Blog

  • net zero carbon emissions : शून्य कार्बन उत्सर्जन ध्येयात चंद्रपूर शहराची निवड

    net zero carbon emissions : शून्य कार्बन उत्सर्जन ध्येयात चंद्रपूर शहराची निवड

    net zero carbon emissions हवामान बदलावरील बैठकीत भारताने २०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्याचा संकल्प केला असुन यातील अंमलबजावणीच्या पहिल्या टप्यात महाराष्ट्रातील मुंबई,नवी मुंबई,पनवेल,ठाणे,अमरावती,नाशिक व चंद्रपूर शहराची निवड झाली आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात वनविभागाच्या खड्ड्यात बुडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

    net zero carbon emissions  महाराष्ट्र हे देशातील तिसरे सर्वात शहरीकरण झालेले राज्य आहे, जिथे शहरांतील मानव निर्मित सोयी सुविधांमार्गे ऊर्जेची जास्त मागणी आहे ज्याचे कारण वातानुकुलीकरण, लाइटिंग आणि इतर उपकरणे हे आहेत. ऊर्जेच्या वापरामुळे हरितगृह वायू उत्सर्जनात इमारत क्षेत्राचा मोठा वाटा आहे. भारताचे हवामान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य ठेवून उर्जेचा वापर कमी करणे आवश्यक आहे कारण कार्बन उत्सर्जन हे २०५० पर्यंत धोकादायक स्तरावर पोहचेल त्यामुळे आतापासूनच कार्य करणे गरजेचे आहे.

    अवश्य वाचा : आता 10 वि पास होणार इंजिनिअर

    सध्याच्या लोकसंख्येपैकी ३५ टक्के लोक शहरामध्ये राहतात. असा अंदाज आहे की, २०५० पर्यंत, भारताची शहरी लोकसंख्या दुप्पट झाली असेल येत्या पंधरा वर्षांत इमारत क्षेत्र हे देशातील सर्वात मोठे वीज वापरणारे क्षेत्र म्हणून उदयास येण्याची अपेक्षा आहे. रहिवासी आणि व्यावसायिक इमारतीचा वीज वापर ३१ टक्के आहे आणि तो दरवर्षी १०-१२ टक्क्यांनी वाढत आहे.भारताच्या शून्य कार्बन उत्सर्जन वचनबद्धतेचा विचार करताना शहरे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

    net zero carbon emissions   यासंबधी चंद्रपूर शहरात उपाययोजना राबविण्यासाठी आढावा बैठक आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली होती. यात कार्बन उत्सर्जन कमी करण्यास शहरातील पथदिवे बदलुन एलइडी लाइट्सचा वापर करणे, ऊर्जेचा वापर ५० टक्क्यांवर आणणे, सौर ऊर्जेसाठी रेंट अ रूफ धोरण राबविणे, बांधकामात इको फ्रेंडली विटांचा वापर करणे,खाजगी व शासकीय इमारतींवर सोलर पॅनेल बसविणे,विजेचा वापर कमी करून सौर ऊर्जेचा वापर वाढविणे, स्वयंपाकात लाकूड कोळसा या परंपरागत इंधनांचा वापर कमी करणे इत्यादी उपाययोजना राबविण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.

  • DTE Engineering Diploma Course : दहावी पास विद्यार्थी होणार इंजिनिअर

    DTE Engineering Diploma Course : दहावी पास विद्यार्थी होणार इंजिनिअर

    DTE Engineering Diploma Course दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाने म्हणजेच डीटीईने इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

    प्रवेश प्रक्रियेला बुधवार २९ मे २०२४ पासून सुरुवात झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २५ जून २०२४ आहे.

    अवश्य वाचा : स्मार्ट वीज मीटर योजना

    प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी :

    उमेदवारांनी वेळापत्रकानुसार https://poly24.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ओंलीण अर्ज सादर करावेत. उमेदवार मोबाईलद्वारे Android किंवा IOS स्टोअरवरून “DTE Diploma Admission” हे App डाउनलोड करून त्याद्वारेदेखील अर्ज भरून निश्चित करू शकतात.
    ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड / युपीआय / नेट बँकिंगद्वारे उमेदवारांना खाली नमूद केलेले अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क ना-परतावा पद्धतीचे आहे.

