासुदीच्या काळात चंद्रपुरातील मार्गात बदल

    चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदार संघात ६ हजार ८५३ बोगस मतदारांची नावे मतदार यादीत आली होती मात्र काही सजग नागरिकांनी हा मुद्दा उचलला, त्याला कांग्रेस पक्षाने साथ देत प्रशासनाला याबाबत तक्रार दिली. यासंदर्भात राजुरा तहसीलदार यांनी १९ ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती, मात्र त्या बोगस मतदाराची नोंदणी कुणी केली यावर अजूनही खुलासा झालेला नाही. 6853 fake voter registrations

    कारवाई थंडबस्त्यात

    विधानसभा निवडणुकीच्या काळात राजुरा विधानसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांच्या प्रचाराचे बॅनर, बिल्ले व इतर साहित्य सहित तब्बल ६१ लाख रुपयांची रोख २० नोव्हेम्बर रोजी मिळून आली होती, त्यावर तक्रार झाली, चौघांवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली मात्र अजूनही त्या प्रकरणाची चौकशी थंड बस्त्यात आहे. यावर माजी आमदार धोटे यांनी प्रशासनाला विचारणा केली मात्र तपास सुरु आहे असे सांगण्यात येते, पोलीस व जिल्हा प्रशासन सह निवडणूक आयोगाने आज पर्यंत यावर कारवाई केली नाही अशी माहिती धोटे यांनी दिली. Rajura bogus voters police complaint details

    त्याकरिता आम्ही याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा विचार करीत असल्याची माहिती धोटे यांनी दिली. ते पुढे म्हणाले कि राजुरा विधानसभा क्षेत्रात बोगस मतदारांची नोंदणी कुणी केली? यावर प्रशासनाकडे उत्तर नाही, ६१ लाखांची रोख रक्कम कुणाची याचा सुद्धा शोध प्रशासनाने घेतलेला नाही. याचा अर्थ मतचोरी हि चंद्रपूर जिल्ह्यात झाली आहे, पत्रकार परिषदेत खासदार प्रतिभा धानोरकर, कांग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, विनोद दत्तात्रय व सुनीता लोढिया उपस्थित होत्या.

  • Changes in traffic in Chandrapur city । चंद्रपूर शहरातील वाहतुकीत मोठे बदल : जाणून घ्या

    Changes in traffic in Chandrapur city

    Changes in traffic in Chandrapur city : चंद्रपूर, दि. 1 सप्टेंबर २०२५ : चंद्रपूर शहरात 5 सप्टेंबर रोजी ईद–ए–मिलाद निमित्त आयोजित जुलूस व रॅली तसेच 6 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

    आमदार सुधाकर अडबाले यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

    ईद–ए–मिलाद निमित्त 5 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासुन दुपारी 3 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी खालीलप्रमाणे वाहतूक वळविण्यात आली आहे.

    1. कोहिनूर ग्राउंड–दस्तगीर चौक –मिलन चौक–गांधी चौक– जयंत टॉकीज चौक –जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौक व प्रियदर्शनी चौक– जटपुरा गेट–कस्तुरबा रोडने कोहीनुर ग्राउंड पर्यंतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद ठेवण्यात येत आहे. तसेच सदरचा रस्ता नो पार्किंग झोन म्हणुन घोषित करण्यात येत आहे. 2. नागपुरकडुन शहरामध्ये जाणारी वाहने (जड वाहने वगळून)) घुटकाळा, श्री टॉकीज, पठाणपुरा परिसरात जायचे असल्यास जुना वरोरा नाका चौकातून उजवीकडे वळण घेऊन रामनगर– संत केवलराम चौक– सेंट मायकल स्कुल– सवारी बंगला चौक –नगिनाबाग ते चोर खिडकी मार्गे शहरात प्रवेश करतील. alternative routes for Chandrapur rally traffic

    3. शहरातील नागरिकांनी नागपुर, वणी, घुग्घुस, गडचांदूरकडे जाणाऱ्या प्रवाशांनी रहमतनगर, नगिनाबाग व इतर परिसरातून जाण्यासाठी बिनबा गेट– रहेमत नगर, दाताळा इत्यादी मार्गाचा अवलंब करावा. 4. बल्लारशा व मुलकडुन येणा–या वाहनांना (जड वाहने वगळून)) शहरामध्ये जायचे असल्यास बसस्टॅड–एलआयसी ऑफीस–बगड खिडकी मार्गे किंवा जुनोना चौकातून शहरामध्ये किंवा प्रसन्ना पेट्रोलपंप कडून बाबुपेठ मार्गे शहरात प्रवेश करता येईल.

