Blog

  • Muslim community helping flood relief Punjab । घुग्घुस मधील मुस्लिम बांधवांकडून 2.20 लाखांची मदत पंजाब पूरग्रस्तांसाठी

    Muslim community helping flood relief Punjab

    Muslim community helping flood relief Punjab : चंद्रपूर – वर्ष २०२५ मध्ये देशातील पंजाब या राज्यात आस्मानी संकट कोसळले, पंजाब राज्यात आलेल्या पुराने लाखो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले, अनेकांचा मृत्यू झाला, या संकटातून सदर नागरिक बाहेर निघावे यासाठी देशपातळीवरून मदत होत असून चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस मधून मुस्लिम बांधवानी सामाजिकतेचे भान राखत एक कर्तव्य म्हणून छोटीशी मदत पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी गोळा केली आहे.

    पुराचा धोका, चंद्रपूर भोयेगाव मार्ग बंद

    घूग्घूस येथील मुस्लिम बांधवान कडून पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी 2 लाख 20 हजार 786 रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे. समस्त मुस्लिम बांधवाच्या सहकार्याने 2,20,786 रुपयांचा निधी गुरुद्वारा सिंह सभा घुग्गुस यथे जमा करणात आला आहे.

    सामाजिक कार्य

    यात प्रामुख्याने आजम खान, मोमीन शेख, अनिस सिद्दीकी, इर्शाद कुरेशी, बाबू सिद्दीक़ी,अज़हर शेख ,सानू सिद्दीकी ,मुस्लिम खान, इस्लाम अहमद, इकरार भाई, जुबेर शेख, फैझान खान आणी समस्त मुस्लिम बांधव यांनी देणगी गोळा करण्यासाठी हातभार लावला.

  • Blacklist the contractor । फक्त दोन वर्षांत पूल खचला, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका – मनसेची मागणी

    Blacklist the contractor

    Blacklist the contractor : चंद्रपूर १२ सप्टेंबर २०२५ :- दोन वर्षांपूर्वी बनलेला लहान पूल यंदाच्या पावसाळ्यात अक्षरशः वाहून गेला, विशेष म्हणजे पुलाची होत असलेली दुर्दशा बाबत मनसे तर्फे पियुष धुपे यांनी मनपाला त्याबाबत निवेदन दिले होते, मात्र कारवाई झाली नाही आणि पूल पावसात वाहून गेला, पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला काळया यादीत टाका अशी मागणी करण्यात आली आहे.

    अपघातग्रस्तांना आमदार मुनगंटीवार यांची तातडीची मदत

    शहरातील हनुमान खिडकी मार्गे भिवापूर कडे जाणाऱ्या झरपट नदीवर मागील दोन वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला होता, मात्र अगदी दोन वर्षातच त्या पुलाला भेगा पडायला लागल्या व या पावसाळ्यात तर त्या भेगा आणखी वाढल्या, दरम्यान हा पूल धोकादायक झाला असल्याने मनपा आयुक्ताकडे मनसेच्या जनहीत कक्ष विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन यावर त्वरित बंदोबस्त करा अन्यथा हा धोकादायक पूल खचून अपघात होण्याची शकता आहे असे नमूद केले होते. contractor negligence leads to bridge failure in monsoon

    अभियंत्यावर गुन्हे दाखल करा

    मात्र तरीही मनपा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले मात्र हा पूल मनसे च्या मागणी मंतर दहा दिवसातच कोसळला त्यामुळे हा पूल बांधणाऱ्या कंत्राटदार व त्यांचे बिल पास करणाऱ्या संबंधित अभियंत्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे जनहीत कक्ष विभागाचे शहर अध्यक्ष पियुष धुपे यांनी निवेदनातून मनपा आयुक्त यांना दिला आहे, यावेळी मनसे जनहीत कक्ष विभागाचेजिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

    मनसे कडून दिनांक २८ ऑगस्ट ला मनपा आयुक्त यांना निवेदन देउन लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा मनपा प्रशासनाने त्याकडे लक्ष न दिल्याने हनुमान खिडकी जवळील झरपट नदी वरील पूल खचला तो बांधणाऱ्या कंत्राटदार व संबंधित अभियंत्यावर गुन्हे दाखल करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकां अशी मागणी सुद्धा निवेदनातून केली आहे.

