Mahesh Salame drowning death Nagbhid । 🚨 नागभीड हादरलं! तलावात आढळला तरुणाचा मृतदेह – गाव शोकाकुल

Mahesh Salame drowning death Nagbhid

Mahesh Salame drowning death Nagbhid : नागभीड-चंद्रपूर (२५ ऑगस्ट २०२५): आज सकाळी नागभीड-चंद्रपूर मार्गावरील चिंधी माल येथील एका २२ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. महेश अभिमन सलामे असे या तरुणाचे नाव आहे.

चंद्रपुरात हवी गोंड वीरांची स्मारके

महेश सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतात जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला होता. बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याची वाट पाहिली. दरम्यान, गावाजवळच्या तलावात एका शेतकऱ्याला एक मृतदेह तरंगताना दिसला. जवळ जाऊन पाहिले असता, तो मृतदेह महेशचा असल्याचे निष्पन्न झाले.

मिर्गीचा आजार

कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. प्राथमिक अंदाजानुसार, महेशचा पाय घसरून तोल गेल्याने पाण्यात पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची शक्यता आहे. महेशला मिर्गीचा (epilepsy) आजार होता, असेही समजते. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *