Blog

  • Jan Suraksha Bill black law । ‘काळा कायदा’ तात्काळ रद्द करा!, महाविकास आघाडीचा हल्लाबोल

    Jan Suraksha Bill black law

    Jan Suraksha Bill black law : चंद्रपूर, १० सप्टेंबर २०२५ – महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या जनसुरक्षा विधेयक २०२४ विरुद्ध आज चंद्रपूरच्या गांधी चौकात महाविकास आघाडीने तीव्र आंदोलन केले. हे विधेयक लोकशाहीच्या मूल्यांना मुठमाती देणारे असून, हुकूमशाही प्रवृत्तीला खतपाणी घालणारे असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. विरोधकांनी या कायद्याला ‘काळा कायदा’ असे ठामपणे घोषित केले आहे.

    या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश रामू तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे सुरेश पचारे, कम्युनिस्ट पक्षाचे अरुण भेलके, तसेच महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    घुग्गुस मध्ये जनसुरक्षा विधेयक विरोधात महाविकास आघाडी चे निदर्शने

    जनतेचा आवाज दडपणार

    आंदोलनात सहभागी सर्व मान्यवरांनी एकमुखाने सांगितले की, “राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा कायदा घाला घालतो. आधीच अस्तित्वात असलेल्या कायद्यांद्वारे सुरक्षा व्यवस्थापन शक्य आहे; त्यामुळे नवीन कायद्याची गरजच नव्हती. हा कायदा नक्षलवाद्यांच्या नावाखाली जनतेचा आवाज दडपण्यासाठी वापरण्यात येणार आहे. Maha Vikas Aghadi protests Jan Suraksha Bill

    सरकारविरोधात बोलणाऱ्यांना, पत्रकारांना तुरुंगात टाकण्यासाठी या कायद्याचा गैरवापर होईल. जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. जर हा कायदा मागे घेतला गेला नाही, तर राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. 

  • apple iphone 17 pro max । कसा आहे नवा iphone 17? जाणून घ्या सोप्या भाषेत

    apple iphone 17 pro max

    apple iphone 17 pro max : टेक ३४ – १० सप्टेंबर २०२५ – iPhone 17: प्रमुख वैशिष्ट्ये आणि आढावा

    अॅपलने नुकताच आपला नवा आयफोन 17 लाँच केला आहे. या वर्षी, कंपनीने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, विशेषतः डिझाइन, परफॉर्मन्स आणि कॅमेरात. चला तर, या नव्या फोनची काही प्रमुख वैशिष्ट्ये आणि त्याचा एकंदरीत अनुभव जाणून घेऊया.

    REALME १५T दमदार मोबाईल आला बाजारात

    1. नवीन डिझाइन आणि मॉडेल्स

    या वर्षी, अॅपलने नेहमीच्या चार मॉडेल्सच्या व्यतिरिक्त, एक नवीन, अल्ट्रा-स्लिम ‘आयफोन एअर’ मॉडेल सादर केले आहे.

    • iPhone 17 Pro आणि Pro Max: या मॉडेलमध्ये अॅल्युमिनियम युनिबॉडी डिझाइन आहे. टायटॅनियमऐवजी अॅल्युमिनियमचा वापर उष्णता चांगल्या प्रकारे बाहेर टाकण्यास मदत करतो.
    • iPhone Air: हा सर्वात पातळ आणि हलका आयफोन आहे. यामध्ये कमी जाडी असूनही बॅटरी लाईफ चांगली आहे.
    • डिस्प्ले: सर्व iPhone 17 मॉडेल्समध्ये आता ‘प्रोमोशन डिस्प्ले’ (ProMotion display) आहे. याचा अर्थ 120Hz रिफ्रेश रेट आता फक्त प्रो मॉडेलपुरता मर्यादित नाही, ज्यामुळे वापरकर्त्यांना अधिक चांगला आणि स्मूथ अनुभव मिळतो.

    2. कॅमेरा

    कॅमेरा हा या फोनचा एक मोठा प्लस पॉइंट आहे.

