Blog

  • One State One Uniform maharashtra : एक राज्य एक गणवेश योजना महाराष्ट्रात लागू

    One State One Uniform maharashtra : एक राज्य एक गणवेश योजना महाराष्ट्रात लागू

    One State One Uniform maharashtra शाळेला लागलेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सध्या संपत आल्याअसून काही दिवसात राज्यातील शाळा नियमितपणे सुरू होणार आहे, त्यासाठी सरकारने आता एक राज्य एक गणवेशाबाबत सूचना जारी केली आहे.

     

    One State One Uniform maharashtra केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येत आहे. त्यासाठी सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करुन एकसमान एक रंगाचे दोन गणवेश (One State One Uniform) उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. एकसमान एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरुन उपलब्ध करुन देण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात सुरू झाला अम्मा की पढाई उपक्रम

    ▪️इ.1 ली ते इ.4 थी मुली नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवारआकाशी रंगाच्या बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक

     

    ▪️स्काऊट व गाईड गणवेश मंगळवार, गुरूवार व शनिवार गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक

     

    ▪️इयत्ता 5 वी मुली नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवार आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट

     

    ▪️स्काऊट व गाईड गणवेश  -मंगळवार, गुरूवार व शनिवार गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक

     

    ▪️इ.6 वी ते इ.8.वी मुली आणि इ.1 ली ते इ.8 वी मुली (ऊर्दू माध्यम) नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवारआकाशी निळ्या रंगाची कमीज, निळ्या गडद रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी

     

    ▪️स्काऊट व गाईड गणवेश -मंगळवार, गुरूवार व शनिवार गडद आकाश निळ्या रंगाची कमीज, गडद निळ्या रंगाची सलवार, गडद निळ्या रंगाची ओढणी

     

    ▪️इ.1 ली ते इ.7 वी मुले- नियमित गणवेश – सोमवार, बुधवार व शुक्रवार आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळया रंगाची हाफ पॅन्ट*

     

    ▪️स्काऊट व गाईड  -मंगळवार, गुरूवार व शनिवार स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट

     

    ▪️इ.8 वी मुले नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवार आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळया रंगाची फुल पॅन्ट

     

    ▪️स्काऊट व गाईड -मंगळवार, गुरूवार व शनिवार स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पैट

    महत्त्वाचे : चंद्रपुरात स्मार्ट वीज मीटर विरोधात आपचे आंदोलन

    One State One Uniform maharashtra शासन निर्णयात नमूद केल्यानुसार विद्यार्थ्यांनी सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश धारण करणे आवश्यक राहील. तसेच स्काऊट व गाईड या विषयाचा गणवेश मंगळवार, गुरूवार व शनिवार या तीन दिवशी विद्यार्थ्यांनी सदर गणवेश परिधान करावा. स्काऊट व गाईड विषयाचा गणवेश असलेल्या दिवशी (मंगळवार, गुरुवार, शनिवार) स्काऊट व गाईड विषयाच्या तासिका ठेवण्यात येणार आहेत.

     

    One State One Uniform maharashtra मोफत गणवेश योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे. राज्यातील शाळा 15 जून, 2024 पासून सुरू होत आहेत. महिला बचत गटामार्फत सद्यस्थितीत नियमित गणवेशाची शिलाई सुरू आहे. योजनेंतर्गत पात्र विद्यार्थी संख्या लक्षात घेता दुसऱ्या (स्काऊट गाईड) गणवेशाचे कापड शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात येत आहे.

    अवश्य वाचा : शहरातील जीर्ण इमारतीवर चालला चंद्रपूर मनपाचा बुलडोझर

    सदर स्काऊट गाईडच्या गणवेश शिलाईसाठी 100 प्रति गणवेश व अनुषांगिक खर्च 10 असे एका गणवेशासाठी एकूण 110 प्रति विद्यार्थी इतकी रक्कम  संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी वर्ग करावी, अशा सूचना देण्यात आले आहेत.

  • Dilapidated building chandrapur : शहरातील जीर्ण इमारतीवर चंद्रपूर मनपाचा बुलडोझर

    Dilapidated building chandrapur : शहरातील जीर्ण इमारतीवर चंद्रपूर मनपाचा बुलडोझर

    Dilapidated building chandrapur महापालिका क्षेत्रातील शिकस्त इमारतींपासून परिसरातील रहिवाशांच्या जीविताला निर्माण होऊ शकणारा धोका पाहता चंद्रपूर महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरवात केली असुन मागील दोन दिवसात दोन जीर्ण इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.

