Blog

  • local crime branch seizes brown sugar heroin । नशेचा डाव उधळला! चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    local crime branch seizes brown sugar heroin

    local crime branch seizes brown sugar heroin : चंद्रपूर – उडता चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेने गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठी कारवाई करीत तब्बल २९८ ग्राम ब्राऊनशुगर/हेरॉईन जप्त करीत २ आरोपीसह तब्बल ३० लाख १९ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष बाब म्हणजे अनंतचतुर्दशी ला पोलीस यंत्रणा हि विसर्जनाच्या कामात व्यस्त असते आणि त्यादिवशी नशेचा व्यापार करणाऱ्या आरोपींनी ब्राऊनशुगर आणण्याचा डाव साधला मात्र स्थानिक गुन्हे शाखेने त्यांचा डाव हाणून पाडला.

    चंद्रपुरात पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली

    ६ सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहरात गणेश विसर्जनाचा भव्य मिरवणुकीचा सोहळा सुरु होता, अश्यातच मोठ्या प्रमाणात शहरात मादक पदार्थ येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने नागपूर-चंद्रपूर रोडवरील पडोली चौकात सापळा रचला. काही वेळात चारचाकी वाहन क्रमांक MH३४ BR ७७६५ ला पोलीस पथकाने थांबवित वाहनांची झडती घेतली, सदर वाहनात पोलिसांना २९८ ग्राम ब्राऊनशुगर/हेरॉईन आढळली.

    नशेच्या तस्करीत पोलिसांनी आणलं विघ्न, मोठी कारवाई

    आढळलेल्या ब्राऊन शुगरची आरोपी अवैधरित्या विक्री करणार होते, सदर मादक पदार्थ हे मुंबई वरून आणला असल्याची माहिती आहे. गणेश विसर्जन सोहळ्यात पोलीस आपलं कर्तव्य बजावीत असताना आरोपी ४२ वर्षीय नितीन उर्फ छोटू शंकर गोवर्धन राहणार महात्मा फुले वॉर्ड बाबुपेठ व २३ वर्षीय साहिल सतीश लांबदूरवार राहणार भिवापूर वॉर्ड यांचा हा डाव पोलिसांनी हाणून पाडला हे विशेष. आरोपींने मादक पदार्थ ज्या व्यक्तीकडून आणले त्यावर सुद्धा कारवाई होणार असून सदर प्रकरणी आरोपींची संख्या वाढणार याबाबत पुढील तपास सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली. Ganesh festival drug operation bust 298 grams brown sugar

    मादक पदार्थाची तस्करी करण्याकरिता वापरलेले वाहन, ब्राऊनशुगर, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण ३० लाख १९ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला. आरोपीवर गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पडोली पोलीस करीत आहे. brown sugar heroin trafficking busted in Chandrapur

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शनन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पडोली पोलीस स्टेशनचे सपोनि योगेश हिवसे, सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी धनराज करकाडे, स्वामी चालेकर, नितीन रायपुरे, संतोष येलपुलवार, चेतन गज्जलवार, गणेश मोहुर्ले, गणेश भोयर, जयसिंग, सुरेंद्र महतो, सचिन गुरनुले, दीपक डोंगरे, विजयमाला वाघमारे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, मिलिंद जांभुळे, सुमित बरडे, अजित शेंडे, प्रफुल गारघाटे, प्रमोद डंभारे, मुलींत टेकाम व सायबर पोलिसांनी केली.

