Blog

  • Nilam Gorhe birthday celebration Chandrapur । डॉ. निलमताई गोऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूरात शैक्षणिक साहित्य व फळवाटप कार्यक्रम

    Nilam Gorhe birthday celebration Chandrapur

    Nilam Gorhe birthday celebration Chandrapur : चंद्रपूर – १४ सप्टेंबर २०२५ :- शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या उप-सभापती मा. ना. डॉ. निलमताई गोऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सौ. मिनलताई आत्राम जिल्हाप्रमुख शिवसेना महिला आघाडी चंद्रपुर तसेच संतोष पारखी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात चंद्रपुरातील उर्जानगर कोंडी जि. प. उच्च प्राथ. शाळेच्या विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच देवाळा येथील डेबू सावली वृद्धाश्रमातील वृद्धांना फळवाटप करीत उत्साहात साजरा केला.

    मातृशक्तीचा अपमान सहन करणार नाही – छबू वैरागडे

    निलमताई गोऱ्हे यांना दीर्घ आयुष्य लाभो व त्यांचे आरोग्य चांगले राहण्याची प्रार्थना

    यावेळी जि. प. उच्च प्राथ. शाळेच्या विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच देवाळा येथील डेबू सावली वृद्धाश्रमातील वृद्धांना फळवाटप कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी व वृद्धांनी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या उप-सभापती मा. ना. डॉ. निलमताई गोऱ्हे यांना दीर्घ आयुष्य लाभो व त्यांचे आरोग्य चांगले राहण्याची प्रार्थना करुन आशिर्वाद दिला.

    shiv sena mahila aghadi chandrapur

    सदर कार्यक्रमाला बल्लारपुर विधानसभा महिला संघटिका सौ. कृष्णाताई सुरमवार, शिवसेना उपतालुका प्रमुख विक्की महाजन, भद्रावती युवासेना उपशहर प्रमुख विवेक दुर्गे, शिवसैनिक योगेश मुऱ्हेकर, भद्रावती माजी नगरसेवक नाना दुर्गे आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.

  • Respect for motherhood insult controversy । मातृशक्तीचा अपमान सहन करणार नाही : चंद्रपूर भाजप महिला मोर्चाचा इशारा

    Respect for motherhood insult controversy

    Respect for motherhood insult controversy : चंद्रपूर: भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, चंद्रपूरने (BJP Mahila Morcha, Chandrapur) काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करत जोरदार आंदोलन केले. AI प्रणालीचा (AI system) गैरवापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि त्यांच्या आईचा अपमानकारक व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप भाजपने केला आहे. या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाने जटपुरा गेट येथे काँग्रेसविरोधात जोरदार निदर्शने केली. Respect for motherhood insult controversy

    दुकानाच्या शेडमध्ये घुसला ट्र्क, एकाचा मृत्यू

    हे आंदोलन भाजपच्या प्रदेशाध्यक्षा आणि आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आले होते. माजी खासदार हंसराज अहिर (Hansraj Ahir), आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar), आणि भाजप शहर जिल्हाध्यक्ष सुभाष कासंगोटूवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. छबूताई वैरागडे (Chhabutai Vairagade) यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. Legal action demanded for insulting PM’s mother via video

    काँग्रेसवर ‘विष पेरणारे’ आणि ‘मातृशक्तीचा अपमान करणारे’ असल्याचा आरोप

    आंदोलनादरम्यान बोलताना सौ. वैरागडे यांनी काँग्रेस पक्षावर बिहार निवडणुकीच्या (Bihar election) मुद्द्यावरून समाजात विष पेरण्याचा आणि मातृशक्तीचा अपमान करण्याचा आरोप केला. “पंतप्रधान पद हे देशाचे असते आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरणे, इतकेच नाही तर वाईट पद्धतीने चित्र रेखाटणे हा देशातील समस्त मातृशक्तीचा अपमान आहे. देशातील माता-भगिनी काँग्रेसचे हे विष कधीही सहन करणार नाहीत,” असे त्या म्हणाल्या.

    भाजपच्या महिला आघाडीने राजीव गांधी (Rajiv Gandhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची विचारसरणी नेहमीच समाजात दुही निर्माण करणारी आणि नारीशक्तीचा अनादर करणारी राहिली आहे, असा दावाही केला. Chandrapur BJP women’s morcha condemnation video incident

    chandrapur bjp mahila morcha

    आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित

    13 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या या निषेध आंदोलनात भाजपचे चंद्रपूर शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला मोर्चाचे कार्यकर्ते आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात विधानसभा प्रमुख वंदना हातगावकर, मंडळ अध्यक्ष स्वप्नील डुकडे, रवि जोगी, सुभाष आदमने, प्रदीप किरमे, विठ्ठल डुकडे, युवा मोर्चाचे मयूर वाढई, सुमित बेले, राकेश बोंमनवार, अक्षय घोटेकर, पुष्पा उराडे, मंजुश्री कासंगोटूवार, प्रज्ञा गदेवार, माजी नगरसेविका वनिता डुकडे, नीलिमा वनकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. BJP protests against Congress over misuse of AI system video

    या आंदोलनातून भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, जिल्हा चंद्रपूरने काँग्रेस पक्षाचा तीव्र निषेध केला असून, देशातील महिलांचा आदर राखण्याचे आवाहन केले आहे.

  • Chandrapur National Lok Adalat case settlements । 📌 चंद्रपूर जिल्हा न्यायालयात १०६७ प्रकरणांचा निपटारा – लोकअदालतीचा यशस्वी उपक्रम

    Chandrapur National Lok Adalat case settlements

    Chandrapur National Lok Adalat case settlements : चंद्रपूर, दि. १३ सप्टेंबर २०२५ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आज दि. १३ सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालयासह सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.

    दुकानात शिरला ट्र्क एक ठार

    या लोकअदालती चे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा समृध्दी भीष्म यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.

    १०६७ प्रकरणे यशस्वीरित्या निकाली

    लोकअदालतीत एकूण ९५३७ प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे व १५६६२ दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ८५५ प्रलंबित व २१२ दाखलपूर्व अशी एकूण १०६७ प्रकरणे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली.

    १ कोटी २८ लक्ष ६१ हजार ६०७ इतकी रक्कम वसूल

    यामध्ये मोटार अपघात दाव्यांची २८ प्रकरणे निकाली काढून २ कोटी ५१ लक्ष ४५ हजार रुपये इतकी नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. दाखलपूर्व प्रकरणांमधून १ कोटी २८ लक्ष ६१ हजार ६०७ इतकी रक्कम वसूल करण्यात आले. धनादेश अनादरित झालेल्या ६६ प्रकरणांचा निकाल लावण्यात आला, तर कामगार व औद्योगिक न्यायालयातील १ प्रकरण निकाली निघाले.

    lok adalat chandrapur

    या लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहकार्य केले, अशी माहिती  एस. एस. इंगळे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांनी दिली.

  • Nagpur-Chandrapur Highway । नागपूर-चंद्रपूर महामार्ग: ट्रक थेट दुकानात घुसला; एकाचा मृत्यू

    Nagpur-Chandrapur Highway

    Nagpur-Chandrapur Highway : चंद्रपूर, ( १३ सप्टेंबर २०२५) – चंद्रपूर जिल्ह्यातील नागपूर–चंद्रपूर महामार्गावर असलेल्या टेमुर्डा येथील मुख्य चौकात शनिवारी (दि. १३ सप्टेंबर २०२५) पहाटे एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका १६ चाकी ट्रकने (क्रमांक यूपी ७२ सीटी ७८१७) नियंत्रण गमावले आणि तो थेट रस्त्यावरील दुभाजक तोडून बाजूच्या ‘शिवकृपा मेडिकल’ आणि ‘तेजस्विनी क्लिनिक’ या दवाखान्याच्या टिनशेडवर आदळला. या अपघातात मेडिकलच्या शेडमध्ये झोपलेल्या एका अज्ञात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

    इरई धरणाचे दरवाजे उघडले, १ मीटरने पाण्याचा विसर्ग सुरु

    काय घडले नेमके?

    पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रकमध्ये धडक इतकी जोरदार होती की, मेडिकलच्या लोखंडी शेडचा चक्काचूर झाला. त्याचबरोबर बाजूला असलेले विठ्ठल काळे यांचे भाजीपाल्याचे शेडही उद्ध्वस्त झाले. अपघातानंतर ट्रकचा चालक आणि क्लिनर घटनास्थळावरून पळून गेले. Fatal accident

    अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यांनी पाहिले की, शेडमध्ये झोपलेला तरुण ट्रकखाली दबला गेला होता आणि त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या वर्षातील या ठिकाणी घडलेला हा सातवा अपघात आहे, त्यामुळे प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.

    ‘मोठा अनर्थ’ टळला

    स्थानिक नागरिकांनी सांगितले की, अपघाताच्या आदल्या रात्री म्हणजे १२ सप्टेंबर रोजी याच ठिकाणी सुमारे २५-३० लोक झोपलेले होते. जर हा अपघात एका दिवसाने झाला असता, तर मोठी जीवितहानी झाली असती, असा अंदाज वर्तवला जात आहे.

