Chandrapur bridge collapse due to heavy rain : चंद्रपूर : चंद्रपुरातील पठाणपुरा ते भिवापूर वॉर्डला जोडणारा झरपट नदीवरील पूल जोरदार पावसामुळे वाहून गेल्याने, स्थानिक MP Pratibha Dhanorkar खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पत्र पाठवून पुलाची उंची वाढवून नव्याने बांधकाम करण्याची सूचना केली आहे.
हा पूल कोसळल्यामुळे पठाणपुरा आणि भिवापूर या दोन महत्त्वाच्या वॉर्डमधील नागरिकांचा थेट संपर्क तुटला आहे. यामुळे बाबुपेठ आणि भिवापूर वॉर्डमधून पठाणपुरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत आहे. पायी चालणेही शक्य नसल्यामुळे, नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात वाढली आहे. Chandrapur bridge collapse news
भाविकांसाठीही अत्यंत महत्त्वाचा
या संदर्भात बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, “हा पूल केवळ वाहतुकीसाठीच नाही, तर चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली यांच्या यात्रेदरम्यान भाविकांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावरून मोठ्या संख्येने वाहतूक वळवली जाते, त्यामुळे हा पूल तातडीने आणि सुरक्षितपणे बांधणे आवश्यक आहे.”
त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्तांना या गंभीर समस्येची दखल घेऊन, युद्धपातळीवर पुलाचे बांधकाम सुरू करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होईल आणि आगामी काळात महाकाली यात्रेदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.
tiger kills farmer near canal : सावली ४ सप्टेंबर २०२५ : वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पाथरी उपवन क्षेत्रातील असोला मेंढा नहराला लागून असलेल्या शेतात निंदण करीत असलेल्या शेतकऱ्याला वाघाने उचलून नेऊन ठार केल्याची घटना गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेमुळे प्रचंड खळबळ माजलेली आहे.
पाथरी येथील पांडुरंग भिकाजी चचाने हे शेतकरी आपल्या विरखल रोड लगत असलेल्या असोला मेंढा नहराला लागून असलेल्या शेतात सकाळी निंदनचे काम करीत असतानाच तिथे वाघाने सदर शेतकऱ्याला उचलून नेऊन ठार केल्याची खळबळ जनक घटना घडलेली आहे. सदर घटनेची माहिती वन परिक्षेत्र विभागाला व पोलीस विभागाला देण्यात आलेली आहे.
याच परिसरात वाघीनेने पिलांना दिला जन्म
सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे व त्यांची चमूने घटनास्थळ गाठून पंचनामा केला, याच परिसरात वाघीनेने पिलांना जन्म दिल्याची माहिती मिळत असून विरखल परिसरात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ऐन शेतीच्या हंगामात वाघाचा धुमाकूळ सुरू झाल्याने शेतकरी भयभीत झाल्याने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
Ravindra Shinde assault complaint after election : भद्रावती ४ सप्टेंबर २०२५ – शिवसेना उबाठा मधून भाजपवासी झालेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष यांनी भद्रावती मधून कांग्रेस व उबाठा ला हद्दपार करीत आहे, अश्यातच भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपची सत्ता शिंदे यांच्या नेतृत्वात ३ सप्टेंबर रोजी आली. कांग्रेसमधून भाजपात आलेले राजेंद्र डोंगे बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान झाले. मात्र हि निवड प्रक्रिया संपताच उबाठा समर्थक ज्ञानेश्वर डुकरे यांनी रविंद्र शिंदे विरुद्ध मारहाणीचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
३ सप्टेंबर रोजी बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली यावेळी भाजपकडून राजेंद्र डोंगे तर त्यांच्याविरुद्ध ज्ञानेश्वर डुकरे यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला, डुकरे यांचा तब्बल १३ मतांनी पराभव झाला. निवड प्रक्रिया झाल्यावर भास्कर ताजने सोबत ज्ञानेश्वर डुकरे चर्चा करीत असताना सीडीसीसी बँक अध्यक्ष रविंद्र शिंदे त्याठिकाणी आले आणि डुकरे यांना शिवीगाळ करीत तू आमच्या विरोधात अर्ज का दाखल केला असे म्हणत गालावर झापड मारली अशी तक्रार भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये डुकरे यांनी शिंदे विरोधात दाखल केली. APMC election Bhadrawati BJP
आरोप फेटाळले
यावर रविंद्र शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि माझ्यावर केलेला मारहाणीचा आरोप खोटा आहे, असा प्रकार त्याठिकाणी घडलेला नाही. लोकशाही मध्ये कुणीही अर्ज दाखल करू शकतो त्यावर आक्षेप घेण्यासारखं काय?