    महत्त्वाचे : 32 लाखांची टाटा ची गाडी घेतल्यावर ग्राहकांची फसवणूक

    पावसाळ्यात दरवर्षी महापालिका क्षेत्रातील जीर्ण व शिकस्त इमारती खाली करण्याची सूचना प्रशासनाकडून नोटीसद्वारे दिली जाते; मात्र मालमत्ताधारक जिवाची पर्वा न करता त्याच इमारतीत तळ ठोकून राहतात. यामुळे परिसरातील रहिवाशांच्या जिवालासुद्धा धोका निर्माण होतो. जीर्ण इमारतींचे पुन्हा एकदा वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून जीर्ण इमारती तातडीने जमीनदोस्त करण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

    Dilapidated building chandrapur  सर्व्हे पूर्ण झालेल्या सर्व जीर्ण इमारतींना नोटीस देण्यात आली असुन नोटीस प्राप्त होऊनही जे धारक अश्या जीर्ण घरात राहत आहे त्यांच्यावर मनपाद्वारे कारवाई केली जात आहे. त्यानुसार झोन क्र.२ अंतर्गत भिवापूर प्रभाग पठाणपूरा गेट जवळ मिलिंद नगर येथील चिवंडे यांची जीर्ण इमारत तसेच एकोरी प्रभाग मानवटकर हॉस्पीटल जवळील खोब्रागडे यांची जीर्ण इमारत अश्या दोन इमारती दोन दिवसात निष्कासीत करण्यात आल्या आहेत.

    अवश्य वाचा : 12 जून रोजी चंद्रपूर जिल्ह्यात आप चे आंदोलन, स्मार्ट वीज मीटर ला विरोध

    उपायुक्त रवींद्र भेलावे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभाग व नगर रचना विभागाने ही कारवाई पार पाडली.

  • Smart Electric Prepaid Meters : स्मार्ट वीज मीटरला करा हद्दपार, आपचे जिल्हाभर आंदोलन

    Smart Electric Prepaid Meters : स्मार्ट वीज मीटरला करा हद्दपार, आपचे जिल्हाभर आंदोलन

    Smart Electric Prepaid Meters आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा यांच्या वतीने, विद्युत स्मार्ट मीटर लावण्यास विरोध करण्यासाठी बुधवार दि. 12 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील महावितरणच्या तालुका स्तरावरील कार्यालयात तसेच जिल्हा स्तरावरील बाबूपेठ येथील मुख्य कार्यालयात आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. हे आंदोलन जिल्हा व तालुका स्तरावरील आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येईल.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात स्मार्ट वीज मीटर ला विरोध

    आम आदमी पार्टीच्या म्हणण्यानुसार, स्मार्ट मीटरची किंमत वाजवी नसून त्यामुळे सर्वसामान्य जनतेवर अनावश्यक आर्थिक बोजा पडणार आहे. प्री-पेड मीटरमुळे वीज रिचार्ज संपल्यास ताबडतोब वीज पुरवठा खंडित होईल. यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागेल.

    महत्त्वाचे : टाटा कंपनीची xuv कार चा टॉप मॉडेल, 32 लाखांची गाडी घेतल्यावर ग्राहक म्हणाला माझी फसवणूक झाली

    Smart Electric Prepaid Meters यासोबतच अनेक उद्योग गटांना अनावश्यक फायदा मिळणार आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरची सक्ती विरोधात हे आंदोलन केले जात आहे.
    आंदोलनाचे स्वरूप शांततामय असेल. परंतु आवश्यकता भासल्यास आंदोलनाचे स्वरूप बदलण्याचा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकाने गाणं म्हणत युवकाला केली बेदम मारहाण

    जिल्हावासीयांनी उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहून या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आम आदमी पार्टीच्या जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यानी केले आहे.

    Janta college

  • Young chanda brigade : चंद्रपुरातील 100 विद्यार्थ्यांना मिळणार निःशुल्क शिक्षण

    Young chanda brigade : चंद्रपुरातील 100 विद्यार्थ्यांना मिळणार निःशुल्क शिक्षण

    Young chanda brigade परिस्थितीमुळे शिक्षण सुटण्याच्या दु:खाची मला जाणीव आहे. चंद्रपूरात अभ्यासु विद्यार्थी आहे. शिक्षणाची आवड येथील विद्यार्थ्यांना आहे. मात्र गरिब परिस्थिमुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे आपण पूढच्या वर्षी पासून अम्मा कि पढाई हा उपक्रम सुरु करणार आहोत. या उपक्रमा अंतर्गत परिस्थितीमुळे पुढील शिक्षणात अडचणी येत असणा-या टॉपर 100 विद्यार्थ्यांना आपण नि:शुल्क शिक्षण देणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    महत्वाची बातमी : 32 लाखांची टाटा टॉप मॉडेल कार, ग्राहक म्हणतो फसवणूक झाली

    Young chanda brigade    रविवारी प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात यंग चांदा ब्रिगेडच्या शिक्षण आघाडीच्या वतीने गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापिठाचे माजी कुलगुरु किर्तिवर्धन दिक्षीत, वाहतूक निरीक्षक शिवाजी विभूते, माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, आदिवासी विभाग जिल्हा प्रमुख जितेश कुळमेथे, अल्पसंख्याक विभाग युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, शहर संघटक विश्वजीत शहा,  सायली येरणे, शाहीन शेख, विमल कातकर, तालुका उपाध्यक्ष दयानंद नगरकर,  प्रा. श्याम हेडाऊ, आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

     

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रात भरीव काम करण्याचा संकल्प आपण केला आहे. गरिबाचा मुलगा शिकला पाहिजे. तो मोठा अधिकारी झाला पाहिजे. मात्र आजची शिक्षण व्यवस्था सर्वसामान्यांना परवडणारी नाही. याची कल्पना आम्हाला आहे. त्यामुळे गरिब गरजु विद्यार्थ्यांसाठी आपण मतदार संघात 11 मोठ्या अभ्यासिका तयार करत आहोत. येथे त्यांना सर्व सोयी सुविधा पूरविल्या जातील. त्यांना येथे नि:शुल्क अभ्यास करता येणार असे ते यावेळी म्हणाले. यातील आठ अभ्यासिकांचे काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच या लोकार्पित होतील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

    महत्त्वाचे: पोलीस ठाण्यात युवकाला अमानुष मारहाण

    Young chanda brigade   तुमचे यश केवळ तुमच्या कष्टाचे फळ नाही तर तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे आणि तुमच्या पालकांच्या सततच्या प्रोत्साहनाचा परिणाम आहे. तुम्ही कठोर परिश्रम केलेत, आपल्या ध्येयावर अढळ राहिलात आणि प्रत्येक आव्हानाला तोंड दिले. त्यामुळेच तुम्हाला आज इथे उभे राहून सन्मानित करण्यात येत आहे. शिक्षकांच्या आपल्या अमूल्य मार्गदर्शनाशिवाय हे शक्य झाले नसते. विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवणे, त्यांना ज्ञानाची गोडी लावणे आणि त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे, या सर्व बाबतीत शिक्षकांनी आपले कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडले आहे. पालकही या यशाचे खरे हकदार आहेत. तुमच्या सततच्या पाठिंब्याने आणि प्रोत्साहनानेच विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त झाले आहे. त्यांच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही त्यांना सावरण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी सदैव तत्पर राहिलात.

     

    आजचा हा सन्मान विद्यार्थांसाठी एक नवीन सुरुवात आहे. तुम्ही इथेच थांबू नका, तर आपल्या ध्येयांचा पाठलाग करत राहा. सतत नवीन ज्ञान मिळवा, नवीन गोष्टी शिका आणि समाजासाठी आदर्श बनण्याचा प्रयत्न करा ,आजच्या या सोहळ्यातून  नवीन उमेद, नवीन उर्जा आणि नवीन प्रेरणा घेऊन जा आपल्या मेहनतीने, कर्तृत्वाने आणि समर्पणाने नवीन उंची गाठा असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात स्मार्ट प्रीपेड वीज मीटर ला विरोध

    Young chanda brigade या कार्यक्रमात जवळपाच 700 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार, सतनाम सिंह मिरधा, चंद्रशेखर देशमूख, जय मिश्रा, आशा देशमूख, कल्पना शिंदे, कार्तिक बोरेवार, रुपेश पांडे, कैलास धायगुडे, पुण्यवर्धन मेश्राम, वंदना हजारे, माला पेंदाम, माधुरी निवलकर, अस्मिता डोनारकर, कविता निखारे, शमा काजी, चंदा इटनकर, मंजुषा दरवरे, वंदना हजारे, राम जंगम आदींनी परिश्रम घेतले. प्रा. श्याम हेडाऊ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सरोज चांदेकर यांनी सुत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली.

