Blog

  • Accident in chandrapur city : प्रियदर्शिनी चौकात अपघात, 3 जखमी

    Accident in chandrapur city : प्रियदर्शिनी चौकात अपघात, 3 जखमी

    Accident in chandrapur city चंद्रपूर – शहरातील प्रियदर्शिनी चौक हा अतिवर्दळीचा भाग आहे मात्र आज या चौकात भर दुपारी ट्रॅक्टर व दुचाकी वाहनाचा अपघात झाला, या अपघातात 3 नागरिक जखमी झाले.

    अवश्य वाचा : ठाकरेंचे उपोषण वडेट्टीवार यांनी सोडविले

    दुपारी एकाच दुचाकीवर 26 वर्षीय अजय गुरनुले, 40 वर्षीय चालूनंदा चंद्रशेखर गुरनुले व 40 वर्षीय जीवनमाला गुरनुले हे डोंगरगाव ला जात होते, त्याच दरम्यान मुख्य बस स्थानक मार्गावरून पाणी टंकी जवळ जाणारा ट्रॅक्टर क्रमांक MH34AP 1648 ने दुचाकी वाहनाला जोरदार टक्कर मारली.

    या धडकेत दुचाकी वाहनांवर असणाऱ्या तिघांना गंभीर दुखापत झाली, धडक इतकी जोरदार होती की दुचाकी थेट ट्रॅक्टर मध्ये शिरली.

    अवश्य वाचा : खासदार प्रतिभा धानोरकर यांचा राजीनामा

    Accident in chandrapur city अचानक झालेल्या या अपघातात नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावीत तिघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले.

    अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गाडे हे आपल्या चमूसहित पोहचले.
    पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

  • Leader of Opposition Vijay Wadettiwar : ठाकरेला गावगुंडाचा त्रास आणि झाली वडेट्टीवार यांची एंट्री

    Leader of Opposition Vijay Wadettiwar : ठाकरेला गावगुंडाचा त्रास आणि झाली वडेट्टीवार यांची एंट्री

    Leader of Opposition Vijay Wadettiwar सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव (तुकुम) येथील सरपंच संदीप बाबुराव ठाकरे यांनी गावगुंडाकडून ग्रामपंचायतीच्या कचरा कुंड्या मालमत्तेची तोडफोड, वारंवार धमक्या व झालेले हल्ले या विरोधात पोलिसात तसेच पंचायत समिती स्तरावर लिखित तक्रार देऊ नये कारवाई न झाल्याने दि.12 जून पासून आमरण उपोषण सुरू केले.
    याची माहिती मिळताच आज मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषण मंडपात भेट देऊन सरपंच संदीप ठाकरे यांच्या समस्या जाणून घेत संबंधित विभागांना तात्काळ चौकशी करून कारवाईचे निर्देश दिले. सदर आश्वासनानंतर सरपंच ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते नींबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले.
    Leader of Opposition Vijay Wadettiwar आपले गाव स्वच्छ व सुंदर तसेच निरोगी राहावे याकरिता सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव (तुकुम) येथील सरपंच संदीप ठाकरे यांनी ग्रामपंचायत अंतर्गत गावात कचराकुंड्या तयार केल्या. मात्र गावातील काही समाजकंटकांनी त्याची तोडफोड केली.
    सोबतच गावातील मुख्य पानंद रस्त्यावरुन वाळू वाहतूक करणारे अवजड वाहने जाऊन रस्त्याची दुर्दशा करण्यात आली. तरी या विरोधात आवाज उठवणाऱ्या सरपंच संदीप ठाकरे यांचे वर सलग दोनदा हल्ला झाला. याची वारंवार तक्रार पंचायत समिती स्तरावर तसेच पोलिसात देऊनही कुठलीही कारवाई न झाल्याने व गाव गुंडांकडून जीविताचा संभावित असल्याने अखेर न्यायासाठी सरपंच ठाकरे यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला. त्यांनी कालपासून सिंदेवाही पंचायत समिती तथा तहसील कार्यालय परिसरात आमरण उपोषण सुरू केले.
    याची माहिती मिळताच आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मतदार संघातील दौरा दरम्यान थेट उपोषण मंडपाला भेट दिली व सरपंच संदीप ठाकरे यांच्या समस्या जाणून घेत सदर मागण्यांची सखोल चौकशी करून खड्डेमय मार्गांची दुरुस्ती, व संपूर्ण मागण्यांची पूर्तता करावी असे वेळीच निर्देश दिले. यावर समाधान व्यक्त करीत मरेगाव (तुकुम )सरपंच संदीप ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या आश्वासनानंतर उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले.
    Leader of Opposition Vijay Wadettiwar याप्रसंगी प्रामुख्याने सिंदेवाही तहसीलदार पानमंद, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण, पंचायत समिती विभागाचे अधिकारी, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, माजी प.स. सदस्य राहुल पोरेड्डीवार, तालुका सरपंच संघटना अध्यक्ष राहुल बोडने, कृउबा संचालक नरेंद्र भैसारे, जानकीराम वाघमारे, सचिन नाडमवार व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
  • Resignation of Pratibha Dhanorkar : खासदार प्रतिभा धानोरकर यांचा राजीनामा