    • 48MP ‘फ्यूजन कॅमेरा’: iPhone 17 आणि iPhone Air मॉडेल्समध्ये 48MP चा मुख्य कॅमेरा आहे. हे ‘डुअल फ्यूजन’ सिस्टीम वापरते, जे चांगल्या रिझोल्यूशनसाठी 48MP आणि 2x झूमसाठी 24MP मध्ये फोटो काढू शकते.
    • प्रो मॉडेल्ससाठी अपग्रेड: iPhone 17 Pro आणि Pro Max मध्ये तीन 48MP कॅमेरे आहेत – मेन, अल्ट्रा वाइड आणि टेलीफोटो. टेलीफोटो लेन्समध्ये 8x ऑप्टिकल झूम आहे, जो आतापर्यंतच्या आयफोनमधील सर्वात जास्त झूम आहे.
    • ‘सेंटर स्टेज’ फ्रंट कॅमेरा: सर्व मॉडेल्समध्ये 18MP चा नवीन फ्रंट कॅमेरा आहे, जो ‘सेंटर स्टेज’ वैशिष्ट्यासह येतो. व्हिडिओ कॉल्सदरम्यान हे वैशिष्ट्य तुम्हाला फ्रेमच्या मध्यभागी ठेवते. dual fusion 48MP camera performance

    3. परफॉर्मन्स आणि बॅटरी

    • A19 आणि A19 प्रो चिप: iPhone 17 मध्ये नवीन A19 चिप आहे, जी मागील मॉडेलपेक्षा 20% वेगवान आहे. Pro आणि Air मॉडेल्समध्ये अधिक शक्तिशाली A19 प्रो चिप आहे, जी 40% चांगली कामगिरी देते.
    • बॅटरी लाईफ: नवीन डिझाइन आणि चिपच्या कार्यक्षमतेमुळे, आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये आतापर्यंतची सर्वात चांगली बॅटरी लाईफ मिळते.

    4. किंमत

    आयफोन 17 ची भारतातील किंमत खालीलप्रमाणे आहे (256GB स्टोरेजसाठी): iPhone 17 series India price

    • iPhone 17: ₹ 82,900 पासून सुरू
    • iPhone Air: ₹ 1,19,900 पासून सुरू
    • iPhone 17 Pro: ₹ 1,34,900 पासून सुरू
    • iPhone 17 Pro Max: ₹ 1,49,900 पासून सुरू

    अंतिम मत

    iPhone 17 ही अॅपलची एक मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे. प्रोमोशन डिस्प्ले सर्व मॉडेल्समध्ये देणे, नवीन एअर मॉडेल सादर करणे आणि कॅमेऱ्यात मोठे अपग्रेड करणे हे या फोनचे प्रमुख वैशिष्ट्य आहेत. जर तुम्ही तुमच्या जुन्या आयफोनमधून अपग्रेड करण्याचा विचार करत असाल, तर आयफोन 17 ही एक चांगली निवड ठरू शकते. मात्र, किंमत थोडी जास्त आहे, त्यामुळे तुमच्या गरजेनुसार मॉडेल निवडणे महत्त्वाचे आहे.

  • Maha Vikas Aghadi protests Jan Suraksha Bill । जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची महाविकास आघाडीची मागणी, घुग्गुसमध्ये निषेध आंदोलन

    Maha Vikas Aghadi protests Jan Suraksha Bill

    Maha Vikas Aghadi protests Jan Suraksha Bill : घुग्घूस १० सप्टेंबर २०२५ : शहरातील गांधी चौकात महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल नरुले, शहर अध्यक्ष राजुरेड्डी, शिवसेना(उबाठा ) शहर प्रमुख बंटी घोरपडे, ज्येष्ठ नेते गणेश शेंडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहर अध्यक्ष शरद कुमार ज्येष्ठ नेते सत्यनारायण डकरे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत सरकार विरोधातील बॅनर फलक घेऊन महायुती सरकार भाजपा सरकार मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध आंदोलन करण्यात आले.

    चंद्रपुरात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

    महाराष्ट्रातील महायुती शासनाने विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 हे विधानसभा व विधानपरिषदेत पारित केले असून राज्यपालांच्या स्वाक्षरी नंतर हा कायदा महाराष्ट्रात लागू केल्या जाणार आहे.
    महायुती शासन या कायद्याची स्पष्टपणे खुलासा करीत नाही हा कायदा शहरी नक्सलवादाला आळा घालण्यासाठी केल्या जात असल्याचे सांगितले जात आहे हा कायदा लागू झाल्यास सरकार विरोधी मत मांडणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनावर अनिर्बंध कारवाईचे अधिकार सरकारला मिळतील. Maharashtra black law Jan Suraksha Bill reaction

    उपोषण, बेकायदेशीर ठरविण्यात येतील

    बेकायदेशीर संघटना व त्यांचे कृत्य याबद्दल शासनाने स्पष्टता केली नसून मोघम व्याख्या केलेली आहे.
    केवळ एक अधिसूचना काढून कोणत्याही संघटनेला बेकायदेशीर ठरविण्याचा अधिकार सरकारला मिळेल
    संघटना बेकायदेशीर केल्यास त्यांची सर्व स्थावर जंगम मालमत्ता जप्ती करण्यात येईल त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना इतकेच नव्हे तर त्यांच्या सभेला जाणाऱ्या व्यक्तींना सात वर्षा पर्यंत तुरुंगात डांबण्याचा अधिकार मिळेल
    जमावबंदी मोडल्यास शांततेत चाललेलं मोर्चा, उपोषण, बेकायदेशीर ठरविण्यात येतील कामगार संघटना सरकारी कर्मचारी यांचा संप बेकायदेशीर ठरविल्यास ते सुद्धा कारवाईस पात्र ठरतील.

    महाविकास आघाडीचे निषेध आंदोलन

    सामाजिक चळवळी, जनआंदोलन आणि विरोधीपक्षांना दडपण्यासाठी या कायदाचा वापर केला जाणार सामाजिक कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा हत्यार म्हणून कायद्याचा वापर होईल राज्यातील संसाधने जमीन,जंगल, बंदर, रस्ते, आदी उद्योगपतीना देतांना होणारा जनविरोध दाबण्यात कायदाचा वापर होईल म्हणून अश्या या काळ्या कायद्याचा आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले, घुग्घूस महाविकास आघाडीच्या वतीने गांधी चौक येथे दुपारी 12 वाजता हातात फलक व बॅनर घेऊन शासना विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले. Maha Vikas Aghadi demands repeal public security law

    याप्रसंगी शिवसेनेचे चेतन बोबडे, अमित बोरकर, लक्ष्मण बोबडे, हेमराज बावणे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते काँग्रेस नेते सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, ज्येष्ठ नेते मुन्ना लोहानी, जिल्हा महासचिव अलीम शेख, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, ज्येष्ठ नेते जगन्नाथ आस्वाले, किशोर आवळे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, शेख शमिउद्दीन,एस्सी सेल तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा, Maha Vikas Aghadi protests Jan Suraksha Bill

    तालुका उपाध्यक्ष सिनू गुडला,शेखर तंगडपल्ली एस्सी सेल जिल्हा उपाध्यक्ष कल्याण सोदारी,महिला जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के, संध्या मंडल, पूनम कांबळे, प्रीती तामगाडगे, भाविका आटे, जोया शेख,एन. एस. यु. आय अध्यक्ष आकाश चिलका, सुनील पाटील, अरविंद चहांदे,कुमार रुद्रारप, कपील गोगला, देव भंडारी, दिपक पेंदोर, शहंशाह शेख, संजय कोवे, दिपक कांबळे, अनवर सिद्दीकी, जय मेश्राम,अंकुश सपाटे, व मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

  • Shree Ganesha Arogyacha health camp । श्रीगणेशा आरोग्याचा शिबिरात 896 नागरिकांची मोफत तपासणी

    Shree Ganesha Arogyacha health camp

    Shree Ganesha Arogyacha health camp : चंद्रपूर 10 सप्टेंबर – गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत 896 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे करण्यात आली.  

    राजुरा बोगस मतदार नोंदणी प्रकरण, न्यायालयात दाद मागणार – माजी आमदार सुभाष धोटे

    896 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

       28 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत मनपाच्या 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे 7 आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरांतून 307 पुरुष व 470 महिला तसेच 119 लहान बालके अश्या 896 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान कुठल्याही नागरिकाला आजार आढळला नाही.

