Blog

  • Nazul land ownership rights scheme । आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपुराव्याला यश, नझूल जमिनीवरील घरपट्टे मिळणार कायमस्वरूपी

    Nazul land ownership rights scheme

    Nazul land ownership rights scheme : चंद्रपूर ८ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर आणि घुग्घुस येथील नझूल धारकांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्याची प्रक्रिया गतिमान होणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण मागणीला प्रतिसाद देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच मंत्रालयात बैठक घेऊन या प्रक्रियेला गती देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आमदार किशोर जोरगेवार यांनी आढावा बैठक घेत महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

    राज्यातील ७५ हजार युवक -युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी

    या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा, उपविभागीय अधिकारी संजय पवार, मनपा उपायुक्त संदीप चिद्रावार, तहसीलदार विजय पवार, घुग्घुस नगरपरिषद कार्यकारी अधिकारी रांजनकर, नगररचना विभागाचे प्रतीक जिवतोडे, राहुल भोयर यांच्यासह भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्षा छबू वैरागडे, भाजप नेते प्रकाश देवतळे, घुग्घुस शहराध्यक्ष संजय तिवारी, महामंत्री रवि गुरनुळे, श्याम कणकम, सविता दंढारे, मंडळ अध्यक्ष सुभाष अदमाने, स्वप्निल डुकरे, विनोद खेवले, माजी नगरसेवक देवानंद वाढई, माजी नगरसेविका पुष्पा उराडे, शीतल गुरनुळे, कल्पना बबुलकर, राशिद हुसेन, विठ्ठल डुकरे, अरुण तिखे, प्रज्ञा बोरगमवार, हेमंत उरकुडे, संतोष नुने, राजकुमार गोडसेलवार, साजन गोहने, मुन्ना लोडे आदींची उपस्थिती होती. Nazul land lease allotment

    सर्वेक्षणाची प्रक्रिया त्वरित पूर्ण करा

    आ. किशोर जोरगेवार यांनी बैठकीत म्हटले की,  सर्वेक्षणाची प्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्वरित पूर्ण करावी. ठरविण्यात येणाऱ्या नवीन नियुक्त एजन्सींनी ठरविलेल्या वेळेत काम पूर्ण करणे आवश्यक असून प्रशासनाने या कामावर सातत्याने देखरेख ठेवावी. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला न्याय मिळावा यासाठी सर्वेक्षणाची प्रक्रिया पारदर्शक ठेवावी. नझूल जमिनीवरील घरांमध्ये वास्तव्यास असलेल्या मूळ रहिवाशांची हक्काची नोंद होणे आवश्यक आहे.

    कोणताही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे. सर्वेक्षण व पट्टावाटपाची प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊन प्रत्येक कुटुंबाला दिलासा मिळावा, हे आपले ध्येय असावे. पारदर्शकता व विश्वास निर्माण होण्यासाठी स्थानिक जनतेला प्रक्रियेची माहिती सतत देत राहावी, अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत. Nazul land survey and housing rights distribution

    चंद्रपूर शहरातील एकूण ३९ झोपडपट्ट्या नझूल जमिनीवर असल्याची नोंद मनपाकडे आहे. त्यापैकी दोन झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून उर्वरित झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण लवकरच सुरू होणार आहे. यासाठी नवीन एजन्सी नियुक्त करण्याचा कंत्राट महानगरपालिकेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. तर ५२३ नागरिकांनी पट्ट्यासाठी प्रस्ताव सादर केल्याची माहिती यावेळी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. सदर नागरिकांना लवकर पट्टे वाटप करण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत.

  • skill development courses by government । राज्यातील 75 हजार युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी

    skill development courses by government

    skill development courses by government : चंद्रपूर, दि. 8 सप्टेंबर २०२५ (News३४) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी 75 वा वाढदिवस असून कौशल्य विभाग रोजगार आणि स्वयंरोजगार सेवा पंधरवडा साजरा करत आहे. या अनुषंगाने राज्यातल्या सुमारे 75 हजार युवक आणि युवतींना कौशल्यविषयक प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. येत्या 17 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत हा पंधरवडा सुरू राहणार असून 1 ऑक्टोबरला राज्यातील 419 आयटीआयमध्ये अभ्यासक्रमांचा शुभारंभ केला जाणार आहे.

