Blog

  • Damini lightning alert : नैसर्गिक आपत्तीपासून वाचविण्यासाठी दामिनी करणार शेतकऱ्यांची मदत

    Damini lightning alert : नैसर्गिक आपत्तीपासून वाचविण्यासाठी दामिनी करणार शेतकऱ्यांची मदत

    Damini lightning alert उष्णतेची लाट सहन केल्यावर आता मान्सूनचे आगमन राज्यात होत आहे, मात्र या मान्सूनमध्ये वीज पडल्याने अनेक नागरिकांचे दुर्दैवी मृत्यू होतात, या नैसर्गिक आपत्ती चा सर्वात जास्त धोका शेतकऱ्यांना असतो हंगामाच्या दिवशी ऊन असो की पाऊस त्यांना शेतात जावंचं लागत मात्र ही आपत्ती त्यांचा घात करतात, आता ही समस्या काही प्रमाणात दूर होऊ शकते, केंद्र सरकारने वीज पडण्याआधी नागरिकांना आधीच याची माहिती होणार असे ऐप सुरू करण्यात आले आहे.

    अवश्य वाचा : दहावी पास विद्यार्थी होणार अभियंता

    राज्यात आता खरीप पेरण्या जवळ आल्या आहेत. मान्सूनला देशात सुरुवात झाली असून अनेक भागात वीज पडून शेतकऱ्यांसह अनेकांचा मृत्यू होत असल्याची वृत्त कानावर पडत आहे. भारतात दरवर्षी २ हजारांहून अधिक मृत्यू वीज पडून होतात. दरम्यान, खरीप पेरण्यांच्या दरम्यान शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या ४० किमी अंतरात वीज पडू शकते का हे आता शासनाच्या ‘दामिनी’ मोबाईल ॲपमधून कळू शकणार आहे.

    Damini lightning alert भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था पुणे यांच्यामार्फत हा ॲप विकसित करण्यात आला आहे.

    महत्त्वाचे : शेतात काम करणाऱ्या शेत मजुरांसाठी शेतमजूर शौचालय

    कसे कळणार आपल्या भागात वीज पडणार का?

    आपल्या भागातील ४० किमी अंतरात वीज पडण्याची शक्यता कितपत आहे याची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला दामिनी हा ॲप प्ले स्टोअरमधून डाउनलोड करावा लागेल.

    या ॲपला तुम्ही इथूनही डाऊनलोड करू शकता..‘Damini: Lightining Alert’ असे या ॲपचे नाव आहे.

     

    हा ॲप डाउनलोड केल्यानंतर यामध्ये तुम्हाला तुमची प्राथमिक माहिती भरावी लागेल. यात आपले नाव, मो. नं, पत्ता, पिनकोड, व्यवसाय याचा समावेश असेल.

     

  • Farm labor toilet in Chandrapur : चंद्रपुरात शेतमजूर शौचालय

    Farm labor toilet in Chandrapur : चंद्रपुरात शेतमजूर शौचालय

    Farm labor toilet in Chandrapur अंबुजा फाउंडेशन, उपरवाही उत्तम कापूस प्रकल्पाअंतर्गत रजनी खानोरकर यांच्या मार्गदशनाखाली सुमठाना या गावी शेतकरी विठ्ठल उमरे व सौ. प्रांजली उमरे यांच्या शेतात शेतमजूर शौचालय बांधण्यात आले.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात भीषण अपघात, दोघे ठार

    शेतात येणारे महिला पुरुष मजूर यांना शौचास जाण्यास अडचणी होतात. त्याचप्रमाणे त्यांची सुरक्षा हेतू व एक उत्तम काम म्हणून शेतामध्ये शेतमजूर शौचालय बांधून आज त्याचे उत्तम उदाहरण शेतकऱ्यांनी दिलं आहे.

    महत्त्वाचे : हा विजय जनतेला समर्पित – खासदार प्रतिभा धानोरकर

    Farm labor toilet in Chandrapur शेतमजूर शौचालय सोबत महिलांना मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड व हँडवॉश करण्यासाठी साबुन याची देखील व्यवस्था शेतमजूर शौचालयास मध्ये ठेवण्यात आली.