  • Ganesh immersion laser light violation । 🚨 गणेश विसर्जनात लेझर लाईटचा वापर! पोलिसांच्या आदेशाकडे डीजे चालकांचे सपशेल दुर्लक्ष

    Ganesh immersion laser light violation

    Ganesh immersion laser light violation : चंद्रपूर – ६ सप्टेंबर २०२६ – चंद्रपुर जिल्ह्यात वेगवेगळ्या तारखेला गणेश मूर्ती विसर्जन वेगवेगळ्या तारखेला आयोजन करण्यात आले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत हजारो नागरिक सहभागी होतात मात्र यावेळी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना बसला आहे. मुख्य मार्गावर स्ट्रीट व हायमास्ट लाईट बंद आहे. आणि विशेष बाब म्हणजे २१ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षकांनी लेझर लाईट वापरावर प्रतिबंध असल्याचा आदेश निर्गमित केला होता, त्या आदेशाला डीजे चालकांनी केराची टोपली दाखवली आहे.

    गणेश विसर्जनाच्या पूर्व संध्येला चंद्रपुरात युवकाची भाईगिरी, चाकू काढत नागरिकांना धमकी

    मानवी जीविताला धोका, आरोग्य, सुरक्षितता व गोंधळ सह भांडणे निर्माण करीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने मिरवणुकीत लेझ लाईट वापरास प्रतिबंध केला असा आदेश सुद्धा निर्गमित करण्यात आला होता. मात्र गणेश उत्सवाच्या धामधुमीत डीजे चालकांनी पोलिसांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर केलाच. Violation of Chandrapur police order

    चंद्रपूर शहरातील ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीत अनेक डीजे चालकांनी लेझर लाईटचा वापर केल्याचे दिसून येत आहे, यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

    लेझर लाईटचे दुष्परिणाम काय?

    लेझर लाईटमुळे अंधत्व येणे, डोळे निकामी होणे, आरोग्याला धोका आणि गोंधळाची स्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्वये 27 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2025 या कालावधीत आयोजित मिरवणुकीमध्ये लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे पोलिस अधिक्षकांच्या आदेशात नमुद आहे.

  • Bhaigiri in Chandrapur । गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला युवकाने माजवली दहशत, चंद्रपूर शहर पोलिसांची तात्काळ कारवाई

    Bhaigiri in Chandrapur

    Bhaigiri in Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपुरातील युवकांना भाईगिरीचे वेड लागले असून याचे अनेक उदाहरणे आपल्याला रस्त्यालगत नेहमीच दिसत असतात, दारू पिऊन कुठेही रस्त्यावर हातात शस्त्र घेऊन दहशत माजविणे हि बाब आता सामान्य झाली आहे, चंद्रपूर शहरात सुद्धा असाच एक प्रकार समोर आला. चंद्रपुरातील चौपाटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रामाला तलाव जवळ एक युवक आपल्या हातात धारदार शस्त्र घेऊन लोकांना धमकावीत होता, काही वेळात शहर पोलिसांनी त्या युवकाच्या मुसक्या आवळल्या.

    चंद्रपूर जिल्ह्यात ५४० इसमांवर हद्दपारीची कारवाई

    गणेश उत्सव शांततेत पार पाडावा यासाठी शहर पोलीस प्रयत्न करीत आहे, यासाठी शहरातील शांतता भंग करणारे ५४० गुन्हेगारी वृत्ती असलेल्या इसमांना आधीच पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे, तरी सुद्धा गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पूर्व संध्येला शहरात धारदार शस्त्र घेऊन नागरिकांना एक युवक धमकावीत असल्याचा प्रकार घडला.

    धारदार चाकू जप्त

    चंद्रपूर शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे रामाला तलाव जवळ त्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले, त्या युवकाच्या ताब्यातील चारचाकी वाहन क्रमांक एमएच३४ AA ६२९१ व वाहनात वाहन चालकाच्या सीटच्या खाली एक धारदार चाकू पोलिसाना मिळाला, सदर चाकू त्या आरोपी इसमाचा आहे असे स्वतः त्याने कबूल केले असे त्याने कबुली दिली. Chandrapur law and order

    आरोपीचे नाव २९ वर्षीय साहिल विश्वजितकुमार सिंग राहणार लालपेठ कॉलरी क्रमांक ३ असे असून त्याच्यावर शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम ४,२५ भारतीय शस्त्र अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत शहर पोलिसांनी ५ लाख १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, भावना रामटेके, सचिन बोरकर, लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, निकेश ढोंगे, जावेद सिद्दीकी, कपूरचंदं खरवार, योगेश पिदूरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, रुपेश पराते. सारिका गौरकार व दीपिका झिंगरे यांनी केली.

