Blog

  • encroachment of forest land । 📢 सुधीर मुनगंटीवार यांची हमी – पात्रांना पट्टे तातडीने मिळणार, वाद संवादातून सुटणार

    encroachment of forest land

    encroachment of forest land : चंद्रपूर, दि. 30 ऑगस्ट २०२५ : पोंभुर्णा तालुक्यातील मौजा देवई, केमारा आणि भटारी गावांतील वनजमिनीवरील अतिक्रमण पट्टे देण्यासंदर्भात राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत अतिक्रमित जमिनींचे सर्वेक्षण, वैयक्तिक व सामूहिक वनहक्क दावे, तसेच निस्तारहक्कपत्रांसाठी आवश्यक कार्यवाही आणि कायदेशीर प्रक्रिया यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. लाभार्थ्यांना पट्टे तात्काळ वितरित करण्यासाठी सर्व कागदपत्रे तपासून आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश आ.मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले.

    कांग्रेसला आमदार जोरगेवार यांचा धक्का, अनेकांनी घेतला भाजपात प्रवेश

    पोंभुर्णा तालुक्यातील मौजा देवई, केमारा आणि भटारी येथील वनजमिनीवरील अतिक्रमण पट्टे देण्यासंदर्भात नियोजन भवनात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते.बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, आदिवासी चळवळीचे जिल्हा संघटक प्रमूख जगनजी येलके, गणेश परचाके सामजिक कार्यकर्ते, अल्का आत्राम, संध्याताई गुरनुले, डॉ. मंगेश गुलवाडे, रामपाल सिंग, अजय दुबे, हरीश ढवस, गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी, उपविभागीय अधिकारी अजय चरडे, पोंभुर्णाचे तहसीलदार मोहनिश शेलवटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी फनींद्र गादेवार तसेच संबंधित महसूल व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. Sudhir Mungantiwar meeting forest patta Pombhurna

    pombhurna forest

    पट्टे देण्यासाठी आवश्यक ती पावले उचला

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जमिनीबाबत तहसीलदार आणि वन अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांची सर्व कागदपत्रांची पडताळणी करावी, तसेच पट्ट्यांबाबत उद्भवलेले वाद संवादातून सोडवावे. शासनाच्या धोरणानुसार पात्र लाभार्थ्यांना पट्टे देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची कार्यवाही करावी. महसूल तसेच वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण असेल तर कायद्यान्वये तपासून कॅम्प घेऊन पट्ट्याचा निर्णय घेता येईल. लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्रे व पुरावे कॅम्पमध्ये घेऊन यावीत. जे पट्टे देता येईल ते तात्काळ दिले जावे.

    युद्ध पातळीवर कॅम्प घेऊन दाव्याची प्रकरणे निकाली काढावीत. सामुदायिक वनहक्क दाव्यांबाबत निस्तार हक्कपत्र देण्यासाठी शासन निर्णयानुसार त्रुटी पूर्ततेसाठी योग्य कागदपत्रासह तिन्ही गावांचे प्रस्ताव तयार करून आवश्यक कार्यवाही करा. सर्व कागदपत्रांची तपासणी करून अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करावी. वनजमिनीवरील अतिक्रमण पट्ट्यांबाबत समितीने दर आठवड्याला बैठक घेऊन महसूली व वनहक्काचे दावे निकाली काढावेत. असे निर्देश देखील त्यांनी बैठकीत दिले. encroachment of forest land

    प्रायोगिक स्तरावर पोंभुर्णा तालुक्यातील वनजमिनीवरील अतिक्रमण पट्ट्यांचा प्रश्न प्रथम मार्गी लावावा. त्यानंतर मूल व बल्लारपूर तालुक्यांतील विषय मार्गी लावण्यात येतील. जेवढे पट्टे वितरित करता येतील ते तातडीने वाटप करण्याचे नियोजन करावे, असेही आमदार  सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