    आदि कर्मयोगी प्रशिक्षण कार्यशाळेचे जिल्हाधिका-यांच्या हस्ते उद्घाटन

    कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात राज्यातील आयटीआयमध्ये रोजगाराच्या जागतिक संधी उपलब्ध करून देणारे अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही आता अत्याधुनिक अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू होत आहेत. कौशल्य विकासाद्वारे युवक व युवतींचे सक्षमीकरण हा यामागचा मूळ उद्देश आहे. मात्र अनेकांना नियमित कार्यशाळेत जाऊन  वेळेअभावी किंवा इतर कारणास्तव प्रशिक्षण घेण्याची संधी मिळत नाही.  skill development courses

    अशा होतकरू युवकांना आणि युवतींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  प्रत्येक जिल्ह्यात अल्पकालीन अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आयटीआयच्या नियमित वर्गाच्या व्यतिरिक्त इतर वेळेत हे अभ्यासक्रम घेण्यात येतील.

    राज्यातील आयटीआयमध्ये सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसोबतच  अतिशय अल्पदरात युवक आणि युवतींना रोबोटिक, सौर ऊर्जा तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आणि व्यक्तिमत्व आणि सामाजिक विकासासंदर्भात अत्याधुनिक अभ्यासक्रम चालवले जाणार आहेत. उद्योगांना पूरक स्वयंरोजगाराच्या संधी या अल्पकालीन अभ्याक्रमाच्या माध्यमाने तरुणांना उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे सध्या आयटीआयचे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींकडून या अभ्यासक्रमांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

    येथे करा नोंदणी :

      https://admission.dvet.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर राज्यातल्या प्रत्येक  जिल्ह्यात सुरू होत असलेल्या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती तसेच प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. अल्पकालीन अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर युवकांना रोजगाराच्या संधीबाबत आणि स्वयंरोजगाराची माहितीही संबंधित आयटीआय संस्थेत दिली जाणार आहे. उपलब्ध जागांचा विचार करता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असून युवकांनी त्वरित या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

  • Adi Karmayogi Abhiyan tribal development । आदि कर्मयोगी प्रशिक्षण कार्यशाळेचे जिल्हाधिकारी गौडा यांच्या हस्ते उद्घाटन

    Adi Karmayogi Abhiyan tribal development

    Adi Karmayogi Abhiyan tribal development : चंद्रपूर, दि. 8 सप्टेंबर २०२५ : प्रतिक्रियाशील सुशासन कार्यक्रमाच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत सेवा व लोककेंद्रीत विकासाची पुर्तता करण्यासाठी केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयाने ‘आदि कर्मयोगी अभियान’ सुरू केले आहे. या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आदिवासी गावांचा आराखडा तयार होणार आहे. जेणेकरून सन 2047 च्या विकसीत भारताच्या संकल्पनेत त्याचा समावेश करता येईल. त्यामुळे लोकसहभागातून आपल्या जिल्ह्याचे उत्कृष्ट ‘व्हीजन डॉक्युमेंट’ तयार करा, अशा सुचना  जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.

    वाघाच्या जबड्यात पत्नी, पटीने वाघाशी केले दोन हात

    एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरच्या वतीने वन अकादमी येथे आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर तसेच इतर प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

     ‘आदि कर्मयोगी अभियान’ हे केंद्र शासनाचे अतिशय महत्वाकांक्षी अभियान आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, या माध्यमातून आदिवासी समाजाकरीता असलेल्या 1. पीएम जनमन योजना, 2. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, 3. राष्ट्रीय सिकलसेल उच्चाटन मोहीम आणि 4. एकलव्य निवासी शाळांचा विस्तार आणि शिष्यवृत्ती योजना तसेच आदिवासी बांधवांसाठी असलेल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या इतर योजनांवर आधारीत लोकसहभागातून उत्कृष्ट गावनिहाय आराखडा तयार करावयाचा आहे. त्यासाठी राज्यस्तर, जिल्हा, तालुकास्तर मास्टर ट्रेनर तयार करण्यात येत आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून आपापल्या गावस्तरावर योग्य प्रशिक्षण द्यावे. या तीन दिवसाच्या प्रशिक्षणाचा चांगला फायदा करून संपूर्ण प्रक्रिया समजावून घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी प्रशिक्षणार्थ्यांना केल्या. PM Janman Yojana benefits for tribal communities

    pm janman yojana benefits for tribal communities

    मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह म्हणाले, ‘आदि कर्मयोगी’ हे अभियान सेवा, समर्पण आणि संकल्प यावर आधारीत आहे. आदिवासी बांधवांसाठी चार मुख्य योजनांवर मास्टर ट्रेनरची ही जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. प्रशिक्षण हे आपले कौशल्य विकसीत करण्यासाठी असते, त्यामुळे त्याचा योग्य लाभ घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