       या शिबिरांत न्यू बाल गणेश मंडळ,हनुमान नगर गणेश मंडळ,याहू गणेश मंडळ,बाल बलवंत गणेश मंडळ,आदर्श विद्यार्थी गणेश मंडळ,एकता गणेश मंडळ,नूतन युवक गणेश मंडळ ही गणेश मंडळे सहभागी झाली होती. शिबिरांच्या यशस्वीतेसाठी  वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार,डॉ. अश्विनी भारत,डॉ.आरवा लाहिरी,डॉ.योगेश्वरी गाडगे,डॉ.शरयु गावंडे,डॉ.नेहा वैद्य,डॉ. जयश्री मालुसरे, डॉ अल्फीया खान यांचा सहभाग लाभला.

  • Male Leopard found dead । चंद्रपूरात नर बिबट्याचा रहस्यमय मृत्यू

    Male Leopard found dead

    Male Leopard found dead : चंद्रपूर : 9 सप्टेंबर 2025 – सावली वनपरिक्षेत्रांतर्गत मूल तालुक्यातील टेकाडी येथे सुनील गेडाम यांच्या पोल्ट्री फार्मलगच्या शेतात एक नर बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागामध्ये खळबळ उडाली आहे. स्थानिक वनरक्षकाच्या माहितीवरून त्याला जेरबंद करण्याची सर्व तयारी करण्यात आली असताना शोध मोहिमेदरम्यान तो मृतावस्थेत आढळून आला.

    घराबाहेर भांडे घासत असताना महिलेवर वाघाचा हल्ला

    सावली वनपरिक्षेत्रांतर्गत मूल तालुक्यातील टेकाडी येथे सुनील गेडाम यांच्या पोल्ट्री फार्मलगच्या शेतातील झुडपात एक बिबट दडून असल्याची माहिती स्थानिक वनरक्षकाला मिळाली त्यांनी लगेच वरिष्ठांना माहिती दिली. त्यावरून विभागीय वनाधिकारी तलमले, सहाय्यक उपवनसंरक्षक तरसे आणि सावली वनपरिक्षेत्राधिकारी धुर्वे यांचे नेतृत्वात बिबट्याला रेस्क्यू करून जेरबंद करण्याचे नियोजन करण्यात आले. Mul taluka leopard death

    बिबट्याची शोधाशोध आणि…

    याकरीता चंद्रपूर टी.टी.सी.चे डॉक्टर, अतिशीघ्र कृती दलाचे कर्मचारी, वनकर्मचारी आणि संजीवन पर्यावरण संस्था मूल चे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला बेशुद्ध करून सुरक्षितपणे पकडण्याचे नियोजन पूर्ण झाले. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम राबविण्यास सुरूवात झाली. वनविभागाच्या पथकाकडून बिबट्याची शोधाशोध सुरू असताना बिबट मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे वनाधिकाऱ्यांना धक्काच बसला. लगेच वरिष्ठांना माहिती देण्यात आली. त्यानंतर मृत बिबट्याला ताब्यात घेऊन सावली वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले. त्या ठिकाणी डॉ. कुंदन पोडचलवार यांनी सहाय्यक उपवनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या समक्ष बिबट्याचे शवविच्छेदन केले आणि त्या ठिकाणीच दहन करण्यात आले.

    शवविच्छेदन वेळी डॉ. कुंदन पोडचलवार, क्षेत्र सहाय्यक एन.एस. सिडाम, वनरक्षक एस.डब्लू. बोनलवार, लंकेश आखाडे, अतिशीघ्र कृती दलाचे शूटर अविनाश फुलझेले, कीशोर डांगे, मनोज चावरे, अंकीत पडगेलवार, संजीवन पर्यावरण संस्था मूल चे उमेशसिंह झिरे, तरुण उपाध्ये, तन्मयसिंह झिरे, हौशिक मंगर, अक्षय दुम्मावार, टेकाडी पी.आर.टी. टीम व सहाय्यक वनमजूर उपस्थित होते. Chandrapur wildlife incident

    याच परिसरात चार दिवसांपूर्वी ३०० कोंबड्यांना ठार करणारी मादी बिबट जेरबंद करण्यात आली होती. सध्या मृत अवस्थेत सापडलेला बिबट नर जातीचा आहे. नर आणि मादी बिबट दोघेही या परिसरात एकत्र वावरत असावेत असा वनविभागाचा कयास आहे. टेकाडी परिसर सादागडच्या घनदाट जंगलाच्या जवळ असल्याने येथे वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यामुळे याच परिसरात नर मादी बिबट राहत असावेत असे अशी प्रतिक्रिया वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वन विभाग परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून, परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचे आणि वन्यप्राण्यांची कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वन विभागाला कळविण्याचे आवाहन केले आहे.