  • Sudhir Mungantiwar healthcare response । 🚑 मुल उपजिल्हा रुग्णालयात गैरसोयीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांची जलद कारवाई

    Sudhir Mungantiwar healthcare response

    Sudhir Mungantiwar healthcare response : चंद्रपूर ६ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यतत्परतेचे आणखी एक उदाहरण नागरिकांनी बघितले. सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सगळे व्यस्त आहेत. स्वतः आमदार श्री. मुनगंटीवार देखील विविध मंडळांना भेटी देऊन श्रीगणेशाचे दर्शन घेत आहेत. पण या आनंदात आणि उत्सवाच्या वातावरणातही त्यांनी रुग्णांच्या गैरसोयीची तातडीने दखल घेतली. मुल उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयीच्या तक्रारी प्राप्त होताच वैद्यकीय अधिकाऱ्यांना सगळी कामे सोडून पहिले प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर शल्य चिकित्सकांनी रुग्णालयात पोहोचून पाहणी केली व वैद्यकीय अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले.

    चंद्रपूर भाजप बल्लारपूर मंडळाची कार्यकारणी घोषित

    आमदार श्री. मुनगंटीवार यांनी जनसेवा हिच ईश्वरसेवा मानली आहे. त्यामुळे कुठल्याही कामांच्या, कार्यक्रमांच्या आधी जनहिताच्या कामांना ते प्राधान्य देत असतात. अशाच पद्धतीने त्यांच्याकडे मुल उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या या तक्रारींची दखल घेत त्यांनी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शल्य चिकित्सकांना पत्र लिहून कार्यवाहीचे निर्देश दिले. Mul Sub District Hospital complaint

    रुग्णांची गैरसोय, कारवाई करा

    मुल उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनी विविध तक्रारी आ. श्री. मुनगंटीवार यांच्याकडे दिल्या होत्या. जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्र लिहून आ. श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष घालण्यास सांगितले. ‘मुल उपजिल्हा रुग्णालयामध्ये विविध आजारांवरील उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी माझ्या जनसंपर्क कार्यालयात प्राप्त झालेल्या आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची/कर्मचार्‍यांची अनुपस्थिती, रुग्णांशी असभ्य वर्तन, योग्य प्रकारे विचारपूस न करणे, औषधोपचाराचा तुटवडा तसेच नियमित आणि कंत्राटी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने रुग्णांना होणारी गैरसोय या सर्व बाबींवर योग्य कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. Rural hospital complaints

    यासंदर्भात स्वतः उपजिल्हा रूग्णालय मुल येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व वरील तक्रारींची पुनरावृत्ती होणार नाही याची गांभीर्याने दखल घ्यावी, असेही आ. श्री. मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले. त्यानंतर शल्य चिकित्सकांनी पाहणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांची गैरसोय टाळण्याचे निर्देश दिले. यावेळी मुल येथील भाजपचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.भाजप शहराध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, माजी सभापती मिलींद खोब्रागडे, प्रशांत बोबोटे, सुनील कुकुटकर, संतोष गाजुलवार, राकेश ठाकरे, सूर्यकांत सहारे आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

  • Ballarpur BJP mandal committee appointments । बल्लारपूर भाजपा मंडलात नवे चेहरे – संघटनेला नवी ऊर्जा

    Ballarpur BJP mandal committee appointments

    Ballarpur BJP mandal committee appointments : बल्लारपूर – महाराष्ट्राचे लोकनेते मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील नवनियुक्त भाजपा मंडल अध्यक्षांनी आपापल्या मंडलातील तालुका महामंत्री व आघाडीच्या अध्यक्षांची घोषणा केली आहे.  

