Blog

  • IBPS Bank Jobs : ग्रामीण प्रादेशिक बँकेत मेगाभरती

    IBPS Bank Jobs : ग्रामीण प्रादेशिक बँकेत मेगाभरती

    बँकेत मेगाभरती : ग्रामीण प्रादेशिक बँकेत तब्बल 9,995 पदांसाठी नोकरभरती..

    IBPS Bank Jobs निवडणुका व मतमोजणी संपल्यावर पहिल्यांदाच शासकीय मेगाभरती निघाली आहे, बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या युवक-युवतीसाठी मोठी संधी चालून आली आहे, या संधीचा रोजगाराच्या शोधात असलेल्यानी अवश्य लाभ घ्यावा.

    अवश्य वाचा : दहावी पास विद्यार्थी होणार इंजिनिअर

     बँकेत नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. बँकिंग कर्मचारी निवड संस्थेने (IBPS), 7 जून रोजी विविध ग्रामीण बँकांमध्ये भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. 

    IBPS Bank Jobs पदाचे नाव –

    कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -II (कृषी अधिकारी), अधिकारी स्केल -II (पणन अधिकारी), अधिकारी स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), अधिकारी स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), अधिकारी स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक)

    महत्त्वाचे : स्मार्ट मीटर बाबत जाणून घ्या ही माहिती

    पद संख्या – 9995 पदे

     

    शैक्षणिक पात्रता –

     शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात बघावी.

     

    ऑफिस 

    खुला प्रवर्ग – रु. 850/-

     राखीव प्रवर्ग – रु. 175/-

     

    अर्ज पद्धती – ऑनलाईन

     

    अर्ज सुरु झाल्याची तारीख – 7 जून 2024

    अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2024

     

    अधिकृत वेबसाईट –

     www.ibps.in

     

    मूळ जाहिरात वाचा :

    https://shorturl.at/RtuYt

     

    ऑनलाईन अर्ज करा

    Group ‘B’ Office Assistants (Multipurpose) 👉🏻 https://ibpsonline.ibps.in/rrb13oamay24/

    Group “A” Officers (Scale-I, II & III) 👉🏻 

    https://ibpsonline.ibps.in/rrbxiiimay24/

     

  • Ias vinay gowda : राज्यस्तरीय समितीवर जिल्हाधिकारी गौडा यांची निवड

    Ias vinay gowda : राज्यस्तरीय समितीवर जिल्हाधिकारी गौडा यांची निवड

    Ias vinay gowda शासन निर्णय 2023 च्या अन्वये तलाठी संवर्गाची आस्थापना जिल्हास्तरावर निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुसरून तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या संगणकीय ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे . यासाठी राज्यस्तरीय अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली असून या अभ्यास गटात चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचा समावेश शासनाने केला आहे. याबाबतचा शासन आदेश 7 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आला.

    अवश्य वाचा : चंद्रपूर शहरातील ही पोलीस चौकी 24 तास सुरू ठेवा

    महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनिमय आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम – 2005 अधिसूचित करण्यात आलेला आहे. सदर अधिसूचनेतील कलम 4 नुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या सामान्यपणे वर्षातून केवळ एकदाच एप्रिल किंवा मे महिन्यात करण्यात येतात. त्या अनुषंगाने शासन अधिसूचना 25 मे 2006 मधील तरतुदी तसेच कर्मचाऱ्यांच्या बदलीच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागामार्फत वेळोवेळी सूचना निर्गमित करण्यात येतात.

     

    Ias vinay gowda या सूचनांचा अभ्यास करून, तलाठी संवर्गातील बदल्या संगणकीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्याबाबत सर्वसमावेशक कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे. यात पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पूलकुंडवार अध्यक्ष म्हणून तर सदस्य म्हणून चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महसूल व वन विभागाचे सहसचिव संजय बनकर, अपर जिल्हाधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे, साताराचे उपजिल्हाधिकारी अभिषेक देशमुख यांचा सदस्य म्हणून तर या अभ्यास गटाचे सदस्य सचिव म्हणून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (महसूल) यांचा समावेश करण्यात आला आहे.