  • women and youth BJP joining । 🌟 आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत ४०० महिला व युवकांनी भाजपात घेतला प्रवेश

    women and youth BJP joining

    women and youth BJP joining : चंद्रपूर (३० ऑगस्ट २०२५) – आजचा कार्यक्रम हा फक्त प्रवेशाचा किंवा औपचारिक कार्यक्रमाचा क्षण नाही, तर समाजहितासाठी नवे वचन देण्याचा क्षण आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेश करून तुम्ही राष्ट्रसेवेच्या एका महान प्रवासाची सुरुवात केली आहे. भाजप हा केवळ सत्तेसाठीचा पक्ष नाही, तो समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविणारा पक्ष आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ही घोषणा म्हणजेच आपली विचारधारा आहे. या विचारधारेचा प्रसार प्रत्येक घरापर्यंत करणे ही आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    ग्रामीण भागात मनसेचा झंझावात, माजी सरपंचाचा मनसे मध्ये प्रवेश

    घुग्घुस येथे आज शनिवारी पक्ष प्रवेश आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस नेते प्रा. हेमंत उरकुडे यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सोबतच सय्यद इद्रीस, नीतू जायसवाल, सविता गोहणे, मनीषा मेश्राम, उज्वला उईके, रमन तांद्रा, गुरुदास तंग्रपवार, मल्लेश बल्ला, किशोर धनकमारे, लक्ष्मी चांदेकर, सय्यद हुसेन अली यांच्या नेतृत्वाखाली ४०० हून अधिक  महिला व युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. Kishor Jorgewar speech

    ghugus news

    या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, घुग्घुस शहराध्यक्ष संजय तिवारी, महामंत्री मनोज पाल, महामंत्री सविता दंढारे, तुषार सोम, नामदेव डाहुले, मंडळ अध्यक्ष विनोद खेवले, आशिष मासिरकर, अमोल शेंडे, राशिद हुसेन, सायली येरणे, संतोष नुने, राजकुमार बोरचेलवार, मुन्ना रोडे, संजय भांगडे, श्याम अगदारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

    यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, भाजप हा केवळ राजकीय पक्ष नाही तर तो एक राष्ट्रभक्तीची चळवळ आहे. या पक्षाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, विकासाभिमुख विचार आणि सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास ही घोषणा आज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वेगाने जात आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केलेला तुमचा पक्षप्रवेश हा पक्षाला आणखी बळकट करणारा आहे. Ghugus BJP induction event leadership quotes

    कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच पक्ष बळकट

    भाजप कार्यकर्त्यांचे स्थान फार मोठे आहे. येथे कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच पक्ष बळकट होतो. तुम्ही ज्या ऊर्जेने आज प्रवेश केला आहे, तीच ऊर्जा पुढील काळात संघटनाच्या कार्यात वापरावी. भाजप सरकारने गरीब, शेतकरी, कामगार, महिला आणि युवकांसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे. उज्ज्वला योजनेतून घराघरात गॅस पोहोचला, प्रधानमंत्री आवास योजनेतून लाखो घरे उभी राहिली, जनधन योजनेतून गरिबांना बँकेत खाते मिळाले, शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी सुरु झाला, तर युवकांसाठी स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया सारख्या योजनांमधून संधी निर्माण झाल्या. women and youth BJP joining

    पक्षात प्रवेश करणे ही पहिली पायरी आहे. आज ४०० कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झालात, यामुळे संघटनाला नवसंजीवनी मिळाली आहे. तुमच्या ऊर्जेने आणि तुमच्या प्रामाणिकपणाने आपण येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित करू, असा विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

    यावेळी भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • cyber crime awareness session for students । सायबर गुन्ह्यांविरोधात सजगता: छोटूभाई पटेल हायस्कूलमध्ये विशेष व्याख्यानमाला

    cyber crime awareness session for students

    cyber crime awareness session for students : चंद्रपूर ( ३० ऑगस्ट २०२५)-‘सायबर क्राईमपासून वाचण्यासाठी प्रत्येकाने सजग राहणे, तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे’ ‘आपल्या भोवतालच्या मुलांविषयी सतत जागरूकता बाळगा. विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता उलट धाडसाने चुकीच्या गोष्टींना विरोध करावा ‘ असे आवाहन छोटूभाई पटेल हायस्कूलच्या माजी विद्यार्थी तथा महाराष्ट्र पोलीस विभागातील अधिकारी परवीन पठाण यांनी व्यक्त केले.

    छोटूभाई पटेल हायस्कूल, चंद्रपूर माजी विद्यार्थी संघातर्फे माजी विद्यार्थी कै. स्वप्नील महावादीवार स्मृतीप्रित्यर्थ आयोजित “व्याख्यानमाला – दुसरे पुष्प” हा प्रेरणादायी कार्यक्रम शनिवारी (दि. ३० ऑगस्ट २०२५) सकाळी शाळेच्या पटांगणात उत्साहात संपन्न झाला.