    गणेश मंडळासाठी महावितरण ने दिल्या महत्वाच्या सूचना

    बल्लारपूर शहर मंडल बल्लारपुर मंडलाचे अध्यक्ष ॲड. रणजंय सिंह यांनी संघटन महामंत्री म्हणून श्री मनीष पांडे व महामंत्रीपदी सतीश कनकम, देवेंद्र वाटकर, घनश्याम बुरडकर यांची तर युवा मोर्चा अध्यक्षपदी श्री. मिथलेश खेंगर व महीला आघाडी अध्यक्षा सौ वैशाली जोशी यांची घोषणा केली. Ballarpur rural mandal

    बल्लारपूर ग्रामीण

    बल्लारपूर ग्रामीणचे चंद्रकांत देऊळकर यांनी महामंत्रीपदी श्री सुनील फरकडे, श्रावण सातपुते, गणेश टोंगे, रुमदेव देरकर तसेच युवा मोर्चा अध्यक्षपदी श्री. संदीप पोडे, महीला आघाडी अध्यक्षपदी सौ. वैशाली बुद्धलवार यांची घोषणा केली आहे.

    पोंभूर्णा मंडल

    पोंभूर्णा मंडलांचे अध्यक्ष श्री हरिश ढवस यांनी महामंत्रीपदी श्री. विनोद देशमुख, सौ.ज्योती बुरांडे, गुरुदास पिपरे तसेच युवा मोर्चा अध्यक्षपदी श्री अजय मस्के, महीला आघाडी अध्यक्षपदी सौ. वैशाली बोलमवार यांची घोषणा केली आहे.

    मूल ग्रामीण मंडल

    मुल ग्रामीण चे अध्यक्ष श्री. चंदुभाऊ मारगोनवार यानी महामंत्री पदी श्री.संजय येनुरकर,श्री.बंडु  नर्मलवार डॉ.श्री.गुरुदास भेंडारे तसेच युवा मोर्चा अध्यक्ष पदी श्रीधर पाकमोडे , महिला आघाड़ी अध्यक्ष पदी सौ.अर्चना बल्लावार यांची घोषणा केली आहे.

    चंद्रपुर तालुका

    चंद्रपुर तालुका अध्यक्ष श्री.श्रीनिवास जनगम यांनी महामंत्री पदी श्री.शांताराम चौखे,श्री.संजय यादव,श्री.अमोल जगताप,तसेच युवा मोर्चा अध्यक्ष पदी श्री.नागेश कडूकर महिला आघाड़ी अध्यक्ष पदी श्रीमती,अनिता भोयर यांची घोषणा केली आहे. Chandrapur taluka mandal secretary appointments BJP

    मूल शहर

     मूल शहर अध्यक्ष श्री.प्रवीण मोहुर्ले यांनी महामंत्री पदी श्री.प्रशांत बोबाटे,श्री.दादाजी येरणे,श्री.जितेंद्र टिंगसुले तसेच युवा मोर्चा अध्यक्ष पड़ी श्री पंकज लाडवे महिला आघाडी अध्यक्ष पदी श्रीमती,मनिषा गांडलेवार यांची घोषणा केली आहे.

    या घोषणेनंतर भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.हरीश शर्मा यांनी महाराष्ट्राचे लोकनेते मा.आ.सुधीरभाऊंच्या निर्देशनात येत्या दोन दिवसात संपूर्ण मंडल कार्यकारिणी व उर्वरित आघाडी व प्रकोष्ठ चे अध्यक्ष /महामंत्रींची घोषणा करावी असे निर्देश दिले आहे.