  • OBC convention chandrapur : ऑगस्ट महिन्यात चंद्रपुरात होणार ओबीसी महाअधिवेशन

    OBC convention chandrapur : ऑगस्ट महिन्यात चंद्रपुरात होणार ओबीसी महाअधिवेशन

    OBC convention chandrapur मुल – मागील वर्षी चंद्रपूर येथे झालेल्या तीन दिवसीय बहुजन समता पर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो ओबीसी बांधव एकत्र आले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांवर दबाव निर्माण झाला असून याचा फायदा भविष्यात पुढच्या पिढीला नक्की होईल. याच उदात्त हेतूने भारतीय ओबीसी महाधिवेशन ऑगस्ट २०२४ मध्ये चंद्रपूर येथे होणार असून त्याची प्राथमिक तालुका स्तरीय पूर्वतयारी बैठक दिनांक ९जून २०२४ रोज रविवारला सायंकाळी ५ वाजता पत्रकार भवन मुल येथे आयोजित करण्यात आली.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात स्मार्ट वीज मीटर ला विरोध

    OBC convention chandrapur सभेच्या अध्यक्षस्थानी माजी जी.प. सदस्य प्रा. रामभाऊ महाडोरे, मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध सर्जन व अध्यक्ष बहुजन समता पर्व व ओबीसी आंदोलन जिल्हा समन्वयक डॉ. संजय घाटे, डॉ. दिलीप कांबळे मुख्य संयोजक बहुजन समता पर्व जिल्हा चंद्रपूर, ओबीसी नेते श्री.नळे साहेब,बहुजन चळवळीचे नकले,  माजी प्राचार्य नत्थु पाटील आरेकर, बाजार समिती संचालक किशोर घडसे, माजी सभापती वैशाली पुल्लावार, राजू पाटील मारकवार, गजानन नागापुरे,आदी मान्यवर उपस्थित होते.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात युवकाला अमानुषपणे मारहाण

    याप्रसंगी जिल्हा समन्वयक डॉ.संजय घाटे यांनी अधिवेश आयोजना मागची भूमिका सविस्तर पने विशद केली. तर मुख्य संयोजक डॉ.दिलीप कांबळे यांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना बाबत राजकीय पक्षांवर दबाव निर्माण करणे, ओबीचींचे आरक्षण,न्याय,हक्क, रोजगार, शेती विषयक कायदे यावर विस्तृतपणे मुद्देनिहाय माहिती पटऊन सांगितले. झालेल्या चर्चेत गजानन नागापुरे,राजू पाटील मारकवार, डॉ.पद्माकर लेंनगुरे, संजय पडोळे, कैलास चलाख, प्रा.विजय लोनबले, आदींनी वेगवेगळ्या मुद्यावर चर्चा केली. बैठकीचे अध्यक्ष प्रा.रामभाऊ महाडोरे यांनी जिल्हास्तरीय महाअधिवेशनाला मुल तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल याची ग्वाही दिली.

     

    OBC convention chandrapur बैठकीला सल्लागार. प्रा.गजानन नागापूरे, माजी प्राचार्य बंडू गुरनुले, निमछंद शेरकी, प्रा सिकंदर लेंनगुरे, गंगाधर कुंनघाडकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, लक्ष्मण खोब्रागडे, अशोक पुल्लावार, बल्लमवार सर, युवा आघाडी प्रमुख रोहित नीकूरे, भाजपा युवा मोर्चाचे राकेश ठाकरे, शिवसेना प्रमुख प्रशांत गट्टूवार, संदीप मोरे, कांग्रेस शहर अध्यक्ष, सुनील शेरकी, जितेंद्र लेंनगुरे, संदीप मोहबे, चौधरी सर,प्रशांत भरतकर, वाडगुरे सर, रामदास गुरनुले,राजू सूत्रपवार, शुभम लेनगुरे, बालगोविंद आदे, ईश्वर लोनबले, रुमदेव गोहने ,गुलाब शेंडे,वामन टिकले,संदीप वाढई, यांचेसह सर्व पक्षीय,सर्व जातीय ओबीसी बांधव उपस्थित होते. बैठकीचे संचालन ओबीसी राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी यांनी केले.प्रास्ताविक माळी महासंघाचे महासचिव गुरु गुरनुले यांनी केले.

    अवश्य वाचा : 32 लाखाच्या गाडीत निघाला डिफेक्ट, चंद्रपुरातील प्रकार

    आभार प्रदर्शन मुख्याध्यापक गंगाधर कुनघाडकर यांनी मानले.तालुका कार्यकारणी तालुका अध्यक्ष प्रा.रामभाऊ महाडोरे, उपाध्यक्ष नत्थु पाटील आरेकर, राजू पाटील मारकवार, किशोर घडसे, सचिव संजय पडोळे, सहसचिव गुरु गुरनुले, जितेंद्र बल्की, संघटक डॉ.पद्माकर लेंनगुरे, प्रशांत भरतकर, नितीन गुरनुले, ओंमदेव मोहरले यांचेसह अनेक ओबीसी बांधवांना कार्यकारिणी मद्ये सहभागी करून घेणार आहे. उपस्थित अनुभवी व ज्येष्ठ मंडळींना सल्लागार आणि उर्वरित कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य म्हणून सर्व मिळून सहकार्य करतील असे ठरविण्यात आले.

  • smart electricity meter : चंद्रपुरात स्मार्ट मिटरला विरोध

    smart electricity meter : चंद्रपुरात स्मार्ट मिटरला विरोध

    smart electricity meter चंद्रपूर : – चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात वीज ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असून ही प्रक्रिया रद्द करण्यात यावी त्या विरोधात मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांना निवेदन देताना महेश मेंढे म्हणाले की आमच्या योजनेला विरोध असून सदर कारवाई तात्काळ थांबावी असे ते म्हणाले.

    अवश्य वाचा : पोलीस ठाण्यात युवकाला अमानुषपणे मारहाण, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकार

    निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात वीज ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सर्व्हे करण्यात येत आहे. वास्तविक वीज मीटर निवडी बाबत वीज कायदा 2003 कलम 55 नुसार ग्राहकांना स्वातंत्र आहे . मात्र वीज वितरण कंपनी कडून स्मार्ट वीज मीटर लावण्यासाठी ग्राहकांच्या घरोघरी सर्व्हे करण्यात येत असून स्मार्ट मीटर लावणे एकप्रकारे बंधनकारक असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे . ग्राहकांना वेठीस धरण्याच्या महावितरणच्या या धोरणाला आम्ही विरोध दर्शवित आहोत.

     

    smart electricity meter संपूर्ण देशभरात प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय नुकत्याच काही महिन्यांपूर्वी शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात याबाबतचा सर्वे सुरु आहे. मात्र स्मार्ट मिटरला जिल्ह्यातील वीज ग्राहकांमधून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. विशेष म्हणजे प्रीपेड स्मार्ट मीटर जिल्हा वासियांसाठी तापदायक ठरणार आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपुरात एकाने 32 लाखांचे वाहन घेतले मात्र त्यामध्ये निघाला डिफेक्ट

    देशभरात प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय नुकत्याच काही महिन्यांपूर्वी शासनाने घेतला आहे. स्मार्ट मीटरची सुरुवात मेट्रो सिटीपासून करण्याचा शासनाचा मानस आहे. प्रीपेड मीटरच्या बाबतीत गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वे सुरु करण्यात आला आहे. सर्वेदरम्यान जिल्ह्यातील ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला आहे. विशेष म्हणजे स्मार्ट मीटरच्या संकल्पनेला राज्यातील वीज संघटनेचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे.

     

    smart electricity meter चंद्रपूर जिल्ह्यात बहुतांश वर्ग हा ग्रामीण भागात असून आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे.त्यामुळे प्रीपेड मिटर लावल्यास आधी पैसे भरून वीजवापरण्याची क्षमता ग्राहकांमध्ये नाही. तसेच ऐनवेळी रिचार्ज संपल्यास तोही वेळेतच करण्याची आर्थिक परिस्थिती नाही अशी वास्तविकता जिल्ह्यातील वीज ग्राहकांची आहे, नव्हेतर ती सर्वश्रुत आहे. अन्न, वस्त्र, निवारा व वीज मानवी जीवनातील या चार मूलभूत गरजा असल्याचे पंतप्रधान भाष्य करतात. तसेच यासंदर्भात सरकार नेहमीच सकारात्मक असल्याचं बोलतात. याच मूलभूत गरजांच्या बाबतीत शासनाकडून अन्यायाचा पावित्रा का असाअनुत्तरितप्रश्न निर्माण झाला आहे.