    या चौकात दररोज मच्छी बाजार, फळ-भाजीपाला विक्रेते, नाश्ता सेंटर आणि इतर लहान व्यवसाय चालतात, त्यामुळे येथे नेहमीच मोठी गर्दी असते. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने या चौकात वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

  • KineMaster tutorial for beginners । YouTube व Reels साठी KineMaster एडिटिंग गाईड – अगदी सुरुवातीपासून 🚀

    KineMaster tutorial for beginners

    KineMaster tutorial for beginners : १३ सप्टेंबर २०२४ – KineMaster हे मोबाईल फोन आणि टॅबलेटसाठी एक अतिशय शक्तिशाली व्हिडिओ एडिटिंग ॲप आहे. हे ॲप वापरण्यास सोपे आहे, पण यात अनेक व्यावसायिक (professional) व्हिडिओ एडिटिंग टूल्स आहेत. YouTube क्रिएटर्स, इंस्टाग्राम रील बनवणारे, आणि सामान्य वापरकर्ते जे मोबाईलवर व्हिडिओ एडिट करू इच्छितात, त्यांच्यामध्ये हे ॲप खूप लोकप्रिय आहे.

    कसा आहे आयफोन १७, जाणून घ्या सोप्या भाषेत


    KineMaster चे प्रमुख फायदे (Features)

    1. सोपा इंटरफेस (User-Friendly Interface): KineMaster चा इंटरफेस खूप सोपा आहे. ॲप उघडल्यावर तुम्हाला सर्व महत्त्वाचे ऑप्शन्स सहज दिसतात. टाइमलाईन, व्हिडिओची लेयर्स (Layers), आणि विविध टूल्स (Tools) स्क्रीनवर व्यवस्थित मांडलेली असल्यामुळे नवशिक्यांसाठीही ते वापरणे सोपे आहे.

    2. मल्टी-लेयर एडिटिंग (Multi-Layer Editing): हे KineMaster चे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. तुम्ही एकाच वेळी अनेक व्हिडिओ लेयर्स (layers) वापरू शकता. याचा अर्थ, तुम्ही तुमच्या मुख्य व्हिडिओवर (main video) दुसरा व्हिडिओ, फोटो, मजकूर (text) किंवा स्टिकर्स जोडू शकता. हे वैशिष्ट्य ग्रीन स्क्रीन (Green Screen/Chroma Key) वापरण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. KineMaster multi layer editing effects guide

    3. Chroma Key (ग्रीन स्क्रीन): हे एक व्यावसायिक फीचर आहे. तुम्ही या टूलचा वापर करून व्हिडिओमधील ग्रीन किंवा ब्लू बॅकग्राउंड काढू शकता आणि त्याऐवजी दुसरा कोणताही व्हिडिओ किंवा फोटो लावू शकता. KineMaster green screen editing on mobile app

    4. ॲसेट स्टोअर (Asset Store): या ॲपमध्ये एक मोठा ॲसेट स्टोअर आहे जिथे तुम्हाला हजारो व्हिडिओ इफेक्ट्स, ट्रान्झिशन्स, स्टिकर्स, फॉन्ट्स आणि संगीत (Music) मोफत आणि सशुल्क स्वरूपात उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या व्हिडिओला अधिक आकर्षक बनवण्यासाठी याचा वापर करू शकता.

    5. अचूक एडिटिंग टूल्स: KineMaster मध्ये व्हिडिओ ट्रिम करणे, कट करणे, स्प्लिट करणे, आणि ऑडिओ-व्हिडिओची गती (speed) कमी-जास्त करणे यासारखी सर्व मूलभूत टूल्स उपलब्ध आहेत.

    6. 4K व्हिडिओ सपोर्ट: हे ॲप 4K व्हिडिओ एडिटिंगला सपोर्ट करते, ज्यामुळे तुम्ही उच्च दर्जाचे व्हिडिओ तयार करू शकता.


    KineMaster च्या मर्यादा (Limitations)

    1. वॉटरमार्क (Watermark): KineMaster च्या मोफत व्हर्जनमध्ये एडिट केलेल्या व्हिडिओवर वॉटरमार्क (KineMaster logo) येतो. हा वॉटरमार्क काढण्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन (subscription) घ्यावे लागते.