शिवसेना मधून शिवसेना वेगळी झाल्यावर रविंद्र शिंदे यांनी शिवसेना उबाठा ला वरोरा विधानसभा क्षेत्रात नवसंजीवनी देण्याचे काम केले, विशेष बाब म्हणजे आपल्या नेतृत्वात त्यांनी बाजार समिती निवडणूकित विरोधकांची धोबीपछाड करीत एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र कालांतराने राजकीय समीकरणे बदलली आणि शिंदे भाजपात गेले व थेट मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. अश्यात त्यांच्यावर मारहाणीसारखे आरोप हे राजकीय आकसापोटी होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
Mega blood donation camp in Chandrapur : चंद्रपूर, ३ सप्टेंबर २०२५ – यूथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र, चंद्रपूर युनिट तर्फे दरवर्षी प्रमाणे १२ रबी–उल–अव्वल या पवित्र दिनानिमित्त मेगा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर ५ सप्टेंबर २०२५, शुक्रवार रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत जटपुरा गेट, चंद्रपूर येथे होणार आहे.
या कार्यक्रमाचे औचित्य मानवतेचे मार्गदर्शक, अल्लाहचे शेवटचे संदेष्टा प्रेषित मोहम्मद सल्लम. ﷺ यांचा जयंती महोत्सव (ईद मिलादुन्नबी) यानिमित्त साधण्यात आले आहे. दिव्य कुरआनमध्ये मानवजातीला उद्देशुन स्पष्ट संदेश आहे की – “जो एक जीव वाचवतो, तो संपूर्ण मानवता वाचवतो. तसेच प्रेषित्यांच्या शिकवणीतून येते की “तुमच्यातील सर्वोत्तम तो आहे, जो लोकांच्या कामी येतो. लोकांची सेवा केल्याने अल्लाहची उपस्थिती लाभते.”
मागील 17 वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन
याच शिकवणींमधून प्रेरणा घेत, यूथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र मागील 17 वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन महाराष्ट्रभर करीत आहे. रक्तदान ही केवळ सेवा नव्हे तर मानवी जीवन वाचवण्याचा आणि समाजात बंधुभाव वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. Eid Milad un Nabi blood donation drive
तज्ज्ञांच्या मते, महाराष्ट्र राज्यात दररोज सुमारे ८,००० ते १०,००० युनिट रक्ताची गरज भासते. अपघातग्रस्त, थॅलेसिमिया, कॅन्सर तसेच इतर गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी हा साठा अत्यावश्यक असतो. त्यामुळे रक्तदान शिबिरांमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात.
या शिबिरात शहरातील युवक, विविध संघटनांचे कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे व मानवतेचा हा संदेश सर्वदूर पोहोचवावा.
Rajendra Donge APMC president BJP : भद्रावती : मागील काही महिन्यांपासून उलथापालथ सुरु असलेल्या भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीची शेवटी आज (दि.३) ला घडी बसली. बाजार समितीच्या शिवसेना (उबाठा) व काँग्रेस पक्षाच्या संचालकांनी काल (दि.२) ला भारतीय जनता पक्षाच्या नेतेमंडळीच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला. व भारतीय जनता पक्षाचा झेंडा बाजार समितीवर रोवला. आज (दि.३) ला बाजार समितीच्या सभापतींची निवड पार पडली, यात १३ मतांनी बाजार समितीचे बांधकाम सभापती राजेंद्र डोंगे यांची बाजार समितीच्या सभापती पदी निवड झाली. राजेंद्र डोंगे हे आधी काँग्रेस पक्षात होते. चेकबरांज मानोरा ग्रामपंचायतचे ते उपसरपंच आहेत. कर्नाटक एम्टा कोळसा खाणीत ते कामगार नेते म्हणूनही ओळखल्या जातात. या निवडीने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. BJP local leaders consolidation APMC Bhadrawati
आज (दि.३) ला पार पडलेल्या सभापती निवडणुकीकरिता बांधकाम सभापती राजेंद्र डोंगे व संचालक ज्ञानेश्वर डुकरे यांनी अर्ज दाखल केला. गुप्त मतदान प्रक्रियेद्वारे राजेंद्र डोंगे यांना १३ तर ज्ञानेश्वर डुकरे यांना ५ मते पडली.