    अल्युमिनियम चोरीचा गुन्हा २४ तासात उघड, ७ आरोपीना अटक

    सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्व. छोटूभाई पटेल यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कांत (वैद्य) मॅडम, उपमुख्याध्यापक मानकर सर, निबांळकर सर, कुमरे मॅडम, तसेच माजी विद्यार्थी आशिष धर्मपुरिवार, जितेंद्र मशारकर, धीरज साळुंके, सागर कुंदोजवार यांची उपस्थिती होती. school cyber safety lecture Maharashtra police

    सायबर क्राईम व लहान मुलांवर होणारे अत्याचार

    या व्याख्यानात “सायबर क्राईम व लहान मुलांवर होणारे अत्याचार – जागरूकता आणि उपाय योजना” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शाळेची माजी विद्यार्थिनी व महाराष्ट्र पोलीस विभागातील अधिकारी परवीन पठाण यांनी प्रमुख प्रवक्त्या म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

    आपल्या अनुभवातून त्यांनी सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, संशयास्पद घटनांची तक्रार करण्याची पद्धत, तसेच बालकांवरील अत्याचाराविरोधातील कायदेशीर तरतुदी या संदर्भात मार्गदर्शन केले.

    त्यांच्या ओघवत्या व वास्तववादी भाषणामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शंका समाधान करून घेतले. Parveen Pathan cyber safety talk Chandrapur school

    या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, अशा व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांच्या मनात सजगतेची बीजे रोवली जातील आणि ते सुजाण नागरिक म्हणून घडतील, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कांत मॅडम यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी ॲड. आशिष धर्मपुरीवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री पडोळे सर यांनी केले.

    छोटूभाई पटेल हायस्कूल माजी विद्यार्थी संघाने घेतलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, “व्याख्यानमाला” मालिकेतील हे दुसरे पुष्प सर्वार्थाने यशस्वी ठरले.

  • Realme 15T Mobile । Realme 15T Mobile चा ड्युअल 50MP कॅमेरा, दमदार परफॉर्मन्स – संपूर्ण माहिती

    Realme 15T Mobile

    Realme 15T Mobile : चंद्रपूर, (दि. ३० ऑगस्ट): स्मार्टफोन बाजारात आपल्या वेगवान वाढीसाठी ओळखल्या जाणाऱ्या Realme कंपनीने आपल्या नव्या ‘Realme 15T‘ या स्मार्टफोनच्या घोषणेने ग्राहकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. येत्या २ सप्टेंबर रोजी हा फोन भारतात लाँच होणार असून, त्यापूर्वीच याच्या दमदार फिचर्सची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः याची मोठी बॅटरी आणि दोन्ही बाजूंनी ५० मेगापिक्सलचा कॅमेरा यांमुळे हा फोन बाजारात मोठा बदल घडवून आणेल असे मानले जात आहे. Realme 15T launch date

    होमलोन बाबत सविस्तर माहिती

    काय आहेत Realme 15T ची खास वैशिष्ट्ये?

    Realme 15T मध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत, जी त्याला त्याच्या श्रेणीतील इतर फोन्सपासून वेगळे ठरवतात.

    • डिझाइन आणि डिस्प्ले: फोनला एक आकर्षक आणि प्रीमियम डिझाइन देण्यात आले आहे. यात 6.57 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 4000 nits च्या पीक ब्राइटनेससह येतो. त्यामुळे उन्हातही स्क्रीन अगदी स्पष्ट दिसते. यासोबतच 2160Hz PWM डिमिंगची सुविधा असल्याने डोळ्यांवर ताण येत नाही.
    • दमदार बॅटरी: सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात असलेली 7,000mAh ची मोठी बॅटरी. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर १३ तास गेमिंग आणि २५ तासांपेक्षा जास्त YouTube व्हिडिओ पाहण्याचा अनुभव देते. यासोबतच यात 10W रिवर्स चार्जिंगची सुविधाही आहे, ज्यामुळे तुम्ही या फोनमधून इतर उपकरणे चार्ज करू शकता. Realme 15T battery backup and fast charging
    • कॅमेरा: फोटोग्राफीच्या शौकिनांसाठी हा फोन खास आहे. यात मागील आणि पुढील दोन्ही बाजूंना 50-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यामुळे सेल्फी आणि रेग्युलर फोटोग्राफी दोन्हीसाठी उत्तम गुणवत्ता मिळते. Realme 15T 50MP dual camera phone
    • प्रोसेसर आणि परफॉर्मन्स: Realme 15T हा MediaTek Dimensity 6400 Max 5G चिपसेटवर चालतो. हा प्रोसेसर वेगवान गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी उत्तम मानला जातो. फोनमध्ये Android 15 आधारित Realme UI 6.0 देण्यात आले आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना नवीन आणि उत्तम अनुभव मिळेल.
    • इतर वैशिष्ट्ये: फोनची बॉडी IP66, IP68 आणि IP69 रेटेड आहे, ज्यामुळे तो धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो. थर्मल मॅनेजमेंटसाठी 6,050 स्क्वेअर मिमीचे एअरफ्लो वाष्प चेंबर (VC) कूलिंग सिस्टीम वापरण्यात आली आहे.