    अर्ज शुल्काविषयी :

    ■ महाराष्ट्र राज्यातील सर्वसाधारण प्रवर्ग, महाराष्ट्र राज्याबाहेरील (OMS), जम्मू व काश्मीर संघराज्य क्षेत्र आणि लडाख संघराज्य क्षेत्र मधून विस्थापित उमेदवार : ४०० रुपये DTE Engineering Diploma Course

    ■ फक्त महाराष्ट्र राज्यातील राखीव प्रवर्ग उमेदवार [SC, ST, VJ/DT-NT(A), NT(B), NT(C), NT (D), OBC, SBC, SEBC, EWS] आणि दिव्यांग उमेदवार : ३०० रुपये

    केंद्रिय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील महत्वाच्या तारखा :

    ● प्रवेशप्रक्रियेसाठी उमेदवारांद्वारे वेबसाइटवरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवड करून ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन कागदपत्र अपलोड करणे (महाराष्ट्र राज्य / अखिल भारतीय / जम्मू-काश्मीर व लडाख विस्थापित उमेदवारांसाठी)- २९ मे २०२४ ते २५ जून २०२४

    ● प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे १. ई-स्क्रूटनी पद्धत निवडलेल्या उमेदवारांसाठी २. प्रत्यक्ष स्क्रूटनी पद्धत निवडलेल्या उमेदवारांसाठी- २९ मे २०२४ ते २५ जून २०२४
    ● तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे- २७ जून २०२४
    ● सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी : तात्पुरत्या गुणवत्ता याद्यांमध्ये तक्रार असल्यास, त्या सादर करणे- २८ जून २०२४ ते ३० जून २०२४
    ● अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे- २ जुलै २०२४

    पात्रता निकष :

    ◆ उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
    ◆ उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डकडून SSC (10वी) परीक्षा किमान ३५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
    ◆ 2024 मध्ये SSC परीक्षा देणारे उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.

    महत्त्वाचे :

    उमेदवारांनी महाराष्ट्र तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध ऑनलाइन अर्ज फॉर्म भरावा. उमेदवारांनी अर्ज फॉर्ममध्ये निर्दिष्ट केलेले आवश्यक दस्तऐवज आणि प्रमाणपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी. DTE Engineering Diploma Course

    उमेदवारांनी दस्तऐवज पडताळणी आणि त्यांचे अर्ज फॉर्म पुष्टी करण्यासाठी नियुक्त सहाय्य केंद्रांवर भेट द्यावी. उमेदवारांनी मूळ दस्तऐवजांसह स्व:साक्षांकित छायांकित प्रत एक संच पडताळणीसाठी आणावे. DTE Engineering Diploma Course

    पदभरती : महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात पदभरती

    उमेदवारांनी SSC परीक्षेत मिळविलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
    गुणवत्ता यादी आणि उमेदवारांनी भरलेल्या पर्यायांच्या आधारे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (CAP) मार्फत आसन वाटप केले जाईल.

    महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार प्रवेश प्रक्रियेसाठी आरक्षण धोरणे लागू होतील. राखीव श्रेणीतील उमेदवारांनी अर्ज प्रक्रियेदरम्यान वैध श्रेणी प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

  • Forest Department Chandrapur : वनविभागाचा तो खड्डा जीवघेणा ठरला

    Forest Department Chandrapur : वनविभागाचा तो खड्डा जीवघेणा ठरला

    Forest Department Chandrapur चंद्रपूर शहरातील लालपेठ भागात 15 वर्षीय मुलाचा वनविभागाच्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 2 जून ला घडली. मृतक मुलाचे नाव 15 वर्षीय तनविर शेख रहमान असे असून तो मेजर गेट दुर्गापूर येथे राहणारा होता.

    अवश्य वाचा : स्मार्ट वीज मीटर योजना काय आहे?