    Resignation of Pratibha Dhanorkar : खासदार प्रतिभा धानोरकर यांचा राजीनामा

    Resignation of Pratibha Dhanorkar वरोरा-भद्रावती विधानसभेच्या माध्यमातून जनतेने आमदार म्हणून निवडून दिले. २०१९ ते २०२४ या कालावधीत विधानसभेच्या माध्यमातून जनसामान्यांची संपूर्ण कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले.  यावेळी विधानसभेच्या अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द करुन विधानसभा सचिवालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.

    अवश्य वाचा : हवामान विभागाच्या अलर्ट चा अर्थ काय?

    अलिकडेच लोकसभा निवडणूक पार पडून त्यामध्ये चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार पदांची धुरा प्रतिभा धानोरकर यांच्याकडे आली.  खासदार पदी निवडून आल्याने आज विधानसभा अध्यक्षांकडे आमदार पदाचा राजीनामा सुपूर्द केला.  यावेळी अध्यक्षांनी प्रतिभा धानोरकर यांना भावी राजकीय आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांनी विधानसभेत केलेल्या कार्याबद्दल स्तुतीसुमने उधळली.

    महत्त्वाचे : स्मार्ट वीज मीटर विरोधात आप चे निषेध आंदोलन

    Resignation of Pratibha Dhanorkar याप्रसंगी प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत वेळोवेळी जनतेच्या प्रश्नांवर चर्चेसाठी संधी दिल्याबद्दल अध्यक्षांचे आभार मानले.  तसेच विधानसभा सचिवालयातील सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले व जनतेने ठेवलेल्या विश्वासाबद्दल कायमची ऋणी राहीन व विधानसभेत विविध आयुधांद्वारे जनतेच्या प्रश्नांवर केलेल्या चर्चेच्या अनुभवनातून लोकसभेत नव्या दमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे मत याप्रसंगी खा. प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.

     

    दिवंगत खासदार बाळू धानोरकर व मला विधानसभेचा कालावधी पूर्ण करता आला नाही, पण जनतेच्या आशिर्वादाने आम्हाला खासदार म्हणून जनतेने दिलेली संधी माझ्या आयुष्यासाठी प्रेरणादायी ठरलेली आहे.  या निवडणूकीत जनतेने भरभरुन दिलेले आशिर्वाद मी विकास कार्यात परावर्तित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मतदेखील यावेळी व्यक्त केले.

    Resignation of Pratibha Dhanorkar भविष्यात देखील जनतेच्या कामांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून  जनतेचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले.

  • Congress Celebrations : कांग्रेस नेते महेश मेंढे यांनी केला नागरिकांचा सत्कार

    Congress Celebrations : कांग्रेस नेते महेश मेंढे यांनी केला नागरिकांचा सत्कार

    Congress Celebrations चंद्रपूर : -२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर वणी आर्नी लोकसभा क्षेत्राच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना भरघोस बहुमताने विजय मिळवून देणाऱ्या खारीचा वाट असणाऱ्या म्हातारदेवी, नकोडा, घुग्गुस येथील नागरिकांचा महेश मेंढे यांनी शाल, स्मुतीचिन्ह देऊन सत्कार केला.

    अवश्य वाचा : हवामान खात्याद्वारे सांगितल्या जाणाऱ्या अलर्ट चा अर्थ काय?