या घडामोडीत भारतीय जनता पक्षाचे विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर, तालुका अध्यक्ष शामसुंदर उरकुडे, शहर अध्यक्ष सुनील नामोजवार, विनोद पांढरे, रमेश राजूरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वासुदेव ठाकरे आदींचा सहभाग होता.
यावेळी भाजपवासी झालेले कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या उपसभापती अश्लेषाताई मंगेश भोयर, संचालक गजानन उताणे, ज्ञानेश्वर डुकरे, मनोहर आगलावे, शामदेव कापटे, परमेश्वर ताजणे, शांताताई रासेकर, शरद जांभुळकर, कान्होबा तिखट, मोहन भुक्या, अनिल चौधरी, राजु आसुटकर, विविध कार्यकारी सहकारी संस्था भद्रावती अध्यक्ष रोहण कुटेमाटे, उपाध्यक्ष विश्वास कोंगरे, अरुण घुगुल, सतिश वरखडे, पवन नगराळे, आनंद तागडे, हरी रोडे, संतोष माडेकर, मारोती नागपूरे, आशा ताजणे, शिला आगलावे, वर्षा आत्राम आदी उपस्थित होते. APMC leadership change Bhadrawati BJP 2025
रविंद्र शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडीया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात रवींद्र शिंदे यांनी भाजपात प्रवेश सत्र सुरु केले आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या सर्व घडामोडी पार पडल्या. शिवसेना (उबाठा) गटाचे सर्व संचालक भाजपात आले तर बाजार समितीतील काँग्रेसचे राजेंद्र डोंगे, अनिल चौधरी व राजु आसुटकर या तीन संचालकांना भाजपात आणुन त्यांच्यापैकी राजेंद्र डोंगे यांना बाजार समितीचे सभापती पद देऊन शिंदे यांनी मास्टरस्ट्रोक दिला. Rajendra Donge APMC president BJP
काही महिन्याअगोदर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. त्यानंतर ते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. आणि अल्पावधीतच त्यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना भाजपात आणण्याची खेळी केली.
निवडून आल्यानंतर पदाधिकारी हा पक्षाचा राहत नसुन जनतेचा होतो, त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जनतेची कामे केली पाहिजे, या मताचे रवींद्र शिंदे आहेत. सभापती पदा निवड झालेले राजेंद्र डोंगे हे काँग्रेस मधे असताना शिंदे यांनी त्यांना बांधकाम सभापती पद दिले होते. यावरुन विरोधी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची सचोटी दिसून येते.
भाजपात होणार भव्य प्रवेश
यानंतर येत्या काळात रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांच्या सोबत काम करीत असणारे इतर राजकीय, सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य प्रवेश भारतीय जनता पक्षात होणार असल्याचे संकेत शिंदे यांनी दिले आहेत.
Financial problems of retired teachers staff : चंद्रपूर : दि. २ सप्टेंबर २०२५ ला आमदार सुधाकर अडबाले यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद मध्ये मा. सा. कन्नमवार सभागृहात महाराष्ट्र राज्य सेवानिवृत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना यांची समस्या निवारण सभा घेण्यात आली.