    महत्त्वाचे : जात वैधता प्रमाणपत्र काढायचे? तर हे कागदपत्रे सादर करा

    सदर अभ्यास गटाने सामान्य प्रशासन विभागाच्या 2006 मधील तरतुदी तसेच कर्मचाऱ्यांच्या बदलीच्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल 15 दिवसांमध्ये शासनास सादर करायचा आहे, असेही शासन निर्णयात नमूद आहे.

  • Babupeth police station : चंद्रपूर शहरात या भागात वाढतेय गुन्हेगारी

    Babupeth police station : चंद्रपूर शहरात या भागात वाढतेय गुन्हेगारी

    Babupeth police station मागील पाच वर्षांपूर्वी बाबुपेठ येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारण्यात आले त्यावेळी बाबूपेठ वासीयांतर्फे फार मोठे आंदोलन उभारले,त्यावेळी हत्याराला शिक्षा झाली आणि तेव्हाच बाबूपेठ येथे पोलीस चौकी मंजूर करण्याची मागणी बाबूपेठ वासीयांनी केली आणि ती प्रशासनाने मान्य करून बाबूपेठ येथे पोलीस चौकी मंजूर केली.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील या गावात बालविवाहचे प्रमाण जास्त

    ती पोलीस चौकी काही दिवस सुरू होती परंतु बऱ्याच दिवसापासून बाबूपेठ पोलीस चौकी बंद अवस्थेत असल्याचे अनेकांनी सांगितले, पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती नसल्यामुळे ही पोलीस चौकी बंद राहत असल्यामुळे बाबुपेठ मध्ये काही अनपेक्षित घटना घडल्या किंवा छोटे मोठे भांडण तंटे ,चोरी झाली तर रात्री बेरात्री बाबूपेठ येथील नागरिकांना शहर पोलीस स्टेशन किंवा बागला पोलीस चौकीमध्ये पायपीट करून जावे लागते अशावेळी नागरिकांना प्रचंड मनस्ताप होतो.

    अवश्य वाचा : कोण आहे कुलविंदर कौर?

    Babupeth police station त्यामुळे परिसरातील नागरिकांनी महिला काँग्रेस कडे निवेदनाद्वारे बाबूपेठ येथील पोलीस चौकी नियमित सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली,त्यांच्या मागणीची दाखल घेत दखल चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांनी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मा.मुक्कका सुदर्शन साहेब त्यांची भेट घेऊन बाबूपेठ पोलीस चौकी बाबत सविस्तर चर्चा करून बाबूपेठ पोलीस चौकी 24 तास सुरू ठेवण्याची निवेदनाद्वारे मागणी केली.

     

    जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी निवेदनाची दखल घेत बाबूपेठ पोलीस चौकी यापुढे नियमित सुरू राहील असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले,निवेदन देताना चंद्रपूर शहर महिला काँग्रेस अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे,परिसरातील रोशनी राजूरकर,योगिता नवले,उपस्थित होत्या.

  • Child marriage chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील या तालुक्यात सर्वाधिक बालविवाह

    Child marriage chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील या तालुक्यात सर्वाधिक बालविवाह

    Child marriage chandrapur पालकांच्या समुपदेशाने जिल्ह्यात एकाच दिवशी दोन बालविवाह रोखण्यात चाईल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाला यश प्राप्त झाले. विशेष म्हणजे जिवती तालुक्यातील 5 बालविवाह यावर्षी यंत्रणेनी थांबविले आहे.

     

    चंद्रपूरपासून दूर अंतरावर असलेल्या जिवती तालुक्यातील गावांमध्ये बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती चाईल्ड हेल्पलाईन च्या 1098 क्रमांकावर मिळाली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी चंद्रपूर आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम दोनही बालिका अल्पवयीन असल्याचा पुरावा सहाय्यक संरक्षण अधिकारी परविन शेख, अंगणवाडी सेविका व सुपरवायजर यांच्या मदतीने प्राप्त करण्यात आला.

    अवश्य वाचा : कंगना राणावतच्या कानशिलात लगावणारी कुलविंदर कौर कोण आहे?

    Child marriage chandrapur यानंतर चाइल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी दोन्ही बालिकेच्या बालविवाह होत असलेल्या गावात पोहचले व ग्रामीण बाल संरक्षण समिती सदस्यांच्या मदतीने दोन्ही बालविवाह थांबविले.

    महत्त्वाचे : जातवैधता प्रमाणपत्रासाठी लागणार हे पुरावे

    दोन्ही अल्पवयीन बालिकांच्या कुटुंबाकडून बालविवाह करणार नसल्याचे शपथपत्र लिहून घेण्यात आले. या संपूर्ण कारवाही दरम्यान जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, चाईल्ड हेल्पलाईनचे अभिषेक मोहुर्ले, प्रकल्प समन्वयक प्रदिप वैरागडे, सुपरवायझर अंकुश उराडे,  किरण बोहरा आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या हर्षा वऱ्हाटे  यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

  • Who is Kulwinder Kaur? : कंगना राणावतच्या कानशिलात लगावणारी कुलविंदर कौर कोण आहे?

    Who is Kulwinder Kaur? : कंगना राणावतच्या कानशिलात लगावणारी कुलविंदर कौर कोण आहे?

    Who is Kulwinder Kaur? अभिनेत्रीतून राजकारणी बनलेली कंगना राणावत सोबत चंदीगड विमानतळावर झालेल्या थापड घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे.  तपासणीदरम्यान सीआयएसएफच्या महिला सुरक्षा रक्षकाने थापड मारल्याच्या घटनेनंतर कंगना राणावत ने व्हिडिओ शेअर करून संपूर्ण माहिती दिली. 

     

    एका व्हिडिओमध्ये कंगना राणावत म्हणाली की ती सुरक्षित आणि बरी आहे, पण पंजाबमधील वाढत्या दहशतवादामुळे ती चिंतेत आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर कंगनाने एक स्टेटमेंट जारी केले की, महिला कॉन्स्टेबल तिच्याकडे आली, कंगना म्हणाली, ‘तिने मला थप्पड मारली आणि मला शिवीगाळ करायला सुरुवात केली.  मी तिला असे का केले असे विचारल्यावर हवालदाराने सांगितले की, ती शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देते. 

    अवश्य वाचा : शेतकऱ्यांच्या मदतीला धावली दामिनी

    Who is Kulwinder Kaur? कंगना राणावत ला थापड मारणाऱ्या सीआयएसएफ जवान कुलविंदर कौरला तात्काळ ताब्यात घेण्यात आले आणि चौकशीनंतर निलंबित करण्यात आले.

     

    चंदिगड विमानतळावर तैनात असलेल्या सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौर या कपूरथला जिल्ह्यातील तलवंडी चौधरी पोलीस ठाण्यातील माई वाल या गावातील रहिवासी आहेत.  शेतकरी आंदोलनादरम्यान कंगनाने म्हटले होते की, दिल्लीत शेतकरी आंदोलनात धरणे देणाऱ्या महिला प्रत्येकी 100 रुपये घेऊन बसतात.

     

    Who is Kulwinder Kaur? कुलविंदर कौर 35 वर्षांची असून तिचे कुटुंब पंजाबमधील सुलतानपूर लोधी येथील रहिवासी आहे.  कुलविंदर कौर गेल्या 15 वर्षांपासून सीआयएसएफमध्ये काम करत आहेत आणि तिचा आतापर्यंतचा रेकॉर्डही स्वच्छ आहे.  कुलविंदरने नोकरीत असताना आपल्या सर्व जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडल्या आहेत.  तिचा नवराही सीआयएसएफ जवान आहे.  कुलविंदर तिच्या पतीसोबत कपूरथला येथे राहते आणि तिला 2 मुले आहेत. त्यांचा भाऊ शेर सिंग हा शेतकरी नेता असून किसान मजदूर संघर्ष समितीमध्ये संघटन सचिव पदावर आहे.

    महत्त्वाचे : जातवैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी हे पुरावे लागतील?

    कुलविंदर कौर गेल्या 2 वर्षांपासून चंदिगड विमानतळावर तैनात आहेत आणि पूर्ण प्रामाणिकपणे आपले काम करीत आहे.  त्यांचे कुटुंब शेतकरी कुटुंबातील असल्याने ते शेतकरी चळवळीशी जोडले गेले आहे.  कंगना राणावत सोबत झालेल्या गैरवर्तनानंतर कुलविंदरचा चंदीगड विमानतळावरून एक व्हिडिओही समोर आला होता, ज्यामध्ये त्यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान भाजप खासदारावर विरोधी वक्तव्य केल्याचा आरोप केला होता. 

     

    Who is Kulwinder Kaur? महिला कर्मचाऱ्याने कथित व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘कंगना यांनी विधान केले होते की दिल्लीतील शेतकरी 100-200 रुपये घेऊन आंदोलन करत आहेत.  त्यावेळी माझी आई ही आंदोलकांमध्ये होती.

  • Cast validity certificate documents in marathi : जातवैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणार हे पुरावे

    Cast validity certificate documents in marathi : जातवैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणार हे पुरावे

    Cast validity certificate documents in marathi मे महिन्यात वर्ग 10 व 12 वी चा निकाल लागला, त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची घाई सुरू झाली, मात्र काही अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र द्यावे लागते, आता हे प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणते कागदपत्रे हवे, याची माहिती पालक व विद्यार्थ्यांना नसते. तर आज आपण जाणून घेऊया या प्रमाणपत्रासाठी काय कागदपत्रे हवी.

    महत्त्वाचे : या कंपणीची पर्यावरण परवानगी रद्द करा

     दहावी- बारावीच्या निकालानंतर आता पुढील व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र (जात वैधता प्रमाणपत्र) आवश्‍यक आहे. 

     

    Cast validity certificate documents in marathi बारावीनंतर विद्यार्थी अभियांत्रिकी, फार्मसी, नर्सिंग, मेडिकलसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. तर दहावीनंतर काही विद्यार्थी पॉलिटेक्निकला जातात. अशावेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांच्याकडील जात प्रमाणपत्राची पडताळणी प्रमाणपत्र (जात वैधता प्रमाणपत्र तथा व्हॅलिडीटी) द्यावे लागते.

     

     विद्यार्थ्यांनी तातडीने ‘या’ कागदपत्रांसह करावेत अर्ज

    * एससी : १९५० पूर्वीचा जातीची नोंद असलेला पुरावा

    * व्हीजेएनटी (अ, ब, क, ड) : १९६१ पूर्वीचे जातीचा पुरावा

    * ओबीसी, एसबीसी, एसईबीसी : १९६७ पूर्वीचे पुरावे

     

     विद्यार्थ्यांनी असे करावेत अर्ज…

    * विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी सुरवातीला ‘बार्टी’च्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा.

    * ऑनलाइन अर्ज भरल्याची प्रिंट व आवश्यक कागदपत्रांसह तो प्रस्ताव ऑफलाइन पद्धतीने सात रस्ता येथील समितीच्या कार्यालयात द्यावा.

    * विद्यार्थ्यांनी स्वतःचा अचूक मोबाईल क्रमांक व ई-मेल ॲड्रेस अर्जासोबत द्यावा, जेणेकरून अर्जाच्या त्रुटींची माहिती त्यावर समजू शकेल.

    * परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेल्या विद्यार्थ्यांची ‘व्हॅलिडिटी’ त्याच्या ई-मेलवर ऑनलाइन पद्धतीने देखील पाठविली जाईल.

    महत्त्वाचे : आता बर्ड फ्लू चा धोका

    Cast validity certificate documents in marathi जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीच अर्ज करावेत. प्रमाणपत्र देण्याचा कालावधी जरी ४५ ते ६० दिवसांचा असला, तरीदेखील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कोणतीही अडचण येणार नाही, यादृष्टीने त्यांच्या अर्जांवर दररोज कार्यवाही केली जात आहे. विद्यार्थ्यांनी योग्य पुराव्यानिशी ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज करावेत, त्रुटी असल्यास त्याची तातडीने पूर्तता करावी.

  • Surjagad Iron Ore Company : पर्यावरण परवानगी रद्द करा – राजेश बेले

    Surjagad Iron Ore Company : पर्यावरण परवानगी रद्द करा – राजेश बेले

    Surjagad Iron Ore Company सुरजागड लोह खनिज खाण मेसर्स लॉयडस मेटल व एनजी लि. तह एटापल्ली जिल्हा गडचिरोली या प्रकल्प द्यारे पर्यावरण कायद्याचे वारंवार उल्लंघन होत असल्यामुळे या प्रकल्पाची पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी अशी मागणी संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केली आहे.

    प्रभागातील घाण मनपा कार्यालयात टाकणार – अजय सत्कार

    सुरजागड लोह खनिज खाण या प्रकल्पाद्वारे हवेमध्ये खाणीतून निघालेली लाल मातीचे कण व लोह दगडातील सूक्ष्म कण हवेमध्ये उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे. लोह खनिज खाणीतील घातक रासायनिक द्रव खाणीला लागून असलेल्या नाल्या द्वारे जंगलातून गोदावरी नदीमध्ये सोडत असल्यामुळे तेथील मानवी जीव, जल प्राणी, वन्य प्राणी, पाळीव प्राणी यांच्या जीवाला व आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे व आजाराची लागण नवजात शिशु चा मृत्यू, दमा, हृदय विकार, त्वचा रोग, डोळ्याचे विकार, मेंदूचे विकार, क्षयरोग, कर्करोग अशा अनेक आजाराची सुद्धा लागण झालेली आहे.

     

    Surjagad Iron Ore Company लोह खनिज खाणीतून निघणार्या लोह खनिज मधून निघणारा ओवर बर्डन हाताळणी करते वेळी हवेमध्ये शुस्म कण उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजन होत नाही.

    देशात पुन्हा बर्ड फ्लू चा धोका

    लोह खनिज व खाणीतून निघणारे ओवर बर्डन ट्रक व हायवा गाडीमध्ये हाताळणी करते वेळी हवेमध्ये सूक्ष्म कण उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे, तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजना होत नाही जड वाहतुकी द्वारा कायद्याचे उल्लंघन करून वाहतुकीमुळे सुरजागड लोह खनीज प्रकाल्पासून एटापल्ली, आलापल्ली, गोंडपिपरी, आक्सापूर, पोम्भूर्ण, केळझर, कोठारी बामणी या गावातील रस्ते व आजूबाजूचा परीसर लोह खनिजाचे कण हवेमध्ये उडते.

     

    Surjagad Iron Ore Company लोह खनिज खाणीतून निघणारे घातक रासायनिक द्रव खाणीला लागून असलेल्या नाल्या द्वारे जंगलातून नदीमध्ये सोडत असल्यामुळे घातक जल प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजन होत नाही.

    शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार दामिनी

    Surjagad Iron Ore Company सुरजागड लोह खनिज खाण या प्रकल्प द्यारे पर्यावरण कायद्याचे वारंवार उल्लंघन होत असल्यामुळे या प्रकल्पाची पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी. अशी मागणी बेले यांनी केली आहे.

  • World Environment Day : बाबूपेठ येथे महिला बचत गटाच्या वतीने वृक्षारोपण

    World Environment Day : बाबूपेठ येथे महिला बचत गटाच्या वतीने वृक्षारोपण

    World Environment Day दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत चालल्यामुळे वातावरणाचा समतोल बिघडत आहे.त्यामुळेच मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने सामाजिक बांधिलकी जोपासून किमान एक तरी झाडं आपल्या आयुष्याच्या शुभदिनी लावून त्याचे संगोपन करावे असे मौलिक विचार जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वृक्षरोपन कार्यक्रमाप्रसंगी महिला बचतगटांच्या संस्थापक अध्यक्षा सौ.चंदाताई वैरागडे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

    अवश्य वाचा : तर प्रभागातील घाण चंद्रपूर मनपा कार्यालयात आणून टाकणार

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बाबूपेठ महिला बचतगट तर्फे बजरंग क्रीडा संकुल बाबूपेठ परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमात सौ पुष्पाताई डोनिवार यांनी निसर्गावर महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी अतिशय सुंदर गाणं म्हटलं,कार्यक्रमाला बचतगटाच्या संस्थापक अध्यक्षा चंदाताई वैरागडे, निताताई चन्ने, नम्रताताई मोरे,रेखाताई वैरागडे, शिल्पाताई आंबटकर, लीलाताई बुटले, वर्षाताई साखरकर, स्नेहलताई अंबागडे यांच्या हस्ते वृक्षरोपन करण्यात आले.

     

    World Environment Day कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रेखाताई तडसे प्रास्ताविक शालिनीताई काळे,आणि आभार प्रदर्शन सौ.पूनम नवले यांनी केले ,या कार्यक्रमात बचतगटातील जागृत सदस्य महिलांची उपस्थिती होती.

  • Social issues chandrapur : बंगाली कॅम्प प्रभागातील घाण मनपा कार्यालयात टाकणार

    Social issues chandrapur : बंगाली कॅम्प प्रभागातील घाण मनपा कार्यालयात टाकणार

    Social issues chandrapur चंद्रपूर महानगरपालिका नगरसेवकांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपला होता, मात्र त्यानंतर अनेक भागात समस्यांचे डोंगर उभे राहिले.

    अवश्य वाचा : बर्ड फ्लू चा धोका वाढला

    शहरातील बंगाली कॅम्प भागात मागील वर्षभरापासून नाल्यांची स्वच्छता न केल्याने विविध भागांतील नाल्या घाणीने साचल्या आहे, प्रशासन या समस्येवर डोळेझाक करीत आहे.

     

    Social issues chandrapur यावर प्रभागाचे माजी नगरसेवक अजय सरकार यांच्याकडे नागरिकांनी प्रभागात होत असलेली घाणी बाबत सूचना दिली, सरकार यांनी महानगरपालिका प्रशासनाला याबाबत निवेदन देत माहिती दिली मात्र यावर प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही.

    महत्त्वाचे : दहावी पास विद्यार्थी होणार इंजिनिअर

    6 जून रोजी प्रभागातील नागरिकांना सोबत घेत अजय सरकार यांनी मनपा प्रशासनाला याबाबत निवेदन दिले 2 दिवसात प्रभागातील नाल्यांची स्वच्छता झाली नाही तर ज्या भागातील नाल्यांमध्ये घाण पसरली आहे ती सर्व घाण सोमवारी मनपा कार्यालयात आणून टाकणार असा इशारा सरकार यांनी मनपा प्रशासनाला दिला.

  • Bird flu 2024 : जगात बर्ड फ्लू चा धोका?

    Bird flu 2024 : जगात बर्ड फ्लू चा धोका?

    Bird flu 2024 वर्ष 2020 मध्ये जगात कोरोना महामारीने थैमान घातलं होत, 2 वर्षे या महामारीने लाखो नागरिकांचा जीव घेतला, त्यानंतर आता बर्ड फ्लू ने मानवी मृत्यू झाल्याने who ने चिंता व्यक्त केली आहे, नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केलंय.