    प्रतिभाताई धानोरकर यांनी खासदारची निवडणूक लढविली आणि तब्बल २ लाख ६० हजार मतांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या बड्या नेत्याचा पराभव केला. यात ज्या मतदार राज्याने सहभाग घेतला होता त्यांचा महेश मेंढे यांनी त्याचे गावी, घरी जाऊन सत्कार केला.

     

    Congress Celebrations यात म्हातारदेवी येथील सरपंच सौ. संध्या पाटील, काँगेसचे ज्येष्ठ नेते संजय टिपले, उपसरपंच सावे, चटप साहेब, माधुरी मेश्राम यांचा तर नकोडा येथील हाजी शेख सनवर, माजी उपसरपंच हकीम शेख, युवा नेते राजू तीरानकर, आणि घुघुस येथील माजी सभापती रोशन पचारे, सूरज कन्नूर, तोलीक शेख,सिंनु गुडला, शेखर तंगडपेल्ली, प्रशांत सारीकर, प्रपूल हीरके, सुधाकर जाणकर, स्वागत बुरचूडे, याचा शाल व स्मुतीचीन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

    अवश्य वाचा : बामणी प्रोटिन्स उद्योग सुरू करा, कामगार सह कुटुंबाने सुरू केले आंदोलन

    यावेळी काँग्रेसचे नेते महेश मेंढे यांच्यासह रोशन रामटेके, पियुष तुपे, अविनाश मेश्राम , सचिन रणवीर, दिशांत कांबळे यांची उपस्थिती होती.

  • Weather Alert in India : रेड, ऑरेंज, यलो व ग्रीन अलर्टचा अर्थ काय?

    Weather Alert in India : रेड, ऑरेंज, यलो व ग्रीन अलर्टचा अर्थ काय?

    Weather Alert in India सध्या राज्यात काही ठिकाणी मान्सूनचे आगमन झाले आहे मात्र अनेक जिल्ह्यात पाऊस पडलेला नाही, हवामान खाते वारंवार पावसाचे अलर्ट देत आहे, मात्र हे अलर्ट नेमकं काय सांगतात याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत.

    महत्त्वाचे : एक राज्य एक गणवेश योजना 15 जूनपासून लागू

    काय सांगतात, पावसाचे अलर्ट ?

     

     रेड अलर्ट: रेड अलर्ट म्हणजे मोठ्या संकटाची शक्यता. अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा अंदाज असतो. त्यामुळे नागरिकांना घरीच थांबण्याच्या सूचना दिल्या जातात.

     

    ऑरेंज अलर्ट: मुसळधार पावसाची शक्यता. कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता. आवश्यक असेल तरच बाहेर पडण्याचे निर्देश असतात.

     

    यलो अलर्ट: नैसर्गिक संकटाची शक्यता. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे सावधगिरीचा इशारा असतो.

     

     ग्रीन अलर्ट: पावसाची परिस्थिती सामान्य असते. कुठलेही निर्बंध घालण्याची गरज नसते.

    महत्त्वाचे : जातवैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणार हे पुरावे

    Weather Alert in India मान्सून सक्रिय झाल्यानंतर भारतीय हवामानशास्त्र विभाग नागरिकांसाठी विविध अलर्ट जारी करते. पावसाचा अंदाज काय असेल आणि नागरिकांनी कोणती काळजी घ्यायला हवी, यासाठी हे अलर्ट महत्त्वाचे असतात. या पार्श्वभूमीवर विविध अलर्टचे निकष काय असतात, याची ही छोटीशी झलक.

  • Bamni Protein Industries : कामगारांच्या लढाईत कुटुंबाची उडी

    Bamni Protein Industries : कामगारांच्या लढाईत कुटुंबाची उडी

    Bamni Protein Industries बल्लारपूर येथील बामणी प्रोटिन्स लिमिटेड हा उद्योग कंपनी व्यवस्थापन यांच्या चुकीच्या निर्णयामुळे बंद पडल्याने तब्बल 250 कामगारानावर उपासमारीची वेळ आली आहे. याविरोधात भारतीय केमिकल वर्क्स युनियन ने 20 मे पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले, आज 23 दिवसांनी कामगारांच्या या धरणे आंदोलनात कुटुंब सहभागी झाले, कंपनी व्यवस्थापनाने आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी कामगारांच्या कुटुंबीयाने केली आहे.

    अवश्य वाचा : आप ने केले स्मार्ट वीज प्रीपेड मीटर विरोधात निषेध आंदोलन

    बल्लारपूर येथील बामणी मध्ये वर्ष 1998 पासून बामणी प्रोटिन्स हा उद्योग सुरु झाला होता, या कंपनीत तब्बल 250 कामगार कार्यरत आहे, वर्ष 2024 मध्य तथाकथित पर्यावरण वादी राजेश बेले यांनी बामणी प्रोटिन्स उद्योग हा मोठ्या प्रमाणात प्रदूषण करीत असल्याची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळाला केली होती.
    बेले यांच्या तक्रारीवरून प्रदूषण नियामक मंडळाने लॉकआऊट कारवाई करीत रीतसर प्रदूषण बाबतीत उपाययोजना करीत उद्योग पूर्वरत सुरु करा असे निर्देश 13 मार्च ला कंपनी व्यवस्थापनाला दिले.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील कामगारांनी पंतप्रधान मोदी यांना लिहले रक्ताने पत्र

    Bamni Protein Industries मात्र कंपनीने प्रदूषण नियामक मंडळाच्या निर्देशाचे पालन केले नाही, व नफ्यात असलेला उद्योग त्यांनी बंद करण्याचा निर्णय घेतला, विशेष म्हणजे कंपनीने कामगार संघटनांना कसलीही पूर्वसूचना न देता 19 मे 2024 ला कंपनीच्या गेटला टाळे लावले.
    उद्योगात मान्यता प्राप्त कामगार संघटना असताना सुद्धा व्यवस्थापनाने कसलीही चर्चा केली नाही, त्यामुळे 20 मे पासून कामगारांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले.

     

    यादरम्यान मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्यवस्थापनाशी बैठक घेतली मात्र व्यवस्थापनाही भूमिका उद्योग सुरु कारण्याबाबत सकारात्मक दिसून आली नाही.

     

    Bamni Protein Industries त्यामुळे 12 जूनपासून कामगार सोबत त्यांचे कुटुंब महिला व मुले या लढ्यात सामील झाले, कामगारांच्या कुटुंबाला आता मुलांच्या भविष्याची चिंता होऊ लागली आहे. व्यवस्थापनाने जुलै महिन्यापर्यंत कामगाराना वेतन देण्याचं ठविले मात्र त्यांनतर काय होणार? हा प्रश्न कामगारांच्या पुढे आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभेतील हा महत्वाचा उद्योग होता जो बंद पडला.

    महत्त्वाचे : 15 जूनपासून महाराष्ट्रात 1 राज्य 1 गणवेश

    जर या आंदोलनानंतर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या काळात साखळी व आमरण उपोषणाचा एकमेव पर्याय आमच्याकडे असणार असे कामगार संघटनांनी सांगितले.

  • Smart Prepaid Recharge Meter : चंद्रपुरात आपचे स्मार्ट वीज मीटर विरोधात निषेध आंदोलन

    Smart Prepaid Recharge Meter : चंद्रपुरात आपचे स्मार्ट वीज मीटर विरोधात निषेध आंदोलन

    Smart Prepaid Recharge Meter लोकसभा निवडणूक संपताच आता स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचे काम जोरात सुरू करण्यात आले आहे, मात्र हा स्मार्ट मीटर काय याबाबत सामान्य जनतेमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपूरच्या कामगारांनी पंतप्रधान मोदी यांना लिहले रक्ताने पत्र

    12 जून ला चंद्रपूर-गडचिरोली वीज वितरण कार्यालय बाबूपेठ येथे आम आदमी पक्षाच्या वतीने स्मार्ट वीज मीटर विरोधात आंदोलन करण्यात आले.

     

    Smart Prepaid Recharge Meter ऑगस्ट 2023 मध्ये स्मार्ट वीज मीटर बाबत निविदा मंजूर करण्यात आली होती, त्यानंतर हे काम अदानी, एनसीसी व मोंटेकारलो कंपनीला मिळाले.
    वीज मीटर ची किंमत 6 हजार 300 असताना सरकार 12 हजार रुपयांना हे मीटर खरेदी करीत आहे, हा मोठा घोळ यामध्ये आहे.