    स्मार्ट वीज मीटर चा ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. यामध्ये बदल न केल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन आगामी दिवसात करण्यात येईल असे महेश मेंढे म्हणाले.

     

    या संदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. चर्चा सकारात्मक झाली असून यावेळी काँग्रेसचे नेते महेश मेंढे यांच्यासह रोशन रामटेके, पियुष तुपे, अविनाश मेश्राम , वैभव अमृतकर यांची उपस्थिती होती.

  • NEET exam paper leak 2024 : नीट परीक्षा घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा – NSUI ची मागणी

    NEET exam paper leak 2024 : नीट परीक्षा घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा – NSUI ची मागणी

    NEET exam paper leak 2024 NEET परीक्षेत मोठ्या प्रमाणात झालेल्या हेराफेरीच्या विरोधात युवा नेते रोशन दादा बिट्टू यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसयूआय जिलाध्यक्ष शफ़क शेख़ यांच्या नेत्तृत्वात सदर परीक्षा रद्द करून परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी 10 जून रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदनामार्फत करण्यात आली.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार यांनी युवकाला केली बेदम मारहाण

    यावेळी शफक शेख म्हणाले की NEET चा निकाल आला आहे, देशात काही विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, त्यांनी NTA एजन्सीवर बंदी घालण्याबद्दल बोलत आहे आणि NEET परीक्षेच्या या घोटाळ्यामागे मोदी सरकारचाही हात असल्याचे सांगितले. सीबीआय तपासाबाबत बोलताना चंद्रपूर जिल्हा एनएसयूआयने Neet परीक्षा पुन्हा घेण्यात यावी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. दोषींना शिक्षा न झाल्यास पुढे मोठे जनआंदोलन करण्याचे संकेत चंद्रपूर एनएसयूआयने दिले आहेत.

     

    घोळ काय?

    67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले, हरियाणा मधील परीक्षा केंद्रावर 8 विद्यार्थ्यांना 718 गुण, तर 6 विद्यार्थ्यांना 720 गुण प्राप्त झाले, 10 दिवसा आधी निकाल जाहीर करण्यात आला.

    अवश्य वाचा : 32 लाखांची टाटा ची xuv घेतली ग्राहक म्हणतो माझी फसवणूक झाली, चंद्रपुरातील प्रकार

    NEET exam paper leak 2024 यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य प्रवीण भाऊ पडवेकर, एनएसयूआयचे जिल्हा उपाध्यक्ष दानिश शेख, मनीष दास, साहिल दहिवले, विनीत डोंगरे, अभिनय बागडे, सारिका वाकुडकर, आशिष बावणे, स्मिथ फुलझाले, प्रथम आसवले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

  • Chandrapur police officers : कोरपना पोलीस स्टेशनमध्ये युवकाला अमानुष मारहाण

    Chandrapur police officers : कोरपना पोलीस स्टेशनमध्ये युवकाला अमानुष मारहाण

    Chandrapur police officers सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य, मात्र चंद्रपुरात याबाबत सर्व काही उलट चित्र आहे, चंद्रपूर पोलीस दलात अनेक पोलीस अधिकारी चांगले काम करीत असताना एक अधिकारी मात्र पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहे.

    अवश्य वाचा | 32 लाखांची गाडी घेतली आणि झाली फसवणूक, चंद्रपुरातील प्रकार

    चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांनी असा प्रताप केला की ते फक्त आपण चित्रपटात बघितलं आहे, एकाडे यांच्यावर याआधी सुद्धा अनेकांनी आरोप केले आहे मात्र त्यांच्यावर कुणाचं अभय आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

     

    Chandrapur police officers एका युवकाला ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षक संदीप एकाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना 8 जून रोजी कोरपना पोलीस ठाण्यात घडली आहे.