    प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानात चंद्रपूर जिल्ह्यातील 167 गावे तर पीएम जनमन योजनेत 68 गावांचा समावेश आहे. आदिवासी गावांमध्ये आरोग्य, शिक्षण, पोषण, रोजगार, पाण्याची उपलब्धता करणे आाणि शासनाशी संपर्क ठेवण्यासाठी ‘आदि कर्मयोगी अभियान’ सुरू करण्यात आले आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून गावांचे नियोजनबध्द आराखडे तयार करावयाचे आहेत, असे त्यांनी सांगितले. Tribal empowerment programs by Ministry of Tribal Affairs

    सदर कार्यशाळेकरीता 9 जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनरसह एकूण 120 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यात ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, वनविभाग, महावितरण, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग आणि जि.प. पंचायत विभागाचा समावेश होता.

     असे आहे ‘आदि कर्मयोगी अभियान’:

     आदिवासी भागात तळागाळातील शासन व सेवा वितरणामध्ये आमुलाग्र परिवर्तन घडविणे, आदिवासी समुदायांना सशक्त करण्यासाठी प्रतिक्रियाशील सुशासन कार्यक्रमांतर्गत नेत्यांचे कॅडर निर्माण करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. सेवा, समर्पण आणि संकल्प या तत्वावर हे अभियान राबविले जाणार असून आदिवासी भागांमध्ये शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहचवली जाईल. आदिवासी समुदायांच्या सक्षमीकरणासाठी संपूर्ण भारतात 20 लक्ष परिवर्तनशील नेत्यांचे मिशन आधारीत कॅडर निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

  • Chandrapur property tax online payment । 💰 चंद्रपूरकरांसाठी सुवर्णसंधी! मालमत्ता कर ऑनलाईन भरा आणि मिळवा थेट 10% सूट

    Chandrapur property tax online payment

    Chandrapur property tax online payment : ८ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 2025-26 चालु आर्थिक वर्षातील मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा करणाऱ्यांना सवलत दिली जात असुन 30 सप्टेंबर पूर्वी कराचा भरणा केल्यास 8 टक्के सूट देण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने कर भरल्यास अतिरिक्त 2 टक्के म्हणजेच 10 टक्के सूट मनपामार्फत देण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने कर भरणा करण्याकडे नागरिकांचा कल वाढला असुन मागील आर्थिक वर्षात 8914 तर यावर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत 5036 असे एकूण 13950 नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा करण्यास ऑनलाईन प्रणालीचा वापर केला आहे.  

    पतीसमोर वाघाने पत्नीला नेले फरफटत, चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

    मागील वर्षी म्हणजे सन 2024-25 या आर्थिक वर्षात 8914 मालमत्ता धारकांनी एकूण रु.7 कोटी 49 लक्ष 14 हजार 302 इतक्या रक्कमेचा ऑनलाईन भरणा केला होता तर सन 2025-26 या चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत 5036 मालमत्ता धारकांनी एकूण रु.2 कोटी 97 लक्ष 51 हजार 350 इतक्या रक्कमेचा ऑनलाईन भरणा केला आहे.