    गणेश विसर्जनानिमित्त बदल

     : 6 सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहरामध्ये गणपती विसर्जन मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुक मार्गावर देखावे पाहण्याकरीता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रियदर्शनी चौक – जटपुरा गेट–कस्तुरबा चौक – गांधी चौक – जटपुरा गेट – रामनगर – संत केवलराम चौक– ईरइ नदी (रामसेतू पुल) या मुख्य मिरवणुकीच्या मार्गावरील रहदारीमध्ये 6 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता पासून ते 7 सप्टेंबर रोजीच्या सकाळी 6 वाजेपर्यंतच्या शहरातील वाहतुक खालीलप्रमाणे वळविण्यात येणार आहे. Changes in traffic in Chandrapur city

    1. गणेश विसर्जन मुख्य मिरवणुक सोहळा पार पड़ेपर्यत प्रियदर्शनी चौक

     – जटपुरा गेट–कस्तुरबा चौक – गांधी चौक – जटपुरा गेट – रामनगर रोड – संत केवलराम चौक– ईरइ नदी (रामसेतू पुल) हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्यात येत आहे. 2. नागपूर रोडने येऊन बल्लारशा किंवा मुलकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने हे प्रियदर्शनी चौककडे जाण्यास बंदी करून सर्व प्रकारची वाहने ही वरोरा नाका उड्डान पुल– सावरकर चौक ते बंगाली कॅम्प, मुल किंवा बल्लारशाकडे जातील. 3. मुल किंवा बल्लारशा कडुन नागपूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही बंगाली कॅम्प –सावरकर चौक –वरोरा नाका –नवीन उड्डाणपुल मार्गे नागपूरकडे जातील.

    4. नागपूरकडून शहरामध्ये जाणारी सर्व वाहने (जड वाहने वगळून) छोटा नागपुर मार्गे दाताळा चौक–देवाळा गांव–चोराळा टी पॉईट वरून बिनबा गेट किंवा पठाणपुरा गेट मधून शहरात प्रवेश करतील. 5. शहरातील नागरिकांनी नागपुर, वणी, घुग्घुस, गडचांदुरकडे जाण्याकरीता रहमत नगर, नगीनाबाग व इतर परिसरातुन जाण्यासाठी बिनबा गेट– चोराळा–दाताळा इत्यादी मार्गाचा अवलंब करावा. 6. बल्लारशा व मुल कडुन येणा–या सर्व वाहनांना (जड वाहने वगळून) शहरामध्ये जायचे असल्यास बस स्टॅड–एलआयसी ऑफीस–बगड खिडकी मार्गे किंवा जुनोना चौकातुन शहरामध्ये किंवा प्रसन्ना पेट्रोल पंप कडुन बाबुपेठ मार्गे शहरात फक्त अंचलेश्वर गेटपर्यंत प्रवेश करता येईल.

    ही ठिकाणे आहेत नो पार्कींग झोन व नो हॉकर्स झोन

     : 1. जटपुरा गेट ते कस्तुरबा चौकपर्यंत 2. जटपुरा गेट ते रामनगर रोड मार्गे रामसेतू पुलपर्यंत 3. जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौकपर्यंत 4. कस्तुरबा चौक ते गांधी चौक ते जटपुरा गेट 5. कस्तुरबा चौक ते अंचलेश्वर गेटपर्यंत 6. गांधी चौक ते मिलन चौक ते जोड देऊळपर्यंत 7. कस्तुरबा चौक ते जेल रोड चौक 8. दस्तगीर चौक ते मिलन चौक 9. मिलन चौक ते बजाज पॉलीटेक्नीक कॉलेज 10. हिंदी सिटी हायस्कुल ते रघुवंशी कॉम्प्लेक्सपर्यंत 11. मौलाना आझाद चौक ते जयंत टॉकीज 12. छोटा बाजार चौक ते पाताळेश्वर मंदीर. Chandrapur no parking zones during festivals

    नो–पार्किंग व नो– हॉकर्स झोन म्हणुन घोषित केल्याने मिरवणुक व वाहतूक मार्गावर नागरिकांनी, व्यवसायिकांनी तसेच गणेश विसर्जन भक्तांनी कोणत्याही प्रकारची वाहने पार्किंग/उभी करू नये. मुख्य मिरवणुक मार्गावर राहणाऱ्या रहिवाशांना स्वतःची पार्किंगकरीता जागा नसल्यास त्यांना आपली वाहने 1) जुबली हायस्कुलचे  पटांगण 2) महानगरपालीकेच्या बाजुला असलेली पार्किंग या ठिकाणी उभी करावी. Changes in traffic in Chandrapur city

    इतर ठिकाणांवरून येणा–या नागरिकांसाठी येथे आहे पार्किंग व्यवस्था : 1. चांदा क्लब ग्राउंड 2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, वरोरा नाका 3. सेंट मायकल हायस्कुल, नगीनाबाग 4. सिंधी पंचायत भवन, संत केवलराम चौक जवळ रामनगर 5. व्यायाम शाळा ग्राउंड, पठानपुरा चौक 6. डी.एड. कॉलेज ग्राउंड बाबुपेठ 7 महाकाली मंदीर ग्राउंड, चंद्रपुर

    जुलूस रॅली तसेच विसर्जन मिरवणूक काढणा–या सर्व मंडळांनी तसेच नागरिकांनी देखील वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे. कोणीही तरतुदीचे उल्लघंन केल्यास ते कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहतील, असे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी निर्गमित केले आहे. Changes in traffic in Chandrapur city

  • scrub typhus prevention tips during monsoon । स्क्रब टायफसचा प्रादुर्भाव, पावसाळ्यातील धोका!

    scrub typhus prevention tips during monsoon

    scrub typhus prevention tips during monsoon : चंद्रपूर 1 सप्टेंबर – किटकजन्य आजारांतील स्क्रब टायफस हा जीवाणूमुळे होणारा व माईट्सद्वारे प्रसारित होणारा आजार आहे. याला बुश टायफस असेही म्हणतात. ओरिएंटल सुत्सुगामुशी जीवाणू संक्रमित चिगर (माईट्सच्या अळ्या) द्वारे प्रसारित होतो.पावसाळ्यात स्क्रब टायफसचे रुग्ण आढळून येतात. स्क्रब टायफस या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी अधिक सतर्क राहून सर्व प्रकारच्या उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नयना उत्तरवार यांनी सांगितले.

    आमदार सुधाकर अडबाले अधिकाऱ्यांवर संतापले

    स्क्रब टायफसचा प्रसार कसा होतो?

    संक्रमित चिगर्स (माइट्सची अळी) जेव्हा मानवी त्वचेवर चावतात, तेव्हा जीवाणू रक्ताभिसरण प्रणालीमध्ये प्रवेश करतात आणि पुनरुत्पादन करतात, ज्यामुळे आजाराची लक्षणे दिसू लागतात.पावसाळ्याच्या काळात या आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. early signs of scrub typhus eschar

    प्रतिबंधात्मक उपाययोजना –

    स्क्रब टायफसची लक्षणे आढळल्यास किंवा ताप आल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे.
    पूर्ण बाह्यांचे व शरीर पूर्ण झाकले जाईल असे कपडे घालावेत.
    घरात व परिसरात पाणी साचू देऊ नये.
    आजुबाजूची स्वच्छता राखावी.
    शेतात व जंगलात काम करणाऱ्या मजुरांनी कपडे धुऊन, उन्हात वाळवून वापरावेत.
    गरज भासल्यास परिसरात तणनाशक, किटकनाशकाची फवारणी करावी.
    उंदीर नियंत्रणाची उपाययोजना करावी.

    स्क्रब टायफसची लक्षणे –

    ताप येणे (६ ते २१ दिवसांच्या आत)
    डोकेदुखी
    स्नायू दुखणे
    शरीरात कंप सुटणे
    मळमळ, उलटी
    थंडी वाजून ताप येणे
    घशात दुखणे
    कोरडा खोकला
    श्वसनास त्रास होणे
    जुलाब, गॅस्ट्रिक, सूज
    लसिकाग्रंथी सुजणे
    साखर, मूत्रामध्ये प्रथिने आढळणे
    गंभीर अवस्थेत: गोंधळ, संभ्रम, फिट्स, रक्तदाब कमी होणे, शुद्ध हरपणे

    स्क्रब टायफसचे निदान –

    स्क्रब टायफसचे निदान करण्यासाठी रक्त जल तपासणी करण्यात येते. प्रभावी उपचारांसाठी अचूक आणि वेळेवर निदान महत्त्वाचे आहे. रुग्णांचे चिन्ह, बाहय लक्षणांवरून आणि रुग्णाच्या वास्तव्य इतिहासाची तपासणी केली जाते. चिगर चाव्याच्या ठिकाणी व्रण असणे एक महत्वपूर्ण लक्षण आहे. scrub typhus recovery

    उपचार – 

    स्क्रब टायफसचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी तातडीने वेळेवर उपचार करणे महत्वाचे आहे. प्रतिजैविके (Antibiotics) थेरेपी हा उपचाराचा आधारस्तंभ आहे. याकरिता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. रुग्णास येणारा अचानक ताप, शरीरातील कमी होणारी पाण्याची मात्रा यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. उपचार न केल्यास किंवा उपचारास उशीर झाल्यास स्क्रब टायफसमुळे गंभीर गुतागुंत होऊ शकते, ज्यापैकी काही जीवघेणी असू शकतात. नागरिकांनी सतर्क राहून लवकर निदान, वेळीच उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास हा आजार पूर्णपणे टाळता व नियंत्रणात ठेवता येणे शक्य असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नयना उत्तरवार यांनी सांगितले.