    Janta college

    महिला उघड्यावर किंवा धुरा बांधावर शौचास जाण्यास अडचणी होतात व महिला वेळ काढ किंवा उशिरा शौचास झाल्याने महिलांमध्ये अनेक आजार हे वाढत होताना दिसतात त्याच अनुषंगाने एक उत्तम काम म्हणून महिलांसाठी व पुरुषांसाठी एकूणच शेतात येणाऱ्या शेतमजूर सर्वांसाठी शौचालयाची निर्मिती करण्यात आली.

    अवश्य वाचा : तब्बल 60 वर्षांनी चंद्रपूर लोकसभेला मिळाली महिला खासदार

    Farm labor toilet in Chandrapur या उपक्रमाला उपस्थित शेतकरी महिला शेतकरी व पुरुष शेतकरी तसेच गावातील उपस्थित- उपसरपंच सौ. अनुताई प्रमोद ताकसांडे व मुक्ताई गटातील सर्व तेराही सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित शेतकरी गणपत बल्की , नीलकंठ बोबडे, विनोद देवतळे, प्र. अ. रजनी खानोरकर, हे उपस्थित होते.

  • Chandrapur city : चंद्रपुरातील या भागात अपघाताचे वाढते प्रमाण

    Chandrapur city : चंद्रपुरातील या भागात अपघाताचे वाढते प्रमाण

    Chandrapur city चंद्रपूर – चंद्रपूरच्या ST वर्कशॉप चौक तुकूम येथे दररोज घडणाऱ्या अपघातांच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, आम आदमी पार्टी चंद्रपूर महानगर अध्यक्ष योगेश गोखरे यांनी महानगरपालिकेकडे त्वरित गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

    योगेश गोखरे यांनी मनपाला दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, दुर्गापूर ते तुकूम आणि तुकूम ते दुर्गापूर या मार्गांवर वाहनांची गती नियंत्रित करण्यासाठी दोन गतिरोधकांची अत्यंत आवश्यकता आहे. हे गतिरोधक अपघातांची संख्या कमी करण्यास मदत करतील आणि नागरिकांच्या जीविताचे रक्षण करतील.

     

    Chandrapur city गोखरे यांनी म्हटले, “ST वर्कशॉप चौकात अपघातांचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या समस्येचे त्वरित निराकरण होणे आवश्यक आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही महानगरपालिकेला मागणी करतो की तातडीने या ठिकाणी दोन गतिरोधक बसवण्यात यावेत.”

    महत्त्वाचे : हा जनतेचा विजय आहे – खासदार प्रतिभा धानोरकर

    Chandrapur city चंद्रपूर महानगरपालिकेने या मागणीवर त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. अन्यथा स्थानिक लोकांना सोबत घेऊन आम आदमी पार्टी चंद्रपूर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. निवेदन देताना महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर महिला अध्यक्षा तब्बसूम शेख, महानगर उपाध्यक्ष सुनील सदभैय्या, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, जितेंद्र भाटिया, अलंकार सावळकर व इतर कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते.

  • Horrible accident in Chandrapur : चंद्रपुरात भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

    Horrible accident in Chandrapur : चंद्रपुरात भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

    Horrible accident in Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना-गडचांदुर मार्गावर 5 जून रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

     

    मृतक हे कोरपना तालुक्यातील खडकी, रायपुर येथील रहिवासी होते, समीर मडावी व प्रियांका झित्रु कुलसंगे असे मृतकाचे नाव आहे.

     

    Horrible accident in Chandrapur सदर अपघात हा सोनूर्ली गावाजवळ घडला, समीर व प्रियंका गडचांदूर येथे बँकेत काही कामानिमित्त आले होते, दोघे दुचाकीने परतीच्या वाटेवर असताना कोरपना गडचांदूर मार्गावरील सोनूर्ली गावाजवळ समोरून कोळसा वाहतूक करणारा ट्रक क्रमांक mh34 ab 1173 याने समोरून समीर च्या दुचाकीला धडक देत तब्बल 50 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले.

     

    अपघात इतका भीषण होता की दोघांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला, अपघात स्थळी रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.

     

    मागील अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू आहे, रस्ता खराब असल्याने दुचाकी व चारचाकी वाहने नियंत्रित गतीमध्ये वाहन चालवितात मात्र कोळसा वाहतूक करणारे ट्रक हे बेभान होत वाहन चालवितात.

  • Chandrapur congress party : नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार

    Chandrapur congress party : नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार

    Chandrapur congress party मुल – चंद्रपूर आर्णी लोकसभेच्या निवणुकीत महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर यांनी २ लाख ६० हजार अशा बहुमताने विजयी झाल्या.

    हा जनतेचा विजय – खासदार प्रतिभा धानोरकर

    त्यांच्या विजयाबद्दल कांग्रेस कमिटी मूल तर्फे जल्लोर्षं साजरा करण्यात आला, आज मूल कांग्रेस कमिटी तर्फे खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आला.

     

    Chandrapur congress party यावेळी मुल तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेसचे नेते सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनात वरोरा येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जिल्हा काँग्रेसचे महासचिव राकेश रत्नावार, माजी तालुका अध्यक्ष व माजी सभापती तथा संचालक घनश्याम येनुरकर, मुल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलंमवार, पदाधिकारी प्रशांत उराडे, माजी नगर सेविका लीना फुलझेले, सचिव शामला बेलसरे, सुरेश फुलझेले, शहर उपाध्यक्ष संदीप मोहबे, विष्णू सादमवार, चिटलोजवार यांनी नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना तालुका कांग्रेस तर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. व पुढील कार्यासाठी व वाटचालीसाठी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राकडून भरभरून शुभेच्छा दिल्या.

  • Pratibha dhanorkar chandrapur : माझा विजय जनतेला समर्पित – खासदार प्रतिभा धानोरकर

    Pratibha dhanorkar chandrapur : माझा विजय जनतेला समर्पित – खासदार प्रतिभा धानोरकर

    Pratibha dhanorkar chandrapur चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जुन 2024 रोजी जाहिर झाला. या निवडणूकीत कॉग्रेस च्या प्रतिभा धानोरकर यांनी तब्बल 2 लाख 60 हजार 406 मतांनी विजय प्राप्त केला. त्यानंतर चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे विजय सभेत बोलतांना प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, माझा विजय हा जनतेला समर्पित आहे.

    अवश्य वाचा : 60 वर्षानंतर चंद्रपूर जिल्ह्याला मिळाली दुसरी महिला खासदार

    चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडी, महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाच्या वतीने चंद्रपूर शहरात वरोरा नाका चौकातून गांधी चौकापर्यंत विजय मिरवणूक काढण्यात आली होती. ढोल ताशाच्या गजरात निघालेल्या या मिरवणूकीचा समारोप गांधी चौकातील मनपा च्या मैदानात सभेने झाला.

     

    Pratibha dhanorkar chandrapur चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी चौकातील सभेत नवनियुक्त खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार प्रसंगी प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, माझा विजय हा दिवंगत लोकनेते माजी खासदार बाळुभाऊ धानोरकर यांना समर्पित असून त्या सोबतच माझा विजय हा एकटीचा नसुन हा विजय महाविकास आघाडी व इंडिया आघाडी च्या पदाधिकारी, कार्यकर्ते त्या सोबतचे काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा आहे. या विजयाचे खरे शिल्पकार माझ्या लोकसभा क्षेत्रातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, महीला व तरुण असून हा माझा विजय मी जनसामान्यांना समर्पित करीत आहे.

    अवश्य वाचा : या कामासाठी चंद्रपूर शहराची निवड

    यावेळी मंचावर असलेल्या आमदार सुभाष धोटे व आमदार सुधाकर अडबाले यांनी देखील मनोगत व्यक्त केले. जनतेने ठेवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याची भावना देखील प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली. यावेळी मंचावर शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिÚहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, आम आदमी पार्टी चे मयुर राईंचवार, मराठा सेवा संघाचे दिलीप चौधरी, सी.पी.एम नेते अरुण भेलके, प्रकाश रेड्डी सी.पी.आय. नेते, चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, बाळु खोब्रागडे, चंदाताई वैरागडे, नम्रता ठेमस्कर, संगीता अमृतकर, अभिलाषा गावतूरे, सोहेल रजा शेख, अरुण धोटे, अनिल धानोरकर, घनश्याम मुलचंदानी, दिनेश चोखारे तसेच महाविकास आघाडी व इंडिया आघाडी चे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह जनतेची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • MP Pratibha Dhanorkar : चंद्रपूर लोकसभा क्षेत्राला 60 वर्षांनी मिळाल्या महिला खासदार

    MP Pratibha Dhanorkar : चंद्रपूर लोकसभा क्षेत्राला 60 वर्षांनी मिळाल्या महिला खासदार

    MP Pratibha Dhanorkar चंद्रपूर : 19 एप्रिलला पार पडलेल्या 13 चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आज 4 जून रोजी चंद्रपूरात पार पडली. 28 व्या फेरी अखेर काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी सुमोर 2 लाख 60 हजार 406 मताधिक्याने आघाडी घेऊन दणदणीत विजय मिळविला आहे. मोठ्या मताधिक्याने राज्याचे वनमंत्री तथा कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे्. अडीच लाखाच्या फरकाने आघाडी घेतल्याने धानोरकर यांनी विजयी जल्लोष साजरा केला. प्रतिभा धानोरकर ह्या चंद्रपूर लोकसभेच्या दुसऱ्या महिला खासदार ठरल्या. 1964 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत इंदिरा काँग्रेसच्या गोपिकाबाई कन्नमवार ह्या पहिल्या महिला खासदार म्हणून जिंकून आल्या होत्या. 60 वर्षांनी प्रतिभा धानोरकर यांनी हा बहुमान मिळविला.

    अवश्य वाचा : दहावी पास विद्यार्थी होणार इंजिनिअर

    13 चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक 19 एप्रिलला पहिल्या टप्यात पार पडली. त्यामध्ये भाजपाचे सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचेसह 15 उमेदवार रिंगणात उभे होते. सर्वच उमेदवारांचे भाग्य इव्हिएम मध्ये बंद झाल्यानंतर आज 4 जून ला मशिनबंद झालेले भाग्य उघडण्यात आले. या क्षेत्रात खरी लढत भाजपाचे हेविवेट नेते तथा विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार विरूध्द कॉग्रेसच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या मध्ये होती.

     

    MP Pratibha Dhanorkar मुनगंटीवार यांनी मतमोजणीच्या पूर्वसंध्येला माध्यमांशी बोलताना लाखाच्या फरकाने विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु आज हाती आलेले निकाल मुनगंटीवार यांच्यासाठी धक्कादायक ठरले. सकाळी 8 वाजतापासून सुरू झालेल्या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून तर 28 व्या फेरीपर्यंत कॉग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनीच आघाडी घेतली. पहिल्या एक दोन फेरीनंतर मुनगंटीवार हे आघाडी घेतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. परंतु ती अपेक्षा भंग ठरली. एक दोन नव्हे तर तब्ब्ल 28 व्या फेरी अखेर प्रतिभा धानोरकर यांनी 7 लाख 18 हजार 410 मते मिळविली. तर प्रतिस्पर्धी भाजपाचे सुधीर मुनगंटीवार 4 लाख 58 हजार 004 मते घेतली. तब्बल 2 लाख 60 हजार 406 मतांनी मुनगंटीवारांना मागे टाकले. विशेष म्हणजे प्रतिभा धानोरकर यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी 28 व्या फेरीपर्यंत कायम ठेवली.

    अवश्य वाचा : स्मार्ट मीटर योजना काय आहे? जाणून घ्या

    MP Pratibha Dhanorkar प्रारंभापासून लोकसभची निवडणूक लढविण्याची इच्छा नव्हती, परंतु पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली पण त्यांना यामध्ये यश आले नाही. आजच्या लोकसभेच्या निवडणूकीत त्यांना मोठ्या पराभवाला समोरे जावे लागले आहे. वंचितचे राजेश बेले यांना 21 हजार 980 मध्य 28 व्या फेरी अखेर मिळाले. विशेष म्हणजे यावेळीही नोटाचा संख्या वाढली आहे. 2019 मध्ये सुमारे 6 हजार नोटाला पसंती दिली होती. यावेळी त्यामध्ये वाढ होवून 10 हजार 843 वर पोहचला आहे.