    घरबसल्या कर भरण्याची संधी

    शहरातील मालमत्ताधारकांना करांचा भरणा सुलभरीत्या करता यावा म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ऑनलाइन युपीआय ॲप अर्थात फोन पे, गुगल पे,भीम ॲप ( भारत इंटरफेस फॉर मनी ) या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.आता मालमत्ता कर भरणे आता अधिक सोपे झाले असुन, नागरीक chandrapurmc.org या लिंकसोबतच युपीआय ॲपचा वापर करून मोबाईलद्वारे सुद्धा कर भरू शकतात. Chandrapur Municipal Corporation property tax

    शहरात 80 हजारांपेक्षा अधिक मालमत्ता आहेत. या मालमत्तांच्या कराची रक्कम रोखीने अथवा धनादेशाद्वारे अदा करण्याची पद्धत आहे. यात महापालिका कर्मचारी घरोघरी जाऊन वसुली करीत असतात किंवा संबंधित मालमत्ताधारक पालिकेच्या प्रभाग कार्यालयांमध्ये जाऊन रकमेचा भरणा करीत असतात. मात्र अनेकदा वेळेच्या अभावामुळे अथवा कार्यालयातील गर्दीमुळे प्रत्यक्ष रोखीने अथवा धनादेशाद्वारे कर भरण्यास अडचण निर्माण होते. अशा वेळी नागरिकांना करभरणा करताना सोयीचे व्हावे म्हणून युपीआय ॲपशी कर प्रणाली लिंक करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिले होते. how to pay property tax online

    मालमत्ता करावरील ही सूट 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच देण्यात येत असल्याने अधिकाधिक नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा करून या अतिरिक्त सूटचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  

  • Latest tiger attack news from Chandrapur । सोमनाथ पर्यटनस्थळाजवळ वाघाचा हल्ला, धाडसी पतीचा प्रयत्न व्यर्थ, पत्नीचा मृत्यू

    Latest tiger attack news from Chandrapur

    Latest tiger attack news from Chandrapur चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एका ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमनाथ पर्यटन स्थळाजवळील बाबा आमटे प्रकल्पाच्या क्वार्टरमध्ये घडली.

    नेमकं काय घडलं?

    अन्नपूर्णा बिलोणे (५२) आणि त्यांचे पती तुलसीराम बिलोणे हे बाबा आमटे प्रकल्पाच्या क्वार्टरमध्ये राहत होते. आज पहाटे ४.३० वाजता अन्नपूर्णा त्यांच्या घराच्या अंगणात भांडी घासत होत्या. त्याचवेळी एका वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. Villager woman killed by tiger attack

    सावली तालुक्यात धुमाकूळ घालणारी नरभक्षी वाघीण जेरबंद

    पतीचा धाडसी प्रयत्न

    अन्नपूर्णा यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांचे पती तुलसीराम तातडीने बाहेर आले. त्यांनी पाहिले की वाघाने अन्नपूर्णा यांच्या गळ्याला पकडले आहे. घाबरून न जाता, तुलसीराम यांनी आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी वाघाशी दोन हात केले. त्यांनी अन्नपूर्णा यांचे पाय धरून त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला, पण वाघाच्या ताकदीसमोर त्यांचा जोर कमी पडला. शेवटी, त्यांनी जवळच पडलेली एक काठी घेऊन वाघावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यानंतर वाघ तिथून पळून गेला, पण दुर्दैवाने अन्नपूर्णा यांचा जागीच मृत्यू झाला होता. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २९ नागरिकांनी वाघाच्या हल्ल्यात आपला जीव गमावला असून यामध्ये २७ वाघाच्या हल्ल्यात तर एक-एक हत्ती व अस्वलच्या हल्ल्यात बळी गेला.

    प्रशासकीय कार्यवाही

    घटनेची माहिती मिळताच मुल पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. तात्काळ, मेजर राष्ट्रपाल कातकर, धनराज नेवारे, वेदनाथ करंबे यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुल उप-जिल्हा रुग्णालयात पाठवला. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन मृत महिलेच्या पतीला तात्काळ २०,००० रुपयांची मदत दिली.

    या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

  • Ballarpur BJP mandal committee list । बल्लारपूर ग्रामीण भाजप कार्यकारिणीत सर्व आघाड्यांचे प्रतिनिधित्व – जाणून घ्या संपूर्ण यादी

    Ballarpur BJP mandal committee list

    Ballarpur BJP mandal committee list : बल्लारपूर – ८ सप्टेंबर २०२५ – महाराष्ट्राचे लोकनेते मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या सुचनेनुसार व जिल्हा अध्यक्ष हरीशजी शर्मा यांच्या मार्गदशनाखाली बल्‍लारपूर तालुका भारतीय जनता पार्टीची कार्यकारणी तयार करण्‍यात आली आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील नवनियुक्त भाजपा मंडल अध्यक्ष चंद्रकांत देऊळकर आपापल्या मंडलातील तालुका महामंत्री व आघाडीच्या अध्यक्षांची घोषणा करण्‍यात आलेली आहे.