  • Rajura Voter Fraud Case । राजुरा बोगस मतदार नोंदणी, माहितीसाठी प्रशासनाची ना!, कारवाई नाही तर न्यायालयीन लढा

    Rajura Voter Fraud Case

    Rajura Voter Fraud Case : मुंबई – ९ सप्टेंबर २०२५ – भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने हातात हात घालून मतचोरी केल्याचे एकाएका मतदार संघातील घोटाळे काँग्रेस पक्ष उघड करत आहे. राहुल गांधी यांनी महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश करून भाजपा व आयोगाच्या भ्रष्ट युती पुढे आणली आहे. महादेवपुराप्रमाणे मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही झाला असून याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे पण ११ महिने झाले तरी अद्याप यावर कोणतीच कारवाई होत नाही. या मतचोरी प्रकरणी पुढील एका महिन्यात कारवाई करावी अन्यथा काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे. Rajura voter fraud exposed

    चंद्रपूर जिल्हा कांग्रेस प्रभारीपदी आमदार अभिजित वंजारी यांची निवड

    गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मतचोरीची माहिती देताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या ५ महिन्यांच्या कालावधीत राजुरा मतदारसंघात ५५ हजार मतदारांची वाढ करण्यात आली. राजुरा मतदारसंघात १ ऑक्टोबर २०२४ ते १५ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ११ हजार ६६७ ऑनलाईन बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली होती.

    तक्रार दाखल मात्र कारवाई नाही

    यासंदर्भात काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी रितसर तक्रार दाखल केल्यानंतर ६८५३ मते डिलिट करण्यात आली. याप्रकरणी एफआयआर ही दाखल करण्यात आला आहे. पण पुढे काहीच कारवाई केलेली नाही. ही ऑनलाईन बोगस मतदार नोंदणी करण्यात आली त्याचे IP address, email id आणि मोबाईल नंबर ची माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे पण आजपर्यंत ती देण्यात आलेली नाही. ही माहिती दिल्यास चोर कोण, हे उघड होईल म्हणून पोलीस व प्रशासन माहिती देत नाही. bogus voter registration Rajura

    अतुल लोंढे पुढे म्हणाले की, राजुरा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवाराकडे ६१ लाख रुपये व निवडणूक साहित्य सापडले. निवडणूक आयोगाच्या FST पथकाने ही कारवाई केली आहे, गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पण आजपर्यंत यावरही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. मतचोरी प्रकरणी काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांनी निवडणूक आयोग, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्याकडे वारंवार निवेदन देऊनही कारवाई संदर्भात काहीच हालचाल केली जात नाही. मतचोरी प्रकरणी काँग्रेस जनतेच्या न्यायालयात लढा देत आहेच पण न्यायालयातही लढा देऊ, असे अतुल लोंढे म्हणाले.

    चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राजुरा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष धोटे यांनीही यावेळी मतचोरीप्रकरणाची सविस्तर माहिती दिली.

  • prenatal sex determination । 🚨 चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा : बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर कडक कारवाई!

    prenatal sex determination

    prenatal sex determination : चंद्रपूर – ९ सप्टेंबर २०२५ –  गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्राचा वापर करून बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान करणे व गर्भपात करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी  विनय गौडा जी.सी. यांनी दिले.