सदर सभेला मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सावंत मॅडम, प्राथमिक शिक्षणाधिकारी अश्विनी केळकर, उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख व अर्चना मासिरकर व 15 पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. सदर सभेमध्ये संघटनेने दिलेल्या 23 मागण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर मागण्यांमध्ये एकस्तर थकबाकी १४८३ शिक्षकांच्या खात्यावर सोमवारपर्यंत जमा करण्यात येईल. उर्वरित साठी जिल्हा परिषदकडे निधी शिल्लक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सन २०१६ पासून प्रलंबित असलेले गट विमा सर्व प्रकरणे शिबिर घेऊन ३० सप्टेंबरपर्यंत काढण्यात येतील. सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचे थकीत असलेल्या हप्त्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांनी आठ दिवसात मागणी करावी त्यानुसार वरिष्ठाकडे मागणी करून निधी उपलब्ध झाल्यानंतर हप्ते देण्यात येतील. सेवानिवृतांचे समस्यांसाठी दर महिन्याला पेन्शन अदालतची मागणी संघटनेकडून करण्यात आली. त्यानुसार दर दोन महिन्याला सभा घेण्यात येईल. पुढील सभा ४ नोव्हेंबर घेण्याचे निश्चित झाले. उपदानातून वसूल करण्यात आलेली एकस्तरची रक्कम संबंधितांना त्वरित देण्याचे मान्य करण्यात आले. संगणक वसुलीचे mscit संघटनेने सादर केलेले २४ शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे पाठविण्यात आले. त्याकरिता आमदार अडबाले स्वतः प्रयत्न करणार आहेत. pension and gratuity resolution Chandrapur retired staff
सेवानिवृत झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे मेडिकल बिल तात्काळ मंजूर करण्यात येणार
सेवानिवृत्त विस्तार अधिकारी बाबुराव मडावी व तुकाराम कुचणकर इतर सर्वांचे रजा रोखीकरण की रक्कम निधी उपलब्ध झाल्याबरोबर त्यांचे खात्यात जमा करण्यात येईल. सेवानिवृत झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे मेडिकल बिल तात्काळ मंजूर करण्यात येईल. माध्यमिकमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांची वरिष्ठ श्रेणी तात्काळ मंजूर करण्यात यावी तसेच प्राथमिक शिक्षकांची वरिष्ठ श्रेणी मंजूर करावी. ३० ऑक्टोबर पर्यंत सदर दोन्ही प्रकारचे फाईल निकाली काढण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. retired teacher service benefits Chandrapur
मूळ सेवापुस्तक एक वर्षांपूर्वी अद्यावत करण्यात येणार
संघटनेने दिलेल्या आंदोलनाच्या नोटीसमुळे पुढील दोन वर्ष पर्यंत निवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यांचे मूळ सेवापुस्तक एक वर्षांपूर्वी अद्यावत करण्यात येणार आणि पेन्शन केस निवृत्तीच्या सहा महिने पूर्वी जिल्हा परिषद ला पाठवण्यात येईल, असे सांगण्यात आले. जीपीएफ ठेव संलग्न विमा संबंधाने मयत झालेल्या शिक्षकांचे 60 हजार रुपये प्रमाणे 91 कर्मचाऱ्यांचे खात्यात सदर निधी जमा करण्यात आला असून उर्वरित 35 प्रकरण त्वरित मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा पुरस्काराची एक वेतनवाढ आठ शिक्षकांना त्वरित देण्यात यावी व ज्यांची रक्कम उपदानातून वसूल करण्यात आली. त्यांची परत करण्यात यावी, त्यास मान्यता देण्यात आली. 31 मार्च पर्यंत सर्व प्रकरणे निकाली काढण्यात येतील.Financial problems of retired teachers staff
वेतन त्रुटी निवारण समिती 2024 खुल्लर समितीने दिलेल्या निर्देशानुसार सर्व पात्र शिक्षकांना एक महिन्यात लाभ देण्यात येतील तसेच दोन वर्षापासून प्रलंबित असलेले पेन्शन निवृत्ती प्रकरण नरेंद्र इटनकर, ज्ञानेश्वर सिडाम यांचे मंजूर झाले असून प्रमोद धानकुटे यांचे पुढील पंधरा दिवसात प्रकरण निकाली काढण्यात येईल. Financial problems of retired teachers
याशिवाय उर्वरित समस्यांमध्ये अनेक वर्षापासून मरनोत्तर मिळणारे सानुग्रह अनुदान पंधरा हजार रुपये प्रमाणे अनेक तालुक्यात देण्यात येत नाही ते संबंधितांची कुटुंबीयांना देण्यात येईल. 31 मार्चपर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन संघटनेला देण्यात आले निवड श्रेणी बाबत प्रशासन व संघटना यांची विशेष सभा घेण्याचे आजच्या सभेत ठरविण्यात आले, पेन्शन ५ तारखेपूर्वी करावी. सभेच्या शेवटी संघटनेच्या वतीने मुख्य मार्गदर्शक विजय भोगेकर यांनी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, उपस्थित सर्व अधिकारी यांचे आभार मानून शिल्लक असलेल्या सगळ्या समस्या दोन महिन्याचे आत निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे संघटनेकडून होणारे 5 सप्टेंबर शिक्षक दिनीपासूनचे धरणे आंदोलन 4 नोव्हेंबर पर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे सभेत जाहीर केले.