    गणेश विसर्जन करताना चंद्रपुरात युवकाचा नदीत बुडून मृत्यू

    भारतीय जनता पार्टी बल्लारपूर ग्रामीण चे अध्यक्ष चंद्रकांत देऊळकर यांनी महामंत्रीपदी सुनील फरकडे, श्रावण सातपुते, गणेश टोंगे, रुमदेव देरकर, उपाध्यक्ष पदी दिलीप धोबे, किशोर कोटरंगे, योगेश पोतराजे, देवाशीष सिंह, शालिनी यादव कोवे, सरला पारेकर, सचिव पदी मोरेश्वर उदिसे, सुयोग विरुतकर, अजय मेश्राम, मनिषा बंडू शेट्टे, प्रिया प्रवीण चौधरी, निता महेश देपटवार.

    बल्लारपूर ग्रामीण युवा मोर्चा

    तसेच भारतीय जनता पार्टी बल्लारपूर ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष संदीप पाडे, महामंत्री  संतोष लोनगाडगे, देवा पिपरे, मल्लेश कोडारी, उपाध्यक्ष अंकित ढवस, सूरज भोयर, सचिव कुणाल लोखंडे, महेंद्र डोहे,सूरज काळे. BJP Ballarpur rural youth wing office bearers

    ग्रामीण महिला मोर्चा

    तसेच भारतीय जनता पार्टी बल्लारपूर ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्ष वैशाली बुद्धलवार, महामंत्री स्नेहल टिंबडिया, सुरेखा ईटनकर, वनिता पेंदराम, उपाध्यक्ष उषा लोनगाडगे, सविता डाहुले, कांचन नहरशेट्टीवार, सचिव वैशाली पोतराजे शुभांगी धिवे.

    ग्रामीण किसान मोर्चा

    भारतीय जनता पार्टी बल्लारपूर ग्रामीण किसान मोर्चा अध्यक्ष पदी अनिल मोरे, महामंत्री नरेंद्र आमने, पंकज ठाकरे, सुरेश राजुरकर, उपाध्यक्ष चंद्रकांत येवले, ज्ञानेश्वर राजुरकर, सचिव विजय डावरे, रमेश पिपरे. Ballarpur BJP mandal committee list

    ग्रामीण आदिवासी मोर्चा

    भारतीय जनता पार्टी बल्लारपूर ग्रामीण आदिवासी मोर्चा अध्यक्ष दत्तू कोरवते, महामंत्री रुपदास सिडाम, सुरेश पेंदोर, संजय टेकाम, उपाध्यक्ष मनोहर सिडाम, महादेव मडावी, सूरज मडावी, सचिव अंकित आत्राम, अविनाश मठ्ठे.

    ग्रामीण अनुसूचित जाती मोर्चा

    भारतीय जनता पार्टी बल्लारपूर ग्रामीण अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष भीमराव नगराळे महामंत्री विकास दुपारे, सोमेश्वर पद्मगिरीवर,  उपाध्यक्ष प्रीतम उमरे,भारत नामदेव दुबे

    ग्रामीण कामगार आघाडी

    भारतीय जनता पार्टी बल्लारपूर ग्रामीण कामगार आघाडी अध्यक्ष सूरज टोमटे, उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष अरुण त्रिवेदी, माजी सैनिक सेल अध्यक्ष विष्णू दुर्वे, बुद्धिजीव सेल अध्यक्ष निखिल लेडांगे, पदवीधर अध्यक्ष विपुल कवठे, संस्कृती सेल अध्यक्ष रवी ढवस, पंचायत राज ग्रामविकास अध्यक्ष गोसावी डाहुले, उद्योग आघाडी अध्यक्ष शंकर डवरे, दक्षिण भारतीय सेल अध्यक्ष प्रकाश मडपल्लीवर, ट्रान्स्पोर्ट सेल अध्यक्ष मंगेश धोबे, जेष्ठ कार्यकर्ते सेल अध्यक्ष ऋषी पाटील निब्रड, क्रीडा सेल अध्यक्ष आकाश लेडांगे, व्यापारी आघाडी अध्यक्ष रमेश सोनवणे, बेटी बचाओ बेटी पढाओ सेल अध्यक्ष मंदा पेनदोर यांची घोषणा करण्‍यात आलेली आहे. Ballarpur BJP local cell president list

    नवनियुक्त महामंत्री व आघाडी  अध्यक्षांचे अभिनंदन व आगामी संगठनात्मक कार्यांसाठी शुभेच्छा महाराष्ट्राचे लोकनेते व माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिल्या.