    नवनियुक्त महामंत्री व आघाडी  अध्यक्षांचे अभिनंदन व आगामी संगठनात्मक कार्यांसाठी शुभेच्छा महाराष्ट्राचे लोकनेते व माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यानी दिल्या.वरिल नवनियुक्तीचे स्वागत व अभिनंदन केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा.हंसराजभैया अहीर,जिल्हाध्यक्ष श्री.हरीश शर्मा, जेष्ठनेते श्री.चंदनसिंह चंदेल,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा सौ.संध्याताई गुरुनुले,प्रदेश सचिव  सौ.विद्याताई देवाडकर,प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ.रेणुकाताई दुधे,महिला आघाडी  प्रदेश महामंत्री कु.अल्काताई आत्राम, जिल्हा महामंत्री डॉ.मंगेश गुलवाड़े, श्री.विवेक बोढे,श्री.रामपाल सिंह,माजी नगराध्यक्षा सौ.रत्नमालाताई भोयर,पोंभुर्णा नगर पंचायत अध्यक्षा सौ.सुलभाताई पिपरे,उपाध्यक्ष श्री.अजीत मंगळगिरीवार,श्री. प्रभाकरराव भोयर,श्री.किशोर पंदिलवार,श्री.काशीनाथ सिंह,श्री.हनुमान काकडे,श्री.नंदु रणदिवे,श्री.राहुल संतोषवार,श्री.राजु बुद्धलवार आदी पदाधिकार्‍यांनी केले आहे.

  • bogus workers wage fraud । CTPS मध्ये Bogus Workers Wage Fraud प्रकरण – मनसेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

    bogus workers wage fraud

    bogus workers wage fraud : चंद्रपूर ५ सप्टेंबर २०२५- सीटीपीएस च्या एस. व्ही. इंटरप्राईजेस या कंत्राटी कंपनीमध्ये बोगस कामगार दाखवून व हजेरी बुकावर बोगस सह्या मारून 15 कामगारांचे वेतन हडपले असल्याची गंभीर बाब समोर आली असून सीटीपीएस ला करोडोंचा चुना लावल्या जातं असल्याने याची सखोल चौकशी करण्याची मागणी मनसे कामगार सेना ने पत्रपरीषदेत केली आहे. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी प्रशासनाला दिला आहे.

    भाजपचा विजय, मात्र अध्यक्षांवर गुन्हा दाखल

    सीटीपीएस मध्ये एस.व्ही.इंटरप्राईजेस ही कंपनी 2 ते 3 वर्षांपासून युनिट क्रमांक 2 व 3 मध्ये बेल्ट कन्वर्शन, प्लॅटफॉर्म जाळ्या लावणे, शेडडाऊन, डांपिंग प्लेट रिप्लेसमेंट इत्यादी कामे करत आहे. दरम्यान या कंपनी मध्ये काम करणायां कामगारांची नावे हजेरी बुकावर नोंदविण्यात आली. त्यामध्ये मोठा घोळ असून मिळालेल्या दास्तावेज नुसार या कंपनी मध्ये एकूण 15 कामगार कर्मचारी काम करतात असे नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात या कंपनी मध्ये केवळ 5 कामगारचं काम करत असल्याची माहीती अंधेवार यांनी दिली. CTPS contractor SV Enterprises

    कंत्राटदार यांचेसह संबंधित सीएसटीपीएस अधिकायांवर कारवाई करावी

    कंपनीत प्रणतोष हरिपद इजारदार, नितेश दामोधर दानव, रमेश आंनदराव भोंगरे, रामेश्वर सदाशिव खोब्रागडे, राजकुमार जुनघरे इत्यादी आहेत. मात्र सीटीपीएस प्रशासनाकडे पाठविण्यात आलेल्या यादीत इतर 10 लोकं कोण आहेत, त्यांची नोंद ह्या रेकॉर्डवर का घेण्यात आले याची सखोल चौकशी करून त्या पाच कामगारांना कामावरून कमी केले त्यांना कामावर घ्यावे व कंत्राटदार यांचेसह संबंधित सीएसटीपीएस अधिकायांवर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी मुख्य अभियंता राजेंद्र राठोड यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. bogus attendance scam