flood relief shelter arrangements : चंद्रपूर 03 सप्टेंबर – मुसळधार पावसामुळे ईरई धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शहरातील काही ठिकाणी पूर सदृश परिस्थिती 2 सप्टेंबरच्या रात्री निर्माण झाली होती. त्यामुळे शहरातील 29 नागरिकांना मनपा आपत्ती व्यवस्थापन चमूने महात्मा ज्योतिबा फुले शाळेत हलवून त्यांच्या निवारा व भोजनाची व्यवस्था केली आहे, त्याचप्रमाणे ईरई नदीतुन मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी येत असल्याने जलशुद्धीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले असुन पाणीपुरवठा नियमित होतपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपुन वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. Chandrapur disaster management
2 सप्टेंबरच्या रात्री रहमत नगर व घुटकाला परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे या परिसरातील 29 नागरिकांना मनपा आपत्ती व्यवस्थापन चमूने सुरक्षित स्थळी हलविले आहे.पुढील काही दिवस सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा असल्याने मनपा अधिकारी कर्मचारी 24 तास अलर्ट मोडवर असुन नदी पात्रा लगतच्या नागरिकांनी कुठलीही जोखीम न घेता जवळच्या मनपा शाळेत आश्रय घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेने केले आहे.
मनपा शाळेत आश्रयास असलेल्या नागरिकांसाठी शाळेत जेवण,पिण्याचे पाणी,झोपण्याची सोय,आरोग्य व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या असुन या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार प्रथमोपचार व औषधे देण्यात येत आहेत. तसेच पुराच्या पाण्याची पातळी कमी झालेल्या रहेमत नगर, फिल्टर प्लांट परिसरात साफ सफाई करुन ब्लीचिंग व लिंडेन पावडर टाकुन स्वच्छता करण्यात आली आहे. वाढते पाणी पाहता सर्वांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घेण्याचे तसेच आपातकालीन प्रसंगी 07172254614,07172259406 (101),8975994277,9823107101 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. flood relief shelter arrangements
आपत्ती प्रसंगी या मनपा शाळांमध्ये घेता येईल आश्रय –
महात्मा ज्योतिबा फुले प्राथ. शाळा, घुटकाळा वार्ड, डॉ. जाकिर हुसेन उर्दू प्राथ. शाळा, दादमहल वार्ड, शहिद भगतसिंग प्राथ. शाळा, भिवापूर वार्ड, लोकमान्य टिळक कन्या प्राथ. शाळा, पठाणपूरा रोड, लोकमान्य टिळक प्राथ. शाळा, काळाराम मंदीर, समाधी वार्ड, डॉ. राजेंन्द्र प्रसाद प्राथ. शाळा, भानापेठ वार्ड,महाकाली कन्या प्राथमिक शाळा, महाकाली मंदिर वार्ड, रामचंद्रनगर हिन्दी प्राथ. शाळा, जटपूरा वार्ड,सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक शाळा, जटपूरा वार्ड, स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा, वंडगाव वार्ड, लालपेठ कॉलरी मराठी प्राथ. शाळा, बंगाली कॉलनी, भिवापूर वार्ड,महाकाली कॉलरी प्राथ. शाळा, महाकाली कॉलरी, महात्मा गांधी कन्या प्राथ. शाळा, रैय्यतवारी वार्ड,पी.एम.श्री. सावित्रीबाई फुले उच्च प्राथ. व माध्यमिक शाळा, नेताजी चौक, बाबुपेठ
how to get pilot license with state subsidy : चंद्रपूर, दि. 3 : नागपुर फ्लाईंग क्लब अंतर्गत चंदपुर फ्लाइंग स्टेशन समितीच्या वतीने चंद्रपुर जिल्ह्यातील 12 वी उतीर्ण (गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयासह उत्तीर्ण) झालेल्या 2 विद्यार्थ्यांना व्यावसायिक पायलट लायसन्स प्रशिक्षणाकरीता विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी करीता राज्य शासनाकडून 90 टक्के अनुदान (अदांजे 37 लक्ष) रुपये प्राप्त होणार असून उर्वरित 10 टक्के रक्कम (अंदाजे 4 लक्ष रुपये) निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतः भरावयाची आहे. याबाबतचा अधिक तपशील व अर्जाचा नमुना www.chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