    महत्त्वाचे : बँकेत 9 हजार पदांची मेगाभरती

    7 जून रोजी कोरपना पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस निरीक्षक एकाडे, एक वाहतूक पोलीस, शिपाई व महिला पोलीस कर्मचाऱ्याला सोबत घेत तांडा क्रमांक 1 मध्ये पोहचले. त्यावेळी 28 वर्षीय विपुल मुनावत ला त्याचे काका रमेश मुनावत यांचे घर कुठे आहे असे विचारले, त्यावेळी रमेश मुनावत यांच्या घरी त्यांची मुलगी होती, विपुल यांनी ठाणेदार एकाडे यांना सांगितले की घरी कुणी नाही आहे, मात्र त्यांनी विपुल ला तू शासकीय कामात अडथळा आणू नको म्हणत धमकावले, पोलिसांनी तपासणी केली मात्र त्यांना काही आढळले नाही.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात 5 हजार वृक्षांचे होणार वृक्षारोपण

    त्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा विपुल यांच्या घराच्या दिशेला वळविला मात्र तिथेही पोलिसांना काही आढळले नाही, पोलिसांना संशय होता की रमेश व विपुल हे घरी अवैध दारू ची विक्री करतात, याआधी विपुल वर अवैध दारू विक्रीचा गुन्हा नोंद आहे.

     

    पोलीस निरीक्षक एकाडे यांनी विपुल ला म्हणाले की तुझ्यावर मागील प्रकरणी गुन्हा दाखल आहे उद्या ठाण्यात ये असे म्हणत पोलीस तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी 8 जून ला विपुल कोरपना पोलीस ठाण्यात गेला असता ठाणेदार एकाडे यांनी तू शासकीय कामात अडथळा का आणला असे विचारत त्याला बेदम मारहाण सुरू केली, एकाडे इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी बाजीराव पट्ट्याने विपुल च्या पाठीवर मारणे सुरू केले.

    ही अमानुष मारहाण सुरू असतेवेळी संदीप एकाडे हे कांटा लगा हे गाणे गात होते, विपुल त्यांना हात जोडून विनवणी करीत होता मात्र एकाडे हे अमानुष पणे त्याला मारहाण करीत राहिले.

    विपुल ने ठाण्यात जाण्याअगोदर मोबाईल मध्ये व्हॉइस रेकॉर्डिंग सुरू केली होती, ती रेकॉर्डिंग सध्या चंद्रपूर जिल्ह्यात चांगलीच व्हायरल झाली आहे.

     

    Chandrapur police officers अश्लील शिवीगाळी करीत विपुल च्या हाता-पायावर सूज येईपर्यंत त्याला एकाडे यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर जर तू दवाखान्यात गेला तर तुला पुन्हा मारणार अशी धमकी विपुल ला दिली, विपुल घरी गेला मात्र गावकऱ्यांनी त्याला दवाखान्यात नेत त्याचे मेडिकल केले, त्याच्या हातावर, पाठ व पायावर मोठ्या प्रमाणात अमानुष मारहाणीची सूज होती.

     

    याबाबत ठाणेदार संदीप एकाडे यांच्याशी या मारहाणीबाबत संपर्क केला असता ते म्हणाले की असं काही घडलं नाही, मी फक्त सुचनापत्र देण्यासाठी विपुल ला ठाण्यात बोलाविले होते, त्याला कुणी मारहाण केली नाही.

     

    Chandrapur police officers पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना सदर घटनेबाबत माहिती मागितली असता ते म्हणाले की आज तक्रारदार मला भेटणार आहे, मी त्यांना भेटण्यासाठी बोलाविले आहे, घटनेत सत्यता असेल तर कारवाई नक्की होणार.

  • tata harrier top model black colour : चंद्रपुरात घडला असा प्रकार की ग्राहकाने टाटा ची गाडी लावली शोरूम बाहेर

    tata harrier top model black colour : चंद्रपुरात घडला असा प्रकार की ग्राहकाने टाटा ची गाडी लावली शोरूम बाहेर

    tata harrier top model black colour चंद्रपुरात 32 लाखांची गाडी घेतल्यावर एका ग्राहकांची फसवणूक झाली मात्र त्यानंतर ग्राहकाने कुणाचीही फसवणूक होऊ नये यासाठी अनोखी अशी शक्कल लढवली आहे.

    अवश्य वाचा : महिलांनी उचलली 5 हजार वृक्षारोपणाची जबाबदारी

    चंद्रपुरातील सुनिल आहुजा यांनी मार्च महिन्यात टाटा कंपनीची हॅरिअर xuv वाहन तब्बल 32 लाख रुपयात खरेदी केले, त्यानंतर वाहनाच्या पेंट ला नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी वाहनाचे टेपलॉन करण्याचे ठरविले, हे काम करीत असताना वाहनाच्या डाव्या बाजूला असलेल्या दाराला रिपेंट करण्यात आल्याचे समजले, त्यानंतर आहुजा यांनी टाटा कंपनीच्या जायका मोटर्स शोरूम ला भेट दिली, याबाबत त्यांना तक्रार सुद्धा केली मात्र त्याचे निराकरण झाले नाही.