    पुढे सांगीतले की, एस. व्ही. इंटरप्राईजेस या कंत्राटी कंपनीमध्ये बोगस कामगार दाखवून व हजेरी बुकावर बोगस सह्या मारून 15 कामगारांचे वेतन घेण्यात येत आहे ही अतिशय गंभीर बाब असून अशा किती कंत्राटी कंपन्या आहेत. ज्या कंत्राटी कंपनी मध्ये असे बोगस कामगारांना दाखवून कंपनीला कोट्यावधी रुपयांचा चुना लावल्या जातं आहे याची सखोल चौकशी करावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची मागणी असून सीएसटीपीएस कंपनीच्या संबंधित अधिकायांशिवाय हा घोळ होऊ शकत नाही त्यामुळे कमिशनखोरी करणाया अधिका_यांवर पण कारवाई करावी आणि कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषदेतून मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी प्रशासनाला दिला आहे.

    पत्रपरीषदेत मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष रमेश काळाबाधे, सुनील गुढे, पियुष धुपे उपस्थित होते.

  • Ganesh Visarjan electrical safety guidelines । महत्वाची सूचना, गणेशोत्सवात सुरक्षितता प्रथम – विसर्जनावेळी विजेपासून कशी घ्याल काळजी?

    Ganesh Visarjan electrical safety guidelines

    Ganesh Visarjan electrical safety guidelines : चंद्रपूर :- ५ सप्टेंबर २०२५ – यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. मिरवणुका, डीजे आणि ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं विसर्जन केलं जातं मात्र या आनंदाच्या वातावरणात विद्युत सुरक्षेची काळजी घेणे खूप महत्त्वाचा आहे. अनेकदा विजेच्या तारा, खांब आणि इलेक्ट्रिक उपकरणांमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत आणि विसर्जन स्थळी विद्युत अपघात टाळण्यासाठी काही महत्त्वाचे नियम पाळण्याचे आवाहन महावितरण ने केले आहे.

    मराठा समाजाचे ओबीसीकरण, चंद्रपुरात शासन निर्णयाची होळी

    Avoid electrical accidents during Ganesh Visarjan immersion

    मिरवणूक सुरू करण्याआधी मंडळाने ठरवलेला मार्ग व्यवस्थित तपासा. रस्त्यात असलेले विजेचे खांब, लोंबकळणाऱ्या तारा, ट्रांसफार्मर आणि ओपन जंक्शन बॉक्सची माहिती आधीच घ्या. शक्य असल्यास विजेच्या तारांना स्पर्श होणार नाही अशा कमी उंचीच्या वाहनांचा वापर करा.

    विद्युत उपकरणे आणि सजावट

    मंडपातील विद्युत सजावट आणि मिरवणुकीतील लाइटिंगसाठी योग्य दर्जाच्या आणि सुरक्षित उपकरणांचा वापर करा. निकृष्ट दर्जाच्या तारा किंवा जोडण्या वापरू नका. शक्यतो प्रमाणित (एग मार्क) असलेली सामग्रीच वापरा. जनरेटर किंवा बॅटरीचा वापर करताना ते योग्य ठिकाणी ठेवा आणि त्यांच्या वायर्स सुरक्षित आहे त्याची खात्री करा. पाण्यात किंवा ओल्या जागेवर कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर टाळा. Ganesh Visarjan generator and wiring safety

    मिरवणुकीतील सावधगिरी

    मिरवणुकीत जनरेटर ट्रॉलीवर असेल तर ती इतर वाहनांपासून सुरक्षित अंतरावर ठेवा. मिरवणूक मार्गावर असलेले विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा तारांच्या जवळ येताच मोठा आवाज किंवा ढोल ताशांचा गजर थांबवा. मूर्तीची उंची जास्त असेल तर विजेच्या तारांपासून सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी मिरवणुकीच्या पुढे जाणारे स्वयंसेवक ठेवा.