1) अर्ज सादर करावयाचा कालावधी 1 ते 16 सप्टेंबर 2025, 2) परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देणे 24 सप्टेंबर, 3) लेखी परीक्षा 27 सप्टेंबर 2025 रोजी, 4) लेखी परीक्षेचा निकाल परिक्षा संपल्यानंतर, 5) जिल्हा समितीद्वारे कागदपत्र पडताळणी 30 सप्टेंबर 2025
परीक्षा शुल्क : ऑनलाईन पध्दतीने प्रत्येक विद्यार्थी 1 हजार रुपये
लाभार्थी/उमेदवार निकष :
1) उमेदवार महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असावा / असावी. 2) उमेदवाराची वयोमार्यादा किमान 18 वर्षे ते 28 असावी. (01.01.2024 रोजी), 3) 12 वी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्रख् रसायनशास्त्र आणि गणित हे विषय घेऊन अनुसुचीत जमाती करीता किमान 65 टक्के गुणासह व अमागास करीता किमान 75 टक्के गुणासह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. 4) उमेदवार इयता 10 वी नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत क्षेत्रातून उतीर्ण झालेला असेल अशा उमेदवारांना ग्रामीण क्षेत्रातील समजण्यात येईल. pilot license training application Chandrapur 2025
अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे :
1) महाराष्ट्र राज्याचे विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील डोमीसाईल (अधिवास) प्रमाणपत्र 2) जन्मतारखेचा दाखला 3) 10 वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र व मार्कशिट 4) 12 वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र व मार्कशिट 5) मुख्याध्यापक / शाळेचे प्राचार्य / राजपत्रित अधिकारी यांनी दिलेले चारित्र्याचे प्रमाणपत्र 6) चंद्रपूर जिल्ह्याचे स्थानिक रहिवासी असल्याबाबतचे तहसिलदार यांचे रहिवास प्रमाणपत्र 7) आधार कार्ड, 8) अनुसुचीत जमातीच्या प्रवर्गाकरीता जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र how to get pilot license with state subsidy
9) अंतिम प्रवेशपात्र झालेल्या उमेदवारांनी DGCA Approved Medical Practitioner यांच्याकडून Medical Certificate व पोलीस विभागाकडून चारित्र्याचे प्रमाणपत्र प्राप्त करुन सादर करणे आवश्यक राहील 10) अंतिम प्रवेश झालेले उमेदवार अनु. क्र.8 व 9 मधील प्रमाणपत्रे विहीत मुदतीत सादर करु शकणार नाहीत, त्यांचे प्रवेश रद्द करण्यात येतील.
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
: 1) प्रस्तुत पदांकरीता फक्त http://chandaflying.govbharti.org या अधिकृत संकेतस्थळावरून विहित पध्दतीने भरलेले ऑनलाईन पध्दतीने केलेले अर्ज स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. सदर संकेत स्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी स्वतः उमेदवाराची राहिल. 2) पात्र उमेदवाराला वेब बेस्ड ऑनलाईन अर्ज http://chandaflying.govbharti.org या वेबसाईटद्वारे 1 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर 2025 या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील. 90 percent subsidy pilot training Maharashtra
3) अर्ज करतांना, शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे. तथापि, ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांची पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास व भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील व याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही.