    जिल्हाधिकारी कार्यालयातील विस कलमी सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, डॉ.भास्कर सोनारकर, डॉ. नयना उत्तरवार तसेच आरोग्य विभागातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    दूरसंचार विभागाचे केबल चोरणारी टोळी जेरबंद

    जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान केंद्रांविषयी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. माहितीच्या आधारे खातरजमा होऊन संबंधित व्यक्ती किंवा केंद्राविरुद्ध खटला दाखल झाल्यास माहिती देणाऱ्यास शासनातर्फे 1 लाख रुपये व चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 25 हजार रुपये, असे एकूण 1 लाख 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तसेच, स्टींग ऑपरेशनसाठी सहभागी होणाऱ्या गर्भवती महिलेस न्यायालयीन खटला दाखल झाल्यानंतर शासनातर्फे 1 लाख व महापालिकेतर्फे 25 हजार रुपये, असे एकूण 1 लाख 25 हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. reward for reporting illegal fetal sex

    सर्व अल्ट्रासाऊंड केंद्रे, रुग्णालये व दवाखान्यांची काटेकोर तपासणी करावी, बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्टींग ऑपरेशन्स वाढविणे, सर्व सोनोग्राफी केंद्रांची दर तीन महिन्यांनी तपासणी करणे, तसेच 12 आठवड्यांपेक्षा अधिक गर्भपात करणाऱ्या केंद्रांना आवर्जून भेट देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

    शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सर्व कागदपत्रे, अहवाल व नोंदवही काटेकोर तपासावीत, यामध्ये निष्काळजीपणा होऊ नये, आवश्यकतेनुसार पोलिस विभाग व इतर शासकीय कर्मचाऱ्यांचे सहकार्य घ्यावे, असेही त्यांनी सुचविले. district collector orders unregistered ultrasound center raids

    टोल फ्री द्वारे माहिती द्या

    जन्मापूर्वी मुलगा किंवा मुलगी आहे हे जाणून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा बेकायदेशीर कृत्याची माहिती नागरिक खालील टोल फ्री क्रमांक व माध्यमांद्वारे देऊ शकतात : 18002334475 (शासन टोल फ्री हेल्पलाईन), 104 (आरोग्य टोल फ्री क्रमांक), 18002574010 (मनपा टोल फ्री क्रमांक), व्हॉट्सॲप : 8530006063, संकेतस्थळ : www.amchimulgimaha.in, तक्रार निवारण ॲप :  https://grievance.cmcchandrapur.com /complaint_registration/add इत्यादी.

    गर्भलिंग निवडीच्या प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी जनजागृतीबरोबरच कायद्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने “मुलगी वाचवा, मुलगी शिकवा” या अभियानासाठी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

  • OBC Welfare Committee Re-appointment । खासदार प्रतिभा धानोरकर यांची पुनर्नियुक्ती, ओबीसी हक्कांसाठी नवा आत्मविश्वास!

    OBC Welfare Committee Re-appointment

    OBC Welfare Committee Re-appointment : चंद्रपूर ९ सप्टेंबर २०२५ : खासदार प्रतिभा धानोरकर यांची इतर मागासवर्गीयांच्या कल्याण विषयक समितीवर (२०२५-२६) सदस्य म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे, ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी या समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा भक्कम आवाज ऐकायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लोकसभा सचिवालयाने १ सप्टेंबर, २०२५ रोजी यासंदर्भात अधिकृत पत्र जारी केले.

    आमदार अभिजित वंजारी चंद्रपूर जिल्हा कांग्रेस प्रभारी

    ही महत्त्वाची समिती २९ ऑगस्ट, २०२५ रोजी ‘समाचार भाग-दोन’ द्वारे जाहीर करण्यात आली होती. लोकसभा अध्यक्षानी या समितीच्या अध्यक्षपदी खासदार गणेश सिंह यांची नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातील सदस्यांचा समावेश आहे.

    दुसऱ्यांदा या समितीवर संधी

    खासदार प्रतिभा धानोरकर यांना दुसऱ्यांदा या समितीवर संधी मिळाल्यामुळे त्यांच्या मागील कामाची दखल घेतल्याचे स्पष्ट होते. याआधीही त्यांनी संसदेत ओबीसी समाजाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. विशेषतः ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना यांसारख्या लोकहितकारी विषयांवर त्यांनी सातत्याने जोर दिला होता. त्यांची ही पुनर्नियुक्ती ओबीसी समाजाच्या हितासाठी एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.

  • Maharashtra Congress District In-charge । 🚀 चंद्रपूरमध्ये काँग्रेसला बळकटी, आमदार वंजारी यांची प्रभारीपदी नियुक्ती

    Maharashtra Congress District In-charge

    Maharashtra Congress District In-charge : चंद्रपूर ९ सप्टेंबर २०२५ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांची चंद्रपूर शहर व ग्रामीण जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबाबतचे अधिकृत पत्र प्रदेश काँग्रेसकडून जारी करण्यात आले आहे.