    किंमत आणि उपलब्धता:

    लीक झालेल्या माहितीनुसार, Realme 15T ची किंमत ₹20,000 च्या आसपास असण्याची शक्यता आहे. हे फोन ‘फ्लोइंग सिल्व्हर’, ‘सिल्क ब्लू’ आणि ‘सूट टायटॅनियम’ या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. कंपनीने जाहीर केल्यानुसार, हा फोन २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्ट, Realme च्या अधिकृत वेबसाइट आणि काही निवडक ऑफलाइन स्टोअर्सवर उपलब्ध होईल.

    एकंदरीत, Realme 15T हा कमी किमतीत मोठी बॅटरी, दमदार कॅमेरा आणि उत्तम परफॉर्मन्स देणारा एक आकर्षक पर्याय म्हणून बाजारात दाखल होणार आहे, अशी अपेक्षा आहे.

  • police solve aluminium wire theft case । 🚨 २४ तासांत अल्युमिनियम तार चोरी उघडकीस – भिसी पोलिसांनी दाखवली तत्परता

    police solve aluminium wire theft case

    police solve aluminium wire theft case : भिसी ३० ऑगस्ट २०२५ – १७ विजेच्या खांबावर विजेची अल्युमिनियम तार लावणायचे काम जांभूळगाव ते खापरी या गावजवळ समीक्षा अँड डिम्पल इलेकट्रीकल कंपनी चामोर्शी च्या वतीने सुरु होते, यासाठी कंपनीने अल्युमिनियम तार मार्गावर ठेवण्यात आला होता. मात्र २७ ऑगस्ट रोजी तार चोरी गेल्याची तक्रार कंपनीचे सुपरवायझर नितेश गव्हारे यांनी भिसी पोलिसात दिली. पोलिसांनी जलद तपास करीत २४ तासांच्या आत आरोपीना अटक करीत तार जप्त केली.

    चंद्रपूर मनपाची डेंगू तपासणी मोहीम

    जांभूळगाव ते खापरी मार्गावरील विजेची लाईन टाकण्याचे काम सुरु आहे, यासाठी कंपनीने तार आणून ठेवली होती मात्र अज्ञातांनी सदर तार चोरी केली, याबाबत भिसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली. तक्रार प्राप्त झाल्यावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. यावेळी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली, माहितीच्या आधारे पोलिसांनी जांभुळघाट गावातील २१ वर्षीय आनंद गुलाब नेवारे व २४ वर्षीय मंगेश नीलकंठ बोरकर यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी सदर अल्युमिनियम तार चोरी केल्याची कबुली दिली. aluminium wire theft

    ७ आरोपी अटकेत

    तसेच सदर चोरी करण्यासाठी जांभूळगावातील २३ वर्षीय क्रिष्णा रमेश मीटपल्लीवार याने मदत केली, व चोरीचा माल २२ वर्षीय रोशन अण्णाजी हजारे, १९ वर्षीय कुणाल गणेश हजारे यांना विकला व चोरीचा माल हा २६ वर्षीय सागर अण्णाजी हजारे, २१ वर्षीय विजय नंदकिशोर भेंडवाल यांच्या सहकार्याने कुणाल हजारे याने चारचाकी वाहनाने घेऊन जात जांभूळगाव ते खापरी रोडवरील झुडपात लपवून ठेवला.

