Chandrapur breaking news today tiger attack : चंद्रपूर: २९ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून आज २९ नोव्हेम्बरला चंद्रपूर वनविभागाच्या हद्दीत जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करीत ठार केले. चालू वर्षातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील हि ४१ वी घटना असून यामध्ये आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात ३७, बिबटच्या हल्ल्यात २, हत्ती व अस्वलाच्या हल्ल्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील चिचपल्ली रेंज कंपार्टमेंट क्रमांक ६९६ मध्ये मंदा तुकूम गावातील रहिवासी ५५ वर्षीय रमेश नागो बोमनवार हे नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेले होते. मात्र त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने बोमनवार यांच्यावर हल्ला करीत ठार केले. घटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यावर त्यांनी तात्काळ घटनस्थळ गाठत पंचनामा केला. नियमानुसार मृत गुराख्याच्या कुटुंबाला वनविभागातर्फे आर्थिक मदत देण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. Chandrapur breaking news today tiger attack
विभागीय वनाधिकारी राजन तलमले यांनी परिसरातील नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यप्राण्यांच्या हालचाली लक्षात घेऊन अशा संवेदनशील वनक्षेत्रात एकटे फिरणे टाळावे आणि सतर्कता बाळगावी. वन्यप्राण्यांबद्दल कोणतीही माहिती असल्यास त्वरित वन विभागाला कळवावी.
Bhadrawati crime news : चंद्रपूर/भद्रावती २७ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात सध्या नगरपरिषद निवडणुकीचा धुरळा सुरु आहे, अनेक ठिकाणी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी चुरस वाढली आहे. या चुरशीदरम्यान भद्रावती शहरात २२ वर्षीय तरुणाने हातात तलवार बाळगत परिसरात दहशत निर्माण करण्याचे काम करीत होता, भद्रावती पोलिसांच्या सतर्कतेने त्या तरुणाला हिसका दाखवीत अटक केली.
निवडणुकीच्या रणधुमाळीत भद्रावती शहरात २२ वर्षीय प्रज्वल अशोक कोडापे राहणार शिवाजी नगर हा तरुण सुमठाणा चौकात हातात तलवार बाळगून परिसरात दहशत निर्माण करीत होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच शहानिशा करण्यात आली. पोलिसांनी प्रज्वल कोडापे ला ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक तलवार जप्त करण्यात आली.
जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) अनव्ये शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल असे शस्त्र बाळगण्यास मनाई असताना आरोपी प्रज्वल कोडापे यांनी अआदेशाचे उल्लंघन केले असून त्याच्यावर कारवाई करीत ताब्यात घेण्यात आले. आरोपी प्रज्वल कडून लोखंडी तलवार किंमत १ हजार जप्त करण्यात आली. Bhadrawati crime news
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोउपनि गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, गोपाल आतकुलवार, जगदीश झाडे, अनुप आष्टुन्कर, विशवनाथ चुदरी, योगेश घाटोळे, खुशाल कावळे, रोहित चिटगिरे व संतोष राठोड यांनी केली.
lcb chandrapur arrests illegal scrap gang : चंद्रपूर २२ नोव्हेम्बर (News 34) – दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई करत अवैधरित्या लोखंडी भंगाराची चोरी आणि वाहतूक करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली आहे. बल्लारपूर-चंद्रपूर महामार्गावर ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये पिकअप वाहनासह सुमारे ७ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, बल्लारपूर-चंद्रपूर महामार्गावरून अवैधरित्या लोखंडी भंगार चोरीची वाहतूक सुरू आहे. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून पिकअप वाहन क्रमांक MH 34 BZ 8653 ला ताब्यात घेतले.