    Forest Department Chandrapur आज दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास मृतक तनविर शेख हा आपल्या मित्रांसोबत 16 वर्षीय आर्यन साईनाथ यलगमवार रा. दादमहल, 16 वर्षीय कृष्णा जितेंद्रकुमार साहू रा.भिवापूर व 20 वर्षीय सकलेन हमीद खान पठाण, भिवापूर हे चौघे आपल्या 2 दुचाकीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय समोरील लालपेठ जाणाऱ्या मार्गावरील असलेल्या बंकर जवळ गाडी धुण्यासाठी गेले.

     

    त्यानंतर जवळ असलेल्या वनविभागाच्या खड्ड्यात तनविर पोहण्यासाठी गेला, तनविर सोबत आर्यन व कृष्णा हे दोघे त्या खड्ड्यात उतरले, मात्र सकलेन ने त्यांना खड्ड्यात जाऊ नका असे सांगितले होते.

     

    मात्र तिघांनी सकलेन चे म्हणणे ऐकले नाही, काही वेळात आर्यन व कृष्णा दोघे परत आले मात्र तनविर बाहेर आला नसल्याने तिघांची घाबरगुंडी उडाली, त्यांनी मदतीसाठी अनेकांना बोलाविले.

    अवश्य वाचा : चंद्रपूर लोकसभा एक्जिट पोल

    Forest Department Chandrapur लालपेठ परिसरातील नागरिक काही वेळात त्याठिकाणी जमा झाले, पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आली असता शहर पोलीस त्याठिकाणी दाखल झाले, तनविर चा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले, पथक प्रमुख अशोक गरगेलवार यांनी बोटीच्या साहाय्याने तनविर चा शोध केला, तब्बल 2 तासांनी पोलिसांच्या बचाव पथकाला यश मिळाले. तनविर चा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

     

    मृतदेह बाहेर काढल्यावर तनविर च्या कुटुंबाने टाहो फोडला, तनविर हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

     

    Forest Department Chandrapur याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगामकर यांच्याशी सम्पर्क साधला असता त्यांनी त्या खड्ड्याबाबत माहिती दिली की त्याठिकाणी गवत विकास केंद्र सुरू होणार होते मात्र काही दिवसांपूर्वी तो प्रकल्प रखडला, त्या प्रकल्पासाठी वनविभागाच्या जागेवर आम्ही काम केले, आता त्याच ठिकाणी भारत माता प्रकल्प सुरू होत आहे, ज्या खड्ड्यात तनविर चा मृत्यू झाला, त्यामध्ये वेकोलीच्या खाणी चे पाणी आम्ही खड्ड्यात सोडले.

     

    जंगलाला तो भाग लागून असल्याने पाण्याच्या शोधात असलेले जनावरे त्याठिकाणी पाणी प्यायला यायचे, मात्र काही दिवसांपासून काही टवाळखोर वनविभागाच्या त्या खड्ड्याजवळ पोहण्यासाठी येत होते, आम्ही अनेकदा त्यांना हाकलून लावले, नंतर सुरक्षिततेसाठी आम्ही त्या परिसरात फेंसिंग लावली, मात्र 2 दिवसात फेंसिंग चोरीला गेली.

     

    आता भारत माता हा प्रकल्प त्याठिकाणी सुरू होत आहे, खड्ड्यात साचलेलं पाणी आम्ही तिथे लावण्यात येणाऱ्या वृक्षांना देणार होतो.
    सदर घडलेली घटना ही दुःखद आहे, त्या ठिकाणी बाहेरचे कुणी यायला नको यासाठी ठोस उपाययोजना काही दिवसात करण्यात येईल. अशी प्रतिक्रिया वनपरिक्षेत्र अधिकारी नायगामकर यांनी दिली.

  • Young chanda brigade : चंद्रपुरात सत्कार गुणवंतांचा

    Young chanda brigade : चंद्रपुरात सत्कार गुणवंतांचा

    Young chanda brigade सीबीएससी व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत इयत्ता १० वी आणि १२ वी चा  निकाल नुकताच जाहीर झाला असून यात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने 9 जुन २०२4 रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे सायंकाळी 5 वाजता सत्कार कार्यक्रमाचे आयोजन आले आहे.