    चंद्रपुरात केबल चोरी करणाऱ्या बाहेर राज्यातील टोळक्याला अटक

    प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार

    प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांसाठी प्रभारी नेमण्यात आले असून ब्रह्मपुरी व वरोरा विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून आ. वंजारी यांच्यावरच जबाबदारी देण्यात आली आहे. राजुरा विधानसभेसाठी हैदर अली दोसानी, चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी श्री. मुजीब पठाण (नागपूर), बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासाठी उमाकांत अग्निहोत्री, तर चिमूर विधानसभा क्षेत्रासाठी श्री. विश्वजीत कोवासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी या नियुक्तीचे पत्र जारी केले असून, जिल्हा प्रभारी व विधानसभा प्रभारी यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी तातडीने संपर्क साधून संघटनात्मक बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत.
    या नियुक्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या संघटनात्मक कामकाजाला नवे बळ मिळेल, तसेच आगामी राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेस पक्ष मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

  • BSNL copper cable thieves arrested । कंत्राटी कामगार म्हणून यायचे आणि चोरी करायचे, स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

    BSNL copper cable thieves arrested

    BSNL copper cable thieves arrested : चंद्रपूर – ९ सप्टेंबर २०२५ – चंद्रपुरात स्वतःला कंत्राटी कामगार भासवीत चोरी करणाऱ्या २ आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने अटक करीत तब्बल ४४ लाख ४८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई दूरसंचार विभागाचे कनिष्ठ अभियंता अभिजित अशोक जीवने यांच्या तक्रारीवरून करण्यात आली.जीवने यांनी ८ सप्टेंबर रोजी बीएसएनएल कंपनीचे कॉपर केबल चोरी गेल्याची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती.

    पत्नीवर वाघाचा हल्ला, पती वाघाशी भिडला

    ८ सप्टेंबर रोजी जीवने यांनी दिलेल्या तक्रारीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरु केला, पोलिसांनी या गुन्ह्याचा तंत्रबद्ध व सखोल तपास करीत गुन्हेगाराबाबत गोपनीय माहिती काढली असता एक चारचाकी आयशर ट्र्क हा कोसारा रोडवर लपलेल्या स्थितीमध्ये होता, माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याठिकाणी पोहचत चौकशी केली असता त्या वाहनात चोरी गेलेला बीएसएनएल कंपनीचा कॉपर केबल किंमत २४ लाख रुपये आढळून आला.

    कामगार म्हणून भासवायचे आणि डाव साधायचा

    गुन्हे शाखेच्या पथकाने आयशर वाहन क्रमांक up२४ bt ७०४६ व कॉपर केबल, हेल्मेट, रिफ्लेक्टर, जॅकेट, प्लॅस्टिक बॅरीकेट सह एकूण ४४ लाख ४८ हजार ३०० रुपयांचा माल जप्त करीत आरोपी २२ वर्षीय नरेंद्र सोरणसिंह मौर्या व २६ वर्षीय नाजीम शोख असमुद्दीन शेख दोघे राहणार कलपिया तालुका जिल्हा बदायू उत्तरप्रदेश यांना अटक करण्यात आली. सदर आरोपी हे स्वतःला कंत्राटी कामगार भासवून दुरुस्तीच्या नावाने कॉपर केबल चोरत होती. crime branch recovers stolen telecom cable

    telecom cable

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी स्वामीदास चालेकर, गणेश भोयर, जयंत चुनारकर, नितेश महात्मे, सचिन गुरनुले, किशोर वैरागडे, जयसिंग, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, चेतन गज्जलवार, गणेश मोहुर्ले, अजय बागेसर, नितीन कुरेकार, सुरेंद्र महतो, संजय वाढई, दीपक डोंगरे, मिलिंद जांभुळे, प्रदीप मडावी, शशांक बदामवार, किशोर वाकाटे, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, अजित शेंडे, सुमित बरडे, हिरालाल गुप्ता, दिनेश अराडे यांनी केली.