     

    आहुजा यांनी मागील महिन्याभरापासून टाटा कंपनी व जायका मोटर्स च्या मागे चपला झिजविण्याचे काम केले तरीसुद्धा काही उपयोग झाला नाही.

    महत्त्वाचे : बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, मेगाभरती

    tata harrier top model black colour त्यानंतर 8 जून ला आहुजा यांनी थेट जायका मोटर्स शोरूम बाहेर आपले वाहन उभे ठेवत त्यावर टाटा कंपनीची गाडी कुणीही घेऊ नका, हे फसवणूक करतात अश्या आशयाचे बॅनर लावले.

    आहुजा यांनी म्हटले की जर माझ्या समस्येचे निराकरण झाले नाही तोपर्यंत मी आपले वाहन इथेच उभे ठेवणार, त्यानंतर ग्राहक मंचात याबाबत दाद मागणार.

    tata harrier top model black colour याबाबत जायका मोटर्स चे मिलिंद कवाडे यांच्याशी याबाबत चर्चा केली असता ते म्हणाले की आम्ही आहुजा यांच्या तक्रारीची दखल घेतली असून लवकर त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.

  • Tree plantation programme : चंद्रपूर शहरात होणार 5 हजार वृक्षारोपण

    Tree plantation programme : चंद्रपूर शहरात होणार 5 हजार वृक्षारोपण

    देशात यंदा तापमानाने हाहाकार माजविला होता, देशातील अनेक भागात तापमानाने उच्चांक गाठला ज्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागल्या, याच एकमेव कारण म्हणजे हवामानात होणारा बदल आणि मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड.

    अवश्य वाचा : बँकिंग क्षेत्रात काम करण्याची सुवर्णसंधी, निघाली मेगाभरती

    देशासहित विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा यंदा तापमानाने उच्चांक गाठला होता, आता प्रत्येक नागरिकांनी वृक्षारोपण करावे असा संदेश शहरातील उत्कृष्ट महिला मंचाने दिला आहे. यासाठी स्वतः आधी महिला मंच पुढाकार घेत आहे.

    अवश्य वाचा : जिल्हाधिकारी गौडा यांची राज्यसमितीवर निवड

    चंद्रपूर शहरात यंदा 5 हजार वृक्षारोपणाचा निर्धार उत्कृष्ट महिला मंचाने केला आहे, यासाठी तयारी सुद्धा सुरू करण्यात आली असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

    Chandrapur city
    छबु वैरागडे मनपा आयुक्त पालिवाल यांच्याशी चर्चा करताना

    उत्कृष्ट महिला मंचाच्या अध्यक्षा छबु वैरागडे यांनी याबाबत माहिती दिली की उन्हाळ्यात नागरिकांचे काय हाल होतात हे संपूर्ण देशाने यंदा बघितलं आहे, जर हे वातावरण आपल्याला बदलायचे असेल तर त्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करायला हवी, आम्ही या मोहिमेद्वारे शहरात 5 हजार झाडांचे वृक्षारोपण करणार आहोत, विशेष बाब म्हणजे वृक्षारोपण केल्यावर त्याचे संगोपन सुद्धा आपणच करणार आहोत अशी प्रतिक्रिया वैरागडे यांनी यावेळी दिली.

    अवश्य वाचा : चंद्रपूर शहरातील या भागात वाढतेय गुन्हेगारी

    या सर्व उपक्रमाची माहिती छबु वैरागडे यांनी मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांच्याशी सामायिक केली असून या मोहिमेत मनपाचे सहकार्य उत्कृष्ट महिला मंचाला लाभणार आहे, सदर उपक्रमाबाबत विपीन पालिवाल यांनी उत्कृष्ट महिला मंच अध्यक्ष छबु वैरागडे व सदस्यांचे कौतुक केले.

     

    प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत भाग घ्यावा यासाठी आम्ही वृक्षारोपण करीत त्या वृक्षाचे संगोपन करणाऱ्या नागरिकाला प्रोत्साहन म्हणून पुरस्कार सुद्धा देणार आहो.

     

    शहरातील अनेक भागात मोकळी जागा आहे त्या भागात हे वृक्षारोपण करण्यात येईल अशी माहिती वैरागडे यांनी दिली आहे.