    अवश्य वाचा : आता तुमचे वीज मीटर होणार स्मार्ट

    सदर कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार. या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

     

    Young chanda brigade दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा 10 वी आणि 12 वीच्या परिक्षेत यश संपादन करणा-या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन यंग चांदा ब्रिगेडच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या सत्कार कार्यक्रमात 12 वी च्या परीक्षेत 75 टक्के च्या वर गुण प्राप्त करणाऱ्या आणि 10 वी च्या परिक्षेत 80 टक्के च्या वर गुण प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपुरात या मृतदेहाची ओळख पटेना

    यासाठी सदर गुणवंत विद्यार्थ्यांना जैन भवन जवळील आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात दि. 8 जून २०२4 पर्यंत गुणपत्रिकेची प्रत जमा करावी किंव्हा  https://bit.ly/4bF3655 या संकेत स्थळावर नोंदणी करून घ्यावी असे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

    Janta college chandrapur
    जनता करिअर लॉन्चर आजच प्रवेश घ्या….

    Young chanda brigade सदर कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक वृंद, शाळा संस्थापक अध्यक्ष तसेच महानगरातील विविध क्षेत्रातील नागरिक व शिक्षण क्षेत्राशी निगडीत मान्यवर व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

  • smart prepaid electricity meters : काय आहे स्मार्ट वीज मीटर योजना?

    smart prepaid electricity meters : काय आहे स्मार्ट वीज मीटर योजना?

    smart prepaid electricity meters

    काय आहे ही योजना?

    भारत सरकारने वीज चोरी आणि वाढीव बिलांची समस्या लक्षात घेऊन ‘स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिसिटी मीटर योजना’ सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश फक्त वीज चोरीवर नियंत्रण ठेवणे नाही तर जे ग्राहक वेळेवर बिल भरू शकत नाहीत त्यांना देखील हा एक चांगला पर्याय आहे. महाराष्ट्रात ही योजना लवकरच लागू होणार आहे, जिथे महावितरण वीज ग्राहकांच्या विद्यमान मीटरला स्मार्ट प्रीपेड मीटरने बदलले जाईल.

    अवश्य वाचा : समाज कल्याण विभागात पदभरती

     सध्या काय स्थिती?

    सध्या महावितरणच्या माध्यमातून वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर दिले जात आहेत. या मीटरमध्ये मासिक वीज वापराचे नियमित वाचन महावितरणच्या स्थायी किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांना द्वारे केले जाते. त्या आधारावर ग्राहकांना बिल पाठवले जाते.

     

     स्मार्ट प्रीपेड मीटरची कार्यप्रणाली

    smart prepaid electricity meters स्मार्ट प्रीपेड मीटर ‘मोबाइल’ रिचार्ज सारखे काम करते. ग्राहकांना जेवढी वीज हवी आहे तेवढेच पैसे भरावे लागतील. या मीटरमध्ये ग्राहक आपला वीज वापर आपल्या मोबाइल फोनवरील अॅपद्वारे बघू शकतात. तसेच, वीज वापरासाठी कुठूनही रिचार्ज करता येईल, ज्यामुळे ग्राहक वीज खपत कमी करू शकतील.

    अवश्य वाचा : राज्यातील मुलींना आता उच्चशिक्षण मिळणार मोफत

     स्मार्ट प्रीपेड मीटरचे वैशिष्ट्ये

    ग्राहक आपल्या वीज वापराची माहिती त्वरित आपल्या मोबाइल फोनवर पाहू शकतात. यामुळे त्यांना आपला वापर नियंत्रित करण्यास आणि अनावश्यक वीज खर्च कमी करण्यास मदत होईल.

    ऑनलाइन रिचार्जची सुविधा

    smart prepaid electricity meters ग्राहक घरबसल्या आपल्या मोबाइल फोनवरून वीज खपतसाठी रिचार्ज करू शकतात. ही सुविधा त्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे जे व्यस्त असतात आणि वीज कार्यालयात जाऊन वीज बिल भरू शकत नाहीत.