    2. सशुल्क सबस्क्रिप्शन (Paid Subscription): अनेक चांगले आणि व्यावसायिक फीचर्स फक्त प्रीमियम व्हर्जनमध्येच उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागतील. KineMaster mobile video editing tutorial for beginners

    3. फोनच्या कार्यक्षमतेवर अवलंबून (Performance on your device): जर तुम्ही जास्त लेयर्स आणि इफेक्ट्स वापरून मोठा व्हिडिओ एडिट करत असाल, तर तुमच्या मोबाईलची मेमरी (RAM) चांगली असणे आवश्यक आहे. कमी मेमरी असलेल्या फोनवर ॲप स्लो होऊ शकते किंवा क्रॅश (crash) होऊ शकते.


    अंतिम मत (Review)

    KineMaster हे मोबाईलवर व्हिडिओ एडिटिंगसाठी एक उत्कृष्ट ॲप आहे. याचे फीचर्स डेस्कटॉप एडिटिंग सॉफ्टवेअरच्या जवळपास आहेत. जर तुम्ही फक्त व्हिडिओ ट्रिम करायला आणि संगीत लावायला हे ॲप वापरणार असाल, तर मोफत व्हर्जन खूप चांगले आहे. पण, जर तुम्ही व्यावसायिक दर्जाचे व्हिडिओ बनवत असाल आणि तुम्हाला सर्व फीचर्स वापरायचे असतील, तर प्रीमियम सबस्क्रिप्शन घेणे फायदेशीर ठरू शकते.

  • chandrapur flood latest update |मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    chandrapur flood latest update

    chandrapur flood latest update : चंद्रपूर १३ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे, यामुळे वर्धा व इरई नदीचा जलस्तर वाढला असून अनेक ठिकाणी पुराचा धोका वाढला आहे, इरई धरण परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

    पुरात अडकली बस, बसमध्ये होते ७० विद्यार्थी

    इरई धरणाचे ७ दरवाजे उघडले

    चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने धरणाचे सातही दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहे. यामुळे नदीकाठील पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना आणि इतर इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. पुलावरून पाणी जात असल्यास कुणीही पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, जनावरांना नदीकाठी चरण्यास सोडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. flood warning Errai dam villages

    जीर्ण इमारत कोसळली, २ मुली बचावल्या

    संततधार पावसामुळे बल्लारपूर शहरातील १०० वर्षे जुनी असलेली जीर्ण इमारतीचा मोठा भाग शुक्रवारी रात्री कोसळला, बल्लारपूर वस्ती विभागातील गांधी चौकाच्या नजिक असलेला गुप्ता यांच्या घराचा रस्त्याकडील पूर्ण भाग कोसळला. यावेळी मार्गावरून जात असलेल्या दोन मुली थोडक्यात वाचल्या. मलब्याखाली दबलेली काही दुचाकी वाहने अग्निशमन दलाच्या पथकांनी काढले आहे.अजूनही काही दुचाकी वाहने ढिगाऱ्याखाली दबलेली आहेत.या दुर्घटनेत कोणतीही वित्तहानी वा जिवीतहानी झालेली नाही. 100-year old building collapse in Ballarpur
    रस्ता बंद करून बॅरीगेटिंग करण्यात आले.त्या ठिकाणी १ सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले. इमारतीत राहणाऱ्या दोन कुटुंबांपैकी १ कुटुंब त्यांच्या नातेवाईकाकडे थांबले असून १ कुटुंबाची राहण्याची व्यवस्था लोक मंगल कार्यालयात केली आहे. जेसीबी आणि ट्रॅक्टर लावून मलबा काढण्याबाबत सूचन देण्यात आल्या. सदर इमारत खूप जुनी असल्याने अगदी जीर्ण झालेली आहे.

    बस पाण्यात

    दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी अंदाजे वेळ 18.15 वाजता चंद्रपूर आगाराची बस क्रमांक MH40 N 9426 भादुर्ली ते मुल येत असताना रेल्वेपटरी खालील बोगद्या मध्ये गाडी आली असता अंदाजे एक ते दोन फूट पाणी असल्याने बस निघू शकेल असे समजून चालकाने गाडी काढण्याचा प्रयत्न केला असता सायलेन्सरला पाणी लागल्यामुडे गाडी बंद पडली व पाऊस वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्याने गाडीच्या रेडिएटर पर्यंत पाणी आले असून गाडी अडकून आहे. सदर गाडीत तीन प्रवासी प्रवास करत होते. सदर प्रवासी व चालक वाहक सुखरूप आहे.
    सदर घटना चालकाच्या निष्काळजी पणामुळे घडलेली आहे. घटनास्थळी आगार व्यवस्थापक, चंद्रपूर, विभागीय वाहतूक अधिकारी, सहाय्यक यंत्र अभियंता हे यांत्रिक कर्मचाऱ्यांसाह गाडी काढणायासाठी पोहोचले होते. chandrapur flood latest update