  • help by sudhir mungantiwar after road accident । भद्रावतीत अपघातग्रस्तांना तातडीने मदत – आ. सुधीर मुनगंटीवारांची मानवी संवेदनशीलता चर्चेत

    help by sudhir mungantiwar after road accident

    help by sudhir mungantiwar after road accident : भद्रावती १२ सप्टेंबर २०२५ : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा संवेदनशीलतेची प्रचिती दिली. एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना अपघात झालेला दिसला. त्यांनी आपला ताफा थांबवून जखमींना तातडीने रुग्णालयात भरती करण्याची व्यवस्था केली. त्यानंतरच ते पुढच्या प्रवासाला निघाले. ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ असे मानणारे आ. श्री. मुनगंटीवार यांची तत्परता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.

    चंद्रपुरात आले पेंट चोर

    आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जीवनातील प्रत्येक क्षण जनतेसाठी अर्पण केला आहे, याची प्रचिती भद्रावती येथे घडलेल्या अपघातातून पुन्हा एकदा आली. नागपूर येथे आयोजित कार्यक्रमासाठी जात असताना भद्रावती येथे एका अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही व्यक्ती बल्लारपूर येथील प्रदीप डोके आणि घनश्याम मेश्राम (रा.विसापूर) जखमी झाले. त्याच वेळी नेमके त्या मार्गावरून आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा ताफा जात होता.

    मुनगंटीवार यांचा ताफा थांबला

    अपघातग्रस्तांची अवस्था पाहताच, ‘माणसाचे प्राण वाचवणे हेच सर्वोच्च कर्तव्य’ या भावनेतून क्षणाचाही विलंब न करता आ. मुनगंटीवार यांनी आपला ताफा तात्काळ थांबवला. स्वतः पुढाकार घेऊन जखमींना प्राथमिक उपचार मिळवून देत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. त्यांच्या तात्काळ पुढाकारामुळे अपघातग्रस्तांना जीवदान मिळाले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरिशजी शर्मा आणि महामंत्री डॉ मंगेशजी गुलवाडे यांनीही तत्परतेने जखमींना रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी नेण्याची मदत केली. politician save accident victim

    sudhir mungantiwar help accident victim

    आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून ते नेहमीच सामाजिक कार्यात आघाडीवर असतात. आरोग्य शिबिरे, मोफत शस्त्रक्रिया शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम, गरजूंसाठी मदत, ग्रामविकासासाठी सततचे प्रयत्न अशा अनेक उपक्रमांमधून त्यांनी जनतेच्या सेवेला नवी दिशा दिली आहे. त्यामुळेच “जनसेवा हीच ईश्वरसेवा” ही त्यांची जीवनव्रती भूमिका जनतेच्या मनाला स्पर्श करत राहते.जनतेच्या सुखदुःखात नेहमी धावून जाणारे, संकटात मदतीचा हात देणारे संवेदनशील नेते म्हणजे आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत, हे पुन्हा एकदा यानिमित्ताने सिद्ध झाले.

  • Irai dam gates opening alert villages । मुसळधार पावसामुळे इरई धरणाचे दरवाजे उघडले, नदीकाठावरील गावांना इशारा

    Irai dam gates opening alert villages

    Irai dam gates opening alert villages : चंद्रपूर ११ सप्टेंबर २०२५ – काही दिवसांची विश्रांती घेतल्यावर चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन झाल्याने जिल्ह्यातील काही भाग हा अस्तव्यस्त झाला आहे. मागील ३ दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरवात झाली. त्यामुळे वर्धा व इरई नदीचा जलस्तर वाढल्याने काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

    चंद्रपुरातील या शिक्षकांचा होणार सन्मान

    ग्रामीण व शहरी भागात पावसाचा जोर वाढल्याने वर्धा नदीचा जलस्तर वाढल्याने चंद्रपूर-भोयेगाव मार्ग पूर्णतः बंद झाला, यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ११ सप्टेंबर रोजी दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने सदर मार्ग हा बंदच आहे. Chandrapur weather alert for rising river water levels

    ३ दिवसांपासून येत असलेल्या पावसाने इरई धरणाच्या पातळीत वाढ झाल्याने गुरुवारी ११ सप्टेंबर रोजी सकाळी इरई धरणाचे तीन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले होते. दुपारी पुन्हा दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा काही दरवाजे उघडण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने सूचित करण्यात आले आहे.