    महत्त्वाचे : 12वी नंतर काय करावे? अवश्य वाचा

     स्वयंचलित वीज कट होणार

    वर्तमान प्रणालीमध्ये जर वीज बिल वेळेवर भरले नाही तर वीज पुरवठा बंद केला जातो. नव्या प्रणालीमध्ये ग्राहकांना प्रथम रिचार्ज करावे लागेल आणि तेवढीच वीज मिळेल जितके पैसे त्यांनी विजेसाठी रिचार्ज केले आहेत. पैसे संपल्यानंतर वीज पुरवठा स्वयंचलितरित्या बंद होईल.

     

     जागरूकता आणि पारदर्शकता

    स्मार्ट मीटर ग्राहकांना त्यांच्या वीज वापराबद्दल अधिक जागरूक करतात. ग्राहक अॅपद्वारे हे पाहू शकतात की किती वीज वापरली आहे आणि किती पैसे शिल्लक आहेत.

     

     महावितरण आणि स्मार्ट प्रीपेड मीटर

    smart prepaid electricity meters महावितरण, महाराष्ट्राची प्रमुख वीज वितरण कंपनी, या योजनेअंतर्गत सर्व ग्राहकांचे मीटर स्मार्ट प्रीपेड मीटरने बदलेल. हा निर्णय फक्त ग्राहकांना सोयीचा होईल असे नाही, तर वीज चोरी आणि जास्त बिलांची समस्या देखील नियंत्रित होईल.

     

     मॅन्युअल रीडिंगची समाप्ती

    पारंपरिक मीटरमध्ये मॅन्युअल रीडिंग आवश्यक असते, ज्यामुळे वेळ आणि साधनांचा अपव्यय होतो. स्मार्ट मीटर रिअल-टाइम डेटा पाठवतात, ज्यामुळे मॅन्युअल रीडिंगची आवश्यकता संपुष्टात येइल.

     

    वीज चोरीवर नियंत्रण

    स्मार्ट मीटरची एक प्रमुख विशेषता म्हणजे हे वीज चोरीवर नियंत्रण ठेवतात. पारंपरिक मीटरच्या तुलनेत, स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करण्याची शक्यता कमी असते. 

     

     प्रारंभिक खर्च

    स्मार्ट प्रीपेड मीटरच्या स्थापनेची प्रारंभिक खर्च पारंपरिक मीटरच्या तुलनेत अधिक असू शकतो. तथापि, दीर्घकालीन फायद्यांच्या दृष्टिकोनातून हा खर्च योग्य असे जाणकारांचे मानणे आहे.

     

     तांत्रिक समस्या

    स्मार्ट मीटर मध्ये तांत्रिक समस्या येऊ शकतात, जसे की नेटवर्क कनेक्टिविटी समस्या. या समस्यांच्या निराकरणासाठी महावितरण तांत्रिक सहाय्य आणि उपाय पुरवेल.

    Janta collage

     निष्कर्ष

    smart prepaid electricity meters केंद्र सरकारची ‘स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिसिटी मीटर योजना’ एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्यामुळे वीज चोरी आणि जास्त बिलांची समस्या सोडवण्यास मदत होईल त्यामुळे ग्राहकांना अनेक फायदे मिळतील. महाराष्ट्रात या योजनेच्या अंमलबजावणीमुळे महावितरणच्या ग्राहकांना एक नवीन आणि उत्कृष्ट सेवा मिळेल. स्मार्ट प्रीपेड मीटरच्या स्थापनेमुळे वीज वितरणात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल, तसेच ऊर्जा संरक्षण आणि पर्यावरण सुरक्षा देखील होईल.

  • Chandrapur city police : मृतदेहाची ओळख पटेना

    Chandrapur city police : मृतदेहाची ओळख पटेना

    Chandrapur city police चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेट परिसरात 25 मे ला रात्री 9 वाजेदरम्यान एका अज्ञात इसमाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता.

    अवश्य वाचा : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत हा उमेदवार आघाडीवर, एक्जिट पोल आला समोर

    मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी त्याची ओळख पटविणे सुरू केले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

    6 दिवस लोटल्यावर सुद्धा त्या मृतदेहाची ओळख अजूनही पटलेली नाही.