    वरिल नवनियुक्तीचे स्वागत व अभिनंदन केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराजभैया अहीर, जिल्हाध्यक्ष श्री.हरीश शर्मा, जेष्ठनेते श्री. चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा सौ. संध्याताई गुरुनुले, प्रदेश सचिव सौ. विद्याताई देवाडकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ. रेणुकाताई दुधे, महिला आघाडी प्रदेश महामंत्री कु. अल्काताई आत्राम, जिल्हा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाड़े, श्री. विवेक बोढे, श्री.रामपाल सिंह, किशोर पंदिलवार, रमेश पिपरे, अॅड हरिश गेडाम, राजु बुध्‍दलवार, रवी ढवस, मनोहरराव देउळकर, नामदेव भोयर आदी पदाधिकार्‍यांनी केले आहे.

  • man-eater tigress captured । पाथरीत धुमाकूळ घालणारी नरभक्षी वाघीण अखेर जेरबंद!

    man-eater tigress captured

    man-eater tigress captured : सावली ७ सप्टेंबर २०२५- वनपरिक्षेत्रातील पाथरी उपक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या आणि माणसांवर हल्ले करणाऱ्या एका नरभक्षी वाघिणीला अखेर वन विभागाने जेरबंद केले आहे. त्यामुळे पाथरी आणि आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

    गणेश विसर्जन करताना युवक बुडाला

    गेल्या काही दिवसांपासून या वाघिणीने परिसरात दहशत माजवली होती. पाथरी ते विरखल रस्त्यावरील आसोला मेंढा कालव्याच्या जवळ शेतात काम करणाऱ्या ६५ वर्षीय पांडुरंग चचाने या शेतकऱ्याचा तिने बळी घेतला होता. या घटनेमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता आणि संभाव्य मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी या वाघिणीला पकडण्याकरिता वन विभागावर दबाव वाढत होता. man-eating tigress tranquilised

    वनविभागावर दबाव

    या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाने तातडीने पाऊले उचलली. गेल्या दोन दिवसांपासून या वाघिणीवर पाळत ठेवली जात होती. अखेर, शार्पशूटर आणि बचाव पथकाला (रेस्क्यू टीम) पाचारण करण्यात आले. रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास या पथकाने वाघिणीला यशस्वीरित्या बेशुद्ध करून (ट्रँक्विलाइज करून) पकडले.

    या कामगिरीबद्दल सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे आणि त्यांच्या संपूर्ण बचाव पथकाचे अभिनंदन केले जात आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे परिसरातील शेतकरी आणि स्थानिकांच्या जीविताला असलेला धोका टळला आहे.

  • boy drowns during Ganesh immersion । चंद्रपूर गणेश विसर्जन दु:खद अपघात, १८ वर्षीय तरुणाचा इरई नदीत बुडून मृत्यू

    boy drowns during Ganesh immersion

    boy drowns during Ganesh immersion : चंद्रपूर – ७ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर शहरात ६ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन पार पडलं, मात्र या आनंद व उत्साहाच्या वातावरणात विघ्न आलं, दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीत गणेश विसर्जन करताना १८ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ७ सप्टेंबर रोजी आपत्ती व्यवस्थापन व पोलीस कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबवित मुलाचा मृतदेह बाहेर काढला. १८ वर्षीय दीक्षांत राजू मोडक असे मृतकाचे नाव आहे.

    चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    चंद्रपूर व शहरातील इतर भागात गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात सुरु होते, दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भटाळी पूल इरई नदीच्या पात्रात सुद्धा विसर्जन सुरु होते, बेताल चौक दुर्गापूर मध्ये राहणारा १८ वर्षीय दीक्षांत राजू मोडक हा आपल्या घरी असताना दुपारी त्याच्या मित्राने फोनद्वारे गणेश विसर्जनाला जाऊ असे म्हणत बोलाविले, ते दोघेही घराजवळील बावणे यांच्या गणेश विसर्जनाला गेले.