    bus in water

    ३ कामगारांचे रेस्क्यू

    आज दिनांक 13सप्टेंबर रोजी अंकुश डिव्हिजन तरफदार वय २८ राह. नरेंद्रपूर तालुका चामुर्शी जिल्हा गडचिरोली 2) आशिष आनंदलाल शहा, वय ३५, राह. लालपेठ चंद्रपूर, 3) शुभजीत शंकर देवनाथ वय ३१, राह. सुभाष ग्राम तालुका चामुर्शी जिल्हा गडचिरोली हे सर्व लॉईड मेटल कंपनीचे लेबर कंपनीचे पाणी पुरवठ्याचे काम करीत असताना म्हातारदेवी गावा जवळील वर्धा नदीला पूर आल्याने दि. 12.09.25 चे रात्री पासून नदीमध्ये अडकून होते. वरील अडकलेल्या लोकांना आज दिनांक 13.09.2025 रोजी चंद्रपूर जिल्हा पोलीस रेस्क्यू पथक मधील बोट चालक – पीएसआय अशोक गर्गेलवार, रेस्क्यू पथक मधील पोलीस हवालदार मनोज हांडे , उमेश बनकर, प्रमोद डोंगरे, गिरीश मरापे, वामन नक्षीने, लीलाधर करमे, राजाराम गायकवाड, सुमेध घडसे यांनी बोटच्या साह्याने सुखरूप बाहेर काढले.

    rescue

    वरोरा : निमसडा मार्ग बंद झालेला आहे. निमसड्याचे 32 शाळेचे विद्यार्थी व 25 ग्रामस्थ अडलेले असून त्यांची व्यवस्था वर्धा पावर कंपनीमध्ये करण्यात आली आहे. वरोरा तालुक्यातील सोईत – कोसारा पुलावर 5 फूट पाणी आल्याने सदरचा मार्ग पूर्णतः बंद करण्यात आला आहे. road closure warnings flood

  • school children trapped by flood | वरोरा तालुक्यात पुरात अडकले विद्यार्थी….

    school children trapped by flood

    school children trapped by flood : वरोरा १३ सप्टेंबर २०२५ – वरोरा तालुक्यातील भटाळा, खेमजई, वडगाव, नांद्रा, लोदीखेडा, येरखेडा आदी गावांतील शाळकरी विद्यार्थ्यांची बस काल रात्री परतीच्या मार्गावर असताना नाल्याला आलेल्या पूरामुळे अडकली. वाहनचालकांनी सुरक्षेच्या दृष्टीने धोका पत्करला नाही व नाल्यावरून बस नेण्याचा निर्णय न घेता पाणी ओसरल्यानंतरच प्रवास करण्याचे ठरवले.

    चंद्रपूर जिल्हा परिषदेत प्रथमच अनुसूचित जातीची महिला बनणार अध्यक्ष, आरक्षण जाहीर

    दरम्यान स्थानिक आसाळा येथील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत 60 ते 70 मुला-मुलींसाठी जेवणाची व्यवस्था केली. तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री गजानन मुंडकर, तहसीलदार वरोरा श्री योगेश कौटकर, मंडळ अधिकारी श्री. अजय निखाडे, तलाठी आसाळा श्री. रितेश आमटे, तलाठी टेमुर्डा श्री. सुनील राऊत, कोतवाल श्री. चांदेकर व शिपाई श्री. सचिन शेळकी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. रात्री उशिरा मुलींची राहण्याची व्यवस्था समाजभान आसाळा येथे तर मुलांची राहण्याची व्यवस्था टेमुर्डा येथील समाजभवनात करण्यात आली. school children stranded in flood rescue

    पाणी ओसरले आणि..

    सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस प्रशासनाने लेडी कॉन्स्टेबल्ससह शिपायांचे पथक घटनास्थळी पाठविले. अखेर रात्री साडेअकराच्या सुमारास नाल्याचे पाणी ओसरल्याने आगार व्यवस्थापकांच्या सल्ल्यानुसार बस परत सोडण्यात आली.

    विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी टप्प्याटप्प्याने सोडताना प्रत्येक गावात महसूल,ग्राम विकास,पोलीस प्रशासनाकडून जीपीएस फोटोग्राफ व व्हिडिओ घेण्यात आले, जेणेकरून विद्यार्थी योग्य ठिकाणी सुखरूप पोहोचले आहेत याची खात्री करता आली. या काटेकोर प्रक्रियेमुळे पालक व विद्यार्थ्यांच्या मनात समाधान व आनंद होता. या संपूर्ण प्रसंगात वाहनचालकांची दक्षता, स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य व प्रशासनाची तातडीची कार्यवाही यामुळे संभाव्य धोका टळला.