     

    Chandrapur city police मृतदेहाचे वर्णन – उंची 5 फूट, रंग – सावळा, अंगात गुलाबी कलरची टी-शर्ट त्यावर काळा पट्टा, दोरीने बांधलेला काळा पॅन्ट परिधान करून असलेला.

    महत्त्वाचे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी साठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन सज्ज

    याबाबत शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मंगेश मोहोड पुढील तपास करीत आहे.

     

    सदर मृतदेहाबाबत कुणाला काही माहिती असल्यास शहर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • Lok Sabha Exit Poll : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत हा उमेदवार आघाडीवर

    Lok Sabha Exit Poll : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत हा उमेदवार आघाडीवर

    Lok Sabha Exit Poll देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे 2 दिवस बाकी असताना विविध एजन्सीने आपला पोल जाहीर केला आहे.

    अवश्य वाचा : 101 टेबलावर होणार चंद्रपूर लोकसभेची मतमोजणी

    Lok Sabha Exit Poll या पोल मध्ये इंडिया आघाडी व भाजप मध्ये टक्कर बघायला मिळत आहे, मात्र चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या जागेवर समोर कोण आहे. असा प्रश्न सर्वांना पडला आहे, अश्यात tv9 मराठी ने महाराष्ट्र राज्याच्या पोल जाहीर केला आहे.

     

    यामध्ये इंडिया आघाडी समोर तर भाजप देशात मागे दिसत आहे, चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत कांग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांची आघाडी दर्शविली आहे,  महाविकास आघाडी ला 25 तर महायुती 22 व अपक्ष 1 जागा महाराष्ट्र राज्यात जिंकत आहे. यामध्ये भाजप 18, शिवसेना शिंदे 4, राष्ट्रवादी अजित पवार 0, कांग्रेस 5, शिवसेना ठाकरे गट 14, शरद पवार राष्ट्रवादी 6 जागेवर विजय मिळणार.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील धोकादायक झाडं

    हा सध्या अंदाज असून 4 जून रोजी निकाल जाहीर झाल्यावर चित्र स्पष्ट होणार आहे.

  • Chandrapur loksabha election counting : चंद्रपूर जिल्हाप्रशासन मतमोजणीसाठी सज्ज

    Chandrapur loksabha election counting : चंद्रपूर जिल्हाप्रशासन मतमोजणीसाठी सज्ज

    Chandrapur loksabha election counting निवडणूक प्रक्रियेमधील अतिशय महत्वाचा समजला जाणारा मतमोजणीचा टप्पा, येत्या मंगळवारी (4 जून) होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाची युध्द पातळीवर तयारी सुरू आहे. मतमोजणी करीता प्रशासन पूर्णपणे सज्ज असून या व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी वखार महामंडळाच्या गोडाऊन येथील स्ट्राँग रुमसह मतमोजणी केंद्राची पाहणी केली व सूचना दिल्या.

    13- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल 2024 रोजी पार पडली. जवळपास दीड महिन्यांच्या कालावधीनंतर येत्या 4 जून रोजी पडोली एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोडावून येथे मतमोजणी होणार आहे. या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी मतमोजणी केंद्राला भेट दिली. प्रत्यक्ष मतमोजणीकरीता येथे असलेल्या एकूण टेबलची व्यवस्था, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधींच्या बसण्याची व्यवस्था, लावण्यात आलेले बॅरेकेटींग, सीसीटीव्ही, विद्युत व्यवस्था, ईव्हीएम असलेल्या स्ट्राँगरूमचा मार्ग, सुरक्षा व्यवस्था, मिडीया सेंटर आदींचा त्यांनी आढावा घेतला. तसेच संबंधितांना सुचनाही केल्या.

    Janta college chandrapur

    Chandrapur loksabha election counting यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे,  उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, अजय चरडे, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी सतीश खडसे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    अवश्य वाचा : महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात पदभरती

      मतमोजणीकरीता एकूण टेबल व फे-यांची संख्या : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघासाठी (ईव्हीएम मतमोजणी) प्रत्येकी 14 टेबल याप्रमाणे एकूण 84 टेबल, टपाली मतपत्रिका मोजण्याकरीता 9 टेबल आणि ईटीपीबीएमएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) मोजण्याकरीता 8 टेबल असे एकूण 101 टेबल राहणार आहेत. तसेच राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या 24 फे-या, चंद्रपूर – 28, बल्लारपूर – 26, वरोरा – 25, वणी – 25, आणि आर्णि मतदारसंघाच्या मतमोजणीच्या 27 फे-या होणार आहेत.