या कारवाईत एकूण पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, एका आरोपीचा शोध सुरू आहे. सर्व आरोपी चंद्रपूर येथील रहिवासी आहेत: दुर्गेश तुळशीराम भागडे (वय २१), रोशन उमेश भोयर (वय २१), कृष्णा संजय गदईकर (वय १९), अशोक बनेश झाडे (वय ४१), दिवाकर तुळशीराम भागडे. याशिवाय, साबिर शेख नामक एक आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. lcb chandrapur arrests illegal scrap gang
याप्रकरणी आरोपींवर चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे कलम १२४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. सदरची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर च्या पथकाने केली. कारवाई पथकात PSI संतोष निंभोरकर, PSI सुनील गौरकर, ASI धनराज करकाडे, HC गणेश भोयर, संतोष येलपुलवार, PC सुमित बरडे, आणि प्रफुल गारघाटे यांचा समावेश होता.
chimur taluka crime news today : चिमूर १६ नोव्हेम्बर (News३४): स्थानिक पोलीस स्टेशन चिमूर हद्दीतील मालेवाडा आणि पिपर्डा या दोन गावांमध्ये सुरू असलेल्या अवैध हातभट्टी मोहादारू निर्मितीवर चिमूर पोलिसांनी मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत सुमारे रु. २,१२,५००/- किमतीचा दारूसाठा आणि रसायनं जप्त करून घटनास्थळी नष्ट करण्यात आली.
🎯 गोपनीय माहितीच्या आधारावर छापा
दिनांक १३ नोव्हेम्बर रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर चिमूर पोलिसांनी तत्काळ प्रोहिबिशन (दारूबंदी) रेडच केली. मौजा मालेवाडा आणि पिपर्डा येथील दोन ठिकाणी अवैध दारू निर्मिती सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध दारू आणि दारू तयार करण्यासाठी वापरला जाणारा सडवा (मोहफुले भिजवलेले मिश्रण) जप्त केला, ज्यात खालील साहित्याचा समावेश आहे: chimur taluka crime news today
मोहा सडवा (Moha Sadvva): 15 मोठ्या प्लास्टिक ड्रममध्ये सुमारे 750 किलो मोहासडवा.
इतर साहित्य: हातभट्टीसाठी वापरले जाणारे ७ हजार रुपये किमतीचे साहित्य.
जप्त केलेल्या संपूर्ण साहित्याची एकूण किंमत २ लक्ष १२ हजार ५०० रुपये इतकी आहे. सर्व अवैध सडवा आणि दारू घटनास्थळीच नष्ट करण्यात आली.
⚖️ दारूबंदीसह जुगार प्रकरणी गुन्हे दाखल
या कारवाईदरम्यान अवैध दारू निर्मितीसोबतच अवैधरित्या चालणाऱ्या सट्टा-पट्टी जुगारवरही पोलिसांनी कारवाई केली. संबंधित आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन चिमूर येथे दारूबंदी कायदा आणि जुगार कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक (Crime Detection Squad) करत आहे. chimur taluka crime news today
👮♂️ यशस्वी कारवाईत सहभागी पथक
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, आणि उपविभागीय पोलिस अधिकारी चिमूर श्री. दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी करण्यात आली.
पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे यांच्या नेतृत्वाखालील पथकात खालील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता:
पोहवा. सचिन साठे
पोअं. सचिन खामनकर
पो.अं. रुपेश शामकुळे
सौरभ महाजन
चिमूर पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू निर्मिती आणि जुगार अड्ड्यांना मोठा धक्का बसला असून, यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन अधिक मजबूत झाले आहे.
Chandrapur Journalist Family Assaulted : चंद्रपूर ९ नोव्हेम्बर (News34) – चंद्रपूर शहरात पहिल्यांदा महानगरपालिकेने इतिहास घडविला आहे, ४ फुटाच्या गल्ली मधील अतिक्रमण काढण्यासाठी थेट बुलडोझर चालविण्यात आला, या कारवाईचा विरोध करणाऱ्या परिवाराला पोलिसांसमोर मारहाण करण्यात आली. असे प्रसंग बिहार किंवा उत्तरप्रदेश राज्यात सतत घडत असतात मात्र आता हे जंगलराज महाराष्ट्रातील चंद्रपुरात बघायला मिळाले आहे. एका दलित कुटुंबाला पोलिसांसमोर १० ते १२ जणांच्या घोळक्याडून मारहाण करण्यात आली.