  • Ashram school administrative mismanagement । शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

    Ashram school administrative mismanagement

    Ashram school administrative mismanagement : चंद्रपूर : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा “समस्या तुमच्या, पुढाकार आमचा” या उपक्रमाअंतर्गत संघटनेचे प्रांतीय सरकार्यवाह तथा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विजाभज आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची समस्या निवारण सभा दि. २९ ऑगष्ट २०२५ रोजी डॉ. सचिन मडावी‚ सहा. संचालक चंद्रपूर यांचे कार्यालयात पार पडली. सभेदरम्यान या कार्यालयात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आल्यामुळे आमदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

    स्व. वसंतराव नाईक प्राथ. आश्रमशाळा दमपुर मौदा शाळेतील गैरकारभार-

    आश्रमशाळा दमपुर मोहदा ता. जिवती शाळेतील निवृत्त कर्मचारी सरूबाई राठोड यांचे सेवाकालावधीत संस्थेने आयुष्यभर आर्थिक व मानसिक शोषण केले. निवृत्त होऊन दीड वर्ष झाले, तरी त्यांचा पेन्शन प्रस्ताव टाकला नाही. महत्वाची बाब म्हणजे या शाळेला मागील तीन वर्षापासून नियमित किंवा प्रभारी मुख्याध्यापकच नाही. शाळेत पुर्णपणे अनागोंदी कारभार सुरू आहे. प्रत्यक्ष हजर राहून सरूबाईंनी ही माहिती दिली. आमदार सुधाकर अडबाले यांनी या गलथान कारभारासाठी संस्थाचालकांसह अधिकार्‍यांना दोषी ठरवून झालेल्या अनियमिततेबाबत शासनाकडे तक्रार करून शाळेवर प्रशासक लावण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. Salary delays in tribal schools

    समायोजन प्रक्रियेतील अनियमितता-

    जिल्ह्यातील समायोजन प्रक्रियेत फार मोठा घोळ असून १८ अतिरिक्त शिक्षकांपैकी ५ शिक्षक हे समायोजित शाळेत रुजू झालेच नाही तर २ शिक्षकांना संस्थांनी रुजू करून घेतले नाही. शासन परिपत्रक दिनांक ८ मार्च २०१८ नुसार समायोजित शिक्षकांनी १५ दिवसात समायोजित शाळेत रुजू न झाल्यास सेवेतील हक्क संपुष्टात येतो. ३ महीने कालावधी झाला तरी हे शिक्षक रुजू झाले नाही. मात्र, या शिक्षकांवर कोणतीही कारवाई न करता अधिकार्‍यांनी त्यांना पाठीशी घातले असून त्यांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त होत आहे.

    शिक्षक रुजू न झाल्याने विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे व शासनास या अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. आदेशाचे पालन न करणार्‍या शिक्षकांना तात्काळ समायोजित शाळेत रुजू होण्याच्या सूचना आमदार महोदयांनी केल्या असून जिल्ह्यात कोणतीही अनियमितता खपवून घेणार नाही, असे खडे बोल आमदार सुधाकर अडबाले यांनी सहा. संचालकांना सुनावले. Vidarbha tribal ashram school pension backlog

    अम्मा कि पढाई उपक्रम पुन्हा सुरु

    आरक्षित जागेवर खुल्या प्रवर्गातील शिक्षकाचे समायोजन-

    रविंद्र ठमके या शिक्षकाचे २०२३ मध्ये आरक्षित जागेवर केलेल्या कायम समायोजनामुळे आरक्षण कायदा २००४ कलम ४ चे उल्लंघन झाले असून हा नियमाप्रमाणे दंडनीय अपराध आहे. हे नियमबाह्य समायोजन रद्द करण्याचा आदेश प्रधान सचिवांनी दिनांक २०/०८/२०२४ ला दिला असून आजतागायत यावर कार्यवाही झाली नाही, त्यामुळे आमदारांनी सहा. संचालकांना धारेवर धरले असून हे नियमबाह्य समायोजन चोवीस तासात रद्द करण्याचे आश्वासन सहा. संचालकांनी सभेत दिले. Compassionate appointment guideline