    नागरिकांनो सतर्क रहा

    इरई धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने नदी काठावरील पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

  • Chandrapur teacher awards 2025 । चंद्रपूर जिल्ह्यातील या शिक्षकांचा होणार सन्मान

    Chandrapur teacher awards 2025

    Chandrapur teacher awards 2025 : चंद्रपूर, दि. 11 सप्टेंबर २०२४ : जिल्हा परिषद ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने 12 सप्टेंबर रोजी 11 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह येथे मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा, आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वितरण सोहळा, संपूर्णता अभियान सन्मान पुरस्कार वितरण सोहळा आणि जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण  सोहळा होणार आहे.

    चंद्रपुरात १५० किलो प्लॅस्टिक जप्त

    जिल्ह्यातील 15 पंचायत समितीमधून निवड समितीद्वारे जिल्हा शिक्षक पुरस्काराकरिता शिक्षकांची निवड  झाली आहे.

    प्राथमिक विभागात

    • 1. प्रदीप टिपले, जि. प. उ. प्रा. आदर्श शाळा, चिंचाळा (ता. चंद्रपुर), 2. सविता झाडे जि. प. प्रा. शाळा गोंदेडा (चिमूर), 3. कुणाल दुधे जि. प. प्रा. शाळा बेलगाव,(देश) (वरोरा), 4. राजकुमार मुन जि. प. उ. प्रा. शाळा चिखली, (बु.) (जिवती), 5 गीता  साखरे जि. प. उ. प्रा. शाळा फिस्कूटी, (मूल), 6 कामिना  आत्राम  जि. प. उ. प्रा. शाळा बेलगाव, (सावली), 7. प्रशांत साखलवार  जि. प. उ. प्रा. शाळा आंबेधानोरा, (पोंभुर्णा), 8. अजय  मुसळे जि. प. उ. प्रा. शाळा चिरादेवी, (भद्रावती), 9. सुनिल पोटे जि. प. प्रा. शाळा कळमना, (बल्लारपुर), 10. गोवर्धन टिकले जि. प. उ. प्रा. शाळा जुगनाळा, (ब्रह्मपुरी), 11. अर्चना मरघडे जि. प. उ. प्रा. शाळा, पळसगाव ,(खुर्द) (नागभीड), 12. सुभाष  पावडे जि. प. प्रा. शाळा, परसोडी, (गोंडपिपरी), 13. धनराज  दुर्योधन जि. प. उ. प्रा. शाळा, भुरकुंडा (बु.) (राजुरा), 14. मंगला  उरकुडे  जि. प. उ. प्रा. शाळा, कढोली (खुर्द) (कोरपना), 15.अ. अजीज अ. मुजीब शेख  जि. प. उ. प्रा. शाळा, नाचनभट्टी, (सिंदेवाही).

    अपंग/विशेष/कला शिक्षक पुरस्कार राहुल वैद्य जि. प. उ. प्रा. आदर्श शाळा, चिंचाळा, (चंद्रपुर) यांना तर :- माध्यमिक विभाग पुरस्कार राजू हिवंज  जि. प. हायस्कूल तथा कनिष्ठ महा. भद्रावती यांना जाहीर करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अश्विनी केळकर यांनी कळविले आहे. district teacher award primary school Chandrapur

  • chandrapur crime branch action । चंद्रपूर गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई – 24 तासांत 3.38 लाखांचा माल जप्त 🚔

    chandrapur crime branch action

    chandrapur crime branch action : चंद्रपूर ११ सप्टेंबर २०२५ – नवीन घराचे बांधकाम सुरु असताना अज्ञात आरोपींनि घराच्या पेंटिंगसाठी लागणारे पेन्टचे डब्बे व इलेकट्रीक साहित्याची चोरी केल्याची घटना १० सप्टेंबर रोजी पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली, मात्र या प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांच्या आत करीत २ आरोपीना अटक करीत तब्बल ३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    चंद्रपुरातील जटपुरा गेट परिसरात पहाटे धक्कादायक दुर्घटना