    पाण्यात असताना

    विसर्जन करताना मूर्तीसोबत कोणतीही विद्युत उपकरणे किंवा लाइटिंग चे साहित्य पाण्यात टाकू नका. तुम्ही पाण्यात उतरून विसर्जन करत असाल तर तुमच्या शरीराचा विजेच्या कोणत्याही तारांशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्या. पाण्यात उतरण्याआधी मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे काढून ठेवा.
    तुम्हाला कुठेही तुटलेल्या वायर्स, ओपन जंक्शन बॉक्स किंवा विजेची ठिणगी पडताना दिसली तर तात्काळ त्या ठिकाणच्या पोलिसांना किंवा महावितरण ला कळवा अशावेळी त्या जागेपासून सुरक्षित अंतर ठेवा आणि इतर लोकांनाही सावध करा.

  • blood moon lunar eclipse 2025 । खग्रास चंद्रग्रहण 2025: भारतात कधी, कुठे आणि किती वेळ दिसणार ‘रेड मून’?

    blood moon lunar eclipse 2025

    blood moon lunar eclipse 2025 : चंद्रपूर – 7 सप्टेंबर रोजी भारतातून खग्रास चंद्र ग्रहण दिसणार असून खगोल आणि विज्ञान अभ्यासकांना हे ब्लड मून,रेड मून पाहण्याची चांगली संधी मिळणार आहे.रात्री 9.57 मिनिटांनी खंडग्रास ग्रहणाला सुरवात होऊन 12.22 वाजेपर्यंत ते पाहता येईल अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुप चे अध्यक्ष प्रा सुरेश चोपने ह्यांनी दिली आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात ५४० इसमांना केले हद्दपार

    ह्या वर्षी फारसे ग्रहण भारतातून दिसले नाही.त्यामुळे हेच खग्रास चंद्र ग्रहण चांगल्या पद्धतीने पाहण्याची संधी मिळणार आहे. हे ग्रहण एकूण 5 तास 27 मिनिटे दिसणार आहे,त्यात छायाकल्प चंद्रग्रहनाची सुरवात रात्री 9 वाजता होईल. खंडग्रास ग्रहणाची सुरुवात 9.57 वाजता होईल तर खग्रास ग्रहण रात्री 11 वाजता सुरू होईल आणि ते रात्री 12.22 वाजेपर्यंत दिसेल. ह्याच दरम्यान चंद्र लाल रंगाचा दिसेल म्हणून त्याला ब्लड मून, रेड मुन असे म्हटल्या जाते. Chandra Grahan 2025

    खग्रास स्थिती ही 2 तास 7 मिनिटांची असेल. आकाशात ढगाळ हवामान नसेल तर त्या ठिकाणी खूप सुंदर ग्रहण पाहता येईल. कुठलीही अंधश्रद्धा न बाळगता ग्रहणाचा खगोलीय आणि वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण आणि अभ्यास करावा असे आवाहन सुद्धा प्रा सुरेश चोपणे ह्यांनी केले आहे.

    21 सप्टेंबर ला शेवटचे सूर्यग्रहण

    21 सप्टेंबर ला ह्या वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण दिसणार आहे,परंतु ते भारतातून दिसणार नाही. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक, अटाटिक आणि न्यूझीलंड ह्या देशातील काही भागातूनच ही सूर्यग्रहण पाहता येणार आहे अशी माहिती स्काय वॉच ग्रुप तर्फे देण्यात आली आहे.

  • prohibited criminals ban during festival । 🚔 गणेशोत्सवात शांततेसाठी चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई – 540 गुन्हेगार हद्दपार

    prohibited criminals ban during festival

    prohibited criminals ban during festival : चंद्रपूर ५ सप्टेंबर २०२५ – २७ ऑगस्टपासून राज्य व देशात गणेशोत्सवाची धूम सुरु आहे, लाखो भाविक दररोज श्री गणेशाचे दर्शन घेत असून या उत्सवात विघ्न पडू नये याकरिता पोलिसांनी कम्बर कसली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता भंग करणारे तब्बल ५४० गुन्हेगारी वृत्तीच्या इसमांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