चंद्रपुरातील पत्रकार विनोद दुर्गे व त्यांच्या कुटुंबाला चक्क पोलिसांसमोर मारहाण करण्यात आली असून या संदर्भातील मारहाणीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. बाबुपेठ प्रभागातील हिंग्लज भवानी वार्डात विनोद दुर्गे हे मागील १५ वर्षांपासून राहत आहे. त्याकाळी अतिक्रमण काढा असा कसलाही वाद झाला नाही, दुर्गे यांना घरकुल आवास मंजूर झालं आणि अतिक्रमणाच्या वादाला तोंड फुटले.
नेमकं काय घडलं?
पत्रकार विनोद दुर्गे हे मागील १५ वर्षांपासून हिंग्लज भवानी वार्डात राहतात, या भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतो, मात्र दुर्गे यांनी आपल्या शेजाऱ्यांसोबत बोलून बोरवेल चे काम केले होते, विशेष म्हणजे शेजाऱ्यांनी या बोरवेल साठी सामूहिक रक्कम जमा केली होती, आपलं घर अजून सुंदर व्हावं यासाठी शासनाच्या घरकुल आवास योजनेत अर्ज केला, दुर्गे यांना घरकुल मंजूर झाला, जानेवारी २०२५ मध्ये त्यांनी घराचे काम सुरु केले. Political Pressure Behind Chandrapur Bulldozer Action
दुर्गे यांचं घराचं काम चौधरी नामक शेजारी यांना खुपलं व त्यांनी दुर्गे यांच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण केले. घर निर्माण कार्यात वाद होऊ नये यासाठी दुर्गे गप्प राहिले मात्र शेजारी यांनी त्रास देणे सुरूच ठेवले, अखेर काही दिवसांनी सामूहिक निर्माण करण्यात आलेल्या बोरवेल चे पाणी दुर्गे यांना देणे बंद केले. शेजाऱ्यांनी केलेले अतिक्रमण बाबत चंद्रपूर मनपा मध्ये तक्रार देण्यात आली. मात्र काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी घेत दुर्गे यांना धमकविण्याचा प्रयत्न शेजाऱ्यांनी सुरु केला. रामनगर पोलिसात तक्रार करण्यात आली. मात्र काही राजकीय गुंडांच्या वरदहस्ताने उलट पोलीस दुर्गे यांना धाकदपट करू लागले. दुर्गे यांची बाजू कुणीही ऐकायला तयार नव्हते.
त्यानंतर शेजाऱ्यांनी दुर्गे यांनी आमचा येण्याजाण्याचा रस्ता अडविला आहे, आम्हाला जायला रस्ता नाही अशी तक्रार काही शेजारी नागरिकांनी चंद्रपूर मनपामध्ये केली. विशेष बाब म्हणजे राजकीय शक्तीचा वापर करीत आमदारांना दुर्गे विरोधात पत्रही द्यायला लावले. political pressure municipal action
६ ऑक्टोबर २०२५ रोजी चंद्रपूर मनपाचे कर्मचारी व रामनगर पोलीस दुर्गे यांच्या घरी दाखल झाले, विशेष म्हणजे ४ फुटाच्या गल्ली मधील दुर्गे यांच्या घराच्या बांधकामाचे सामान काढण्यासाठी मनपाने थेट बुलडोझर आणला, विनोद दुर्गे व त्याच्या कुटुंबाने या कारवाईचा विरोध केला असता काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी विनोद दुर्गे, त्यांची पत्नी दिक्षा व मुलाला थेट पोलिसांसमोर अमानुषपणे मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकार व्हिडीओ मध्ये कैद झाला आहे.