    चंद्रपूर जिल्ह्यात चोरी, घरफोडी, अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा मोहीम राबवित आहे, या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकाने १० सप्टेंबर रोजी पेन्टचे डब्बे व इलेकट्रीक साहित्यांची चोरी करणाऱ्या आरोपीना अटक केली. पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या ५४ वर्षीय धीरज ठाकूर यांच्या नव्या घराचे बांधकाम महाकाली नगर २ मध्ये सुरु होते. यावेळी नव्या घरासाठी पेंटिंग व इलेक्ट्रिक फिटिंग साठी लागणारे साहित्य घरी आणून ठेवले होते. मात्र १० सप्टेंबर बुधवारी अज्ञातांनी ते साहित्य लंपास केले. याबाबत ठाकूर यांनी पडोली पोलीस स्टेशनमध्ये याबाबत फिर्याद नोंदवली. quick police action

    गुन्हे शाखेची शिताफी आणि गुन्हा उघड

    गुन्हा दाखल होताच सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या पथकाने सुरु केला, पडोली परिसरात दोघेजण पेन्टचे डब्बे व इलेक्ट्रिक साहित्य विकण्यासाठी फिरत आहे, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने दोघांना ताब्यात घेत विचारपूस केली असता ठाकूर यांच्या घरी झालेली चोरी त्यांनी केली असल्याचे कबूल केले. electric supplies stolen Chandrapur arrest

    गुन्हे शाखेने आरोपी २९ वर्षीय शादाब शब्बीर सैफी राहणार नेरी वार्ड दुर्गापूर व २८ वर्षीय सोहेल कादिर सय्यद नेरी वॉर्ड दुर्गापूर यांना अटक केली, दोघांना पडोली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी गुन्हे शाखेने चोरी केलेला माल व गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा एकूण ३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सपोनि दीपक कांक्रेडवार, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, रजनीकांत पुठ्ठावार, सतीश अवथरे, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, शशांक बदामवार व मिलिंद टेकाम यांनी केली.

  • how much is penalty for plastic bag use | चंद्रपूरमध्ये 150 किलो प्लास्टिक जप्त – दुकानदारावर ₹5000 दंड!

    how much is penalty for plastic bag use

    how much is penalty for plastic bag use : चंद्रपूर 11 सप्टेंबर  – बिनबा गेट परिसरातील राजनूर सेलिब्रेशन जवळील दुकानावर चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने कारवाई करून 150 किलो प्लास्टीक जप्त केले आहे शिवाय प्लास्टीकचा साठा करणाऱ्या दुकानदाराकडुन 5 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.सदर व्यावसायिकावर ही पहिल्यांदा कारवाई करण्यात आली आहे.

    पहाटे जटपूरा गेट परिसर हादरला

    पुन्हा सदर गुन्हा केल्यास 10 हजार रुपये दंड

      चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली असुन सदर व्यावसायिकास सक्त ताकीद देण्यात आली आहे. पुन्हा सदर गुन्हा केल्यास 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असुन प्लास्टीक पिशव्यांच्या साठयाबाबत गुप्त माहीती देणाऱ्यास 5 हजारांचे बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आले आहे.यास मोठा प्रतिसाद मिळुन मनपापर्यंत प्लास्टीक साठ्याची गुप्त माहीती पोचविण्यात येत आहे. first offence plastic violation

    एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त श्रीमती. शुभांगी सूर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके,भुपेश गोठे,शुभम खोटे, शुभम चिंचेकर,राहुल गगपल्लीवार, पूनम समुद्रे यांच्याद्वारे करण्यात आली. 

       

  • Part of a dilapidated building collapsed | 🏚️ चंद्रपूर हादरलं! जटपुरा गेटसमोरील जीर्ण इमारतीचा भाग कोसळला – महिला गंभीर जखमी

    Part of a dilapidated building collapsed

    Part of a dilapidated building collapsed : चंद्रपूर 11 सप्टेंबर 2025 – चंद्रपुरातील जटपुरा गेट समोरील इमारतीचा एक भाग कोसळला, या घटनेत दूध विक्रेता महिला गंभीर जखमी झाली. सदर घटना पहाटे 5 वाजता घडली.

    जन सुरक्षा विधेयकविरोधात महाविकास आघाडीचे निदर्शने

    ऐतिहासिक जटपूरा गेट समोरील विनोद मेहता यांच्या मालकीच्या इमारतीचा वरचा भाग जीर्ण अवस्थेत आला होता, आज झालेल्या घटनेत 50 वर्षीय मनीषा लोखंडे या महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. सदर इमारत ही 50 ते 60 वर्षे जुनी आहे.

    माजी नगरसेविकेचा पाठपुरावा


    याबाबत माजी नगरसेविका छबु वैरागडे यांनी सदर इमारतीच्या झालेल्या जीर्ण इमारतीची अवस्था बघता भविष्यात दुर्घटना होऊ नये यासाठी पालिकेद्वारे 4 नोटीस पाठविल्या होत्या मात्र मेहता यांनी त्यावर काहीच उत्तर दिलं नाही. घर मालकाच्या दुर्लक्षामुळे व पालिकेच्या उदासीनतेमुळे कामामुळे महिला जखमी झाली.

    सदर इमारतिच्या तळमजल्यावर छोटं हॉटेल सुद्धा आहे, या घटनेमुळे त्या हॉटेलला धोका निर्माण झाला असून पालिकेचे कर्मचारी व अधिकारी यांनी सदर इमारतीची पाहणी केली असून त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. चंद्रपूर शहरात अश्या अनेक जीर्ण इमारती असून भविष्यात त्यामुळे मोठी दुर्घटना घडणार ही शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे पालिकेने अश्या जीर्ण इमारती लवकरात लवकर जमीनदोस्त कराव्या अशी मागणी नागरिक करीत आहे.

  • how to apply for disability scholarships । दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज कसा कराल? संपूर्ण माहिती येथे 📚

    how to apply for disability scholarships

    how to apply for disability scholarships : चंद्रपूर ११ सप्टेंबर २०२५ – सन 2025-26 या वर्षात दिव्यांग कल्याण योजनेतील वैयक्तिक लाभाच्या योजना जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय, जि.प. मार्फत राबविण्यात येत असून सदर योजना खालीलप्रमाणे आहे. 1. शालांत पूर्व शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती 2. मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृती 3. दिव्यांग व्यक्तिंना लघु उद्योगासाठी वित्तीय सहाय्य करणे आणि 4. दिव्यांग व्यक्तिच्या विवाहास आर्थिक सहाय्य करणे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी धनंजय साळवे यांनी केले आहे.

    अत्याधुनिक बॅडमिंटन हॉलमुळे जिल्ह्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक प्राप्त करतील

    1. शालांत पूर्व शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती : दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याकरीता शिष्यवृत्ती अदा करण्यात येते. इयत्ता 1 ली ते 4 थी (कर्णबधिर पायरी वर्गापासून)  वार्षिक शिष्यवृत्ती 1 हजार रुपये,  इयत्ता 5 वी ते 7 वी दीड हजार रुपये, इयत्ता 8 वी ते 10 वी करीता 2 हजार रुपये, मतिमंद मानसिक विकलांग (नोंदणी प्रमाणपत्र विशेष शाळेतील) करीता दीड हजार रुपये आणि दिव्यांग कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थी यांना वार्षिक 3 हजार रुपये.

    पात्रता 

    : इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतचे शिक्षण घेणारे अंध, कर्णबधिर व अस्थिव्यंग प्रवर्गातील विद्यार्थी तसेच विशेष नोंदणी प्रमाणपत्र शाळेतील मतिमंद विद्यार्थी. विद्यार्थ्याकडे किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्क्यांचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असावे. विद्यार्थी एकाच इयत्तेत दोन वेळा नापास झालेला नसावा. how to apply for disability scholarships

    आवश्यक कागदपत्र

     : दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र 40 टक्के, वार्षिक परिक्षेच्या निकालाची प्रत व गुणपत्रीका,  बोनाफाईट दाखला.