    शोधमोहिमेत मिळाला मृतदेह

    दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान भटाळी पुलावर इरई नदीच्या पात्राजवळ मित्र व इतर नदी पात्रात उतरले असता दीक्षांत व एकाचा तोल गेला, त्याचवेळी दुसऱ्या मुलाला वाचविण्यास यश आले मात्र दीक्षांत बुडाल्याने तो पाण्याबाहेर आला नाही, तात्काळ याबाबत पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. बचाव पथकाने दीक्षांत चा शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही. रात्र झाल्याने पोलिसांनी शोधमोहीम थांबविली. Irai river drowning incident during Ganesh immersion

    ७ सप्टेंबर रोजी पुन्हा शोधमोहीम राबवली असता सकाळी १० वाजताच्या सुमारास शोध पथकाला दीक्षांत चा मृतदेह मिळाला, दीक्षांत च्या मृत्यूने दुर्गापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुर्गापूर पोलिसांनी याप्रकरणी मार्ग दाखल केला आहे.

  • Sharad Ganveer joins MNS Chandrapur । भव्य पक्षप्रवेश!, काँग्रेसला धक्का, मनसेला बळ

    Sharad Ganveer joins MNS Chandrapur

    Sharad Ganveer joins MNS Chandrapur : चंद्रपूर/मूल:- चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठया प्रमाणात अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश होत आहे, त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात मनसेला चांगली संधी आहे, अशातच कांग्रेस भाजपचे वर्चस्व असणाऱ्या मूल तालुक्यातील टेकाडी या मोठ्या गावात मनसेने एंट्री केली असून तेथील कांग्रेस कमेटीचे मूल तालुका उपाध्यक्ष व लढाऊ नेतृत्व असणारे शरद गणवीर यांनी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह दिनांक 1 सप्टेंबर ला मनसे पक्षात प्रवेश केला. MNS entry in Tekadi village

    गावठाण जमिनीची बेकायदेशीर रजिस्ट्री, सरपंच व सचिवावर कारवाई करा

    शरद गणवीर यांच्या मनसेत पक्ष प्रवेशाने मूल तालुक्यात मनसेची ताकत वाढली असून टेकाडी गावासह जवळपास 25 गावात मनसेच्या शाखा तयार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे, दरम्यान शरद गणवीर यांची मनसे जनहीत कक्ष विभागाच्या बल्लारपूर विधनासभा अध्यक्ष पदी नियुक्ती सुद्धा करण्यात आली, यावेळी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, उपजिल्हा अध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे, बल्लारपूर तालुका सचिव राजू लांडगे, महाराष्ट्र सैनिक प्रतीक इत्यादीची उपस्थिती होती. political shift from Congress to MNS

    political shift from congress to mns

    टेकाडी गावात समस्यांचा डोंगर

    मूल तालुक्यातील टेकाडी या गावात समस्याचा डोंगर असून पिण्याचे शुद्ध पाणी मिळतं नाही, रस्ते नाल्या चा प्रश्न गंभीर बनला आहे, घरकुल धारकांना पैसे मिळाले नाही पण याकडे आमदार, खासदार लक्ष देत नसल्याने आता जनतेसाठी लढणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या आक्रमक पक्षात जाऊन गावाच्या समस्या सोडविण्यासाठी कांग्रेस चे तालुका अध्यक्ष शरद गणवीर यांनी आपल्या समर्थकासह मनसे पक्षात प्रवेश केला, दरम्यान शरद गणवीर यांची बल्लारपूर विधानासभा क्षेत्राचे मनसे जनहित कक्ष विभागाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली.

    त्यामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मनसेची ताकत वाढताना दिसतं आहे. यावेळी टेकाडी गावाचे प्रमुख कार्यकर्ते कुंदन मोहुर्ले, आशिष शेंडे, आवेश रामटेके, विनोद गोहणे, किसन गुरनुले, अशफाक शेख, सचिन मेश्राम, अतुल बोलीवार, होमेंद्र बोलिवार, रुपेश कोल्हे, सुमित कांबडी, नर्गिस सय्यद, उत्कर्षां पोटवार, समीक्षा जक्कुलवार, भाग्यश्री जक्कुलवार, गायत्री जक्कुलवार, नंदिनी मोहुर्ले, रुपाली जक्कुलवार, श्रावणी जक्कुलवार इत्यादीची उपस्थिती होती.

  • Gavthan jamin registry । सचिव व सरपंचांवर कारवाईची मागणी – गावठाण जमीन गैरव्यवहार

    Gavthan jamin registry

    Gavthan jamin registry : चंद्रपूर – साखरवाही ग्रामपंचायत अंतर्गत मालमत्ता क्रमांक ५०६ ही गावठाण जागा आहे. परंतु ही जागा ग्रामपंचायत सरपंच आणि सचिवांनी संगनमताने सदस्यांना विश्वासात न घेता आणि बेकायदेशीरपणे व्यवहार करून संबंधित व्यक्तिच्या नावावर रजिस्ट्री केली आहे. त्यामुळे साखरवाही ग्रामपंचायत सदस्य विनोद खापने यांनी पत्रकार परिषदेत ही रजिस्ट्री रद्द करण्याची आणि यासाठी जबाबदार असलेल्या ग्रामपंचायत सचिव आणि सरपंचावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, २९८ ग्राम ब्राऊनशुगर जप्त

    पत्रकार परिषदेत सांगितले की, साखरवाही ग्रामपंचायतमध्ये झालेल्या ग्रामसभेत गावातील गावठाणच्या मोकळ्या जागेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. खटोड यांची ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात शेती आहे. त्यांच्या शेतीचा भाग गावठाण क्षेत्रात समाविष्ट आहे. गावातील गावठाण जागा शेतीसाठी किंवा इतर कोणत्याही व्यावहारिक कारणासाठी वापरता येत नाही. किंवा ती कोणालाही विकता किंवा बक्षिस म्हणून देता येत नाही. ती जमीन गावातील गरीब नागरिकांसाठी किंवा घरकुल योजनेसाठी वापरता येते. illegal common land registration Panchayat case

    प्रस्ताव चर्चेसाठी आला नाही

    ग्रामपंचायतीला याचा अधिकार आहे या सर्व गोष्टी सचिवांनी ग्रामसभेत सांगितल्या असे असूनही, मालमत्ता क्रमांक ५०६ धारक खटोड यांनी फेरफार करून चंद्रपूर येथील रहिवासी चांडक यांच्या नावावर गावठाण ची जागा रजिस्ट्री करून ती विकली. सभेतील काही सदस्यांना अंधारात ठेवून ते मंजूर ही करण्यात आले. ही बाब उघडकीस आल्यानंतर सर्व सदस्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीत याबद्दल आक्षेप घेत अर्ज सादर केला. सभेत हा प्रस्ताव चर्चेसाठी आला नाही, उपसरपंच आणि तीन सदस्यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी न करता ही प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

    प्रस्ताव बनावटी

    ग्रामपंचायतमधील एकूण ९ सदस्यांपैकी फक्त ५ जणांनी स्वाक्षरी केली आहे, त्यामुळे खापणे यांनी पत्रकार परिषदेत हा प्रस्ताव बनावटी असल्याचा आरोप केला. सदस्यांना त्याबद्दल कोणतीही माहिती न देता प्रस्तावावर सदस्यांचे नाव आणि स्वाक्षरी दाखविणे हा कायदेशीर गुन्हा आहे. खापने यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला आहे की हे प्रकरण सरपंच आणि तत्कालीन सचिव यांच्या संगनमताने झाले आहे आणि बैठकीत पारदर्शकता न दाखवता बनावट कागदपत्रे तयार करून गावातील मालमत्तेचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. Panchayat illegal registry of village land case

    या संदर्भात, ग्रामपंचायत सदस्य विनोद खापने यांनी ग्रामपंचायत बैठक क्रमांक ६ मध्ये घेतलेल्या ठराव क्रमांक ७, ७/१ आणि ८ ची सखोल चौकशी करावी, मालमत्ता क्रमांक ५०६ ची बेकायदेशीर नोंदणी त्वरित रद्द करावी आणि यासाठी जबाबदार सचिव आणि सरपंचांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पत्रपरीषदेत केली आहे.