मारहाणीबाबत दुर्गे यांनी रामनगर पोलिसात तक्रार दिली असता पोलिसांनी शोभा चौधरी, अमोल चौधरी, दयाराम अंबादे व प्रीतम गेडाम यांच्यावर विविध कलमानव्ये गुन्हा दाखल केला. याबाबत पुरोगामी संघटनेने दुर्गे कुटुंबाला मारहाण प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली असून शेजाऱ्यांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी घेत मारहाण केल्याचा प्रकार निंदनीय आहे व यामध्ये चंद्रपूर मनपाच्या शुभम वरघट सह शेजाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पत्रकार परिषदेमार्फत केली आहे. social injustice Maharashtra
अतिक्रमणाच्या नावावर १५ वर्षांपासून शेजारी गप्प का?
चंद्रपूर शहर हा अतिक्रमणाने वेढला आहे, याठिकाणी राजकीय दृढ संबंध व श्रीमंत नागरिकांनी मोठे अतिक्रमण केले आहे मात्र ते अतिक्रमण काढावे, त्याच्यावर कारवाई व्हावी याबाबत मनपा डोळेझाक करीत आहे. दुर्गे हे १५ वर्षांपासून हिंग्लज भवानी वॉर्डात राहत आहे, इतक्या काळात शेजाऱ्यांना अतिक्रमण का दिसले नाही? दुर्गे यांच्या घराचे बांधकाम सुरु असताना शेजाऱ्यांना जायला रस्ता नव्हता का? हे सर्व कट कारस्थान शेजाऱ्यांनी केले हे स्पष्ट आहे, मात्र राजकीय दबावाने दुर्गे यांच्यावर कारवाई झाली हे यातून स्पष्टपणे दिसत आहे. Chandrapur Journalist Family Assaulted
Chandrapur Public Holiday News : चंद्रपूर १४ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन इतिहास घडवला. या ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’ निमित्त दरवर्षी मोठा जनसमूह या दिवशी चंद्रपूरमध्ये एकत्र येतो. मात्र, या दिवशी अद्यापही सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आलेली नव्हती.
या पार्श्वभूमीवर चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विभागीय आयुक्तांकडे आक्रमक मागणी करून १६ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची विनंती केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत, जिल्हाधिकारी विनय गौडा (अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूर) यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत १४ ऑक्टोबर २०२५ रोजी अधिकृत आदेश जारी केला आहे. public holiday on Dhamma Chakra Pravartan Day
अत्यावश्यक सेवा वगळता सुट्टी
या आदेशानुसार १६ ऑक्टोबर २०२५ रोजी चंद्रपूर शहरातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.कार्यालयांनी फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच आवश्यक कर्मचारी उपस्थित ठेवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले होते की, या दिवशी सुट्टी नसल्यामुळे अनेक शासकीय कर्मचारी, कामगार आणि नागरिकांना रजा मिळवून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी, दीक्षाभूमीवरील ऐतिहासिक सोहळ्यात त्यांचा सहभाग मर्यादित राहतो. मात्र आता जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या सुट्टीमुळे लाखो अनुयायांना व त्यांच्या कुटुंबीयांना या पवित्र दिनाचे उत्साहात व शांततेने पालन करता येणार आहे. ही मागणी अंशतः मान्य झाल्याने समाजाच्या भावना आणि लोकहित दोन्हींचा सन्मान झाला आहे.
MP Pratibha Dhanorkar ultimatum : चंद्रपूर : शहरातील रस्त्यांच्या दयनीय आणि जीवघेण्या अवस्थेवरून चंद्रपूर शहर महानगरपालिका (मनपा) प्रशासनाला तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मनपा आयुक्तांना थेट ५ (पाच) दिवसांचे ‘अल्टिमेटम’ दिले असून , या निर्धारित वेळेत काम न झाल्यास, मनपाच्या निष्क्रियतेविरोधात महानगरपालिकेच्या प्रांगणातच “गिट्टी फेक” आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रामध्ये मध्ये रस्त्यांच्या दुरावस्थेवर प्रकाश टाकला आहे. चंद्रपूर शहरातील मुख्य रस्त्यांपासून अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे, उखडलेला डांबर आणि निकृष्ट दर्जाचे काम यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जीवघेणी बाब
रस्त्यांवरून ये-जा करणे आता नागरिकांसाठी मोठी अडचण आणि ‘जीवघेणी बाब’ बनली आहे. विद्यार्थ्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, रस्त्यांवर अपघात झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मनपा आयुक्तांना स्पष्टपणे कळवले आहे की, चंद्रपूर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती ५ दिवसांच्या आत पूर्ण न झाल्यास, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निष्क्रियेतेचा तीव्र निषेध करण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रांगणात ‘गिट्टी फेक’ आंदोलन सुरू करण्यात येईल.असा इशारा त्यांनी दिला आहे.
Chandrapur multiple deaths in road crash : चंद्रपूर (२९ सप्टेंबर २०२५)- चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी घडलेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून ५ नागरिक जखमी झाले आहे. मूल तालुक्यातील जुनासुर्ला हद्दीत दुचाकीला ट्र्क ची धडक बसल्याने २ युवकांचा जागीच मृत्यू झाला तर माजरी मध्ये तेलंगणा राज्यातून नातेवाईकांकडे आलेल्या नागरिकांना चारचाकी वाहनांची धडक बसल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, या दोन्ही अपघातात एकूण ५ जण जखमी झाले आहे.
२९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथील युवक कापसाला फवारणीचे औषध खरेदी करून मोटरसायकलने गोंडपिपरी – खेडी मार्गे येत असतांना पोलीस स्टेशन मुल अंतर्गत जुनासूर्ला हद्दीत ट्रकने उडविले. या अपघातात सारंग गंडाटे ( वय २६) रा. पेंढरी मक्ता याचा जागीच मृत्यू झाला तर प्रियांशु गंडाटे ( वय २३) रा. पेंढरी मक्ता याचा मुल उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला असून या अपघातात एक युवक जखमी आहे त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. Chandrapur accident latest news
माजरी येथे रविवारी २८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास एका बोलेरो वाहनाच्या भीषण धडकेत दोन दुचाकींना जोरदार धडक बसून एकाचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. माजरी कॉलरी ते माजरी वस्ती या मार्गावर नागमंदिरासमोर ही दुर्घटना घडली.
फिर्यादी हॅन्सन प्रकाश राव हे माजरी वस्तीला जात असताना भरधाव बोलेरो (क्र. एमएच ३१ एफसी ६६८७) ने दोन मोटारसायकलींना धडक दिली. पहिल्या मोटारसायकलवर बसलेले जंबोजी व्यंकटचारी, कोंडापर्ती राजमोगली आणि कोंडापर्ती श्रीलता तर दुसऱ्या मोटारसायकलवर बसलेले सपना दत्तू पुरुषोत्तम व जगन्नाथ मलय्या बंडा हे गंभीर जखमी झाले. यातील कोंडापर्ती राजमोगली यांचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. fatal road accident Chandrapur district
नातेवाईकाकडे आले आणि…
या अपघातात जखमी झालेले कोंडापर्ती श्रीलता व मृतक कोंडापर्ती राजमोगली हे तेलंगणा राज्यातील गोदावरी खनी येथील रहिवासी असून ते आपल्या नातेवाईक जंबोजी व्यंकटचारी यांच्याकडे माजरीला आले होते. वर्धा – बल्लारशाह या गाडीतून ते माजरी रेल्वे स्थानकावर उतरले, त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी व्यंकटचारी हे मोटारसायकलवर आले होते. त्याचवेळी हा भीषण अपघात झाला. तसेच इतर जखमीही रेल्वे स्थानकावरूनच घरी परतत होते.
दरम्यान, वेकोलिच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना वरोरा आणि नागपूर येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले. वेकोलिच्या क्षेत्रीय रुग्णालयात तात्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले.