    येत्या काळात काळजी घेणार

    यावेळी स्थानिकांनी विशेषतः ग्रामीण भागातील नाल्यांमध्ये अडकणारा केरकचरा व झाडेझुडपे नियमितपणे स्वच्छ करण्याची मागणी केली. प्रशासनाच्या वतीने संबंधित विभागाकडून येत्या काळात या बाबीवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. village flood children safe return home

    दरम्यान वरोरा तालुक्यामध्ये सदर दिवशी काही मंडळात 120 मिमी तर काही मंडळात 60 मिमी इतका पर्जन्य नोंदविण्यात आला. या पावसाचा अंदाज एक दिवस आधीच घेतल्यामुळे दुसऱ्या दिवशी शाळकरी विद्यार्थ्यांचा प्रवास टाळण्याच्या दृष्टीने माननीय जिल्हाधिकारी महोदय श्री विनय गौडा साहेब , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप सिंग साहेब, निवासी उपजिल्हाधिकारी श्री कुंभार साहेब व जिल्हा शिक्षण अधिकारी श्रीमती सोनावणे मॅडम यांनी संयुक्तरीत्या निर्णय घेऊन वरोरा तालुक्यासाठी विशेष बाब म्हणून शाळांना सुट्टी जाहीर केली. स्थानिक प्रशासनाने हा निर्णय सर्व शाळांमार्फत पालकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.

    या संपूर्ण कार्यवाहीत स्थानिक मा.खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर मॅडम व मा.आमदार श्री करण देवतळे साहेब यांच्या सूचना व मदतीने प्रशासनाने समन्वय साधून कार्य केले, त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षित सुटका शक्य झाली.

  • Chandrapur ZP president reserved for SC woman | 1962 पासूनचा इतिहास बदलणार, चंद्रपूर ZP अध्यक्षपदासाठी अनुसूचित जाती महिला वर्गाला आरक्षण

    Chandrapur ZP president reserved for SC woman

    Chandrapur ZP president reserved for SC woman : चंद्रपूर – वर्ष २०२२ नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाना मुहूर्त मिळाला नाही, नुकतेच सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागल्यावर निवडणुकीची लगबग सुरु झाली. आज १२ सप्टेंबर रोजी राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. first SC woman chairperson for Zilla Parishad Chandrapur history

    पंजाब राज्यात अस्मानी संकट, चंद्रपुरातील मुस्लिम बांधवांचा मदतीचा हात

    चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला म्हणून घोषित करण्यात आले, चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षपदावर वर्ष १९६२ पासून आतापर्यंत २४ अध्यक्ष विराजमान झाले आहे.

    वर्ष १९६२ ते वर्ष २०२२ पर्यंत हे होते अध्यक्ष

    • अब्दुल शफी कार्यकाळ – १२ ऑगस्ट १९६२ ते ११ ऑगस्ट १९६७, पुन्हा वर्ष १९६७ ते १३ सप्टेंबर १९७२
    • वामनराव गड्डमवार कार्यकाळ – १४ सप्टेंबर १९७२ ते २० जून १९७९
    • देवराव मुसळे कार्यकाळ – २१ जून १९७९ ते १० एप्रिल १९८०
    • सुभाष धोटे – ११ एप्रिल १९८० ते २४ एप्रिल १९८०
    • राजाभाऊ जोगी – २५ एप्रिल १९८० ते ११ ऑगस्ट १९८०
    • सुभाष धोटे – १२ ऑगस्ट १९८० ते १ सप्टेंबर १९८०
    • अरुण तुम्पल्लीवार २ सप्टेंबर १९८० ते २५ ऑगस्ट १९८२
    • प्रशासकीय कालावधी – २६ ऑगस्ट १९८२ ते २१ मार्च १९८२
    • उमाजी बगडे – २१ मार्च १९९२ ते १ डिसेम्बर १९९२
    • चंद्रकांत गोहोकार – २ डिसेम्बर १९९२ ते ३० डिसेम्बर १९९२
    • प्रकाश पाटील मारकवार – ३१ डिसेम्बर १९९२ ते २१ डिसेम्बर १९९५
    • दिगंबर गुरकुडे – २६ डिसेम्बर १९९५ ते ८ फेब्रुवारी १९९६
    • प्रकाश पाटील मारकवार – ९ फेब्रुवारी १९९६ ते २० मार्च १९९७
    • एम.के. परचाके – २१ मार्च १९९७ ते २० मार्च १९९८
    • पी.एस.गावंडे – २१ मार्च १९९८ ते २१ मार्च १९९९
    • सुधाकर कुंदोजवार – २१ मार्च १९९९ ते २० मार्च २००२
    • डॉ. निळकंठराव काळे – २१ मार्च २००२ ते १८ मार्च २००५
    • वैशाली वासाडे – १९ मार्च २००५ ते २० मार्च २००७
    • संतोषसिंह रावत – २१ मार्च २००७ ते २५ नोव्हेंबर २००९
    • सतीश वारजुरकर – २६ नोव्हेम्बर २००९ ते २० मार्च २०१२
    • संतोष कुमरे – २१ मार्च २०१२ ते २० सप्टेंबर २०१४
    • संध्याताई गुरनुले – २१ सप्टेंबर २०१४ ते २० मार्च २०१७
    • देवराव भोंगळे – २१ मार्च २०१७ ते ४ जानेवारी २०२०
    • संध्याताई गुरनुले – ५ जानेवारी २०२० ते २० मार्च २०२२

    वर्ष १९६२ ते वर्ष २०२२ या कालावधीत चंद्रपूर जिल्हा परिषदेत फक्त तीन वेळा महिला अध्यक्षपदी विराजमान होत्या, आता प्रथमचं अनुसूचित जाती महिला वर्गाला आरक्षण मिळाल्याने राजकीय हालचाली सुरु झाल्या आहे. सध्याचं पक्षीय वातावरण बघता जिल्हा परिषद निवडणुकीत चांगलीच चुरस बघायला मिळणार आहे. Chandrapur district council president reservation SC woman announced

  • Annasaheb Patil arthik magas vikas mahamandal । वेळ वाचवा, खर्च वाचवा – अण्णासाहेब पाटील महामंडळाची नवी सुविधा

    Annasaheb Patil arthik magas vikas mahamandal

    Annasaheb Patil arthik magas vikas mahamandal :  चंद्रपूर, दि.12 सप्टेंबर २०२५ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना आता सीएससी केंद्रामधून (Common Service Centre) महामंडळाच्या योजनांचा लाभ माफक दरात घेता येणार आहे. याबाबतचा  सामजंस्य करार महामंडळाच्या मुख्य कार्यालयामध्ये महामंडळाचे व्ययस्थापकीय संचालक, विजयसिंह देशमुख व सीएससी केंद्राचे प्रमुख वैभव देशपांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.

    मुस्लिम बांधवानी दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात

      या करारानुसार, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे लाभार्थी आता त्यांच्या जवळच्या कोणत्याही सीएससी केंद्रावर जाऊन महामंडळाच्या योजनांचा लाभ कमी दरात घेऊ शकतील, यामध्ये महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, योजनेची सद्यस्थिती तपासणे आणि आवश्यक मार्गदर्शन मिळवणे यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. Anna Patil Mandal schemes

    जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही

     सीएससी केंद्र हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध सरकारी आणि खासगी सेवा पुरवण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. महामंडळाने सीएससी केंद्रासमवेत केलेल्या करारामुळे महामंडळाच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही, त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचेल.

    राज्यामध्ये सीएससी चे 72 हजारपेक्षा जास्त केंद्र कार्यरत असल्याने त्यांच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांना त्यांच्या गावातूनच पात्रता प्रमाणपत्र, कागदपत्र, बँकेचे कर्ज मंजुरी, बैंकचा हप्ता , अपलोड करण्यासाठी प्रत्येकी 70 रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली. या करारामुळे लाभार्थ्यांचा वेळ वाचणार आहे आणि त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज लागणार नाही. तसेच महामंडळाच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून पैसे उकलणाऱ्या अनधिकृत एजंट लोकांना आळा घालणे शक्य होईल. भविष्यात लाभार्थ्यांसाठी महामंडळाचे मोबाईल अॅप व  चॅट बॉट सारख्या सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

        या नवीन उपक्रमामुळे महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि किफायतशीर होईल, असे मत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी व्यक्त केले.

  • Mukhyamantri samruddha Panchayat raj abhiyan । मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात चंद्रपूर जिल्हा अव्वल असावा – पालकमंत्री डॉ. उईके

    Mukhyamantri samruddha Panchayat raj abhiyan

    Mukhyamantri samruddha Panchayat raj abhiyan : चंद्रपूर, दि. 12 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. 100 दिवसांचे आणि 100 गुणांचे हे उत्कृष्ट अभियान असून यात प्रत्येक ग्रामपंचायत सक्षम होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी या अभियानात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून आपला जिल्हा राज्यात अव्वल राहील, यासाठी सुक्ष्म नियेाजन करावे, अशा सुचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिल्या.

    आमदार मुनगंटीवार यांनी अपघातग्रस्तांचे वाचविले प्राण

    जिल्हा परिषदेच्या वतीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सर्वश्री सुधाकर अडबाले, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके (पंचायत), नुतन सावंत (सामान्य), शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश पाताळे, अश्विनी केळकर (प्राथ्.) मान्याची वाडी गावचे (ता.पाटण, जि. सातारा) सरपंच रविंद्र माने आदी उपस्थित होते. Chief Minister Samruddha Panchayatraj campaign success

    यावेळी पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, या अभियानामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायती अधिक सक्षम, पारदर्शक, जलसमृध्द, उपजिविका विकास, सामाजिक न्याय आदी बाबतीत स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल. लोकसहभागातून ज्या ग्रामपंचायती उत्कृष्ट कार्य करतील त्यांना जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ सेवा पंधरवड्यापासून म्हणजे 17 सप्टेंबर पासून सुरू होईल. संपूर्ण राज्यात 100 दिवस म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात चंद्रपूर जिल्हा राज्यात प्रथम राहील, असा विश्वास पालकमंत्री डॉ. उईके यांनी व्यक्त केला. 100 day 100 score gram panchayat development planning

    ग्रामपंचायतींनी ध्येय ठेवून काम करावे : सरपंच रविंद्र माने

    मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान हे गावाचा चेहरा मोहरा बदलविणारे अभियान आहे. केवळ उत्पनावर ग्रामपंचायत चालत नसते तर वेगवेगळ्या अभियानात सहभागी होऊन पुरस्काराच्या माध्यमातून आपण आपली ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतो. पुरस्काराच्या रकमेतून गावाचा व गावातील प्रत्येक कुटुंबाचा विकास करणे शक्य आहे. मात्र त्यासाठी ग्रामपचांयतींनी ध्येय ठेवून काम करावे, असा सल्ला केंद्र आणि राज्य शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत मान्याची वाडी (ता. पाटण, जि. सातारा) चे सरपंच रविंद्र माने यांनी उपस्थित सरपंचांना दिला. एकदिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते.

    पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अतिशय उत्कृष्ट अभियान आहे. आतापर्यंत राबविलेल्या सर्व अभियानाचा यात सारांश आहे. प्रत्येक अभियान हे वर्षभरासाठी असते मात्र हे अभियान केवळ 100 दिवसांचे व 100 गुणांचे आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने 8 मुद्यांवरील 50 प्रश्नांवर काम करायचे आहे. पुढील 100 दिवस प्रत्येक सरपंचांनी गावातच राहून हे अभियान यशस्वी करावे तसेच जिल्ह्यासाठी पुरस्कार प्राप्त करावे, असे आवाहनही त्यांनी केले. CM Panchayatraj scheme

    यावेळी आमदार सुधाकर अडबाले, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच आदी उपस्थित होते.

    आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वाटप : 

    सन 2024-25 चे आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार रंजना मुळे,  (ग्रा. पं. वढा, चंद्रपूर), विजय पचारे (ग्रा.पं. मुधोली / पळसगाव सी./वडाळा तु. भद्रावती), सचिन घारगे, (ग्रा.प.मेसा/ वनोजा,  वरोरा), आनंद गलबले, (ग्रा.पं. चेकजाटेबार, चिमुर), ऋषीश्वर औरासे,  (ग्रा.पं.  वांद्रा/ आक्सापुर, ब्रम्हपूरी) यांच्यासह 15 जणांना देण्यात आला.

    सन 2023-24 च्या पुरस्कारप्राप्त अधिका-यांमध्ये अनिता दुधे (ग्रा.पं.  धानोरा, चंद्रपूर), जयश्री चंदनखेडे (ग्रा.पं. चालबर्डी/ चपराळा, भद्रावती), विद्या गिलबीले, (ग्रा.पं. आंनदवन, वरोरा), भगवंत नरड,(ग्रा.पं. बोथली (वहा) चिमुर), मंगेश गोवर्धन, (ग्रा.पं बेलगांव जाणी/ तोरगांव खु.,  ब्रम्हपूरी) यांच्यासह 15 अधिकारी तर सन 2022-23 चे आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार प्रकाश पवार ,(ग्रा.पं. पिंपळखुट, चंद्रपूर), राजेन्द्र अवघड, (ग्रा.पं. घोनाड,  भद्रावती), विद्या गिलबीले, (ग्रा.पं. आनंदवन, वरोरा), विठ्ठल नखाते, (ग्रा.पं. कळमगांव, चिमुर),  होमदेव तलांडे , (ग्रा.पं. बरडकिन्ही, ब्रम्हपूरी) यांना देण्यात आला.