    या व्यतिरिक्त विभागाचा शासननिर्णय दिनांक ४ जून २०२५ नुसार विजाभज आश्रमशाळेतील पात्र शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती लाभ व प्रोत्साहन भत्ता प्रलंबित थकबाकी तात्काळ अदा करण्यात यावी, कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित करून अकारण वेतनवाढ गोठवणार्‍या संस्था/मुख्याध्यापकांवर कारवाई अग्रेसित करणे, जिल्ह्याबाहेर झालेले प्राथमिक शिक्षकांचे समायोजन रद्द करून शासन परिपत्रकानुसार जिल्ह्यातच इयत्ता ६ ते ८ वी मध्ये रिक्त जागांवर करणे, प्रलंबित भ.नि.नि. / डिसीपीएस हिशोबचिठ्या तात्काळ वितरित करणे, कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती, वरिष्ठ/निवड श्रेणी, वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्ताव, अनुकंपा व निवृत्ती वेतन प्रस्ताव सेवा हमी कायद्यानुसार ४५ दिवसाच्या आत मार्गी लावणे, जिल्ह्यातील सर्व कर्मचार्‍यांची सेवापुस्तस्के अद्ययावत करून पडताळणी करून घेणे, माहे जुलै २०२४ पासून प्रलंबित १% घरभाडे भत्ता फरक तात्काळ अदा करणे, या प्रमुख मागण्यांसह अनेक विषयांवर चर्चा झाली.

    सदर समस्या निवारण सभेकरिता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आश्रमशाळा विभागाचे जिल्हा अध्यक्ष दिनेश चौधरी, कार्यवाह किशोर नगराळे, वि.मा.शि. संघाचे जिल्हा कार्यवाह दीपक धोपटे, महानगर अध्यक्ष दिगंबर कुरेकर, महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, संघटनेचे पदाधिकारी श्रीहरी शेंडे, केशव ठाकरे, डॉ. विजय हेलवटे, पद्माकर वनकर, राज्यपाल बोरकर, वसंत कोंडेकर इतर आश्रमशाळा पदाधिकारी व समस्याग्रस्त शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. Ashram school administrative mismanagement

  • Amma Ki Padhai competitive exam guidance । ‘अम्मा कि पढ़ाई’ उपक्रम पुन्हा सुरू—284 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत मार्गदर्शन!

    Amma Ki Padhai competitive exam guidance

    Amma Ki Padhai competitive exam guidance : चंद्रपूर ३१ ऑगस्ट २०२५ – आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला अम्मा कि पढाई उपक्रम पुन्हा नव्याने रेडक्रॉस भवन येथे सुरू करण्यात आला. या उपक्रमांतर्गत 284 प्रतिभावंत, गरीब व गरजूं विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी निशुल्क मार्गदर्शन मिळणार आहे. रविवारी या उपक्रमाचा शुभारंभ आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आला. अम्माच्या आशीर्वादाने हा उपक्रम पुन्हा सुरू होत असल्याचा मला आनंद आहे, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.

    आरक्षण वाचविण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण

    या कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू विजय आईंचवार, रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप रामटेके, सचिव गण्यारपवार, अजय जयस्वाल, अम्मा कि पढाई फाऊंडेशनचे उपाध्यक्ष संजय बेले, सचिव सुमित बेले, विश्वस्त नायब तहसीलदार प्रतिक बोडे, चंदु वासाडे, प्रसाद जोरगेवार, पोलिस उपनिरीक्षक अनिल देरकर, भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री मनोज पाल, सविता दंढारे, तुषार सोम, विमल कातकर, कौसर खान आदी मान्यवर उपस्थित होते. Amma Ki Padhai relaunched at RedCross building

    free coaching amma ki padhai

    यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, काही काळ हा उपक्रम थांबला होता. तेव्हा खरंच अंतःकरणाला दुःख होत होतं. विद्यार्थ्यांची स्वप्नं, त्यांचा उत्साह आणि उर्मी यांना थोडा विराम मिळाल्यासारखं वाटलं. पण आज अम्मा कि पढाई पुन्हा सुरू होत आहे, हीच माझ्यासाठी खरी आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. अम्माच्या आशीर्वादाने आणि समाजाच्या विश्वासाने हा प्रवास पुन्हा नव्या जोमानं पुढे नेण्याचा निर्धार केला आहे.

    हेच विद्यार्थी उद्या अधिकारी म्हणून जिल्ह्याचे आणि देशाचे नेतृत्व करतील

    ते पुढे म्हणाले, शिक्षण हेच व्यक्तीला आयुष्यातील खरी ताकद देणारे साधन आहे. कुटुंबाची, गावाची आणि समाजाची उन्नती शिक्षणाशिवाय शक्य नाही. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी होण्यासाठी मोफत मार्गदर्शनाची संधी मिळावी, या हेतूने या उपक्रमाची सुरुवात केली. आज 284 विद्यार्थी या उपक्रमाचा भाग होत आहेत. हेच विद्यार्थी उद्या अधिकारी म्हणून जिल्ह्याचे आणि देशाचे नेतृत्व करतील, ही खात्री आहे. Amma Ki Padhai competitive exam guidance

    या उपक्रमाचा उद्देश केवळ शिक्षण देणे नसून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, चिकाटी व समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा जागवणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा उपक्रम थांबवताना वेदना झाल्या; पण या काळात अनेकांनी प्रोत्साहन दिले. विशेषतः रोटरी क्लबने हॉल उपलब्ध करून मोठे सहकार्य केले. येथून पुन्हा नव्या जोमाने आम्ही हा उपक्रम पुढे नेणार आहोत. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, वेळेचे महत्त्व आणि मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस करावे. विद्यार्थ्यांच्या पाठीशी पालक, शिक्षक आणि समाज आहे. की अम्मा कि पढाई उपक्रमाचा विस्तार करून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची ज्योत पोहोचवू, असे आमदार जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांची उपस्थिती होती. 