अपघातानंतर माजरी पोलिसांनी बोलेरो चालक अजित नथ्थु पावडे याला अटक करून वाहन जप्त केले. आरोपी चालक हा व्यसनी असून अपघाताच्या वेळी दारूच्या नशेत असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत माजरी पोलीस ठाण्यात अप. क्र. ८१/२०२५ नुसार कलम २८१, १२५(अ), १२५(ब), १०६(१) भादंवि तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
police solve aluminium wire theft case : भिसी ३० ऑगस्ट २०२५ – १७ विजेच्या खांबावर विजेची अल्युमिनियम तार लावणायचे काम जांभूळगाव ते खापरी या गावजवळ समीक्षा अँड डिम्पल इलेकट्रीकल कंपनी चामोर्शी च्या वतीने सुरु होते, यासाठी कंपनीने अल्युमिनियम तार मार्गावर ठेवण्यात आला होता. मात्र २७ ऑगस्ट रोजी तार चोरी गेल्याची तक्रार कंपनीचे सुपरवायझर नितेश गव्हारे यांनी भिसी पोलिसात दिली. पोलिसांनी जलद तपास करीत २४ तासांच्या आत आरोपीना अटक करीत तार जप्त केली.
जांभूळगाव ते खापरी मार्गावरील विजेची लाईन टाकण्याचे काम सुरु आहे, यासाठी कंपनीने तार आणून ठेवली होती मात्र अज्ञातांनी सदर तार चोरी केली, याबाबत भिसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली. तक्रार प्राप्त झाल्यावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. यावेळी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली, माहितीच्या आधारे पोलिसांनी जांभुळघाट गावातील २१ वर्षीय आनंद गुलाब नेवारे व २४ वर्षीय मंगेश नीलकंठ बोरकर यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी सदर अल्युमिनियम तार चोरी केल्याची कबुली दिली. aluminium wire theft
७ आरोपी अटकेत
तसेच सदर चोरी करण्यासाठी जांभूळगावातील २३ वर्षीय क्रिष्णा रमेश मीटपल्लीवार याने मदत केली, व चोरीचा माल २२ वर्षीय रोशन अण्णाजी हजारे, १९ वर्षीय कुणाल गणेश हजारे यांना विकला व चोरीचा माल हा २६ वर्षीय सागर अण्णाजी हजारे, २१ वर्षीय विजय नंदकिशोर भेंडवाल यांच्या सहकार्याने कुणाल हजारे याने चारचाकी वाहनाने घेऊन जात जांभूळगाव ते खापरी रोडवरील झुडपात लपवून ठेवला.
भिसी पोलिसांनी यावेळी चारचाकी वाहन क्रमांक एमएच ३४ बीजी ९४९७, अल्युमिनियम तार असा एकूण ६ लाखांचा मुद्देमाल सह ७ आरोपीना २४ तासांच्या आत अटक केली. suspect arrests for aluminium wire theft
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात सपोनि मंगेश भोंगाळे, पोउपनि रवींद्र वाघ, पोउपनि भारत थिटे, पोलीस कर्मचारी अजय बगडे, सतीश झिलपे, श्रीकांत वाढई, रेखलाल पटले व वैभव गोहणे यांनी केली.
Mahesh Salame drowning death Nagbhid : नागभीड-चंद्रपूर (२५ ऑगस्ट २०२५): आज सकाळी नागभीड-चंद्रपूर मार्गावरील चिंधी माल येथील एका २२ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. महेश अभिमन सलामे असे या तरुणाचे नाव आहे.
महेश सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतात जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला होता. बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याची वाट पाहिली. दरम्यान, गावाजवळच्या तलावात एका शेतकऱ्याला एक मृतदेह तरंगताना दिसला. जवळ जाऊन पाहिले असता, तो मृतदेह महेशचा असल्याचे निष्पन्न झाले.
मिर्गीचा आजार
कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. प्राथमिक अंदाजानुसार, महेशचा पाय घसरून तोल गेल्याने पाण्यात पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची शक्यता आहे. महेशला मिर्गीचा (epilepsy) आजार होता, असेही समजते. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.