    2. शालांत परिक्षोत्तर (मॅट्रीकोत्तर शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती :  मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना www.mahadbtmahiti.gov.in या संकेतस्थळावर Online अर्ज करायचा असतो. सदर संकेतस्थळावर सर्व अटी, शर्ती व लाभाबाबत माहिती उपलब्ध आहे. divyang welfare scheme

    आवश्यक कागदपत्रे : दिव्यांगत्वाचे वैद्यकिय प्रमाणपत्र 40 टक्के, वार्षिक परिक्षेच्या निकालाची प्रत,  शाळेत शिक्षण घेत असल्याचे प्रमाणपत्र, विद्यापीठात भरणारे सक्तीचे शुल्क, प्रवेश फी, ट्यूशन फी, नोंदणी फी लायब्ररी, मॅगेजिन फी, वैद्यकिय तपासणी बाबतचे पावती देय

    3. स्वयंरोजगारासाठी दिव्यांग व्यक्तीना वित्तीय सहाय्य (बिज भांडवल योजना) : दिव्यांग व्यक्तीना लघुउद्योगासाठी वित्तीय सहाय्य करणे.

    पात्रता : वार्षिक उत्पन्न रुपये 1 लक्षपेक्षा कमी असावे, दिव्यांग व्यक्तीचे किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्के दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असावे, वय 18 ते 50 वर्ष यामधील असावे, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

    लाभाचे स्वरुप

     : रुपये 1.50 लक्ष मर्यादेपर्यंतच्या राष्ट्रीयकृत बँकेने मंजुर केलेल्या रक्कमेच्या 20 टक्के सबसिडी स्वरुपात अर्थसहाय्य देण्यात येते.

    4. दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास आर्थिक सहाय्य देणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य  विभाग अंतर्गत  दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास आर्थिक सहाय्य देणे योजना राबविल्या जाते.

    पात्रता : दिव्यांग व्यक्तीचे किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्के दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असावे, विवाहित जोडप्यापैकी एक व्यक्ती दिव्यांग व एक व्यक्ती अव्यंग असावा, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

    लाभाचे स्वरुप : विवाहित जोडप्यांना संयुक्तरित्या एकुण 50 हजार रुपये अनुदान देण्यात येते. disabled marriage subsidy Maharashtra

    वरीलप्रमाणे योजनांचे प्रस्ताव जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जि.प. येथे सादर करावे, असे आवाहन धनंजय साळवे यांनी दिले आहे.

  • modern badminton court Chandrapur । अत्याधुनिक बॅडमिंटन हॉलमुळे जिल्ह्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक प्राप्त करतील – आमदार मुनगंटीवार

    modern badminton court Chandrapur

    modern badminton court Chandrapur : चंद्रपूर १० सप्टेंबर २०२५ – चंद्रपूरमध्ये उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक बॅडमिंटन हॉलमुळे जिल्ह्यामध्ये दर्जेदार खेळाडू निर्माण होतील. मुंबई-पुण्यातील खेळाडूंप्रमाणेच भविष्यात चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू देखील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नावलौकीक प्राप्त करतील व चंद्रपूरचा मान वाढवतील, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    कसा आहे नवीन आयफोन १७? जाणून घ्या सोप्या भाषेत

    चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल येथे, चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन डेव्हलपमेंट असोसिएशन तर्फे डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार मेमोरियल महाराष्ट्र मिनी स्टेट सिलेक्शन बॅडमिंटन स्पर्धा-2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव सिद्धार्थ पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड,चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश चांडक, अनिरुद्ध जोशी,सचिव जुवेलजी चांदेकर, तालुका क्रीडा अधिकारी नंदू आवारी, जवाहर पंजाबी, आदित्य गलांडे, विक्रांत पटवर्धन, जयश्री देवकर, रंजना सेवतकर, खेळाडू व पालकांची उपस्थिती होती.