अधिक माहितीकरीता www.chanda.nic.in या संकेतस्थळावर संपर्क करावा. तसेच इच्छुक पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी केले आहे.
Ganesh visarjan chandrapur preparations चंद्रपूर 03 सप्टेंबर – शहरात 06 सप्टेंबर अनंत चतुर्दशी रोजी होणारा श्रीगणेश विसर्जन सोहळा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेचे 100 हुन अधिकारी कर्मचारी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात कार्यरत आहेत. विसर्जनाच्या दिवशी गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने प्रियदर्शिनी चौक ते जटपुरा गेट,जिल्हा परिषदेच्या एका बाजुस विसर्जनाच्या दिवशी दुकाने लावण्यास प्रशासनद्वारे मनाई करण्यात आली आहे.
विसर्जन स्थळाची आयुक्त विपीन पालीवाल यांनी पाहणी केली व सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. प्रशासनाद्वारे विसर्जन सुरळीत होण्याच्या दृष्टीने शहरातील विसर्जन मार्गावरील पावसामुळे निर्माण झालेले खड्डे भरून काढण्यात येत आहेत. विसर्जन मिरवणुकीचा मार्ग तसेच वाहतुक व्यवस्थेची माहिती नागरीकांपर्यंत पोहचविली जात आहे. मिरवणुकी दरम्यान अनुचित घटना घडु नये याकरीता विसर्जन मार्गांवर विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. Ganesh festival immersion preparations
मनपा सज्ज
विद्युत विभागामार्फत सर्व कृत्रिम तलाव, जटपुरा गेट, मुख्य मार्ग, विसर्जन मार्ग, विसर्जन स्थळ तसेच संपूर्ण शहरात आवश्यक त्या ठिकाणी पुरेशी लाईट व्यवस्था तसेच जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आरोग्य विभागामार्फत आरोग्य पथकाच्या चमु वैद्यकीय सेवा देण्यास पूर्ण वेळ विसर्जनस्थळी राहणार असुन गांधी चौक, जटपुरा गेट व दाताळा रोडवरील मुख्य विसर्जन स्थळी अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात येत आहे.
जटपुरा गेट येथे गणेश मंडळांच्या स्वागतासाठी मंडप व स्टेज उभारणी करण्यात येणार आहे. यांत्रिकी विभागामार्फत वाहन व्यवस्था सांभाळण्यात येत असुन विसर्जन स्थळी लागणारे पिण्याचे पाणी, फिरते शौचालय कार्यरत ठेवण्यात येणार आहे. Ganesh immersion security measures
निर्माल्य कलश व कुंडात 4481 घरघुती मुर्तींचे विसर्जन
अग्निशमन विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापन चमु पुर्ण वेळ तैनात राहणार असुन मोठे सर्च लाईट, फिरे अँड रेस्क्यु व्हेइकल, पावर बोट,लाईफ जॅकेट लाईफ सेव्हींग ट्युब्ज , क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात 25 कृत्रिम कुंड व 25 निर्माल्य कलश उभारण्यात आले असुन 4481 घरघुती मुर्तींचे विसर्जन त्यात केले गेले आहे. मनपाद्वारे केल्या गेलेल्या जनजागृतीने यावर्षीसुद्धा एकही पीओपी मुर्तीचा वापर नागरिकांनी केला नाही.
स्वच्छता विभागाद्वारे रस्त्यांची नियमित सफाई करण्यात येत असुन रस्त्यावर व विसर्जन स्थळी कचरा जमा राहु नये यादृष्टीने घनकचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे. कृत्रीम तलावातुन निघणारे पाणी,निर्माल्य यांचे पावित्र्य राखून कम्पोस्टिंगसाठी पाठविले जाते तसेच माती ही बगिच्यात वापरण्यात येईल अथवा मुर्तीकारांना वाटप करण्यात येते. ईरई नदी या मुख्य विसर्जन स्थळाची स्वच्छता दररोज केली जात आहे. विसर्जनानंतर त्याच रात्री सर्व रस्ते स्वच्छ करून सकाळी सर्वांना स्वच्छ रस्त्याचा वापर मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी मिळतो.