    शासनाच्या निर्णयाची चंद्रपुरात होळी

    शांततेत उत्सव साजरा होणार

    सण उत्सव साजरे करीत असताना शांतता व सलोखा अबाधित ठेवण्यासाठी पोलीस सदैव प्रयत्नशील असतात, मात्र समाजातील विघातक प्रवृत्ती आपली या शांततेत विघ्न टाकण्याचे काम करीत असतात, सध्या चंद्रपूर जिल्ह्यात गणेश उत्सवाची धुमधाम सुरु आहे, ६ सप्टेंबर रोजी अनंतचतुर्दशी ला गणेश विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे, यानिमित्ताने जिल्ह्यातील लाखो भाविक मिरवणुकीत सहभागी होतात. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. police ban repeat offenders during Ganesh immersion

    जिल्ह्यात सामाजिक सलोखा कायम रहावा याकरिता पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन प्रभारी यांनी आपापल्या पोलीस स्टेशन हद्दीत शांतता भंग करणारे एकूण ५४० इसमांविरुद्ध कलम १६३ (२) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अन्वये गुन्हगेरे वृत्तीच्या इसमांना पोलीस स्टेशन हद्दीत येण्यास मनाईचा हुकूम व्हावा असे प्रस्ताव तयार करीत उपविभागीय कार्यालयात पाठवून तब्बल ५४० इसमाविरुद्ध हद्दपार चा आदेश पारित करण्यात आला.

  • Maratha OBC inclusion controversy |मराठा समाजाच्या OBC करणावर वादळी वातावरण; चंद्रपुरात शासन निर्णयाची होळी

    Maratha OBC inclusion controversy

    Maratha OBC inclusion controversy : चंद्रपूर – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेत शासन निर्णय काढला, मराठे आता थेट ओबीसी मध्ये शिरणार याविरुद्ध ओबीसी समाजाने दंड थोपटले आहे. चंद्रपुरात सकल ओबीसी समाजाने शासन निर्णयाची होळी केली. मराठा समाजाचे ओबीसीकरण म्हणजे ओबीसी समाजावर अन्याय आहे हा निर्णय सरकारने तात्काळ रद्द करावा अशी मागणी ४ सप्टेंबर रोजी झालेल्या आंदोलनात ओबीसी समाजाने केली.

    चंद्रपुरात पावसामुळे पूल वाहून गेला

    गांधी चौकात सकल ओबीसी समाजाच्या वतीने शासनाने मराठा समाजाच्या बाजूने काढलेल्या जीआर ची होळी करण्यात आली.हैद्राबाद गॅझेट मधील नोंदीच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे म्हणजे ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची थेट घुसखोरी आहे, हि घूसखारी आम्ही सहन करणार नाही, जात प्रमाणपत्र मिळविण्याची एक पद्धत सामाजिक न्याय विभाग व महसूल प्रशासनाने निश्चित केली आहे. मात्र शासनाने मराठा समाजाच्या बाबतीत नियमांची पायमल्ली केली आहे. OBC activists protest Maratha OBC decision

    निर्णय रद्द करा

    जर ४८ तासांच्या आत शासनाने मराठा समाजाबाबत घेतलेला शासन निर्णय रद्द केला नाही तर राष्त्री मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांना चंद्रपूर जिल्हा व राज्यात फिरू देणार नाही, ते आयोगाचे अध्यक्ष असून त्यांनी तात्काळ महाराष्ट्र शासनाला सदर निर्णय रद्द करण्याचे आदेश द्यावे, अन्यथा आम्ही अहिर यांना घेराव टाकू.

    आयोजित आंदोलनात पप्पू देशमुख, रामू तिवारी, नंदू नागरकर, प्रवीण पडवेकर, मनीषा बोबडे, अनिल डहाके, अजय वैरागडे, चंदा वैरागडे, कुसुम उदार व विविध जातीय संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.