    भिसी पोलिसांनी यावेळी चारचाकी वाहन क्रमांक एमएच ३४ बीजी ९४९७, अल्युमिनियम तार असा एकूण ६ लाखांचा मुद्देमाल सह ७ आरोपीना २४ तासांच्या आत अटक केली. suspect arrests for aluminium wire theft

    सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात सपोनि मंगेश भोंगाळे, पोउपनि रवींद्र वाघ, पोउपनि भारत थिटे, पोलीस कर्मचारी अजय बगडे, सतीश झिलपे, श्रीकांत वाढई, रेखलाल पटले व वैभव गोहणे यांनी केली.

  • MNS gaining strength in Chandrapur । भाजप-शिवसेना-काँग्रेसला आव्हान : चंद्रपूरात मनसेचा झपाट्याने विस्तार

    MNS gaining strength in Chandrapur

    MNS gaining strength in Chandrapur : चंद्रपूर ३० ऑगस्ट २०२५| तालुक्यातील चोरगाव येथे २९ ऑगस्ट २५ शिवसेना (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गावातील माजी सरपंच सुलोचना कोकाडे आणि प्रतीक चिकाटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) मध्ये औपचारिक प्रवेश करून स्थानिक राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले आहेत. हा पक्षप्रवेश सोहळा प्रतीक चिकाटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला असून, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेत कोकाडे यांनी राजसाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त करत मनसेच्या झेंड्याखाली येण्याचा निर्णय घेतला.

    पोंभुर्णा मध्ये रास्त धान्याचा काळाबाजार, युवासेनेने उचलला आवाज

    गावपातळीवर राजकीय सत्ता आणि पक्षीय निष्ठा यांचे बदलते चित्र हा प्रवेश अधोरेखित करतो. सुलोचना कोकाडे आणि प्रतीक चिकाटे यांचा राजकीय प्रवास ग्रामपंचायतीपासून सुरू झाला होता. स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करताना त्यांनी जनतेशी घट्ट नाळ जोडली होती. त्यामुळे त्यांचा पक्षांतर हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून, त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांमध्ये आणि गावकऱ्यांमध्येही त्याचे परिणाम उमटणार हे निश्चित आहे. Aman Andhewar MNS leadership

    या प्रवेश सोहळ्याला मनसेच्या विविध आघाड्यांतील अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहित सेना जिल्हाध्यक्ष रमेश काळबांडे, जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, रोजगार व स्वयम रोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, जनहित सेना तालुका सचिव राजू लांडगे, शहर अध्यक्षा वर्षा बोंबले यांच्यासह राकेश जवादे, अमन तुळ व विशाल भसारकर या कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली. या उपस्थितीने कोकाडे यांच्या प्रवेशाला औपचारिक मान्यता तर मिळालीच, पण मनसेच्या संघटनात्मक ताकदीचेही प्रदर्शन झाले.

    राजकीयदृष्ट्या चंद्रपूर जिल्हा हा नेहमीच वेगवेगळ्या पक्षांसाठी प्रयोगशाळा ठरला आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे संघर्षग्रस्त क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या या भागात मनसेला स्थिरावणे कठीण ठरत होते. मात्र गेल्या काही महिन्यांत स्थानिक पातळीवरील नेतृत्वाची चढती कामगिरी, राजसाहेब ठाकरे यांचे प्रभावी भाषणशैली आणि मराठी अस्मितेवर आधारित राजकारण यामुळे मनसेला ग्रामीण भागात थोड्याफार प्रमाणात आशेची किनार दिसू लागली आहे. कोकाडे आणि चिकाटे यांचा प्रवेश हा या बदलत्या समीकरणाला आणखी चालना देणारा टप्पा ठरू शकतो. sarpanch switches party Shiv Sena to MNS

    राजसाहेब ठाकरे यांच्या दूरदृष्टीवर आमचा विश्वास

    सुलोचना कोकाडे यांनी या प्रवेशावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “राजसाहेब ठाकरे यांच्या दूरदृष्टीवर आमचा विश्वास आहे. स्थानिक जनतेच्या प्रश्नांवर नेमकेपणाने आवाज उठवणारा पक्ष म्हणजे मनसे. गावपातळीवरील प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही मनसेच्या बळावर काम करू.” त्यांच्या या भूमिकेतून शिवसेनेबद्दल असलेली नाराजी आणि नवीन राजकीय जागा शोधण्याची गरज प्रकर्षाने दिसून येते.