    अवश्य वाचा : तर अधिकारी व कंत्राटदार यांची गय केली जाणार नाही – विजय वडेट्टीवार यांची तंबी

    आज आप तर्फे करण्यात आलेल्या आंदोलनात आप चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी सांगितले की गोर गरीब जनता आधीच महागाई पायी त्रासली आहे आणि सरकार त्यांच्या वर रिचार्ज करणारे वीज मीटर थोपविण्याचे काम करीत आहे, रिचार्ज करण्यासाठी नागरिकांजवळ पैसे नसेल तर वीज पुरवठा खंडित होणार, या सरकारच्या धोरणाला आमचा विरोध आहे, याचा निषेध म्हणून आम्ही आज आंदोलन करीत असल्याची माहिती दिली.

    Smart Prepaid Recharge Meter निषेध आंदोलनानंतर मयूर राईकवार यांनी मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांना निवेदन दिले, यावेळी जिल्हा संगठन मंत्री शंकर सरदार, राजकुमार नगराळे, योगेश गोखरे, परमजीत सिंग, शिवम ठाकूर, सुजाता देठे, नाजमा बेग यांची उपस्थिती होती.

  • Vijay Wadettiwar : तर अधिकारी व कंत्राटदार यांची गय केल्या जाणार नाही – विजय वडेट्टीवार

    Vijay Wadettiwar : तर अधिकारी व कंत्राटदार यांची गय केल्या जाणार नाही – विजय वडेट्टीवार

    Vijay Wadettiwar लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ब्रम्हपुरी मतदार संघातील सिंदेवाही तालुक्यातील अनेक विकास कामे ठप्प होती. या विकास कामांना शीघ्र गतीने पुर्ण करुन जनतेच्या समस्या तातडीने सोडवा असे निर्देश राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सिंदेवाही येथिल विश्राम गृह येथे आयोजित सभेत दिले.
    आयोजित आढावा सभेस सिंदेवाही तहसीलदार पानमंद, गटविकास अधिकारी सुकरे,वैद्यकीय अधिकारी झाडे,  पोलिस निरीक्षक तुषार चव्हान,काँग्रेस तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे, काँग्रेस शहराध्यक्ष सुनिल उट्टलवार ,नगराध्यक्ष स्वप्नील कावळे,विरेंद्र जयस्वाल,राहुल पोरेडीवार,महीला आघाडी अध्यक्ष सिमा सहारे, सरपंच राहूल बोडणे,नगर पंचायत पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते,तथा सर्व विभागाचे अधिकारी व सरपंच तसेच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
    Vijay Wadettiwar यावेळी पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणंद रस्ते योजना, घरकुल योजना, अंगणवाडी व शालेय वर्ग खोल्या बांधकाम, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्राम पंचायत भवन इमारत बांधकाम, पाणी पुरवठा अंतर्गत जल जीवन योजना, तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती, जिल्हा परिषद सिंचाई विभागाची विकास कामे, वनविभाग , जलसंधारण विभाग, आरोग्य विभाग,भूमी अभिलेख विभागा अंतर्गत सावली शहरातील मोजणी, महसूल विभाग,तालुका क्रीडा संकुल, नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत सुरु असलेली विकास कामे, , कंत्राटदारांनी केलेल्या चुका,  झालेले शेतकर्यांचे नुकसान तथा अन्य योजनांचा विस्तृत आढावा  विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रं आमदार विजय वडेट्टीवार यांनी घेतला.
    नुकतीच आटोपलेल्या लोकसभा निवडणुक कार्य्रमाअंतर्गत लागू असलेली आचारसंहीता यामुळे विकास कामे ठप्प पडली होती. तर येणारा हंगाम हा पावसाळी हंगाम असुन यातुन सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी, सामान्य नागरिक यांना भेडसावणाऱ्या समस्या प्राधान्य क्रमाने सोडवीण्यात याव्या. तसेच विकास कामांचा दर्जा उत्तम ठेवून कामे तातडीने पुर्ण करावे.
    Vijay Wadettiwar तसेच विकास कामांत हयगय व दुर्लक्ष्य करणाऱ्या अधिकारी असो अथवा कंत्राटदार यांची गय केल्या जाणार नाही अशी तंबी देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. याप्रसंगी प्रामुख्याने संबंधित विभागाचे सर्व अधिकारि, नगर पंचायत पदाधिकारी, नगरसेवक , सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • letter to Prime Minister Modi : चंद्रपुरातील कामगार म्हणतात मोदीजी आम्हाला न्याय द्या

    letter to Prime Minister Modi : चंद्रपुरातील कामगार म्हणतात मोदीजी आम्हाला न्याय द्या

    letter to Prime Minister Modi CMPL माती उत्खनन या कंपनीतील कार्यरत स्थानिक कामगारांना कंपनीचे काम संपल्याचे सर्व कामगारांना पत्र पाठवून कामावरून डावलण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे. कारण सदर कंपनीचे दुसरे काम हे राजुरा विधानसभा क्षेत्र सास्ती इथे सुरु आहे.