गणेशोत्सवात गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या या मनपाने सुरु केलेल्या एक खिडकी योजनेद्वारे देण्यात आल्या होत्या. विसर्जन स्थळी गर्दी होऊ नये व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणुन बॅरिकेटिंग लावण्यात आले आहे, गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावणाऱ्यांनी मनपाची परवानगी घेऊनच स्टॉल लावावा लागणार असुन त्यांना व्यवस्थेकरिता स्वयंसेवक आणि स्टॉल जवळ पुरेसे डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. Ganesh idol immersion CCTV monitoring Chandrapur
त्याचप्रमाणे शहरातील घरगुती मूर्तींचे विसर्जन पूर्णपणे घरी अथवा कृत्रिम कुंडातच केले जाणार असुन इरई नदीजवळील विसर्जन कुंडात केवळ मोठ्या सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन करणाऱ्यांनाच परवानगी असल्याचे मनपाद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे.गणेशोत्सव प्रसंगी महानगरपालिकेद्वारे ही सर्व कार्ये दरवर्षी पार पाडली जातात. यावर्षीसुद्धा श्री गणेशोत्सव हा शांततेत व आनंदात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
revenge killing after prison release : बल्लारपूर ३ सप्टेंबर २०२५ – पोलिसात तक्रार करीत कारागृहात पाठविले म्हणून १९ वर्षीय मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला बल्लारपूर पोलिसांनी दीड वर्षांनी अटक केली आहे. घटना घडल्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता, मात्र पोलिसांनी हार न मानता आरोपीला अटक केली.
वर्ष २०२१ रोजी १९ वर्षीय अनामिका उर्फ रक्षा भालचंद्र कांबळे च्या तक्रारीवरून २९ वर्षीय सिनु उर्फ आकाश लक्ष्मण दहागावकर राहणार महाराणा प्रताप वार्ड बल्लारपूर याला अटक करीत पोलिसांनी कारागृहात पाठविले होते. वर्ष २०२४ मध्ये कारागृहातून बाहेर आल्यावर सिनु च्या मनात अनामिका बाबत राग होता, त्याने त्याचा बदला घेण्याचे ठरवीत, सिनु ने अनामिकाला आपल्या घरी बोलावीत तिच्या डोक्यावर अवजड वस्तूने प्रहार करीत तिची हत्या करीत घटनास्थळावरुन पसार झाला होता.
बल्लारपूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध घेतला मात्र सिनु पोलिसांच्या हाती लागला नाही, घटनेपासून आजपर्यंत आरोपी विविध राज्यात ठिकाण बदलवित लपून राहत होता, आरोपी वारंवार पोलिसांना गुंगारा देत असल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग करणे बंद केले नव्हते. arrest of accused in revenge killing after prison release
नातेवाईकाकडे आला आणि अडकला
बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून बिपीन इंगळे यांनी पदभार स्विकारत, अनामिका कांबळे हत्याकांडातील आरोपीला तात्काळ अटक व्हावी यासाठी सूचना व मार्गदर्शन केले. वर्ष २०२४ मध्ये पसार झालेल्या सिनु च्या अटकेचा दिवस २०२५ मध्ये उजाडला. आरोपी हा तेलंगणा मधील आपल्या नातेवाईकाकडे येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली, सापळा रचत अत्यंत शिताफीने पोलिसांनी आरोपी सिनु ला अटक करीत त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने ८ सप्टेंबर पर्यंत आरोपीची पोलीस कोठडी मंजूर केली. police track down fugitive after years on the run
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक बल्लारपूर बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात सपोनि मदन दिवटे, सपोनी शब्बीर खान पठाण, पोलीस कर्मचारी रणविजय ठाकूर, आनंद परचाके, संतोष पंडित, सुनील कामटकर, पुरुषोत्तम चिकाटे, संतोष दंडेवार, सत्यवान कोटनाके, विकास जुमनाके, भास्कर चिंचवलकर, सचिन अल्लेवार, शरदचंद्र कारुष, खंडेराव माने, सचिन राठोड, मिलिंद आत्राम, लखन चव्हाण व शालिनी नैताम यांनी केली.