    badminton sports

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील श्री. गिरीश चांडक यांनी बॅडमिंटन स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केले. मागील वर्षी बॅडमिंटन हॉलच्या सोलार सुविधेसाठी 95 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. पुढील स्पर्धेपूर्वी हॉलसाठी जनसेट (जनरेटर) बसविण्यात येईल. जिल्ह्यातील खेळाडूंना सोयीसुविधांची उणीव भासू नये यादृष्टीनेच मोठ्या शहरांच्या ताकदीचा अत्याधुनिक बॅडमिंटन हॉल चंद्रपूरमध्ये उभारला गेला आहे. भविष्याचा वेध घेत देशगौरव,पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी 2036 च्या ऑलिंपिकमध्ये अमेरिका, रशिया आणि चीनच्या बरोबरीने भारतही पदक जिंकणारा देश असेल असा विश्वास व्यक्त केला आहे. या विश्वासाला सार्थ ठरविण्यात चंद्रपूर जिल्हा मागे राहणार नाही, हा संकल्प करण्यात आला आहे.’ Chandrapur sports infrastructure future champions

    चंद्रपूरमध्ये प्रगत क्रीडा सुविधा:

    चंद्रपूर क्रीडा संकुलात अत्याधुनिक वातानुकूलित बॅडमिंटन हॉल उभारण्यात आला आहे. बल्लारपूर स्टेडियम मध्येही लवकरच वातानुकूलित हॉल तयार होणार आहे. तसेच म्हाडाच्या 16 एकर जागेवर तब्बल 137 कोटी रुपये खर्चून क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने 10 कोर्ट असलेला भव्य वातानुकूलित बॅडमिंटन हॉल तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनने चंद्रपूरमध्ये वेस्टर्न झोन स्पर्धा आयोजित करण्यास तयारी दर्शविली आहे, ही चंद्रपूरसाठी गौरवाची बाब ठरेल. क्रीडा क्षेत्रात जगाच्या बरोबरीने पुढे राहण्यासाठी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. कारण मैदानावर उतरणाऱ्यांचे मन, बुद्धी आणि शरीर सदैव निरोगी राहते आणि त्यातूनच समाजाला उत्तम आरोग्याचा लाभ होतो. modern badminton court Chandrapur

    चंद्रपूरमध्ये उत्तमोत्तम क्रीडा सुविधा तयार करण्यात आल्या याचा अभिमान आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच अंडर-19 स्पर्धेचे आयोजन मोठ्या शहराऐवजी बल्लारपूर तालुका स्टेडियमवर करण्यात आले. या स्पर्धेत देशातील 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेनंतर खेळाडूंनी मिळालेल्या उत्तम सुविधांचे कौतुक करत अभिमानाची भावना व्यक्त केली. याशिवाय विद्यापीठाची इंटर-युनिव्हर्सिटी स्पर्धाही यशस्वीपणे पार पडली. खेळाडूंना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी 57 कोटीं रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. म्हाडा येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाबुराव शेडमाके यांच्या नावाने 137 कोटींचे भव्य स्टेडियम उभारले जात आहे.आर्चरीसाठी साडेआठ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.


    वन अकादमी येथे 15 कोटी रुपये खर्ची करून स्टेडियम याशिवाय पोलीस फुटबॉल ग्राउंडवरही 15 कोटींचे स्टेडियम उभारण्यात येत आहे, असे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. air-conditioned badminton facility inaugural event

    जिल्ह्याच्या क्रीडा सुविधांवर अभिमान

    केंद्रीय मंत्री ना. रक्षा खडसे यांना सैनिकी शाळेतील स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी सेंटर दाखविण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या, पूर्वी जेव्हा एखाद्या राज्यातील सुविधा पाहायची, तेव्हा महाराष्ट्र मागे असल्याची भावना यायची. मात्र, आता अभिमानाने सांगू शकते की 28 राज्यांच्या बैठकीत बसताना माझ्या मनात ‘हम भी कुछ कम नाही’ असा आत्मविश्वास असेल.’ त्यांचे हे वक्तव्य प्रेरणा देणारे होते. असेही आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आवर्जून सांगितले. जिल्ह्यातील खेळाडूंनी बॅडमिंटनमध्ये देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपले वर्चस्व प्रस्थापित करावे. दिल्लीचे तख्त राखायचे असेल तर जिल्हा कोणत्याही क्षेत्रात मागे राहता कामा नये, असे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.