  • National OBC Federation hunger strike । OBC आरक्षणावर घोंगावणारे संकट? नागपूरमध्ये National OBC Federation चे उपोषण सुरू

    National OBC Federation hunger strike

    National OBC Federation hunger strike : नागपूर ३१ ऑगस्ट २०२५ – मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत 29 ऑगस्ट पासून आंदोलन सुरू केले आहे. त्याविरोधात मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत ओबीसी मधून आरक्षण सरकारने देऊ नये यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने 30 ऑगस्ट पासून नागपूर येथील संविधान चौकात बेमुदत साखळी उपोषण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे , महासचिव सचिन राजुरकर याचे प्रमुख उपस्थितीत सुरू केले आहे.

    वन जिमिनीवर अतिक्रमण, पट्टे मिळणार – माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार

    तोपर्यंत महासंघाचे साखळी उपोषण सुरूच राहणार

    आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. यापूर्वी 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत ओबीसी मधून आरक्षण दिले जाणार नाही असे लिखित दिले होते. पुन्हा एकदा शासनाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाला मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणार नाही असे लिखित देऊन महासंघाला आश्वस्त करावे तोपर्यंत महासंघाचे साखळी उपोषण सुरूच राहणार आहे. Maharashtra OBC protest August 2025

    30 ऑगस्ट रोजी संविधान चौकात सुरू झालेल्या साखळी उपोषणात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नामदेवराव भुयारकर, राजाभाऊ चिलाटे, गणेश नाखले,राजेंद्र काकडे, वसंतराव राऊत, हेमंत गावंडे, केशव शास्त्री, लहू राक्षे हिंगोली, चंद्रकांत हिंगे, राजू गोस्वामी, रंगराव गेचोडे इत्यादींचा सहभाग आहे. National OBC Federation hunger strike

    आज या साखळी उपोषणाला आमदार अभिजीत वंजारी , आमदार प्रवीण दटके, गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार अशोक नेते, माजी नगरसेवक रमेश भुरसे, प्रकाश गेडाम, माजी नगरसेवक रमेश शिंगारे, गडचिरोली जिल्ह्याचे सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, प्राचार्य अशोक जीवतोडे, बबलू कटरे, वीरेंद्र गोतमारे,प्राचार्य चिकटे, विकास गौर, शंकर मौलिया, सतीश इटकेलवार , माजी नगरसेवक नाना झोडे, भरतराव केंद्रे बीड, गडचिरोलीचे माजी भाजप जिल्हाध्यक्ष तथा ओबीसी नेते प्रशांत वाघरे, भास्कर बुरे, अनिल पोहनकर, रत्नदीप म्हशाखेत्री, गणेश दहेलकर , भाविक आभारे, शेषराव कोहळे आकाश सातपुते, विलास भांडेकर वडसा येथील महेश झरकर,

    दिगंबर चौधरी,सुनिल पारधी, वसंतराव दोनाडकर हिरालाल शेंडे कैलास पारधी, रोशन ठाकरे नेताजी तुपट, शंकर पारधी, दीपक प्रधान , गोपाल दरवे, आदित्य मिसार, ॲड राजू शेंडे,विजय आगलावे,सतीश तांबे, तुकाराम धोबे, एडवोकेट अभिजीत जीकार, दिगंबर चौधरी, मटाले सर आदीनी उपोषण मंडपाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या उपोषणाला तिरळे कुणबी समाज , तेली समाज संघटना , ओबीसी संघर्ष समिती गोंदिया, ओबीसी समाज संघटना नागभिड,रिपब्लिकन आठवले गटाने पाठिंबा दिला आहे. OBC Federation demands Maharashtra

    राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रमुख मागण्या

    • मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये तसेच सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये
    • अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी
    • ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमात शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी
    • परदेशी शिष्यवृत्तीसाठी 75 विद्यार्थ्यांची संख्या वाढवून 200 विद्यार्थी करण्यात यावी
    • महा ज्योती या संस्थेकरिता एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी
    • माडा व सिडको तर्फे बांधून देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत ओबीसींना आरक्षण लागू करण्यात यावे
    • नागपूर येथे तयार असलेले उच्च व तंत्र विभागाचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त बांधलेले 200 मुलींचे तयार वस्तीगृह तसेच नागपूर येथे स्वर्गीय वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार असलेले 200 मुलांचे वस्तीगृह ओबीसी, व्ही जे,एनटी,एसबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहासाठी ओबीसी बहुजन कल्याण विभागाकडे हस्तांतरित करण्यात यावे. National OBC Federation hunger strike
    • ओबीसी विजा , भज व विमाप्र समुदायातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची तीन वर्षापासून प्रलंबित असणारी फेलोशि त्वरित अदा करण्यात यावी या मागण्यासह 14 मागण्या महाराष्ट्र शासनाला करण्यात आल्या आहेत.