    राजकारणात सरपंच स्तरावरील बदल अनेकदा मोठे परिणाम घडवतात. कारण अशा नेतृत्वावर स्थानिक पातळीवरील सामान्य नागरिकांचा विश्वास असतो. कोकाडे यांनी मनसेत प्रवेश घेतल्यामुळे चोरगाव परिसरातील पक्षीय स्थितीवर थेट परिणाम होणार असून, आगामी ग्रामपंचायत व विधानसभा निवडणुकांमध्ये हा प्रवेश शिवसेना आणि भाजपसाठी आव्हानात्मक ठरू शकतो.

    मनसे जिल्हा नेतृत्वाने हा प्रवेश स्वागतार्ह ठरवत “ही फक्त सुरुवात आहे” असे संकेत दिले आहेत. कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी यावेळी सांगितले की, “मनसेला ग्रामपातळीवर बळकट करण्याचा आमचा संकल्प आहे. कोकाडे यांसारखे नेतृत्व पक्षात आल्याने चोरगावसह संपूर्ण तालुक्यात मनसेची ताकद वाढेल.” MNS leadership impact Chandrapur politics

    आगामी निवडणुकीत मनसे निर्णायक

    या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय गणिते अधिक गुंतागुंतीची होणार हे निश्चित आहे. एका बाजूला भाजप-काँग्रेसच्या पारंपरिक लढती, दुसऱ्या बाजूला शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणि आता मनसेची झपाट्याने वाढणारी उपस्थिती – या सर्व घडामोडी येणाऱ्या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. MNS gaining strength in Chandrapur

    सौ. सुलोचना कोकाडे आणि प्रतीक चिकाटे यांचा मनसे प्रवेश हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून, ग्रामीण राजकारणाच्या बदलत्या स्वरूपाचे प्रतीक मानला जात आहे. गावकुसातील जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून मनसेची संघटनात्मक चळवळ उभी राहिली, तर हा प्रवेश स्थानिक पातळीवर क्रांतिकारी ठरू शकतो.

  • corruption in ration shop Pombhurna । गरीबांच्या अन्नावर डाका – पोंभुर्णा धान्य घोटाळा प्रकरणात युवासेनेची कारवाईची मागणी

    corruption in ration shop Pombhurna

    corruption in ration shop Pombhurna : पोंभुर्णा – पोंभुर्णा शहर व तालुक्यातील शासनमान्य धान्य दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात धान्याचा काळाबाजार सुरू असून, सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्य सर्रासपणे खासगी व्यापाऱ्यांना व ट्रकमधून बाहेर जिल्ह्यात विकले जात असल्याची गंभीर तक्रार युवा सेना शहरप्रमुख महेश प्रकाश श्रीगिरीवार यांनी पोंभूर्णा तहसीलदार यांचेकडे केली आहे.

    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची चंद्रपुरात पडताळणी सुरु

    सरकारी स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे स्वस्त धान्य गरीब व गरजू जनते च्या घरी न पोहोचता दलाल व व्यापाऱ्यांच्या खिशात जात असल्याने हजारो कुटुंबे स्वस्त धान्यापासून वंचित राहत आहेत. शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या योजनेला हा उघडपणे लुटण्याचा प्रकार ठरत असून, प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पोंभूर्णा युवा सेनेकडून करण्यात आला आहे. black marketing of subsidised food grain

    महत्वाच्या मागण्या :-

    • १) धान्य घोटाळ्यातील सर्व संबंधित दोषी दुकानदार, लाभार्थी व व्यापाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी.
      २) गोडावून व दुकानांची चौकशी करून साठवलेले धान्य तात्काळ जप्त करावे.
      ३) धान्य वाहून नेणारे ट्रक व इतर वाहनांवर कारवाई करून त्यातील माल जप्त करावा.
      ४) हा घोटाळा मोठ्या प्रमाणावर असून, यामध्ये उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी.