    अवश्य वाचा : दामिनी वाचविणार शेतकऱ्यांना

    बर्ड फ्लूबाबत तज्ज्ञांनी पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. अलीकडेच अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ही धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं जात आहे. अंटार्क्टिकमधील पेंग्विनमध्ये बर्ड फ्लू आढळल्यानंतर, मानवामध्ये H5N1 व्हायरसची पुष्टी झाल्याबद्दल अलर्ट जारी करण्यात आला आहे. आरोग्य तज्ञांचे असे मत आहे की, याकडे गांभीर्याने आणि सावधगिरीने पाहिले पाहिजे कारण ते महामारीचे रूप धारण करू शकते आणि मोठ्या प्रमाणावर विनाश घडवू शकते. बर्ड फ्लू H5N1 इतका धोकादायक का मानला जातो ते जाणून घेऊया.

     

    Bird flu 2024 बर्ड फ्लूवर संशोधन करणाऱ्या संशोधकांनी एवियन फ्लू म्हणजेच बर्ड फ्लूबाबत इशारा दिला आहे. हा व्हायरस अनेक वर्षांपासून साथीच्या यादीत अग्रस्थानी आहे. आता तो धोकादायक बनत चालला आहे. असे झाल्यास धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते असं म्हटलं आहे. तसेच जॉन फुल्टन नावाच्या तज्ज्ञाने असं म्हटलं आहे की, तो कोरोनापेक्षा 100 पट जास्त धोकादायक होऊ शकतो. म्यूटेट होऊ शकतो आणि घातक ठरू शकतो.

     महत्वाचे : दहावी पास विद्यार्थी होणार अभियंता

    बर्ड फ्लूची प्रकरणं फक्त टेक्सासमध्येच नाही तर अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये आढळून आली आहेत. हा व्हायरस गायींमध्येही पसरला आहे. अमेरिकेत मानवांमध्ये एव्हीयन फ्लूची ही दुसरी घटना आहे. कोलोरॅडोमध्ये २०२२ मध्ये पहिली केस आढळली होती. १ जानेवारी २००३ ते २६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत जगातील २३ देशांमध्ये मानवांमध्ये बर्ड फ्लूचे ८८७ रुग्ण आढळले आहेत. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, यापैकी ४६२ प्रकरणे अतिशय धोकादायक आहेत. बर्ड फ्लूचा व्हायरस पहिल्यांदा १९५९ मध्ये समोर आला होता. २०२० नंतर, तो अनेक देशांमध्ये प्राण्यांमध्ये पसरला आहे.

     

    बर्ड फ्लूची लक्षणं

    ◆इतर कोणत्याही फ्लूप्रमाणे बर्ड फ्लूची लक्षणे आहेत.

    ◆खोकला येणे. 

    ◆ताप येणे.

    ◆अंगदुखी

    ◆गंभीर किंवा जीवघेणा न्यूमोनिया होण्याचा धोका.

    मानवी संक्रमण

    माणसांमध्ये बर्ड फ्लूचे संक्रमण संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कातून होऊ शकते, जसे की त्यांचा मल, लाळ किंवा पंखांच्या संपर्कातून. याशिवाय, कच्च्या किंवा अपुरीत शिजवलेल्या चिकन किंवा अंड्यांच्या सेवनातून देखील हा विषाणू पसरू शकतो, बर्ड फ्लूच्या संक्रमणामुळे मनुष्यांमध्ये गंभीर आजार होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये, हे संक्रमण न्यूमोनिया, श्वसन समस्या आणि अगदी मृत्यु देखील होऊ शकते.

     

    Bird flu 2024 कच्चे किंवा अपुरीत शिजवलेले चिकन आणि अंड्यांचे सेवन टाळा. चिकन आणि अंड्यांना चांगले शिजवूनच खा.