    या आंदोलनासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रा शेषराव येलेकर , कोषाध्यक्ष गुणेश्वर आरीकर, परमेश्वर राऊत, शरद वानखेडे, शंकर मौर्य , निखिल भुते, नाना झोडे, विनोद इंगोले, वृषभ राऊत राहुल करांगडे, निलेश कोढे, दीपक कारेमोरे, कवडू लोहकरे, आदीचे सहकार्य लाभले.

  • Additional Superintendent of Police Birthday । भव्य रक्तदान शिबिरातून साजरा झाला अप्पर पोलीस अधीक्षक कातकडे यांचा वाढदिवस

    Additional Superintendent of Police Birthday

    Additional Superintendent of Police Birthday : चंद्रपूर- जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक मा.श्री.ईश्वर कातकडे साहेब यांच्या जन्मदिवसानिमित्त पोलीस मुख्यालय मधील ड्रिल शेड मध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

    सायबर क्राईम बाबत छोटूभाई पटेल हायस्कुल मध्ये मार्गदर्शन

    या आयोजनाला चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी आरसीपी चे जवान महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाचे पदाधिकारी यांच्याकडून रक्तदान शिबिरांमध्ये रक्तदान श्रेष्ठदान या तत्त्वावर रक्तदान करण्यात आले. Maharashtra Police Boys Association

    पोलीस अधिकाऱ्यांनी केले रक्तदान

    महाराष्ट्र पोलीस दल चंद्रपूर जिल्हा मधील अप्पर पोलीस अधीक्षक मा.श्री.ईश्वर कातकडे साहेब यांनी सुद्धा आपले स्वतःचे रक्तदान केले.तसेच मा.श्री. महेश कोंडावार, होम साहेब, चंद्रपूर मा.श्री. नवघरे साहेब, पोलीस मुख्यालय, राखीव पोलीस निरीक्षक यांनी सुद्धा आपले अमूल्य रक्तदान केले. यादरम्यान महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.राहुल भैय्या अर्जुनराव दुबाले यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष मा.श्री.आरती ताई सुधीर जांगळे यांची प्रमुख उपस्थिती लागली होती तसेच विदर्भातून विविध जिल्ह्यातून पदाधिकारी यांचे सुद्धा अमूल्य रक्तदान व उपस्थिती लाभली. police blood donation camp Chandrapur

    maharashtra police boys association

    त्यामध्ये विदर्भाचे सल्लागार मा.श्री.संतोषजी पुंडकर भंडारा जिल्हा अध्यक्ष चेतनदादा शर्मा अकोला जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.गौरवदादा अशोकराव सपकाळ व संपूर्ण जिल्ह्यातील संघटनेचा परिवार उपस्थित होता. संपूर्ण शिबिराचे आयोजक चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मा.श्री.परमेश्वर बळीराम चव्हाण ह्यांनी राहुल भैय्या अर्जुनराव दुबाले यांच्या प्रमुख नेतृत्वात कार्यक्रम पार पाडला.

    यावेळी महाराष्ट्र पोलीस दल चंद्रपूर चे अधिकारी अंमलदार व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे महिला आघाडी अध्यक्ष शीला दिलीप जाधव युवक आघाडी अध्यक्ष विशाल राठोड मयूर घोटकर विद्यार्थी आघाडी अध्यक्ष रोहित दुरतकर विजय चव्हाण संघटक राहुल पोद्दार सोशल मीडिया प्रमुख मानव झाडे दिलीप जाधव प्रफुल मानकर कृष्णा मेश्राम भूपेंद्र जाधव महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

  • sip mutual fund investment । फक्त ₹500 पासून सुरू करा SIP Mutual Fund Investment आणि स्वप्नं पूर्ण करा!

    sip mutual fund investment

    sip mutual fund investment : मराठी वृत्त ३० ऑगस्ट २०२५ – आजच्या काळात बचत करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ती बचत योग्य प्रकारे गुंतवणे देखील महत्त्वाचे आहे. आर्थिक नियोजनाचा विचार करताना, अनेक सामान्य गुंतवणूकदारांसाठी SIP (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हा एक अत्यंत सोपा आणि प्रभावी मार्ग ठरत आहे. एसआयपी म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये ठराविक कालावधीनंतर, ठराविक रक्कम पद्धतशीरपणे गुंतवण्याची एक सोपी पद्धत.