     

    सन 2019 मध्ये मोदी लाटेमध्ये काँग्रेसचे बाळू धानोरकर हे महाराष्ट्रात या जागेवर 45 हजाराने एकमेव उमेदवार निवडून आले होते. परंतु काही महिण्यापूर्वीच त्यांचे आजाराने निधन झाले होते. त्यानंतर त्याच जागेवर त्यांच्याचं पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी निवडणूक लढविली. आणि मोठ्या मत्ताधिक्याने विजय मिळविला . विशेष म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचे प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरात आले. राज्याचे मोठमोठे नेत्यांनी मुनगंटीवार यांचेसाठी प्रचार केला. परंतु यावेळी मोदीची जादू चालली नाही. भाजपाला मोठ्या पराभवाला समोरे जावे लागले.

    सुधीर मुनगंटीवार यांची पराभवाची हट्रिक

    सुधीर मुनगंटीवार यांनी पहिली निवडणूक वर्ष 1989 मध्ये लढविली होती, त्या निवडणुकीत मुनगंटीवार यांना 1 लाख 93 हजार 397 मते मिळाली होती.

    दुसरी निवडणूक वर्ष 1991 मध्ये लढविली, त्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी 1 लाख 23 हजार 122 मते मिळविली मात्र दोन्ही निवडणुकीत मुनगंटीवार यांना कांग्रेसचे नेते शांताराम पोटदुखे यांच्या पुढे पराभव स्वीकारावा लागला.

     

    MP Pratibha Dhanorkar 34 वर्षांनी पुन्हा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची संधी मुनगंटीवार यांना मिळाली, आधी मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली, मात्र पक्षाने जबाबदारी दिल्यावर त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. 6 विधानसभा क्षेत्रात त्यांनी सभा घेतल्या, इतकेच नव्हे तर खुद्द प्रधानमंत्री मोदी यांनी चंद्रपुरात सभा घेतली, त्यानंतर भाजपचे अनेक दिग्गजांनी मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सभा घेतली मात्र निवडणुकीत त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

     

    वर्ष 2019 च्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा 44 हजार मतांनी पराभव झाला होता, मात्र यंदा मुनगंटीवार रिंगणात उभे असल्याने लढत अटीतटीची होणार असा विश्वास कार्यकर्त्यांना होता, मात्र त्या लढतीत मुनगंटीवार यांचा विजय होणार, पण तसे काही झाले नाही.

     

    MP Pratibha Dhanorkar वर्ष 2019 ते 2024 च्या निवडणुकीत धानोरकर यांनी 6 पट जास्त मताधिक्य घेतलं आणि विजय प्राप्त केला, विशेष बाब म्हणजे एकही कांग्रेसचा बडा नेता धानोरकर यांच्या प्रचाराला आला नाही त्यानंतर सुद्धा त्यांचा विजय झाला, यंदा जनतेनी ही निवडणूक हातात घेतली होती.

     

    मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

    मी माझा पराभव नम्रपणे स्वीकारतो, व विजयाबद्दल प्रतिभा धानोरकर यांना शुभेच्छा देतो, जनतेनी विकासाला नाकारलं, आता लोकसभा क्षेत्राच्या विकासाची जबाबदारी धानोरकर यांनी चांगली पार पाडावी अश्या शुभेच्छा त्यांना देतो.

     

  • Chandrapur loksabha election result live : चंद्रपूर लोकसभा निवडणुक निकाल, 2 लाख 50 हजार लीड

    Chandrapur loksabha election result live : चंद्रपूर लोकसभा निवडणुक निकाल, 2 लाख 50 हजार लीड

    Chandrapur loksabha election result live आज 4 जून रोजी सकाळी 8 वाजता पासून देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली, यामध्ये अनेक उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

    अवश्य वाचा : सुधीर मुनगंटीवार म्हणतात मी जिंकणारचं

    Chandrapur loksabha result live चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा नशीब आजमावत असलेले राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची थेट व अटीतटीची लढत दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत होत आहे, तसेच वंचित बहुजन आघाडी कडून राजेश बेले हे पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे.

    अवश्य वाचा : आमदार प्रतिभा धानोरकरांच्या मनात काय?

    चंद्रपूर लोकसभेच्या निवडणूकित 2 विद्यमान आमदार यांच्यात होत असलेल्या लढतीचा निकाल आपण बघणार आहो..