     

    नियुक्त कर्मचा-यांची संख्या : प्रत्यक्ष मतमोजणी करीता आणि अतिरिक्त स्टाफ धरून 120 टक्के याप्रमाणे एकूण 379 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात मतमोजणी पर्यवेक्षकांची संख्या 122, मतमोजणी सहायक 140 आणि सुक्ष्म निरीक्षकांची संख्या 117 आहे.  Chandrapur loksabha election counting

    मतमोजणी केंद्रावर नियुक्त सुरक्षा व्यवस्था : मतमोजणी आवाराच्या / परिसराच्या सभोवताली 100 मीटर परिघापासून राज्य पोलिस, मतमोजणी आवाराच्या प्रवेशद्वारावर राज्य सशस्त्र पोलिस आणि मतमोजणी कक्षाच्या द्वाराजवळ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपुरातील हे दुकान होणार सील

    मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तुंना प्रतिबंध : मतमोजणी केंद्रात मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप, आयपॅड, तसेच कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुध्दा केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल, कॅमेरा मिडीया सेंटर येथे जमा करावा लागेल.

    उमेदवार / प्रतिनिधींना अत्यावश्यक सुचना : मतमोजणी परिसरात तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था असल्याने प्रत्यक्ष मतमोजणी स्थळी एकदाच प्रवेश दिला जाईल, परिसर सोडल्यास पुन्हा प्रवेश नाकारण्यात येईल. उमेदवार / उमेदवारांचे प्रतिनिधींनी आपले मोबाईल / इलेक्ट्रॉनिक संयत्रे जमा करणे बंधनकारक राहील.

    Chandrapur member of parliament

    कोण होणार खासदार ?

    दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनांनंतर चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीत कांग्रेस पक्षातर्फे आमदार प्रतिभा बाळू धानोरकर ह्या मैदानात असून त्यांच्या समोर 2 वेळा लोकसभा लढलेले व 5 वेळा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचं आव्हान होत, आता या अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार हे 4 जून ला कळेल.

  • Old pension latest news : जुन्या पेन्शनबाबत स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करा – आमदार अडबाले

    Old pension latest news : जुन्या पेन्शनबाबत स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करा – आमदार अडबाले

    Old pension latest news वित्त विभागाच्‍या २ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार १ नोव्‍हेंबर २००५ रोजी किंवा त्‍यानंतर रूजू झालेल्‍या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे. याबाबत सर्व विभागाने जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा स्‍वतंत्र शासन निर्णय निर्गमित करावा, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे केली आहे.

    महत्त्वाचे : 1 जूनपासून या नियमात बदल

    १ नोव्‍हेंबर २००५ रोजी किंवा त्‍यानंतर रूजू झालेल्‍या शिक्षक – राज्‍य कर्मचाऱ्यांना old pension scheme लागू करण्यासाठी आमदार सुधाकर अडबाले हे आंदोलने, पाठपुरावा करीत आहेत. वित्त विभागाच्‍या २ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार दि. ०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्‍या प्रकरणी शासन सेवेत दि. ०१.११.२००५ रोजी किंवा त्‍यानंतर रूजू झालेल्‍या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे. Old pension latest news

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील धोकादायक झाडं

    परंतु, अजूनही जिल्‍हा परिषद / नगर पालिका / महानगरपालिका / खासगी अनुदानित / अंशतः अनुदानित शाळेत कार्यरत शिक्षक – कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णय लागू झालेला नाही. त्‍यामुळे सदर कर्मचाऱ्यांत तीव्र असंतोष आहे. Old pension latest news

    वित्त विभागाने दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी काढलेल्‍या जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय नगर विकास, ग्रामविकास व शालेय शिक्षण विभागासोबतच सर्व विभागाने स्‍वतंत्र काढण्याची आग्रही मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्‍याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच येत्‍या पावसाळी अधिवेशनात सदर मुद्द्यावर प्रश्‍न उपस्‍थित करून मागणी आमदार अडबाले लावून धरणार आहेत.

  • These rules will change from June 1 : 1 जून पासून या महत्वाच्या नियमात होणार बदल

    These rules will change from June 1 : 1 जून पासून या महत्वाच्या नियमात होणार बदल

    These rules will change from June 1 दर महिन्याला विविध विभागाच्या काही नियमात बदल करण्यात येतो, हे होणारे बदल सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम नक्कीच करतात तर काही नियम दिलासा देण्याचे काम करतात, 1 जून पासून देशात काही महत्वाच्या नियमात बदल होणार आहे.

    Janata college chandrapur

    त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया…

    आरबीआयने जारी केलेल्या बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार, जूनमध्ये बँका 10 दिवस बंद राहणार आहे.

    अवश्य वाचा : महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागात पदभरती

    These rules will change from June 1 ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवीन नियम जाहीर झाले असून 1 जून 2024 पासून तुम्ही RTO ऐवजी खाजगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांवर चाचणी देऊ शकणार आहात. या केंद्रांना परवाना पात्रतेसाठी चाचण्या घेण्यासाठी आणि प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी अधिकृत करण्यात येणार आहे.

    अवश्य वाचा : राज्यातील मुलींना उच्चशिक्षण मोफत

    These rules will change from June 1 त्याशिवाय वाहतूक नियमाबद्दल झाले आहे. वेगाने वाहन चालवल्यास दंड ₹ 1,000 ते ₹ 2,000 च्या दरम्यान असेल. मात्र, जर एखादा अल्पवयीन वाहन चालवताना पकडला गेला तर त्याला ₹25,000 इतका मोठा दंड द्यावा लागणार आहे. तर वाहन मालकाची नोंदणी रद्द करण्यात येईल. तर अल्पवयीन व्यक्ती 25 वर्षांची होईपर्यंत परवान्यासाठी अपात्र असेल. पुुुणे अपघात घटनेनंतर सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे, या नियमामुुळे अल्पवयीन चालकांना पालक वाहन देणार नाही.

     

    आता तुम्ही 14 जूनपर्यंत आधार कार्ड ऑनलाइन मोफत अपडेट करु शकणार आहात. पण जर तुम्ही ते ऑफलाइन करणे निवडल्यास तर तुम्हाला प्रत्येक अपडेटसाठी ₹50 द्यावे लागणार आहेत.

    महत्वाची बातमी : 12 वी पास झाला, तर ह्या कोर्सची करा निवड

    These rules will change from June 1 एलपीजी सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला अपडेट होतात. येत्या 1 जूनला तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर करतील. मे महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी झाल्या होत्या आणि जूनमध्ये पुन्हा सिलिंडरच्या किमती कमी केल्या जातील असा अंदाज व्यक्त करण्यात येतो.

     

    ऑइल मार्केटिंग कंपन्या एअर टर्बाइन इंधन (ATF) आणि CNG-PNG च्या किमती देखील बदल होणार आहे. अशा परिस्थितीत, 1 जूनला त्यांच्या नवीन किंमती जाहीर होतील. पेट्रोल व डीझल च्या किमतीबाबत माहिती समोर आली नाही.

     

    SBI क्रेडिट कार्डचे नियम 1 जून 2024 पासून बदलणार असून SBI काही क्रेडिट कार्डांसाठी सरकारी संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट लागू होणार नाहीत, असं सांगितलंय. यामध्ये स्टेट बँकेचे : विविध कार्ड्स चा समावेश असणार आहे.

    `• AURUM,`

    `• SBI Card ELITE`

    `• SBI Card ELITE`

    `• Advantage आणि SBI Card Pulse`

     `• SimplyCLICK SBI कार्ड,` 

    `• SBI कार्ड (SBI Card Prime)`

     `• SBI कार्ड प्राइम (SBI Card PRIME) यांचा समावेश आहे.