    अवश्य वाचा : महाराष्ट्रात एक राज्य एक गणवेश योजना लागू

    कंपनीने स्थानिक कामगारांना कामावरून कमी केल्यास त्यांच्यावर तसेच त्याच्या परिवारावर उपासमारीची वेळ येणार. स्थानिक कामगारांना कामावरून न काढता सास्ती येथे स्थलांतर करण्यात यावे.

     

    letter to Prime Minister Modi याकरिता अनैशा वाहन चालक कामगार संघटना चे संस्थापक अध्यक्ष सुरज भाऊ उपरे तसेच सामजिक कार्यकर्ते भूषणभाऊ फुसे यांच्या नेतृत्वात राजुरा तहसील कार्यालयासमोर दिनांक 10 जून 2024 रोज सोमवार ला बहुजनांच्या महापुरुषांना अभिवादन करून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आले.

    महत्त्वाचे : नोकरीच्या शोधात आहात तर ही बातमी तुमच्यासाठी

    letter to Prime Minister Modi बेमुदत धरणे आंदोलनात आंदोलनकर्ते आकाश ताकसांडे, ऋषी चौधरी, अजय इग्रपवार, साई कुमार मोगलीवार, राकेश चेनमेंवार, श्रीकांत जलावार, पांडुरंग मंगाम, आशिष पझारे,या वेळेस माणिक संजीव, दशरथ कोंडावार, मिथुन कांबळे,राहुल राठोड,विशाल सल्लम, संकेत भादिकर,शंकर काळे,प्रवीण जेल्लेल, प्रवीण चेनवेंनवार,उपस्थित होते.

    आंदोलनाचा दुसरा दिवस

    आज दिनांक 11 जून 2024 रोजी आमच्या न्याय हक्कासाठी व शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलनकर्त्यानी स्वतःच्या रक्ताने देशाचे पंतप्रधान मा. मोदीजींना पत्र लिहिले आहे.पत्राचा मजकुर “मा.मोदीजी आम्हाला न्याय द्या” असा आहे.

  • Central Armed Police Force Eligibility : 12 वी पास उमेदवारांसाठी शासकीय नोकरीची सुवर्णसंधी

    Central Armed Police Force Eligibility : 12 वी पास उमेदवारांसाठी शासकीय नोकरीची सुवर्णसंधी

    Central Armed Police Force Eligibility नुकतेच 12 वी चे निकाल जाहीर झाले होते, काहींनी पुढील शिक्षणासाठी अभ्यासक्रम निवडत आहे तर काही नोकरीच्या शोधात आहे, ज्यांना केंद्र सरकार च्या पोलीस दलात नोकरी हवी त्यांच्यासाठी ही माहिती महत्वाची आहे.

    महत्त्वाचे : 15 जूनपासून राज्यात एक राज्य एक गणवेश लागू

    Central Armed Police Force Eligibility केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 1526 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे.

    अवश्य वाचा : बँकिंग क्षेत्रात नोकरी हवी, तर आताच अर्ज करा

    संस्था – केंद्रीय सशस्त्र पोलीस दल

     

    भरले जाणारे पद

    1. सहायक उपनिरीक्षक
    2. हेड कॉन्स्टेबल

     

    पद संख्या 1526 पदे

     

    अर्ज करण्याची पद्धत

    ऑनलाईन

     

    अर्जची शेवटची तारीख

    08 जुलै 2024

     

    पद व पद संख्या

    सहायक उपनिरीक्षक- 243 पदे

    हेड कॉन्स्टेबल – 1283 पदे

     

    आवश्यक शैक्षणिक पात्रता*

    HC (Ministerial) 1283

    12th Pass + टायपिंग

     

    ASI (Steno) 243

    12th Pass + स्टेनो

     

    असा करा अर्ज

    1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
    2. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
    3. अर्जा सोबत सर्व आवश्यक माहिती देणं गरजेचं आहे.
    4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे.

     

    अधिकृत वेबसाईट

    https://rectt.bsf.gov.in/