    SIP म्हणजे काय?

    एसआयपी हा एक गुंतवणुकीचा मार्ग आहे, ज्यात तुम्ही दर महिन्याला किंवा ठराविक अंतराने एक निश्चित रक्कम म्युच्युअल फंडामध्ये गुंतवता. ही पद्धत शेअर बाजारातील चढ-उतार विचारात न घेता काम करते. यामुळे बाजाराच्या स्थितीचा तुमच्या गुंतवणुकीवर फारसा परिणाम होत नाही. तुम्ही फक्त रु. ५०० पासून सुद्धा एसआयपी सुरू करू शकता. sip mutual fund investment

    होमलोन घ्यायचं? जाणून घ्या सोप्या भाषेत माहिती


    गुंतवणूक कुठे व कशावर आधारित करावी?

    गुंतवणूक करताना मुख्यत्वे दोन गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे: जोखीम स्वीकारण्याची क्षमता (Risk Appetite) आणि आर्थिक उद्दिष्टे (Financial Goals).

    १. तुमचे उद्दिष्ट ठरवा:

    • लघु-मुदतीची उद्दिष्टे (१-३ वर्षे): जर तुम्हाला कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल, तर लिक्विड फंड्स किंवा अल्ट्रा शॉर्ट-ड्यूरेशन फंड्स चांगले पर्याय आहेत. यात जोखीम कमी असते.
    • मध्यम-मुदतीची उद्दिष्टे (३-५ वर्षे): यासाठी संतुलित (Balanced) किंवा हाइब्रिड फंड्स योग्य आहेत. हे फंड्स इक्विटी आणि डेब्ट दोन्हीमध्ये गुंतवणूक करतात, ज्यामुळे जोखीम आणि परताव्याचा समतोल राखला जातो.
    • दीर्घ-मुदतीची उद्दिष्टे (५ वर्षांपेक्षा जास्त): मुलांचे शिक्षण, निवृत्ती नियोजन किंवा घर खरेदी यासाठी इक्विटी फंड्स (Equity Funds) सर्वोत्तम आहेत. यात जोखीम जास्त असली तरी, दीर्घ काळात चांगला परतावा मिळण्याची शक्यता खूप जास्त असते.

    २. जोखीम समजून घ्या:

    • कमी जोखीम (Low Risk): जे लोक शेअर बाजारातील अस्थिरता सहन करू शकत नाहीत, त्यांनी डेट फंड्स किंवा लिक्विड फंड्समध्ये गुंतवणूक करावी.
    • मध्यम जोखीम (Moderate Risk): जे थोडी जोखीम घेऊन चांगला परतावा मिळवू इच्छितात, त्यांनी लार्ज कॅप किंवा मल्टी-कॅप फंड्सचा विचार करावा.
    • जास्त जोखीम (High Risk): जे दीर्घ मुदतीसाठी जास्त जोखीम घेऊ शकतात, त्यांनी मिड-कॅप, स्मॉल-कॅप किंवा सेक्टर-आधारित फंड्समध्ये गुंतवणूक करावी. sip mutual fund investment

    SIP चे फायदे:

    • पद्धतशीर गुंतवणूक: दर महिन्याला थोडी रक्कम गुंतवल्याने तुमच्या आर्थिक शिस्त लागते.
    • जोखीम कमी होते: बाजाराच्या सरासरी मूल्यानुसार गुंतवणूक होते, ज्यामुळे किंमतीतील चढ-उतारांचा धोका कमी होतो.
    • चक्रवाढ व्याजाचा फायदा (Power of Compounding): दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास तुमच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यावरही परतावा मिळत जातो, ज्यामुळे संपत्ती वेगाने वाढते.
    • लवचिकता: तुम्ही कधीही एसआयपी थांबू शकता, रक्कम वाढवू किंवा कमी करू शकता. how to start SIP

    गुंतवणूक कशी सुरू करावी?

    • आर्थिक सल्लागाराची मदत घ्या: तुमच्या उद्दिष्ट्यांनुसार योग्य फंड निवडण्यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता.
    • डिजिटल प्लॅटफॉर्म: आजकाल झिरोधा (Zerodha), ग्रो (Groww) यांसारख्या ॲप्सद्वारे तुम्ही सहजपणे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही कागदपत्रे (पॅन कार्ड, आधार कार्ड) लागतील.

    थोडक्यात, एसआयपी हा सामान्य गुंतवणूकदारांसाठी एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे, जो योग्य नियोजन आणि शिस्तीने दीर्घकाळात तुमची आर्थिक स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करतो. योग्य फंड निवडून आणि नियमित गुंतवणूक करून तुम्ही भविष्यासाठी मजबूत आर्थिक पाया तयार करू शकता.