    निकाल अपडेट

    कांग्रेस प्रतिभा धानोरकर 7 लाख 14 हजार 476, भाजप सुधीर मुनगंटीवार 4 लाख 56 हजार 043, वंचित बहुजन आघाडी राजेश बेले 21 हजार 897,  बसपा राजेंद्र रामटेके 9 हजार 133, नोटा 10 हजार 786 कांग्रेसच्या धानोरकर ह्या 2 लाख 58 हजार 433 मतांनी पुढे.

     

  • Chandrapur loksabha result : चंद्रपूर लोकसभा बाबत तो एक्झिट पोल खोटा ठरणार – सुधीर मुनगंटीवार यांचा दावा

    Chandrapur loksabha result : चंद्रपूर लोकसभा बाबत तो एक्झिट पोल खोटा ठरणार – सुधीर मुनगंटीवार यांचा दावा

    Chandrapur loksabha result लोकसभा निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारांचा आज आढावा घेण्यात आला. यादरम्यान विविध प्रसारमाध्यमांचा एक्झिट पोल खोटा ठरणार असा दावा करत, आम्ही या जागेवर निवडणूक जिंकणारच असे म्हटले आहे.

    निवडणूक मी जिंकणार – प्रतिभा धानोरकर यांचा दावा

    एक्झिट पोलमुळे चंद्रपूरची जागा काँग्रेस पुन्हा आपल्याकडे खेचणार असे चित्र तयार झाले. मात्र पालकमंत्री मुनगंटीवार यांनी थेट सांगितले की, चंद्रपूर लोकसभा आम्ही जिंकणार असून देशात आम्ही ४०० पार तर राज्यात ४५ प्लस जाणार असा विश्वास व्यक्त केला.

    आज ३ जूनला लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात नेहमीप्रमाणे जनसंपर्क सुरू होता, त्यांना भेटण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मतमोजणी प्रतिनिधींना महत्वाच्या सूचना देताना लक्ष ठेवावे असे सांगितले.

    दहावी पास होणार इंजिनिअर : वाचा ही बातमी

    तर काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला, त्यानंतर सायंकाळी चंद्रपूर जनसंपर्क कार्यालयात मतमोजणी प्रतिनिधींशी बैठक घेत, मतमोजणीवर सर्वांनी बारकाईने लक्ष ठेवावे असे निर्देश दिले.

     

    निकालाच्या दिवशी दोन्हीं पक्षांचे नियोजन काय?

    भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनी माहिती दिली की, ४ जूनला लागलेला निकाल हा देशाला कलाटणी देणारा आहे, देशात भाजप सरकार पुन्हा येणार असा विश्वास पावडे यांनी यावेळी व्यक्त केला. यंदाची ही निवडणूक आम्ही जिंकणारचं, निकाल लागल्यावर आम्ही जल्लोष करणार असे नियोजन आम्ही केले आहे.

    तर काँग्रेस महानगर अध्यक्ष रामू तिवारी यांनी याबाबत सांगितले की, भाजपने अंतर्गत सर्व्हे केला असेल तो १०० टक्के फोल ठरणार आहे, ही निवडणूक आम्हीचं जिंकणार आहो.

  • Mla Pratibha Dhanorkar : तर संधीचे सोने करणार – प्रतिभा धानोरकर

    Mla Pratibha Dhanorkar : तर संधीचे सोने करणार – प्रतिभा धानोरकर

    Mla Pratibha Dhanorkar 4 जून लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस या दिवसाची उत्सुकता विविध पक्षातील कार्यकर्त्यांना लागलेली आहे, निकालापर्वी विविध पक्षातील लोकसभा उमेदवार विजय आपलाच यावर दावा करू लागले आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर शहराची या कार्यासाठी झाली निवड

    विदर्भातील चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत राज्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर निवडणुकीच्या रिंगणात होत्या, निकालापूर्वी लोकसभा उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या विजयाचा दावा केलायं.

     

    Mla Pratibha Dhanorkar 4 जून चा निकाल हा देशाच्या दृश्टीने अत्यंत महत्वाचा असून देशाला कलाटणी देणारे ठरणार आहे. मी माझ्या विजयाबद्दल आश्वस्त असून जनतेनी सेवा करण्याची संधी दिल्यास संधी चे सोणे करुन चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी मी सदैव कटीबध्द राहील.