    युवा सेनेचा इशारा :-

    जर ७ दिवसांच्या आत प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही, तर युवा सेना पोंभुर्णा तर्फे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील. ” गरीब आणि सामान्य जनतेच्या हक्काचे धान्य लुटणाऱ्या भ्रष्ट यंत्रणेचा आम्ही कडाडून विरोध करू. पोटभर अन्न मिळावे हा जनतेचा हक्क असून, त्या हक्कासाठी युवा सेना रस्त्यावर लढा देईल.” yuvasena ubt

    निवेदन देतांना युवासेना शहरप्रमुख महेश श्रीगिरीवार यांचेसोबत कृषभ बुरांडे, सुरज कावळे व युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Sudhir Mungantiwar Nitin Gadkari meeting । मुल-चंद्रपूर बायपास व उड्डाणपुलाच्या मागणीवर गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद

    Sudhir Mungantiwar Nitin Gadkari meeting

    Sudhir Mungantiwar Nitin Gadkari meeting : २९ ऑगस्ट २०२५ चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासह चंद्रपूर जिल्ह्यातील विविध रस्ते व उड्डाणपुलांच्या कामांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी सोपविलेल्या निवेदनांवर ना. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर संबंधित कामांच्या संदर्भात कार्यवाही करण्याचा शब्द दिला. Chandrapur road development projects

    लाडक्या बहीण योजनेच्या अर्जाची चंद्रपुरात पडताळणी सुरु

    ना.गडकरी यांच्या भेटीत चंद्रपूर–मूल राष्ट्रीय महामार्ग सिमेंट काँक्रीट करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्गांच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर निवेदन सादर केले. नेहमीप्रमाणेच ना. गडकरी यांनी संवेदनशीलतेने विषय ऐकून घेतला आणि सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या ठाम व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळेच देशातील रस्ते विकासाचा वेग वाढत असून चंद्रपूर जिल्ह्यालाही या विकासप्रवाहाचा मोठा लाभ मिळेल, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    मुल बायपास रस्त्याची रचना

    यामध्ये विशेषतः मुल शहरातील वाहतूक समस्येच्या संदर्भात आ. मुनगंटीवार यांनी निवेदन सोपवले. सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. 2, चंद्रपूर यांच्याद्वारे मुल बायपास रस्त्याची रचना करण्यात आली आहे. त्यानुसार या मार्गासाठी जमिनीचे अधिग्रहणही पूर्ण झालेले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 930 पासून मुल शहरातील रेल्वे क्रॉसिंगमार्गे उमा नदीच्या पुलाजवळून जाणारा हा बायपास रस्ता सुमारे 6.14 किमी. लांबीचा असेल. या प्रस्तावित बायपास रस्त्यावर एक रेल्वे क्रॉसिंग असल्यामुळे त्यावर रोड ओव्हर ब्रिज (ROB) चे बांधकाम करणे आवश्यक आहे, असे आ. मुनगंटीवार यांनी ना. गडकरींना सांगितले. Nitin Gadkari Sudhir Mungantiwar latest news

    महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 मुल-चंद्रपूर (महाराष्ट्र) येतो. या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस चंद्रपूर जिल्ह्यातील जानाला, आगडी, गोंडसावरी, महादवाडी, अजयपूर, चिचपल्ली, वलनी, घंटाचौकी आणि लोहारा ही गावे आहेत. या गावांच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस जुन्या, अरुंद व तुटलेल्या नाल्यांमुळे पावसाचे व सांडपाण्याचे योग्य प्रकारे निस्सारण होत नाही. त्यादृष्टीने मुल-चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस RCC काँक्रीट नाली (अंदाजे लांबी 8.00 किमी) मंजूर करणे आवश्यक असल्याची बाब आ. मुनगंटीवार यांनी मांडली. यासोबतच बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील बल्लापूर, मुल, पोंभुर्णा येथील विविध विकासकामांना केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजुरी देण्याची मागणी आ. श्री. मुनगंटीवार यांनी केली.

    महाराष्ट्रातील मुल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग (एन.एच. 930) वरील रेल्वे क्रॉसिंग (गेट क्र. जी.सी.एफ. 123) येथे दररोजच्या प्रचंड वाहतुकीमुळे दीर्घकाळ वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण होते. यामध्ये केवळ सामान्य नागरिक, शालेय मुले व आपत्कालीन सेवा (ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड) यांनाच अडथळा निर्माण होत नाही तर आर्थिक व औद्योगिक क्रियांवरही नकारात्मक परिणाम होतो. या समस्येच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी संबंधित ठिकाणी रेल्वे ओव्हर ब्रिज (उड्डाणपूल) बांधणे आवश्यक आहे, ही बाब आ. मुनगंटीवार यांनी निदर्शनास आणून दिली.

  • dengue household inspection results । मनपाची डेंग्यू तपासणी मोहीम, चंद्रपुरात किती घरे डेंग्यूने दूषित? जाणून घ्या

    dengue household inspection results

    dengue household inspection results : चंद्रपूर 29 ऑगस्ट २०२५ – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे डेंग्यू व इतर कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी राबविल्या जाणाऱ्या घरांच्या तपासणी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात शहरातील 2 टक्के घरे दुषित आढळुन आली,पहिल्या टप्यात 5 टक्के दुषित घरे आढळल्यानंतर मनपातर्फे मोहीम तीव्र करण्यात आल्याने दूषित घरांची संख्या कमी झाली आहे.

     मनपा कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी रुग्णालयांद्वारे डेंग्यू व इतर कीटकजन्य आजार रुग्णांचा दैनंदिन अहवाल मनपाकडे पाठविला जात असुन,त्यानुसार जुलै महिन्यापासुन शहरात आतापर्यंत टायफाईडचे 12,चिकनगुनियाचे 2 तर डेंग्यूचे 12 रुग्ण आढळले आहेत.मागील काही वर्षांच्या तुलनेत कीटकजन्य आजार रुग्णांच्या संख्येत यावर्षी लक्षणीय घट असुन हे सर्व रुग्ण आता रोगमुक्त आहेत.  

    गडचिरोली मधील लड्डू दत्तक संस्थेत काम करण्याची सुवर्णसंधी

     कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी मनपातर्फे डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविली जात असुन 28 ब्रिडींग चेकर्स,32 एएनएम, 22 एमपीडब्लु,170 आशा वर्कर व स्वच्छता निरीक्षक पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. ब्रिडींग चेकर्सद्वारा अधिकाधिक घरांची दररोज तपासणी केली जात असुन प्रत्येक घरामध्ये सतर्कता बाळगण्याचा इशारा दिला जात आहे. dengue cases drop after intensified inspection drive

     पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात. या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे व नागरीकांना सचेत करणे यासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली असुन नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.  

    डेंग्युची लक्षणे –

    डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यूताप व डेंग्यू रक्तस्रावी ताप हे मुख्य आजार आहेत. ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या खोबणीमधे दुखणे, पाठदुखी, डोकेदुखी, स्नायूमध्ये वेदना, सांधेदुखी ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. वस्तुतः डेंग्यू हा सामान्य आजार आहे परंतु या रोगाबाबत माहिती नसल्याने किंवा अपुरी माहिती असल्याने काही वेळा तो जीवघेणा ठरू शकतो. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

    डेंग्यु टाळण्यास उपाययोजना –

    डेंग्यु डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे आपल्या घराची तपासणी करावी . पाणी साठवण्याची भांडी कोरडी करणे,डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाकणे, पाणी साठा मोठा असले तर त्यात गप्पी मासे टाकणे आवश्यक आहे. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी संपवितात ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो. आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा.

  • Israel 5000 vacancies salary 130k INR । इस्त्रायलमध्ये तब्बल 5000 नोकऱ्या – महिन्याला मिळणार थेट ₹1.30 लाख वेतन 💼🌍

    Israel 5000 vacancies salary 130k INR

    Israel 5000 vacancies salary 130k INR : चंद्रपूर, दि. 29 ऑगस्ट २०२५ :  कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत इस्त्रायल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती विभागाने दिली आहे. या विभागाच्या https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर Latest Jobs या विकल्पाद्वारे उमेदवारांना अर्ज करता येईल.

    चंद्रपुरात लाडक्या बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरु

     990 तासांचा कोर्स पुर्ण करणे आवश्यक

    इस्त्रायलमध्ये होम हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स या पदासांठी सुमारे 5 हजार नोकरीच्या संधी, दीड लाखापर्यंत मासिक वेतनाची संधी व या पदासाठी पात्रतेचे निकष व जाहिरातीचा तपशील वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या वय 25 ते 45 वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे काळजी वाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुन/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यता प्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पुर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. Israel home caregiver jobs

    भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायझरी मधील प्रशिक्षण संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरेपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच  जीडीए /एएनएम/जीएनएम/बीएससी नर्सीग / पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी वरिल लिंकवर जाऊन आपली माहिती भरावी व या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे.